यक्ष--१.सूर्योदय कोणामुळे होतो.(ब्रह्मदेवामुळे) २.त्याच्या चारी बाजूला
कोण असतो.(देवता) ३.सूर्यास्त कोणामुळे होतो. (धर्मामुळे)
४.सूर्य कशामध्ये प्रतिष्ठीत आहे.(सत्यामध्ये) ५.मनुष्य क्षत्रिय कशाने होतो.(वेदाध्ययनाने)
६.क्षत्रियास महत्पद कशाने प्राप्त
होते.(तपाने) ७.तो द्वितीयवान
कशाने होतो.(धैर्याने) ८.तो बुध्दिमान
कशाने होतो.(वृध्दांची सेवा केल्याने)
९.ब्राह्मणांमध्ये देवत्व कोणते
आहे.(वेदांचा स्वाध्याय) १०.ब्राह्मणांचा मुख्य कार्य
कोणते आहे.(तप) ११. ब्राह्मणांचा
स्वाभाविक भाव कोणता
आहे.(मरणे) १२.ब्राह्मणांचे पतीत कर्म
कोणते आहे.(निंदा करणे) १३.क्षत्रियांमध्ये
देवत्व कोणते आहे.(शस्त्रविद्या)
१४.क्षत्रियांचे मुख्य कार्य
कोणते आहे.(यज्ञ) १५.क्षत्रियांचा स्वाभाविक भाव कोणता
आहे.(भिती) १६.क्षत्रियांचा पतीत कर्म
कोणते आहे.(शरणागतांचा परित्याग करणे.) १७.शेती
करणायांसाठी कोणती वस्तु
श्रेष्ठ आहे.(पाऊस) १८.जमिनीमध्ये पेरणायांसाठी कोणती वस्तु
श्रेष्ठ आहे.(बी) १९.प्रतिष्ठा
प्राप्त करणायांसाठी कोणती वस्तु
श्रेष्ठ आहे.(गोपालन) २०.संतान प्राप्त करणायांसाठी कोणती वस्तु
श्रेष्ठ आहे.(पुत्र) २१.असा कोण
पुरूष आहे, जो
इंद्रियांचा अनुभव करतो,
श्वास घेतो, बुध्दिमान
आहे, समाजामध्ये सम्मानित आहे, परंतू
वस्तुतः जिवंत नाही.(जो
देवता, अतिथी, सेवक,
माता-पिता आणि आत्मा
या पाच गोष्टींचे
पोषण करीत नाही,
तो) २२.पृथ्वीपेक्षा महत्तवपूर्ण कोण आहे.(माता)
२३.आकाशहून उंच कोण
आहे.(पिता) २४.वायुपेक्षा गतिमान कोण
आहे.(मन) २५.मातीच्या कणापेक्षा ही आधिक
संख्या कशाची असते.(चिंतेची)
२६.झोपताना कोण डोळे
बंद करीत नाही.(मासा)
२७.जन्म घेतल्यावर कोणाला गती
नसते.(अंड्याला) २८.हृदय कोणाला नसते.(दगडाला)
२९.वेग कोणाचा वाढतो.(नदीचा)
३०.प्रवाश्याचा मित्र कोण
असतो.(सहप्रवासी) ३१.गृहस्थीचा मित्र कोण
असतो.(गृहलक्ष्मी) ३२.रोग्याचा मित्र कोण
असतो.(वैद्य) ३३.अंतकाळी मित्र कोण
असतो.(दानशूर) ३४.सर्व प्राण्यांचा अतिथी कोण
आहे.(अग्नि) ३५.सनातन धर्म कोणता
आहे.(अविनाशी नित्यधर्म) ३६.अमृत कोणते आहे.(
गाईचे दूध) ३७.हे
संपूर्ण विश्व कसे
आहे.(वायुरूप) ३८.एकटाच कोण फिरत
असतो.(सूर्य) ३९.एकदा उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा पुन्हा
कोण उत्पन्न होतो.(चंद्र) ४०.थंडी वर औषधि
कोणते आहे.(अग्नि) ४१.महान भूमी कोणती
आहे.(पृथ्वी) ४२धर्माचे मुख्य स्थान
कोणते आहे.(सावधानता) ४३.यशाचे मुख्य स्थान
कोणते आहे.(दान-धर्म) ४४.स्वर्गार्चे मुख्य स्थान
कोणते आहे.(सत्याचे आचरण) ४५.सुखाचे
मुख्य स्थान कोणते
आहे.(चारित्र्य) ४६.मनुष्याचा आत्मा कोण
आहे.(पुत्र) ४७.मनुष्याचा साथीदार कोण आहे.(धर्मपत्नी)
४८.मनुष्याच्या जीवनाची आवश्यक वस्तू
कोणती आहे.(पाणी) ४९.मनुष्याचा परम आश्रय
कोण आहे.(दान-धर्म) ५०.मनुष्यांमध्ये उत्तम गुण
कोणता आहे.(सावधानता) ५१.धनामध्ये उत्तम धन
कोणते आहे.(धर्मशास्त्र-ज्ञान) ५२.लाभांमध्ये प्रमुख लाभ
कोणता आहे.(आरोग्य) ५३.सुखामध्ये श्रेष्ठ सुख कोणते
आहे.(समाधान) ५४.श्रेष्ठ धर्म कोणता
आहे.(दया) ५५.नित्य उपकारी धर्म
कोणता आहे.(सनातन वैदिक धर्म)
५६.कशाच्या संयमनाने शोक होत
नाही.(मनाच्या) ५७.कोणाची संगत नष्ट
होत नाही.(सत्पुरूषांची) ५८.कोणत्या वस्तुच्या त्यागाने मनुष्य सर्वांस
प्रिय होतो.(अहंकाराच्या) ५९.कशाच्या त्यागाने शोकमुक्त होतो.(क्रोधाच्या) ६०.कशाच्या त्यागाने संपत्तीवान होतो.(कामवासनेच्या) ६१.कशाच्या त्यागाने सुखी होतो.(लोभाच्या)
६२.ब्राह्मणास दान कशासाठी
दान केले जाते.(धर्मासाठी)
६३.कलाकारांना कशासाठी दान केले
जाते.(यशासाठी इनामरूपाने) ६४.सेवकांना कशासाठी दान केले
जाते.(पोषणा साठी वेतनरूपाने)
६५.राजाला कशासाठी दान केले
जाते.(भयमुक्तीसाठी कररूपाने) ६६.हे विश्व
कशाने झाकलेले आहे.(अज्ञानाने) ६७.कशामुळे ते प्रकाशित
होत नाही.(तमोगुणामुळे) ६८.मनुष्य मित्राचा त्याग का
करतो.(लोभामुळे) ६९.स्वर्गामध्ये का जात नाही.(देहाच्या आसक्तिमुळे) ७०.कोणत्या पुरूषास जिवंतपणी मृतवत म्हणले
जाते.(दरिद्री) ७१.कोणत्या राष्ट्रास मृतवत म्हणले
जाते.(राजा शिवाय) ७२.कोणत्या
श्राध्दास मृतवत म्हणले
जाते.(ब्राह्मणा शिवाय केलेल्या)
७३.कोणत्या यज्ञास मृतवत
म्हणले जाते.(दक्षिणा न देता केलेल्या) ७४.मनुष्य जीवनाची दिशा कोण
दाखवितात.(सत्पुरूष) ७५.पाणी कोठून मिळते.(आकाशातून)
७६.अन्न कोठून मिळते.(गाईपासून)
७७.वीष कोणते आहे.
(कामना) ७८.श्राध्दाची योग्य वेळ
कोणती आहे.(ब्राह्मणप्राप्ती) ७९.क्षमा म्हणजे काय.(थंडी
व उष्णता सहन
करणे) ८०.लाज म्हणजे
काय.(काम-वासनेपासून दूर रहाणे)
८१.तप म्हणजे काय.(स्व-धर्माचरण
करणे) ८२.दम म्हणजे
काय.(मनाचे संयमन करणे)
८३.ज्ञान कशाला म्हणतात.(परमात्मा
तत्त्वचा यथार्थ बोध)
८४.शम म्हणजे म्हणजे
काय.(चित्ताची शांती) ८५.दया
म्हणजे म्हणजे काय.
(सर्वांच्या सुखाची इच्छा करणे)
८६.नम्रता म्हणजे म्हणजे
काय.(सर्व प्राणिमात्रां प्रति समभाव)
८७.मनुष्याचा दुर्जय शत्रु
कोण आहे.(क्रोध) ८८.अनंत व्याधि कोणती
आहे.(लोभ) ८९.साधु कोणाला मानावे.(सर्व
प्राणिमात्रांचे हित करणायास)
९०.असाधु कोणाला म्हणतात.(निर्दयी
पुरूषाला) ९१.मोह म्हणजे
काय.(धर्ममूढता) ९२.मान म्हणजे
काय.(आत्माभिमान) ९३.आळशीपणा म्हणजे काय.(धर्मपालन
न करणे) ९४.शोक
म्हणजे काय.(अज्ञान) ९५.स्थिरता कशास म्हणतात.(स्वधर्माचे
आचरण) ९६.धैर्य कशास म्हणतात.(इंद्रियनिग्रह)
९७.परमस्नान कशास म्हणतात.(अंतःकरण
शुध्दी) ९८.दान कशास
म्हणतात.(सर्व प्राणिमात्रांचे रक्षण करणे)
९९.पंडित कोण आहे.(धर्मज्ञ)
१००.नास्तिक कोण आहे.(मूर्ख)
१०१.काम म्हणजे काय.(वासना)
१०२.मत्सर म्हणजे काय.(
हृदयातील असह्य वेदना)
१०३.अहंकार म्हणजे काय.(महान
अज्ञान) १०४.दंभ म्हणजे काय.(ढोंग)
१०५.परमदैव म्हणजे काय.(दानाचे
फळ) १०६.पशुत्व म्हणजे काय.(दुसयांना
दोषी ठरविणे) १०७.धर्म, अर्थ आणि
काम हे परस्पर
विरोधी असून त्यांचा
एका ठिकाणी संयोग
केव्हा होऊ शकतो.(जेव्हा
धर्म आणि धर्मपत्नी
मनुष्याच्या नियंत्रणामध्ये असतात तेव्हा)
१०८.अक्षय नरक कोणास
प्राप्त होतो.(१.जो ब्राह्मणास स्वतः बोलाऊन
त्यास भिक्षा देत
नाही त्यास, २.जो
मनुष्य वेद, धर्मशास्त्र,
ब्राह्मण, देवता यांचा
द्वेष करतो त्यास,
३.जो धनवान असून
ही धन नाही
असे म्हणून दानधर्म
करीत नाही, त्यास)
१०९जन्मकुळ, आचरण, स्वाध्याय
आणि शास्त्रश्रवण यामध्ये नेमके कशाने
ब्राह्मणत्व सिध्द होते.(आचरणानेच)
११०.मधुरतेने बोलणायास काय मिळते.(सर्वांकडून
प्रेम) १११.विचार करून काम
करणायास काय मिळते.(यश)
११२.अनेक मित्र करणायास
काय मिळते.(सुखप्राप्ती) ११३.धर्मनिष्ठ मनुष्यास काय मिळते.(सद्गति)
११४.सुखी कोण आहे.
(१.ज्याच्यावर कर्ज नाही
तो, २.जो घरामध्ये
अन्न शिजवून खातो
तो) ११५.आश्र्चर्य कोणते आहे.
(रोज माणसे मरतात,
परंतू जिवंत रहाणारे
सर्वदा जिवंत रहाण्याची इच्छा करतात) ११६.मार्ग कोणता आहे.(महापुरूषांचे
जीवन) ११७.मुख्य बातमी कोणती
आहे.(काल-भगवान सर्व प्राणिमात्रांना
कालचक्रामध्ये फिरवित आहे)
११८.पुरूषाची व्याख्या काय.(ज्या मनुष्याची ख्याती इहलोकात
व परलोकात आहे, त्यास
पुरूष म्हणतात.) ११९.सर्वात मोठा धनी
कोण आहे.(१.ज्या मनुष्याच्या दृष्टीमध्ये प्रिय-अप्रिय, सुख-दुःख आणि भूत-भविष्य
ही द्वंद्वे समान आहेत
तो, २.जो मनुष्य
निःस्पृह, शांतचित्त, सुप्रसन्न आणि सर्वदा
योगयुक्त आहे तो)
संकलन--स्वामी मोहनदास, भारतीय तत्त्वज्ञान-प्रबोधनकार नारायणधाम,
भास्करा-एच विश्व धायरी,
पुणे (९४२०८५९६१२)
No comments:
Post a Comment