विदुरनिति (महाभारत,उद्योगपर्व,अध्याय-३३ते४०)
महाभारत युध्दाच्या आधी विदुराने धृतराष्ट्रास जो सल्ला दिला ती विदुरनिति म्हणून प्रसिध्द आहे.
विदुर धृतराष्ट्रास सांगतात---महाराज, ज्याचे बलवानाशी वैर
झालेले आहे, त्या निर्बल मनुष्यास रात्री झोप
लागत नाही. तिन्ही लोकांचा स्वामी होण्याची योग्यता असलेल्या धर्मराज युधिष्ठिरास आपण
तेरा वर्षे वनामध्ये पाठविले. युधिष्ठिरामध्ये दया,
सत्य, पराक्रम, धर्माचरण हे
सद्गुण आहेत, म्हणून त्याने कौरवांचे अनेक अपराध निमूटपणे सहन
केले. आपल्या स्वरूपाचे ज्ञान, उद्योग, दुःख सहन
करण्याची शक्ती, व
धर्माचारणामध्ये स्थिरता हे
सद्गुण ज्या मनुष्यास कर्तव्यापासून दूर
करू शकत नाही, त्यास पंडित म्हणतात. जो
मनुष्य श्रेष्ठ कर्म करतो, व
निंदनीय कर्मांचा त्याग करतो, त्यास पंडित म्हणतात. ज्या मनुष्याचे नियोजन, कार्याच्या आधी
प्रगट होत नाही, कार्य पूर्ण झाल्यावर समजते, त्यास पंडित म्हणतात. थंडी-उष्णता, भय-अनुराग, संपत्ती-विपत्ती ही
द्वंद्वे ज्या मनुष्यच्या कार्यामध्ये विघ्न घालू शकत
नाही, त्यास पंडित म्हणतात. ज्याची बुध्दी धर्माचरण करते, भोगाचा त्याग करते, त्यास पंडित म्हणतात. विवेकी मनुष्य आपल्या शक्तीनुसार कार्याची इच्छा करतात व
ते पूर्ण करतात. तसेच कोणासही तूच्छ मानीत नाहीत. विद्वान मनुष्य खूप
वेळ ऐकतो. परंतू काही वेळातच जाणतो. जाणून कर्तव्यबुध्दीने कार्य करतो, अपेक्षेने नाही. दूसऱ्याच्या बाबतीत कोणतीही निरर्थक टीका करीत नाही. विद्वान मनुष्य दुर्मिळ वस्तुची अपेक्षा करीत नाही. हरविलेल्या वस्तु विषयी शोक
करीत नाही. प्रतिकुल परिस्तितीमध्ये घाबरत नाही. जो
मनुष्य पूर्ण विचार करून कार्यास प्रारंभ करतो, मध्येच थांबत नाही, वेळ
निरर्थक वाया घालवीत नाही, मनावर नियंत्रण ठेवतो, त्यास पंडित म्हणतात. विद्वान मनुष्य श्रेष्ठ कार्य प्रेमाने करतात. ते
उन्नतीसाठी कार्य करतात. जो
मनुष्य सन्मानाने आनंदी होत
नाही, अपमानाने दुःखी होत
नाही, ज्याचे चित्त विचलीत होत
नाही, त्यास पंडित म्हणतात. जो
मनुष्य सर्व पदार्थांचे खरे
स्वरूप जाणतो, सर्व कार्ये करण्याची कला
जाणतो, आणि सर्व वस्तु उपयोगी करण्याचा उपाय जाणतो, त्यास पंडित म्हणतात. जो
तत्त्वज्ञान ओघवती वाणीने सांगतो, तर्कशास्त्रदृष्ट्या पटवून सांगतो, जो
प्रतिभासंपन्न आहे, ग्रंथाचे तात्पर्य चटकन सांगतो, त्यास पंडित म्हणतात. जो
मनुष्य विद्यावान, बुध्दीमान, असून थोरांचा सन्मान करतो, त्यास पंडित म्हणतात. जो
मनुष्य अध्ययन न
करता गर्व करतो, दरिद्री असून मोठमोठी मनोरथे करतो, कोणतेही कार्य न
करता धनाची अपेक्षा करतो, त्यास मूर्ख म्हणतात. जो
मनुष्य स्वतःचे कर्तव्य सोडून दूसऱ्याचे काम
करतो, मित्राशी असत्याचे आचरण करतो, त्यास मूर्ख म्हणतात. जो
मनुष्य शत्रुशी मित्रता करतो, आणि
मित्राचा तिरस्कार करतो, त्यास मूर्ख म्हणतात. जो
मनुष्य सर्व ठिकाणी संदेह करतो, प्रत्येक कार्यामध्ये व्यत्यय आणतो, त्यास मूर्ख म्हणतात. जो
मनुष्य पितरांचे श्राध्द करीत नाही, देवतांचे पूजन करत
नाही, त्यास मूर्ख म्हणतात. जो
मनुष्य बोलावल्या शिवाय येतो, विचारल्या शिवाय बोलतो, अविश्वसनीय मनुष्यावर विश्वास ठेवतो, त्यास मूर्ख म्हणतात. जो
मनुष्य स्वतः दोषी असून त्याच्यावर दोषारोपण केले तर
आक्षेप घेतो, तसेच असमर्थ असूनही क्रोध करतो, त्यास महामूर्ख म्हणतात. जो
मनुष्य आपली योग्यता नसताना आळशी वृत्तीने कामभोगाची इच्छा करतो, त्यास मूर्ख म्हणतात. जो
मनुष्य अयोग्य मनुष्यास उपदेश करतो, दरिद्रीचा आश्रय घेतो, त्यास मूर्ख म्हणतात. जो
मनुष्य पुष्कळ धन-संपत्ती प्राप्त करून सुध्दा ती
अयोग्य ठिकाणी खर्च करीत नाही, त्यास पंडित म्हणतात. जो
मनुष्य स्वजनांना भोजन न
देता फक्त स्वतः उत्तम भोजन करतो, त्यास क्रूर म्हणतात. मनुष्य पाप
करून खूप धन
मिळवितो, परंतू त्याचा उपभोग दूसरेच घेतात, तरी
सुध्दा पाप करणाराच दोषी आहे.
एखाद्या धनुर्धराने बाण सोडला तर
तो कोणाल लागेल, किंवा नाही लागणार, परंतू राजाने घेतलेला निर्णय संपूर्ण राष्ट्रास विनाशकारी ठरू
शकतो. एका (बुध्दी)ने (कर्तव्य व
अकर्तव्य) या दोघांचा निश्चय करून चार
उपायांनी(साम,दान,भेद,दंड) तीघांना(शत्रु, मित्र व
त्यागी) नियंत्रणामध्ये ठेवावे. पाच
इंद्रियांवर नियंत्रण ठेवून सहा(संधी, विग्रह, यान, आसन,
द्वैधीभाव, समाश्रयरूप) गुणांना
जाणून सात(स्त्री, जुगार, शिकार, मद्यपान, कठोर वाणी, कठोर शिक्षा, अनितीने धनोपार्जन) गोष्टी सोडून मनुष्य सुखी होत
असतो. वीष पीण्याऱ्यास, एकट्यास मारते, शस्त्राने एकाचाच वध
होतो, परंतू गुप्त योजना प्रकट झाल्यावर राजाचा, प्रजेचा, व
राष्ट्राचा विनाश करू
शकते. एकट्याने स्वादीष्ट भोजन करू
नये. एकट्याने निश्चय करू
नये. जसे समूद्र पार
करण्यासाठी जहाज हे
एकच साधन आहे,
तसेच स्वर्गामध्ये जाण्यासाठी सत्याचरण हे
एकच साधन आहे. दूसरे नाही. परंतू आपणास ते
समजत नाही. क्षमाशील मनुष्यामध्ये एकच
दोष असतो, दुसरा नाही, क्षमाशील मनुष्यास असमर्थ समजतात हाच
तो दोष आहे.
परंतू तो दोष
मानणे चूकीचे आहे.
कारण क्षमा हे
समर्थांचे भूषण आहे.
केवळ धर्माचरण परम
कल्याणकारी आहे. एकमात्र क्षमा हीच
शांतीचा सर्वश्रेष्ठ उपाय आहे.
विद्या संतोष देणारी असून अहिंसा सुख
देणारी आहे. या
संपूर्ण विश्वामध्ये
ऱ्या
दोन
प्रकारचे मनुष्य अधम
आहेत,--आळशी
गृहस्थ व कर्मासक्त संन्याशी. कठोर न
बोलणारा मनुष्य व
दुष्टांचा आदर न
करणारा मनुष्य विशेष मानला जातो. शक्ती शाली असून क्षमा करणारा आणि
निर्धन असून दान
करणारा असे दोघे स्वर्गाच्या वरचे स्थान प्राप्त करतात. नीतीने मिळविलेल्या धनाचे दोन
दुरूपयोग आहेत,--अपात्रास धन
देणे आणि सत्पात्रास धन
न देणे. धनवान असून दान
न करणारा व
दरिद्री असून कष्ट सहन
न करणारा अशा
दोघांस दगड बांधून पाण्यामध्ये बुडवावे. योगयुक्त संन्याशी आणि
रणभूमी मध्ये मरणारा योध्दा हे
दोघे सूर्यमंडळास भेदून उर्ध्वगतीस(उत्तम) प्राप्त होतात. उत्तम, मध्यम, अधम
असे तीन प्रकारचे मनुष्य असतात, त्यांना यथायोग्य कार्यमध्ये प्रवृत्त करावे. स्त्री, पुत्र व
दास हे तीन
प्रकारचे मनुष्य धनाचे आधिकारी नाहीत, त्यांनी मिळविलेल्या धनावर त्यांचाच आधिकार असतो, ज्यांच्या वर
ते तीघे आधीन आहेत(पति-स्त्री, पिता-पुत्र व
स्वामी-दास).
दूसऱ्याच्या
धनाची चोरी करणे, दूसऱ्याच्या स्त्रीशी संबंध ठेवणे, व
हितैषी मित्राचा त्याग करणे या
तिन दोषांमुळे मनुष्याचे आयुष्य, धर्म व
कीर्तीचा क्षय होतो. काम,
क्रोध व लोभ
हे नरकाचे तीन
दरवाजे असून त्यांचा त्याग केला पाहिजे. वरदान प्राप्ती, राज्यप्राप्ती, व
पुत्रप्राप्ती या तिघांच्या बरोबरीचे एक
सूख आहे,--शत्रुच्या कष्टापासून मुक्ती. अल्पबुध्दीवान, दीर्घकाळ विचार करणारा, उताविळ, व
स्तूति करणारा, यांच्याशी गुप्त बातमी बद्दल चर्चा करू
नये. त्यांचा त्याग करावा. गृहस्थाने चार
प्रकारच्या मनुष्यास आपल्या घरी
निवास करू द्यावा,--कुटूंबातील वयोवृध्द, उच्च कुळातील संकटग्रस्त मनुष्य, निर्धन मित्र, निपुत्रिक बहिण. या
चारांमुळे तात्काळ फळ
मिळते,--देवतांचा
संकल्प, बुध्दीवंतांचा प्रभाव, विद्वानांची नम्रता, पापांचा विनाश. या
चार कर्मामुळे भय दूर
होते परंतू ते
कर्म करताना श्रध्दा नसेल तर
तेच भय प्रदान करते,--अग्निहोत्र, मौन, स्वाध्याय, यज्ञानुष्ठान. पिता, माता, अग्नि, आत्मा व
गुरू या पाचांची सेवा श्रध्देने करावी. देवता, पितर, मनुष्य, संन्याशी, अतिथी या
पाचांचा सन्मान करणारा मनुष्य यश
प्राप्त करतो. कोठेही असाल तेथे हे
पाचजण असतातच,--मित्र, शत्रु, त्यागी, आश्रीत, आश्रय देणारा. पाच
ज्ञानेंद्रियापैकी एक जरी
इंद्रिय दोषयुक्त झाले, तरी
त्याची बुध्दी भ्रमिष्ट होते. संपत्ती प्राप्त करणाऱ्या मनुष्याने या सहा
दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे,--झोप, तन्द्री, भिती, क्रोध, आळस,
दीर्घसूत्रता. या सहांचा त्याग करावा,--उपदेश न
देणारा आचार्य, मंत्रोच्चार न
करणारा ब्राह्मण, रक्षण करण्यामध्ये असमर्थ राजा, कटु
वचन बोलणारी स्त्री, नगरामध्ये रहाण्याची इच्छा करणारे गुराखी, वनामध्ये रहाण्याची इच्छा करणारी परिचारिका. मनुष्याने या
सहा सदगुणांचा त्याग कधीही करू
नये,--सत्य,
दान, कर्तव्य, अनसूया(गुणांमध्ये दोष दाखविण्याच्या प्रवृत्तीचा अभाव) क्षमा, धैर्य. धनप्राप्तीची विद्या, धनप्राप्ती, निरोगी शरीर, धर्मपत्नीची अनुकूलता, धर्मपत्नीचे प्रेम, आज्ञाधारी
पुत्र या सहा
गोष्टी मनुष्यास सुखदायी आहेत. जो
मनुष्य षडविकारांवर (काम, क्रोध, लोभ,
मोह, मत्सर,अहंकार)नियंत्रण ठेवतो, तो
पापमुक्त होतो. या
जगामध्ये हे सहा
च (सातवा नाही) प्रकारचे मनुष्य सहा
प्रकारच्या लोकांपासून आपले जीवननिर्वाह करतात,--चोर बेसावध मनुष्यापासून, वैद्य रोग्यापासून, कामोन्मत्त स्त्रीया कामी मनुष्यापासून, पुरोहित यजमानापासून, राजा भांडखोरापासून, विद्वान मूर्खापासून. मुहूर्तभर(एक मुहूर्त म्हणजे ४८
मिनीटे) सुध्दा देख-रेख न
करण्याने गाय, सेवा, शेती, स्त्री, विद्या व
सेवक ही सहा
विस्कळीत होतात. हे
सहाजण आपल्या उपकारकर्त्यास कार्यानंतर विसरतात,--शिक्षण झाल्यानंतर शिष्य आचार्यास, लग्न झाल्यानंतर मुलगा आईस,
कामवासनेची तृप्ती झाल्यानंतर पुरूष स्त्रीस, कार्य झाल्यानंतर मनुष्य सेवकास, नदी
पार झाल्यानंतर मनुष्य नौकेस, निरोगी झाल्यानंतर रोगी वैद्यास. या
जगामध्ये हे सहा
मनुष्यास सुखदायी आहेत,--निरोगी असणे, कर्जबाजारी नसणे, परदेशामध्ये न
रहाणे, चांगल्या लोकांचा सहवास, आपल्या इच्छेने जीवन-निर्वाह करणे, निर्भय असणे. या
जगामध्ये हे सहा
मनुष्यास दुःखदायी आहेत,--मत्सरी, तिरस्कृत, असंतोषी, क्रोधी, शंका घेणारा, दुसऱ्याच्या जीवावर जीवन-निर्वाह करणारा. स्त्री-आसक्ती, जुगार, शिकार, मद्यपान, वाणीतील कठोरता, कठोर शिक्षा, धनाचा दुरूपयोग या
सात दुर्गुणांचा राजाने त्याग केला पाहिजे. मनुष्याच्या विनाशाची आठ
कारणे आहेत,--ब्राह्मणाचा द्वेष, ब्राह्मणाशी वैर,
ब्राह्मणाचे धन लुबाडणे, ब्राह्मणास मारण्याची इच्छा, ब्राह्मणाच्या निंदेमध्ये आनंदी होणे, ब्राह्मणाची प्रशंसा सहन
न होणे, यज्ञकार्यामध्ये
ब्राह्मणाचे विस्मरण होणे, ब्राह्मणाच्या याचने मध्ये दोष
काढणे या सर्व दोषांचा बुध्दीमान मनुष्याने त्याग केला पाहिजे. मित्रांचा सहवास, आधिक धनाची प्राप्ती, पुत्राचे अलिंगन, धर्मपत्नीशी शरीरसंबंध, मितभाषी, स्वजनांची उन्नती, अभिष्टवस्तुची प्राप्ती, समाजामध्ये सन्मान हे
आठ मनुष्यास सुखदायी आहेत. बुध्दी, चारित्र्य, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, पराक्रम, वाणीतील नेमकेपणा, दान,
कृतज्ञता हे आठ
गुण मनुष्याची ख्याती वाढवितात. जो
विद्वान मनुष्य नऊ(दोन डोळे, दोन
कान, दोन नाकाची छिद्रे, मुख,
लिंग व गुदा) दरवाजे असलेल्या, तीन(सत्व, रज,
तम)खांबाच्या,
पाच साक्षीरूप(कान-शब्द, डोळे-रूप, नाक-गंध, त्वचा-स्पर्श, जिभ-रस) आत्म्याच्या निवासस्थानी शरीररूपी घराला जो
तत्वाने जाणतो, तो
ज्ञानी आहे. हे
दहा प्रकारचे लोक
धर्मतत्त्वाला मानीत नाहीत,--दारूच्या नशेमध्ये गुंग झालेला, बेसावध, मूर्ख, थकलेला, क्रोधी, भूकेलेला, आततायी, लोभी, भित्रा, कामी. जो
राजा काम-क्रोधाचा त्याग करतो, सत्पात्री दान
करतो, विशेषज्ञ आहे,
धर्मशास्त्राचा जाणकार, कर्तव्यदक्ष, त्याच्या आज्ञेचे सर्वजण पालन करतात. जो
मनुष्यामध्ये विश्वास उत्पन्न करू
शकतो, जो अपराध्यास शिक्षा करतो, जो
क्षमा करतो, त्या राजाकडे संपत्ती आपोआप जात
असते. जो दुर्बल मनुष्याचा अपमान करीत नाही, सावधानतेने शत्रुशी बुध्दीपूर्वक आचरण करतो, बलाढ्य शत्रुशी युध्द करीत नाही, वेळ
प्रसंगी आपला पराक्रम सिध्द करतो, तो
धैर्यवान आहे. जो
मनुष्य आपत्तिकाळामध्ये दुःखी होत
नाही, तर सावधानतेने आपत्तीवर मात
करण्याचा प्रयत्न करतो, दुःख सहन
करतो, त्याचे शत्रु नेहमी पराजित होतात. आपले घर
सोडून परदेशी निवास, पापींशी संगनमत, परस्त्रीगमन, ढोंगी, चोरी, चूगल्या करणे, मद्य-सेवन या
सर्वांचा जो मनुष्य त्याग करतो, तो
नेहमी सूखी होतो. जो
मनुष्य क्रोधाने किंवा आततायीने धर्म, अर्थ, व
काम पुरूषार्थ करीत नाही, विचारल्यावरच यथार्थ उत्तर देतो, मित्राशी भांडत नाही, सन्मान केला नाही तरी
क्रोधीत होत नाही, विवेकानेच वागतो, दुसऱ्यांचे दोष
पहात नाही, सर्वांवर दया
करतो, तो सर्वत्र प्रशंसनीय होतो. जो
मनुष्य विचीत्र पोशाख घालत नाही, आपल्या पराक्रमाचा डंका पिटत नाही, व्याकुळ परिस्थितीमध्ये सुध्दा कटुवचन बोलत नाही, त्यावर सर्वजण प्रेम करतात. जो
मनुष्य शांत झालेली वैराची आग
पुन्हा प्रज्वलीत करीत नाही, गर्व करीत नाही, आपल्या विपत्तीचा डंका पिटत नाही, अनुचित कार्य करीत नाही, तो
सर्वश्रेष्ठ आहे. जो
मनुष्य आपल्या सुखामध्ये प्रसन्न होत
नाही, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंदी होत
नाही, दान केल्यावर पश्चात्ताप करीत नाही, तो
सदाचारी आहे. जो
मनुष्य अनेक धर्मतत्त्वांना जाणतो, त्यामध्ये उत्तम व
अधम याचा विवेकाने भेद
जाणतो, तो जेथे जाईल तेथे आपले प्रभुत्व सिध्द करतो, जो मनुष्य षडविकारी, पापी, राजद्रोही, दुर्जन, ढोंगी अशा
सर्वांशी वाद करण्याचे टाळतो, तो
श्रेष्ठ आहे. जो
मनुष्य दान, हवन,
देवपूजन, मांगलिक कर्म, प्रायश्चित्त ही
सर्व नित्य कर्मे करतो, त्यास देवता अभ्युदय प्रदान करतात. जो
मनुष्य आपल्या समविचारी लोकांशी मैत्री, विवाह-संबंध करतो, त्याची नीति श्रेष्ठ आहे.
जो मनुष्य आपल्या आश्रितांना भोजन दिल्यानंतर स्वतः थोडेच भोजन करतो, खूप
कार्य करून थोडीच विश्रांती घेतो(झोपतो), त्याची सर्व संकटे दूर
पळून जातात. जो
मनुष्य सर्व प्राणीमात्रास शांती देतो, सत्यवादी असून दूसऱ्यांचा आदर
करतो, तो सर्वत्र प्रसिध्दी मिळवितो. जो
मनुष्य विनम्र आहे,
तो श्रेष्ठ असून त्याची कांती सूर्यासमान चमकत असते.
No comments:
Post a Comment