Friday, 15 December 2017

महात्मा जोतीबा फुले यांना अभिप्रेत असलेली शिक्षणपध्दती



महात्मा  जोतीबा  फुले  यांना  अभिप्रेत  असलेली  शिक्षणपध्दती

महात्मा  जोतीबा  फुले  हे  भारताच्या  आधुनिक  काळातील  मानवतावादी  संस्कृतीचे  एक  आद्य  प्रवर्तक  होते.  समाज  सुधारक  म्हणून  त्यांचे  नांव  हिंदुस्थानच्या  इतिहासामध्ये  सुवर्ण  अक्षरामध्ये  कोरले  गेले  आहे.  जोतीबांना  अभिप्रेत  असलेल्या  शिक्षणपध्दतीचा  विचार  करण्यासाठी  त्यांच्या  काळातील  सामाजिक  परिस्थितीचा  आढावा  घेतला  पाहिजे.
जोतीबांचा  काळ  हा  साधारणपणे  सन  १८२७  पासून  १८९०  पर्यंतचा  आहे.  त्या  काळामध्ये  महाराष्ट्रामध्ये  पेशवाईचा  अस्त  होऊन  इंग्रजी  राजवट  चालू  होती.  सर्वत्र  ब्राह्मणवर्णाची  मक्तेदारी  असून  शूद्रांस  हीनतेची  वागणूक  मिळत  असे.  शिक्षणक्षेत्रामध्ये  तसेच  इंग्रजी  राजवटीमधील  सरकारी  नोकयांमध्ये  सुध्दा  ब्राह्मण  वर्णाचेच  वर्चस्व  होते.  अशी  सामाजिक  विषमता    उच्चनीचता  धर्माच्या  नावाखाली  जोपासली  जात  होती.  थोडक्यात  ब्राह्मणी  वर्चस्व,जातिभेदातील  उच्चनीचतेचा  अंमल,  धर्मसंस्थेच्या  छत्राखाली  अज्ञान    भोळेपणा  यांनी  भरलेल्या  कल्पनांचे  प्रस्थ,  अंधश्रध्देने  पाठिंबा  दिलेल्या  मौख्यपुर्ण  चालिरीती  इत्यादी  समाजातील  दोष  या  ऐतिहासिक  पार्श्वभूमीवर  सामाजिक  परिस्थितीचा  परिणाम  जोतीबांच्या  मनावर  खोल  घर  करून  राहीला.
ही  सामाजिक  विषमता  दूर  करण्यासाठी  समतेवर  आधारलेल्या  आधुनिक  शिक्षण  पध्दतीचा  अवलंब  करण्यास  जोतीबांनी  सुरवात  केली.  ते  म्हणतात  धर्माशी  प्रत्यक्ष  संबंध  नसलेले  आधुनिक  शिक्षण  हाच  खरा  समाजाच्या  सर्वांगीण  विकासाचा  पाया  आहे.खेड्यातील  बहुसंख्य  सामान्य  जनतेसा  शिक्षण  देऊन  तीला  नैतिक  आणि  भौतिक  दृष्ट्या  उच्च  पातळीवर  आणल्या  शिवाय  आणि  त्या  समाजामध्ये  सामाजिक  दायीत्वाची  जाणिव  निर्माण  केल्या  शिवाय  हिंदुस्थानचा  उध्दार  होणार  नाही  असे  जोतीबांचे  ठाम  प्रांजळ  मत  होते.  सन  १८८२  मध्ये  हिंदुस्थानातील  शिक्षण  विषयक  प्रश्नांसंबंधी  इंग्रजी  सरकारने  वुइल्यम  हंटर  यांना  अध्यक्ष  करून  एक  मंडळ  नेमले  होते.  या  मंडळाला  जोतीबांनी  लेखी  निवेदन  देऊन  आपले  आधुनिक  शिक्षण  पध्दतीचे  विचार  कळविले.  त्याचा  थोडक्यात  गोषवारा  पुढील  प्रमाणे  आहे.  त्यामधून  त्यांना  अभिप्रेत  असलेल्या  शिक्षणपध्दतीचा  अंदाज  येतो.
सरकारने  कनिष्ठ  वर्गातील  लोकांच्या  शिक्षणाची  आबाळ  केलेली  आहे.  उच्च  वर्गामध्ये  अनुकूल  शिक्षण  पध्दतीमुळे  सर्व  सरकारी  वरिष्ठ  जागांवर  ब्राह्मण  वर्गाची  मक्तेदारी  झालेली  आहे.  तरी  सरकारने  जनतेच्या  प्राथमिक  शिक्षणाकडे  आधिक  लक्ष  दिले  तर  नितीने    वागणूकीने  बरेच  चांगले  लोक  सरकारी  वरिष्ठ  जागांवर  नोकरी  करण्यासाठी  शिकून  तयार  होतील.  समाजातील  प्रत्येक  घटकाला  शिक्षणाची  गोडी  लागणे,  आवड  निर्माण  होणे  यासाठी  प्राथमिक  शिक्षणाकडे  आधिक  लक्ष  केंद्रित  करणे  आवश्यक  आहे.  एकदा  शिक्षणाची  आवड  निर्माण  झाल्यावर  त्याच्या  उच्च  शिक्षणाची  सोय  करण्याची  गरज  उरत  नाही  कारण  तो  स्वतः  ती  संधी  शोधू  लागतो  त्यासाठी  सरकारने  प्रयत्न  करण्याची  जरूरी  नाही.  कनिष्ठ  वर्गातील  लोकांच्या  शिक्षणासाठी  सरकारला  जास्त  प्रयत्न  करावे  लागतील  कारण  या  वर्गातील  लोकांची  मुले  त्यांच्या  घरी  गुरे  राखण्यासाठी,  शेती  करण्यासाठी  गुंतली  गेलेली  असतात.  म्हणून  त्यांना  शिक्षणाची  आवड  निर्माण  करण्यासाठी  शिष्यवृत्या,  बक्षिसे  यांची  प्रलोभने  देऊन  त्यांच्यामध्ये  शिक्षणाची  आवड  निर्माण  करावी.  तसेच  सुमारे  वयाच्या  बारा  वर्षांपर्यंत  सर्वांना  शिक्षण  सक्तीचे  करण्यात  यावे.  जातीभेदाच्या  रूढ,  अनिष्ट  चालारिती  नुसार  ब्राह्मणा  शेजारी  कनिष्ठ  वर्गातील  मुलगा  बसू  शकत  नसल्यामुळे  सरकारने  कनिष्ठ  वर्गातील  लोकांसाठी  वेगळ्या  शाळा  सुरू  कराव्यात.  शिक्षणाचा  अभ्यासक्रम  विद्यार्थाच्या  भावी  आयुष्यमध्ये  उपयोगी  होणारा,  व्यवहार  उपयोगी  असला  पाहिजे.  प्रचलित  शिक्षण  पध्दती  तसेच  शिक्षक  यंत्रणा  यामध्ये  सुधारणा  झाली  पाहिजे.  कारण  ती  पध्दती  सर्वसामान्याच्या  जीवनाच्या  दृष्टीने  अव्यवहार्य    अयोग्य  आहे.  मुलांच्या  भावी  स्वतंत्र  जीवनाला  समर्थ  करू  शकेल  असे  ते  शिक्षण  नाही.  याच  प्रमाणे  मूलींचे  शिक्षण  मोठ्या  प्रमाणामध्ये  सुरू  होण्यासाठी  उपाय  योजना  अंमलात  आणावी.  शिक्षकांच्या  नोकरीचे  नियम    अटी  आधिक  सोईच्या    स्वास्थदायी  कराव्यात.  त्यांच्या  पगारामध्ये  वाढ  करण्यात  यावी  कारण  शिक्षकच  असमाधानी  असेल  तर  तो  मुलांना  तोकडेच  शिकविणार  त्यामुळे  ती  मुले  आळशी,  कामचूकार  बनतात  हे  भयंकर  धोक्याचे  आहे.  म्हणून  शिक्षकवर्ग  समाधानी  असावा.  त्याने  अध्यापनशास्त्राची  परिक्षा  दिलेली  असली  पाहिजे.  त्याचे  वर्तन  नीतीमुल्यांवर  आधारलेले  असावे.  तरच  मुलांवर  तसे  संस्कार  होऊ  शकतील.  तसेच  शिक्षक  मुलांच्या  गरजा,  भावना,  आवडी-निवडी  जाणणारा  असावा.  तरच  तो  त्यांची  मने  जाणून  त्यांच्यावर  नैतिक    हितकर  परिणाम  करू  शकतो.  शिक्षकांना  शेतीचे  प्राथमिक  शिक्षण  असले  पाहिजे.  मुलांच्या  गुणवत्तेनुुसार  शिक्षकांना  उत्तेजनार्थ  अधिक  मोबदला  देण्यात  यावा.  अधूनमधून  सरकारने  या  शिक्षणकार्याच्या  तपासण्या  घ्याव्यात  म्हणजे  अभ्यासक्रमाचे  मूल्यमापन  समजू  शकते.  सरकारने  वसूल  केलेल्या  कराचा  अर्धा  भाग  या  शिक्षणासाठी  खर्च  करावा.  मनुष्याच्या  नैतिक  संस्कार  संपादनावर  भर  देण्यात  यावा.  मुलांच्या  वागणूकीतील  व्यवस्थितपणा  स्वच्छता  आणि  शिस्त  याकडे  विशेष  लक्ष  पुरविण्यात  यावे.  त्यासाठी  मुख्यतः  नीतीमुल्याच्या  गोष्टी,  कथा  सांगण्याचे  उपक्रम  योजण्यात  यावे.
फक्त  कारकून  निर्माण  करणे  हेच  या  प्रचलित  शिक्षण  पध्दतीचे  एकमेव  उद्दीष्ट  आहे.त्यामध्ये  सुधारणा  झाली  पाहिजे.  उच्च  शिक्षणावर  अवास्तव  खर्च  होत  असल्याचे  स्पष्टपणे  सरकारच्या  निदर्शनास  आणून  दिले.  प्रचलित  शिक्षण  वरिष्ठ  वर्गातून  झिरपत  झिरपत  कनिष्ठ  वर्गापर्यंत  पोहोचतो  याचा  प्रखर  विरोध  केला.  असे  जाहिरपणे  विचार  मांडणारे  त्याकाळामध्ये  जोतीबा  एकटेच  होते  हे  लक्षात  घेतले  पाहिजे.  या  विचारांची  आजसुध्दा  दखल  घेतली  तरी  हरकत  नाही.  परंतू  वर्षातून  एकदा  दोनदा  जोतीबांचे  स्मरण  करणे  एव्हढेच  मर्यादीत  प्रेम  आज  दिसून  येते.  त्याच्या  विचारांचे  आचरण  कोण  करणार  हा  खरा  आज  प्रश्न  आहे.
ज्या  काळामध्ये  ब्राह्मणाशिवाय  कोणी  शिकत  सुध्दा  नव्हते  त्या  काळामध्ये  कनिष्ठ  वर्गातील  मुलांसाठी  जोतीबांनी  अनेक  शाळा  सुरू  केल्या.  स्त्री  शिक्षणाची  सुरवात  स्वतःच्या  पत्नीने  करून  त्यांना  पहिली  भारतीय  शिक्षिका  घडविले  हे  त्यांचे  धाडसी  कार्य  आहे  हे  कबूल  केलेच  पाहिजे.  कारण  त्या  काळामध्ये  कोणत्याही  वर्गातील  स्त्री  घराच्या  बाहेर  सुध्दा  पडत  नसे  त्या  काळामध्ये  त्यांनी  स्त्री  शिक्षण  यशस्वी  करून  दाखविले  ही  एक  क्रांतीच  आहे.  त्यांना  अनेक  विरोध  झाले  परंतू  पक्क्या  ध्येयाने  त्यांनी  हे  शिक्षण  कार्य  त्यांनी  चालू  ठेवले.  म्हणून  त्या  कार्याचा  नंतर  जाहिर  सत्कार  झाला.
त्याचप्रमाणे  आपले  आधुनिक  शिक्षण  पध्दतीचे  विचार  त्यांनी  साहित्यातून  समाजापूढे  मांडले.  त्यांनी  सर्व  प्रथम  सन  १८५५  मध्ये  तृतीय  रत्न  हे  नाटक  लिहून  शिक्षण  हा  माणसाचा  तिसरा  डोळा  आहे  हे  सांगितले.  तसेच  त्याच्या  अखंड  काव्यसंग्रहातून  सुध्दा  शिक्षणाचा  प्रसार  करण्याची  तळमळ  दिसून  येते.
 क्षत्रियांनो  तुम्ही  कष्टकरी  व्हावे    कुटूंबा  पोसावे  आनंदाने  ।।१।।
 नित्य  मुली  मलांना  शाळेत  घालावे    अन्नदान  द्यावे  विद्यार्थ्यास  ।।२।।
 सार्वभौम  सत्य  व्रत  स्वतः  आचरावे    सुखे  वागवावे  आर्यभट्ट  ।।३।।
 अशा  वर्तनाने  सर्वा  सुखी  द्याल    स्वतः  सुखी  व्हाल  जोती  म्हणे  ।।४।।

दरिद्री  मुलांनी  विद्येस  शिकावे  भिक्षान्न  मागावे  पोटापुर्ते  ।।१।।
 विद्वान  वृध्दांनी  विद्यादान  द्यावे  भिक्षेकरी  व्हावे  गावामध्ये  ।।२।।
 स्त्र  पुरूषांसाठी  शाळा  घालाव्या  व्द्या  शिकवाव्या  भेद  नाही  ।।३।।
 स्वहितासाठी  खर्च  जे  करिती  अधोगती  जाती  जोती  म्हणे  ।।४।।

 अशा  प्रकारे  जीवनभर  शिक्षणाचा  ध्यास  घेणाया  जोतीबांना  अभिप्रेत  असलेली  शिक्षणपध्दतीचा  एक  शेवटचा  आणि  खूप  महत्वाचा  मुद्दा  असा  होता  की  नविन  शिक्षक  निर्माण  झाले  पाहिजेत  हा  दूरवर  केलेला  विचार  आज  सुध्दा  लक्षात  घेण्यासारखाच  आहे.  कारण  आज  सर्वजण  स्वतःसाठी  पैसे  मिळविण्याच्या  मागे  धावत  आहेत.  कोणालाही  दुसयासाठी  काही  करावे  असे  वाटत  नाही.  आणि  चूकून  कोणाला  इच्छा  झालीच  तर  ती  केवळ  प्रसिध्दी  साठीच  असते.  निरपेक्ष  वृत्तीने  दुसयास  शिकविण्याची  तळमळ  शोधून  सुध्दा  सापडत  नाही.  त्यासाठी  जोतीबांनी  केलेला  दूरवर  विचार  अत्यंत  परिणामकारक  आहे.  कारण  त्यांच्या  नंतर  हा  झरा  आटता  कामा  नये  अशी  त्यांची  तिव्र  इच्छा  होती.

No comments:

Post a Comment