गीता रहस्य प्रकरण चौदावे
(गीताध्यायसंगती)
या चौदाव्या प्रकरणामध्ये
टिळकांनी संपूर्ण गीतेतील तत्त्वज्ञानाचा आढावा घेऊन विवेचन केलेले आहे.
कर्मे करीत असताना
अध्यात्मविचाराने सर्वात्मैक्यरूप साम्यबुध्दि पूर्णपणे संपादन करणे व ती प्राप्त
झाल्यावरही संन्यास घेण्याच्या भरीस न पडता संसारातील सर्व कर्मे केवळ कर्तव्य
म्ह्णून नेहमी करीत रहाणे हाच या जगात मनुष्याचा परम पुरुषार्थ असे गीतेमध्ये
सांगितलेले आहे. आपला हिंदुस्थान देश ज्ञानाचे, वैभवाचे, यशाचे आणि पूर्ण
स्वराज्याचे सुख अनुभवीत आहे अशी जेव्हा त्याची चोहोकडे ख्याती झाली होती, तेव्हा
एका सर्वज्ञ महापराक्रमीमहापराक्रमी, यशस्वी व परमपूज्य क्षत्रियाने दुसऱ्या महान
धनुर्धरास क्षात्र धर्माच्या स्वकार्यास प्रवृत्त करण्यासाठी गीतेचा उपदेश केलेला
आहे हे अभ्यासकांनी प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. चित्तशुध्दीसाठी स्वधर्माप्रमाणे
वर्णाश्रमविहीत कर्मे करून ज्ञानप्राप्ती झाल्यावर मोक्षासाठी शेवटी सर्व कर्मे
सोडून सदुसऱ्या महान धनुर्धरास क्षात्र धर्माच्या स्वकार्यास प्रवृत्त करण्यासाठी
गीतेचा उपदेश केलेला आहे हे अभ्यासकांनी प्रथम लक्षात ठेवले पाहिजे.
चित्तशुध्दीसाठी स्वधर्माप्रमाणे वर्णाश्रमविहीत कर्मे करून ज्ञानप्राप्ती
झाल्यावर मोक्षासाठी शेवटी सर्व कर्मे सोडून संन्यास घेणे यास सांख्य, आणि कर्मे
कधीही न सोडता शेवटपर्यंत निष्काम बुध्दिने करीत रहाणे यास कर्मयोग म्हणतात. मी
मारणार आणि तो मरणार ही कर्मदृष्टि सोडून देऊन, मी आपला केवळ स्वधर्म करीत आहे या
बुध्दिने तू आपले स्वधर्माचे कार्य कर म्हणजे त्यापासून तूला कोणतेहि पाप लागणार
नाही, हा उपदेश गीतेमध्ये केलेला आहे. गीता म्हणजे कर्म, भक्ति व ज्ञान या तीन
स्वतंत्र निष्ठांची खिचडी असून त्यामध्ये
कर्मयोग नावाचे मौल्यवान व मनोहर असे गीतारूपी सार सांगितलेले आहे.
निरूपणाची पध्दत संवादात्मक आहे. त्यामध्ये सुलभ व प्रेमळपणा आहे. हा गीता-ग्रंथ
संन्यासमार्गाचा किंवा दुसरा कोणत्याही निवृत्तिपर पंथाचा नाही इतकेच नव्हे, तर
ज्ञानोत्तरही कर्मसंन्यास का करू नये याचे ब्रह्मज्ञानदृष्ट्या संयुक्तिक उत्तर
देण्यासाठी गीतेची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणून गीतेस सुध्दा संन्यास देण्याच्या
भरीस न पडता संन्यासमार्गप्रतिपादक दुसरे जे वैदिक ग्रंथ आहेत तेव्हड्यावरच
संन्यासमार्गाच्या अनुयायांनी संतुष्ट राहिले पाहिजे, अथवा गीतेत संन्यासमार्गालाही
भगवंतांनी ज्या निरभिमान-बुध्दिने नि:श्रेयस्कर म्हटले आहे त्याच समबुध्दीने
सांख्यमार्गीयांनी सुध्दा जग चालावे असा परमेश्वराचा हेतु असून त्यासाठीच
ज्याअर्थी तो वेळोवेळी अवतार धारण करतो, त्याअर्थी ज्ञानोत्तर निष्काम बुध्दिने
व्यावहारीक कर्मे चालू ठेवण्याचा भगवंतांनी गीतेत उपदेशिलेला मार्गच कलियुगामध्ये
सुध्दा संयुक्तित आहे हे लक्षात घेतले पाहिजे. टिळकांनी केलेले हे गीतेचे
कर्मयोगपर व तुलनात्मक हे पहिलेच विवेचन आहे. गीता-रहस्य हा ग्रंथ कोणत्याही
विशिष्ट व्यक्तीस किंवा संप्रदायास उद्देशून लिहीलेला नाही. या गीतेतील
तत्त्वज्ञाच्या विचारामध्ये टिळकांनी पुष्कळ वर्षे घालविली, त्याच्या चिंतनामध्ये
त्यांना जे समाधान झाले ते अवर्णनीय आहे. पुढच्या पिढीतील तरूणांनी या ग्रंथाचे
अध्ययन करावे. त्यांनी याचे चिंतन, मनन करून गीतेतील रहस्य समजून घेतले पाहिजे अशी
टिळकांची प्रेमाची, आग्रहाची विनंती आहे. कारण हा गीता-रहस्य आजच्या सर्व
प्रश्नांची समर्पक उत्तरे देत आहे.
No comments:
Post a Comment