देविचे मुख्य अवतार
नारायणऋषी नारदास सांगतात-प्रकृतीशक्तीची
पाच भिन्न कार्ये
म्हणून पाच रूपामध्ये
प्रगट. पाच प्रकारची
शक्तीस्वरूप दुर्गा, शुध्द-सत्वरूप महालक्ष्मी, विद्याविग्रहरूप सरस्वती,परमानंदरूप सावित्री(गायत्री), प्राणस्वरूप श्रीराधा
सृष्टी निर्माण
करण्यासाठी योगमायेचा आश्रय घेऊन
परमात्मा दोन रूपांमध्ये
प्रगट. उजवा भाग
पुरूष व डावा भाग प्रकृती.
त्याच प्रकृतीपासून हे पाच अवतार. ब्रह्मस्वरूप.
नित्य, सनातन जसे
अग्नीमध्ये ज्वलनशक्ती अभिन्न तसेच
परमात्मा व प्रकृतीरूप
शक्ति अभिन्न. म्हणून महापूरूष
परमात्म्यामध्ये स्त्री-पूरूष भेद करीत
नाहीत.
१)शक्तीस्वरूप दुर्गा-
माहेश्वरी महाभागे महामाये महोदये ।
महादेव प्रियावासे महादेव प्रियंकरी
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
। शरण्ये त्र्यंबके
गौरी नारायणी नमोस्तुते ।।
हे परमेश्वरी,
परमभाग्यशालिनी, महान अभ्युदयवाली,
महादेवांची प्रिय आनंदस्वरूपिणी,
भीती नष्ट करणारी
सर्वत्र मंगल करणारी
सर्वांचे कल्याण करणारी,
शरणागतांचे रक्षण करणारी
हे गौरी नारायणी
तूला निरंतर नमस्कार
शिवप्रिय तसेच शिवस्वरूप.
सर्वांची अधिष्ठात्री देवी. देवता,
मनुष्य व दानव पूजन,स्तवन करतात. धर्मस्वरूप,
सत्यस्वरूप, पुण्यस्वरूप व परम तेजस्वी. भक्तांना यश, कल्याण,
सुख, प्रसन्नता व मोक्ष
प्रदान करते. भक्तांचे
दुःख, शोक व संकटे नष्ट
करते. भक्तांचे निरंतर रक्षण
करते. भक्तांना सिध्दी प्रदान
करणारी असून सिध्देश्वरी
आहे. तीची अनेक
नावे-बुध्दि निद्रा क्षुधा
छाया शक्ति तृष्णा
क्षांति जाति लज्जा
शांति श्रध्दा कांति लक्ष्मी
वृत्ति स्मृति दया
तुष्टि माता भ्रांति
भक्ति इत्यादी. अनेक राक्षसांचा
संहार केलेला आहे.
(हयग्रीव,मधु-कैटभ,महिषारूर,दुर्गम,तारकासूर,अरूण
इत्यादी)दुर्गादेवीचे १८ हात आहेत(दंड,घंटा,दर्पण,तर्जनी,मुद्रा,धनुष्य,बाण,ध्वज,पाश,परशु,डमरू,शक्ति,
मुद्गर,शूल,अंकुश,वज्र,चक्र,शलाका) अशा अष्टादशभुजा
दुर्गादेवीचे नित्य-निरंतर स्मरण केले
पाहिजे. शक्तीस्वरूप दुर्गा-पूजनामध्ये कुमारीपूजन, ब्राह्मणासमवेत आवश्यक आहे.
नऊ कुमारींचे पूजन करावे.
पाद्यपूजा,गंध-पुष्पाने. मिष्टांन्न भोजन,दक्षिणा व रेशमीवस्त्रदान
करावे.
२)शुध्द-सत्वरूप महालक्ष्मी-
नमस्ते-स्तु महामाये श्रीपीठे सुरपुजिते । शंखचक्रगदाहस्ते
महालक्ष्मि नमो-स्तु ते
नमस्ते गरूडारूढे
कोलासुरभयंकरी । सर्वपापहरे
महालक्ष्मि नमो-स्तु ते ।।
हे महालक्ष्मी
तुझा जयजयकार हो. शक्तिपीठामध्ये
निवास करणारी सर्व
देवांना पूजनीय, तूला नमस्कार.
हातामध्ये शंख चक्र
गदा धारण करणारी,
गरूडावर आरूढ होऊन
कोलासुरास भिती दाखविणारी,
आणि सर्व पापांचा
नाश करणारी हे
महालक्ष्मी तूला नमस्कार.
तू सर्व
संपत्तीची अधिष्ठात्री देवी. विलोभनीय,
संयमी, शांत, सुशील,
मंगलस्वरूप. लोभ,मोह,काम,क्रोध, व अहंकार
रहित. भक्तांवर अनुग्रह करणारी, आपल्या स्वामीसाठी
पतिव्रता, आपल्या स्वामीची
सर्वाधिक प्रियकर, विष्णुच्या सेवेमध्ये तत्पर. ती
स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी, महाराजांमध्ये राजलक्ष्मी, गृहस्थी मनुष्यांमध्ये गृहलक्ष्मी, सर्व प्राणीमात्रांमध्ये
चैतन्यरूपाने स्थित, महापूरूषांमध्ये
कीर्तिरूपाने, महाराजांमध्ये प्रभावरूपाने, व्यापायांमध्ये व्यवहार-चातुर्याने, पाप्यांमध्ये कलहरूपाने विराजमान असते. सर्वांची
अधिष्ठात्री देवी. देवता,
मनुष्य व दानव पूजन,स्तवन करतात.
भाद्रपद शुक्ल अष्टमी
पासून आश्विन कृष्ण
अष्टमी पर्यंत श्रीमहालक्ष्मीव्रत
करावे. हे व्रत
सोळा दिवसांचे आहे. या
व्रताचे अनुष्ठान करणायास सर्व कामनांची
सिध्दी तसेच धर्म,अर्थ,काम
व मोक्ष प्राप्ती
होते. जसे तीर्थांमध्ये
प्रयाग, नदींमध्ये गंगा श्रेष्ठ,
तसेच व्रतांमध्ये हे श्रीमहालक्ष्मीव्रत
श्रेष्ठ आहे. केवळ
फलाहार करून सोळा
दिवस श्रीमहालक्ष्मी निरंतर स्मरण
करावे. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणाची
पाद्यपूजा,गंध-पुष्पाने. मिष्टांन्न भोजन,दक्षिणा व रेशमीवस्त्रदान
व सोळा दिपकदान
करावे.
३)विद्याविग्रहरूप सरस्वती-
या कुन्देन्दु
तुषारहार धवला या
शुभ्रवस्त्रावृता
या वीणावर
दण्ड मण्डितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्माच्युत
शंकरप्रभृतिभि र्देवैः सदा वंदिता
सा मां पातु सरस्वती
भगवती निःशेषजाड्यापहा।।
जी कुंदाचे
फूल, चंद्रमा, बर्फ आणि
हारासमान शुभ्र वस्त्रांनी
सुशोभित आहे, जीच्या
हातामध्ये वीणा आहे,
जी श्वेत कमळावर
विराजमान आहे, ब्रह्मदेव,विष्णु,
महादेव जिची सदैव
स्तुति करतात आणि
जी सर्व प्रकारचे
अज्ञान नष्ट करते,
ती भगवती सरस्वती
माझे पालन-पोषण करो.
परमात्म्याची वाणी,बुध्दी तसेच ज्ञानाची
अधिष्ठात्री देवता. मनुष्यांना
बुध्दी, प्रतिभा, मेधा(शुध्द बुध्दी) व स्मृती
प्रदान करते. ती
सर्व
प्राणीमात्रांची संजीवनी शक्ति आहे.
ती सत्त्वगुणमयी आहे. स्वतः
तपस्वरूप असून तपस्वींना
सिध्दी प्रदान करणारी
आहे. तीची कांती
बर्फ, कुंद, चंद्रमा,
कुमुद तसेच शुभ्र
कमलासमान शुभ्र आहे.
माघ शुक्ल
पंचमी(वसंत पंचमी)ला विद्याविग्रहरूप सरस्वतीचे विशेष पूजन
करावे. कलशाची स्थापना
करून सरस्वतीचे निरंतर स्मरण
करावे. दिवसभर केवळ
दुग्धप्राशन करून श्रीं
ह्रीं सरस्वत्यै नमः या मत्राचा जप करावा.
धर्मशास्त्रांची पुस्तके (रामायण, महाभारत,भागवत इत्यादी) यांची सुध्दा
पूजा करावी. दूसया
दिवशी ब्राह्मणाची पाद्यपूजा,गंध-पुष्पाने. मिष्टांन्न भोजन, दक्षिणा
व रेशमीवस्त्रदान व ग्रंथ
दान करावे.
४)परमानंदरूप सावित्री(गायत्री)-
ध्येयः सदा
सवितृमंडल मध्यवर्ती। नारायणः सरसिजासन न्निविष्टः
केयुरवान मकरकुंडलवान् किरीटी। हारी हिरण्मयवपु
र्धृतशंखचक्रः
चार ही वर्ण, वेद,
छंद यांचे मंत्र
तसेच सर्व मंत्र
व तंत्राची जननी आहे.
जपरूपिणी, तपस्विनी, संस्काररूपिणी
आणि ब्राह्मणांची तेजस्वरूप आहे. तीची
कांती शुध्द स्फटीकासमान
आहे. ती शुध्द
सत्त्वगुणमयी सनातनी पराशक्ती
असून परमानंदरूप आहे. ती
परब्रह्मस्वरूप, मुक्तिप्रदायिनी, ब्रह्मतेजोमयी आहे. तीच्या
चरणरजाने संपूर्ण ब्रह्मांड पवित्र होते.
चोवीस अक्षरी गायत्रीमंत्राने
ही देवी प्रसिध्द
झालेली आहे. ही
गायत्री देवी पंचमुखी
असून तीला दहा
भुजा आहेत. ती
उपासकांच्या सर्व कामना
पूर्ण करते. गायत्रीमंत्राचा
उल्लेख वेदांपासून आहे. गायत्रीमंत्राचे
पुरश्चरण(२४लाख वेळा जप)केल्यास
सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. गायत्रीमंत्राचे
ऋषी विश्वामित्र व देवता
सविता, मस्तक ब्रह्मदेव
शिखा महादेव असून
गायत्रीदेवी विष्णुच्या हृदयामध्ये निवास करते.
गायत्रीमंत्राच्या अखंड उपासनेने
विश्वामित्रऋषी प्रतिसृष्टी निर्माण करू शकले.
गायत्रीमंत्रामध्ये विधायक तसेच
विघातक सुध्दा शक्ती
आहे. शास्त्रानुसार गायत्रीमंत्राची उपासना केल्यास
विधायक शक्ती निर्माण
होते तर आपल्याच
मनाने गायत्रीमंत्राची उपासना केल्यास
विघायक शक्ती निर्माण
होते, त्याने उपासकास
पाप भोगावे लागते.
प्राःतकाळी गायत्री रक्तवर्णाने कुमारी रूपामध्ये(आसन
रक्तकमळ), माध्यान्ही सावित्री शुक्ल रक्तवर्णाने
युवतीच्या रूपामध्ये(आसन गरूड), तर
सायंकाळी सरस्वती कृष्णवर्णाने प्रौढरूपामध्ये(आसन-वृषभ) प्रगट होते.
५)प्राणस्वरूप श्रीराधा-
कृष्णार्चायां नाधिकारो यतो राधार्चनं
विना।
वैष्णवैः सकलैस् तस्मात्
कर्तव्यं राधिकार्चनम्
कृष्णप्राणाधिदेवी सा तदधीनो
विभुर्यतः
रासेश्वरी तस्य नित्यं
तया हीनो न तिष्ठति
राध्नोति सकलान् कामास्त
स्माद् राधेति कीर्तिता
नारद-श्रीराधादेवीची पूजा केली
नाही तर मनुष्य
श्रीकृष्णाच्या पूजेचा आधिकारी
होत नाही. म्हूणून
सर्व वैष्णवांनी भगवती श्रीराधादेवीची
पूजा केली पाहिजे.
कारण ती श्रीकृष्णाच्या
प्राणांची अधिष्ठात्री देवता आहे.
म्हणून भगवान हीच्या
अधिन असतात. ही
भगवंताच्या महारासेची नित्य अधिश्वरी
आहे. भगवान श्रीराधादेवी
शिवाय कोठेही जात
नाहीत. श्रीराधादेवी भक्तांच्या सर्व कामना
पूर्ण करते.
ती परमात्मा
श्रीकृष्णाची वामांगार्धस्वरूप(डावे अंग), पंचप्राणस्वरूप,
(१.प्राण(हृदयामध्ये)-श्वास व प्रश्वास,
२.समान(बेंबीमध्ये)-संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण, ३.व्यान(शरीरामध्ये सर्वव्यापी)- संपूर्ण शरीरामध्ये प्राणवायुचे प्रसारण,४.उदान(गळ्यामध्ये)स्वर उच्चार, ५.अपान(गुदेमध्ये)-मलमूत्र त्याग), परम सुंदरी,
श्रीकृष्णाची प्राणप्रिय, सर्वगुणसंपन्न, परम आल्हादस्वरूप,
आत्मस्वरूप, निर्गुण-निराकार, निर्लिप्त, सौभाग्यमानिनी, गौरवमयी, सनातनी, पूजनीय आहे.
रासक्रिडेची अधिष्ठात्री
देवी. गोलोक निवासी, श्रीराधादेवी सर्वतीर्थमय, सर्वैश्वर्यमयी आहे. तीच्या
चरणरजाने संपूर्ण पृथ्वी पवित्र
होते. मुकुट मोरपंखाने
तर कंठामध्ये मालतीची माळ, हातामध्ये
बासरी व रत्नमय
अलंकार. वराहकल्पामध्ये वृषभानु-पुत्रीरूपाने वृंदावनामध्ये प्रगट. ब्रह्मदेवाने
आत्मशुध्दीसाठी ६०,०००वर्षे तप केले,
परंतू प्राणस्वरूप श्रीराधादेवीचे दर्शन झाले
नाही. श्रीकृष्णासाठी वृंदावनामध्ये प्रगट, श्रीवृषभानुपूरीमध्ये
भाद्रपद शुक्ल अष्टमीला
माध्यान्हीला प्रगट. तेथे
ब्रह्मदेवास दर्शन झाले.
जो मनुष्य श्रीराधादेवीचे
नित्य स्मरण करतो
त्यास सर्व प्रकारची
विद्या,धन, सुख, विवेक,प्राप्त
होते, तसेच तो
सर्वगुणसंपन्न होतो, तो
निष्काम होऊन त्यास
मोक्षप्राप्ती होते.
No comments:
Post a Comment