दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व
आपल्या संस्कृतीमध्ये
अनेक उत्सव साजरे
केले जातात. त्या
प्रत्येक उत्सवामध्ये आनंद साजरा
करण्याबरोबरच प्रतिकात्मक तत्त्वज्ञान अभिप्रेत आहे. ते
समजून घेऊन ते
उत्सव साजरे केले
पाहिजेत. दिवाळीच्या उत्सवामध्ये आश्विन महिन्यातील
कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरकचतुर्दशी, आश्विन अमावस्या
म्हणजे लक्ष्मीपूजन, तर कार्तीक
महीन्यातील शुध्द प्रतिपदा
म्हणजे पाडवा आणि
कार्तीक महीन्यातील शुध्द द्वितीया
म्हणजे भाऊबीज असे
चार मुख्य दिवस
आहेत. दिवाळी हा
दिव्यांच्या सजावटीचा उत्सव आहे.
आपले जीवन प्रकाशमय
व समृध्द व्हावे
हाच विचार प्रगट
करण्यासाठी दिवाळीच्या उत्सवास विशेष महत्व
आहे. दिवाळीच्या उत्सवामध्ये लहान मुलामूलींना
नवीन कपडे, नवीन
वस्तू तसेच खाण्यासाठी
मिठाई असे उत्साहाचे
वातावरण असते.
नरकासूराच्या सैतानी वृत्तीचा
नाश श्रीकृष्णाने आश्विन कृष्ण
चतुर्दशीच्या दिवशी केला.
तो आनंदोत्सव हे या नरकचतुर्दशीचे महत्व आहे.
या दिवशी पहाटे
अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.
आपल्या मनातील दुष्ट
प्रवृतींचा नाश करून
मनाची विशालता वाढविणे हे या दिवसाचे महत्त्व आहे. मी
आणि माझे घर
ही संकुचित वृत्ती सोडून
हे सर्व विश्व
माझेच आहे आणि
मी विश्वाचा आहे, त्या
विश्वातील प्रत्येक घटकांची मी सेवा
करेन अशी विश्व
व्यापकता आपल्या अंगी
निर्माण झाली पाहिजे.
तसेच अभ्यंगमर्दनाने शरीर निरोगी
व सशक्त होते.
आश्विन अमावस्येला
लक्ष्मीचे पूजन करून
कृतज्ञता व्यक्त केली
जाते. लक्ष्मीचे पावित्र्य टिकविणे हा थोर विचार येथे
प्रगट होतो. धन-संपत्तीचा अहंकार होऊ
नये यासाठी भगवंताची
कृपा प्राप्त करून घेणे
यासाठी लक्ष्मीपुजन आवश्यक असते.
कार्तिक शुध्द प्रतिपदेला
भगवंताने असुरी वृत्तीच्या
बळीराजास पाताळामध्ये धाडले त्याचा
आनंदोेत्सव साजरा केला
जातो. बळीराजाला दानधर्माचा अहंकार झालेला
होता. हा सात्विक
अहंकार सुध्दा मनुष्याच्या
उध्दारामध्ये विघ्न आणतो
ही शिकवण या
प्रसंगामधून आपण लक्षात
घेतली पाहिजे. कार्तीक प्रतिपदा हा पाडव्याचा
दिवस व्यापारी नवीन वर्षाचा
प्रथम दिवस आहे.
व्यापारी मंडळी या
दिवशी आपल्या हिशोबांच्या
नवीन वह्यांची पूजा करून
नवीन वर्षाच्या उद्योगधंद्याची सुरवात करतात.
या दिवशी पत्नीने
पतिराजास औक्षण करण्याची
पध्दत आहे. पति-पत्नीचे
अतूट नाते अखंडीत
रहावे हा उद्देश
येथे प्रतिकात्मक रितीने व्यक्त
केलेला दिसून येतो.
त्यानंतर दुसया दिवशी
कार्तिक शुध्द द्वितीयेला
म्हणजे भाऊबीजेला भावाला बहिणीने
औक्षण करण्याची पध्दत आहे.
या दिवशी यमुनेने
यमराजाला म्हणजे आपल्या
भावाला प्रसन्न करून बहिण
भावाच्या प्रेमाचे वरदान मागून
घेतले म्हणून बहिण
भावाचे प्रेम अतूट
रहावे हाच विचार
येथे व्यक्त होतो.
भावाने बहिणीचे संरक्षण करण्याचा तो एक संकल्प आहे.
अशा रितीने पति
पत्नी, लहान मुले
मूली, बहिण, भाऊ
अश्या सर्वांसाठी दिवाळी हा
उत्सव आपल्या संस्कृतिमध्ये
एक महत्त्वाचा घटक आहे.
परंतू आजच्या काळामध्ये
आपल्या संस्कृतीचे महत्त्व लक्षात न
घेता पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव प्रत्येक
ठिकाणी दिसून येतो.
पाश्चात्य संस्कृतीमध्ये आणि आपल्या
संस्कृतीमध्ये मुलतःच जमिन
आसमाना इतका मोठा
फरक आहे. आपली
संस्कृती मोक्षप्रधान व त्यागाची
आहे. तर पाश्चात्य
संस्कृती फक्त भोगप्रधान
आहे. भोगप्रधान विचारधारा वरवर इंद्रियांना
कीतीही सुखावह वाटली
तरी शेवटी ती
विषकन्ये प्रमाणे घात करते,
तर मोक्षप्रधान विचारधारा मनुष्याचा उध्दार करते,
त्यासाठी धर्म व मोक्ष हे
मुख्य पुरूषार्थ जाणून मनुष्य
जीवन कसे जगावे
याचे मार्गदर्शन आपल्या संस्कृतीमध्ये
सांगितलेले सर्वांच्या कल्याणासाठीच आहे. आपल्या
संस्कृतीमध्ये प्रत्येक मनुष्याने दुसयांसाठी त्याग करावा
हे सांगितलेले आहे. तर
पाश्चात्य संस्कृतीमध्ये प्रत्येक मनुष्याने दुसयाकडून भोग कसा
घ्यावा हे सांगितलेले
आहे. जे सुख आनंद त्यागामध्ये
आहे ते भोगामध्ये
कदापीही नाही हे
समजून घेतले पाहिजे.
अलिकडे पाश्चात्य संस्कृतीमधील विचावंतांना आपले तत्त्वज्ञान
समजू लागले आहे.
ते आपल्या संस्कृतीचे
महत्त्व जाणू लागलेले
आहेत. परंतू आपणच
आपल्या संस्कृतीचे महत्त्व विसलेलो आहे हेच
मोठे दुर्दैव आहे.
आतषबाजीच्या नविन नविन
शोधामुळे धूराचे, ध्वनींचे व विचारांचे
प्रदुषण वाढत चालले
आहे. त्यामुळे आपले आचरण
अधोगतीला जाऊ लागलेले
आहे. तसेच विनाकारण
पैशाचा धूर होत
आहे. उदा. दहा
हजार, पन्नास हजार
फटाक्यांची माळ वाज्विणे
असा अतिरेक अनेक
ठिकाणी दिसून येतो.
ही दिवाळीच्या मंगल सणाची
चेष्टा आहे. कारण
दिवाळी हा लक्ष्मीपूजनाचा
सण आहे तर आपण त्या
पैशाची किंमत न
करता त्याची उधळपट्टी
करतो. हे चूकीचे
आहे. तरी दिवाळीच्या
सणाचे सांस्कृतिक महत्व लक्षात
घेऊन त्याची जोपासना
करण्यामध्ये शहाणपणा आहे. त्यामध्ये
आपले व सर्वांचेच
कल्याण आहे हा विचार लक्षात
घेऊन दिवाळी साजरी
करावी.
या दिवाळी
निमित्त आपल्या जीवनामध्ये
ज्ञानाचा प्रकाश व
सद्गुणांची समृध्दि व्हावी हीच
शूभेच्छा
! ! !
No comments:
Post a Comment