ब्राह्मणसमाज पुढे जातोय का
?
ब्राह्मणसमाज पुढे जातोय म्हणजे
काय हे प्रथमतः
समजून घेतले पाहिजे.
तरच त्याला ब्राह्मण
म्हणणे योग्य. नाही
तर इतर जाती
समाजामध्ये आणि ब्राह्मण
वर्णामध्ये फरक तो काय. ब्राह्मण
ही जात नव्हे
तो वर्ण आहे,भगवंताने
गुणकर्मानुसार केलेला. जाती या
मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. म्हणून
ब्राह्मणसमाजाने आपली इतर
जातींशी तुलना करणे
हा भगवंताचा अवमान आहे.
या दृष्टीने आपण ब्राह्मणसमाज
पुढे जातोय का
याचा विचार करू
या.
आपल्या भारतीय
तत्त्वज्ञाना नुसार प्रत्येक
मनुष्याचा स्वभाव सत्व,
रज व तम या तिन गुणांनी बनलेला असतो.
ब्राह्मणवर्ण हा फक्त
सत्वगुणांनी बनलेला आहे.
आता प्रश्न येतो
सत्वगुण कोणते असतात.
शम,दम,तप,पवित्रता, संतोष,क्षमा,भक्ती,दया,सत्य हे सत्वगुण
आहेत. ज्या मनुष्याच्या
अंगी हे सत्वगुण
असतात, त्याला ब्राह्मण
म्हणतात. ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला आला कि तो ब्राह्मण
होत नसतो.
आजच्या ब्राह्मणसमाजामध्ये
शम,दम,तप,पवित्रता,संतोष,क्षमा,भक्ती,दया,सत्य
हे सत्वगुण आहेत का
याचा प्रथमतः विचार केला
पाहिजे. आजच्या कलियुगामध्ये
ब्राह्मणसमाजाने आपला सत्वगुण
सोडून दिलेला दिसून
येतो. तो आधी आत्मसात केला पाहिजे.
आपल्या भारतीय तत्त्वज्ञाना
नुसार ब्राह्मणवर्णाचे ध्येय ब्रह्मज्ञानप्राप्ती
हे आहे. म्हणून
ब्राह्मणसमाजाचे पुढे जाणे हे
त्याच्या ध्येयाशी निगडित आहे.
आजच्या ब्राह्मणसमाजाने प्रथमतः ब्राह्मणवर्णाचे सत्वगुण आत्मसात केले पाहिजेत.
त्यानंतर ब्रह्मज्ञानप्राप्तीच्या ध्येयाचे उद्दीष्ट निश्चित केले पाहिजे.
हेच ब्राह्मणसमाजाचे पुढे जाणे
आहे, हे सत्य
पक्के ध्यानात घेतले तरच
आपल्या भारतीय तत्त्वज्ञाना
नुसार ब्राह्मणवर्णाला न्याय मिळेल.
म्हणून भारतीय
तत्त्वज्ञानाचा विचार करता
असे खेदाने नमुद
करावेसे वाटते कि
ब्राह्मणसमाज पुढे जात
नाही. उलट अधोगतीला
चाललेला आहे. आज
ब्राह्मणसमाजास ब्राह्मणवर्णाची नितीमुल्ये सांगणारे ही केवळ
बोटावर मोजण्या इतकेच आहेत.
त्यांचे ऐकण्याची, समजून घेण्याची
गरज ब्राह्मणसमाजास वाटत नाही.
यास कारणे अनेक
आहेत. त्यातील एक पाश्चात्य
संस्कृतीचा प्रभाव हे
आहे. आज ब्राह्मणसमाज
पुढे चालला आहे
तो भौतीकतेच्या दिशेने. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने ब्राह्मणसमाजास असे वाटते
कि आजच्या काळात
चार वर्णाची काहीच आवश्यकता
नाही. विज्ञाननिष्ठेच्या जोरावर आज
ब्राह्मणसमाज पुढे चालला
आहे हे मान्य
केलेच पाहिजे. परंतू तो
ब्राह्मणवर्णाच्या ध्येयापासून भरकटत चालला
आहे, हे विद्वान
ब्राह्मणांना सुध्दा समजत
नाही, उमजत नाही.
दुसरे महत्त्वाचे कारण हेच
कि आज भारतीय
तत्त्वज्ञानाचा शुध्द अर्थ
सांगण्याची संपूर्ण समाजामध्ये व्यवस्था नाही, चार
वर्णावर उपदेश करण्याची
मनस्थिती नाही. इतकेच
नाही तर वर्णव्यवस्थे
वर बोलणे हा
गुन्हा आहे अशी
समाजधारणा झालेली आहे.
यास जबाबदार ब्राह्मणसमाज च आहे हे मान्य
करावेच लागेल. सुमारे
सातशे वर्षांपुर्वीच्या काळापासून ब्राह्मणसमाजाने इतर समाजाशी
अत्यंत निंदनीय वर्तणूक केलेली आहे.
त्या काळातील अहंकारी ब्राह्मणसमाजाने इतर समाजाशी निष्ठूरतेने वर्तणूक केलेली आहे.
धर्मशास्त्राचा स्वार्थबुध्दीने अर्थ सांगून
इतर समाजाचे आर्थीक, मानसिक, शारिरीक शोषण केलेले
आहे. त्याचा बदला
आता इतर समाज
घेत आहे असे
म्हणले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
आज ब्राह्मणसमाजास काहीही किंमत
नाही, आदर नाही,
मान-सन्मान नाही. केवळ
ब्राह्मणसमाजाची निंदा केली
जात आहे. केवळ
ब्राह्मणसमाजाची नाही तर
आपल्या धर्मशास्त्राची निंदा केली
जात आहे. भारतीय
तत्त्वज्ञानाची चेष्टा केली
जात आहे. हे
सुध्दा विद्वान ब्राह्मणांना समजत नाही,
उमजत नाही.
म्हणून ब्राह्मणसमाज पुढे जातोय
का इतकाच विचार
करून आज आपण थांबता कामा
नये. ब्राह्मणसमाजाने शम,दम,तप,पवित्रता,संतोष,क्षमा,भक्ती,दया,सत्य हे सत्वगुण
धारण केले पाहिजेत.
शम म्हणजे बुध्दी
परमेश्वर चरणी स्थिर
करणे. दम म्हणजे
विषय इंद्रियांचे संयमन करणे.
तप म्हणजे सर्व
कामनांचा त्याग होय.
पावित्र्य म्हणजे प्रत्येक
कर्मामध्ये अनासक्ती होय. संतोष
म्हणजे समाधान वृत्ती
होय. क्षमा म्हणजे
दुसयांनी दिलेले दुःख
सहन करणे. भक्ती
म्हणजे अनन्यतेने भगवंतामध्ये निरंतर प्रेम
करणे. दया म्हणजे
दुःख देणायास मनाच्या व्यापकतेने माफ करणे.
सत्य म्हणजे सर्वत्र
भगवंताचे अस्तित्व अनुभवणे. (शब्द मर्यादतेस्तव
इथेच थांबतो.)
स्वामी मोहनदास,
भारतीय तत्त्वज्ञान प्रचारक
(भ्रमणध्वनी-९४२०८५९६१२)
एल-५०७ चंद्रमा
डिएसके विश्व धायरी
पुणे-४११०४१
No comments:
Post a Comment