Wednesday, 1 November 2017

देवीभागवताचे स्थान


  या  देवी  सर्वभूतेषु  विष्णुमायेति  शब्दिता।नमस्तस्यै  नमस्तस्यै  नमस्तस्यै  नमो  नमः।  बुध्दि,  शक्ति,  श्रध्दा,  लक्ष्मी,मातृ,भक्ति।  सर्व  मंगलमांगल्ये  शिवे  सर्वार्थसाधिके।शरण्ये  त्र्यंबके  गौरी  नारायणि  नमोस्तुते  शरणागत  दिनार्त  परित्राण  परायणे   सर्वस्यार्ति  हरे  देवि  नारायणि  नमोस्तुते

पुराणांमध्ये  श्रीमद्  देवीभागवताचे  स्थान  अत्यंत  मोठे-वेदतुल्य,  पवित्र,  मातृदेवतेची  उपासना,भगवतीची  वाङमयीन  मूर्ति-शाक्त  भागवत-सर्वत्र  आदिशक्तीचा  महिमा,  उपासनेचे  वर्णन-शक्तीहीन  मनुष्याचा  सर्वत्र  अवहेलना-शक्तीमुळेच  महत्व-ध्रुव,  प्रल्हाद  यांची  भक्तीशक्ती,  गोपींची  प्रेमक्ती,  हनुमान,भीष्म  यांची  ब्रह्मचर्यशक्ती,  वाल्मिकी,व्यास  यांची  काव्यशक्ती,  भीम,अर्जुन  यांची  पराक्रमशक्ती,  हरिश्चंद्र,युधिष्ठिर  यांची  सत्यशक्ती,  शिवाजी,राणा  प्रताप  यांची  वीरशक्ती,इत्यादी-तीच  आदिशक्ती-संसार  बंधनातून  मुक्तीसाठी  भगवतीस  शरणागती  हेच  मनुष्यमात्राचे  अंतीम  ध्येय-श्रीमद्  देवीभागवत  सारस्वत  कल्पातील  तर  श्रीमद्  भागवत  पाद्म  कल्पातील.महर्षी  व्यासांनी  जनमेजय  राजास  हे  देवीभागवत  सांगतले.  आपल्या  पित्याच्या  सद्गतीसाठी  जनमेजयाने  भगवतीची  विधीवत  पूजन,चिंतन  करून  नऊ  दिवस  हे  देवीभागवत  श्रध्देने  श्रवण  केले,तेव्हा  त्याला  साक्षात्कार  झाला  कि  आपल्या  पित्याने  भगवतीच्या  परमधाम  मणिद्विपामध्ये  स्थान  प्राप्त  केले.आपल्या  पित्याची  अशी  दिव्य  सद्गती  पासून  अत्यानंद  झाला.-तिन्ही  लोकांची  जननी  साक्षात्  सनातन  भगवतीचा  महिमा  वर्णन-जो  दररोज  अर्धा-पाव  श्लोकाचे  पठण,श्रवण  करतो  त्यास  परमगति  प्राप्त,  पुत्रहिनास  पुत्रप्राप्ती,धनार्थीस  धनप्राप्ती,  विद्यार्थीस  विद्याप्राप्ती,क्षयरोगमुक्ती-ज्या  घरामध्ये  दररोज  श्रीमद्  देवीभागवता  चे  पुजन  ते  घर  तीर्थस्वरूप-घरातील  सर्वांचे  पाप  नष्ट,संकटे  नष्ट,ऐश्वर्य  प्राप्त,  संधीकाळामध्ये  पठण,श्रवण,चिंतन  केल्यास  ब्रह्मज्ञान  प्राप्ती,ज्ञानसंपन्नता,त्या  घरामध्ये  सरस्वती,लक्ष्मी  यांचा  नित्य  निवास  कृतकृत्यता-शारदीय(आश्विनामध्ये)   वासंतीक(चैत्रामध्ये)  नवान्ह  पारायणाने  शक्तीप्राप्त-जसे  सप्तश्लोकी  गीता,चतुःश्लोकी  भागवत,एकश्लोकी  भागवत,एकश्लोकी  रामायण,  एकश्लोकी  महाभारत  तसेच  अर्धाश्लोकी  देवीभागवत-सर्वं  खल्विद-मेवाहं  नान्यद्  अस्तिसनातनम्‌-१-१५-५२सर्वकाही  मीच  आहे.दूसरे  कोणीही  सनातन  नाही.  पापी,मूर्ख,  नास्तिक,  हिंसाचारी  हे  सर्वजण  श्रवणाने  पवित्र  होतात.घ्जे  याचा  तिरस्कार  करतात  ते  शेकडो  जन्मांमध्ये  दुष्ट  कुत्रे  होतात  यात  शंका  नाही.जो  कधीच  श्रवण  करीत  नाही  तो  डुकराच्या  योनिमध्ये  नरकयातना  भोगतो.  परस्त्री,परधन,ब्राह्मणधन,  लुटणारे   भगवतीचा  द्वेष  करणारे  याचे  अधिकारी  नाहीत.



 देवीभागवत  सार
 काळ  कोणासाठीही  थांबत  नाही.  मूर्खांचा  काळ  व्यसनांमध्ये  वाया  जातो,  तर  विद्वानांचा  वेळ  धर्मशास्त्रांच्या  चिंतनामध्ये  कारणी  लागतो.  मूर्खांचा  संपर्क  इंद्रीय-विषयांपेक्षाही  अधिक  अनिष्टकारी  असतो.  तर  विद्वानांची  संगत  अमृतासमान  कल्याणकारी  आहे.  गृहस्थाश्रम  बंधनाचे  कारण  नाही,  जो  मनाने  मुक्त  आहे,  तो  गृहस्थाश्रमामध्ये  ही  मुक्त  होतो.  षडविकार(काम,क्रोध,लोभ,  मोह,मत्सर,अहंकार)  हे  मनुष्याचे  शत्रु  तर  संतोष,समाधानवृत्ती  हे  मित्र  आहेत.  तीर्थक्षेत्रांमध्ये  स्नान  करून  सुध्दा  मन  निर्मळ  होत  नसेल  तर  सर्व  तीर्थयात्रा  निरर्थक  आहे.  शत्रु,मित्र  किंवा  उदासीनता  हे  सर्व  मनाचे  खेळ  आहेत.  द्वैतामुळेच  निर्माण  झालेले  आहेत.  एकात्मता  झाल्यावर  सर्व  भेद  नष्ट  होतात.  कठोर  प्यत्न  करून  सुध्दा  यश  मिळत  नसेल  तर  प्रारब्ध  बलवान  आहे  असे  मानावे.  धर्माचरणाने  सर्व  व्याधी  नष्ट  होतात,   त्यानेच  आयुष्य  वाढते.  जेव्हा  कोणतेही  कर्म  द्रव्यशुध्दी,क्रियाशुध्दी   मंत्रशुध्दीने  केले  जाते,  तेव्हाच  पूर्ण  फळाची  प्राप्ती  होते,  अन्यथा  नाही.  अनितीने  मिळविलेल्या  धनाचा  उपयोग  करून  जरी  पुण्यकर्म  केले  तरी  यश  आणि  फळ  मिळत  नाही.  यज्ञ  करण्यापेक्षा  दुःखी  प्राण्याचे  रक्षण  केल्यास  अधिक  पुण्य  मिळते.  (श्रीकृष्ण  उध्दवास  उपदेश  करतात-सर्वांना  अभय  देणे  हेच  खरे  परम  दान)लोभ  आणि  मोहाने  युक्त  केलेले  दान,तीर्थस्नान,धर्माचे  अध्ययन  हे  सर्व  काही  निरर्थक  होते.  (सुखामध्ये  हसणे   दुःखामध्ये  रडणे  करू  नये)दुःखामध्ये  आपल्यापेक्षा  आधिक  दुःखी  माणसाचा(तर  आपले  दुःख  कमी  वाटते)  तसेच  सुखामध्ये  आपल्यापेक्षा  आधिक  सुखी  माणसाचा  विचार  करावा.(परमसुखाचा)  जसे  इंद्रवारूणाचे  फळ  पिकल्यावर  सुध्दा  गोड  होत  नाही,  तसेच  नास्तिकाने  तिर्थक्षेत्रामध्ये  कोट्यावधी  स्नान  केले  तरी  तो  पवित्र  होत  नाही.  म्हणून  कल्याण  साधण्यासाठी  मनुष्याने  प्रथमतः  मन  शुध्द(अंतःकरणाची  शुध्दता)  केले  पाहिजे.  मन  शुध्द  झाल्यावर  द्रव्यशुध्दी  आपोआप  होते.   या  शिवाय  दुसरा  कोणताच  उपाय  नाही.  पापकर्माचा  उपदेशकर्ता,  पापकर्माची  बुध्दी  देणारा,  पापकर्माची  प्रेरणा  देणारा,  तसेच  पापकर्माचा  साहाय्य  करणारा   या  सर्वांना  पापकर्त्यासमान  पापकर्मफळ  भोगावे  लागते.  उपदेश  करण्यापेक्षा  त्याचे  आचरण  करणारा  श्रेष्ठ  आहे.  क्षणामध्ये  नष्ट  होणारे  हे  मनुष्यशरीर  अत्यंत  दुर्लभ  आहे,  तरी  मृत्युपुर्वी  कल्याण  साधून  घ्यावे.

 स्कंधपुराणानुसार  माहात्म्य
 अध्याय१-निमिषारण्यामध्ये  एकदा  शौनकऋषींनी  व्यासशिष्य  सुतमहाराजांना  विचारले-आपण  आम्हांस  पवित्र  कथा  सांगा.  ज्यामुळे  आम्हांस  सिध्दी  प्राप्त  होतील.  ज्यामुळे  आम्हांस  काहीही   करता  भोग   मोक्ष  दोन्ही  प्राप्त  होईल.
 सुतमहाराज--हे  ऋषींनो  मी  तुम्हांस  सर्व  पुराण-शांस्त्रांचे  सार  सांगतो.  मनुष्यासाठी  देवीभागवताचे  श्रवण  अत्यंत  कल्याणकारी.  कारण  जोपर्यंत  देवीभागवताचे  श्रवण  होत  नाही  तोपर्यंत  मनुष्याची  दुःखे  नष्ट  होत  नाहीत.  व्यासजींनी  हे  देवीभागवत  जनमेजय  राजास  सांगितले.  कलियुगामध्ये  १)धर्माचरण   करणारे,२)सदाचार   करणारे,३)अल्प  आयुष्य  असणारे  यांच्या  कल्याणासाठी  महर्षी  व्यासांनी   या  अमृतमयी  श्रीमद्देवीभागवत  पुराणाची  रचना  केली.  जनमेजय  राजाने  आपल्या  पित्याच्या  सद्गतीसाठी  जगत्‌-जननीची  विधीवत  पूजा  करून  नऊ  दिवस   या  देवीभागवताचे  श्रवण  केले.  नवव्या  दिवशी  आपल्या  पित्यास  दिव्य  गती  प्राप्त  झालेली  पाहून  आनंदीत  झाला.  देवीभागवताचे  श्रवणासाठी  कोणताही  नियम  नाही,  म्हणून  सदासर्वकाळ  श्रवण-पठण  करावे.  तसेच  चैत्र,  आषाढ,  आश्विन,  माघ,   या  चार  महिन्यातील  नवरात्रीमध्ये  श्रवणाचे  विशष  फळ  सांगितले  आहे.  पापी,मूर्ख,मित्रद्रोही,वेदद्रोही,नास्तिक  सुध्दा  देवीभागवताच्या  नवान्ह  अनुष्ठानाने  श्रवणाने  पवित्र  होतात.  जे  फळ  तप,व्रत,यज्ञ,  हवन,जप,  दान,  तीर्थस्नान  इत्यादींनी  प्राप्त  होत  नाही  ते  देवीभागवताच्या  नवान्ह  अनुष्ठानाने  श्रवणाने  प्राप्त  होते.  धर्म,अर्थ,काम,मोक्ष  प्राप्त  होतात.  जो  मनुष्य  आश्विन  शुक्लमहाअष्टमीला  सुवर्णसिहासनासहित  देवीभागवत  ग्रंथाचे  बाह्मणास  श्रध्देने  दान  करतो,  त्यास  देवीचे  परमधाम  प्राप्त.   या  देवीभागवताच्या  श्रवणाने  पुत्रहीनास  पुत्रप्राप्ती,  दरीद्रीस  धनप्राप्ती,  महारोग्यास  रोगमुक्ती,  संतानहिन  स्त्रीस  दीर्घायु  पुत्रप्राप्ती,  भोग  प्राप्ती  तसेच  मोक्षप्राप्ती  होते.  ज्या  घरामध्ये  श्रीमद्देवीभागवताचे  पूजन  होते,  ते  घर  तीर्थस्वरूप  होते,  घरातील  सर्वांचा  पापनाश  होतो.
 अध्याय२)  सुतमहाराज--हे  ऋषींनो,  जगत्जननीच्या  माहात्म्याची  एक  कथा  सांगतो.  एकदा  भगवान  श्रीकृष्णावर  स्यमंतक  मणि  चोरल्याचा  आळ  आला  होता.  तो  मणि  शोधण्यासाठी  भगवान  निघाले.  शोध  घेत  घेत  ते  जांबवानाच्या  गुहेमध्ये  पोहोचले.  भगवंताने  जांबवानाशी  स्यमंतक  मण्यासाठी  सत्तावीस  दिवस  युध्द  केले.  शेवटी  जांबवानाने  भगवंतास  ओळखले.  मणि   आपली  सौंदर्यवान  कन्या  जांबवतीचे  कन्यादान  केले.  तीन  दिवस  गुहा  सापडण्यासाठी   सत्तावीस  दिवस  युध्दाचे  असे  सुमारे  तीस  दिवस   श्रीकृष्ण  परत  घरी  आला  नाही  म्हणून  वसुदेव  काळजीत  पडले,  तेव्हा  नारदमुनी  तेथे  आले  असता  नारदमुनींनी  अंबिकादेवीची  आराधना  करण्यास  सांगितले.   वसुदेवाने   कुलपुरोहित  गर्गाचार्यास  जगदंबेची  नवरात्रविधीनुसार  पूजन  करण्यास  सांगितले   श्रीमद्देवीभागवत  पुराणाचे  नऊ  दिवस  श्रध्देने  श्रवण  केले.  नवव्या  दिवशी  उद्यापन  झाल्यानंतर  अचानक  भगवान  श्रीकृष्ण  जांबवतीसह  घरी  परत  आले.  वसुदेवास  आनंद  झाला.  भगवतीच्या  कृपेनेच  हे  शक्य  झाले.
 अध्याय३)  सुतमहाराज--हे  ऋषींनो,  जगत्जननीच्या  माहात्म्याची  अजून  एक  कथा  ऐका.  प्राचीन  काळातील  प्रसंग-एकदा  श्राध्ददेव  राजाने  वसिष्ठमुनींच्या  अनुमतीने  पुत्रेष्टी  यज्ञ  केला,  परंतु  श्राध्ददेवाच्या  पत्नीने  हवन  करणाया  ब्राह्मणांस  गुपचूपपणे  कन्या  प्राप्तीचा  संकल्प  करण्यास  सांगितले.  कालांतराने  राजास  कन्या  झाली  हे  पाहून  राजाने  वसिष्ठमुनींना  विचारले.  वसिष्ठमुनीं  भगवतीचे  ध्यान  केले.   सर्वांसमक्ष  ती  कन्या  पुत्ररूप  झाली.  त्याचे  नाव  सुद्युम्न.  कालांतराने  महादेवाच्या  आशिर्वादाने  एक  महिना  तो  सुद्युम्न  कन्यारूप  तर  दूसया  महिन्यामध्ये  पुत्ररूप  होऊ  लागला.  तेव्हा  वसिष्ठमुनींनी
 भगवतीचे  ध्यान  केले.  आश्‍विनशुक्ल  प्रतिपदेपासून  नवमी  पर्यंत  श्रीमद्देवीभागवत  पुराणाचे  नऊ  दिवस  श्रध्देने  पठण  श्रवण  केले.  सुद्युम्नाने  भक्तीने   श्रध्देने  श्रवण  केले.  भगवतीचे  ध्यान  केले.  त्यामुळे  त्यास,  पूर्णत्वाने  पुरूषत्व  प्राप्त  झाले.
 अध्याय४)  सुतमहाराज--हे  ऋषींनो,  जगत्जननीच्या  माहात्म्याची  अजून  एक  कथा  ऐका.  प्राचीन  काळातील  प्रसंग-  ऋतवाक  नावाचे  एक  महान  बुध्दीसंपन्न  मुनी  होते.  त्यांना  रेवती  नक्षत्राच्या  गंडांतयोग  मुहूर्तावर  पुत्र  झाला.  तेव्हापासून  ऋतवाकमुनी  शोक   रोगाने  त्रस्त  होऊ  लागले.  क्रोध   लोभाने  आसक्त  झाले.  त्यांची  पत्नी  सुध्दा  दुःखी  असे.  ऋतवाकमुनी  विचार  करू  लागल.  तारूण्यामध्ये  तो  पुत्र  आई  वडिलांस  आपल्या  दुराचाराने  दुःखी  देऊ  लागला.  कुपूत्रामुळे  कूळ  नष्ट  होते,  यश  नष्ट  होते,  जन्मभर  यातना  भोगाव्या  लागतात.  (कुपूत्रामुळे  वंश  नष्ट  होतो,  दुष्ट  पत्नीमुळे  जीवन  नष्ट  होते,  विकृत  भोजनाने  दिवस  व्यर्थ  जातो.  आणि  दुष्ट  मित्रामुळे  सुख  मिळत  नाही.)
 ऋतवाकमुनीने  ज्योतीषशास्त्राचे  आचार्य  गर्गाचार्यांना  याचे  कारण  विचारले.
 गर्गाचार्यां--पुत्राचा  जन्म  अशुभकाळी  झालेला  असल्याने  हे  सर्व  दुःख  आपणास  भोगावे  लागत  आहे.  तरी  आपण  भगवतीची  उपासना  करावी.  क्रोधाने  ऋतवाकमुनीने  रेवती  नक्षत्रास  शाप  दिला  आकाशातून  खाली  पड.  त्याप्रमाणे  ते  रेवती  नक्षत्र  कुमुद  पर्वतावर  पडले.  त्यातून  एक  तेजस्वी  कन्या  उत्पन्न  झाली.  प्रमुचऋषींनी  त्या  कन्येचे  पालन-पोषण  केले.  नामकरण  केले  रेवती.  तारूण्यात  आल्यावर  तीचा  विवाह  करण्याचा  विचार  झाला  तेव्हा  रेवती  नक्षत्रावरच  विवाह  करण्याचा  हट्ट  केला.  तेव्हा  प्रमुचऋषींनी  आपल्या  तपाने  पुन्हा  रेवती  नक्षत्र  आकाशामध्ये  स्थापीत  केले.  त्यानंतर   रेवती  नक्षत्राच्या  मुहूर्तावर  रेवतीचा  विवाह  दुर्दम  नावाच्या  राजाशी  झाला.  एकदा  पुत्रप्राप्तीसाठी  दुर्दम  राजाने  लोमशऋषींकडून  श्रीमद्देवीभागवत  पुराणाचे  नऊ  दिवस  श्रध्देने  श्रवण  केले.  ब्राह्मणास  वस्त्रालंकार-  दक्षिणासह  भोजन  देऊन  विधीवत  उद्यापन  केले.तसेच  राजाने  नवार्णमंत्राचे  हवन  करून  कन्यापूजन  केले.  (पाच  वेळा)  (ॐ  ऐं  हृीं  क्लीं  चामुंडायै  विच्चे  नवार्णमंत्र)
 यथावकाश  भगवतीच्या  कृपेने  राजास  महापराक्रमी,   धर्मज्ञ  पुत्र  प्राप्त  झाला.  हा  सर्व  देवीचा  महिमा  आहे.
 अध्याय५)सुतमहाराज--हे  ऋषींनो,आता  मी  तुम्हांस  श्रीमद्देवीभागवत  पुराणा  चे  श्रवण  विधी  सांगतो.  गणेशउपासक,  सूर्य  उपासक,  किंवा  शैव,वैष्णव,  शाक्त  हे  सर्व   या  श्रीमद्देवीभागवत  पुराणा  चे  श्रवण  अधिकारी.  कारण  सर्व  देवतांसाठी  शक्ती  आवश्यक  आहे.  देवीभागवतामध्ये  शक्तीउपासना  आहे.  वक्ता  वक्तृत्वसंपन्न,  संयमी,शास्त्रजाणकार,  भगवती-आराधना-तत्पर,दयाळु.निर्लोभी,  सावध,धैर्यवान  असावा.  श्रोता  ब्राह्मणभक्त,  देवभक्त,जिज्ञासु,  उदार,विनम्र,  अहिंसक  असावा.  पाखंडी,  लोभी,स्त्रीलंपट,  निष्ठुर,  रागीट  श्रोता  नसावा.  श्रीमद्देवीभागवत  पुराणाची   व्यासपीठाची(वक्त्याची)पूजा  करावी.   भगवतीस  पार्थना  करावी--हे  महामाये,  भुवनेश्वरी,  मी  संसारसागरामध्ये  डुबत  चाललो  आहे,  माझा  उध्दार  कर.  ब्रह्म,विष्णु  महेश  यांची  माता  जगदंबिके  माझ्यावर  प्रसन्न  हो.  कृपा  कर.  मी  आपणास  वारवांर  नमस्कार  करीत  आहे.  त्यानंतर  शांत  चित्ताने  नऊ  दिवस  कथा  श्रध्देने  ऐकावी.  हे  नऊ  दिवस  नऊ  यज्ञासमान  आहेत.  नऊ  दिवस  कुमारीपूजन  करावे.   या  नऊ  दिवसात  केलेले  दान  अनंत  प्रकारचे  फळ  देते.  नऊ  दिवसांनंतर  उद्यापन  करावे.  श्रीमद्देवीभागवत  पुराणाची   व्यासपीठाची(वक्त्याची)पूजा  करावी.  नवार्णमंत्राचे  हवन  करावे.  (ॐ  ऐं  हृीं  क्लीं  चामुंडायै  विच्चे  नवार्णमंत्र)  वक्त्यास  वस्त्र,सुवर्ण,  दक्षिणा   स्वादिष्ट  भोजनाने  संतुष्ट  करावे.  कारण  ब्राह्मण  संतुष्ट  झाल्यावर  सर्व  देवता  प्रसन्न  होतात.  गोदान   भूमीदान  करावे,  कारण  त्याचे  फळ  अक्षय  असते.  श्रीमद्देवीभागवत  पुराण  स्वहस्ते  लिहून  सुवर्णासह  दान  करावी.

No comments:

Post a Comment