सार्थ पितृस्तोत्र
ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार ब्रह्मर्षि रूचि
यांनी पितरांची स्तुति केली.
जे सर्वांना पूजनिय, अत्यंत तेजस्वी, तसेच
दिव्यदृष्टिसंपन्न आहेत, त्या पितरांना मी नमस्कार करतो. जे इंद्र व सर्व
देवता, दक्ष, कश्यप, सप्तर्षि, सूर्य, चंद्र यांच्याहून श्रेष्ठ आहेत, आणि जे इच्छा
पूर्ण करणारे आहेत, त्या पितरांना मी नमस्कार करतो. जे समुद्रामध्ये
रहाणारे आहेत, त्या पितरांना मी नमस्कार करतो. नक्षत्र,
ग्रह, वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी यांच्याहून जे श्रेष्ठ आहेत, त्या पितरांना
मी हात जोडून नमस्कार करतो. जे देवर्षिंचे जन्मदाता, सर्वांना
पूजनिय, तसेच नेहमी अक्षय फळ देणारे आहेत, त्या पितरांना मी हात जोडून नमस्कार
करतो. प्रजापती, सोम, वरूण तसेच योगेश्वरांच्या रूपामध्ये नेहमी स्थित रहाणाऱ्या, पितरांना मी हात जोडून नमस्कार करतो. मी योगदृष्टिसंपन्न
ब्रह्मदेवास आणि चंद्रावर प्रतिष्ठित योगमूर्तिधारी
पितरांना मी नमस्कार करतो. जगतपिता सोमदेवास तसेच अग्निस्वरूप सर्व पितरांना मी नमस्कार
करतो, कारण हे संपूर्ण ब्रह्मांड सोममय व अग्निस्वरूप आहे. सर्व पितरांना मी एकाग्रचित्ताने
पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, ते माझ्यावर प्रसन्न व्हावेत.
जो मनुष्य या भक्तिपूर्वक स्तुतिने पितरांना संतुष्ट करतो, त्यास
उत्तम भोग, आत्मज्ञान, निरोगी-आयुष्य, तसेच मुले-नातवंडे प्राप्त होतात. जो मनुष्य
या भक्तिपूर्वक स्तुतिने श्राध्दतिथीला ब्राह्मण-भोजन समयी पितरांना संतुष्ट करतो,
ते श्राध्द अक्षय
होते, यामध्ये शंका घेऊ नये. अशा प्रकारे सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी पितरांना
संतुष्ट करावे.
नमाम्यहं हषीकेशं केशवं मधुसूदनम् । सूदनं सर्वदैत्यानां
नारायण मनायम् ।
जयन्तं विजयं कृष्णमनन्तं वामनं तथा । विष्णुं विश्वेश्वरं
पुण्यं विश्वात्मानं सुरार्चितम्
।
अनघं त्वघहर्तारं
नारसिंहं श्रियःप्रियम् । श्रीपतिं श्रीधरं
श्रीदं श्रीनिवासं महोदयम्
।
श्रीरामं माधवं मोक्षं क्षमारूपं
जनार्दनम् । सर्वज्ञं
सर्ववेत्तारं सर्वेशं सर्वदायकम्
।
हरिं मुरारिं
गोविन्दं पद्मनाभं प्रजापतिम्
। आनन्दं ज्ञानसंपन्नं
ज्ञानदं ज्ञानदायकम् ।
अच्युतं सबलं चन्द्रवक्त्रं व्याप्त-परावरम् । योगेश्वरं जगद्योनिं
ब्रह्मरूपं महेश्वरम् ।
मुकुन्दं चापि वैकुण्ठमेकरूपं कविं ध्रुवम् । वासुदेवं महादेवं
ब्रह्मण्यं ब्राह्मणप्रियम् ।
गो-प्रियम् गोहितं
यज्ञं यज्ञांगं यज्ञवर्धनम्
। यज्ञस्यापि सुभोक्तारं
वेदवेदांग पारगम् ।
वेदज्ञं वेदरूपं
तं विद्यावासं सुरेश्वरम्
। प्रत्यक्षं च महाहंसं शंखपाणिं
पुरातनम् ।
पुष्करं पुष्कराक्षं
च वाराहं धरणीधरम्
। प्रद्युम्नं कामपालं
च व्यासध्यातं महेश्वरम्
।
सर्वसौख्यं महासौख्यं
सांख्यं च पुरुषोत्तमम्
। योगरूपं महाज्ञानं
योगीशम-जितं प्रियम् ।
असुरारिं लोकनाथं
पद्महस्तं गदाधरम् । गुहावासं सर्ववासं
पुण्यवासं महाजनम् ।
वृन्दानाथं बृहत्कायं
पावनं पापनाशनम् । गोपीनाथं गोपसखं
गोपालं गो-गणाश्रयम् ।
परात्मानं पराधीशं
कपिलं कार्य-मानुषम् । नमामि निखिलं
नित्यं मनो-वाक्काय-कर्मभिः ।
your valuable comments please
you may forward this to your intimates
sanatan-sanskar.blogspot.in
swamiji.mohandas@gmail.com
स्वामी मोहनदास-९४२०८५९६१२
भारतिय तत्त्वज्ञान प्रसारक
No comments:
Post a Comment