विश्व कल्याणासाठी
योग
योगेन चित्तस्य
पदेन वाचां मलं
शरीरस्य च वैद्यकेन
। यो पाकरोत्तं
मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मि ।।
आज दुर्दैवाने
योग या शब्दाचा
विपर्यास केलेला दिसून
येतो. योग म्हणजे
योगासने हाच अर्थ
काही योगाचार्यांनी(भोंदू) प्रचलित केलेला दिसून
येतो. पतंजलि सांगतात,
योग म्हणजे चित्ताच्या
वृत्तींचा निरोध होय.
विश्व कल्याणासाठी योग म्हणजे
विश्वातील प्रत्येक मनुष्याच्या कल्याणासाठी योग होय.
योग म्हणजे साधना
होय. मनुष्याच्या कल्याणासाठी केलेली साधना,
उपासना म्हणजे योग
होय. सुरवातीस कल्याण म्हणजे
काय या विषयी
अनेक मत-मतांतर असू शकते
म्हणून या लेखामध्ये
कल्याण या शब्दाचा
अर्थ भारतीय तत्त्वज्ञानानुसार
मानलेला आहे हे मुद्दामूनच स्पष्ट करीत
आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार
मनुष्याचे कल्याण हे
त्याच्या ज्ञानप्राप्तीमध्ये आहे. त्यासाठीच
मनुष्य जन्म आहे.
मनुष्य जन्म खाणे,
पिणे, भोगण्यासाठी नाही. ज्ञान
म्हणजे स्वरूपाचे ज्ञान. मनुष्याचे
स्वरूप काय आहे.
शरीर हे त्याचे
स्वरूप नाही. आत्मा
हेच त्याचे सत्य-स्वरूप
आहे. हेच ज्ञान
योग-साधनेने कसे प्राप्त
करावे यासाठी पतंजलिमुनींनी सुत्ररूपाने योग-दर्शन शास्त्र निर्माण केलेले आहे.
हे शास्त्र निर्माण केले तेव्हा
संपूर्ण विश्वामध्ये एकच संस्कृती
होती ती म्हणजे
सनातन वैदीक संस्कृती
म्हणजेच भारतीय संस्कृती.
ही संस्कृती लाखो वर्षांपासून
अस्तित्वात आहे. इतर
संप्रदाय(धर्म) त्यानंतर खूप वर्षांनी
निर्माण झालेले आहेत.
तात्पर्य ही योग-साधना
कोणाताही एकच संप्रदाय
डोळ्यासमोर ठेवून केलेली
नाही, अखिल मनुष्यमात्रांचे
कल्याण साधण्याचे ध्येय ठेवून
केलेली आहे. योग साधनेने
मनुष्याचे अंतिम उद्दीष्ट
प्राप्त होऊ शकते,
यासाठी पतंजलिमुनींनी सुत्ररूपाने योग-दर्शन शास्त्र निर्माण केलेले आहे.
आजच्या विज्ञाननिष्ठ मनुष्याला सुध्दा ग्राह्य
होईल अशा तर्कशास्त्रदृष्ट्या
या योग-सुत्रांची मांडणी केलेली
आहे. त्याला स्थळाचे,
काळाचे, वंशाचे, जातीचे, धर्माचे कोणतेच बंधन
नाही. यामुळे अखिल
मनुष्यमात्रांचे कल्याण होणार
आहे. हा एक चिंतनाचा, अखिल विश्वातील
प्रत्येकाचे जीवन सार्थकी
लावण्याचा खटाटोप आहे.
या योग-दर्शन शास्त्रामध्ये समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद, कैवल्यपाद हे चार विभाग असून
एकुण १९५ योगसुत्रे
आहेत. या योग-दर्शन
शास्त्राचा अप-प्रचार अनेक माध्यमातून
सध्या सुरू आहे.
योग म्हणजे योगासने,
प्राणायाम वगैरे. योग
साधनेने भयंकर रोग
नष्ट होतात असे
सुध्दा अप-प्रचार सुरू आहे.
म्हणून पतंजलिमुनींनी सुरवातीच्याच सुत्रामध्ये योग म्हणजे
चित्ताच्या वृत्तींचा निरोध होय,
असे सांगितले आहे. चित्ताच्या
सर्व वृत्तींचा निरोध झाल्यानंतर
मनुष्य स्वरूपामध्ये स्थिर होतो.
असे स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे.
म्हणून पतंजलिमुनींचे हे योग-दर्शन
शास्त्र भारतीय मानस
शास्त्र आहे हे ठामपणे समजावून
घेतले पाहिजे.
तसेच योग-साधना
समजून घेण्यासाठी योग-दर्शन शास्त्र (पतंजलिमुनींचे) काय आहे
ते थोडक्यात समजून घेतले
पाहिजे. या योग-दर्शन
शास्त्रातील प्रकरण क्रमरचना
सुध्दा शास्त्रशुध्द आहे. प्रथम
समाधिपाद प्रकरणामध्ये मनुष्याचे अंतिम कल्याण
कोणते आहे ते आधी सांगितले
आहे. त्यानंतर त्यासाठी कोणत्या साधनांची आवश्यकता आहे ते दूसया साधनपाद
प्रकरणामध्ये सांगितले आहे. त्यानंतर
योग-साधना करीत असताना
अनेक सिध्दी प्राप्त
होतात, त्यांचे वर्णन त्यांचे
दुष्परिणाम तिसया विभूतिपाद
प्रकरणामध्ये सांगितले आहे. आणि
शेवटी कैवल्यपाद प्रकरणामध्ये मनुष्याचे अंतिम कल्याण
योग-साधनेने कसे साधते
याचा तपशील दिलेला
आहे. म्हणून विश्व कल्याणासाठी
योगाचा अभ्यास करण्यासाठी
पतंजलिमुनींच्या या योग-दर्शन
शास्त्राची ओळख करून
घेणे अत्यंत महत्वाचे
आहे. आणी शेवटी
असेच ध्यानात येते कि
विश्व कल्याणासाठी योगाचा शास्त्र-शुध्द
अभ्यास करण्यासाठीच पतंजलिमुनींनी सुत्ररूपाने योग-दर्शन शास्त्र निर्माण केलेले आहे.
हे योगशास्त्राचा अभ्यास व
आचरण केल्याने विश्वातील प्रत्येक मनुष्याचे कल्याण होईल
यामध्ये तीळमात्र शंका नाही.
समाधिपाद प्रकरणामध्ये अभ्यास आणि
वैराग्य या दोन उपायांनी चित्त-वृत्तींचा निरोध होतो.
तर सर्व चित्त-वृत्तींच्या
निरोधासाठी केलेल्या प्रयत्नास अभ्यास म्हणतात.
हा अभ्यास दीर्घकाळ
अखंडपणे व आदरपूर्वक
केल्यावर दृढ होतो.
आणी विषयासक्ति चित्तातून पूर्णपणे नष्ट होणे
त्यास वैराग्य म्हणतात. या विषयावर
भर देऊन योग
साधनेची सुरवात कशी
करावी हे सविस्तरपणे
सांगितलेले आहे. तसेच
समाधिमध्ये चित्त निर्मळ
होते. समाधिमध्ये योग्याची प्रज्ञा ऋतंभरा होते.
ऋतंभरा प्रज्ञेच्या संस्कारांचा सुध्दा निरोध
झाल्यावर निर्बीज समाधि प्राप्त
होते. ती कैवल्यावस्था
आहे. हेच योग
साधनेचे अंतिमतः उद्दीष्ट आहे हे स्पष्ट केलेले
आहे. साधनपाद प्रकरणामध्ये योग साधनेची
पध्दती विस्ताराने सांगितलेली आहे. त्या
मध्ये प्रामुख्याने यम, निमय,
आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान
व समाधि या
अष्टांगयोगाचा आग्रह धरलेला
आहे. तो क्रमाक्रमाने
करण्यास सांगितलेला आहे. (१)यम
पाच प्रकारचे(अ)अहिंसा--विचाराने, बोलण्याने व कृतीने
कोणाचीही हिंसा न
करणे. (ब)सत्य--नेहमी सत्याचा विचार करून
सत्य बोलावे व
तसेच सत्याचेच आचरण करणे,
(क)अस्तेय--दुसयाच्या संपत्तीचा लोभ न करणे,(ड)ब्रह्मचर्य--स्त्री विषयी काम-आसक्ती
न करणे, (इ)अपरिग्रह--गरजे
पेक्षा आधिक वस्तुंचा
साठा न करणे.
(२)निमय पाच प्रकारचे(अ)शौच--विवेकाने
मनाची व सात्विकतेने
शरीराची शुध्दता करणे, (ब)संतोष--मिळेल
त्यात समाधान मानणे,
(क)तप--ध्यान-धारणेसाठी मनोनिग्रह करणे, (ड)स्वाध्याय--आत्मज्ञान
प्राप्तीसाठी उपासना करणे
व (इ)ईश्वर प्राणिधान--परमेश्वरावर नितांत श्रध्दा
असणे. (३)ज्या स्थितीमध्ये शरीरास व
मनास सुख व स्थिरता प्राप्त होते त्यास
आसन म्हणतात. (केवळ पद्मासन)
(४)आसनजय झाल्यावर श्वास व
प्रश्वास यांचे नियंत्रण
करणे म्हणजे प्राणायाम
होय. प्राणायामाने चित्तातील प्रकाशरूप सत्त्वगुणांवर आवरण घालणाया
रज, तम गुणांचा
क्षय होतो. (५)प्रत्याहार
म्हणजे इंद्रियांचे संयमन करणे.
नाक, जिभ, डोळे,
त्वचा, कान ही ज्ञानेंद्रिये व वाणी,
हात, पाय, शिश्न,
गुदा ही कर्मेंद्रिये
यांना विषयभोगापासून नियंत्रित ठेवणे. मनोनिग्रह
झाल्यानंतर धारणा करण्यासाठीची
योग्यता मनाच्या ठीकाणी प्राप्त
होते. (६)धारणा म्हणजे मन
एकाग्र करणे. यम,
निमय, आसन, प्राणायाम,
प्रत्याहारा नंतर मन
एकाग्र करणे सूलभ
होते. (७)ध्यान म्हणजे मन
एकाग्र होणे. यम-निमय,
आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणे नंतर
मन एकाग्र लवकर
होते. (८)समाधी म्हणजे देहाभिमान
नष्ट होऊन स्वरूपाचा
साक्षात्कार होणे. विभूतिपाद
प्रकरणामध्ये योग साधनेमुळे
प्राप्त होणाया सिध्दींचे
वर्णन केले आहे.
अहिंसा दृढ झाल्यावर
त्या योग्याच्या सान्नीध्यामध्ये येणायांच्या चित्तामध्ये वैरभावनेचा त्याग होतो.
सत्य दृढ झाल्यावर
त्या योग्याच्या केवळ इच्छेनेच
क्रियाफळ प्राप्त होते. अस्तेय
दृढ झाल्यावर त्या योग्याच्या
केवळ इच्छेनेच सर्व साधन-संपत्ति
प्राप्त होते. ब्रह्मचर्यव्रत
सुप्रतिष्ठीत झाल्यावर त्या योग्याला
कोणत्याही कार्याविषयी सामर्थ्य आणि उत्साह
प्राप्त होतो. अपरिग्रह
दृढ झाल्यावर त्या योग्याला
सर्व गतजन्म व
पुनर्जन्म यांचे ज्ञान
प्राप्त होते. शरीर
शुध्दता पाळल्याने आपल्या देहाचा
सुध्दा तिरस्कार वाटू लागतो.
तसेच दुसयांच्या देहाचा ही.
चित्तशुध्दीमुळे मन प्रसन्न
होते. इंद्रीये नियंत्रित होतात. आत्मसाक्षात्काराची
पात्रता प्राप्त होते. संतोषामुळे
सर्वोत्तम सुख प्राप्त
होते.तपामुळे शरीर व इंद्रिये शुध्द होऊन
सिध्दी प्राप्त होतात. स्वाध्यायामुळे
देवता व ऋषींचे
दर्शन होते. ईश्वर
प्राणिधानाच्या दृढतेने समाधि सिध्द
होते.आसन सिध्द झाल्यानंतर
कोणत्याही द्वंव्दांचे कष्ट होत
नाहीत. प्राणायामाने ज्ञानप्रकाशावरचे आवरण नष्ट
होते. प्रत्याहाराने इंद्रिये पूर्णपणे नियंत्रित होतात. धारणेचा
अभ्यास करण्याची योग्यता मनाच्या ठिकाणी प्राप्त
होते. ध्यानाने
चित्त वासनारहित होते. समाधि
अवस्थेमुळे चित्तातील ज्ञान निर्मळ
होते, तसेच चित्त
त्रिगुणरहित होते. कैवल्यपाद
प्रकरणामध्ये अतिम उद्दीष्ट
प्राप्त करण्यासाठी योग साधनेच्या
मार्गातील विघ्नांचा तसेच ती
दूर करण्याची उपाय योजना
विस्ताराने सांगितलेली आहे. तसेच
आत्मसाक्षात्कारमुळे विवेकयुक्त कैवल्याचे मार्गक्रमण
होते. आत्मसाक्षात्कारमुळे शरीराचा अहंकार नष्ट
होतो. आत्मज्ञानाविषयी विरक्त झाल्यानंतर
समाधि प्राप्त
होते, याचे विवेचन
विस्ताराने केलेले आहे.
आजच्या सर्व समस्या
देहाशी निगडीत आहेत.
देहाभिमानाचा विसर झाल्यावर एकात्मतेची भावना निर्माण
होइल. मुख्य म्हणजे
मृत्युचे भय रहाणार
नाही. कारण मृत्यु
हा देहाचा आहे.
आणि आपले खरे
स्वरूप देह नसून
आत्मा आहे. योग
साधनेने वेगवेगळ्या पातळीवर जीवन उध्दाराचे
बदल दिसून येतात.
वैयक्तीक पातळीवर आत्मज्ञानाची जाण होऊन
मनःशांती निरोगी शरीर
सुख समाधान मिळते.
कौटुंबिक पातळीवर कुटूंबातील प्रत्येकाचे जीवन सुखी
समृद्ध होते. लहान
मुलांचे संस्कार त्याच वातावरणात
चांगले होतात. सामाजीक
पातळीवर एका नवीन
समृद्ध समाजाची निर्मीती होते, ज्या
समाजातील प्रत्येकाची वैचारीक क्षमता उदार,
विशाल आहे. राष्ट्रीय
पातळीवर प्रत्येकामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण
होते, जी आजच्या
काळाची खरी गरज
आहे. ही विश्वबंधुत्वाची
भावना नुसतीच धोरणे
जाहीर करून होत
नसते. त्यासाठी प्रत्येकाच्या हृदयी विश्वबंधुत्वाची
खरी तळमळ असावी
लागते. म्हणून या
योग-साधनेचा विचार करून
त्याच्या आचरणानेच केवळ मनुष्याचे
म्हणजेच पर्यायाने विश्वाचे कल्याण होते.
नारायण धाम,
भास्करा-एच-विश्व, धायरी, पुणे
४१
No comments:
Post a Comment