जयाचा जनी
जन्म नामार्थ झाला । जयाने सदा
वास नामात केला
। जयाच्या मुखी सर्वदा
नामकिर्ती । नमस्कार
त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति
चैतन्य स्वाध्याय एल-५०७
चंद्रमा-विश्व, धायरी पुणे
४११०६८
चैतन्य स्वाध्याय
हा एक श्रीसमर्थ
सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
यांची प्रवचने,संग्राहक-गो.सी.गोखले या ग्रंथातील
उपदेशांचा अभ्यास करण्यास
उपकृत करण्याचा प्रयत्न आहे. भगवंताच्या
दर्शनाच्या आड येणारे
सारे प्रतिबंध या अभ्यासाने
दूर जातात. ते
दिव्य प्रेम कसे
संपादन करावे याचे
अतिशय स्पष्ट व
तितक्याच खात्रीच्या मार्गदर्शनाचे प्रबोधन होते. प्रवचनांची
भाषा सोपी, आपलेपणाची
असून सुध्दा त्यातील
आशय आपल्या अनुभूतीचा
व व्यवहार्य आहे याचा
बोध होतो. दैनंदिन
जीवनामध्ये परमार्थ कसे आचरणात
आणावे याचा मार्ग
उमगतो.
हा अभ्यासक्रम एक वर्षाचा
असून निरपेक्षवृत्तीने घेण्यात येत आहेत.(विनामुल्य)
श्रीसमर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
यांची प्रवचने,संग्राहक-गो.सी.गोखले या पुस्तकाचा
अभ्यास करून प्रत्येक
महिन्याच्या प्रवचनांवर आधारीत दहा
प्रश्न तयार केलेले
असून त्याची उत्तरे
(आपल्या भाषेमध्ये) लिहून पत्रद्वारे
पाठवावीत. अभ्यास करताना
प्रत्येक महीन्यातील प्रवचनांचे सात दिवस
दररोज एकाग्रतेने पठण, श्रवण
करावे. त्यातील मतितार्थ समजून घेणे.
त्यानंतर सात दिवस
त्या अभ्यासाचे चिंतन करणे.
व त्यानंतर पंधराव्या दिवशी प्रश्नोत्तरे
आपल्या भाषेमध्ये लिहून दर
महीन्यास पत्राद्वारे परतीचे टपालासह
पाठवावे. प्रश्नांच्या आधारे नेमके
उत्तरे शंभर शब्दांमध्ये
लिहून त्यानंतर मार्गदर्शनासाठी दोन ओळी
कोया सोडाव्यात. कोणत्याही महिन्यापासून अभ्यासक्रमास सुरूवात करता येईल.
शंका निरसन व
चौकशी, मार्गदर्शनासाठी संपर्क करण्यास
हरकत नाही. उत्तरावर
मार्गदर्शन करून ती
परत पाठविली जातात.
प्रश्नांच्या
माध्यमातून अभ्यास केल्यामुळे
पुन्हा पुन्हा वाचन,
चिंतन मनन होते,
तेच महाराजांना अपेक्षित आहे.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
वार्षिक परिक्षा घेण्यात येत नाही
तसेच प्रमाणपत्र ही दिले
जात नाही. हा
उपक्रम श्रीरामस्वरूपामध्ये एकरूप होण्यासाठी
आहे. महाराजांचा मुख्य उपदेश
देहाभिमान नष्ट करणे
हा आहे. अभ्यासक्रम
पूर्ण झाल्यानंतर गोंदवले येथे एक
शिबीर घेण्यात येईल.
महाराजांची ही प्रवचने
आजच्या सर्व समस्यांंवर
रामबाण उपाय आहे.
म्हणून याचा अभ्यास
करून त्याचे आचरण
केल्याने मनुष्यास सुख समाधान
प्राप्त होते. तरी
हा अभ्यासक्रम स्वतः करून
आपल्या हितचिंतकांस जरूर सांगावा.
याच प्रकारचे
श्रीमद्भागवत, एकनाथी भागवत,
योग, व्यक्तिमत्त्व विकास, देवीभागवत-उपासना
इत्यादी विषयांचे सुध्दा पत्रद्वारा
अभ्यासक्रम (विनामुल्य)सुरू आहेत. जिज्ञासूंनी
जरूर संपर्क करावा.
स्वामी मोहनदास, भरतीय तत्त्वज्ञान
प्रचारक (भ्रमणध्वनी - ९४२०८५९६१२)
एल-५०७ चंद्रमा-विश्व,
धायरी, पुणे ४११०४१
चैतन्य स्वाध्यायाचा
एक वर्षाचा अभ्यासक्रम
महिना पहिला
१. पुण्य कशाने प्राप्त
होते ?
२. राम राम म्हणण्याचा
शेवट कशामध्ये आहे ?
३. सकाम नाम घेणे कसे आहे. ?
४ नेमाची संख्या
पुरी झाली तरी कशाची सवय ठेवावी ?
५. आज भगवंताचे
स्मरण का होत नाही ?
६. कोणता प्रश्न स्वतःला
विचारणे जरूर आहे ?
७. खरा जीवन्मुक्त कोण आहे ?
८. योग केल्याने
काय होईल ?
९. वाचकाला
खरा अर्थ कधी कळतो आणि आनंद होतो ?
१०.नामसाधनेतला आनंदाचा
मार्ग कोणता आहे ?
महिना दुसरा
१. सिध्दांना
कशाचाही उच्चार केला तरी काय वाटते ?
२. शरणागती
कधी येते ?
३. देवांस
देवपण आपण कशाने देतो ?
४. माया तरून जायला रामबाण
उपाय कोणता आहे ?
५. महाराज
पुन्हा जन्मास का आले ?
६. नामाचे
प्रेम न यायला खरे कारण कोणते आहे ?
७. खरा पाश कोणता आहे ?
८. आपली ओळख करून घेण्यास
उपाय कोणता आहे ?
९. नाम हे कोणापेक्षा
श्रेष्ठ आहे ?
१०.वासना म्हणजे
काय ?
महिना तिसरा
१. माया म्हणजे काय ?
२. आमचा मुख्य रोग कोणता आहे ?
३. स्वतःबद्दल
नास्तिक्यबुध्दी असणे म्हणजे
भगवंताबद्दल काय ?
४. पोटात विषयांचे
प्रेम ठेवून सत्कर्मे
केली, तर काय होते ?
५. जो जरूरी पुरता प्रपंच करील, त्याला किती तास पुरतील
?
६. साधन कशावर अवलंबून
नसते ?
७. भेटायला
येणायांकडे पाहून महाराजांना
कशाचे वाईट वाटते
?
८. प्रपंचामध्ये मनुष्याने
किती व्यवहारी असावे
?
९. भक्तीचे
मर्म कोणते आहे ?
१०.कोणते तत्त्वज्ञान
खरे आहे ?
महिना चौथा
१. संतांचे
होणे म्हणजे काय ?
२. साधनेत
प्रगती झाली असे कधी समजावे
?
३. आपण कशी वृत्ती
ठेवली पाहिजे ?
४. ज्ञान प्राप्ती
कशाकरिता करू नये ?
५. स्वर्गसूख
हाती आले, ते घेऊन काय करायचे असे का होते ?
६. निःस्वार्थी
भाषा कशी असते ?
७. संतांना
ओळखण्याचे गुण कशासाठी
सांगितले आहेत ?
८. निःस्वार्थी भाषा कशी असते ?
९. परमार्थ
ऐकत नसताना त्याला
सांगणारा कोण असतो ?
१०.कशामध्ये आपले कल्याण आहे ?
महिना पाचवा
१. परमेश्वराचे
अस्तित्व कोणाला जाणवेल
?
२. कोणत्या
क्षणी मुक्ती मिळेल
?
३. भजन करित असताना
काय विसरले पाहिजे
?
४. संतांचे काम कोणते आहे ?
५. चित्तशुध्दीच्या मार्गात
मोठी धोंड कोणती आहे ?
६. नामाची
गोडी यायला आपण काय केले पाहिजे ?
७. नामस्मरण
कसे करू नये ?
८. किती वाचावे
व नंतर काय करावे ?
९. आपल्या
वृत्तीवर काय अवलंबून
असते ?
१०.आपली वृत्ती
कधी सुधारेल ?
महिना सहावा
१. पोथी वाचल्यानंतर प्रथम काय केले पाहिजे ?
२. सुखदुःख
हे कशावर अवलंबून
आहे ?
३. खरा श्रोता आणि साधक कोण असतो ?
४. शेवटची पायरी कोणती आहे ?
५. परमार्थ
लवकर कधी साधेल
?
६. आपल्या
हितासाठी कोणता आश्रम उपयुक्त
आहे
?
७. विघ्ने
कशासाठी येत असतात
?
८. परमार्थ साधण्यासाठी
कोणते साधन आहे ?
९. प्रपंच
आणि परमार्थ एकच आहे की वेगळा आहे ?
१०. मी देही नाही हे कसे सिध्द झाले ?
महिना सातवा
१. भगवंताचे
प्रेम जोडण्यासाठी काय केले पाहिजे
?
२. देहात कोण कधीच नसते ?
३. कोणाला
महाराज खरे कळले ?
४. प्रपंचातल्या कष्टांचे
सार्थक कधी होते ?
५. नाम घेताना काय विसरून गेले पाहिजे ?
६. सदगुरूची
आवश्यकता कशासाठी आहे ?
७. शरणागती
कशाला म्हणतात ?
८. सदगुरु शिष्यासाठी
काय करतात ?
९. भजन करताना महराजांना
कोण दिसत असे ?
१०. आपण काय करून गुरूला गौणपणा
देतो ?
महिना आठवा
१. आपले खरे स्वरूप
काय केल्याने प्रकट होईल ?
२. सुखाचा
उगम कोठे आहे ?
३. काहीही
न करणे ही कोणती अवस्था
आहे ?
४. आपले खरे स्वरूप काय केल्याने प्रकट होईल ?
५. देवाचे
प्रेम लागण्यासाठी काय केले पाहिजे
?
६. अनन्यतेने
काय प्राप्त होते ?
७. आपण कोठे जाण्याचा
प्रयत्न केला पाहिजे
?
८. भ्रम कोणता आहे ?
९. खरे समाधान कशाने लाभणार नाही.
१०. कोणती खात्री असली तर भगवंताचे
होता येते.
महिना नववा
१. कोणाला
विसरणे ही आत्महत्याच
आहे ?
२. परमार्थात
काय मिसळले कि तो प्रपंचच
झाला ?
३. भगवंताचे
अनुसंधान काय केल्याने
विसरायचे नाही ?
४. कृष्णाचा जन्म कोठे झाला पाहिजे ?
५. नामस्मरण
कसे करावे ?
६. भगवंताचे
नामस्मरण म्हणजे काय ?
७. नाम घेऊन प्रापंचिक
सुख मागणे कसे आहे
?
८. भाग्याचा दिवस कोणता आहे ?
९. भगवंताचे
अनुसंधान काय केल्याने
विसरायचे नाही ?
१०. सोन्याची
मंदिरे बांधण्यापेक्षा काय केले पाहिजे
?
महिना दहावा
१. इतरांच्या
ठिकाणी भगवंताला कधी पाहता येईल ?
२. सात्विक
कृत्ये करताना काय लक्षात ठेवावे
?
३. भगवंताचा
वाढदिवस का करायला
पाहिजे ?
. ४ खरा संन्यास
कोणता आहे ?
५. संतांनी
भगवंतास सगुणामध्ये का आणले ?
६. निष्काम
कर्म कोणते आहे ?
७. भक्ती कोठे जन्म पावते ?
८. वासनेच्या तीन अवस्था कोण्त्या
?
९. मनुष्याला
भगवंतापासून दूर कोण नेते ?
१०.परमार्थाचे सर्वसार
कोणते आहे ?
महिना अकरावा
१. कोणत्या
वाटेने जाण्याचा निश्चय
करावा ?
२. साधन व साध्या
एकच असे काय आहे ?
३. हिंसेचे
लक्षण कोणते आहे ?
४. मनुष्य सुखी कधी होईल ?
५. मनुष्य
निष्पाप झाला असे कधी समझावे
?
६. प्रपंचातील
लाभहानीचे महत्त्व कधी संपते ?
७. भगवंताची
कृपा आपल्यावर कधी प्रकट होते ?
८. खरा मुहूर्त
कोणता आहे ?
९. कोणास योगी समजावे
?
१०.गीतेचा विषय कोणता
?
महिना बारावा
१. वेदांचा
खरा अर्थ कधी कळेल
?
२. नाम किती खोल गेले पाहिजे ?
३. भगवंत कशासाठी हवा असतो
?
४. पोथ्या-पुराणे बाधक का ठरतात ?
५. कोणाला
देव सांभाळीत असतो ?
६. कशाचा अनुभव घ्यायला
तयार झाले पाहिजे ?
७. देव कोणाला सांभाळीत
असतो ?
८. भक्तीचे लक्षण कोणते आहे ?
९. शरणागती
कोणती आहे ?
१०.वैराग्याचे लक्षण कोणते आहे ?
No comments:
Post a Comment