विनोबाजींच्या शिक्षणपध्दतीची आवश्यकता
आजच्या परिस्थितीमध्ये जे जे प्रश्न उभे
आहेत त्याचे एकमेव
कारण अज्ञान हेच
आहे. आजच्या तरूणाचे
जीवन दिशाहीन आहे. कारण
आज त्याला ज्ञान
देण्या ऐवजी शिक्षण
(पैसे मिळविण्याचे) दिले जात
आहे. हे ज्ञान
कीती हीनतेचे आहे हे पाश्चात्यांनी आपल्यावर बिंबवून, बिंबवून सांगितले कारण त्यांना
त्या ज्ञानाची किंमत समजली
होती परंतू त्यांना
आपल्याला अज्ञानीच ठेवायचे होते कारण
त्यातच त्यांचा स्वार्थ होता. आजच्या
भयाण परिस्थितीचे मूळ कारण
काय आहे याचा
विचार मी सतत करतो. दोनशे
वर्षांपुर्वीचा भारतीय नागरिक
व आजचा नागरिक
यामध्ये मनाची संकुचितता,
स्वार्थीपणा कोठून आला?
उत्तर आहे. आजची
शिक्षणपध्दती
ही शिक्षणपध्दती भारतामध्ये सुरू करणायाचेच
लॉर्ड मेकॉलेचे शब्द आहेत--येथे
भारतामध्ये दुराचार नाही, भ्रष्ट्राचार
नाही, हा सर्व
येथील संस्कृतीचा परिणाम आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या (पाश्चात्य) संस्कृतीचा प्रसार केला
पाहिजे. गुरूकुल पध्दती नष्ट
करून शाळापध्दती अंमलात आली
पाहिजे. आणि परिस्थिती
हळूहळू बदलत गेली.
१९४७ पर्यंत आपण
पारतंत्र्यात होतो, परंतू
स्वतंत्र झाल्यावर सुध्दा शाळापध्दतीच
चालू आहे. कारण
त्याची आपल्याला सवय झाली.
चटक लागली. शाळा
शिकला तर मोठ्या
पगाराची नोकरी, मान,
सन्मान वगैरे....
महाराष्ट्र राज्य मराठी
विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रसिध्द केलेल्या मराठी विश्वकोशामध्ये
स्पष्ट उल्लेख आहे,--
मेकॉलेला प्राचीन भारतीय वाङमय,
शास्त्रे टाकाऊ वाटत
होती. भारतासारख्या बहुभाषीक देशातील कारभारात एकसूत्रीपणा आणण्यासाठी इंग्रजी भाषा सोयीची
असा आग्रह मेकॉलेने
धरला होता. या
देशातील जनता आणि
तिच्यावर राज्य करणारे
आपण यांच्यातील दुभाषांचा एक वर्ग
इंग्रजी शिक्षणातून उभा राहील.
हे लोक रक्ताने,
वर्णाने भारतीय असले
तरी त्यांची अभिरूची, त्यांची मते, विचारपध्दती
इंग्रजी असेल अशी
अपेक्षा मेकॉलेची या शिक्षणपध्दती
बद्दलची होती. ही
शिक्षणपध्दती आपल्या देशामध्ये
१८३५ पासून आजतागायत
सुरू आहे. त्याचे
दुष्परिणाम आपण सर्वजण
भोगतो आहे हे सुर्यप्रकाशा इतके सत्य
आहे.
ही शिक्षणपध्दती
दोषी आहे म्हणून
अनेकांनी त्यामध्येच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर
काही महाभागांनी ही शिक्षणपध्दती
लाभदायी आहे म्हणून
त्याची प्रशंसा केली, परंतू
शासन पातळीवर केणीही ही
मेकॉले-शिक्षणपध्दती बंद करून
आपली गुरूकुल पध्दती पुन्हा
प्रस्थापित केली नाही.
या प्रचलीत शिक्षणपध्दती विषयी आपल्या
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात,
-- शिक्षणाला शुध्द चारित्र्याची
बैठक नसेल तर
त्या शिक्षणाची किंमत शून्य
आहे. त्या शिक्षणाला
सत्यनिष्ठेचा व शुध्दतेचा
भरभक्कम आधार नसेल
तर ते कुचकामी
ठरेल. आपल्या जीवनातील
व्यक्तीगत शुध्दता, पावित्र्य यांकडे शिक्षकांचे
लक्ष नसेल तर
शिक्षकांचा नाश होईल.
केवळ शिक्षकांच्या पांडित्याला काही किंमत
नाही.
तरी समृध्द भारतासाठी,
विश्व-कल्याणासाठी आज विनोबाजींच्या
शिक्षणपध्दतीची अत्यंत आवश्यकता
आहे. त्यामुळेच स्वावलंबन, सेवावृत्ती, शिक्षकांचे मुल्य, राष्ट्रभक्ती,
संस्कारमुल्य, व्यसनमुक्ती, दारूबंदी, व्यवहारज्ञान, कृषीमुल्य, कलेचा विकास,
मानवता मुल्य, इत्यादी
अनेक विचारांना आचरणाची दिशा मिळेल,
व भारतामध्ये ख-या अर्थाने
सुखसमृध्दी नांदेल व
विश्वामध्ये शांती-समाधान प्रस्थापित होऊ शकेल.
इतकी प्रंचड ताकद
विनोबाजींच्या शिक्षणपध्दतीमध्ये आहे.
No comments:
Post a Comment