Wednesday, 6 September 2017

ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न


उद्याचे  ज्येष्ठ  नागरिकांचे  प्रश्न
 सन  २०२०  नंतर  ज्येष्ठ  नागरिकांसमोर  कोणते  प्रश्न  असतील   त्यांच्या  निराकरणासाठी  कोणते  उपाय  योजावे  ?
 याचे  उत्तर  अगदी  सोपे  आहे.  सुमारे  पंधरा  वर्षांपासून  जसे  शेतजमिन  विकून  त्या  जमिनीवर  रहाण्यासाठी  घरे  बांधणे  सुरू  झाले  तसेच  आज  पासून  पंधरा  वर्षांनंतर  रहाण्यासाठी  घरे  विकून  त्या  जमिनीवर  वृध्दाश्रम  बांधणे  सुरू  होणार  हाच  प्रामुख्याने  भेडसावणारा  गहन  प्रश्न  सन  २०२०  नंतर  ज्येष्ठ  नागरिकांसमोर  उभा  रहाणार  आहे.  त्याचे  निराकरण  करण्यासाठी  वानप्रस्थाचे  आचरण  हा  एका  शब्दामध्ये  सांगता  येणारा  सर्वोत्तम  उपाय  आहे.  कारण  वृध्दाश्रम  हा  केवळ  पर्यायी,  तात्पुरता  उपाय  आहे.
 आता  जरी  संगणकयुग  चालू  असले  तरी  चार  वर्ण   चार  आश्रमांची  व्यवस्था  आपल्या  संस्कृतीमध्ये  केलेली  आहे  तीच  आज  सुध्दा  मनःशांतीसाठी  अत्यावश्यक  आहे.  सारासार  विचार  केल्यावर  हेच  लक्षात  येते  की  आजची  समाज  व्यवस्था  जर  आपली  नाही  आणि  तीचे  दुष्परिणाम  आपण  प्रत्यक्ष  भोगत  आहे  तर  ती  दुसयांची  पाश्चिमात्य  पध्दती  झटकून  देऊन  आपली  समाज  व्यवस्था  स्विकारण्यामध्ये  लाज,  कमीपणा   मानता  मोठेपणा,  अभिमान  मानण्यात  खरी  धन्यता  आहे,  देशाची  वास्तविक  समृध्दी  आहे,  (नुसतीच  देशाच्या  प्रतिज्ञेतील  कोरड्या  शब्दांची  नाही)  असा  विशाल  दृष्टिकोन  प्रत्येक  ज्येष्ठ  नागरिकांच्या  आचरणातून  आज  व्यक्त  झाला  पाहिजे  नाही  तर  उद्या  कीती  हीन  प्रकारचा  समाज  निर्माण  होणार  आहे  याची  कल्पना  सुध्दा  करता  येत  नाही.  त्यांचे  आजारपण,  शरीराची  दुर्बलता,  अनादर,  विचार  भिन्नता,  तिरस्कार,  वेळेचा  निरूपयोग,  व्यसनाधीनता,  असे  असंख्य  प्रश्न  निर्माण  होऊन  त्याचा  एकंदर  समाजावर  अनिष्ट  परिणाम  होतो.  आजच्या  तरूणाला  आपण,  आपली  बायको,  मुले,  आणि  मित्र-मैत्रिणी  या  शिवाय  दुसरे  काही  दिसतच  नाही.  हाच  आजचा  पायाभूत  प्रश्न  आहे.  मुलाचे  लग्न  झाले  की  त्या  जोडप्याला  आई-वडील  सुध्दा  परके  होतात.  त्यांनी  दुसरीकडे  रहाण्याचा  विचार  सुरू  होतो  किंवा  जोडप्याने  दुसरीकडे  रहाण्याचा  विचार  सुरू  होतो.  जनरेशन  गॅपच्या  संयुक्तिक   भ्रामक  विचाराने  तो  तरूण  स्वस्थ  रहातो.  तरूण  पिढीमध्ये  आपल्या  आई-वडीलांच्या  बाबतीत  ही  जाणीव  दिसते  तर  समाजाचे  लांबच  राहिले.  आणि  समाज  हा  तरूण,  वृध्द,  मुले  यांच्या  पासूनच  बनलेला  असतो.

 ज्या  भिन्न  भिन्न  व्यक्तींचा  समाज  बनतो  त्या  व्यक्तींच्या  भिन्न  भिन्न  शारिरीक,  मानसिक,  बौध्दिक,  शक्ति   कर्तृत्व  यांचा  पुर्ण  विचार  करून  आपल्या  संस्कृतीमध्ये  ब्रह्मचर्य,  ग्रहस्थ,  वानप्रस्थ,   संन्यास  या  चार  आश्रमांची  व्यवस्था  केली  आहे.  समाज  परिपुर्ण  समृध्दतेने  वैभव  संपन्न  व्हायचा  असल्यास  त्यासाठी  कोणताही  एक  वर्ग  तेव्हढाच  असणे  उपयोगाचे  नाही.  समतेचे  गोंडस  रूप  धारण  करणारी  स्वतंत्रता-समता-बंधुता  ही  फ्रॆंच  राज्यक्रांतीतून  जन्माला  आलेली  समाजव्यवस्था  ऐकावयाला  आकर्षक  वाटत  असली  तरी  शेवटी  रक्ताचे  पाट  वाहविण्यास  कारणीभूत  झाली.  रोमन  साम्राज्याचा  नाश  वर्णसंकरामुळेच  झाला  असे  वा.  दा.  तळवळकर  चातुर्वर्ण्य  या  पुस्तकात  सांगतात.  तर  वर्णसंकरामुळे  अमेरिकन  लोकांचा  बुद्ध्यांक  उणावत  जात  आहे  असे  एका  जपानी  विचारवंतांनी  केलेल्या  चाचणी  मध्ये  स्पष्ट  झाले  आहे.  भौतिक  समृध्दीसाठी  एकवर्णात्मक  समाजरचना  उपयुक्त  नाही  असे  जस्टिस  वुड्राफ,  रोमारोला,  जॉॅर्ज  डवुर्ड,  मेरिडीथ  टाऊनशेड,  पेट्रिक  गेडेस,  व्हि.ए.स्मिथ,  सिडने  ला,  हेन्रॣ  कॉटन  अशा  अनेक  पाश्चात्य  समाजशास्त्राच्या  विचारवंतांचे  मत  असून  चार  वर्णआश्रम  व्यवस्थेचा  त्यांनी  गौरव  केलेला  आहे.

 पाश्चिमात्य  संस्कृतीमध्ये  फक्त  जगत  राहण्याचा  धर्म  आहे.  हा  पृथ्वीचा,  पार्थिव  मानवतेचा  धर्म  आहे.  बुद्धिविकास  हेच  त्यांचे  ध्येय  आहे.  कार्यक्षम  प्राणशक्ति,  शरीर  आरोग्य,  शरीर  भोग,  बुद्धिप्रणीत,  समाजव्यवस्था  ही  पाश्चिमात्यांची  ध्येये  आहेत.
 आपली  भारतीय  संस्कृती  पाश्चिमात्य  संस्कृतीहून  कमी  दर्जाची  नसून  ती  वेगळीच  आहे  हे  लक्षात  घेतले  पाहिजे.  अनुकरणीय  तर  नक्कीच  नाही.  कारण  भोगप्रधान  विचारधारा  वरवर  इंद्रियांना  कीतीही  सुखावह  वाटली  तरी  शेवटी  ती  विषकन्ये  प्रमाणे  घात  करते.

 भारतीय  संस्कृतीने  प्रत्येक  व्यक्तीला  चार  आश्रम  बनवून  एक  जीवनश्रेणी  बनवून  दिलेली  आहे.  जीवनाचे  चार  स्वाभाविक  भाग  या  आश्रमव्यवस्थेत  पडतात.  पहिला  भाग  विद्यार्थीपणाचा  (ब्रह्मचर्याचा),  दुसरा  भाग  गृहस्थाचा,  तिसरा  भाग  वनांत  जाऊन  राहण्याचा  (वानप्रस्थाचा)  चौथा  भाग  समाजातील  बंधनहीन  मनुष्याचा  (संन्यासाचा),  ब्रह्मचर्याश्रम  एव्हढयाकरिता  होता  कीं  मनुष्याला  पुढे  जे  काय  जाणावयाचे,  करावयाचे,  व्हायचे  असेल  त्याचा  भक्कम  पाया  तयार  व्हावा.  आवश्यक  त्या  कलांचे,  शास्त्रांचे,  ज्ञानशाखांचे  पुर्ण  शिक्षण  या  आश्रमांत  दिले  जात  असे,  नैतिक  स्वभावाला  शिस्त  लावण्याकडे  या  आश्रमांत  विशेष  लक्ष  दिले  जात  असे,  पूर्वकाळी  ब्रह्मचायाला,  विद्यार्थ्याला,  आध्यात्मिक  ज्ञानाचे  वैदिक  सूत्र  शिकवणे  आवश्यक  समजले  जात  असे.  पूर्वकाळी  विद्यार्थ्याचे  हे  शिक्षण  नगरापासून  दूर  असलेल्या  योग्य  परिसरांत  गुरूकुलामध्ये  होत  असे.  आता  हे  शिक्षण  अधिक  बौध्दिक   व्यावहारिक  झाले,  ते  नगरांतून,  विद्यापीठातून  देण्यात  येऊ  लागले,  त्यामध्ये  शील   ज्ञान  यांची  आंतरिक  तयारी  करण्याच्या  कार्याकडे  दुर्लक्ष  करण्यात  येऊ  लागले,  प्रथम  आर्य  माणूस  अर्थ,  काम,  धर्म   मोक्ष  हे  पुरूषार्थ  साधण्यासाठी  बयाच  प्रमाणात  शिकवून  तयार  केला  जात  होता.  गृहस्थाश्रमांत  आल्यावर  तो  ब्रह्मचर्याश्रमांत  मिळवलेले  ज्ञान  आचरणात  आणून,  पहिले  तीन  पुरूषार्थ  या  आश्रमात  तो  मिळवित  असे,  तो  आपले  प्राकृतिक  अस्तित्व,  या  अस्तित्वाचे  स्वार्थ,  जीवनसुख  भोगण्याची  आपली  इच्छा  पुरी  करीत  असे,  तो  समाजाचे  ऋण  फेडीत  असे,  समाजाच्या  मागण्या  पुरवित  असे,  आणि  ही  आपली  जीवनकर्तव्ये  करताना  आपल्या  जीवनाचा  सर्वांत  थोर  हेतु  साधण्याची  तो  तयारी  सुध्दा  करीत  असे.  तिसया  (वानप्रस्थ)  आश्रमात  तो  वनांत  जात  असे  आणि  तेथे  आत्म्याचा  विचार  एकान्तात  करीत  असे,  येथे  त्याला  सामाजिक  बंधने  नसतात.  शेवटच्या  आश्रमात  सर्व  नाती  तो  तोडून  टाकीत  असे   जगभर  फिरण्यास  मोकळा  होत  असे,  सामाजिक  जीवनाच्या  सर्व  प्रकारांपासून  तो  दूर  असे,  त्याविषयी  त्याच्या  मनात  पूर्ण  अनासक्ति  असे,  अगदी  आवश्यक  त्या  देहाच्या  गरजा  शुध्द  प्रकारे  कशातरी  भागवीत  असे,  विश्वात्म्याशी  संपर्क  करण्यात,  शाश्वत  स्थानासाठी  आपल्या  आत्म्याची  तयारी  करण्यात  तो  आपला  बहुतेक  सारा  वेळ  खर्च  करीत  असे.  हे  आश्रमचक्र  सर्व  माणसांसाठी  असे.  परंतू  बहुसंख्य  माणसे  पहिल्या  दोन  आश्रमाच्या  पलिकडे  जात  नसत.  पुष्कळशी  माणसे  वानप्रस्थ  आश्रमात  दिवंगत  होत.  काही  थोडी  माणसेच  शेवटची  अवस्था  गांठीत  आणि  संन्यासाचे  जीवन  व्यतीत  करीत.  पण  ही  गाढ  विवेकाने  निर्मिलेली  आश्रमव्यवस्था  समाजाचा  समतोल  राखण्यासाठी  अत्यंत  उपकारी  दिसून  येते.

 आज  प्रत्येक  ज्येष्ठ  नागरिकामध्ये  सामाजिक  जाणिवच  नाही  हे  खेदाने  नमूद  करावे  लागते  याचे  कारण  शोधायला  गेले  तर  विश्वास  बसणार  नाही.  इतका  सूक्ष्म  विचार,  खोलवर  विचार  केला  तरच  उद्याचा  प्रश्न  सुटणार  आहे.  समाजामध्ये  विवेकाने  निर्मिलेली  ही  आश्रमव्यवस्थेची  जाणिव  रुजू  लागण्याची  शक्यता  आहे.  ही  वानप्रस्थ  आश्रमव्यवस्थेची  जाणिव  प्रत्येक  ज्येष्ठ  नागरिकामध्ये  रुजण्यासाठी  प्रथमतः  चार  वर्णआश्रम  व्यवस्थेचा  अभ्यास  केला  पाहिजे  आहे.  कारण  वानप्रस्थी  एका  रात्रीतून  तयार  होत  नसतो.  या  वर्णआश्रम  व्यवस्थेचे  फायदे  जाणून  घेतले  पाहिजेत.  मनुष्य  जन्माचे  अंतिम  ध्येय  काय  आहे  हे  समजून  घेतले  पाहिजे.  मनुष्यजन्माचे  ध्येय  भौतिक  सुखाचा  उपभोग  हे  नक्की  नाही.  परंतू  आजचा  प्रत्येकजण  भौतिक  सुखाच्याच  मागे  धावतो  आहे.  त्या  क्षणिक  सुखासाठी  संपूर्ण  आयुष्य  खर्च  करतो,  वाया  घालवितो  आणि  एके  दिवशी  मरतो.  तरी  सुध्दा  त्याला  सुख  समाधान  मिळत  नाही.  कारण  सुख  शांती  भौतिक  सुखामध्ये  नसते.  ते  तर  नश्वर  आहे.  त्यामध्ये  कशी  परमशांती  मिळेल.  आत्मानुभूती  हेच  मनुष्यजन्माचे  उद्दीष्ट  आहे.  या  आत्मानुभूतीमध्ये  विश्वबंधुत्वाचा   समदर्शनाचा  विचार  आहे.  वैयक्तीक  पातळीवर  आत्मज्ञानाची  जाण  झाल्यावर  मनःशांती  निरोगी  शरीर  सुख  समाधान  मिळते.  कौटुंबिक  पातळीवर  कुटूंबातील  प्रत्येकाचे  जीवन  सुखी  समृद्ध  होऊन  लहान  मुलांचे  संस्कार  त्याच  वातावरणात  चांगले  होतात.  सामाजीक  पातळीवर  एका  नवीन  समृद्ध  समाजाची  निर्मीती  होऊन  प्रत्येकाची  वैचारीक  क्षमता  उदार,  विशाल  बनते.  राष्ट्रीय  पातळीवर  प्रत्येकामध्ये  विश्वबंधुत्वाची  भावना  निर्माण  होते.  जी  आजच्या  काळाची  खरी  गरज  आहे.  ही  विश्वबंधुत्वाची  भावना  नुसतीच  धोरणे  जाहीर  करून  होत  नसते.  त्यासाठी  प्रत्येकाच्या  हृदयी  विश्वबंधुत्वाची  खरी  तळमळ  असावी  लागते.  तसेच  ही  वर्णआश्रम  व्यवस्था  समजामध्ये  ब्रह्मचर्याश्रमापासून  रूजविण्याचा  प्रयत्न  केला  पाहिजे  तरच  ज्येष्ठ  नागरिकांचे  सर्व  गहन  प्रश्न  हमखास  कायचे  सुटणार  आहेत.  कारण  हा  काही  फक्त  २०२०  नंतरच्या   ज्येष्ठ  नागरिकांचा  प्रश्न  आहे  असे  नाही.  आजचा  बालकवर्ग  सुमारे  ६०  वर्षांनंतर  ज्येष्ठ  नागरिक  होणारच  आहे.  या  दृष्टीने  हा  प्रश्न  फक्त  ज्येष्ठ  नागरिकांचा  नसून  संपुर्ण  समाजाचा  आहे.

 म्हणून  सामाजिक  जाणिवेची,  परिणामांची  विचारक्षमता  येण्यासाठी  समाजातील  प्रत्येक  घटकाच्या  सर्व  शक्तिंचा   गुणांचा  विकास  म्हणजे  व्यक्तिमत्त्वाचा  विकास  होणे  आवश्यक  आहे.  शरीराची  सुदृढता   मनाची  व्यापकता  झालेली  असतील  तरच  विज्ञानाच्या  विकासाचा  विधायक  कार्यासाठी  उपयोग  केला  जातो  नाहीतर  नूसत्या  विज्ञानमयाच्या  विकासाने  विघातक  उपक्रम  निर्माण  होतात  आणि  प्रगती  होत  नाही.  हीच  गोष्ट  आज  प्रत्ययाला  येत  आहे.  विज्ञान  संपन्नतेनंतर  आनंदमयाचा  विकास  होणे  हेच  मनुष्याच्या  जीवनातील  अंतिम  उद्दिष्ट  आहे  आणि  तोच  सर्वांगीण  विकास  आहे.  तसेच  नूसत्याच  आनंदमयाच्या  विकासाने  पाखंडी,  ढोंगी,  कर्मठ  कर्मकांड  या  प्रवृत्ती  बळावतात  आणि  अंतिम  उद्दिष्टाकडे  दुर्लक्ष  होऊन  अनितीचा  प्रभाव  वाढू  लागतो.  आजच्या  तसेच  उद्याच्याही  परिस्थितीचे  मूळ  कारण  हेच  आहे.  त्याचे  निराकरण  करण्यासाठी  वानप्रस्थाचे  आचरण  हाच  सर्वोत्तम  उपाय  आहे.

No comments:

Post a Comment