नृसिंह भगवान
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलंतं
सर्वतोमुखम्
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं
नमाम्यहम्
ब्रह्मदेवाने दिलेले वरदान तंतोतंत पाळून
सुध्दा भगवान नृसिंहाने दैत्यराज हिरण्यकश्यपु चा वध केला. एकदा हिरण्यकश्यपुने
शंभर वर्षे मंदराचलाच्या दरीमध्ये अन्न-पाणी सोडून उग्र तप केले होते. हात उंचावून आकाशाकडे पहात तो पायाच्या
अंगठ्यावर उभे राहून उग्र तप केले होते. अशा
तपाने पृथ्वी थरथरू लागली. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यास वरदान दिले. हे दैत्यराज, तुला मी उत्पन्न केलेल्या सृष्टि
पासून (मनुष्य,पशु,देवता,दानव,नाग )मृत्यु नाही. आत,बाहेर,दिवसा,रात्री,जमिनीवर,कोणत्याही
शस्त्राने मृत्यु नाही.
या वरदानाचा आदर करून नृसिंह भगवान एका
खांबातून प्रगट झाले. त्या खांबातून महाभयंकर आवाज एकू आला. ते रूप अतिशय विक्राळ
होते. मुख सिंहाचे तर शरीर मनुष्याचे होते. डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे
धमक होते. जांभई दिल्यामुळे आयाळ इकडे तिकडे फडफडत होते. दाढा अतिशय भयावह होत्या.
तलवारीच्या धारे प्रमाणे तीक्ष्ण जीभ होती. चंद्रकिरणां प्रमाणे
शुभ्र रोम सर्व शरीरावर चमकत होते. तीक्ष्ण नखे हीच आयुधे होती. भुवया उंचावल्याने
मुख अधिकच दारूण दिसत होते. कान वरच्या बाजूला ताठ होते. फुगविलेले नाक आणि
उघडलेले तोंड पहाडातील गुहेप्रमाणे भयानक दिसत होते. फाकलेल्या जबड्यामुळे ते रूप अधिकच
दारूण दिसत होते.
जसा गरूड सापाला पकडतो तसे त्या दैत्याला भगवान
नृसिंहाने पकडून दरवाज्यात नेले. आपल्या मांडीवर घेउन सहजपणे तीक्ष्ण नखांनी
त्याचे पोट फाडून काढले व जमिनीवर आपटले. देव-ब्राह्मणांचा छळ करणारा हिरण्यकश्यपुचा
संहार झाल्यामुळे सर्वजण आनंदित झाले. स्वर्गातून पुष्पवृष्टि झाली. ब्रह्मदेव,
महादेव, इंद्र, ऋषी-मुनी, पितर, सिध्द, विद्याधर, नाग-देवता, मनुमहाराज, प्रजापती,
गंधर्व, चारण, यक्ष, किंपुरूष, पार्षद, व भक्तराज प्रल्हाद या सर्वांनी नृसिंह भगवानाची स्तुति केली. त्यानंतर नृसिंह भगवान
अंतर्धान पावले. हा विष्णुचा अवतार आवेशात्मक आहे. केवळ महापराक्रमी दैत्यराज हिरण्यकश्यपुचा
वध करण्यासाठी.
नमो
भगवते तुभ्यं पुरूषाय
महात्मने । हरये अद्भूत सिंहाय
ब्रह्मणे परमात्मने ।।
भगवन, आपल्याला नमस्कार असो, आपण
सर्वांच्या ह्र्दयात विराजमान असलेले व स्वत: परब्रह्म परमात्मा आहात. अदभूत नृसिंहरूपधारी
श्रीहरींच्या चरणांना मी नमस्कार करतो.
No comments:
Post a Comment