शिक्षण म्हणजे नेमके
काय. शिक्षण हा
शब्द शिक् या
धातू पासून तयार
झालेला असून शिक्
याचा अर्थ शिकणे
असा आहे. प्रामुख्याने
कसे शिकावे यावर
भर देण्या ऐवजी
शिकवावे कसे यावरच
मेकॉलेच्या अभ्यास पध्दतीमध्ये
भर दिलेला आहे.
शिकावे कसे हे भारतीय संस्कतीने
सांगितलेले आहे. विनोबा
भावे म्हणतात जे शिकविले
जात नाही ते
खरे शिक्षण. आपल्या भारतीय
संस्कृतीमध्ये ज्ञान प्राप्त
करून घेण्यासाठी ब्रह्मचर्याश्रम सांगितलेला आहे. तो
सुरवातीस सांगितलेला आहे. याचे
कारण असे की मनुष्य जिवनाचे
ज्ञान सुरवातीस संपादन करावे
लागते. त्यानुसार गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व शेवटी
संन्यासाश्रम यांचे आचरण
करायचे आहे. याचा
अर्थ हे ज्ञान
मनुष्याच्या सर्वांगीण विकासाचे आहे. शिक्षण
केवळ पैसे मिळविण्याचे
असते परंतू ज्ञानामध्ये
मनुष्याच्या सर्वांगीण विकासाचे मर्म आहे.
हा मुख्य फरक
नेहमी लक्षात ठेवला
पाहिजे. आजच्या परिस्थितीचे
मुख्य आणि मूळ
कारण येथेच दडलेले
आहे. याचा विचार
आपण करायचा आहे.
प्रचलित शिक्षण पध्दती
नुसार आजचा विद्यार्थी शिक्षण
घेऊन पैसे मिळवितो.
त्यासाठी तो अनितीच्या
कोणत्याही थराला जातो.
कारण त्याला फक्त
पैसे मिळविण्याचेच शिक्षण दिले
जाते. आणि त्याचाच
परिणाम अनिती सर्वत्र
दिसून येते. हे
समजून घेणे अत्यंत
महत्त्वाचे आहे. कारण
याच पायावर आपला
संपूर्ण अभ्यासक्रम आधारलेला आहे. आपण
त्याच्या उदरनिर्वाहाची नक्कीच काळजी
घेणार आहे. परंतू
तेथेच थांबणार नाही. तर
जिवनाकडे पहाण्याची दिशा आपण
त्याला देणार आहोत.
त्यामूळे आजच्या समस्या
हळुहळु कमी होऊ
शकतील. त्यातूनच राष्ट्राचा विकास होऊ
शकेल. विश्व बंधुत्वाची
भावना, समता व स्वातंत्र्य या शब्दांना
जिवंतपणा येईल.
आता प्रश्न
येतो अभ्यासक्रमाचा. अभ्यासक्रम येथे त्याअर्थी
जास्त महत्त्वाचा नाही. पध्दती
तसेच शिकविण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. उदा.
गणितातील बेरजेचे उदाहरण १२३४५ अ ६७८९० हे
एकदा शिकविले की या विश्वातील कोणतीही बेरीज त्या
विद्यार्थ्यांस स्वतःहून येईल. प्रत्येक
बेरीज त्याला शिकवावी
लागणार नाही. तसेच
भाषा हा विषय
कशासाठी शिकायचा हे त्यास
समजाऊन सांगितल्यावर तो स्वतःहून
ते शिकण्याचा प्रयत्न करील. मराठी
हा विषय त्यातील
धडे पाठ करून
त्यातील प्रश्न-उत्तरे परिक्षेमध्ये लिहीण्यासाठी नाही हे
त्यास उमजे पर्यंत
समजाऊन सांगण्यात येईल. याच
प्रमाणे तो त्याच्या
आवडीच्या भाषा शिकण्याचा
प्रयत्न करील. त्याच
प्रमाणे इतिहास भूगोल,
विज्ञान वगैरे हे
विषय कशासाठी शिकायचे आहेत. त्याचा
उपयोग आपल्या जीवनामध्ये
कोठे कोठे असतो
हे त्यास समजाऊन
सांगितल्यावर तो हे विषय आधिक
तळमळीने शिकण्याचा प्रयत्न करील.
अशा प्रकारे
नवा अभ्यासक्रम शिकविल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे
पुढे भवितव्य काय असा
प्रश्न उभा राहतो.
तर त्यास आपण
सर्व सरकारमान्य परिक्षेस बसविणार आहोत. आपल्या
दृष्टीने या परिक्षा
केवळ १०
ऽ आहेत. आपण
त्या विद्यार्थ्यांना १००
ऽ ज्ञान देऊन
परिपूर्ण केलेले आहे.
गुरूकूलातील विद्यार्थ्यांना ज्ञान देणार
आहोत याची संपूर्ण
जाणीव सतत गुरूजनांनी
ठेवली पाहिजे. ही गोष्ट
सुरवातीस कठीण जाणार
आहे कारण आजपर्यंत
अशा पध्दतीचे अनुकरण आपण
केलेले नाही. आपल्याला
प्रचलीत पध्दतीची सवय झालेली
आहे. ती दूर केली पाहीजे.
आपण विद्यार्थ्यांना शिकविणार नसून त्यांच्या
अंगी असलेली शिकण्याची
वृत्ती जागृत करण्याचा
प्रयत्न केला पाहिजे.
स्वामीजी म्हणतात--खरे ज्ञान प्रत्येकाच्या
हृदयात असतेच फक्त
ते प्रगट करण्यास
प्रवृत्त करण्याचे काम गुरूजींचे
असते. नवा अभ्यासक्रम
तयार करताना कोणते
विषय घ्यावेत याचा विचार
करताना विद्यार्थ्यास पुढील आयुष्यामध्ये
कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे
लागणार आहे, त्यासाठी
त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना
त्याला कशाची गरज
लागणार आहे, त्याच्या
उपजिवीकेचा मार्ग इत्यादींचा
विचार करून उत्तम
अभ्यासक्रम करावा. प्रथम
त्याला समाजातील घटकांशी संवाद साधण्यासाठी,
थोर साहित्यीकांचे वाङमयीन कार्य समजून
घेण्यासाठी स्थानीक भाषेची गरज
आहे. म्हणून मराठी
भाषा त्याला शिकवीली
पाहिजे. त्याला आपल्या
राष्ट्रीय विचारवंतांचे वाङमयीन कार्य समजून
घेण्यासाठी राष्ट्रीय भाषेची गरज
आहे. म्हणून हिंदी
भाषा त्याला शिकवीली
पाहिजे. त्याला आपल्या
भारतीय संस्कृतीची विचारधारा समजून घेण्यासाठी
संस्कृत भाषेची गरज
आहे. म्हणून संस्कृत
भाषा त्याला शिकवीली
पाहिजे. त्याला जागतीक
विचारवंतांचे वाङमयीन कार्य समजून
घेण्यासाठी इंग्रजी भाषेची गरज
आहे. इंग्रजी भाषा जागतीक
स्तरावरील सर्वमान्य भाषा आहे.
म्हणून ती त्याला
शिकवीली पाहिजे. अशा रितीने
अनेक स्तरांवरील साहित्य त्यास सहजपणे
समजून घेता येईल.
व त्या विचारांचा
वारसा घेऊन त्याची
वैचारिक क्षमता व्यापक
होईल. मनुष्याचे आचरण त्याच्या
विचारांवरच आधारलेले असते. अशा
रितीने बारा वर्षां
नंतर हा विद्यार्थी
सुसंस्कृत विचारांचा नक्कीच होईल.
या समाजाशी, समाजातील घटकांशी व्यवहार करताना त्यांच्याशी
त्या विद्यार्थ्याचे नाते काय
आहे, त्यांच्याशी कोणत्या प्रकारे वर्तन केले
पाहिजे याची उमज
व समज येण्यासाठी
त्याला या समाजाने,
समाजातील काही घटकांनी
काय कार्य केले,
कसे बलिदान केले,
कोणत्या हाल-अपेष्टा सोसल्या, त्यांचा त्यामागे उद्देश कोणता
होता हे सर्व
त्याला शिकविले पाहिजे. म्हणून या
भारत देशाचा इतिहास,
भूगोल त्याला शिकवीला
पाहिजे. हे त्यांला
समजल्यावर त्याला मातृभूमीची
ओढ लागेल. आपल्या
प्राणांची आहूती देणाया
राष्ट्रभक्तांकडून त्याला स्फुर्ती
मिळेल. त्याला आपल्या
जीवनाचे उद्दीष्ट समजेल. त्याच्या
अंगी असलेली राष्ट्रभक्ती
जागृत होईल. इतके
मोठे सामर्थ्य इतिहास या
विषयामध्ये आहे. इतिहासाचा
अभ्यास केवळ परिक्षेमध्ये
गुण मिळवून पास
होण्यासाठी, किंवा त्या
राष्ट्रभक्तांची आरती (जयंती
व पुण्यतिथीस) ओवाळण्यासाठी, किंवा त्या
राष्ट्रभक्तांच्या विचारांमध्ये किती व कशी भिन्नता
आहे याचे संशोधन
करण्यासाठी नाही हे
त्या विद्यार्थ्याला उमजे पर्यंत
समजावून सांगितले जाईल. अशा
रितीने बारा वर्षां
नंतर या विद्यार्थ्याच्या
अंगी राष्ट्रभक्ती जागृत होईल.
तसेच या आजूबाजूला
दिसणाया निसर्गाशी, बदलणाया ऋतुमानाशी त्या विद्यार्थ्याचे
नाते काय आहे,
त्यांचा त्याच्या जीवनाशी काय व कोणता संबंध
आहे याची उमज
व समज येण्यासाठी
त्याला आयुर्वेद शिकविला पाहिजे. आयुर्वेदामध्ये प्राणीज, खनिज, व
वनस्पती द्रव्यांचा उपयोग मूळ
स्वरूपामध्ये चिकीत्सेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये
केलेला आहे. तसेच
शरीरातील सर्व क्रियांचा
सखोल अभ्यास करून
शुध्द चिकीत्सेचा आग्रह प्रतिपादलेला
आहे. असे हे आयुर्वेद मनुष्याच्या आयुष्याचे अलौकीक शास्त्र
आहे. हे त्याला
समजून सांगितले पाहिजे. या आयुर्वेदाचा
शास्त्रशुध्द अभ्यास केल्या
मुळे या विद्यार्थ्याच्या
आरोग्याचा तसेच उपजिवीकेचा
प्रश्न सुटणार आहे.
इतकेच नव्हेतर तो समाज
परिवर्तन घडवू शकेल.
भारतातील प्रत्येक घटकाचा निरोगी
आरोग्याने विकास होऊ
शकेल. या समाजाशी,
समाजातील घटकांशी देवाण-घेवाणीचा व्यवहार करताना त्याला
गणिताचे ज्ञान असणे
आवश्यक आहे. नाही
तर तो बुध्दीमान
असून सुध्दा देवाण-घेवाणीचा
व्यवहारामध्ये फसला जाईल.
सामान्य विद्यार्थ्याला रोजच्या व्यवहारा पूरतेच गणित
शिकविणे आवश्यक आहे.
तेव्हढेच शिकविले जाईल. प्रचलीत
अभ्यासक्रमातील अनावश्यक भाग जो त्याच्या जीवनामध्ये कधीही उपयोगी
नाही तो शिकविण्यामध्ये
काहीही स्वारस्य नाही हे
समजून घेतले पाहिजे.
यामुळे विद्यार्थ्याची गणिता विषयीची
अनास्था जाऊन गोडी
निर्माण होईल. हे
गुरूजनांनी समजून घेतले
पाहिजे.
त्यानंतर आजच्या विज्ञानयुगाशी
व संगणकीय युगाशी सामना
देण्यासाठी विद्यार्थ्याला
प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक संगणकीय
ज्ञान दिले पाहिजे.
या क्षेत्रातील आधूनिक व
प्रगत ज्ञानाच्या आधाराने बारा वर्षां
नंतर या विद्यार्थ्याचा
उपजिवीकेचा प्रश्न सुटणार
आहे. इतकेच नव्हेतर
तो आपले भारत
राष्ट्र सुख-समृध्द करू शकेल.
परंतू आज या क्षेत्रातील प्रगतीमुळे केवळ भोगवादी
समृध्दीच दिसून येते.
त्याचे दुष्परिणाम दिसतात याचे
मूळ कारण आहार,
विचार व सांस्कृतिक
वारसा यांचा अभाव
आहे. तो अभाव
आयुर्वेदाने व संस्कृताच्या
सखोल अभ्यासानेच नष्ट होऊ
शकतो. अशा रितीने
बारा वर्षां नंतर
हा विद्यार्थी विज्ञाननिष्ठ नक्कीच होईल.
आपल्या देशाचा भौगोलिक
विचार केला तर
शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. म्हणून
शास्त्रशुध्द शेतीचे प्रगत
तंत्रज्ञान त्यास जरूर
दिले पाहिजे. यामुळे आपल्या
भारत राष्ट्राचे स्वावलंबन, स्वय-रोजगार, सुख-समृध्दी असे अनेक
फायदे होणार आहेत.
अशा रितीने बारा
वर्षां नंतर या
विद्यार्थ्यास उपजिवीकेचा योग्य मार्ग
मिळणार आहे. हे
मुख विषय लक्षात
घेऊन ते अशा प्रकारच्या दृष्टीकोनातून शिकविले पाहिजेत. इतर अनेक
विषय या मुख्य
विषयांशी निगडीत आहेत
ते जरूर शिकविले
जातीलच.
बारा वर्षांनंतर
हा विद्यार्थी गुरूदक्षिणेचा मूळ अर्थ
आचरण्यात आणण्याचा प्रयत्न उस्फुर्तपणे करील. त्यास
कोणी सांगावे लागणार नाही.
गुरूकडून घेतलेले ज्ञान दूसयास
देणे हा गुरूदक्षिणेचा
खरा अर्थ आहे.
हे ज्ञान तो
गुरूकुलामध्ये राहून शिकविण्याच्या
माध्यमातून करू शकतो.
किंवा त्याच्या पुढील आयुष्यामध्ये
संपकर्ात येणाया अनेकांना
सांगू शकतो.
या प्रकारे
गुरूकुलाचे कार्य अविरतपणे
चालू राहील.
No comments:
Post a Comment