रूक्मिणीचे प्रेमपत्र
विदर्भराज भीष्मक या पाच पुत्र होते. रूक्मी,रूक्मरथ,
रूक्मबाहू, रूक्मकेश, रूक्ममाली व एक कन्या रूक्मिणी होती. अनेक सत्पुरूष, ऋषी-मुनी महाराजांच्या
दरबारी येत असत. रूक्मिणीने त्या सर्वां कडून श्रीकृष्णाचे सौंदर्य,
पराक्रम, वैभवाची प्रशंसा ऐकलेली होती. म्हणून तीने निश्चय केला कि श्रीकृष्णच आपला पती व्हावा. भगवंताने सुध्दा रूक्मिणीची बुध्दी, उदारता,
सौंदर्य, चारित्र्य या गुणांमुळे रूक्मिणीशी विवाह करण्याचा निश्चय केला होता. परंतू रूक्मीने शिशुपालाशी रूक्मिणी चा विवाह नक्की केला. रूक्मिणी उदास झाली. तीने एका विश्वासु ब्राह्मणामार्फत
श्रीकृष्णाकडे संदेश पाठविला. केवळ सात वाक्यामध्ये रूक्मिणीने श्रीकृष्णाकडे
हा संदेश पाठविण्याचे धाडस केले. १) हे त्रिभुवनसुंदरा, त्रिविध ताप नष्ट करणाऱ्या अच्युता, तूझे गुण सौंदर्य ऐकून लाज सोडून माझ्या चित्ताने तूझ्या हृदयात प्रवेश केला आहे.
२) कुळ, चारित्र्य, सौंदय, विद्या, संपत्ती या सर्व बाबतीत तू अद्वितीय आहेस. कोणतीही कन्या तूलाच पती म्हणून वरेल.
३) म्हणून मी आपल्यास वरले आहे. माझा पत्नी म्हणून स्विकार करावा.
४) मी जन्मजन्मांतरा मध्ये दान, नियम, व्रते करून जे पुण्य प्राप्त केले त्याचे फळ म्हणून माझे पाणिग्रहण करावे.
५) विवाहाच्या आदल्या दिवशी माझे राक्षसविधीने पाणिग्रहण करावे.
६) विवाहाच्या आदल्या दिवशी नववधूला देवदर्शनासाठी नेतात.
७) आपण आला नाहीत तर मी प्राणत्याग करेन.
भगवंताने संदेश ऐकून आपला संदेश सांगितला--माझेही मन तिच्यातच लागून राहिले, झोप लागत नाही. मी अवश्य रूक्मिणीचे हरण करून तिच्याशी विवाह करेन. रूक्मिणीला धीर आला. आदल्या दिवशी प्रार्थना हे, अंबिके तुला माझा नमस्कार. भगवान श्रीकृष्णच माझे पती व्हावेत असा वर दे. पूजन झ्याल्या वर रूक्मिणीस भगवंताचे दर्शन झाले. भगवंताने तीला रथामध्ये बसवून हरण केले. रुक्मीच्या सर्व सैन्याचा संहार केला. श्रीकृष्ण-रूक्मिणीचे द्वारकेमध्ये स्वागत झाले. तेथे विधीवत विवाह संपन्न झाला.
No comments:
Post a Comment