श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम स्वाध्याय एल-५०७
चंद्रमा-विश्व, धायरी पुणे
४११०६८
श्रीराम स्वाध्याय हा एक तुलसीदास विरचित श्रीरामचरितमानस(सार्थ
मराठी) या ग्रंथातील
तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यास
उपकृत करण्याचा प्रयत्न आहे. श्रीरामाचा
आदर्शवाद या ग्रंथामध्ये
अत्यंत सोपा करून
सांगितलेला आहे. श्रीरामाची
भक्ती करण्याची जिज्ञासा उत्पन्न होते. दैनंदिन
जीवनामध्ये श्रीरामाचा आदर्शवाद कसा आचरणात
आणावा याचा मार्ग
उमगतो. याच उद्देशाने
पत्रद्वारा हा अभ्यासक्रम
तयार केलेला आहे.
हा अभ्यासक्रम
सुमारे एक वर्षाचा
असून निरपेक्षवृत्तीने घेण्यात येत आहेत(विनामुल्य)
तुलसीदास विरचित श्रीरामचरितमानस(गोरखपूर,
गीताप्रेस सार्थ मराठी)
या ग्रंथाचा
अभ्यास करून प्रत्येक
प्रकरणावर(कांडावर) आधारीत दहा
प्रश्न तयार केलेले
असून त्याची उत्तरे
(आपल्या भाषेमध्ये) लिहून पत्रद्वारे
पाठवावीत. अभ्यास करताना
प्रत्येक (प्रकरणाचे)कांडाचेे सात दिवस
दररोज एकाग्रतेने पठण, श्रवण
करावे. त्यातील मतितार्थ समजून घेणे.
त्यानंतर सात दिवस
त्या अभ्यासाचे चिंतन करणे.
व त्यानंतर पंधराव्या दिवशी प्रश्नोत्तरे
आपल्या भाषेमध्ये लिहून दर
महीन्यास पत्राद्वारे परतीचे टपालासह
पाठवावे. प्रश्नांच्या आधारे नेमके
उत्तरे शंभर शब्दांमध्ये
लिहून त्यानंतर मार्गदर्शनासाठी दोन ओळी
कोया सोडाव्यात. कोणत्याही महिन्यापासून अभ्यासक्रमास सुरूवात करता येईल.
शंका निरसन व
चौकशी, मार्गदर्शनासाठी संपर्क करण्यास
हरकत नाही. उत्तरावर
मार्गदर्शन करून ती
परत पाठविली जातात.
प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यास केल्यामुळे
पुन्हा पुन्हा वाचन,
चिंतन मनन होते,
त्यानेच श्रीराम भक्ती दृढ
होते.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
वार्षिक परिक्षा घेण्यात येत नाही
तसेच प्रमाणपत्र ही दिले
जात नाही. हा
उपक्रम श्रीरामस्वरूपामध्ये एकरूप होण्यासाठी
आहे. महाराजांचा मुख्य उपदेश
देहाभिमान नष्ट करणे
हा आहे. अभ्यासक्रम
पूर्ण झाल्यानंतर एक शिबीर
घेण्यात येईल.
तुलसीदास विरचित श्रीरामचरितमानस
आजच्या सर्व समस्यांंवर
रामबाण उपाय आहे.
म्हणून याचा अभ्यास
करून त्याचे आचरण
केल्याने मनुष्यास सुख समाधान
प्राप्त होते. तरी
हा अभ्यासक्रम स्वतः करून
आपल्या हितचिंतकांस जरूर सांगावा.
याच प्रकारचे श्रीमद्भागवत, एकनाथी भागवत,
योग, व्यक्तिमत्त्व विकास, देवीभागवत,
चैतन्य इत्यादी विषयांचे सुध्दा पत्रद्वारा
अभ्यासक्रम (विनामुल्य)सुरू आहेत. जिज्ञासूंनी
जरूर संपर्क करावा.
स्वामी मोहनदास, भारतीय तत्त्वज्ञान
प्रचारक (भ्रमणध्वनी - ९४२०८५९६१२)
एल-५०७ चंद्रमा-विश्व,
धायरी, पुणे ४११०६८
श्रीराम स्वाध्यायाचा एक वर्षाचा
अभ्यासक्रम
महिना पहिला बालकांड
१. जनकपूरीच्या
लोकांना चारी पुत्रांचे
दर्शन कश्या प्रमाणे
वाटले ?
२. निरोप देताना जनकराजाने
श्रीरामाची स्तुती कशी केली ?
३. श्रीरामाने
परशुरामांचा क्रोध कसा शांत केला ?
४. जनकाचा
स्वयंवराचा पण कोणीही
पूर्ण करू शकले नाही तेव्हा
लक्ष्मणाने जनकास काय उत्तर दिले ?
५. अहल्येने श्रीरामाची
स्तुती कशी केली ?
६. रामनामाचा
महिमा वर्णन करा.
७. महादेवांनी
सतीचा त्याग का केला ?
८. प्रतापभानुची
कथा कशासाठी सांगितली
आहे ?
९. श्रीरामाने
महादेवास कोणती विनंती
केली ?
१०.महादेवांनी पार्वतीस
श्रीराम महिमा कोणत्या
शब्दामध्ये सांगितला ?
महिना दुसरा अयोध्याकांड
१. चित्रकुटामध्ये वसिंष्ठ
भरतास व प्रजेस
उद्देशून काय म्हणाले?
२. वाल्मिकींनी
श्रीरामाची स्तुती कोणत्या
शब्दामध्ये केली आहे ?
३. भरद्वाजमुनींनी भरतास कोणता उपदेश केला ?
४. चित्रकुटामध्ये श्रीरामाने
भरतास कोणता उपदेश केला
?
५. श्रीरामाने
भरतास निरोप कसा दिला ?
६. सुमित्रेने लक्ष्मणास
वनात जाताना कोणता उपदेश केला ?
७. श्रीरामा
बरोबर वनात जाण्यासाठी
कोणता युक्तिवाद केला ?
८. कैकयीने
वर मागितल्यानंतर दशरथाची
मनःस्थिती कशी झाली ?
९. राजपद ग्रहण करण्यास सांगितल्यानंतर भरत काय म्हणला
?
१०.श्रीराम वनामध्ये
गेल्यानंतर अयोध्येचे वर्णन करा.
महिना तिसरा अरण्यकांड
१. श्रीरामांनी
संतांची कोणती वैशिठ्ये
सांगितली?
२. अनसूयेने
सीतेस कोणता स्त्रीधर्म
सांगितला ?
३. श्रीरामाने
जयंतावर बाण का सोडला ?
४. सीतेचे
हरण झाल्यावर तिने कसा विलाप केला ?
५. श्रीरामाने
शबरीस कोणत्या भक्तीचा
उपदेश केला ?
६. जटायुने अंतसमयी
श्रीरामाची स्तुती कशी केली ?
७. श्रीरामाने
लक्ष्मणास कोणत्या भक्तीचा
उपदेश केला ?
८. सीता अग्नीमध्ये समाविष्ट
का झाली ?
९. कोणत्या
नऊ व्यक्तींशी वैर करण्याने कल्याण
होत नाही ?
१०अत्रीमुनींनी श्रीरामाची
स्तुती कशी केली ?
महिना चौथा किष्किंधाकांड
१. श्रीरामाने
वर्षाऋतुचे वर्णन करताना
कोणते तत्त्वज्ञान सांगितले
?
२. सुग्रीवाने
हनमानास सीतेचा शोध घेण्यासाठी कोणती आज्ञा केली ?
३. सुग्रीवाने
प्रथम श्रीराम लक्ष्माणास
पाहून कोणती आज्ञा केली ?
४. सुग्रीवाने
श्रीरामास वालीची कथा कशाप्रकारे सांगितली
?
५. श्रीराम
लक्ष्मणाच्या क्रोधास सुग्रीवाने
कसे उत्तर दिले?
६. अंतसमयी वालीने
श्रीरामास काय विचारले,
उत्तर काय मिळाले
?
७. श्रीरामाने
शरदऋतुचे वर्णन करताना
कोणते तत्त्वज्ञान सांगितले
?
८. श्रीराम
व सुग्रीव यांच्या
मैत्रीचे वर्णन करा.
९. श्रीरामाने
तारेला केणता उपदेश केला ?
१०.श्रीरामाच्या किर्तीचे
वर्णन कसे केले आहे ?
महिना पाचवा सुंदरकांड
१. मंदोदरीने
रावणास कोणता सल्ला दिला ?
२. बिभीषणाने
रावणास कोणता सल्ला दिला?
३. हनुमान
व बिभीषण प्रथम भेटीचे वर्णन करा.
४. हनुमानाने
सीतेस श्रीरामाचा कोणता निरोप सांगितला
?
५. हनुमानाने
रावणास कोणती विनंती
केली ?
६. हनुमानाने श्रीरामास
सीतेचा कोणता निरोप सांगितला?
७. श्रीराम
व बिभीषण प्रथम भेटीचे वर्णन करा.
८. लक्ष्मणाने
रावणास कोणता निरोप पाठविला ?
९. समुद्राने
श्रीरामास कोणता सल्ला दिला ?
१०.माल्यवानाने रावणास
कोणता सल्ला दिला ?
महिना सहावा लंकाकांड
१. कुंभकर्णाने
रावणास कोणता सल्ला दिला ?
२. मंदोदरीने
श्रीराम-महिमा कोणत्या शब्दामध्ये
रावणास सांगितला ?
३. माल्यवानाने
युध्द सुरू झाल्यानंतर
रावणास कोणता सल्ला दिला ?
४. हनुमान
व भरत यांच्या
प्रथम भेटीचे वर्णन करा.
५. त्रिजटेने
सीतेचे कसे सांत्वन
केले ?
६. रावण-अंत झ्याल्यावर
मंदोदरीने विलाप कोणत्या
शब्दामध्ये केला ?
७. इंद्राने
श्रीरामाची स्तुती कोणत्या
शब्दामध्ये केली ?
८. ब्रह्मदेवाने
श्रीरामाची स्तुती कोणत्या
शब्दामध्ये केली ?
९. लंकेच्या
शिखरावर असलेल्या महालाचे
वर्णन करा.
१०.अंगदाने रावणास
कोणता सल्ला दिला ?
महिना सातवा उत्तरकांड
१. श्रीरामाने
भरतास संतांची कोणती लक्षणे सांगितली
?
२. श्रीरामाने
प्रजेला कोणता उपदेश केला ?
३. श्रीराम-राज्याचे वर्णन करा.
४. वसिष्ठांनी
श्रीरामाची स्तुती कोणत्या
शब्दांमध्ये केली ?
५. भजन-महिमा
वर्णन करा
६. रूद्राष्टकाचा अर्थ स्पष्ट करा.
७. ज्ञान व भक्तीचे
वर्णन करा.
८. गरूडाने
विचारलेल्या सात प्रश्नांची
उत्तरे द्या.
९. तुलसीदासांनी
रामचरितमानस-महिमा कसा सांगितला
आहे ?
१०श्रीरामशलाका प्रश्नावलीचे
स्वरूप कसे आहे ?
No comments:
Post a Comment