प्राचीन काळातील
घटना आहे. एकदा पृथु नावाच्या राजाने शंभर अश्वमेध यज्ञ
केले. हा पृथुराजा इंद्रासमान अजिंक्य
असून, पृथ्वीसमान क्षमाशील, समुद्रा- समान गंभीर, पर्वतासमान
धैर्यवान, यमदेवासमान प्रशासक, कुबेरासमान
विशाल राजकोष संपन्न, महादेवासमान
तेजस्वी, कामदेवासमान
सौंदर्यवान, सिंहासमान उत्साही, ब्रह्मदेवासमान
सर्वसमर्थ, बृहस्पतीसमान विचारवंत,
व श्रीहरिसमान
जितेंद्रिय होता. एकदा पृथुराजाच्या यज्ञशाळेमध्ये सनकादिक मुनी आले. (सनक,
सनंदन, सनातन, आणि सनत्कुमार हे चार ब्रह्मदेवाचे ब्रह्मनिष्ठ पुत्र)
या सनकादिक मुनींनी पृथुराजास
आत्मज्ञानाचा उपदेश केला.
सनकादिक--हे राजन,
सत्पुरूषांचा सहवास श्रोता व वक्ता अशा दोघांनाही प्रिय असतो, कारण सत्पुरूषांच्या
सहवासामध्ये होणारी चर्चा सर्वांसाठी कल्याणकारी असते. भगवंताच्या चरणकमलांवर
अविचल प्रेम करावे. ते अत्यंत कठीण आहे. ते प्रेम प्राप्त झाल्यावर सर्व विषयवासना नष्ट होतात. विषयवासनेच्या चिंतनाने
च मनुष्यास पुढच्या जन्मामध्ये स्थावरयोनि प्राप्त होते. ही विषयासक्ती
पुरूषार्थ प्राप्तीसाठी अत्यंत बाधक असते.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरूषार्थामध्ये मोक्ष सर्वश्रेष्ठ आहे, कारण इतर
तीन पुरूषार्थांना काळाचे भय असते. अविचल प्रेमासाठी सर्व
नश्वराबद्दल वैराग्य धारण करावे आणि शाश्वताबद्दल दृढ भक्ती करावी. धर्मशास्त्रांवर विश्वास ठेवावा. भागवतधर्माचे आचरण करावे. नेहमी
भगवंताच्या कथांचे श्रवण करावे. निरपेक्षपणे यम-नियमांचे आचरण करावे. (यम-१.अहिंसा,
२.सत्य, ३.अस्तेय, ४.ब्रह्मचर्य, ५.अपरिग्रहता) (नियम—१.शौच,
२. संतोष, ३.तप, ४.स्वाध्याय, ५.ईश्वरप्राणिधान) निरंतर वासुदेवाचे स्मरण करावे. योगक्षेमासाठी प्रयत्न
करू नयेत. नित्य भगवंताचे गुणसंकिर्तन करावे. हा भवसागर पार करणे अत्यंत कठीण आहे.
भगवंताच्या चरणकमलांची नाव(होडी) बनवून सहजपणे हा भवसागर पार करणे शक्य होते. ही साधना
निरंतर केल्याने कालांतरानंतर अहंकारात्मक लिंगशरीर नष्ट होते. विदेह-अवस्था प्राप्त
होते. आत्मज्ञान प्राप्त होते. हाच भागवतधर्म आहे.
No comments:
Post a Comment