विकास चिंतनिका
आजची सर्वसाधारण
परिस्थिती आपण सर्वत्र
पहातो आहे. मानसिक
तणाव, स्वार्थीपणा, इतरांचा द्वेष, चोरी,
दरोडे, खून, मारामारी,
जाळपोळ, हत्याकांड, सत्तेची हाव, भ्रष्टाचार,
स्त्रीयांवर अत्याचार, इत्यादी सर्व काही
अनिष्ट परिणामांचे मूळ कारण
परमसत्याचे अज्ञान हेच
एकमेव आहे. तरी
या विघातक विचारांकडे
आपण अत्यंत गांभिर्याने
विचार केला पाहिजे.
हे
अज्ञान नष्ट करण्याचा
रामबाण उपाय व्यक्तिमत्व-विकास
हाच आहे. मनुष्याचा
सर्वांगीण व्यक्तिमत्व-विकास शारिरीक विकास(अन्नमय, प्राणमय), मानसिक विकास (मनोमय), बौध्दीक विकास (विज्ञाममय), आध्यात्मिक विकास (आनंदमय) या माध्यमातून
होत असतो. त्यामुळे
परमसत्याचे ज्ञान प्राप्त
होते. म्हणून आज
आपल्या राष्ट्रास व्यक्तिमत्व-विकासाची अत्यंत आवश्यकता
आहे. शारिरीक विकास आयुर्वेदाच्या
उपचाराने होउ शकतो.
आयुर्वेदामध्ये आहार, विहार,
दिनचर्या, ऋतुचर्या, सदवृत्त, पंचकर्म इत्यादींचा सखोल विचार
केलेला आहे. मानसिक
विकास अष्टांगयोगाच्या आचरणाने होउ शकतो.
अष्टांगयोग साधना यम,
निमय, आसन, प्राणायाम,
प्रत्याहार, धारणा, ध्यान,
समाधी या आठ पाययांनी पुर्ण होत
असते. चित्तातील सर्व विकार
नष्ट होतात. बौध्दीक
विकास विवेकज्ञानाने होत असतो.
विवेक म्हणजे सारासार
बुध्दी. आध्यात्मिक विकास आत्म-साक्षात्काराने
होत असतो. मनुष्याच्या
सर्वांगीण विकासाला स्थळाचे, काळाचे, वंशाचे, जातीचे, धर्माचे कोणतेच बंधन
नाही. हा सर्वांगीण
विकास सदा सर्वकाळ
सर्वांसाठी आहे. हा
एक चिंतनाचा, मनुष्यजीवन सार्थकी लावण्याचा खटाटोप आहे.
हेच या उपक्रमाचे
मुख्य उद्दीष्ट आहे.
हा एक वर्षाचा पत्रद्वारा विनामुल्य अभ्यासक्रम आहे. दर
महीन्याच्या सुरवातीस सात दिवस
दररोज एकाग्रतेने वाचन करावे.
त्यातील मतितार्थ समजून घेणे.
त्यानंतर सात दिवस
त्याचे चिंतन मनन
करावे. व त्यानंतर
पंधराव्या दिवशी प्रश्नोत्तरे
आपल्या भाषेमध्ये लिहावीत. प्रश्नांच्या आधारे नेमके
उत्तरे शंभर शब्दांमध्ये
लिहून त्यानंतर
मार्गदर्शनासाठी दोन ओळी
कोया सोडाव्यात. शंका निरसन
व चौकशी, मार्गदर्शनासाठी
संपर्क करण्यास हरकत नाही.
उत्तरावर मार्गदर्शन करून ती
परत पाठविली जातात.
१.व्यक्तिमत्व-विकास लेखक--प्रा.मोहन धर्म, गायत्री
प्रकाशन, २६/१२ प्रतिकनगर
येरवडा पुणे-०६
२.व्यक्तिमत्व-विकास लेखक--स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मठ प्रकाशन,
धंतोली नागपूर-१२ या पुस्तकांचा
अभ्यास करून दहा
प्रश्नोत्तरे (आपल्या भाषेमध्ये) दर महीन्यास
पत्राद्वारे परतीचे टपालासह
पाठवावे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
वार्षिक परिक्षा घेण्यात येत नाही
तसेच प्रमाणपत्र ही दिले
जात नाही. हा
उपक्रम ज्ञान प्राप्तीसाठी
आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
एक शिबीर घेण्यात
येते.
आजच्या भयाण
परिस्थितीमध्ये सर्व समस्यांवर
सर्वांगीण व्यक्तिमत्व-विकास हाच एकमेव
उपाय आहे. म्हणून
हा अभ्यास करून
त्याचे आचरण केल्याने
मनुष्यास परमशांती प्राप्त होते. तरी
हा अभ्यासक्रम आपण स्वतः
करून सर्वांना जरूर सांगावा.
अश्याच प्रकारचे
भागवत-स्वाध्याय,योग स्वाध्याय,चैतन्य स्वाध्याय,देवीभागवत-उपासना,श्रीराम स्वाध्याय इत्यादी विषयांचे सुध्दा पत्रद्वारा
अभ्यासक्रम सुरू आहेत.
जिज्ञासूंनी जरूर संपर्क
करावा.
व्यक्तिमत्व-विकास या विषयांवर
आपल्या येथे माझे
व्याख्यान आयोजित करावे.
स्वामी मोहनदास,
(भ्रमणध्वनी-०९४२०८५९६१२) एल-५०७ चंद्रमा-विश्व, धायरी, पुणे - ४११०६८
विकास
चिंतनिका एक वर्षाचा
पत्रद्वारा विनामुल्य अभ्यासक्रम
पहिला महिना
१.व्यक्तिमत्व-विकास म्हणजे
काय ?
२.व्यक्तिमत्व-विकास कोणासाठी
आहे ?
३.सर्वांगीण
विकास म्हणजे काय ?
४.आजच्या परिस्थितीचे
कारण काय ?
५.संपत्तीने
मनुष्य सुखी होतो काय ?
६.आज शिक्षणाने विकास
होत आहे का?
७.विकासाचे
शिक्षण कसे असावे
?
८.मुंडकोपनिषदामध्ये काय सांगितले ?
९.नीतिशास्त्र
म्हणजे काय ?
१०.या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट
काय ?
दुसरा महिना
१ शारिरीक विकास
म्हणजे काय ?
२शारिरीक
विकास कशाने होतो
?
३शारिरीक
विकासाचा परिणाम काय ?
४शारिरीक विकासाचा
दुष्परिणाम काय ?
५.सूर्य
नमस्काराचे फायदे कोणते
?
६.सूर्य
नमस्कारामध्ये किती आसने ?
७.शारिरीक
विकास आवश्यक आहे का ?
८. पंचप्राणांचे
कार्य कोणते ?
९. दिनचर्या व ऋतुचर्या म्हणजे
काय ?
१०.आयुर्वेद
म्हणजे काय ?
तिसरा महिना
१. मानसिक
विकास म्हणजे काय ?
२.मानसिक
विकास कशाने होतो
?
३.मानसिक
विकासाचा परिणाम काय ?
४.मानसिक विकासाचा
दुष्परिणाम काय
५.अष्टांग
योग म्हणजे काय ?
६.अपरिग्रहता
म्हणजे काय ?
७. मानसिक विकास
आवश्यक आहे ?
८. पंचप्राणांचे
कार्य कोणते ?
९. मनाचे चतुर्विध
कार्य कोणते ?
१०. अहिंसा म्हणजे
काय ?
चौथा महिना
१ बौद्धिक विकास
म्हणजे काय ?
२ बौद्धिक विकास
कशाने होतो ?
३ बौद्धिक विकासाचा
परिणाम काय ?
४ विघातक
कार्य कशामुळे होते ?
५ बौद्धिक विकासाने
पैसा मिळतो का
?
६ कोणते कर्म हितकारी आहे ?
७ भावनिक विकास
आवश्यक आहे का ?
८. भौतिक दारिद्र्य कशाने येते ?
९. विज्ञान म्हणजे
काय ?
१० अर्थ(पैसा) अनर्थकारी
आहे का ?
पाचवा
महिना
१ आध्यात्मिक विकास
म्हणजे काय ?
२आध्यात्मिक
विकास कशाने होतो
?
३आध्यात्मिक
विकासाने काय होते
?
४ पाखंडी
स्तोम कशाने वाढते
?
५.फक्त
जप म्हणजे परमार्थ
आहे का ?
६ आत्मसाक्षात्कार म्हणजे
काय ?
७. आध्यात्मिक विकास
आवश्यक आहे ?
८. लाखो अनुयायी म्हणजे
सद्गुरू ?
९. प्रपंचामध्ये परमार्थ
आहे का ?
१०. अद्वैतता म्हणजे
काय ?
सहावा महिना
१ स्वामीजींचा मध्यवर्ती
संदेश कोणता ?
२.एकाग्रतेच्या
शक्तीने काय साधते
?
३.आत्मविश्वास
म्हणजे काय ?
४.मनुष्याचे दिव्यत्व
कशामध्ये आहे ?
५.चारित्र्य
कसे घडते ?
६.नकारात्मकता
म्हणजे काय ?
७.समाज परिवर्तन की स्वतःचे परिवर्तन
?
८. निरपेक्षतेचा
फायदा कोणता ?
९. दुर्बलता म्हणजे
मृत्यु आहे काय
?
१०.आत्मविश्वासाने काय होते ?
सातवा महिना
१ पाश्चात्य संस्कृतीमध्ये विकास
म्हणजे?
२मानसिक
तणाव कशाने होतात
?
३स्वार्थीपणा
म्हणजे सभ्यता आहे का ?
४ स्त्रीयांवर
अत्याचार कशामुळे होतात
?
५ कायदे करून दुराचार नष्ट होईल का
६ मारामारी, खून कशामुळे होतात
?
७. पैशाने सर्वकाही
मिळू शकते ?
८. सत्तेची
हाव कशासाठी असते ?
९. भ्रष्टाचार कशाने नष्ट होईल
?
१०.कायद्यांनुसार आचरण का होत नाही?
आठवा महिना
१. भारतिय संस्कृतीचे
वैशिष्य काय ?
२. धर्माचरणाने सदाचार
वाढेल का ?
३. धर्म निरपेक्षता
म्हणजे काय ?
४ आपल्या
संस्कृतीचा कर्म सिध्दांत
काय?
५. कर्मयोग म्हणजे
काय ?
६. पुनर्जन्म सिध्दांतामुळे
काय होते ?
७. मनुष्याचे कल्याण
कशामध्ये आहे ?
८.असत्य कधी निंदनीय नाही ?
९.प्राणिमात्रांची सेवा ईश्वरपुजा आहे का
१०.अंतःकरण
शुध्द कशाने होते
?
नववा महिना
१. परमार्थ म्हणजे
अंधश्रध्दा आहे का
?
२. नास्तिकता
म्हणजे काय ?
३. मनुष्याची सार्थकता
भोगामध्ये आहे का ?
४.सतत उपभोगाने
इंद्रियतृप्ती होते का ?
५. भोगवादी संस्कृतीमध्ये
सुख आहे का
?
६. कर्माच्या
अहंकाराने समाधान मिळते का
७. धार्मिक
शास्त्रांमध्ये श्रध्दा का नसावी ?
८.नास्तिकतेमुळे चंगळवाद
बळावतो का ?
९. धर्मांधता म्हणजे
काय ?
१०.प्रमाणांनी
काय काय सिद्ध करता येत नाही?
दहावा महिना
१ सुखाच्या प्रयत्नाने
दुःखच का मिळते?
२.सदाचा-यांच्या नशिबी दुःख, यातना का
३. आर्थिक विषमतेचे
कारण काय ?
४.आपल्या संस्कृतीमध्ये
असंख्य देवता का
५ उपास,नवस, करून परमेश्वर भेटतो का
६. कोणती देवता श्रेष्ठ आहे ?
७. निर्गुण साधना करावी की सगुण ?
८. विवीध साधनेतून नक्की काय करावे
?
९. वर्णव्यवस्थेतून भेदाभेद
होतो का ?
१०.आपल्या
संस्कृतीमध्ये धर्मसंस्थापक नाही?
अकरावा महिना
१.उत्सव
म्हणजे आध्यात्मिक विकास
?
२ धर्मसाहित्य
म्हणजे आध्यात्मिक विकास
३.धर्माचरण
म्हणजे आध्यात्मिक विकास?
४.वेदपठणाने आध्यात्मिक
विकास होतो का
५.तीर्थ
यात्रेने शांती समाधान
मिळतेे का
६.यज्ञाने,
ज्ञानयज्ञाने परमेश्वर भेटतो का?
७.षोडपचार पूजनाने
परमेश्वर भेटतो का?
८. वेद श्रवणाने
परमेश्वर भेटतो का?
९. मनुष्यजन्माचे
अंतिम उद्दीष्ट काय
?
१०.सायुज्यता कशाने प्राप्त होते ?
बारावा महिना
१सर्वांगीण
विकासातून परिवर्तन होईल?
२.आज सर्वांगीण विकास
शक्य आहे का
३.समाजाची
मानसिकता अनुकूल कोणी करावी?
४.कार्यकर्त्यांची भूमिका
काय पाहिजे?
५.राज्यकर्त्यांची भूमिका
कोणती पाहिजे?
६.सर्वांगीण
विकासातून राष्ट्रप्रेम होईल?
७.सर्वांगीण विकासातून
राष्ट्र उद्धार होईल?
८.सर्वांगीण विकासचिंतन
कोणी करावे ?
९.या उपक्रमाच्या प्रचाराने
समाजकार्य होईल?
१०.या उपक्रमाचा
तुम्हास काय उपयोग झाला?
No comments:
Post a Comment