ॐनमो भगवते वासुदेवाय ॐनमो
भगवते वासुदेवाय
ॐनमो भगवते वासुदेवाय ॐनमो
भगवते वासुदेवाय
भागवत प्रबोधन एल-५०७
चंद्रमा-विश्व, धायरी पुणे
४११०४१
भागवत हा एक चिंतनाचा,
जीवन सार्थकी लावण्याचा उपदेश आहे.
भागवतातील उपदेशाचा प्रसार होणे
हेच या उपक्रमाचे
मुख्य उद्दीष्ट आहे. हा भागवत ग्रंथ संस्कृत
भाषेमध्ये आहे. म्हणुन
एकनाथ महाराजांनी सर्वसामान्यांसाठी मराठी भाषेमध्ये केवळ भक्तिरूप तत्त्वज्ञान
असलेल्या अकराव्या स्कंधाचे
निरूपण केले आहे. ते एकनाथी
भागवत म्हणून प्रसिध्द
आहे.
भागवत प्रबोधनाच्या एकनाथी भागवताचा
अध्यायानुसार तीन वर्षाचा
अभ्यासक्रम तयार केलेल
आहेत. अभ्यासक्रम
निरपेक्षवृत्तीने घेण्यात येत आहेत.
(विनामुल्य)
एकनाथी भागवतातील प्रत्येक अध्यायावर एकतीस महीने
असे हे अभ्यासक्रम
तयार केलेले आहेत.
ज्यामुळे भागवतातील तत्त्वज्ञान रोज आचरण्यात
कसे आणावे हे
समजते. तरी आपण
हा अभ्यास आपल्या
आत्मोध्दारासाठी जरूर करावा.
भागवताचा अभ्यास करताना प्रत्येक
महीन्यातील अध्यायाचे सात दिवस
दररोज एकाग्रतेने पठण, श्रवण
करावे. त्यातील मतितार्थ समजून घेणे.
त्यानंतर सात दिवस
त्या अभ्यासाचे चिंतन करणे.
व त्यानंतर पंधराव्या दिवशी प्रश्नोत्तरे
आपल्या भाषेमध्ये लिहावीत.
एकनाथी भागवत (सार्थ) या पुस्तकाचा
अभ्यास करून प्रश्नोत्तरे
(आपल्या भाषेमध्ये) दर महीन्यास
पत्राद्वारे परतीचे टपालासह
पाठवावे. प्रश्नांच्या आधारे नेमके उत्तरे
शंभर शब्दांमध्ये लिहून त्यानंतर मार्गदर्शनासाठी
दोन ओळी को-या
सोडाव्यात. शंका निरसन
व चौकशी, मार्गदर्शनासाठी
संपर्क करण्यास हरकत नाही.
उत्तरावर मार्गदर्शन करून ती
परत पाठविली जातात.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
वार्षिक परिक्षा घेण्यात येत नाही
तसेच प्रमाणपत्र ही दिले
जात नाही. हा
उपक्रम भागवतातील ज्ञानप्राप्तीसाठी आहे. भागवतातील
मुख्य उपदेश देहाभिमान
नष्ट करणे हा
आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
एक शिबीर घेण्यात
येते.
भागवत हे कलियुगातील
सर्व दोषांवर रामबाण उपाय
आहे. म्हणून याचा
अभ्यास करून त्याचे
आचरण केल्याने मनुष्यास परमशांती प्राप्त होते. तरी
हा अभ्यासक्रम आपण स्वतः
करून आपल्या हितचिंतकांस
जरूर सांगावा.
अश्याच प्रकारचे योग स्वाध्याय,
विकास चिंतनिका, देवीभागवत-उपासना, चैतन्य स्वाध्याय,
श्रीराम स्वाध्याय इत्यादी विषयांचे सुध्दा पत्रद्वारा
अभ्यासक्रम सुरू आहेत.
जिज्ञासूंनी जरूर संपर्क
करावा.
आपल्या येथे भागवत प्रवचन
सप्ताह जरूर आयोजित
करावेत.
स्वामी मोहनदास, (भ्रमणध्वनी - ९४२०८५९६१२)
एकनाथी भागवताचा अध्यायानुसार तीन वर्षाचा पत्रद्वारा अभ्यासक्रम
अध्याय पहिला
१.चिंता कधी संपते ?
२.गुरूस्तवन कसे केले आहे ?
३.ब्राह्मणाचे महत्त्व काय आहे ?
४.मराठी भाषेचे महत्त्व कसे आहे ?
५.श्रीशुकदेवास आनंद कधी झाला ?
६.भजन सुखास उल्हास कधी येतो ?
७.गणपतीची प्रार्थना कशी केली आहे ?
८.ब्राह्मणाचा छळ करण्याने काय होते ?
९.एकनाथी भागवताचे समर्थन कसे केले आहे ?
१०.या अध्यायाचा सारांश दहा ओळींमध्ये लिहा.
११. ..... स्वानंदघने उल्हासे
। ही ओवी स्पष्ट करा.
------------------------------------------------------------------
अध्याय दूसरा
१.भ्रम कोणता आहे ?
२.देहबुध्दीने काय होते ?
३.सदगुरू कसा असतो ?
४.भक्त नित्यमुक्त कधी होतो ?
५.अभिमान कधी विरून जातो ?
६.भागवतधर्म कशास म्हणतात ?
७.मनुष्यजन्माची थोरवी काय आहे ?
८.विधीनिषेधाची बाधा कोणास नाही ?
९.अहोरात्र श्रीकृष्णाचे स्मरण का करावे ?
१०.श्रीकृष्णगुण संकीर्तन कसे श्रवण करावे ?
११.भागवतधर्माचा महिमा कसा स्पष्ट
केला आहे ?
------------------------------------------------------------------
अध्याय तिसरा
१.माया कशी आहे ?
२. अहिंसा कोठे असते ?
३.स्त्रीकामनेने काय होते ?
४. अहंकार
कधी वितळून जातो ?
५. सत्संगाची
त्रिवीध लक्षणे कोणती
?
६. .... असत्य तेथ स्पर्शेना । स्पष्ट करा.
७.गुरूची दृष्टी
शिष्याप्रती कशी असते ?
८.विषयासाठी केलेल्या
कर्माने काय होते ?
९.परमार्थाचा प्रत्यक्ष
साक्षात्कार केव्हा होतो ?
१०.अनुभूतीसाठी कोणते उदाहरण दिले आहे ?
११.अहंकार व बाह्य पवित्रतेसाठी
कोणते उदाहरण दिले आहे?
---------------------------------------------------------------------------------------
अध्याय चौथा
१.कर्ता कोण आहे ?
२.परमशांती कोठे दिसते ?
३.भेदभाव कधी नष्ट होतो ?
४.कल्की अवतार कधी घेईल ?
५.वैकुंठपती कोठे वस्तीला येतात
?
६.निर्विकार शांती कशास म्हणतात ?
७.भगवंताच्या अनंतपणाचे वर्णन करा.
८. .... तू झालासी सूत्रधार । ... स्पष्ट करा.
९.भागवतामध्ये कोणता आत्मबोध आहे ?
१०. ..... तो पुर्णावतारू श्रीकृष्ण । स्पष्ट करा.
११.नारायणाचा महिमा कसा सांगितला
आहे ?
----------------------------------------------------------------------
अध्याय पाचवा
१.शांती कोठे नांदत असते ?
२.भक्त ऋणमुक्त केव्हा होतो ?
३.विवाहाचा नियम कशासाठी आहे?
४. भक्तांचे निर्भय स्थान कोणते आहे ?
५. लग्नाचा
विधी कशासाठी सांगितला
आहे ?
६.भक्ता नाही देहअहंता ।......... स्पष्ट करा.
७.सत्त्वगुणे शुध्द ब्राह्मण । ...........स्पष्ट करा.
८.काय गृहाश्रमी देव नसे । ...........स्पष्ट करा.
९.स्वर्ग नव्हे भोगस्थान । ...............स्पष्ट करा.
१०.योगी भावना भावून ।....................स्पष्ट करा.
११.हे पंचाध्यायी
नव्हे । ......................स्पष्ट करा.
------------------------------------------------------------
अध्याय सहावा
१.अंतःकरण कधी निर्मळ होते ?
२.जन्ममरण मुक्तीचा उपाय कोणता ?
३.वेदवाणीमध्ये कोण प्रकट होत नाही ?
४.वेदाध्यायनामध्ये कोणता धोका आहे ?
५.श्रीकृष्णास भोक्तेपणाचा
लेप का नाही ?
६.माया कशी आहे?
७.मनुष्याचा उध्दार कशाने होतोे ?
८.भक्तांची पुजास्थाने कोणती ?
९.उध्दवाची स्थिती कशी झाली. ?
१०.या अध्यायाचा सारांश दहा ओळींमध्ये लिहा.
११.दर्पणीच्या प्रतिबिंबासी
।..... ही ओवी स्पष्ट करा.
----------------------------------------------------------------------
अध्याय सातवा
१.वस्तुतः हे संपूर्ण विश्व कसे आहे ?
२.ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होते. ?
३.चोवीस गुरूंची नावे सांगा.
४.संसारास कशाची उपमा दिलेली आहे ?
५.आत्मज्ञान कशाने लवकर प्राप्त
होते ?
६.अवधूत मुक्त कसे झाले.?
७.साधकास पुर्ण वैराग्य नसेल तर काय होते ?
८.मनुष्यजीव कसा आहे.?
९.ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर काय होते?
१०.भगवंताची कशी तद्रुपता प्राप्त होईल.?
११...... निजहीतासी गुरू केले । ही ओवी स्पष्ट करा.
----------------------------------------------------------------------
अध्याय आठवा
१.आशेमुळे काय होते ?
२.संसारास कशाची उपमा दिली आहे ?
३.दुःखे कशी नष्ट होतात ?
४. .... विवीध घातु जीवासी । स्पष्ट करा.
५.विचीत्र दैवगती
कोणती आहे ?
६. .... मुख्य दोष ते आशा । स्पष्ट करा.
७.भोग वस्तु कशासाठी निर्माण केल्या ?
८.सज्जन सारतत्त्व कसे ग्रहण करतात ?
९.या विश्वातील सारतत्त्व कोणते आहे ?
१०.सज्जनांना उपभोगाचा तिटकार का असतो?
----------------------------------------------------------------------
अध्याय नववा
१.वैराग्या शिवाय अध्यात्माचे परिणाम कोणते ?
२.एखाद्या वस्तुमध्ये एकरूपता कशी येते ?
३.उपभोगाच्या सर्व वस्तु कशा असतात ?
४.मूर्ख गाढव कोणाला म्हणतात ?
५.मनुष्य देह कशासाठी निर्माण
केला ?
६.माणुसकी कोणास नसते ?
७.देहाभिमान नष्ट झाल्यावर काय होते ?
८. .... काळरूपेसी संहारी । स्पष्ट करा.
९.सविकल्प समाधी कशास म्हणतात ?
१०. ...। निजस्वभावे हितालागी । स्पष्ट करा.
११.सर्व परित्यागामध्ये महत्त्वाचा
त्याग कोणता ?
----------------------------------------------------------------------
अध्याय दहावा
१.कर्मवादी ज्ञाते म्हणविती । .. स्पष्ट करा.
२.मनुष्य निंद्य कर्मास कधी प्रवृत्त होतो?
३.भागवताचा अधिकारी कोण आहे ?
४.हे नेणोनि लोक गुतले। स्पष्ट करा.
५.अविद्येचा भ्रम कशाने दूर होतो ?
६. ....। सुखदुःखे जाण तो भोगवी । स्पष्ट करा.
७.त्रिपुटी कधी नष्ट होते ?
८.ब्रह्मज्ञान कधी प्राप्त होते ?
९.अतःकरणाची शुध्दी कशाने होते ?
१०.सन्मानाच्या अपेक्षेने काय होते ?
११.आवडता भक्त कोण आहे ?
----------------------------------------------------------------------
अध्याय अकरावा
१.दानधर्म सफळ होण्यासाठी कशाचा दृष्टांत दिलेलला आहे ?
२.अध्यात्ममार्गामध्ये निर्विघ्न निर्मळ मार्ग कोणता आहे ?
३.दांभिक भजन कसे असते ?
४.देहाभिमान कशामुळे जागृत होतो ?
५.बध्दपणा
व मुक्तपणा कळामुळे
होतो ?
६.गुरूकृपेचा वर्षाव झाल्यावर काय होते ?
७.भगवंत भक्ताची सेवा कधी करतो ?
८.उपदेशा प्रमाणे आचरण न करणारा कसा आहे ?
९.अहेतुक कर्म कोणते ?
१०.निंदा स्तुती कधी नष्ट होते ?
११.आत्मस्वरूपाच्या स्थिरतेसाठी
कोणते उदाहरण दिले आहे ?
--------------------------------------------------------------------------------
अध्याय बारावा
१.दानधर्म सफळ होण्यासाठी कशाचा दृष्टांत दिलेलला आहे ?
२.जीवपणाचा आभास कशामुळे होतो?
३.उसाचे उदाहरण कशासाठी दिले आहे ?
४.सिध्दींचा त्याग कोण करू शकतो?
५.निश्चित सद्गुरू
कोणता असतो ?
६.संन्यासांना निवासस्थान का नाही ?
७.कर्माचे स्वरूप कसे आहे ?
८.भगवंताचे स्थान प्राप्त करण्याचे कोणते साधन आहे ?
९.तिळमात्र अभिमानाने काय होते ?
१०.संत उपासना केव्हा करीत नाहीत ?
११.आपल्या विचारांप्रमाणे साधना केली तर काय होते ?
-----------------------------------------------------------------------------
अध्याय तेरावा
१.निजात्मज्ञान विसरल्यावर काय होते ?
२.रजोगुण कसा आहे ?
३.तमोगुण वाढल्यावर काय होते ?
४.कामवासने विषयी उदासिनता कधी येते ?
५.सात्विक कसे ओळखावे
?
६.मुख्य भक्ति कोणती आहे ?
७.धर्माचरणाची आवड कशाने निर्माण होते ?
८.कामासक्ती कशामुळे उत्पन्न होते ?
९.खरा भाग्यवंत कोण आहे ?
१०.वैराग्ययुक्त भक्तिने काय होते ?
११.मद्यप्राशनाने आत्मघात
कसा होतो ?
----------------------------------------------------------------------
अध्याय चौदावा
१.निरपेक्ष भक्ति शिवाय विद्याशास्त्र कसे आहे ?
२.संचित व क्रियमाण पातके कधी नष्ट होताते ?
३.मीपणाची स्फुर्ती अद्वैतामध्ये कधी लोप पावते ?
४.स्त्रीलंपट पुरूषांच्या संगतीचा परिणाम काय होतो ?
५.असत्य कशास म्हणतात ?
६. कर्मफळे दुःखरूप कशाने होतात ?
७. …….। येर उपावो तो गौण ।। ओवी स्पष्ट करा.
८. अनन्यतेने भजन केल्याने काय होतेे ?
९. परमशांती कशाला म्हणतात ?
१०. सायुज्यमुक्ती कसी प्राप्त होते ?
११. मोक्षाचे
मुख्य साधन कोणते आहे ?
----------------------------------------------------------------------
अध्याय पंधरावा
१.प्रसिध्द आठ सिध्दी कधी प्राप्त होतात ?
२.सिध्दिंचा त्याग का करावा ?
३.भागवताचे हे फळ कसे आहे ?
४.आचरण न करणाया वक्त्याची अवस्था कशी असते ?
५.परिक्षिताचा लोकांवर कोणता उपकार आहे ?
६.जन्ममरणासाठी कोणते उदाहरण दिले आहे?
७.सिध्दिंची अपेक्षा केली तर काय होते ?
८.सिध्दिंची अपेक्षा कोण करतो ?
९.हरिप्राप्तीच्या विलंबाचे कारण कोणते ?
१०.उपनिषदातील अर्थ कधी समजतो ?
११.सिध्दिंचे वैभव आत्मघातकीसाठी कोणते उदाहरण दिले आहे ?
-----------------------------------------------------------------------------
अध्याय सोळावा
१………। मन नाकळे मजवीण ।। स्पष्ट करा
२.मनुष्य भक्तिमार्गास कधी लागतो ?
३.अंतःकरणामध्ये देव कधी प्रगटतो ?
४.गुळातील दगडाचे उदाहरण कशासाठी दिले आहे ?
५. कोण देहात असला तरी ब्रह्मरूपच
आहे ?
६. कोणास परमशांती प्राप्त होते?
७. सर्व मंत्र पवित्र का होतात ?
८. मनाचे नियमन कशाने करावे ?
९. प्राणिमात्रांच्या कोणत्या क्रिया भगवंतामुळे होतात ?
१०. या अध्यायात काय सांगितलेले आहे ?
११. भगवंताच्या
विभुतिचे वर्णन कसे आहे ?
----------------------------------------------------------------------
अध्याय सतरावा
१.स्वप्नाप्रमाणे काय खोटे आहे ?
२.श्रीकृष्णास आनंद केव्हा झाला ?
३.भक्तिमार्गातील मोठे
विध्न कोणते आहे
?
४.क्षत्रियाचा स्वभाव
कसा आहे ?
५.भगवंतास अरिमर्दन का म्हणतात ?६.स्वजनांचा संबंध किती काळ असतो ?
७.कोणत्या स्थितीमध्ये मृत्युने नरकप्राप्ती होते ?
८. ..। शूद्र ते जाण तमोनिष्ठ ।। स्पष्ट करा.
९.वानप्रस्थाचे आचरण कोणास अशक्य आहे ?
१०.देहाचा अहंकार कोणास बाधत नाही ?
११. माणसे दूस-या जन्मामध्ये एकमेकास का ओळखत नाहीत ?
----------------------------------------------------------------------
अध्याय सतरावा
१.स्वप्नाप्रमाणे काय खोटे आहे ?
२.श्रीकृष्णास आनंद केव्हा
झाला ?
३.भक्तिमार्गातील मोठे विध्न कोणते आहे ?
४.क्षत्रियाचा स्वभाव कसा आहे
५.भगवंतास अरिमर्दन का म्हणतात ?
६.स्वजनांचा संबंध किती काळ असतो ?
७.कोणत्या स्थितीमध्ये मृत्युने नरकप्राप्ती होते ?
८. ..। शूद्र ते जाण तमोनिष्ठ ।। स्पष्ट करा.
९.वानप्रस्थाचे आचरण कोणास अशक्य आहे ?
१०.देहाचा अहंकार कोणास बाधत नाही ?
११. माणसे दूस-या जन्मामध्ये
एकमेकास का ओळखत नाहीत ?
----------------------------------------------------------------------
अध्याय अठरावा१.मनुष्यास वैराग्य निर्माण कधी होते ?
२.सर्वत्र भगंवत-भावना
कधी अनुभवता येते
?
३.संन्यासग्रहण कधी करावे ?
४.संकल्प विकल्प
या कोणाच्या अवस्था
आहेत ?
|
५.मुक्ती प्राप्तीसाठी काय केले पाहिजे
?
६.मुनीजनांनी कोणती यात्रा अवश्य करावी
७.मनुष्याचे शत्रु कोण आहेत ?
६.मुनीजनांनी कोणती यात्रा अवश्य करावी
७.मनुष्याचे शत्रु कोण आहेत ?
८.तर्कशास्त्राप्रमाणे कोण वाद करीत नाहीत ?
९.शुध्द भजन कोणते आहे ?
१०.शुध्द अन्नाचा महिमा काय आहे ?
११.वेदांतील फलश्रुती कशासाठी सांगितलेली आहे ?
----------------------------------------------------------------------
अध्याय एकोणीसावा
१.महामूर्ख कोण आहे ?
२.कोणते नामस्मरण पापांचे
भस्म करते ?
३.ध्येयापासून वंचित कोण होतो ?
४.कशाने भगवंताच्या स्वरूपाचे
ज्ञान होते ?
५.वीषापेक्षाही आघिक भयानक काय आहे ?
६. ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय?
७.मन शुध्द कशाने होते ?
८.खरे महादुःख कोणते आहे ?
९.भगवंताची श्रेष्ठ पुजा कोणती ?
१०.त्रिभुवनामध्ये कोण ईश्वरच आहे ?
११.साधकांचे निव्वळ
भ्रम कोणते आहेत
?
----------------------------------------------------------------------
अध्याय विसावा
१.मनास कशाने नियंत्रित
करावे ?
२.स्वर्ग आणि संसार कधी निरस वाटू लागतात
?
३.वेदांतील अर्थ कोणाशिवाय
समजत नाही ?
४.भक्तियोग कोणासाठी प्रगट केलेला आहे ?
५.निरपेक्ष भक्ति कधी प्राप्त होते ?
६. कर्मयोग कोणासाठी प्रगट केलेला आहे ?
७.नरदेह किती श्रेष्ठ आहे ?
८. ,,,,,। गुप्त निजठेवा सांगेन ।। स्पष्ट करा
९.वेदांमध्ये कशाचा उपदेश केलेला
आहे
१०.ज्ञानयोग कोणासाठी
प्रगट केलेला आहे
११.वेदांमध्ये स्वधर्माचरणाचा उपदेश कशासाठी केलेला
आहे ?
----------------------------------------------------------------------
अध्याय एकविसावा
१.जेथ मूळी मुख्य अद्वैतता
। ....स्पष्ट करा
२.वेदरहस्य कोणते आहे ?
३.वेदाने ज्ञानकांडामध्ये काय सांगितलेले आहे ?
४.वेदाने भक्ती कोणासाठी प्रगट केली आहे
५.ब्रह्म समाधान
कोणास प्राप्त होते ?
६.विषयांची निंदा कशासाठी केलेली आहे ?
७.दिशांची कल्पना कशासाठी केलेली आहे ?
८.सद्गुण कोणता व अवगुण कोणता आहे ?
९.भगवंत सर्वव्याप्त तरी दोषांपासून अलिप्त कसा ?
१०.भयंकर यातना का भोगाव्या
लागतात ?
११.मनुष्य अपेक्षेने
कर्म करतो यासाठी
कोणते उदाहरण ?
----------------------------------------------------------------------
अध्याय बाविसावा
१.कोण अत्यंत मूर्ख आहेत ?
२.मनाने कशाची कल्पना
केलेली आहे ?
३.ज्ञानप्राप्तीची साधने व्यर्थ
केव्हा होतात ?
४.ते मन काय करते
५.प्रकृति आणि पुरूष कसे आहेत ?
६..तत्त्व एकच आहे असे कोण म्हणतात ?
७.कर्माचे बंधन कशाने दृढ होत आहे ?
८.पंचवीस तत्त्वे कोणती आहेत ?
९.अनुप्रवेश कशास म्हणतात ?
१०.या अध्यायामध्ये
कशाचे मार्गदर्शन केलेले
आहे
११.तैसे कार्य आणि कारण।
.....स्पष्ट करा
----------------------------------------------------------------------
अध्याय तेविसावा
१.संसाराचा आभास
कोण निर्माण करते
?
२.भिक्षूगीताचे तात्पर्य
काय आहे ?
३.शांती कधी लाभते ?
|
४.मनाचा उत्तम गुण कोणता आहे
५.उपासनेमध्ये विषयांची आसक्ती
कोणाला असते
६.मनुष्यदेह कधी प्राप्त होतो ?७.ब्राह्मणाचा कशाने नाश होतो ?८.शांती कशाने प्राप्त होते ?९.कोण सर्वकाही आनंदाने सहन करतो ?१०.दुर्जनाचा आघात कोण सहन करतो ? |
११. ... । अर्थ अनर्थाचे मुख्य घर ।
.....स्पष्ट करा.
----------------------------------------------------------------------
अध्याय चोविसावा
१.सांख्ययोग कोणाला समजणार
आहे ?
२.ज्यासी पटुतर सांख्यज्ञान
। ... .....स्पष्ट
करा.
३.वस्तु एकलीचि आपण । .....स्पष्ट
करा.
४.काय नाशवंत च आहे ?
५.प्रकृतिपुरूषाच्या उभययोगानेच काय झालेले आहे.?
६.कोणते स्थान अनन्य भक्तांनाच प्राप्त होते ?
७.हा अहंकार मुख्यतः काय करतो ?
८.प्रकृती गुण कधी प्रकट करू शकते ?
९.पुरूषाचे केव्हा दर्शन होते.?
१०.प्रकृति आणि पुरूष कसे आहेत ?
११.जेवी अर्धनारीनटेश्वरी ।
... .....स्पष्ट करा.
----------------------------------------------------------------------
अध्याय पंचविसावा
१.सात्विक आहार कोणता आहे ?
२.निर्गुणाचे साधन कोणते आहे ?
३.कर्म राजसिक कोणते आहे ?
४.दम म्हणजे काय ?
५.निस्फृहता म्हणजे
नेमके काय ?
६.उपनिषदातील सार कोणते आहे.?
७.या अध्यायामध्ये कशाचा उपदेश केलेला आहे ?
८.सात्विक अहंकार कोणता आहे ?
९.शम म्हणजे काय ?
१०.तप म्हणजे काय ?
११.सत्त्वगुणी कोण असतो ?
----------------------------------------------------------------------
अध्याय सव्विसावा
१.परमानंद कसा प्राप्त होतो ?
२.स्त्रीविषयांपासून मुक्त करण्यास कोण समर्थ आहे ?
३.मन निर्मळ कशाने होते ?
४.देहो तितुका अशुचिकर ।........स्पष्ट करा.
५.ज्याचे मन स्त्रीकाममय आहे,त्याचे
काय होते ?
६.कोट्यावधी सुवर्ण मोहरा देऊन काय मिळणार नाही ?
७.संसारपाश कशाने नष्ट होतात ?
८.हरिची भक्ती दृढ कशाने होऊ लागते ?
९.भगवंत कोणास प्रसन्न होतो ?
१०.सव्विसाव्या अध्याया मध्ये कशाचे वर्णन केले आहे ?
११.कामवासना संपत नाही यासाठी
कोणकोणती उदा. दिली आहेत ?
----------------------------------------------------------------------
अध्याय सत्ताविसावा
१.आठवे पूजास्थान कोणते ?
२.सातवे पूजास्थान कोणते ?
३.सहावे पूजास्थान कोणते ?
४.तिसरे पूजास्थान कोणते?
५.पहिले पूजास्थान
कोणते ?
६. जनार्दन अत्यंत तृप्त कधी होतो?
७. तीन प्रकारचा याग कोणता आहे?
८. मिश्र मार्ग कोणता आहे ?
९. तांत्रिक मार्ग कोणता आहे ?
१०. वैदिक मार्ग कोणता आहे ?
११. जरी झाले अतिसज्ञान
।........स्पष्ट करा.
----------------------------------------------------------------------
अध्याय अठ्ठाविसावा
१.देहाभिमान कशाने नष्ट होतो ?
२.अविद्येचे सर्व अज्ञान कधी नष्ट होते ?
३.सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंत आहे हे कशासाठी सांगितले आहे ?
४.भक्ताच्या अधिन कोण व का होतो ?
५.धन्य कोण आहे ?
६.कोणाला कशाचाही धोका नाही ?
७.देहाभिमानाचे कार्य कसे आहे ?
८.आभास कोण निर्माण करते ?
९.उपरति कशाला म्हणतात ?
१०.इंद्रियकर्माचे बंधन कोणाला नाही ?
११.विषय भोगाचा
उपभोग घेऊन सुध्दा
कोण अलिप्त असतात
?
----------------------------------------------------------------------
अध्याय एकोणतिसावा
१.देवाला भाषाभिमान आहे का ?
२.जव कर्तव्याचा अहंभावो ।........स्पष्ट करा.
३.योगक्षेमाचा भार कोण व कधी घेतो ?
४.भक्तीचे अमृत कशापेक्षा श्रेष्ठ आहे ?
५.चारी मुक्तींचा
राजा कोण आहे ?
६.कर्माचे कृष्णार्पण कसे असावे ?
७.अनन्य भक्त काय काय अर्पण करतात ?
८.ज्ञानीजनांचे चातुर्य कोणते आहे ?
९.भक्तांची योगसाधना कशी असते ?
१०.एकोणतिसाव्या अध्यायामध्ये काय सांगितलेले आहे ?
११.परमसत्य कोणास जरूर सांगावे
?
----------------------------------------------------------------------
अध्याय तिसावा
१.विज्ञान कोणते आहे ?
२. ...। सहजे जाण ठसावे ।........स्पष्ट करा.
३. ....। तू ब्रह्मसंपन्न स्वये होसी । स्पष्ट करा.
४. ....। तेवी द्वेषेही माझे दर्शन ।........स्पष्ट करा.
५. ....। तेवी यदुकुळी
श्रीकृष्ण । स्पष्ट
करा.
६.जेथ सद्भावे द्विजपूजन ।........स्पष्ट करा.
७. ....। होय संसाराची बोळवण ।........स्पष्ट करा.
८. ....। तुझे महिमान कळेना । स्पष्ट करा.
९. ....। विज्ञान जाणा त्या नाव । स्पष्ट करा.
१०. आम्ही सज्ञान पूर्ण ।........स्पष्ट करा.
११. ....। सत्यवचनोक्ती पै माझी । स्पष्ट करा
----------------------------------------------------------------------
अध्याय एकतिसावा
१....। एकाकी एकादश दुजेनिवीण ।........स्पष्ट करा.
२....। एथवरी ममता नसावी त्यासी ।........स्पष्ट करा.
३. ..। कृष्णपदवी निश्र्चिंती स्वये पावे ।.....स्पष्ट करा.
४कृष्णदेहो नाही निमाला ।.....स्पष्ट करा.
५.श्रीकृष्णाच्या निर्याणाची
उपमा कशास दिली आहे ?
६.श्रीकृष्ण निजधामास का गेला ?
७.श्रीकृष्णअवताराचे अंती ।.....स्पष्ट करा.
८.श्रीकृष्णाचे निजधामगमन कोणास अनाकलनीय आहे ?
९. ..। अविद्येघरी घरजावयी तो ।.....स्पष्ट करा.
१०.भाळेभोळे विषयीजन ।........स्पष्ट करा.
११. . ..। श्रीकृष्णनिर्याण निजबोधु
।........स्पष्ट करा.
----------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment