आपल्या
सर्व वाङ्मयांमध्ये समर्थांनी अंतःकरण ओतले. पण
आत्मारामामध्ये त्यांचे हृदय सापडते.
म्हणून बध्दानेच नव्हेतर सिध्दाने सुध्दा आत्मारामा
पासून परमार्थ शिकावा.--- ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज.
आत्माराम
समास पहिला त्याग
निरूपण
जयास लटिका आळ
आला । जो माया गौरी
पासूनि जाला । जालाचि नाही
तया अरूपाला । रूप कैचे ?।।१।।
परमात्मा वस्तूवर खोटा आरोप
झाला तो मायारूपी
आदिशक्तीमुळे निर्माण झाला. खरे
तर परमात्मा झालाच नाही
तरी रूपाचा संबंध
नसलेल्या परमात्म वस्तूला रूप असणे
शक्य नाही.
तेथे स्तवनाचा
विचार । न घडे निर्वीकारी
विकार । परी तयास नमस्कार
। भावबळे माझा
।२।। तेथे स्तवन
करण्याचा विचार करता
येत नाही कारण
तो निर्विकार आहे. तरी
तो आहेच या
खात्रीने मी त्यास
नमस्कार करतो. जयाचेनि
वेदशास्त्र पुराणे ।
जयाचेनि नाना निररूपणे
। जयाचेनि स्वसुखा लाधणे। शब्दी
निःशब्द ।।३।।ज्याच्या प्रेरणेने वेदशास्त्रे पुराणे आत्मज्ञान
सांगतात. ज्याच्या कृपेने आत्मानंद
मिळतो. तो शब्दाच्या
पलिकडे असणारा त्याचा
अनुभव शब्दामध्ये घालण्यास कठीण आहे.
जे शब्दास आकळेना
। जे शब्दविण
सहसा कळेना ।
कळले ऐसेही घडेना
। जिये स्वरूपी
।।४।। जे स्वरूप
शब्दाने कळत नाही.
ते शब्दाशिवाय सुध्दा समजत
नाही. ते कळले
असेही घडत नाही
कारण ते स्वरूप
प्राप्त झाल्या नंतर
कळण्याची जाणिव रहात
नाही.
ऐसे सदा
सर्वत्र संचले ।
जे तकर्ा न
वचे अनुमानले । ते जयेचेनि प्राप्त झाले । आपरूप आपणासी
।।५।। ते स्वरूप
निरंतर सर्वत्र आहे. ते
तकर्ाने जाणणे अशक्य
आहे. ते त्याच्याच
कृपेने आपणास प्राप्त
होते. नमन तिचीया
निजपदा । माया वाग्देवी शारदा ।
जयेचेनि प्रवर्तती संवादा ।
संत माहानुभाव ।।६।। वाणीची
देवता शारदेच्या चरणांसी माझा नमस्कार
असो. ज्ञानीजन शारदेच्या प्रेरणेने परमात्मास्वरूप सांगण्यास प्रवृत्त होतात. आता वंदीन
सद्गुरूस्वामी । जेथे राहिले तोचि
मी । आणि निवारिली निजधामी । पाचही
जेणे ।।७।। आता
सद्गुरूस्वामींना वंदन करतो.
तेच माझे स्वरूप
आहे. तेथे पंचमहाभूतांचे
विश्व विरून जाते.
तया निजपदाकडे । आनंदे
वृत्ति वावडे ।
पद लाधलिया जडे । तद्रूप होऊनि
।।८।। त्या आपल्या
मूळ स्थानाकडे मन आनंदाने
जोरात जाते. तेथे
पोहोचल्यावर स्थिर होऊन
एकरूप होते. स्वामी
कृपेचा लोट आला
। मज सरोवरी
सामावला । पूर्ण
जालिया उचंबळला । अनुभव
उद्गार ।।९।। सद्गुरूंच्या
कृपेने माझे अंतःकरण
भरून जेव्हा वाहू
लागले तेव्हा तो
अनुभव उद्गाररूपाने व्यक्त झाला.
माझे सद्गुरूकृपेचे बळ । मनामाजी साठवले तुंबळ
। तेणे बळे
स्वानंदजळ । हेलाऊ
लागे ।।१०।। माझ्यामध्ये
माझ्या सद्गुरूचे सामर्थ्य आहे. तो
परमानंद उचंबळत आहे.
आता नमस्कारीन राम । जो योगियांचे
निजधाम । विश्रांति
पावे विश्राम । जये ठायी ।।११।।
आता मी श्रीरामास
नमस्कार करतो. जो
योग्यांचे निजधाम आहे.
तेथे योग्यांना विश्रांती लाभते. जो
नावरूपा वेगळा ।
जो ये मायेहून
निराळा । जेथे जाणिवेची कळा । सर्वथा न
चले ।।१२।। तो
श्रीराम नामरूपाहून भिन्न आहे.
तो मायातीत आहे. ते
स्वरूप जाणण्याची शक्ति मनुष्याच्या
ठिकाणी नाही. जेथे
भांबावला तर्क । जेथे पांगुळला
विवेक । तेथे शब्दांचे कौतुक ।
केवी घडे ।।१३।।
ते स्वरूप तकर्ाने
सिध्द होत नाही.
विवेकाने जाणता येत
नाही. म्हणून त्याचे
वर्णन शब्दाने करता येत
नाही. जयालागी योगी उदास
। वनवासी फिरती
तापस । नाना साधनी सायास
। जयाकारणे ।।१४।। त्या
परमात्म्याच्या दर्शनासाठी सर्वत्याग करतात. अरण्यामध्ये तप करतात.
अनेक प्रकारची साधना करतात.
ऐसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम । उपमाच
नाही निरोपम ।
रूप जयाचे ।।१५।।
असा श्रीराम सर्वांचा अंतरात्मा आहे. तोच
सगुण, निर्गुण व पूर्णकाम
आहे. त्याला कशाचीही
उपमा देता येत
नाही असे त्याचे
रूप आहे. आता
वंदीन संत सज्जन
श्रोते । जे कृपाळू भावाचे
भोक्ते । माझी वचने प्राकृते
। सांगेन तयापासी
।।१६।। आता संत
सज्जन श्रोते यांना
वंदन करतो. जे
दयाळू व रसिक आहेत. माझे
साधे मराठी बोलणे
त्यांना सांगत आहे.
तयाचे वर्णावे स्वरूप ।
तरी ते स्वरूपाचेचि
बाप । जे वेदांसि सांगवेना रूप । ते जयाचेनि
प्रगटे ।।१७।। त्यांचे
स्वरूप सांगणे कठीण
आहे कारण ते
आत्मस्वरूपाहून थोर आहेत.
जे वेदांनाही अशक्य ते
हे संत प्रगट
करून घेतात. आता
शिष्या सावधान ।
ऐक सांगतो गुह्यज्ञान
। जेणे तूझे
समाधान । आंगी बाणे ।।१८।।
आता शिष्या सावधान
होऊन एकचित्ताने ऐक. तूला
मी गुढ आत्मज्ञान
सांगतो आहे ज्यामूळे
तूला समाधानाचा अनुभव प्राप्त
होईल. तुवा शंका
नाही घेतली ।
परंतू मज तूझी
चिंता लागली ।
का जे तुझी
भ्रांति फिटली ।
नाहीच अद्यापि ।।१९।। तु
शंका घेतली नाहीस.
परंतू मलाच तूझी
काळजी लागली. कारण अजून
तूझा भ्रम नाहीसा
झालेला नाही. दासबोधीचे
समासी । निर्मूळ
केले मीपणासी । तया निरूपणेही वृत्तीसी । पालट दिसेना ।।२०।।
दासबोधामध्ये मी देहाभिमान
नष्ट करावा हा
उपदेश केला तरी तूझ्या
आचरणामध्ये परर्व्तन झालेले नाही.
म्हणूनी न पुसता
सांगणे । पडले शिष्या तुजकारणे
। आता तरी
सोय धरणे । श्रवण मननाची
।।२१।। म्हणून तू
काही न विचारता
तूला सांगण्याचा प्रसंग आला.
आता तरी श्रवण
मननाची सवय करून
घे. चातकपक्षी वरीचा वरी
। चंचू पसरून
थेंबुटा धरी । जीवन सकळही
अव्हेरी । भूमंडळीचे
।।२२।।
ज्याप्रमाणे चातकपक्षी जमिनीवरचे पाणी सोडून
फक्त पावसाचे पाणी वरच्या
वर पितो त्याप्रमाणे
विश्वमाया सोडून एकाग्रतेने
परमात्म्याचे चिंतन करावे.
तैसा शब्दवरूषाव
होता । असो नेदावी वेग्रता
। श्रवणपुटी सामाविता । मनन करावे ।।२३।।
गुरूवचनांचा वर्षाव सूरू
झाला की एकाग्रतेने
ते श्रवण करून
त्याचे मनन करावे.
लागवेग जाणोन शब्दांचा
। आवाका पहाव
मनाचा । शब्दाआतील
गर्भाचा । सांटावा
घ्यावा ।।२४।। बोलणायाच्या
शब्दांचा संदर्भ ओळखून
बोलण्याचा हेतू जाणावा.
त्या शब्दांतील सारांश मनामध्ये
साठवावा. अरे तू कोण ? कोणाचा ? कोठोनि
आलासि कैचा? ऐसा
विचार पूर्वीचा । घेई बापा ।।२५।।
अरे बाबा तू
कोण आहेस ? कोणाचा आहेस?
तू येथे कोठून
आलास ? याचा विचार मनामध्ये
कर. अरे त्वां
जन्मांतर घेतले ।
काय मानितोसी आपुले ।
ऐसे तुवा विचारले
। पाहहिजे आता ।।२६।।
अरे तू आतापर्यंत
अनेक जन्म घेतले
आहेस. ते आपले
मानतोस ते खरे आहे का याचा शोध आता
तूला केला पाहिजे.
येथे तुझे काहीच
नाही । भुलला
आहेसी काई । चुकोनि आलासि
जाई । जेथीचा
तेथे ।।२७।। या
जगात तुझे असे
काहीच नाही. अज्ञानाने
त्या जगामध्ये भुलला आहेस.
चूकुन येथे आलास
तरी आता मऊळ
ठिकाणी गेले पाहिजे.
तू समर्थांचे लेकरू ।
अभिमाने घेतला संसारू
। अभिमान टाकिता
पैलपारू । पावशील
बापा ।।२८।। तू
परमेश्वराचे लेकरू आहेस.
परंतू देहाभिमानाने संसारामध्ये अडकलेला आहेस. तो
देहाभिमान सोडून देशील
तर मुक्त होशील.
ईश्वरापासून जालासी ।
परी तू तयासी
चुकलासी । म्हणोनि
हे दुःख भोगिसी
। वेगळेपणे उत्कट ।।२९।।
तू परमेश्वरापासून निर्माण झालास. परंतू
त्यालाच तू विसरलास.
त्यामुळेच वेगळेपणाचे
दुःख भोगावे लागत
आहे. त्यागिसी सकळ वैभवाला
। आणि विश्वाससी
माझिया बोला । तरि मी घालीन रे
तुजला । जेथील
तेथे ।।३०।। तू
सर्वस्वाचा त्याग करून
माझ्या वचनांवर विश्वास ठेवलास तर
मी तूला नक्की
मुक्त करेन. तुझे
अढळपद गेले । तुज मायेने
वेढा लाविले ।
ते जरी तुझे
तुज दिधले ।
तरी मज काय देसी ।।३१।।
तू तूझे शाश्वत
मुळ स्थान सोडून
मायेमध्ये गुंग झाला
आहेस. ते शाश्वत
मुळ स्थान मी
तूला पुन्हा मिळवून
दिले तर तू मला काय
देशील. जितुके काही
नासोन जाईल । जे अशाश्वत
असेल । तुज समागमे न
येईल । तितुकेच
द्यावे मज ।।३२।।
जे जे नाशिवंत
आहे. जे अंतकाळी
आपल्या बरोबर घेऊन
जाता येत नाही.
ते ते सर्व
मला मनोभावे द्यावे. मजहि ते
काय करावे ।
परी तुजपासून टाकावे ।
तुवा टाकिले तरी
न्यावे । तुज समागमे ।।३३।।
ते मला नकोच
आहे फक्त तू
टाकावे म्हणून सांगितले.
तू जेव्हा या
सर्वाचा त्याग करशील
तेव्हा मी तूला
माझ्या बरोबर शाश्वत
मुळ स्थानी घेऊन
जाईन. अरे भूषण
भिक्षेचे सांडिले । आणि राजपद प्राप्त
जाले । तरी तुझे काय
गेले । सांग बापा ।।३४।।
भिक्षा मागून जरी
कोणास राज्य प्राप्त
झाले तरी तूझे
काही नुकसाव झाले
काय.
नाशिवंत तितुकेचि देसी । तरी पद प्राप्त निश्चयेसी ।त्यामध्ये लालूच करिसी
। तरी स्वहित
न घडे ।।३५।।
नश्वर जगाचा त्याग
केला तरच मुक्ती
प्रात होईल परंतू
जर जगाच्या मायेमध्ये आसक्त झालास
तर आत्मकल्याण होणार नाही.
तो शिष्य म्हणे
जी दिधले ।
स्वामी म्हणती पद
लाधले । आता तू आपुले
। काही मानू
नको ।।३६।। तेव्हा
तो म्हणाला मी सर्वस्वाचा
त्याग केला आहे.
त्यावर स्वामी म्हणाले
तू आत मुक्त
झाला आहेस. आता
तू काहिही आपले
मानू नकोस. इतुके
स्वामी बोलिले। आज्ञा घेऊन
निघाले । तव शिष्ये विनविले
। विनीत होऊनी
।।३७।। असा उपदेश
करून स्वामी निघाले.
तेव्हा शिष्य नम्रपणे
विनंती करतो. आता
पुढिलीये समासी ।
संवाद होईल उभयतांसी
। तेणे स्वानंदसिंधुसि
। भरिते दाटे
बळे ।।३८।। आता
पुढच्या सामासामध्ये गुरूशिष्य संवाद होईल.
त्याने अंतःकरण परमानंदाने भरून वाहू
लागेल. इति श्री
आत्माराम । रामदासी
पूर्णकाम । ऐका सावध, वर्म
। सांगिजेल पुढे ।।३९।।
येथे आत्मारामाचा पहिला समास
पुर्ण झाला. तो
भ्क्तांची इच्छा पुर्ण
करणारा आहे. आता
यापुढे मुक्तीच्या प्राप्तीचा सारांश सांगणार
आहे तो लक्षपुर्वक
एकाग्रतेने ऐकावा. समास दुसरा
माया निरूपण जय जय जी सच्चिदानंदा
। जय जय जी आनंदकंदा
। जय जय जी निजबोधा
। परमपुरूषा ।।१।। हे
सच्चिदानंदस्वरूपा, आनंदस्वरूपा, आत्मस्वरूपा, परमेश्वरा तुझा जय
जय असो. अनंत
ब्रह्मांडाऐसी ढिसाळे ।
मायेने रचिली विशाळे
। ते तुमचे
कृपेचेनि बळे । विरती स्वानंद
डोही ।।२।। मायेने
अगणित विश्वांची रचना केली
ती केवळ ठिसूळ
ढेकळाप्रमाणे आहेत. ते
सर्व तूमच्या आत्मानंदामध्ये विरघळून गेली. आता
स्वामीने जे काही
इच्छिले । ते पाहिजे अंगिकारले
। शरणागत आपुले
। समर्थे उपेक्षू
नये ।।३।। आता
स्वामीने जे काही
मागितले ते दिले
पाहिजे. तेव्हा शिष्याने
शरण येऊन प्रार्थना
केली मला दूर
करू नका. नाशिवंत
काये म्यां टाकावे
। ते मज स्वामीने सांगावे । मज दातारे करावे
। आपणा ऐसे
।।४। मी काय काय नाशिवंत
टाकावे हे मला स्वामीने सांगावे. मला शिकवावे.
आपणासारखे मला करावे.
ऐकोन शिष्याचे बोलणे ।
स्वामी म्हणती सावध
होणे । अवधान
देऊन घेणे । आनंदपद।।५।। शिष्याचे बोलणे ऐकून
स्वामींनी त्याला सावध
होण्यास सांगितले. एकाग्रतेने आत्मानुभूती घेण्यास सांगितली. शिष्या बहू
मन घाली । आता बाष्कळता
राहिली । येथे वृत्ती चंचल
केली । तरी बुसी संदेहसागरी
।।६।। आता उथळपणा
सोडून द्यावा. जर अजून
सुध्दा
वृत्ती चंचळ असेल
तर संशय सागरामध्ये
बूडुन जाशील. अग्निसंगे
लोहो पिटे । तेणे तयाचा
मळ तुटे । मग परिसेसी
झगडता पालटे ।
लोखंडपण तयाचे ।।७।।
लोखंड आगीमध्ये टाकल्यास त्याचा मळ
निघून जातो. नंतर
त्यास परिसाचा स्पर्श झाला
तर त्याचे लोखंडपण
निघून जाते. तयाचा
मळ झडेना ।
तरी ते सहसा
पालटेना । मृत्तिकारूपे
।।८।। लोखंडाचा मळ निघून
गेळळ्याशिवाय त्याचे शुध्दपण
दिसत नाही. तसेच
त्या मळामुळे त्याचे लोखंडपण
निघून जात नाही.
No comments:
Post a Comment