Saturday, 10 June 2017

योग स्वाध्याय



  योगेन  चित्तस्य  पदेन  वाचां  मलं  शरीरस्य   वैद्यकेन   यो  पाकरोत्तं  मुनीनां  पतंजलिं  प्रांजलिरानतोस्मि  ।।
 योग  स्वाध्याय  हा  एक  पतंजलि  योग-सुत्रातील  यथार्थज्ञानाचा  अनुभव  मिळवून  देण्याचा  पत्रद्वारा  अभ्यासक्रम  आहे.  (हिंदी   इंग्रजी  मध्ये  सुध्दा)   या  योग  साधनेने  मनुष्याचे  अंतिम  उद्दीष्ट  प्राप्त  होऊ  शकते,  यासाठी  पतंजलिमुनींनी  सुत्ररूपाने  योग-दर्शन  शास्त्र  निर्माण  केले.  आजच्या  विज्ञाननिष्ठ  मनुष्याला  सुध्दा  ग्राह्य  होईल  अशा  तर्कशास्त्रदृष्ट्या  या  योग-सुत्रांची  मांडणी  केलेली  आहे.  त्याला  स्थळाचे,  काळाचे,  वंशाचे,  जातीचे,  धर्माचे  कोणतेच  बंधन  नाही.  यामुळे  अखिल  मनुष्यमात्रांचे  कल्याण  होणार  आहे.  हा  एक  चिंतनाचा,  जीवन  सार्थकी  लावण्याचा  खटाटोप  आहे.  पतंजलि  योग-सुत्रातील  तत्त्वज्ञानाचा  प्रसार  होणे  हेच  या  उपक्रमाचे  मुख्य  उद्दीष्ट  आहे.
 या  योग-दर्शन  शास्त्रामध्ये  समाधिपाद,  साधनपाद,  विभूतिपाद,  कैवल्यपाद  हे  चार  विभाग  असून  एकुण  १९५  योगसुत्रे  आहेत.  ती  संस्कृत  भाषेमध्ये  आहेत.  त्यांचे  मराठीमध्ये  भाषांतर   विवेचनात्मक  भावार्थ  विद्यावाचस्पती  कृष्णाजी  केशव  कोल्हटकर  यांनी  उत्तम  रितीने  केलेला  आहे.(ढवळे  प्रकाशन,  मुंबई)  तसेच  हिंदी  मध्ये  सुध्दा  गीता  प्रेस,  गोरखपूरने  पातंजल  योग  प्रदीप  नावाचा  ग्रंथ  प्रकाशित  केलेला  आहे.  या  ग्रंथांचा  अभ्यास  करून  प्रश्नोत्तरे  (आपल्या  भाषेमध्ये)  दर  तीन  महीन्यांनंतर  पत्राद्वारे  परतीचे  टपालासह  पाठवावे.  प्रश्नांच्या  आधारे   नेमके  उत्तरे  लिहून  त्यानंतर   मार्गदर्शनासाठी  पाच  ओळी  कोया  सोडाव्यात.  शंका  निरसन   चौकशी,  मार्गदर्शनासाठी  संपर्क  करण्यास  हरकत  नाही.  उत्तरावर  मार्गदर्शन  करून  ती  परत  पाठविली  जातात.  समाधिपाद,  साधनपाद,  विभूतिपाद,  कैवल्यपाद  हे  चार  विभागांसाठी  प्रत्येकी  आठ  प्रश्न  तयार  केलेले   असून  दर  तीन  महीन्यास  एक  विभाग  याप्रमाणे   एक  वर्षामध्ये  हा  योग  स्वाध्याय  पुर्ण  होतो.  अभ्यासक्रमाची  रूपरेषा  खालील  प्रमाणे  आहे.

 पहिला  महिना--
 समाधिपादाच्या  ५१  योगसुत्रांचा  अर्थाचे  दररोज  वाचन
 दुसरा  महिना---
 समाधिपादाच्या  ५१योगसुत्रांचे  दररोज  चिंतन
 तिसरा  महिना--
 समाधिपादाच्या  आठ  प्रश्नांच्या  उत्तरांचे लेखन
 चौथा  महिना---
 साधनपादाच्या  ५५  योगसुत्रांचा  अर्थाचे  दररोज  वाचन
 पाचवा  महिना--
 साधनपादाच्या  ५५  योगसुत्रांचे  दररोज  चिंतन
 सहावा  महिना--
 साधनपादाच्या  आठ  प्रश्नांच्या  उत्तरांचे  लेखन
 सातवा  महिना--
 विभूतिपादाच्या  ५५  योगसुत्रांचा  अर्थाचे  दररोज  वाचन
 आठवा  महिना--
 विभूतिपादाच्या  ५५  योगसुत्रांचे  दररोज  चिंतन
 नववा  महिना---
 विभूतिपादाच्या  आठ  प्रश्नांच्या  उत्तरांचे  लेखन
 दहावा  महिना--
 कैवल्यपादाच्या  ३४  योगसुत्रांचा  अर्थाचे  दररोज  वाचन
 अकरावा महिना-
 कैवल्यपादाच्या  ३४  योगसुत्रांचे  दररोज  चिंतन
 बारावा  महिना-
 कैवल्यपादाच्या  आठ  प्रश्नांच्या  उत्तरांचे    लेखन

 अभ्यासक्रम  पूर्ण  झाल्यानंतर  वार्षिक  परिक्षा  घेण्यात  येत  नाही,  तसेच  प्रमाणपत्र  ही  दिले  जात  नाही.  हा  योग  स्वाध्याय  निरपेक्षवृत्तीने  घेण्यात  येत  आहेत.(विनामुल्य)  या  योगस्वाध्यायाच्या  अभ्यासाने  योग-साधनेचे  शास्त्रीय  स्वरूप  लक्षात  येते.  परमशांती  लाभू  शकते.  तरी  हा  अभ्यास  आपण  स्वतः  करून  आपल्या  हितचिंतकांस  जरूर  सांगावा.
 श्रीमद्-भागवताचा  सुध्दा  पत्राद्वारे  अभ्यासक्रम  (विनामुल्य)  चालू  आहे.
 अश्याच  प्रकारचे  भागवत-स्वाध्याय,  विकास  चिंतनिका,  देवीभागवत-उपासना  इत्यादी  विषयांचे  सुध्दा
 पत्रद्वारा  अभ्यासक्रम  सुरू  आहेत.  जिज्ञासूंनी  जरूर  संपर्क  करावा.
 आपल्या  येथे  प्रवचन  सप्ताह  जरूर  आयोजित  करावेत.

 स्वामी  मोहनदास,  (भ्रमणध्वनी  -  ९४२०८५९६१२)     एल-५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४११०४१

 योग  स्वाध्याय  एक  वर्षाचा  अभ्यासक्रम
 समाधिपादाचे  आठ  प्रश्न
 १.  चित्त  कशाने  प्रसन्न  होते  ?
 २.  योग्याची  प्रज्ञा  ऋतंभरा  कधी  होते  ?
 ३.  ईश्वर  कसा  आहे  ?
 ४.  वैराग्य  कशाला  म्हणतात.?
 ५.  निर्बीज  समाधि  कधी  प्राप्त  होते  ?
 ६.  मनुष्य  स्वरूपामध्ये  कधी  स्थिर  होतो  ?
 ७.  कोणत्या  दोन  उपायांनी  चित्त-वृत्तींचा  निरोध  होतो  ?
 ८.  योग  म्हणजे  काय  ?
 साधनपादाचे  आठ  प्रश्न
 १.  आसन  कशास  म्हणतात  ?
 २.  योगाची  आठ  अंगे  कोणती  ?
 ३.  क्रियायोग  कशास  म्हणतात?
 ४.  यम  किती  आहेत  ?
 ५.  प्राणायामाने  काय  होते  ?
 ६.  प्रत्याहार  म्हणजे  काय  ?
 ७.  अपरिग्रहतेमुळे  काय  प्राप्त  होते  ?
 ८.  नियम  किती  आहेत  ?
 विभूतिपादाचे  आठ  प्रश्न
 १.  कैवल्याचा  लाभ  कसा  होतो  ?
 २.  इंद्रियसिध्दी  कशी  प्राप्त  होते  ?
 ३.  समाधिमार्गामध्ये  कोणते  अडथळे  आहेत  ?
 ४.  चित्ताला  स्थैर्य  कसे  प्राप्त  होते  ?
 ५.  धारणा  म्हणजे  काय  ?
 ६.  निरोधसंस्कार  म्हणजे  काय  ?
 ७.  भूतकाळाचे   भविष्यकाळाचे  ज्ञान  कशाने  होते  ?
 ८.  समाधि  म्हणजे  काय  ?
 कैवल्यपादाचे  आठ  प्रश्न
 १.  कैवल्यअवस्था  कशी  प्राप्त  होते  ?
 २.  समाधिअवस्था  कशी  प्राप्त  होते  ?
 ३.  कर्मवासना  कशामुळे  निर्माण  होतात  ?
  ४.  धर्माचरणाने  कोणते  महत्त्वाचे  कार्य  होते  ?
 ५.  कर्मवासनांचे  मूळ  स्वरूप  कसे  आहे  ?
 ६.  चित्ताचा  मूळ  स्वामी  कोण  आहे  ?
 ७.  आत्मसाक्षात्कारानंतर  सुध्दा  पुर्वसंस्कारांची  निवृत्ती  का  आवश्यक  आहे  ?
 ८.  एका  जन्मानंतर  दुसया  जन्मामध्ये  भिन्न  योनि  का  प्राप्त  होते  ?



1 comment:

  1. सप्रम नमस्कार, आपल्या स्तुत्य उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छीतो.आपल्या अभ्यासक्रमात सहभागी होण्यास उत्सुक आहे, तरी कृपया प्रवेश कसा घ्यावा या संबंधी मार्गदर्शन करावे. धन्यवाद

    ReplyDelete