Saturday, 7 October 2017

साने गुरूजी



साने  गुरूजी
गुरूजींचा  जन्म  कोकणामध्ये  पालगड  या  गावी  २४-१२-१८९९  रोजी  झाला.  त्यांच्या  वडिलांचे  नाव  सदाशिव    आईचे  नाव  यशोदा  होते.  लहानपणापासून  गुरूजींचे  आपल्या  आईवर  अतोनात  प्रेम  होते.
शालेय  जिवनामध्ये  गुरूजी  हुषार  विद्यार्थी  म्हणून  चमकू  लागले.  मराठी    संस्कृत  या  विषयांमध्ये  त्यांचा  हातखंडा  होता.  त्यांचे  पाठांत्तर  जबरदस्त  होते.
गुरूजींचा  स्वभाव  अतिशय  भिडस्त  होता.  आर्थिक  परिस्थिती  बिकट  होती.  कधी  डाळ  चुरमुरे  खाऊन  तर  कधी  एक  वेळच  जोऊन  रहावे  लागत  असे.  शिक्षण  पूर्ण  झाल्यावर  अंमळनेर  येथे  शाळेमध्ये  त्यांनी  शिक्षकाची  नोकरी  केली.  थोड्याच  दिवसात  तेथील  वसतीगृहाचे  प्रमुख  झाले.  तेथील  विद्यार्थ्यांशी  ते  समरस  झाले.  त्यांनी  विद्यार्थ्यांना  स्वावलंबन    सेवावृत्ती  आपल्या  कृतीतून  शिकविली.  विद्यार्थ्यांच्या  सर्वांगिण  उन्नतीसाठी  ते  खूप  झटले.  सत्याग्रहाच्या  आंदोलनामध्ये  गुरूजींना  तुरूंगवास  भोगावा  लागला.  तेथे  रोज  रात्री  ते  आपल्या  आई  विषयी  एखादी  गोष्ट  लिहीत.  हृदयातील  सारा  जिव्हाळा  त्या  गोष्टींमध्ये  ओतप्रोत  भरलेला  आहे.  त्याच  गोष्टीं  श्यामची  आई  या  नावाने  प्रसिध्द  झाल्या.  प्रेम,  भक्ती    कतज्ञता  यांच्या  अपार  भावना  त्या  पुस्तकामध्ये  रेखांकित  झालेल्या  आहेत.
गुरूजींचे  आणखी  एक  मोठे  कार्य  म्हणजे  आंतरभारतीची  स्थापना  करण्याचा  प्रयत्न  होय.  प्रांताप्रांतातील  हेवेदावे  नष्ट  करण्याच्या   उद्देशाने  निरनिराळ्या  प्रांतातील  लोकांनी  परस्परांच्या  भाषा  शिकाव्या,  चालीरीती  समजून  घ्याव्यात  हाच  आंतरभारतीचा  उद्देश  होता.  परंतू  हे  कार्य  अपूरे  असतानाच  दि.  ११-६-१९५०  रोजी  त्यांचे  देहावसन  झाले.

No comments:

Post a Comment