नारदभक्तिसूत्र
नमस्तुभ्यं
भगवते ज्ञान वैराग्य
शालिने । नारदाय
सर्व लोक पूजिताय
सुरर्षये ।
अथातो भक्तिं
व्याख्यास्यामः ।।१।।
म्हणूनी आता नारदमुनी
।
भक्तिची व्याख्या करी । निरूपण करी
। नारदभक्तिसूत्र ।।१।।
म्हणून आता
(आम्ही) भक्तिची व्याख्या करतो. अथ शब्द आरंभवाचक,
मंगलवाचक -- कार्यसिध्दीसाठी
तीन गोष्टी आवश्यक
१.प्रयत्न,२.काळ,३.दैव--परमभक्ति--वर्णन करू सर्वांगिण
भक्तिचे शुध्द स्वरूप
कथन
सा त्वस्मिन्
परमप्रेमरूपा ।।२।।
ती भक्ति
अशी आहे । परमात्म स्वरूपामध्ये
आहे । परमप्रेमरूप
आहे । निश्चितपणे
।।२।।
ती भक्ति
निश्चितच या अपरोक्ष
परमात्म स्वरूपामध्ये परमप्रेमरूप आहे.भक्तिचे रूप बहिरंग,
प्रेम व्यक्त
अमृतस्वरूपा च ।।३।।
ती भक्ति
अमृतरूप । ती भक्ति शाश्वत
। आणि ती भक्ति चिरंतन
। नक्कीच आहे
।।३।।
आणि ती भक्ति अमृतरूप
आहे.भक्तिचे स्वरूप अंतरंग
आहे.निरपेक्ष प्रेम अमर-मोक्षस्वरूप-हृदयी
प्रगट
यल्लब्ध्वा पुमान् सिध्दो
भवति, अमृतो भवति,
तृप्तो भवति ।।४।।
त्या प्रेमाने
मनुष्य मनुष्य सिध्द
होतो । अमर होतो
। आणि तृप्त
होतो । हा भक्ति-महिमा ।।४।।
जे परमप्रेम
प्राप्त करून मनुष्य
सिध्द होतो, अमर
होतो आणि तृप्त
होतो. लब्ध्वा म्हणजे मिळणे
प्राप्त होणे --
कामना अंतरांतील
सर्व सोडूनि जो
स्वये । आत्म्यात
चि असे तुष्ट
तो स्थित-प्रज्ञ बोलिला ।।२.५५।।
गीताई
परी आत्म्यांत
जो खेळे आत्मा
भोगूनि तृप्त जो
। आत्म्यामध्ये चि संतुष्ट
त्याचे कर्तव्य संपले ।।३.१७।।
यत्प्राप्य न किंचिद्वाछंति,
न शोचति, न
द्वेष्टि, न रमते,
नोत्साही भवति ।।५।।
कशाचीही इच्छा नाही
। शोक नाही
द्वेष नाही । आसक्ती उत्साह
नाही । त्या प्रेमामुळे ।।५।।
ज्या परमप्रेमरूपी
भक्तिला प्राप्त करून (पुरूष)
अन्य कशाचीही इच्छा करीत
नाही, कोणा विषयी
शोक करीत नाही,
कोणाचाही द्वेष करीत
नाही, कोणत्याही वस्तूमध्ये किंवा व्यक्तिमध्ये
आसक्त होत नाही
आणि लौकिक व्यवहारामध्ये
उत्साही होत नाही.
भगवंताचे चिंतन चालू
नित्य निरंतर
न उल्हासे
न संतापे न
मागे न झुरे चि जो । बरे वाईट सोडूनि
भजे तो आवडे
मज ।।१२.१७।।
विषयातील जे भोग ते दुःखास
चि कारण । येती जसे
तसे जाती विवेकी
न रमे तिथे
।।५.२२।।
यज्ज्ञात्वा मत्तो भवति,
स्तब्धो भवति, आत्मारामो
भवति ।।६।।
मनुष्य आनंदी
होतो । देहभान
हरपतो । आत्मरूप अनुभवतो । त्या भक्ति च्या
ज्ञानाने ।।६।।
ज्या (भक्ति)
चे ज्ञान झाल्यानंतर
पुरूष मत्त होतो,
स्तब्ध होतो आणि
आत्माराम होतो.
ज्ञात्वा म्हणजे ज्ञानायुक्त
प्राप्ती -- परिपूर्णता
ज्ञानाशिवाय साधत नाही.
सा न कामयमाना निरोधरूपत्वात् ।।७।।
त्या भक्तिमध्ये कामना नाही । मोह-ममता नाही । इच्छा-अपेक्षा नाही । कारण ती
निर्विकार ।।७।।
ती भक्ति
कामनायुक्त नाही कारण
ती निरोधरूप आहे. प्रेम
करण्यात आनंद --
प्रेमाच्या अपेक्षेमध्ये नाही --
योगश्चित्तवृत्तिनिरोधः ।।२।। पतंजली
योगसुत्र
निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः ।।८।।
सर्व लौकिक
कर्माचे समर्पण ।
वैदिक कर्माचे समर्पण ।
सर्वस्वाचे समर्पण ।
म्हणजे निरोध ।।८।।
सर्व लौकिक
आणि वैदिक कर्माच्या
समर्पणाला निरोध म्हणतात.
जे खासी
होमिसी देसी जे
जे आचरिसी तप
। जे काही
करीसी कर्म ते
करी मज अर्पण
।।९.२७।।
तस्मिन्नन्यता तव्दिरोधिषूदासीनता च ।।९।।
परमेश्वरामध्ये अनन्यभाव । इतर विषयांमध्ये उदासीन ।
असे आचरण । म्हणजे निरोध
।।९।।
परमेश्वरामध्ये अनन्यता आणि त्याच्या
विरूध्द विषयांमध्ये उदासीनता म्हणजे निरोध
होय.
अनन्य-भावे चिंतूनि भजती भक्त
जे मज । सदा मिसळले
त्यांचा मी योग-क्षेम
चालवी ।।९.२२।।
अन्याश्रयाणां त्यागो नन्यता
।।१०।।
इष्ट वस्तु
शिवाय ।अन्य सर्व
वस्तूंचा त्याग ।
ध्यास इष्ट वस्तुचा
निरंतर ।म्हणजे अनन्यता ।।१०।।
(इष्ट वस्तु
व्यतिरीक्त) अन्य सर्व
आश्रयांचा त्याग म्हणजे
अनन्यता धनाश्रय, कर्माश्रय, अन्य जीवाश्रय,
स्वबलाश्रय, देवताश्रय त्याग करून
एकाच परमात्म्याचे चिंतन
सगळे धर्म
सोडूनि एका शरण
ये मज । जाळीन सर्व
मी पापे तुझी
शोक करू नको
।।१८.६६।। गीताई
यज्ञ-दान-तपे केली वेदाभ्यास
हि साधिला ।
तरी दर्शन हे
माझे न लाभे लाभले तुज
।।११.५३।।
लोके वेदेषु
तदनुकूलाचरणं तव्दिरोधिषूदासितानता ।।११।।
परमेश्वर चिंतन व्यवहारामध्ये
। वैदिक कर्मामध्ये
। नित्य उपोसनेमध्ये
। म्हणजे उदासीनता
।।११।।
लोकव्यवहारामध्ये आणि वैदिक
कर्मामध्ये, भगवत्स्वरूप आणि भक्तिला
अनुकूल आचरण करणे
म्हणजेच भगवत विरोधी
व्यवहारांच्या विषयी उदासीन
राहाणे होय. सहा
वृत्ती--१.परमेश्वर प्राप्तीचा दृढ संकल्प,२.मायेचा
त्याग,३.संकटकाळी परमेश्वर हाच एकमेव
आधार, ४.संकटकाळी परमेश्वरावर नितांत श्रध्दा,
५.परमेश्वरचरणी लीन,६.देहाभिमानाचा त्याग
भवतु निश्चचदाढर्यादूर्ध्वं
शास्त्ररक्षणम् ।।१२।।
अनन्यतेचा उदासीनतेचा । दृढ निश्चय व्हावा
। आदर करावा
शास्त्राचा । नित्य
निरंतर ।।१२।।
निश्चय दृढ
झाल्यानंतर शास्त्राचे रक्षण व्हावे.
जे जे आचरितो श्रेष्ठ
ते ते चि दुसरे जन
। तो मान्य
करितो जे जे लोक चालवितात
ते ।।३.२१।।
अन्यथा पतित्याशंख्या
।।१३।।
शास्त्राचा अनादर केल्यास
। होऊ शकते
अधःपतन । बोकाळते
ढोंग ।म्हणून सावध असावे
।।१३।।
अन्यथा अधःपतन
होण्याची भिती आहे.
मी चि कर्मी न
वागेन जरी आळस
झाडुनी । सर्वथा
लोक घेतील माझे
वर्तन ते मग ।।३.२३।।
लोको-पि तावदेव किन्तु
भोजनादिव्यापारस्त्वाशरीरधारणविधि।।१४।।
व्यवहारामध्ये
परमेश्वर चिंतन ।
वैदिक कर्मामध्ये भजन । शरीरासाठी उदरभरण ।करावे
।।१४।।
लोकव्यवहार सुध्दा तसाच
व्हावा (निश्चय दृढ झाल्यानंतरच
व्हावा) परंतू जो
पर्यंत शरीर आहे
तोपर्यंत भोजनादी व्यापार करावा.
तल्लक्षणानि वाच्यन्ते नानामतभेदात् ।।१५।।
दृढ निश्चयाचे
लक्षण । सांगतात
अनेकजण । प्रत्येकांच्या
मतानुसार.। हा भक्ति-महिमा
।।१५।।
त्याची (दृढ निश्चयाची)
लक्षणे अनेकांच्या मतानुसार सांगतात.
पूजादिष्वनुराग इति पाराशर्यः
।।१६।।
पूजनामध्ये अनुराग ।
निर्माण होणे हेच
। भक्ति दृढ
झाल्याचे लक्षण ।
म्हणे पराशरपुत्र व्यास ।।१६।।
पूजादी कर्मामध्ये
अनुराग निर्माण होणे हेच
भक्ति दृढ झाल्याचे
लक्षण आहे, असे
पराशरपुत्र व्यास म्हणतात.
कथादिष्विति गर्गः ।।१७।।
श्रवणामध्ये अनुराग ।
निर्माण होणे हेच
। भक्ति दृढ
झाल्याचे लक्षण ।
म्हणे गर्गाचार्य ।।१७।।
भगवंताच्या कथादी श्रवणामध्ये
अनुराग निर्माण होणे हे
भक्ति दृढ झाल्याचे
लक्षण आहे, असे
गर्गाचार्य म्हणतात
कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग
सिध्दांतमार्ग । योगमार्ग
वैराग्यमार्ग । ऐकत जावे ।।९।।
दशक ४ समास १
नाना व्रतांचे
महिमे । नाना तीर्थांचे महिमे ।
नाना दानांचे महिमे ।
ऐकत जावे ।।१०।।
कैशा नवविधा
भक्ति । कैशा चतुर्विधा मुक्ति ।
कैसी पानिजे उत्तम
गती । ऐसे ते ऐकावे
।।२५।।
ऐसे हे अवघेचि ऐकावे
। परंतु सार
शोधून घ्यावे ।
असार ते जाणेनि
त्यागावे । या नाव श्रवणभक्ति
।।२९।।
आत्मरत्यविरोधेनेति शांडिल्यः ।।१८।।
आत्मस्वरूपामध्ये अनुराग ।
निर्माण होणे हेच
। भक्ति दृढ
झाल्याचे लक्षण ।
म्हणे शांडिल्य ।।१८।।
आत्मस्वरूपामध्ये अनुराग निर्माण
होणे हेच भक्ति
दृढ झाल्याचे लक्षण आहे,
असे शांडिल्य म्हणतात.
जोपर्यंत आत्मतत्त्वाची जिज्ञासा नाही । तो पर्यंत
देहाभिमान जात नाही
। कर्मबंधनातून मुक्ति नाही
। कर्मवासना टिकून रहाते
।।५.५।।ऋषभदेव आपल्या पुत्रांस
उपदेश करतात
नारदस्तु तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति ।।१९।।
परमेश्वराच्या विस्मरणाने । व्याकुळता
निर्माण होणे । हेच लक्षण
भक्ति दृढतेचे । म्हणे
नारद ।।१९।।
आपली सर्व
कर्मे परमेश्वराला समर्पित करून परमेश्वराच्या
विस्मरणाने परमव्याकुळता निर्माण होणे हेच
भक्ति दृढ झाल्याचे
लक्षण आहे, असे
नारद म्हणतात.
अस्त्येवमेवम् ।।२०।।
ईश्वराच्या पूजनामध्ये अनुराग ।श्रवण-चिंतनामध्ये
अनुराग ।विरहामध्ये अनुराग ।निरंतर
।।२०।।
हे प्रेम
असे आहे.
यथा व्रजगोपिकानाम्
।।२१।।
सर्वस्व अर्पण श्रीकृष्णामध्ये
। एकरूपता श्रीकृष्णामध्ये ।व्याकुळता विरहामध्ये ।हे गोपींचे
प्रेम ।।२१।।
ज्याप्रमाणे ब्रजगोपींची अवस्था होते.
तत्रापि न माहात्म्यज्ञानविस्मृत्यपवादः
।।२२।।
गोपी तन्मय
श्रीकृष्णामध्ये।श्रीकृष्णाचे ज्ञान त्यांच्यामध्ये।दोघे
मग्न भक्तिमध्ये।हा भक्तिमहिमा ।।२२।।
त्यांच्यामध्ये श्रीकृष्णस्वरूप ज्ञानाच्या विस्मृतीचा कलंक नाही.
तव्दिहीनं जाराणामिव ।।२३।।
श्रीकृष्णस्वरूपाचे ज्ञान ।
हेच आहे शुध्द
प्रेम । इतर सर्वकाही केवळ । कामवासनायुक्त ।।२३।।
श्रीकृष्णस्वरूप ज्ञाना शिवाय
जे प्रेम असेल
ते कामवासनायुक्त आहे.।।२३।।
नास्त्येव तस्मिंस्तत्सुखसुखित्वम् ।।२४।।
कामवासनायुक्त प्रेमामध्ये । प्रियतमाच्या
सुखामध्ये । प्रेम
विषयांमध्ये । सुख नाही ।।२४।।
त्या कामवासनायुक्त
प्रेमामध्ये प्रियतमाच्या सुखामध्ये सुखी होता
येत नाही.
सा तु कर्मज्ञानयोगेभ्यो-प्यधिकतरा।।२५।।
कठोर कर्म-उपासना
। शुष्कज्ञान संपदा ।
तसेच योग-साधना । या पेक्षा भक्ति
सर्वश्रेष्ठ ।।२५।।
ती भक्ति
कर्म, ज्ञान तसेच
योगा पेक्षा सुध्दा
अधिक श्रेष्ठ आहे.
फलरूपत्वात् ।।२६।।
भक्ति सर्वश्रेष्ठ
आहे । फलस्वरूप
हे कारण त्याचे
। ती परमानंद
देते । हा भक्ति-महिमा ।।२६।।
फलस्वरूप असल्यामुळे
ईश्वरस्याप्यभिमानद्वेषित्वाद् दैन्यप्रियत्वाच्च ।।२७।।
भक्ति मध्ये
देहभान नाही । द्वैत भावना
नाही । द्वेष
- मस्तर नाही
। म्हणून भक्ति सर्वश्रेष्ठ
।।२७।।
परमेश्वराला सुध्दा अभिमानाचा
द्वेष असल्यामुळे भक्ति अधिक
श्रेष्ठ आहे.
तस्या ज्ञानमेव
साधनमित्येके ।।२८।।
काही आचार्य
म्हणतात । भक्तिचे
साधन आहे ज्ञान
। भक्ती पाहिजे
ज्ञानोत्तर । अभ्यासपूर्ण
।।२८।।
काही आचार्य
म्हणतात की भक्तिचे
साधन ज्ञान हेच
आहे.
अन्योन्याश्रयत्वमित्यन्ये ।।२९।।
अन्य आचार्य
म्हणतात । ज्ञान
आणि भक्ति परस्पर
आश्रित । एकमेकास
पूरक । अनुभवावे
।।२९।।
अन्य आचार्य
म्हणतात की ज्ञान
आणि भक्ति परस्पर
आश्रित आहेत. म्हणजेच
भक्तिचे साधन ज्ञान
आहे आणि ज्ञानाचे
साधन भक्ति आहे.
स्वयं फलरूपतेति
ब्रह्मकुमाराः।।३०।।
भक्ति स्वयंफलरूप
। ब्रह्माजीचे पुत्र म्हणतात
। भक्ती हाच
परम लाभ । हा भक्तीयोग
।।३०।।
भक्ति स्वयंफलरूप
आहे असे ब्रह्माजीचे
पुत्र म्हणतात.
राजगृहभोजनादिषु तथैव दृष्टत्वात्
।।३१।।
राजकारणाने सुख मिळत
नाही । भोजन पाहून
भूक शमत नाही
। शांती नाही
। जाणावे ।।३१।।
राभवनामध्ये आणि भोजनादीमध्ये
लक्ष दिल्यामुळे
न तेन राजपरितोषः क्षुधाशांतिर्वा .।।३२।।
ज्ञानाने
प्रसन्नता नाही । पहाण्याने भूक शमत
नाही । आचरण केले नाही
। तर उपयोग
काय ।।३२।।
केवऴ ज्ञानाने
राजा प्रसन्न होत नाही
व भूक ही शमत नाही.
तस्मात्सैव ग्राह्या मुमुक्षुभिः ।।३३।।
म्हणून आश्रय
भक्तिचा । सर्व मुमूक्षूंनी घ्यावा ।
हा ध्यास आचरणाचा
। अनुभवावे ।।३३।।
म्हणून सर्व
मुमूक्षूंनी भक्तिचा आश्रय घ्यावा.
भक्तिचा आश्रय का
घ्यावा १.भगवंतावर प्रेम करण्यासाठी
कोणाचीही जरूरी नाही.
२.कर्म, ज्ञान, योग
साधने प्रमाणे भक्तिसाठी कोणत्याही साधनांची जरूरी नाही.
३.इतर मार्गां प्रमाणे भक्तिमध्ये दोष नाहीत.
४.इतर मार्गां प्रमाणे भक्तिमध्ये अहंकार होत
नाही. ५.इतर मार्गांतील
साधनेमध्ये कठोर परिश्रम
घ्यावे लागतात, परंतू भक्तिमध्ये
परिश्रम न घेता साध्य प्राप्त
होते. ६.इतर मार्गांमध्ये
साधन व साध्य
भिन्न आहे, परंतू
भक्तिमध्ये साधन व साध्य एकच
आहे, ते म्हणजे
निष्काम भक्ति. ७.इतर
मार्गांतील साधनांनी प्रेम निर्माण
होत नाही. परंतू
भक्तिमध्ये अनन्यता असल्याने एकरूपता सहज साधते.
तस्याः साधनानि
गायंताचार्याः ।।३४।।
भक्तीची साधने अनेक
। अनेक आचार्य
सांगतात । भक्तीचे
गायन करतात ।
प्रेमाने ।।३४।।
त्या भक्तीची
साधने अनेक आचार्य
गातात
भक्तीचे गुणगान केले
जाते. बोलणे वेगळे,
सांगणे वेगळे आणि
गाणे वेगळे, उत्स्फुर्तपणे
प्रगट होते ते
गायन
तत्त्ु विषयत्यागात् संगत्यागाच्च ।।३५।।
विशुध्द भक्ति प्राप्त
होते । निश्चितच
विषयत्यागाने । कुसंग
त्यागाने । जाणून
घ्यावे ।।३५।।
ती भक्ति
निश्चितच विषयत्यागाने आणि विषयी
पुरूषांचा संग याच्या
त्यागाने प्राप्त होते.
अव्यावृतभजनात् ।।३६।।
अखंड भजनाने
। स्मरण अढळ
श्रध्देने । चिंतन
एकाग्रतेने । प्राप्त
होते भक्ति ।।३६।।
परमेश्वराच्या अखंड भजनाने
भक्ति प्राप्त होते. नित्य-निरंतर, अव्यावृत
म्हणजे भेदरहित, एकरूपतेने.
लोके-पि भगवद्गुणश्रवण किर्तनात् ।।३७।।
नित्य व्यवहारामध्ये
। गुण-श्रवण परमेश्वराचे । आणि संकीर्तनाने । प्राप्त
होते भक्ति ।।३७।।
व्यवहारामध्ये भगवंताचे गुण-श्रवण संकीर्तनाने भक्ति प्राप्त
होते.
मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा ।।३८।।
मुख्यत्वाने । महापुरूषांच्या
कृपेने । किंवा परमेश्वराच्या
कृपेने । प्राप्त
होते भक्ति ।।३८।।
परंतू मुख्यत्वे
भक्ति महापुरूषांच्या कृपेनेच किंवा भगवंताच्या
लेशमात्र कृपेने सुध्दा
प्राप्त होते.
महत्संगस्तु दुर्लभो-गम्यो-मोघश्र्च ।।३९।।
महापुरूषांचा सत्संग ।
अत्यंत अगम्य दुर्लभ
। आणि आहे
अमोघ । उपयोगी
।।३९।।
महापुरूषांचा सत्संग अत्यंत
दुर्लभ अगम्य आणि
अमोघ आहे.
लभ्यते-पि तत्कृपयैव ।।४०।।
सत्संगाची प्राप्ती होते । महापुरूषांच्या कृपेने ।
कृपा सेवा केल्याने
। म्हणून सेवा
करावी ।।४०।।
सत्संगाची प्राप्ती महापुरूषांच्या कृपेनेच होते.
तस्मिंस्तज्जने भेदाभावात् ।।४१।।
परमेश्वरामध्ये । आणि त्याच्या भक्तांमध्ये । नाही कोणताही भेद । अद्वैत भावना
।।४१।।
परमेश्वरामध्ये आणि त्याच्या
भक्तांमध्ये कोणताही भेद नाही.
तदेव साध्यताम्
तदेव साध्यताम् ।।४२।।
म्हणून महापुरूषांचा
सत्संग । प्राप्त
करण्याचाच प्रयत्न । करावा
जरूर । भक्तीसाठी
।।४२।।
म्हणून महापुरूषांचा
सत्संग प्राप्त करण्याचाच प्रयत्न करावा. प्रयत्न
करावा -- सत्संग
महिमा
दुःसंगः सर्वथैव त्याज्यः ।।४३।।
दुःसंगाचा सर्वथा त्याग
। प्रत्येकाने करावाच ।
दुःसंगाचे परिणाम वाईट
। आत्मघात होतो ।।४३।।
दुःसंगाचा सर्वथा त्याग
करावा.
कामक्रोधमोहस्मृतिभ्रंशबुध्दिनाशसर्वनाश कारणत्वात् ।।४४।।
दुःसंगाने काम क्रोध
वाढतो । विस्मृति मोह वाढतो
। बुध्दिनाश होतो । शेवटी सर्वनाश ।।४४।।
दुःसंगाने काम, क्रोध,
मोह, स्मृतिभ्रंश, बुध्दिनाश होऊन मनुष्याचा
सर्वनाश होतो.
तरंगायिता अपीमे संगात्समुद्रायंति
।।४५।।
षडविकार प्रथम थोडे
। नंतर दुःसंगाने
होतात मोठे । विशाल समुद्राप्रमाणे
। होतात ।।४५।।
ते कामक्रोधादी
तरंगाप्रमाणे लहान असले
तरी दुःसंगाने समुद्राप्रमाणे विशाल व
बलवान होतात.
कस्तरति कस्तरति मयाम् ?
यः संगांस्त्यजति, यो महानुभावं
सेवते, निर्ममो भवति ।।४६।।
जो देहभान
विसरतो । महापुरूषांची
सेवा करतो । तो मायेला
पार करतो । अनुभवावे ।।४६।।
जो देहासक्तिचा
त्याग करून महापुरूषांची
सेवा करतो तोच
मायेला पार करतो.
यः विविक्तस्थानं
सेवते, यो लोकबंधमुन्मूलयति,
निस्त्रैगुणण्यौ भवति, योगक्षेम
त्यजति ।।४७।।
जो एकांतवास
करतो । लौकिकाचा
त्याग करतो । योगक्षेमाचा त्याग करतो
। तो मायामुक्त
।।४७।।
जो एकांतवास
करतो, लौकिक बंधनांचा
त्याग करतो, गुणातीत
होऊन योगक्षेमाचा ही त्याग
करतो, तो मायेला
पार करतो.
एकांतवासाचे फायदे--१.जनसंपकर्ाच्या अभावामुळे इंद्रिये बहिर्मुख न होता अंतर्मुख होतात. २.
मनाचे निरीक्षण सूक्ष्मपणे होऊन विवेक
जागृत होतो. ३.मन
शुध्द होऊन परमेश्वरचरणी
एकाग्र होते. स्वभाव
तीन गुणांनी बनलेला, त्या त्रिगुणाचाही
त्याग केल्यानंतर गुणातीत अवस्था. तीच निर्गुण
अवस्था.
यः कर्मफलं
त्यजति, कर्माणि संन्यस्यति, ततो निर्द्वंद्वो
भवति ।।४८।।
जो कर्मफळाचा
त्याग करतो । कर्मसंन्यास करतो । गुणातीत होतो । तो मायामुक्त
।।४८।।
जो कर्मफळाचा
त्याग करतो, कर्मसन्यास
करतो, सुख-दुःख या द्वंदाच्या
पलिकडे जातो तो
मायेला पार करतो.
वेदानपि संन्यस्यति, केवलमविच्छिन्नानुरागं लभते ।।४९।।
जो वेदांचा
त्याग करतो । अखंड प्रेम
करतो । श्रध्देने
मनन करतो । तो मायामुक्त।।४९।।
जो वेदांचा
सुध्दा त्याग करतो
आणि केवळ अखंड
भगवत प्रेम प्राप्त
करतो तो मायेला
पार करतो.
स तरति स तरति स लोकांस्तारयति ।।५०।।
तो स्वतः
मायामुक्त होतो । इतरांसाठी मदत करतो
। मुक्तीचे महत्त्व सांगतो ।
भक्ति-महिमा ।।५०।।
तो स्वतः
मायामुक्त होतो, व
अन्य लोकांना ही मायेतून
मुक्त होण्यास मदत करतो.
अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम् ।।५१।।
हे प्रेम
स्वरूप अवर्णनीय । आहे अतुलनीय । आणि अनुकरणीय । हा भक्ति-महिमा ।।५१।।
प्रेमाचे स्वरूप अवर्णनीय
आहे.
मुकास्वादनवत् ।।५२।।
कोणी मुका
मनुष्य । घेई मिष्टान्नाचा आस्वाद ।
तसे हे प्रेम
अति दुर्मिळ । हा भक्ति-महिमा ।।५२।।
मुका मनुष्य
ज्याप्रमाणे गोड पदार्थाचा
आस्वाद घेतो, त्याप्रमाणे
प्रकाशते क्वापि पात्रे
।।५३।।
एखाद्याच अधिकारी पुरूषामध्ये । ते प्रेम प्रकाशते
। तो एकच लाखांमध्ये । हा भक्ति-महिमा ।।५३।।
एखाद्याच अधिकारी पुरूषामध्ये ते प्रेम
प्रकाशते.
गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणं वर्धमानमविच्छिन्नं सूक्ष्मतरमनुभवरूपम् ।।५४।।
ते परमप्रेम
निर्गुुण कामनारहित।अविनाशी प्रतिक्षणी नुतन । अनुभवस्वरूप । हा भक्ति-महिमा ।।५४।।
ते परमप्रेम
गुणरहित,कामनारहित, प्रतिक्षण वाढणारे, कधीही नाश
न पावणारे, अत्यंत सूक्ष्म
आणि
अनुभवस्वरूप आहे. ऐश्वर्यस्य
समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः
। ज्ञानवैराग्ययोश्र्चैव षण्णां भग
इतीरणा ।। ऐश्वर्य,
धर्म, यश, लक्ष्मी,
ज्ञान, आणि वैराग्य
या सहांना भग
म्हणतात, ज्याच्यामध्ये ही सहा लक्षणे असतात
तो भगवान. प्रेम
हे भगवंताचे स्वरूप म्हणून
प्रेमामध्येही ६ लक्षणे.
प्रेम अत्यंत सूक्ष्म
ते मनामध्ये ते दिसत
नाही.
तत्प्राप्य तदेवावलकयति, तदेव श्रृणोति,
तदेव भाषयति, तदेव चिंतयति
।।५५।।
त्या प्रेमाने
परमेश्वर जाणतो ।गुण
ऐकतो गुणगान करतो
। चिंतन करतो
। हा भक्ति-महिमा
।।५५।।
ते प्रेम
प्राप्त करून मनुष्य
परमेश्वर रूप पहातो,
गुण ऐकतो, गुणगान
करतो आणि त्याचेच
चिंतन करतो.
गौणी त्रिधा
गुणभेदादार्तादिभेदाद्वा ।।५६।।
भक्ति तीन
प्रकारची भासते ।
त्रीगुणांच्या भेदामुळे । सत्त्व, रज व तम हे । हा भक्ति-महिमा ।।५६।।
सत्त्व, रज व तम गुणांच्या
भेदामुळे भक्ति तीन
प्रकारची - तामस,राजस,
सात्विक तसेच अर्थार्थी,जिज्ञासु
आर्त
उत्तरस्मादुत्तरस्मात्पूर्वपूर्वा श्रेयाय भवति ।।५७।।
जस जशी भक्ति निरपेक्ष
होते । तशी ती शुध्द
होते । कल्याणकारक
होते । हा भक्ति-महिमा ।।५७।।
उत्तर उत्तर
क्रमाच्या अपेक्षेने पूर्व पुर्व
क्रमाची भक्ति कल्याणकारक
होते.याचा अर्थ तामसिक
भक्ति निकृष्ट, राजसिक भक्ति
तामसिक भक्ति पेक्षा
चांगली आणि सात्विक
भक्ति कल्याणकारी तसेच अर्थार्थी,
जिज्ञासु आर्त
अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ।।५८।।
भक्ति सुलभ
आहे । इतर मार्ग कठीण
आहे । केवळ जिज्ञासा पाहिजे ।
हा भक्ति-महिमा ।।५८।।
अन्य साधनांच्या
तूलनेमध्ये भक्ति सुलभ
आहे.
प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात् स्वयंप्रमाणत्वात् ।।५९।।
भक्ति स्वयंप्रमाणभूत
आहे । म्हणून
ती सुलभ आहे
। निरपेक्ष आहे । हा भक्ति-योग
।।५९।।
दुसया प्रमाणांची
अपेक्षा नसल्यामुळे तसेच स्वयंप्रमाणभूत
असल्यामुळे भक्ति सुलभ
आहे.
शांतिरूपात्परमानंदरूपाच्च ।।६०।।
भक्ति शांतस्वरूप
आहे । परमानंदस्वरूप
आहे । आणि सत्यस्वरूप आहे । हा भक्ति-महिमा
।।६०।।
भक्ति शांतस्वरूप
आणि परमानंदस्वरूप आहे.
लोकहानौ चिंता न
कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् ।।६१।।
प्रेमात लौकिक विचार
नाही ।मान-अपमान नाही ।देह
अहंकार नाही ।कारण
ईश्वरार्पण आहे ।।६१।।
भक्ताने लौकिक हानीची
चिंता करू नये
कारण त्याने लौकिक
व्यवहारासह स्वतःला ईश्वरार्पण केलेले आहे.
न तदसिध्दौ
लोकव्यवहारो हेयः किंतु
फलत्यागस्तत्साधनं च कार्यमेव।।६२।।
निश्चिंत होई पर्यंत
।लौकिकाचा नाही त्याग
।त्यासाठी उपासना आवश्यक
।कर्मयोग करावा ।।६२।।
निश्चिंत होईपर्यंत व्यवहाराचा त्याग करू
नये,परंतू कर्मफलाचा त्याग करून
निश्चिंत होण्यासाठी साधना करावी
स्त्रीधननास्तिकवैरिचरित्रं न श्रवणीयम्
।।६३।।
स्त्रीच्या चरित्राचे श्रवण नाही
। नास्तिक वैरी चरित्राचे
नाही । चिंतन
नाही । ते अधर्मयुक्त ।।६३।।
स्त्री, धन, नास्तिक
आणि वैरी यांच्या
चरित्राचे श्रवण करू
नये.
अभिमानदम्भादिकं त्याज्यम् ।।६४।।
अभिमानाचा त्याग करावा
।ढोगीपणाचा त्याग करावा
।अज्ञानाचा त्याग करावा
।भक्तीसाठी ।।६४।।
अभिमान, ढोगीपणा याचा त्याग
केला पाहिजे.
तदर्पिताखिलाचारः सन् कामक्रोधाभिमानादिकं
तस्मिन्नेव करणीयम् ।।६५।।
सर्वस्व अर्पण परमेश्वरास
। म्हणून काम
क्रोध व अभिमान
। त्यालाच अर्पण ।
केले पाहिजे ।।६५।।
कारण भक्ताने
आपले सर्वस्व परमेश्वराला अर्पण केलेले
असल्याने काम, क्रोध
व अभिमान सुध्दा
त्यालाच अर्पण केले
पाहिजे. जानामि धर्मं
न च मे प्रवृृत्तिः जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः
। माझा धर्म
काय ते मी जाणतो परंतु
त्यामध्ये प्रवृृत्ति होत नाही,
अधर्म म्हणजे काय
ते मी जाणतो
परंतु त्याच्यापासून माझी निवृत्ति
होत नाही
त्रिरूपभंगपूर्वकं नित्यदासनित्यकांताभजनात्मकं वा प्रेमैव
कार्यम्, प्रेमैव कार्यम् ।।६६।।
सेवा दासभावाने
।कांता भावाने प्रेम
करावे ।परमेश्वराचे भजन करावे
।प्रेम करावे निरंतर
।।६६।।
तिन्हीही रूपांचा भंग करून
नित्य दासभावाने, कांता भावाने
परमेश्वराचे भजन करावे,
प्रेम करावे.
भक्ता एकांतिनो
मुख्याः ।।६७।।
एकाच परमेश्वराचे
चिंतन ।स्मरण मनन
त्याचेच ।सदैव ध्यास
त्याचाच ।तो भक्त
श्रेष्ठ आहे ।।६७।।
जो भक्त
एकाच परमेश्राचे चिंतन करतो
तो भक्त श्रेष्ठ
आहे.
कंठावरोधरोमांचाश्रुभिः परस्परं लपमानाः पावयंति कुलानि पृथिवीं
च ।।६८।।
अनन्य भक्त
गहिवरतात। रोमाच उभे
अंगावर ।आनंदाश्रु येतात ।ते
पवित्र करतात सर्वांना
।।६८।।
असे अनन्य
भक्त परस्परामध्ये चर्चा करताना
त्यांचा कंठ दाटून
येतो, अंगावर रोमाच
उभे रहातात, आनंदाश्रु येतात. ते
भक्त आपल्या कुळास
व पृथ्वीस पवित्र करतात.
तीर्थीकुर्वंति तीर्थानि, सुकर्मी कुर्वंति कर्माणि, सच्छास्त्रीकुर्वंति शास्त्राणि ।।६९।।
पाण्यास तीर्थ करतात।प्रत्येक
कर्म सुकर्म करतात।धर्मशास्त्रास
पवित्र बनवितात।भक्ति-महिमा ।।६९।।
ते भक्त
पाण्यास तीर्थ बनवितात,
प्रत्येक कर्म सुकर्म
करतो, धर्मशास्त्रास पवित्र बनवितात.
तन्मयाः ।।७०।।
परमेश्वरामध्ये तन्मय ।
परमेश्वरामध्ये एकरूप ।
परमेश्वरामध्ये समरस । झालेले असतात।।७०।।
कारण ते
भक्त परमेश्वरामध्ये तन्मय झालेले
असतात.
मोदन्ते पितरो नृत्यन्ति
देवताः सनाथा चेयं
भूर्भवति ।।७१।।
पुर्वज आनंदित
होतात । देवता
आनंदाने नाचतात ।
आणि पृथ्वी पावते
समाधान । भक्तिमुळे
।।७१।।
भक्तिमुळे पुर्वज आनंदित
होतात, देवता आनंदाने
नाचतात, आणि पृथ्वी
कृतकृत्य होते.
नास्ति तेषु
जातिविद्यारूप कुलधनक्रियादिभेदः ।।७२।।
भक्तांमध्ये भेद नाही
जातीचा ।विद्येचा रूपाचा कुळाचा
।धन-संपत्तीचा कर्माचा । हा भक्ति-योग ।।७२।।
त्या भक्तांमध्ये
जात, विद्या, रूप, कुळ,
धन, क्रिया इत्यादींचा
भेद नसतो.
यतस्तदीयाः ।।७३।।
भक्त भगवंताचेच
असतात । म्हणून
नाही भेद । भगवंतास सर्व समान
। नाही द्वैत
भाव ।।७३।।
कारण ते
सर्व भक्त भगवंताचेच
असतात.
वादौ नावलम्ब्यः
।।७४।।
भक्ताने वाद करू
नये । वादामध्ये
लक्ष घालू नये
। मदत करू
नये । हा आहे भक्ति-योग
।।७४।।
भक्ताने वाद विवाद
करू नयेत. वादे वादे
तत्त्वबोधः न जायते
। वाद विवाद
करून तत्त्वबोध होत नाही.
बाहुल्यावकाशादनियतत्वाच्च ।।७५।।
वादामध्ये अनर्थ वाढतो
। गैरसमज वाढतो
।अंधकार वाढतो ।
तत्त्वज्ञान पडते बाजूला
।।७५।।
वादामध्ये तत्त्वज्ञान बाजूला राहून
अनर्थ वाढण्याची शक्यता असल्यामुळे
भक्ताने वाद विवाद
करू नयेत.
भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधककर्माण्यपि करणीयानि ।।७६।।
भक्तिशास्त्राचे करावे चिंतन
। भक्ति करावी
जागृत । त्यासाठी
करावा प्रयत्न । हा भक्ति-योग ।।७६।।
भक्तिशास्त्राचे मनन करून
भक्ति जागृत करण्यासाठी
प्रयत्न केले पाहिजे.
सुखदुःखेच्छालाभादित्यक्ते काले प्रतिक्ष्यमाणे
क्षणार्ध्दमपि व्यर्थं न नेयम्
।।७७।।
त्याग सुख-दुःखाचा।अपेक्षेचा
लाभाचा त्याग करावा
।त्याग सर्वस्वाचा । क्षणाचा
व्यर्थ नको।।७७।।
सुख-दुःख, इच्छा, लाभ
इत्यादींचा त्याग करण्याचा
विचार करण्यासाठी क्षणाचाही वेळ व्यर्थ
घालवू नये.
अहिंसासत्यशौचदयास्तिक्यादिचारित्र्याणि परिपालनीयानि ।।७८।।
अहिंसेचे पालन करावे
।
सत्याचे आचरण करावे
। धर्माचरण करावे ।
हा आहे भक्ति-योग
।।७८।।
अहिंसा, सत्य, शौच,
दया, आस्तिक्य इत्यादींचे चारित्र्य वर्धन करणारे
धर्माचरण करावे.
सर्वदा सर्वभावेन
निश्चिंन्तितैर्भगवानेव भजनीयः ।।७९।।
परमेश्वराचेच भजन करावे
। नित्य निरंतर
चिंतन करावे ।
अढळ श्रध्देने ।हा भक्ति-योग
।।७९।।
नित्य, निरंतर
सर्वभावाने निश्चिंत होऊन फक्त
परमेश्वराचेच भजन केले
पाहिजे.
स कीर्त्यमानः
शीघ्रमेवाविर्भवति अनुभावयति च भक्तान्
।।८०।।
संकीर्तनाने प्रसन्न होतो । लवकरच प्रकट
होतो । स्वरूपाची
अनुभूती देतो । आपल्या भक्तांना।।८०।।
कीर्तनाने प्रसन्न झालेला परमेश्वर
लवकरच प्रकट होऊन
भक्तांना आपल्या स्वरूपाची
अनुभूती देतो.
त्रिसत्यस्य भक्तिरेव गरियसी भक्तिरेव
गरियसी ।।८१।।
हे त्रिकालाबाधित
सत्य । भक्ति
अत्यंत श्रेष्ठ । सर्वामध्ये
वरीष्ठ । हा आहे भक्ति-महिमा
।।८१।।
त्रिकालाबाधित सत्य आहे
की, भक्ति हीच
अत्यंत श्रेष्ठ आहे.
गुणमहात्म्यासक्तिरूपासक्तिपूजासक्तिस्मरणासक्तिदास्यासक्तिसख्यासक्तिकांतासक्तिवात्सल्यासक्ति
त्मनिवेदनासक्तितन्मयासक्तिपरविरहासक्तिरूपाधाप्येका
एकदशधा भवति ।।८२।।
तन्मयतेने।पूजनाने स्मरणाने आत्मनिवेदनाने।दास्य सख्य कांता
वात्सल्योने।विरहाने व्यक्त ।।८२।।
एक असूनही
भक्ति गुणमहात्म्यासक्ति, रूपासक्ति, पूजासक्ति, स्मरणासक्ति, दास्यासक्ति, सख्यासक्ति, कांतासक्ति, वात्सल्यासक्ति, आत्मनिवेदनासक्ति, तन्मयासक्ति, आणि परविरहासक्ति
या अकरा रूपाने
व्यक्त होते.
आसक्ति म्हणजे
आसमन्तात् सक्तः ।
सक्त म्हणजे रत
होणे, रमबाण होणे. आसमन्तात्
म्हणजे सर्व बाजूंनी,
सर्वांगीण ज्यामध्ये रमते तो
विषय प्रधान होतो
आणि मी गौण होतो त्याला
आसक्ती म्हणतात.
इत्यिेवं वदन्ति जनजल्पनिर्भया
एकमताःकुमारव्यासशुकशांडिल्यगर्गविष्णुकौंडिन्यशेषोध्दवारूणिबलि
हनुमद्विबिभीषणादयो भक्त्याचार्याः ।।८३।।
कुमार व्यास
शुकदेव । शांडिल्य
कौंडिल्य गर्ग विष्णु
उध्दव । बलि हनुमान बिभीषण
। म्हणे ।।८३।।
लोकनिंदेला बळी न पडणारे निर्भय
आचार्यगण सनत्कुमार, व्यास, शुकदेव,
शांडिल्य, गर्ग, विष्णु,
कौंडिल्य, शेष, उध्दव,
आरूणि, बलि, हनुमान,
बिभीषण, इत्यादी सर्व भक्त
एकमुखाने भक्ति हीच
सर्वश्रेष्ठ असे म्हणतात
य इदं नारदप्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिति श्रध्दत्ते स प्रेष्ठं
लभते स प्रेष्ठं
लभत इति ।।८४।।
जो श्रध्दा
ठेवतो । या उपदेशाचे पालन करतो
। तो परमेश्वररूप
होतो । म्हणे
नारदमुनी ।।८४।।
नारदांनी सांगितलेल्या या कल्याणकारी
उपदेशामध्ये जो श्रध्दा
ठेवतो त्यास परमेश्वराची
प्राप्ती होते व तो परमेश्वररूप
होतो.
No comments:
Post a Comment