शारदीय नवरात्री व्रताची माहिती सांगतो आहे. तसेच वासंतिक नवरात्री असे दोन्ही व्रते आयुष्यवृध्दी करणारी आहेत. वसंत व शरद हे दोन ऋतु आरोग्यास अपायकारी आहेत. रोगांचा नाश करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने दोन्ही नवरात्रीचे व्रत करून चंडिकादेवीचे पूजन केले पाहिजे. अमावस्येस सर्व सामुग्री आणून एकाच वेळी भोजन करावे.(एकभुक्त) प्रशस्त मांडव घालावा. जमिन गोमयाने सारवून घ्यावी. भगवतीसाठी वेदी व प्रवचनकारासाठी उच्चासन करावे. देवीभक्त, सदाचारी ब्राह्मणास आमंत्रित करावे. प्रातःकाळी स्नान कर्म आटोपल्यानंतर त्यास मधुपर्क व अर्घ्य-पाद अर्पण करावे. यथाशक्ती वस्त्र,अलंकार प्रदान करावेत. धन असताना कृपणता करू नये. कारण संतुष्ट ब्राह्मणाद्वारे केलेले कार्य परिपूर्ण होत असते. नउ दिवस भगवतीचे चरित्र पठण-श्रवण करावे. वेदीवर रेशमी वस्त्रे आच्छादीत करावीत. त्यावर महिषासूरमर्दिनीची
प्रतीमा(अष्टादशभुजा) स्थापीत करावी. ती दिव्य वस्त्राने, रत्नमय आभूषणाने, मोत्यांचे हारांनी सजवावी. त्यानंतर प्रार्थना म्हणावी.
करिष्यामि व्रतं मातर्नवरात्रम् अनुत्तमम्। साहाय्यं कुरू मे देवि जगदंब ममाखिलम्
हे
माता, मी सर्वश्रेष्ठ
नवरात्रव्रत करीत आहे, हे जगदंबे या
पवित्र कार्यामध्ये
मला संपूर्ण साहाय्य कर.
त्यानंतर षोडपचारे पजा करावी. नारळ,केळी, संत्री,बेलफळ व
महानैवेद्य समर्पित करावा. भगवतीची नऊ
दिवस त्रिकाळ (प्रातः,माध्यान्ही, सांयकाळी) पूजन,गायन,वादन,नृत्य द्वारा स्मरण करावे. महोत्सव साजरा करावा. यजमानाने नऊ
दिवस जमिनीवर झोपावे. वस्त्र,आभूषण व
सुग्रास भोजनाने कुमारी कन्यांचे पूजन करावे.
एक
वर्षाच्या कन्येचे पूजन ताज्य कारण ती अज्ञानी असते.
दोन
वर्षे पूर्ण झाल्यावर कुमारी कन्येचे पूजन करावे. फळ-आयुष्यवृध्दी
तीन
वर्षे पूर्ण झाल्यावर त्रिमुर्ती कन्येचे पूजन करावे. फळ-पुत्र-पौत्रप्राप्ती
चार
वर्षे पूर्ण झाल्यावर कल्याणी कन्येचे पूजन करावे. फळ-राज्यप्राप्ती
पाच
वर्षे पूर्ण झाल्यावर रोहिणी कन्येचे पूजन करावे. फळ-निरोगी आयष्य
सहा
वर्षे पूर्ण झाल्यावर कालिका कन्येचे पूजन करावे. फळ-शत्रुचा नाश
सात
वर्षे पूर्ण झाल्यावर चंडिका कन्येचे पूजन करावे. फळ-ऐश्वर्यप्राप्ती
आठ
वर्षे पूर्ण झाल्यावर शांभवी कन्येचे पूजन करावे. फळ-युध्दामध्ये विजय
नऊ
वर्षे पूर्ण झाल्यावर दुर्गा कन्येचे पूजन करावे. फळ-परलोकी सुखप्राप्ती
दहा
वर्षे पूर्ण झाल्यावर सुभद्रा कन्येचे पूजन करावे. फळ-मनोरथ-सिध्दी
अकरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या
कन्येचे पूजन निंदनीय आहे.
निरोगी, रूपवान कन्येचेच पूजन करावे. सर्वकार्यसिध्दीसाठी ब्राह्मणकन्येचे
पूजन, विजयप्राप्तीसाठी
क्षत्रिय कन्येचे पूजन, ऐश्वर्यप्राप्ती
साठी वैश्य,शूद्रकन्येचे
पूजन करावे. सप्तमी,अष्टमी, व नवमीच्या रात्री देवीची विशेष पूजा करावी. भगवतीचे पूजन,हवन,कुमारी पुजन, ब्राह्मण पूजन, भगवतीचे महिमा पठण-श्रवण, यथाशक्ती दक्षिणासहित ब्राह्मण भोजन करण्याने नवरात्र-व्रत पूर्ण होते. या व्रतासमान कोणतेच व्रत नाही, कारण या व्रताने धन-धान्यवृध्दी,सुखप्राप्ती,विद्याप्राप्ती,निरोगी आयुष्यवृध्दी,
राज्यप्राप्ती, पापमुक्ती, स्वर्गप्राप्ती, मोक्षप्राप्ती
हे सर्वकाही प्राप्त होते.
No comments:
Post a Comment