भगवतीच्या
पूजनाची विशेष माहिती--जो
प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील प्रतिपदेला भगवतीची गाईच्या तुपाने करून
ब्राह्मणांस तूप दान
करतो, तो सदा निरोगी रहातो.
जो प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील द्वितीयेला भगवतीची साखरेने पूजन करून
ब्राह्मणांस साखर दान
करतो, त्यास दीर्घ आयुष्य
प्राप्त होते. जो
प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील तृतीयेला भगवतीची गाईच्या दुधाने पूजन
करून ब्राह्मणांस गाईचे दुध
दान करतो, तो
सर्व दुःखातून मुक्त होतो.
जो प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील चतुर्थीला भगवतीची अनारश्याने पूजा करून
ब्राह्मणांस अनारसे दान
करतो, तो सर्व
विघ्नांतून मुक्त होतो.
जो प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील पंचमीला भगवतीची केळ्यांनी पूजा करून
ब्राह्मणांस केळी दान
करतो, तो बुध्दीमान
होतो. जो प्रत्येक
महिन्याच्या शुक्लपक्षातील षष्ठीला भगवतीची मधाने पूजा
करून ब्राह्मणांस मधाचे दान
करतो, त्यास दिव्य कांती
प्राप्त होते. जो
प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील षष्ठीला भगवतीची मधाने पूजा
करून ब्राह्मणांस मधाचे दान
करतो, त्यास दिव्य कांती
प्राप्त होते. जो
प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील सप्तमीला भगवतीची गुळाने पूजा
करून ब्राह्मणांस गुळ दान
करतो, तो शोकमुक्त
होतो. जो प्रत्येक
महिन्याच्या शुक्लपक्षातील अष्टमीला भगवतीची नारळाने पूजा करून
ब्राह्मणांस नारळ दान
करतो, त्याचा संताप
नष्ट होतो. जो
प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील नवमीला भगवतीची
लाह्याने पूजा करून
ब्राह्मणांस लाह्या दान
करतो, त्यास सुख
प्राप्त होते. जो
प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षातील दशमीला भगवतीची
काळ्या तीळाने पूजा
करून ब्राह्मणांस काळ्या तीळाचे
दान करतो, त्याचे
यमलोकातील भय नष्ट
होते. जो प्रत्येक
महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला भगवतीची दह्याने पूजा करून
ब्राह्मणांस दह्याचे दान करतो,
त्यास भगवतीची भक्ती प्राप्त
होते. जो प्रत्येक
महिन्याच्या शुक्लपक्षातील द्वादशीला भगवतीची चिवड्याने पूजा करून
ब्राह्मणांस चिवड्याचे दान करतो,
त्यास
भगवतीची प्रिती प्राप्त
होते. जो प्रत्येक
महिन्याच्या शुक्लपक्षातील त्रयोदशीला भगवतीची फुटाण्याने पूजा करून
ब्राह्मणांस फुटाण्याचे दान करतो,
त्यास संतान प्राप्त
होते. जो प्रत्येक
महिन्याच्या शुक्लपक्षातील चतुर्दशीला भगवतीची सातूने पूजा
करून ब्राह्मणांस सातूचे दान
करतो, त्यास महादेवाची
भक्ती प्राप्त होते. जो
प्रत्येक महिन्याच्या प्रौर्णिमेला भगवतीची खिरीने पूजा
करून ब्राह्मणांस खिरीचे दान
करतो, त्याच्या पितरांचा उध्दार होतो.
तसेच प्रत्येक रविवारी भगवतीस खिरीचा
नैवेद्य दाखवावा. सोमवारी दुधाचा, मंगळवारी केळ्यांचा, बुधवारी लोण्याचा, गुरूवारी गुळाचा, शुक्रवारी साखरेचा, शनिवारी तुपाचा नेवेद्य
दाखवावा. हे नारदमुनी
भगवतीस प्रसन्न करणारे अजून
एक व्रत सांगतो.
चैत्र महिन्यातील शुक्ल त्रितीयेला
महुआच्या वृक्षामध्ये भगवतीची भावना करून
पूजन करावे. पंचपक्वानांचा
नेवेद्य अर्पित करावा.
वैशाखामध्ये गुळाचा, ज्येष्ठामध्ये मधाचा, आषाढामध्ये
लोण्याचा, श्रावणामध्ये दह्याचा, भाद्रपदामध्ये साखरेचा, आश्विनामध्ये खीरीचा, कार्तिकामध्ये दुधाचा, मार्गशीर्षामध्ये गव्हाच्या खिरीचा, पौषामध्ये लस्सीचा, माघामध्ये गाईच्या तुपाचा, फाल्गुनामध्ये नारळाचा नेवेद्य अर्पित करावा.
अशा
रितीने नारायणऋषींनी नारदमुनींना भगवतीच्या पूजनाची विशेष माहिती
सांगितली. जो अशी भगवतीची विशेष पूजा
करतो, त्यास भगवतीची
दृढ भक्ती प्राप्त
होते.
No comments:
Post a Comment