।। विद्यावंतं यशस्वतं लक्ष्मीवंतं
जनं कुरू ।। ।।
रूपं देहि जयं
देहि यशो देहि
द्विषो जहि ।।
देवीभागवत स्वाध्याय
हा एक श्रीमद् देवीभागवतमहापुराणातील तत्त्वज्ञानाचा अनुभव मिळवून
देण्याचा उपक्रम आहे.
देवीभागवतमहापुराणातील तत्त्वज्ञानाची आजच्या काळातील
उपयुक्तता सांगण्याचा हा खटाटोप
आहे. या पुराणामध्ये
आद्यशक्ती चे महत्त्व
तसेच उपासनेची माहीती सांगितलेली
आहे. त्याला स्थळाचे,
काळाचे, वंशाचे, जातीचे, धर्माचे कोणतेच बंधन
नाही. हे तत्त्वज्ञान
सदा सर्वकाळ सर्वांसाठी आहे. हा
एक चिंतनाचा, जीवन सार्थकी
लावण्याचा उपदेश आहे.
या तत्त्वज्ञानाचा प्रसार होणे
हेच या उपक्रमाचे
मुख्य उद्दीष्ट आहे.
श्रीमद् देवीभागवतमहापुराणातील स्कंधानुसार एक वर्षाचा
(हिंदी मध्ये सुध्दा)
अभ्यासक्रम तयार केलेला
आहेत. हा अभ्यासक्रम
निरपेक्षवृत्तीने घेण्यात येत आहे.
(विनामुल्य)
श्रीमद् देवीभागवतमहापुराणातील प्रत्येक स्कंधावर असे बारा
महीन्यांचा असा हा अभ्यासक्रम तयार केलेला
आहे. ज्यामुळे महामायेचे स्वरूप जाणून
शक्ती-उपासना कशी करावी
हे समजते. तरी
आपण हा अभ्यास
आपल्या आत्मोध्दारासाठी जरूर करावा.
श्रीमद् देवीभागवतमहापुराणाचा अभ्यास करताना
प्रत्येक महीन्यातील स्कंधाचे सात दिवस
दररोज एकाग्रतेने पठण, श्रवण
करावे. त्यातील मतितार्थ समजून घेणे.
त्यानंतर सात दिवस
त्या अभ्यासाचे चिंतन करावे.
व त्यानंतर पंधराव्या दिवशी प्रश्नोत्तरे
आपल्या भाषेमध्ये लिहावीत.
श्रीमद् देवीभागवतमहापुराण-सार्थ गीताप्रेस, गोरखपुर या पुस्तकाचा
अभ्यास करून प्रश्नोत्तरे
(आपल्या भाषेमध्ये) दर महीन्यास
पत्राद्वारे परतीचे टपालासह
पाठवावे. प्रश्नांच्या आधारे नेमके उत्तरे
शंभर शब्दांमध्ये लिहून त्यानंतर मार्गदर्शनासाठी
चार ओळी कोया
सोडाव्यात. शंका निरसन
व चौकशी, मार्गदर्शनासाठी
संपर्क करण्यास हरकत नाही.
उत्तरावर मार्गदर्शन करून ती
परत पाठविली जातात.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
वार्षिक परिक्षा घेण्यात येत नाही
तसेच प्रमाणपत्र ही दिले
जात नाही. हा
उपक्रम ज्ञानप्राप्तीसाठी आहे. श्रीमद्
देवीभागवतमहापुराणातील मुख्य उपदेश
शक्ती-उपासनेचे ज्ञानप्राप्ती हा आहे.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
एक शिबीर घेण्यात
येते.
श्रीमद् देवीभागवतमहापुराणातील मुक्ति उपदेश
हा कलियुगातील सर्व दोषांवर
रामबाण उपाय आहे.
म्हणून याचे चिंतन
केल्याने मनुष्यास परमशांती प्राप्त होते. तरी
हा अभ्यासक्रम आपण स्वतः
करून आपल्या हितचिंतकांस
जरूर सांगावा.
अश्याच प्रकारचे
योग स्वाध्याय, विकास चिंतनिका,
भागवत स्वाध्याय, चैतन्य स्वाध्याय,
श्रीराम स्वाध्याय इत्यादी विषयांचे सुध्दा पत्रद्वारा
अभ्यासक्रम सुरू आहेत.
जिज्ञासूंनी जरूर संपर्क
करावा.
आपल्या येथे
प्रवचन सप्ताह जरूर
आयोजित करावेत.
स्वामी मोहनदास,
(भ्रमणध्वनी-०९४२०८५९६१२) एल ५०७ चंद्रमा-विश्व
धायरी
पुणे-४११०४१
श्रीमद् देवीभागवतमहापुराणाचा स्कंधानुसार एक वर्षाचा
अभ्यासक्रम
स्कंध पहिला
१. जनकराजाने शुकदेवास
काय उपदेश केला?
२. व्यासांनी शुकदेवास
गृहस्थाश्रमाचे वर्णन करा.
३. व्यासांनी
तपश्चर्या कशासाठी केली?
४. नारदांनी व्यासांना
देवीमाहात्म्य काय काय सांगितले?
५. देवीभागवतमहापुराणाच्या लक्षणांची
माहीती सांगा.
स्कंध दुसरा
१. जनमेजयास शांतिप्राप्तीचा उपाय कोणता सांगितला?
२. धृतराष्ट्रास धनसामुग्री
देतेवेळी भीम काय म्हणाला?
३. कुंती,गांधारी,सुभद्रा यांनी व्यासांकडे काय मागतलेे?
४. देवव्रताने कोणती भीष्म प्रतिज्ञा
केली?
५. व्यासांची जन्मकथा
सांगा
स्कंध तिसरा
१. नवरात्र-व्रताचे माहात्म्य
वर्णन करा.
२. नवरात्र-व्रत कसे करावे.
३. त्रिगुणांचे
वर्णन करा.
४. भगवतीने आपल्या
स्वरूपाचे वर्णन कसे केले आहे?
५. विष्णुंनी केलेल्या
भूवनेश्वरू-स्तुतिचे वर्णन करा.
स्कंध चौथा
१. श्रीहरिच्या अवतारांचे
वर्णन करा.
२. श्रीकृष्ण चरित्र
लिहा.
३. अहंकाराचे
निरूपण कसे केले आहे?
४. मायेचा प्रभाव
कसा असतो?
५. कर्मबंधनाचे वर्णन करा.
स्कंध पाचवा
१. देवतांनी भगवतीला
कोणती आयुधे दिली?
२. सुमेधामुनींनी देवीची
तपश्चर्या कशी केली?
३. सुमेधामुनींनी
केलेल्या देवी-माहात्म्याचे वर्णन करा.
४. देवतांनी केलेल्या
भगवती-स्तुतिचे वर्णन करा.
५. भगवतीच्या प्राकट्याचे
वर्णन करा
स्कंध सहावा
१. नारदांनी विष्णुं
दर्शनाचे वर्णन कसे केले आहे?
२. कलि-दोष मुक्तिचा
मार्ग कोणता?
३. चित्त-शुध्दीसाठी कोणता उपदेश केला आहे?
४. कलियुगाचे वर्णन करा.
५. कर्माच्या गतिचे वर्णन करा
स्कंध सातवा
१. देवीच्या पुजन-विधीचे
वर्णन करा.
२. भगवतीद्वारा श्रेष्ठ
भक्तिचे वर्णन करा
३. भगवतीच्या
विराट रूपाचे वर्णन करा.
४. सिध्दपीठांचे वर्णन करा.
५. शाकंभरी देवीचे
वर्णन करा.
स्कंध आठवा
१. तिथीनुसार देवी उपासनेचे वर्णन करा.
२. विवीध नरकांचे
वर्णन करा.
३. गंगा नदीचे वर्णन करा.
४. सप्तपाताळांचे वर्णन करा.
५. मनुने केलेल्या
भगवती-स्तुतिचे वर्णन करा.
स्कंध नववा
१. कोणत्या पापकर्मामुळे
कोणती योनि प्राप्त
होते?
२. सावित्री व धर्मराज यांचा संवाद काय झाला?
३. दिव्यलोक
प्राप्ती साठी कोणते कर्म करावे लागते?
४. तुलसीचे चरित्र
व माहात्म्य वर्णन करा.
५. सरस्वती कवचाचे
वर्णन करा
स्कंध दहावा
१. महिषासूरमर्दिनी कशी प्रकट झाली?
२. देवतांनी केलेल्या
विष्णुं-स्तुतिचे वर्णन करा.
३. मनुपुत्रांचे
वर्णन करा.
४. मनुपुत्रांनी भगवतीची
तपश्चर्या कशी केली ?
५. स्वायंभुव मनुने भगवतीची आराधना
कशी केली ?
स्कंध अकरावा
१. भस्म-स्नानाचे महत्त्व
सांगा.
२. गायत्री महिमा स्पष्ट करा.
३. विवीध रूद्राक्षांची माहिती
सांगा.
४. भूत-शुध्दीचे वर्णन करा.
५. सदाचाराचे वर्णन करा.
स्कंध बारावा
१. देवीभागवतमहापुराणाचा महिमा सांगा.
२. जगदंबेच्या भवनातील
मंडपांचे वर्णन करा.
३. भगवतीच्या
निवासस्थानाचे वर्णन करा.
४. गायत्री-सहस्त्र नामापैकी
दहा नामांची माहिती
सांगा.
५. गायत्री-कवचाचे वर्णन करा.
🙏💐
ReplyDelete