संस्कार या शब्दाचा सरळ
अर्थ आहे शुध्द करणे. अंत:करण शुध्द करणे.
मनुष्य जन्माला
येताना पुर्वजन्मीचे
संस्कार घेऊन
जन्माला येतो.
चांगले संस्कार
असतील तर
ते अधिक
करण्याची गरज
असते. वाईट संस्कार असतील
तर ते
चांगले करण्याची गरज
असते. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये संस्काराला अत्यंत महत्व
दिलेले आहे.
गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळा मध्ये आई, वडिल, आचार्य यांच्याकडून पुत्र किंवा कन्या यांच्यावर त्याच्या कडून सात्विकवृत्ती-आचरण व्हावे म्हणून वैदीक पध्दतीने जे विधी केले जातात, त्यांना संस्कार म्हणतात. त्यामध्ये प्रमुख सोळा आहेत.
१.गर्भाधान संस्कार--गर्भधारणार्थ पत्नीच्या योनिला समर्थ करून तीच्या ठायी परमेश्वर गर्भधारणा करो, गर्भाची वृध्दी सुखकारी होवो अशी परमेश्वराकडे
प्रार्थना केली जाते त्यास गर्भाधान संस्कार म्हणतात.
२.पुंसवन संस्कार--गर्भधारणा झाल्यानंतर पुत्र प्राप्तीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना
केली जाते
त्यास पुंसवन संस्कार म्हणतात.
३.सिमंतोन्नयन संस्कार--पत्नीच्या डोक्यावरचे केस वर करून तीचा चांगला भांग पाडणे. त्यामुळे तीच्या सहस्त्रारातून
चांगल्या लहरी येऊन गर्भाची वाढ चांगली होते. या विधीला
सिमंतोन्नयन संस्कार
म्हणतात. हा संस्कार गर्भधारणे
नंत्तर चौथ्या
महिन्यामध्ये करतात.
४.जातकर्म संस्कार--
हा संस्कार
माझ्या या पुत्रा कडून गर्भातील उदक पिण्यापासून घडलेल्या सर्व दोषांच्या नाशासाठी प्रार्थना, तसेच पुत्राचे आयुष्य,बुध्दी यांची वृध्दी होण्यासाठी प्रार्थना
केली जाते
त्यास जातकर्म
संस्कार म्हणतात.
हा संस्कार
जन्म झाल्यावर
पहिल्यांदा
पुत्रमुख पाहिल्यानंतर करतात.
५.नामकरण संस्कार--आयुष्य वृध्दी, तसेच व्यवहारामध्ये
सिध्दता येण्यासाठी
परमेश्वराकडे प्रार्थना
केली जाते
त्यास नामकरण
संस्कार म्हणतात.
हा संस्कार
जन्मा नंत्तर
१२व्या दिवशी करतात.
६.निष्क्रमण संस्कार--घरा बाहेर नेऊन पुत्रास अष्टदिशा व पंचमहाभूतांच्या हवाली करून परमेश्वराकडे सदैव रक्षणाची प्रार्थना केली जाते
त्यास निष्क्रमण
संस्कार म्हणतात.
हा संस्कार
जन्मा नंत्तर
तिसऱ्या महिन्यामध्ये
जन्मतिथीला करतात.
७.अन्नप्राशन संस्कार--परमेश्वराची
प्रिती होण्यासाठी
आई बाळास पहिला घास भरविते, त्यास अन्नप्राशन संस्कार म्हणतात. हा संस्कार जन्मा
नंत्तर सहाव्या
महिन्यामध्ये
करतात.
८.चौलकर्म संस्कार--आयुष्य,बल,व तेज यांची वृध्दी होण्यासाठी डोक्यावरचे सर्व
केस कापून
फक्त शेंडी ठेवणे, या विधीला
चौलकर्म संस्कार
म्हणतात. हा विधी जन्मा
नंत्तर पाचव्या
वर्षी करतात. त्यामुळे विश्वातील सत्त्वलहरी ब्रह्मरंध्रातूनशरीरा मध्ये येतात.
९.मुंज संस्कार—गायत्रीमंत्राच्या अनुष्ठानासाठी
गुरूगृही जाऊन
ज्ञानसंपादन
करण्यासाठी हा विधी केला जातो. हा विधी जन्मा
नंत्तर पाचव्या
वर्षी करतात.
१०.मेधाजनन संस्कार--वेद ग्रहण करण्याचा संकल्प करणे
या विधीस मेधाजनन
संस्कार म्हणतात.
हा विधी
मुंजीनंतर चौथ्या दिवशी करतात.
११.महानाम्नीव्रत संस्कार--वेदपठणाचा
संकल्प करणे
या विधीस
महानाम्नीव्रत संस्कार
म्हणतात. हा विधी वयाच्या
तेराव्यावर्षी करतात.
१२.महाव्रत संस्कार--आरण्यक पठणाचा संकल्प करणे या विधीस
महाव्रत संस्कार
म्हणतात. हा विधी वयाच्या
चौदाव्यावर्षी
करतात.
१३.उपनिषदव्रत
संस्कार--उपनिषद पठणाचा संकल्प करणे या
विधीस उपनिषदव्रत
संस्कार म्हणतात.
हा विधी
वयाच्या पंधराव्यावर्षी करतात.
१४.गोदानव्रत संस्कार--आचार्यांना
गोदान करणे या
विधीस गोदानव्रत
संस्कार म्हणतात.
हा विधी
वयाच्या सोळाव्यावर्षी करतात.
१५.समावर्तन संस्कार--सोडमुंज करून
गुरूगृहातून
स्वगृही परत येणे या विधीस समावर्तन
संस्कार म्हणतात.
हा विधी
वयाच्या सोळाव्यावर्षी गोदानव्रता नंत्तर करतात.
१६.विवाह संस्कार--ऋतुमती झालेल्या सवर्णातील कन्येशी समागमाचा चिंतनीय विधी यास
विवाह संस्कार म्हणतात. हा विधी वयाच्या
अठराव्यावर्षी
सोडमुंज झाल्या
नंत्तर करतात.
आजच्या काळामध्ये
किशोर-अवस्था संस्कारक्षम आहे. साधारणपणे बाल्य- अवस्था संपल्या नंत्तर तारूण्य-अवस्था
येई पर्यंतच्या मधल्या कालावधीमध्ये किशोर-अवस्था असते. हा किशोर-अवस्थेचा कालावधी
साधारणपणे वयाच्या आठ वर्षांपासून अठरा वर्षांपर्यंत असतो. किशोर-अवस्था ही
मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची असून या कालावधीमध्ये झालेले संस्कार
जन्मभर लक्षात रहातात. या कालावधीमध्ये मन लवचिक असते. घराच्या बाहेर समाजामध्ये
जाणे-येणे होत असल्याने अनेक व्यक्ती, त्यांचे आचार-विचार यांच्याशी संबंध येतो.
त्यातील काही संस्कार चांगले असतात तर काही संस्कार वाईट असतात. समाजातील कोणत्या संस्काराचे
आचरण करायचे आणि कोणत्या संस्काराचे आचरण करायचे नाही हे ठरविण्यासाठी घरामध्ये संस्कार
होणे अत्यंत महत्वाचे असते. घरामध्ये झालेल्या संस्कारामुळे त्या किशोराची
विवेकबुध्दी पक्की होते. सारा-सार विचार करण्याची
बुध्दी म्हणजे विवेकबुध्दी होय. कशाने आपला उध्दार होईल आणि कशाने आपले
अध:पतन होईल याचा शुध्द विचार म्हणजे म्हणजे विवेकबुध्दी होय. समाजातील कोणते आचरण
अंगिकारायचे आणि कोणत्या आचरणाचा त्याग करायचा हे घरामध्ये झालेल्या संस्कारामुळे
ठरत असते. घरामध्ये संस्कार झालेले नसतील तर किशोर-अवस्थेतील मन अनुभवातून तयार
झालेले नसते. साहजिकच ते मन अध:पतनाकडे जाऊ शकते, कारण त्या वाईट आचरणाचे परिणाम
त्यास माहित नसतात, तसेच वाईट आचरण करणे सोपे असते, तर चांगले आचरण करणे त्यामानाने
कठिण असते.
या किशोर-अवस्थेमध्ये
शारिरीक वाढ झपाट्याने होत असते. दाढी-मिश्यांची लव फुटू लागते. गुप्तभागावर,
काखेमध्ये, छातीवर केस येऊ लागतात. आवाज फुटतो. शुक्रजनन होऊन रेतस-खलन क्षमता
येते. मुलींच्या स्तनभागामध्ये चरबी साठू लागून् त्यांना गोलाई येते. स्तनाग्राची वाढ
होते. रजोदर्शन सुरू होते. अशा सर्व शारिरीक बदलांची शास्त्रीय कारणे आई-वडिलांनी
समजाऊन सांगणे अत्यंत गरजेचे असते. नाही तर गैरसमज वाढतात. कारण या
किशोर-अवस्थेमध्ये सम-वयस्क मित्र-मैत्रिणींचे विचार लवकर पटतात. चांगली संगत
मिळाली तर उत्तम, परंतू कुसंगत मिळाली तर आयुष्य उध्वस्त होऊ शकते. कारण या
किशोर-अवस्थेमध्ये झालेले संस्कार जन्मभर लक्षात रहातात. या कालावधीमध्ये मन लवचिक
असते.
या किशोर-अवस्थेमध्ये समाजातील अनेक व्यक्तींच्या आचार-विचारांच्या देवाण-घेवाणामुळे मानसिकता चौकस होते.
मनामध्ये विचार चिंतन वेगाने सुरू होते.
तसेच या किशोर-अवस्थेमध्ये सम-वयस्क मित्र-मैत्रिणींचे
परस्पर आकर्षण होऊ लागते. त्याचवेळी त्यांना गरजेनुसारच लैगिक-शिक्षण देणे अत्यंत
महत्वाचे असते.
सर्वसाधारणपणे किशोर-अवस्थेचा कालखंड मुला-मुलींच्या
जीवनामध्ये झंझावाताचा, अस्थिरतेचा, संघर्षाचा असतो. उज्वल भविष्याची स्वप्ने,
अंतर्मुख चिंतन, आत्मविश्वास,
अनुकरणप्रियता, नाटकीपणा, विसंगत वर्तन, मनाची चंचलता, इत्यादि वैशिष्टे या किशोर-अवस्थेमध्ये
प्रकर्षाने दिसुन येतात.
घरामध्ये संस्कार प्रामुख्याने आई-वडिलांच्या आचरणामुळेच
होत असतात. हे संस्कार धर्मशास्त्रामध्ये विस्ताराने सांगितलेले आहेत. त्यातील मुळ
दहा-बारा संस्कारांचे आचरण करावे.
या संस्कारांचे मर्म चित्त-वृत्तींच्या निरोधामध्ये आहे. अभ्यास आणि वैराग्य या दोन उपायांनी या चित्त-वृत्तींचा निरोध
करता येतो. चित्त-वृत्तींच्या निरोधासाठी केलेला प्रयत्न म्हणजे अभ्यास होय. हा अभ्यास दीर्घकाळ अखंडपणे केल्यावर दृढ. विषयासक्ति चित्तातून पूर्णपणे नष्ट होणे ते वैराग्य आहे.
पाच प्रकारचे यम आहेत—(१)अहिंसा-विचाराने, बोलण्याने आणि कृतीने कोणाचीही हिंसा करु नये.
(२)सत्य-नेहमी
सत्याचा विचार करावा. सत्य बोलावे व तसेच सत्याचेच आचरण करावे. (३) ब्रह्मचर्य-स्त्री
विषयी काम-आसक्ती करु नये. (४)अस्तेय-दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ करु नये. (५)अपरिग्रह-गरजे पेक्षा आधिक वस्तुंचा साठा करु नये.
तसेच पाच प्रकारचे नियम आहेत—(१)शौच-नेहमी विवेकाने मनाची व सात्विकतेने शरीराची शुध्दता ठेवावी. (२)संतोष-जे काही मिळेल त्यात समाधान मानावे. (३)तप- नेहमी ध्यान-धारणेसाठी मनोनिग्रह करावा. (४)स्वाध्याय-आत्मज्ञान प्राप्तीसाठी उपासना करावी. (५)ईश्वरप्राणिधान-भगवंतावर नितांत श्रध्दा असावी.
तसेच प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचे संयमन करावे. नाक, जिभ, डोळे, त्वचा, कान ही ज्ञानेंद्रिये आहेत. डोळे-रूप,
कान-शब्द, नाक-गंध, जिभ-रस,
त्वचा-स्पर्श हे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. व वाणी, हात, पाय, शिश्न, गुदा ही कर्मेंद्रिये यांना विषयभोगा पासून नियंत्रित करावे. कर्मेंद्रियांच्या ५प्रकारच्या
गती(हात-काम करणे, पाय-चालणे, वाणी-बोलणे, शिश्न-मूत्रत्याग, गुदा-मलत्याग) अशा प्रकारे असतात.
अशा रितीने आजच्या काळामध्ये किशोर-अवस्थेमध्ये संस्कार
केल्यास मनुष्य विवेकसंपन्न होऊन आपल्या जीवनाचा उध्दार करू शकतो त्यासाठी किशोर-अवस्थेमध्ये संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत.
No comments:
Post a Comment