अटलजी एक ऋषीतूल्य
व्यक्तीमत्त्व
आहुति बाकी, यज्ञ अधूरा अपनोंके
विघ्नोंने घेरा अंतिम जय
का वज्र बनाने
नवदधीचि हड्िडया गलाए आओ
फिरसे दिया जलाए
हा दिव्य विचार
करू शकणारे मा.अटल
बिहारी वाजपेयी हे आजच्या
काळातील महायोगी आहेत. मानव
कल्याणाचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी
व त्यासाठी बलिदान करण्याची
वेळ आली तरी
भारत कधीही मागे
रहाणार नाही असे
अभिवचन भारताच्या वतीने संयुक्त
राष्ट्र संघाला देण्याचे
धैर्य त्यांच्यामध्ये होते. येथे
स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण येते.
त्यांनी आपल्या घरादाराची
होळी करून संपूर्ण
जीवन राष्ट्रासाठी समर्पित केले. त्यांनी
स्वातंत्र्यपुर्व काळात केलेल्या
देशभक्तीचे राजकीय पुढाऱ्यांनी स्वातंत्र्योत्तर
काळात काय केले
हे आज सर्वांना
माहित आहे. परंतू
त्याचे सावरकरांनी कधीच त्याचे
भांडवल केले नाही.
आणि समाजाने सुध्दा त्याचा
गंभीर विचार केला
नाही. तसेच मा.अटल
बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या
उमेदीच्या काळात कायद्याची
पदवी व विद्यावाचस्पती
पदवी यांचे शिक्षण
सोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी संपूर्ण जीवन समर्पित
केले. इतकेच नव्हेतर
प्रपंचाच्या मोहात सुध्दा
ते चुकून अडकले
नाहीत. अनेकदा घरातील
मंडळींकडून त्याच्या लग्नाचा विषय होई
तेव्हा ते म्हणत,
-- मी माझं
जीवन भारतमातेच्या चरणी अर्पण
केले आहे आता
दुसरा विचार करण्याचा
प्रश्नच उद्भवत नाही.
तसेच जनसंघाचे अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या गूढ मृत्यू
नंतर अटलजींना धमक्या देणारी
पत्रे येऊ लागली
होती. नंतर त्यांच्या
हत्येचा व अपहरणाचा
प्रयत्न पाकिस्तानने केला होता.
प्रत्येक वेळी त्याच्या
नातेवाईकांनी त्यांना राजकारण सोडण्याचा सल्ला दिला
परंतू धमक्यांना घाबरून रणांगण
सोडण्याचा त्याचा स्वभाव
नव्हता. तेव्हा आपण
लग्न न करण्याचा
विचार संयुक्तिक आहे हे सांगताना ते आपल्या
वहिनीस म्हणतात,-- बघितलस तू
माझी वहिनी असून
इतकी रडतेस, मग
माझ्या बायकोला किती दुःख
झाले असते, म्हणून
मी लग्न केले
नाही असो.
गमनार्थ म्हणजे भटकणारा
या ऋष् धातू
पासून ऋषी हा शब्द झालेला
आहे. त्रिकालदर्षी आणि विद्यासंपन्न
असणारा ऋषी होय
असा अर्थ कालांतराने
रूढ झाला. याचीच
प्रचिती अटलजींच्या जीवनपटाकडे पाहिल्यावर दिसून येते.
म्हणून ते आजच्या
काळातील ऋषी आहेत
असे म्हणले तर
ती अतिशयोक्ति नसून प्रत्यक्ष
दिसते आहे. अटल
चा अर्थ न ढळणारा तर
बिहारी चा अर्थ
एका जागी न थांबणारा, सतत भ्रमण
करणारा. अटलजींच्या शब्दामध्ये सांगायचे झाल्यास ते राजकारणामध्ये
अढळ आहेत तर
साहित्याच्या क्षेत्रामध्ये नित्य भ्रमंती
करणारे आहेत म्हणून
त्यांनी त्यांचे नांव सार्थ
करून दाखविले आहे. बोले
तैसा चाले त्याची
वंदावी पाऊले असे
तुकाराम महाराज म्हणतात.
अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिनःभ्योधारिणोवराः । धारिभ्यो
ज्ञानिनः श्रेष्ठाज्ञानिम्योव्यवसायिनः ।।१०३।। --- मनुस्मृति
धर्मशास्त्र वाचणाऱ्यांपेक्षा, ते समजणाऱ्यांपेक्षा,
त्या धर्मशास्त्राचे आचरण करणारे
सर्वश्रेष्ठ आहेत असे
मनुस्मृतिमध्ये बाराव्या अध्यायातील
श्लोक क्रमांक १०३ येथे
सांगितले आहे. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे संस्थापक
डॉ. हेगडेवार हेच सांगतात,
-- समाजाच्या जीवनक्रमाला वळण लावण्याचे
सामर्थ्य जर तत्त्वांमध्ये
नसेल तर त्या
तत्त्वांना काडी इतकीही
किंमत नाही. वास्तविक
तत्त्वे ही ज्या
जोराने, ज्या दुर्मनीय
अभिनिवेशाने उचलून धरली
जातात, त्यामुळेच त्यांना महत्त्व येते. तत्त्वे
ही व्यवहारामध्ये आचरणासाठीच असतात. तत्त्वांना
अनूसरूनच व्यवहार असतो. तत्त्व
व व्यवहार म्हणजे विचार
व आचार, वचन
व कृती होय.
हाच तात्विक विचार राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचा पाया
आहे. म्हणून मनुष्याचे
आचरण अत्यंत महत्त्वाचे
आहे. हे आचरणाचे
धडे अटलजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून मिळाले. म्हणून अटलजींचे
ऋषीतूल्य व्यक्तीमत्त्व केवळ राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या कार्यातूनच स्पष्ट होते.
त्यासाठीच त्यांचा राजकारणातील प्रवास सांगण्याचा
मोह येथे मुद्दामून
टाळून त्यांचे संघाचेच कार्य, संघाची
शिकवण याचा उल्लेख
आवर्जून केलेला आहे.
सन १९४६
मध्ये फाळणीच्या प्रसंगी पाकिस्तानात जाणाया प्रांतातील
हिंदूंचे सुरक्षित स्थलांतर, सीमावर्ती राज्यांतील जनतेला भोगाव्या
लागणाया हिंसाचाराची मलमपट्टी, हिंदू समाजाचे
मनोधैर्य कायम ठेवणे
आणि नवनिर्माणाचा, नव जागरणाचा
पांचजन्य फुंकणे असे
चौफेर काम करण्यासाठी
आपल्या आयुष्याची काही वर्षे
तरी संघाला द्या,
संघाचे प्रचारक बना, या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय
सरसंघसंचालक गोलवलकर गुरूजीच्या कळकळीच्या आवाहनाला उत्कट प्रतिसाद
देऊन अटलजींनी घर सोडून
पुर्ण वेळ संघाचे
कार्य सुरू केले.
संवयंसेवकाशी भावसंपर्क ठेवण्याची त्यांची खासीयत वेगळीच
होती.
अटलजींच्याच शब्दामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्यांचा आत्मा आहे.
संघाच्या विचारसरणीशी इतकी समरसता
असली पाहिजे. संघाचा लोकांकडे
पहाण्याचा, परस्परांकडे पहाण्याचा दृष्टिकोन त्यांना आवडतो. हा
गुण विशेष फक्त
संघामध्येच आहे हे ते स्वाभिमानाने
सांगतात. संघातील एकात्मभाव त्यांना खूप आवडतो.
संघामध्ये अस्पृश्यता मानली जात
नाही याचे महात्मा
गांधीजींनी सुध्दा राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे कौतुक
केले होते. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ ही एकच संघटना
अशी आहे जी समाजाला संघटीत करते.
इतर सर्व संघटना
वेगवेगळी ओळख, वेगवेगळे
स्वार्थ व विशेष
दर्जाच्या गोष्टी करून
समाजात फूट पाडतात.
तथाकथीत कनिष्ठ वर्गांना,
दुर्लक्षित वर्गांना त्यांच्या वेगळेपणाची सतत जाणिव
देऊन त्यांचा अपमान होतो
आहे, त्यांना समाजामध्ये स्थान नाही
असे त्यांच्या मनावर सतत
बिंबवून या संघटना
खरेतर जातीभेदाला खतपाणी घालीत
असतात. त्यामुळे संघाने दुहेरी
उद्दिष्ट ठेवले आहे.
पहिले जातीभेद विरहित, सुसंघटीत, सबल असा
हिंदू समाज निर्माण
करणे व दुसरे
मुस्लिम व ख्रिश्चन
यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात
आणणे, त्यांच्या धर्माच्या, उपासना पध्दतीच्या
बाबतीत ढवळाढवळ न करता त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ फक्त
व्यक्तिंमध्येच बदल घडवून
आणतो असे नाही
तर तो समूह
मनतही आमूलाग्र परिवर्तन घडवून आणतो.
जर एखाद्याने योग्य प्रकारे
साधना केली तर
आत्मज्ञानाचा साक्षात्कार होणे, निर्वाण
साधणे त्याला स्वतः
पुरते शक्य आहे.
परंतू साया समाजाप्रति
प्रत्येकाची जी बांधिलकी
असते त्याचा विचार
संघाने केला आहे.
प्रत्येक व्यक्ति मध्ये बदल
घडवून आणला तर
समाजात बदल घडवून
आणणे शक्य आहे.
असा निष्कर्ष काढून संघाने
काम केलेले आहे.
संघ प्रचारक
म्हणून सन १९४६
पासून अटलजींनी लखनौ जवळील
संडीला येथे कार्य
सुरू केले. सन
१९४७ मध्ये संघाच्या
राष्ट्रधर्म या मासिकाचे
संयुक्त संपादक तसेच
सन १९४८ मध्ये
संघाच्या पांचजन्य या साप्ताहिकाचे
संपादक, सन १९५०
मध्ये दै.स्वदेशचे संपादक असे
कार्य करीत असताना
त्यांच्याच शब्दामध्ये त्या काळामध्ये
संपादकाचे काम अतिशय
जबाबदारीचे मानले जाऊन
त्याला प्रतिष्ठा असे. आपल्या
विचारधारेच्या प्रसाराचा जो आनंद
आणि जे समाधान
मिळायच ते खरोखरी
अद्भूत होते. मजकूर
जमविण्यापासून, लिहिण्यापासून ते अंकांची
बंडलं बाधण्यापर्यंत सगळं काही
अटलजी स्वतः करीत
असत. एकदा त्यांचे
पोट दुखत असताना
सुध्दा एका हाताने
पोट धरून खिळे
जुळविण्याचे काम करीत
असतानाच ते खाली
कोसळले. इतकी समरसता
केवळ महायोग्याच्याच ठिकाणी दिसून
येते.
त्यांच्या काव्याचा स्थायीभाव प्रखर राष्ट्रवाद
हाच असून तूलसीदासांचे
रामचरितमानस हे प्रेरणास्थान
होते.
दि. १७.८.१९९४
रोजी सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार
स्विकारताना नम्रपणे ते म्हणतात,
-- मला माझ्या
मर्यादांचं भान आहे.
माझ्या त्रुटींची जाणिव आहे.
परिक्षकांनी निश्चितच माझ्या त्रुटींकडे
दुर्लक्ष करून माझी
निवड केलेली दिसते.
सद्भाव असला म्हणजे
अभाव आढळून येत
नाही. इतकी नम्रता
हा एक योगच
आहे. संसदेमध्ये सुध्दा अनेकदा
अटलजींनी संघाच्या कार्याची महानता स्पष्ट
करून मांडलेली आहे.
अशा या थोर महायोग्याचे
नूसतेच कौतुक करण्यापेक्षा
अटलजींच्या चरित्रातून स्फुर्ती घेऊन राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे अलौकीक
कार्य अखंडीतपणे चालू ठेवण्याची
आज प्रखरतेने गरज आहे.
हीच भेट अटलजींना
त्यांच्या वाढदिवसांच्या निमीत्ताने देत आहे.
No comments:
Post a Comment