सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास
मनुष्य ज्या
प्रकारची व्यक्ति आहे, तेच
मनुष्याचे व्यक्तिमत्व आहे. ते
त्याच्या आचरणातून, संवेदनशीलतेतून तसेच विचारांतून व्यक्त
होते. मनुष्याचा स्वभाव तसेच
चारित्र्य हेच त्याचे
व्यक्तिमत्व आहे. मनुष्य
कसे आचरण करतो,
काय अनुभवतो, कशाचा विचार
करतो. विपरित परिस्थितीमध्ये
कसा वागतो, हे
त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असते.केवळ बाहेरील देखावा किंवा
मनुष्याची भाषा किंवा
शिष्टाचार हे व्यक्तिमत्वाची
फक्त झलकच असते.
हे खरे व्यक्तिमत्व
नाही. वास्तविकदृष्ट्या व्यक्तिमत्व विकास हा
मनुष्याच्या आंतरिक गुण-विकासावर
अवलंबून असतो.
आपली भारतीय संस्कृती
सनातन संस्कृती आहे. ईश्वराचे
अस्तित्व मानून त्याची
उपासनेद्वारा परमसुख प्राप्त
करणे हे आपल्या
संस्कृतीचे अंतिम ध्येय
आहे. मनुष्याचे अंतिम ध्येय
कोणते आहे हे समजून उमजून
घेतल्या नंतर व्यक्तिमत्व
विकासाची दिशा ठरविणे
उचित होते. मनुष्याच्या
सर्व शक्तिंचा व गुणांचा
विकास म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा
विकास होय. परब्रह्माचा
साक्षात्कार हेच मनुष्याचे
अंतिम ध्येय आहे.
ही ध्येयप्राप्ती शारिरीक विकास, मानसिक
विकास, बौध्दीक विकास, आध्यात्मिक
विकास या माध्यमातून
होत असते.
प्रत्यक्ष दिसणाया या भौतिक
सृष्टि शिवाय काही
सत्य आहे, तसेच
या भौतिक सृष्टितील
सर्व साधने प्राप्त
करून माझ्या इच्छा
पूर्ण उपभोगायच्या ही आपली
संस्कृती नाही. मनुष्याच्या
भौतिक समृद्धीचाच विचार करणे
ही आपली संस्कृती
नाही.
शारिरीक विकासाच्या माध्यमातून मानसिक विकास
करावयाचा आहे. निरोगी
शरीर व मनाच्या
व्यापकतेतून बौध्दीक विकास होणार
आहे. तसेच निरोगी
शरीर व मनाची
व्यापकता आणि विवेक
बुद्धिच्या सहाय्याने आध्यात्मिक विकास होत
असतो. म्हणून क्रमाक्रमाने
विकास साधून घेतला
पाहिजे. एक सोडून
विकास होत नसतो.
उदा. शरीरच जर
निरोगी नसेल तर
विवेक बुद्धि कार्यरत
होणार नाही.
शारिरीक विकास आयुर्वेदाच्या
उपचाराने होउ शकतो.
आयुर्वेदामध्ये आहार, विहार,
दिनचर्या, ऋतुचर्या, सदवृत्त, पंचकर्म इत्यादींचा सखोल विचार
केलेला आहे. आपण
जे अन्न खातो
त्याप्रमाणे आपले शरीर
व मन घडत असते. खाल्लेल्या
अन्नापासून रस, रक्त,
मांस, मेद, अस्थि,
मज्जा, शुक्र हे
सप्तधातू तयार होतात.
सात्विक आहाराने शरीर सुदृढ
व स्वभाव सत्त्वगुणी
होतो. राजसिक आहाराने
शरीर बलशाली व
स्वभाव रजोगुणी होतो. तामसिक
आहाराने शरीर रोगी
व स्वभाव तमोगुणी
होतो. म्हणून आपल्या
आहारामध्ये चार प्रकारची
शुध्दि आवश्यक आहे.
त्यामुळे आपले शरीर
सुदृढ तसेच मन
पवित्र बनते. क्षेत्रशुध्दि,
द्रव्यशुध्दि, कालशुध्दि, भावशुध्दि येथे क ची बाराखडी
आठवावी. कसे भोजन
करावे :- अन्न खाताना
मनामध्ये कोणता विचार
चाललेला आहे, त्याप्रमाणे
त्या अन्नाचे रूपांतरण होते. शुध्द
अंतःकरणाने खाल्लेले अन्न शरीरामध्ये
पोषक रस तयार
करते त्यामुळे शरीर सुदृढ
होते. क्रोध, ईर्षा,
मानसिक तणाव, भिती
अशा मनःस्तितीमध्ये खाल्लेले अन्न शरीरामध्ये
दूषित रस तयार
करते. त्यामुळे अनेक रोग
निर्माण होउ शकतात.
काय भोजन करावे
:- स्निग्ध, रसाळ, मधुर
आहाराने प्रेम, सुख-शांती
शरीर-स्वास्थ्य लाभते. खारट,
कोरडे, कडु, तीखट,
आंबट, व दाहक आहाराने मग्रुरी, अहंकारवृत्ती, ऐषराम, भेदबुध्दि,
विषयभोग या रजोगुणाने
सतत स्पर्धा करावीशी वाटते. रसृहीन,
शिळे, निषिध्द, उष्टे आहाराने क्रोध, लोभ, हिंसा,
याचना, भांडणतंटा, भीती, या
तमोगुणाने आळशीवृत्ती
वाढते. कीती भोजन
करावे :- आपल्या
पोटाच्या दोन भाग
अन्न, एक भाग पाणी व एक भाग रिकामा या
प्रमाणे भोजन करावे.
त्यामुळे अन्नपचन सुलभतेने होते. केव्हा
भोजन करावे :- भोजन
नियमित वेळेवर केल्याने
शरीरातील जठराग्नीद्वारा अन्नपचन सुलभ होते.
सर्वसाधारणपणे भूक लागल्यावरच
खावे. कोठे भोजन
करावे :- प्रत्येक
जागेतील हवापाणी , वातावरण,
व पर्यावरणाचा आपल्या मनावर
तसेच शरीरावर परिणाम होत
असतो. रस्त्यावर, दुषित वातावरणामध्ये
भोजन केल्याने सुक्ष्म जंतू आपल्या
शरीरात जाऊन रोग
उत्पन्न करतात. परंतू
स्वच्छ जागेमध्ये प्रसन्न वातावरणामध्ये भोजन केल्याने
मन आनंदी होऊन
अन्नाचा शरीरामध्ये पोषक रस
तयार होतो त्यामुळे
शरीर सुदृढ होते.
कोणाचे भोजन करावे
:- आपण कोणाचे
भोजन करतो त्याअन्नामध्ये
त्या माणसाची वासना दडलेली
असते. अनीती, अनाचार
आणी बेईमानी अशा अधर्म
मार्गाने मिळविलेल्या पैशाने तयार
केलेल्या भोजनाने आपल्यामध्ये अधर्मवृत्ती बळावते.
भोजनानंतर लगेचच पळणे,
व्यायाम, पोहणे, स्नान,
मैथुन शरीर-स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक
आहे.
भोजनानंतर शतपावली करावी. तसेच
दहा मिनिटे वज्रासनामध्ये
बसावे. त्यामुळे अन्नपचन उत्तम रितीने
होते. रात्रीच्या भोजनानंतर लगेचच झोपणे
शरीर-स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक
आहे.
झोपण्या पुर्वी थोडा
वेळ
धार्मिक ग्रंथांचे वाचन करून
भगवंताचे स्मरण करीत
शांत चित्ताने झोपावे. स्वच्छ अंधरूणावर
पूर्व किंवा दक्षिणेकडे
डोके करून झोपावे.
शरीर तसेच मन
या दोघांनाही आराम मिळाला
पाहिजे. चित्त शांत
आणी प्रसन्न रहाण्यासाठी पाचही ज्ञानेंद्रियांची
शुध्दि केली पाहिजे.
कानाने चांगल्या गोष्टी ऐकाव्यात,
बाते श्रीहरी भजन ऐकावे,
डोळ्याने महापुरूषांचे जीवन पहावे,
सत्-दृश्याचे अवलोकन करावे,
मनामध्ये सत्-विचारांचा विचार करावा,
त्यामुळे मानसिक संतुलन
होते. जे शरीर-स्वास्थ्यासाठी
अत्यंत आवश्यक आहे.
शरीर-स्वास्थ्यासाठी दररोज नियमितपणे
व्यायाम केला पाहिजे.
सूर्यनमस्कार हा एक सर्वांग परिपूर्ण व्यायाम आहे.
पृथ्वीवर सूर्य हा
ऊर्जेचा अखंड स्त्रोत
आहे. सूर्यनमस्कार ही क्रियात्मक,
शब्दात्मक व भावनात्मक
संकल्पना आहे. कारण
सूर्यनमस्काराने काया-वाचा-मन यांचा समतोल
साधता येतो. सूर्यनमस्कारामुळे
शरीराच्या सर्व महत्त्वाच्या
अवयवांना-इंद्रियांना होणारा रक्तपुरवठा
वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. हृदय
आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. पाठीचा
मणका लवचिक होतो.
कंबरेचे स्नायु बळकट
होतात. पोटातील चरबी कमी
होते. पचनक्रिया सुधारते. मनाची एकाग्रता
वाढते. मंत्रोच्चाराने व श्वसनक्रियेमुळे
शब्दउच्चार स्पष्ट होतो.
सूर्यनमस्कारामध्ये योगासनांचा अभ्यास, प्राणायामाची साधना, सूर्याची
उपासना, मंत्रांचे सामर्थ्य आहे. म्हणून
सूर्यनमस्कार हा एक सर्वांग परिपूर्ण व्यायाम आहे. रथसप्तमी
हा जागतिक सूर्यनमस्कार
दिन आहे.
शरीराच्या पोषणासाठी अन्ना इतकीच
प्राणांची गरज असते.
शरीरामध्ये चालणाया श्वसन, पचन,
उच्चारण, अभिसरण, विसर्जन या क्रिया
पंचप्राणांच्या आधारानेच चालत असतात.
त्यामुळेच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये
कार्यक्षम होतात. प्राणवायु
श्वसनक्रिया संतुलित करतो, समानवायु
अन्नाचे पचन करून
त्याचे शरीरास लागणाया
घटकांमध्ये रूपांतर करतो,व्यानवायु रक्ताची अभिसरण क्रिया
कार्यक्षम करतो, अपानवायु
शरीरातील अनावश्यक घटकांचे विसर्जनाचे कार्य करतो,
तर उदानवायु कंठामध्ये राहून वाणीच्या
रूपाने उच्चारणाचे कार्य करतो.
डोळे, कान, नाक,
जीभ व त्वचा
ही पाच ज्ञानेंद्रिये
आहेत. या इंद्रियांमुळे
मनुष्यास दिसण्याचे, ऐकण्याचे, वास घेण्याचे,
अन्नाच्या चवीचे, व
स्पर्शाचे ज्ञान होते.
हात, पाय, वाणी,
शिश्न व गुदा ही पाच कर्मेंद्रिये आहेत. या
इंद्रियांमुळे मनुष्य काम
करणे, खाणे, पिणे,
चालणे, बोलणे, मल-मूत्र
त्यागणे या क्रिया
करू शकतो. प्राणांच्या
विकासासाठी प्राणायाम, पोहणे, गायन
या उपक्रमातून शरीर क्रियाशील
होऊन कार्यक्षमता वाढते. परंतू
प्राणांचा विकास झाला
नाही तर ज्ञानेंद्रिये
व कर्मेंद्रिये यांचे कार्य
सुरळीतपणे होऊ शकत
नाही. दृष्टीदोष. बहिरेपणा, श्वसनदोष, त्वचेचे दोष, बेचवपणा
इत्यादी शरीराचे रोग वाढतात.
उदासीनता वाटू लागते.
मानसिक विकास अष्टांगयोग-आचरणाने
होउ शकतो. योग
म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. चित्त वृत्तींच्या
निरोधासाठी केलेला प्रयत्न
म्हणजे अभ्यास असून
ही साधना आहे.
अनुभवयुक्त इंद्रिय विषयांची आसक्ती चित्तामधून
नष्ट होणे हेच
वैराग्य असून ते
साध्य आहे. अष्टांगयोग साधना यम,
निमय, आसन, प्राणायाम,
प्रत्याहार, धारणा, ध्यान,
समाधी या आठ पाय-यांनी पुर्ण होत
असते. चित्तातील विकार नष्ट
होतात. यम पाच प्रकारचे आहेत--(१)अहिंसा--विचाराने, बोलण्याने व कृतीने
कोणाचीही हिंसा न
करणे. (२)सत्य--नेहमी सत्याचा विचार करून
सत्य बोलावे व
तसेच सत्याचेच आचरण करणे,
(३)अस्तेय--दुसयाच्या संपत्तीचा लोभ न करणे, (४)ब्रह्मचर्य--परस्त्री
विषयी काम-आसक्ती न करणे,
(५)अपरिग्रह--गरजे पेक्षा आधिक
वस्तुंचा साठा न करणे. निमय
पाच प्रकारचे आहेत--(१)शौच--विवेकाने मनाची व
सात्विकतेने शरीराची शुध्दता करणे, (२)संतोष--मिळेल
त्यात समाधान मानणे,
(३)तप--ध्यान-घारणेसाठी मनोनिग्रह करणे, (४)स्वाध्याय--आत्मज्ञान
प्राप्तीसाठी उपासना करणे
व (५)ईश्वर प्राणिधान--परमेश्वरावर नितांत श्रध्दा
असणे. ज्या स्थितीमध्ये
शरीरास व मनास सुख व स्थिरता प्राप्त होते त्यास
आसन म्हणतात. आसनजय झाल्यावर
श्वास व प्रश्वास
यांचे नियंत्रण करणे म्हणजे
प्राणायाम होय. प्राणायामाने
चित्तातील प्रकाशरूप सत्त्वगुणांवर आवरण घालणाया
रज, तम गुणांचा
क्षय होतो. प्रत्याहार
म्हणजे इंद्रियांचे संयमन करणे.
मनोनिग्रह झाल्यानंतर धारणा करण्यासाठीची
योग्यता मनाच्या ठीकाणी प्राप्त
होते. धारणा म्हणजे
मन एकाग्र करणे.
तर ध्यान म्हणजे
मन एकाग्र होणे.
समाधी म्हणजे देहाभिमान
नष्ट होऊन स्वरूपाचा
साक्षात्कार होणे.
बौध्दीक विकास विवेकज्ञानाने
होउ शकतो. प्रत्येक
गोष्टीचा सांगोपांग विचार करून
काय अभिष्ट आहे
याचा निर्णय करण्याचे
सामर्थ्य म्हणजे विवेक
होय. मनुष्याच्या शरीरस्वास्थ्य विवेकी मनानेच
विज्ञानाचा अभ्यास सहज
करू शकतो. याचा
अर्थ शारिरीक विकास व
मानसिक विकास झाल्यानंतरच
बुध्दीचा विधायक कार्यासाठी
उपयोग केला जातो
नाहीतर नूसत्या अहंकारी बुध्दीने विघातक उपक्रम
निर्माण होतात आणि
प्रगती होत नाही.
हीच गोष्ट आज
प्रत्ययाला येत आहे.
बौध्दीक विकासासाठी व्यवहारज्ञान, भौतिकज्ञान, व तंत्रज्ञान
यांचा अभ्यास प्रश्नमंजुषा,
गटचर्चा, परिसंवाद आयोजित करून
विज्ञानाचा विकास होऊन
आकलन, निरिक्षण, निर्णयक्षमता, प्रतिभा यांचा विकास
घडून येतो. परंतू
बौध्दीक विकास झाला
नाही तर भौतिक
दारिद्र्य येते. आधुनिक
तंत्रज्ञानाच्या अज्ञानाने न्युनगंड निर्माण होऊन मत्सर
भावना वाढते.
आध्यात्मिक विकास आत्म-साक्षात्काराने
होउ शकतो. क्रमाक्रमाने
शारिरीक विकास, मानसिक
विकास व बौध्दीक
विकास झाल्यानंतरच आध्यात्मिक विकास होणे
हेच मनुष्याच्या जीवनातील अंतिम उद्दिष्ट
आहे आणि तोच
सर्वांगीण विकास आहे.
आध्यात्मिक विकासाने विश्वाच्या परमसत्याचा शोध घेण्याची
प्रवृत्ती वाढते. देहाभिमान
नष्ट होतो. परंतू
नूसत्याच आध्यात्मिक विकासाने पाखंडी, ढोंगी, कर्मठ
कर्मकांड या प्रवृत्ती
बळावतात आणि अंतिम
उद्दिष्टाकडे दुर्लक्ष होऊन अधर्माचा
प्रभाव वाढू लागतो.
आजच्या परिस्थितीचे मूळ कारण
हेच आहे. त्यासाठी
अध्यात्मशास्त्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास, संतांच्या चरित्राचा अभ्यास, अंतर्मुखता, असे उपक्रम
घेऊन आत्मज्ञान होते. विश्वाच्या
परमसत्याचा शोध घेण्याची
प्रवृत्ती वाढते. देहाभिमान
कमी होतो.
सत्व, रज,
तम हे तीन गुण प्रकृतीचे
आहेत सत्वगुणाने रज व तम या दोन्ही गुणांना
नियंत्रित केले पाहिजे.
निरंतर सात्विक उपासना केली
तर सत्वगुणांची वृध्दी होते.
ज्या धर्माच्या आचरणाने सत्वगुणांची वृध्दी होते
तोच श्रेष्ठ धर्म आहे.
तो धर्म रजोगुणाला
व तमोगुणाला नष्ट करतो.
ज्ञानी पुरूष ज्या
गोष्टींची प्रशंसा करतात त्या
गोष्टी सात्विक आहेत. तर
ते ज्या गोष्टींची
निंदा करतात त्या
गोष्टी तामसिक आहेत.
आणि ते ज्याचा
तिरस्कार करतात त्या
गोष्टी राजसिक आहेत.
जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही
तसेच शरीराची व त्रिगुणांची
निवृत्ती होत नाही
तोपर्यंत सत्वगुणांच्या वृध्दीसाठी सात्विक उपासना करीत
रहावे. त्यानेच धर्माची वृध्दी होऊन
अंतःकरणाची शुध्दी होते
तेव्हा आत्मतत्वाचे ज्ञान होते.
मनुष्याच्या कल्याणासाठी भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग हे तीन मार्ग आहेत.
याशिवाय कोणताही अन्य मार्ग
कल्याणाचा नाही. जो
मनुष्य कर्म व कर्मफळामध्ये अनासक्त आहे व ज्याने कर्माचा
त्याग केलेला आहे
तो ज्ञानयोगाचा आधिकारी असतो. ज्याच्या
चित्तामध्ये कर्माचे व कर्मफळाचे
वैराग्य नाही तो
सकाम मनुष्य कर्मयोगाचा
आधिकारी असतो. जो
मनुष्य कर्मामध्ये विरक्त नाही
तसेच आसक्त नाही
व ज्यास परमात्म्याच्या
लीलांमध्ये श्रध्दा असते तो
भक्तीयोगाचा आधिकारी असतो. परंतू
आध्यात्मिक विकास झाला
नाही तर परम सत्याचे ज्ञान होत
नाही. मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय
प्राप्त होत नाही.
भोगवादाचा अहंकार वाढतो.
मनुष्यास केवळ बुध्दीच्या
जोरावर परमानंद मिळू शकत
नाही. केवळ बुध्दीच्या
विकासाने मनुष्याच्या जीवनाची इतिश्री होत नाही.
आज पाश्चात्य देशांंमध्ये मानसिक आणि
वैज्ञानिक समृध्दीने माणूसकीचा घोर अपमान
होत आहे. ज्ञानाची
अवहेलना होत आहे.
आज सगळीकडे रजोगुणी अहंकार वाढत
चालला आहे. तसेच
त्याला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे
ही मोठी दुर्दैवाची
गोष्ट आहे. सर्वांगिण
व्यक्तिमत्व विकासाने सर्वांमध्येे एकता, समानता
आणि अभिन्नतेची भावना उत्पन्न
होते. मनुष्यजीवन सुख-शांतीमय बनू शकते.
आज सगळीकडे असत्याची प्रशंसा आणि सत्याची
अवहेलना प्रतिष्ठित झालेली आहे.
जो मनुष्य जितका
सुशिक्षित आहे, बुध्दिवान
आहे, तितकाच तो
स्वरूपज्ञान प्राप्त करून घेण्या
ऐवजी माहिती-प्रधान ज्ञानामध्ये डूबलेला दिसून येतो.
त्याच्या जीवनामध्ये शांतीचा अभाव आहे.
ही मनः शांती
सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासानेच मिळू शकते.
स्वामी मोहनदास
(भ्रमणध्वनी-९४२०८५९६१२)
एल - ५०७ चंद्रमा-विश्व,
धायरी,
पुणे ४११० ६८
No comments:
Post a Comment