ॐनमो भगवते वासुदेवाय ॐनमो भगवते वासुदेवाय सुदेवाय
भागवत प्रबोधन हा एक भागवतातील आत्मज्ञानाचा अनुभव मिळवून
देण्याचा उपक्रम आहे.
भागवतातील तत्त्वज्ञानाची आजच्या काळातील
उपयुक्तता सांगण्याचा हा खटाटोप
आहे. भागवत ही
एक मृत्युच्या भीती वर
मात करण्याची शक्ती आहे.
त्याला स्थळाचे, काळाचे, वंशाचे, जातीचे, धर्माचे कोणतेच बंधन
नाही. हा भागवतधर्म
सदा सर्वकाळ सर्वांसाठी आहे. भागवत
हा एक चिंतनाचा,
जीवन सार्थकी लावण्याचा उपदेश आहे.
भागवतातील उपदेशाचा प्रसार होणे
हेच या उपक्रमाचे
मुख्य उद्दीष्ट आहे.
भागवत प्रबोधनाच्या उपक्रमातून श्रीमद् भागवताचा स्कंधानुसार एक वर्षाचा
(हिंदी व इंग्रजीमध्ये
सुध्दा) तसेच एकनाथी
भागवताचा अध्यायानुसार तीन वर्षाचा
असे दोन अभ्यासक्रम
तयार केलेले आहेत.
हे दोन्ही अभ्यासक्रम निरपेक्षवृत्तीने घेण्यात येत आहेत.
(विनामुल्य) संपूर्ण भागवतातील प्रत्येक स्कंधावर असे बारा
महीने तर एकनाथी
भागवतातील प्रत्येक अध्यायावर एकतीस महीने
असे हे दोन अभ्यासक्रम तयार केलेले
आहेत. ज्यामुळे भागवतातील तत्त्वज्ञान रोज आचरण्यात
कसे आणावे हे
समजते. तरी आपण
हा अभ्यास आपल्या
आत्मोध्दारासाठी जरूर करावा.
भागवताचा अभ्यास करताना प्रत्येक
महीन्यातील स्कंधाचे / अध्यायाचे
सात दिवस दररोज
एकाग्रतेने पठण, श्रवण
करावे. त्यातील मतितार्थ समजून घेणे.
त्यानंतर सात दिवस
त्या अभ्यासाचे चिंतन करणे.
व त्यानंतर पंधराव्या दिवशी प्रश्नोत्तरे
आपल्या भाषेमध्ये लिहावीत.
(१)मोहनमहाराज
कृत श्रीमद् भागवतसार, यशवंत प्रकाशन,
पुणे-३०, तसेच (२)एकनाथी
भागवत (सार्थ) या दोन पुस्तकांचा अभ्यास करून
प्रश्नोत्तरे (आपल्या भाषेमध्ये) दर महीन्यास
पत्राद्वारे परतीचे टपालासह
पाठवावे. प्रश्नांच्या आधारे नेमके उत्तरे
शंभर शब्दांमध्ये लिहून त्यानंतर मार्गदर्शनासाठी
दोन ओळी कोया
सोडाव्यात. शंका निरसन
व चौकशी, मार्गदर्शनासाठी
संपर्क करण्यास हरकत नाही.
उत्तरावर मार्गदर्शन करून ती
परत पाठविली जातात.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
वार्षिक परिक्षा घेण्यात येत नाही
तसेच प्रमाणपत्र ही दिले
जात नाही. हा
उपक्रम भागवतातील ज्ञानप्राप्तीसाठी आहे. भागवतातील
मुख्य उपदेश देहाभिमान
नष्ट करणे हा
आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
एक शिबीर घेण्यात
येते.
भागवत हे
कलियुगातील सर्व दोषांवर
रामबाण उपाय आहे.
म्हणून याचा अभ्यास
करून त्याचे आचरण
केल्याने मनुष्यास परमशांती प्राप्त होते. तरी
हा अभ्यासक्रम आपण स्वतः
करून आपल्या हितचिंतकांस
जरूर सांगावा.
अश्याच प्रकारचे योग स्वाध्याय,
विकास चिंतनिका, देवीभागवत-उपासना, चैतन्य-स्वाध्याय इत्यादी विषयांचे सुध्दा पत्रद्वारा
अभ्यासक्रम सुरू आहेत.
जिज्ञासूंनी जरूर संपर्क
करावा.--स्वामी मोहनदास, (भ्रमणध्वनी - ९४२०८५९६१२)
श्रीमद् भागवताचा स्कंधानुसार एक वर्षाचा
अभ्यासक्रम
स्कंध पहिला
१. श्रीहरि-कथा श्रवण केल्याने काय होते ?
२. श्रीहरि-कथा श्रवण न केल्याने
काय होते ?
३.
भागवत कोणासाठी आहे
?
४. श्रीहरि-लिला मनुष्यास
का जाणता येत नाही?
५.
उत्तम पुरूष कोण आहे ?
६.
भागवत हे कशा प्रकारचे फळ आहे ?
७.
जन्ममृत्यु बंधनातून मुक्ती
कधी मिळते ?
८.
दुष्ट पुरूष काय करतो ?
९.
परमात्म्याचे स्वरूप कसे आहे ?
१०. भागवत कोणी रचले
?
-----------------------------------------------------------------------------------------
स्कंध दुसरा
१.
मनुष्यजन्माचे उद्दीष्ट काय आहे ?
२.
मनुष्याचे आयुष्य कमी कसे होते
?
३.
मनुष्यदेहाचा अभिमान कशामुळे
होतो ?
४.
ही दिसणारी सृष्टी
कोण निर्माण करतो ?
५.
निरोध म्हणजे काय ?
६.
स्वप्नातील घटनांशी कशाचा संबंध नसतो
?
७.
मायेने कोण मोहीत होत नाही
?
८.
इंद्रिये संयमित केव्हा
होतात ?
९.
विसर्ग कशाला म्हणतात ?
१०. श्रीहरि
कोठे कोठे असतो
?
------------------------------------------------------------------------------------------
स्कंध तिसरा
१. श्रीहरिचे
चिंतन अज्ञानी का करीत नाही ?
२. अज्ञानी
पुरूषाचे वर्णन करा ?
३. परमाणूची
व्याख्या काय ?
४. विनम्रता
सांगणारे श्लोक स्पष्ट
करा?
५. परमात्मा
कसा आहे ?
६. परमशांती
का मिळत नाही
?
७. चित्तशुध्दीसाठी काय सांगितलेले आहे
?
८. विषयासक्त
मनुष्याचे वर्णन करा.
९. परमात्म्याला
त्रिगुणाची बाधा का नाही ?
१०. मनुष्याचे
मन कशाचे साधन आहे
?
--------------------------------------------------------------------------------
स्कंध
चौथा
१. अज्ञानी पुरूषाचे
सद्गुण काय करतात
?
२. मनुष्य बेचैन कधी होतो ?
३. दुष्टांचे तेज कसे नष्ट होते ?
४. श्रीहरिस अतिप्रिय
कोण आहे ?
५. तत्त्वज्ञानापासून कोण वंचित रहातो
?
६. अलौकिक आनंद कोणता आहे
?
७. कोणता राजा धर्मनिष्ठ आहे
?
८. राजा प्रजेच्या पापाचा
भागीदार केव्हा होतो ?
९. आत्मज्ञान
झाल्यावर काय होते
?
१०. मनुष्य
कल्याणाचा उपदेश कोणता आहे ?
---------------------------------------------------------------------------
स्कंध पाचवा
१. मनुष्य
कर्म करतो ते कसे आहे
?
२. मनुष्यजन्म
कशासाठी आहे ?
३. कर्मबंधन
केव्हा सुटते ?
४. सर्व प्राणिमात्रांची सेवा का करावी
?
५. शरीराचे
विकार कोणते ?
६. राजा प्रजेचा कोण आहे ?
७. मनुष्याचा
खरा शत्रु कोण आहे ?
८. मनुष्यजन्म
का श्रेष्ठ आहे ?
९. कर्माची
गती भिन्न का आहे ?
१०. गुरू, पति, पिता, इष्टदेव कसे असावेत ?
----------------------------------------------------------------------------
स्कंध
सहावा
१. पापाचे
प्रायश्चित्त कसे करावे
?
२. मनुष्य
पापमुक्त का होत नाही ?
३. मनुष्यास
जन्म कसा मिळतो
?
४. मनुष्या
साठी कर्तव्य कोणते
?
५. मनुष्याची
बुध्दि कशी आहे
?
६. सर्वोत्तम
प्रायश्चित्त कोणते ?
७. भौतिकसुख
मिळाले तरी दुःख का होते
?
८. स्त्रिया
कशा असू शकतात
?
९. कोणते मृत्यु श्रेष्ठ
आहेत ?
१०. परमात्मा
कोठे असतो ?
------------------------------------------------------------------------------
स्कंध सातवा
१. मनुष्य
शरीर कसे आहे ?
२. कशाचा द्वेष केल्याने
विनाश होतो ?
३. दुराग्रह
का होतात ?
४. जीवनाचे
सार्थक कोण विसरतो
?
५. मालक व नोकर कसा असावा
?
६. मनुष्य
गुणातीत कसा होतो
?
७. जीवनात
यशवी कोण होतो
?
८. आज कोणत्या संस्कृतीची
गरज आहे ?
९. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम का करावे
?
१०. आत्मा कसा आहे
?
-------------------------------------------------------------------------------
स्कंध
आठवा
१. परमात्म्याचे वर्णन करा.
२. इंद्रियसुखाचे प्रयोजन
कशासाठी असावे ?
३. अनुकरण
कशाचे केले पाहिजे
?
४. ज्ञानवंत
कोण आहे ?
५. श्रीहरि
प्राप्ती कोणासाठी कठीण आहे ?
६. श्रीहरिचा
साक्षात्कार कसा होतो ?
७. मनुष्याचे
कल्याण कशामध्ये आहे
?
८. असत्य कधी निंदनीय नाही ?
८. असत्य कधी निंदनीय नाही ?
९. मनुष्य
इतरांचा तिरस्कार कधी करतो ?
१०. अंतःकरण
शुध्द कशाने होते
?
-------------------------------------------------------------------------------
स्कंध नववा
१.
भक्ती कशी करावी
?
२.
भक्तांचा महीमा स्पष्ट
करा.
३.
मनुष्याची सार्थकता कशामध्ये आहे ?
४.
स्त्रियांच्या स्वभावाबद्दल लिहा.
५.
आत्मज्ञानाने काय समजते
?
६.
जिज्ञासा कशाची असावी
?
७.
परब्रह्म कसा आहे
?
८.
गंगा पृथ्वीवर कशी आली
?
९.
पुत्राचे प्रकार कोणते
?
१०.
कोण समाधानी नसतो ?
----------------------------------------------------------------------------
स्कंध
दहावा
१. पवित्र
कोण कोण होतात
?
२. कशाची
शुध्दी कशाने होते
?
३.
अहंकाराने मनुष्य भ्रष्ट
का होतो ?
४.
वैराग्य कोणास सुलभ
आहे ?
५.
परमसत्य कोणते आहे
?
६.
श्रीहरि स्वरूपाचे ज्ञान कसे
आहे ?
७.
कर्माची गती कशी
आहे ?
८.
निस्वार्थ प्रेम कसे
असते ?
९.
सामर्थ्य नसताना कसे
वागावे ?
१०.
मनाचा संयम कशासाठी राखावा ?
------------------------------------------------------------------------------
स्कंध
अकरावा
१.
परमेश्वर काय काय
करतो ?
२.
सत्वगुणांची वृध्दी कशावर अवलंबून
आहे ?
३.
मूर्ख कोण आहे
?
४.
आत्मघातकी कोणास म्हणावे
?
५.
परमात्म्याची कीती रूपे
आहेत ?
६.
सत्वगुणाचा स्वभाव कसा
असतो ?
७.
हिंसाचार केव्हा होतो
?
८.
श्रीहरि प्राप्तीचे श्रेष्ठ साधन कोणते आहे
?
९.
दुःखाचे मुळ कारण
कोणते आहे ?
१०. मनुष्याचे
धन कोणते आहे
?
-----------------------------------------------------------------------------
स्कंध
बारावा
१. कलियुगाचे
वर्णन करा.
२. आज कलीयुग वर्णन
कसे दिसून येते
?
३.
मृत्युसमयी मनुष्याने काय करावे
?
४.
मनुष्य स्वरूपामध्ये कधी स्थिर
होतो ?
५.
भवसागर पार करण्याचे साधन कोणते
आहे ?
६.
मनाचे खेळ कोणते
आहेत ?
७.भागवतामध्ये
कशाचे कोणी वर्णन
केले आहे ?
८.
कोणते साहित्य निरर्थक आहे ?
९.
भागवताचा महिमा काय
आहे ?
१०.भागवताचे
आचरण केले तर
काय मिळते ?
---------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment