गीता
रहस्य स्वाध्याय हा एक लोकमान्य
टिळकांनी लिहीलेल्या गीता रहस्य या ग्रंथाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करण्याचा उपक्रम आहे. कारण टिळकांनी लिहीलेला
गीता रहस्य हा ग्रंथ अत्यंत गुढ आहे आशीच समजूत अनेक जणांची झालेली आहे. टिळकांनी या ग्रंथामध्ये गीता आणि वेद यातून निर्माण
होणाऱ्या प्रश्नांचे अभ्यासपूर्ण संशोधन
केलेले आहे. गीता ही पाठांतरासाठी अथवा वृध्दांसाठी नसून तरूणांसाठी
अभ्यासासाठी व आचरणासाठी आहे.
हा अभ्यासक्रम निरपेक्षवृत्तीने घेण्यात येत आहेत.(विनामुल्य) गीता रहस्य या
ग्रंथातील पहिल्या बारा
प्रकरणांवर असे बारा महीने असा एक वर्षाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. ज्यामुळे गीतेतील तत्त्वज्ञान रोज आचरण्यात कसे आणावे हे समजते. तरी आपण हा अभ्यास आपल्या आत्मोध्दारासाठी जरूर करावा. भागवताचा अभ्यास करताना प्रत्येक महीन्यातील
प्रकरणाचे सात दिवस दररोज एकाग्रतेने पठण, श्रवण करावे. त्यातील मतितार्थ समजून घेणे. त्यानंतर सात दिवस त्या अभ्यासाचे चिंतन करणे. व त्यानंतर पंधराव्या दिवशी प्रश्नोत्तरे आपल्या भाषेमध्ये लिहावीत.
लोकमान्य
टिळकांनी लिहीलेल्या गीता रहस्य या ग्रंथाचा अभ्यास करून प्रश्नोत्तरे (आपल्या भाषेमध्ये) दर महीन्यास पत्राद्वारे परतीचे टपालासह पाठवावे. प्रश्नांच्या आधारे नेमके उत्तरे शंभर शब्दांमध्ये लिहून त्यानंतर मार्गदर्शनासाठी दोन ओळी कोऱ्या सोडाव्यात. शंका निरसन व चौकशी, मार्गदर्शनासाठी संपर्क करण्यास हरकत नाही. उत्तरावर मार्गदर्शन करून ती परत पाठविली जातात.
अभ्यासक्रम
पूर्ण झाल्यानंतर
वार्षिक परिक्षा घेण्यात येत नाही तसेच प्रमाणपत्र ही दिले जात नाही. हा उपक्रम भागवतातील ज्ञानप्राप्तीसाठी आहे. भागवतातील मुख्य उपदेश देहाभिमान नष्ट करणे हा आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक शिबीर घेण्यात येते.
गीता हे कर्मबंधनातील सर्व दोषांवर रामबाण उपाय आहे. म्हणून याचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्याने मनुष्यास परमशांती प्राप्त होते. तरी हा अभ्यासक्रम आपण स्वतः करून आपल्या हितचिंतकांस जरूर सांगावा.
जिज्ञासूंनी जरूर संपर्क करावा.--स्वामी मोहनदास, (भ्रमणध्वनी - ९४२०८५९६१२)
गीता रहस्याचा प्रकरणानुसार एक वर्षाचा अभ्यासक्रम
प्रकरण पहिले
१.
किती गीतेंचा उल्लेख केलेला आहे ?
२.
गीतेचे परिक्षण कसे केलेले आहे ?
३. गीतेचे
तात्पर्य कोणी व कसे वर्णित केले आहे ?
४.
ग्रंथाचे तात्पर्य काढण्यासाठी कशाचा विचार केला पाहिजे ?
५. गीतेचे रहस्य
कर्मपर च आहे का ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण दुसरे
१. नेहमी सत्य
बोलले पाहिजेच का
?
२. हिंसा कधी
करावी ?
३. अस्तेय म्हणजे
काय ?
४. कार्याकार्यव्यवस्थिती
म्हणजे काय ?
५. मनु हिंसे
बद्दल काय सांगतात
?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण
तिसरे
१. कर्म या
शब्दाची व्यापकता किती आहे ?
२. योग म्हणजे काय ?
३. धर्म म्हणजे काय ?
४. कर्मयोगशास्त्राचा
आधिकारी कोण ?
५. आधिभौतिक,
आधिदैविक व आध्यात्मिक विवेचन कसे केले आहे ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण
चौथे
१. आधिभौतिक
पंथामध्ये श्रेष्ठ पंथ कोणता ?
२. प्रेय आणि
श्रेय यामध्ये श्रेष्ठ कोणते ?
३. संख्येवरून
नितीचा निर्णय होतो की नाही ?
४. आधिभौतिक
सुखवाद म्हणजे काय ?
५. याज्ञवल्क्यांचा
अखेरचा आदेश कोणता ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण
पाचवे
१. मनुष्याचा परम
पुरूषार्थ कोणता ?
२. गीतेचा
सिध्दांत कोणता ?
३. सुख-दु:खाच्या
संबंधी गीतेचे सांगणे कोणते आहे ?
४. गीताधर्माची
चतु:सुत्री कोणती आहे ?
५. गीता कोणत्या
पंथाची आहे ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण सहावे
१. क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार कसा केलेला आहे ?
२. कर्मा बद्दल गीतेचा
सिध्दांत कोणता ?
३. चैतन्य म्हणजे
काय ?
४. इंद्रियांपेक्षा
मन श्रेष्ठ कसे ?
५. मनोव्यापाराचे
तीन विभाग कोणते ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण
सातवे
१. गीतेतील
सांख्य-तत्वज्ञानामुळे कोणता गैरसमज होतो
?
२. न्यायशास्त्रामध्ये
कोणते विषय आहेत ?
३. सांख्य शास्त्रामध्ये
कोणते विषय आहेत ?
४. सत्कार्यवाद
म्हणजे काय ?
५. पदार्थाच्या
तीन अवस्था कोणत्या ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण आठवे
१. पृथकत्व
म्हण्जे काय ?
२. ज्ञानेंद्रियांच्या
तन्मात्रा कोणत्या ?
३. अष्टधा
प्रकृती कोणती ?
४. मनुष्ययोनि, पशुयोनि,
वृक्षयोनि हा भेद
कशाचा परिणाम आहे ?
५. कालगणना कशी
केली आहे ?
६. श्रीहरिचा साक्षात्कार कसा होतो ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण नववे
१. प्रकृती व
पुरूष हे सांख्यांचे द्वैत गीतेस मान्य आहे का
?
२. जीव्, जगत व
परब्रह्म कोणास म्हणतात ?
३. विद्या कशास म्हणतात ?
४. मोक्ष म्हणजे
काय ?
५. सत्य-असत्यातील
कोणती परिभाषा गीतेने स्विकारली आहे
?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण दहावे
१. कर्मविपाक
कशास म्हणतात ?
२. प्रवृत्ती
स्वातंत्र्य म्हणजे काय ?
३. कर्मबंधनातून
सुटका कशी करता येईल ?
४. कर्म क्षय
म्हणजे काय ?
५. देवयान मार्ग म्हणजे काय ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण
अकरावे
१.
कर्मयोगाची श्रेष्ठता काय आहे ?
२.
दु:खाचे खरे मूळ कोणते
?
३. लोकसंग्रहाचा
अर्थ काय ?
४. संन्यास मार्ग
कसा आहे ?
५. निष्ठा या
शब्दाचा अर्थ गीतेमध्ये कसा आहे ?
---------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण
बारावे
१. स्थितप्रज्ञावस्था
म्हणजे काय ?
२. आत्मौपम्य
म्हणजे काय ?
३. मत्कर्मकृत म्हणजे
काय ?
४. ज्ञानी
पुरूषांचा खरा धर्म कोणता ?
५.
गीता रहस्याचे वैशिष्ट्य कोणते ?
---------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment