Friday, 2 February 2018

पर्यावरण दिन


जागतिक पर्यावरण दिन 5 जून - भारतिय तत्त्वज्ञान
पर्यावरण म्हणजे थोडक्यात प्रत्येक सजीवांच्या जीवनासाठी, शुध्द पंचमहाभूतांचे वातावरण. (पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आकाश) तूर्तास आपण मनुष्यासाठी पर्यावरण याचाच येथे विचार करूया. कारण पर्यावरण हा विषय खूपच अमर्याद आहे. वस्तुतः ही पंचमहाभूते मनुष्यासाठीच निर्माण केलेली आहेत. या पंचमहाभूतांचा अंश मनुष्यशरीरामध्ये आहे. शरीरातील त्वचा, अस्थी हे पृथ्वीतत्व आहे, रक्त वगैरे द्रवरूप पदार्थ हे जल तत्व आहे, शरीरातील अन्नाचे पचन जठराग्नि द्वारा होते तेच अग्नितत्व आहे, या शरीरामध्ये प्राण, समान, व्यान, उदान, अपान हे पंचप्राण आहेत ते वायुतत्व आहे, शरीरातील जी पोटामध्ये, तोंडामध्ये जी पोकळी आहे, ते आकाशतत्व आहे, त्यालाच पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. हे भारतिय तत्वज्ञान समजून घेतले कि पर्यावरणाचा शास्त्रीय विचार लक्षात येतो. झाडे जगवा झाडे वाचवा इतका मर्यादीत हा विषय नाही. हे समजून घेतले पाहिजे.
पृथ्वीतून उत्पन्न झालेले अन्न मनुष्यशरीरास पोषक आहे मांसाहार नाही हे तात्काळ लक्षात येते. पावसाचे शुध्द पाणी(नदीचे पाणी) मनुष्यशरीरास पोषक आहे सागराचे नाही(वर्षानुवर्षाचे खारट) हे समजते. सूर्यप्रकाश मनुष्यशरीरास पोषक आहे ढगाळ नाही हेही तात्काळ लक्षात येते. शुध्द प्राणवायु मनुष्यशरीरास पोषक आहे वायु प्रदूषण नाही हे तात्काळ लक्षात येते. आणि मनुष्यशरीरातील शुध्द पोकळी पोषक आहे धुराने अशुध्द नाही हे तात्काळ लक्षात येते. असा हा पर्यावरणाचा विषय मनुष्याच्या आयुष्याशीच जोडला गेलेला आहे. पर्यावरण शुध्द असेल तर मनुष्याचे निरोगी आयुष्य 100वर्षे असते.
पर्यावरण जितके अशुध्द असेल तितके आयुष्य कमी होऊ शकते. असा पूर्ण विचार भारतिय तत्वज्ञानामध्ये आहे.
परंतू आज पाच ही महाभूते अशुध्द आहेत. रासायनिक अशुध्द द्रव्यांमुळे (पृथ्वी) जमिन अशुध्द होते. त्याच जमिनीतून उत्पन्न झालेले अन्न अशुध्द सेवन केल्यामुळे शरीरातील अस्थी, त्वचा कमकुवत होतात.रोग होतात. आयुष्य कमी होते. तसेच रासायनिक अशुध्द द्रव्ये पाण्यामध्ये सोडल्याने पाणी अशुध्द होते. ते पिल्याने रक्त अशुध्द होते. रक्तदाब वाढतो / कमी होतो. हृदयावर ताण पडून अनेक रोग होतात. विषारी वायुच्या प्रदूषणाने नाकावाटे शरीरामध्ये अशुध्द वायु(धूर) जातो. सिगरेट पिणाऱ्यास होणाऱ्या त्रासापेक्षा  त्याच्या शेजारी असलेल्या सिगरेट पिणाऱ्यास दुप्पट त्रास होतो. हे सिगरेट पिणाऱ्यावे समजून घेतले पाहिजे. झाडे सुर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत विषारी वायु ग्रहण करून प्राणवायु सोडतात. म्हणून झाडे जगवा झाडे वाचवा असा पर्यावरणवादींचा नारा असतो. असो
टोलेजंग इमारतींमुळे आज बऱ्याच ठिकाणी सूर्यप्रकाश औषधा इतकाच दिसतो. सुदैवाने जगापेक्षा आपल्या भारतामध्ये खूप सूर्यप्रकाश आहे. आपल्याकडे ही समस्या खूपच कमी आहे. परदेशामध्ये सनबाथ हा एक उपचार असतो. आपण तो सहज घेत असतो. यंत्रांच्या वापरांमुळे आकाशामध्ये विषारी वायुंचे प्रदूषण झालेले आहे. त्यामुळे स्थान अशुध्द होते. वायुतत्व आकाशतत्व यामध्ये सूक्ष्म फरक आहे, श्वास घेणे सोडणे हे वायुतत्व तर श्वास घेणे सोडणे यासाठी जागा लागते ते आकाशतत्व आहे. आकाशतत्व अशूध्द झाले की मनुष्य गुदमरतो. मरतो. 
हे पूर्णतः समजून घेतल्यानंतर पंचमहाभूते शुध्द करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला पाहिजे.
पृथ्वी शूध्द करण्यासाठी रासायनिक द्रव्याच्या विसर्जनासाठी मनुष्यवस्तीपासून दूरवर व्यवस्था करावी. रासायनिक खतां ऐवजी गोबर गोमूत्राचा वापर करावा. धूर सोडणारी औद्योगिक केंद्रे मनुष्यवस्तीपासून दूरवर स्थापन करावीत. सौरउर्जेवर / वायुवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कारावा. काही झाडे 24तास प्राणवायु सोडतात. उदा. पिंपळ, तूळस त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करावी. या शिवाय ध्वनीप्रदूषण, विचारप्रदूषण, कृतीप्रदूषण या समस्या आहेतच. आज जे करायला पाहिजे ते करण्याची लाज वाटते आणी जे करायला नको ते प्रतिष्ठेने केले जाते.
अशा सर्वांगिण पर्यावरणाचा विचार करायचा नाही आणी वर्षातून फक्त एक दिवस पर्यावरणदिन साजरा करायचा यात कोणता शहाणपणा आहे ? ? ? ? ? ?

No comments:

Post a Comment