ग्रामिण विकास......माझी कल्पना
ग्रामिण विकास म्हणजे
आपल्या राष्ट्राचा विकास आहे.
कारण आपला भारत
देश कृषीप्रधान आहे. आज
सुध्दा आपल्या देशातील
सूमारे ६० ऽ माणसाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष
निगडीत आहेत. उदा.
कापड गिरण्यांना कच्चा माल
कापूस लागतो. औषधी
उत्पादकांना कच्चा माल
वनस्पती लागतात. कागद निर्मीतीसाठी,
तसेच रबर व प्लास्टिक निर्मीतीसाठी कच्चा माल
झाडांचा रस लागतो.
इत्यादी व्यवसाय कृषी उत्पादनावर
अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. तर
उरलेले सूमारे
४० ऽ माणसे ज्यांचा
उद्योगाचा कृषी उत्पादनाशी
काहिही संबंध नसतो
त्यांना सुध्दा अन्नासाठी
कृषी उत्पादनावरच अवलंबून रहावे लागते.
अशा रितीने आपल्या
देशातील सर्वांना कृषी उत्पादनावर
या ना त्या
कारणाने अवलंबून रहावे लागते
आहे. हे कृषी
उत्पादन ग्रामिण विभागामध्येच तयार होते.
म्हणून ग्रामिण विकास हा
सर्वस्वी कृषी उत्पादनाच्या
वृध्दीवरच अवलंबून आहे. अशा
रितीने ग्रामिण विकासाचे महत्व समजाउन
घेऊन प्रत्येक मनुष्याने कृषी उत्पादनाच्या
वृध्दीसाठी स्वतः प्रयत्न
केले पाहिजेत. सरकारवर, व्यापायांवर, बँकांवर, सहकारी संस्थांवर,
पाणी पुरवठ्यासाठी सरकारने बांधलेल्या धरणांवर अशा कोणावर
ही अवलंबून न राहता
परंतू कृषीतज्ञांचे व बुजूर्ग,
अनुभवी शेतकयांचे योग्य मार्गदर्शन
घेऊन शेतकयाने स्वतः कृषी
उत्पादनाच्या वृध्दीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कारण आज
शेतकयांच्या आत्महत्येचा प्रश्न दिवसे-दिवस
वाढत चाललेला आहे. त्याचे
कारण आजचा शेतकरी
विनाकारण सरकारवर, व्यापायांवर, बँकांवर, सहकारी संस्थांवर
अवलंबून राहून कमालीचा
परावलंबी झालेला आहे.
मोफत वीज, बिनव्याजी
कर्ज, कर्ज माफी,
कर माफी, कृषी
उत्पादनांचे दर ठरविण्यामध्ये
सरकारचा हस्तक्षेप, दुष्काळग्रस्तांना सरकारी मदत
... इत्यादी सरकारी पोकळ
आश्वासनामुळे हा शेतकरी
लुळा पांगळा होत
गेला. जो दूसयावर
विसंबला त्याचा कार्यभाग
संपला ही म्हण
तो विसरून गेला.
त्याने त्याचा आत्मविश्वास
गमावला. तो त्याची
जबाबदारी, कर्तव्ये पुर्णपणे विसरून गेला.
शेतामध्ये पीक आले
तरी त्याचा दर
सरकारच ठरविणार आणि पीक
आले नाही तर
सरकारच नुकसान भरपाई
देणार यामुळे त्याची
कार्यक्षमता संपुष्टात आली. त्यामुळे
साहजिकच कृषी उत्पादन
घटू लागले. कृषीव्यवसायामध्ये
काही उत्पन्न मिळत नाही
असा गैरसमज निर्माण
होऊ लागला. कर्जाचा
डोंगर डोक्यावर, उत्पादनामध्ये घट आणि सरकारकडून पोकळ आश्वासनाची
पुर्तता होत नाही हे पाहून शेतकयांच्या
आत्महत्या सुरू झाल्या.
याचा सखोल विचार
प्रत्येक मनुष्याने केला पाहिजे.
सरकारने काही तरी
केले पाहिजे या
खुळचट गैरसमजावर कदापीही अवलंबून राहू नये.
कारण सरकार काही
करेल या भ्रामक
आशेनेच शेतकरी आत्महत्या
करू लागले आहेत
हे प्रत्यक्ष अनुभवास येत असून
अजून ही त्याच
मार्गाने जाऊन आपलेच
अधःपतन करून घेणे
आता तरी थांबविण्यातच
शहाणपणा आहे. म्हणून
ग्रामिण विकासाचा सखोल अभ्यास
करण्यासाठी आजच्या ग्रामिण विकासातील प्रमुख अडथळे तसेच त्याचे मूळ
कारण कोठे आहे
याचा विचार प्रथम
केला पाहिजे. जसे वैद्य
रोगाचे मूळ शोधून
औषध देतो. त्याच
प्रमाणे ग्रामिण विकासाचा सखोल विचार
करून त्यावर उपाय
योजना केली पाहिजे.
सुमारे तिनशे
वर्षांपुर्वी आपल्या भारत
देशामध्ये सोन्याचा धूर निघत
होता इतकी सुबत्ता,
समृध्दी आपल्या देशामध्ये
नांदत होती. सर्वजण
गुण्या गोविंदाने नांदत होते.
काबाडकष्ट करीत होते.
दुधदुभते, पौष्टीक अन्न खाऊन
धष्टपुष्ट होऊन सुखी
समाधानी होते. हा
इतिहास आहे. ही
वस्तुस्थिती आहे. पुराणातील
वर्णन नक्की नाही.
म्हणूनच परकीयांनी व इंग्रजांनी
येथे आक्रमणे केली. त्यांच्या
देशातील उत्पादनाला समृध्द बाजारपेठ
मिळविण्यासाठी आणि या देशातील सुवर्ण-संपत्ती लुटण्यासाठी आपल्या देशामध्ये
राज्य सुरू केले.
ज्या संस्कृतीने आपल्या देशाचे
वैभव फुललेले होते ती
संस्कृती उध्वस्त करण्याचे कूट-कारस्थान सुरू केले.
जे आम्ही स्वावलंबी
होतो. स्वाभीमानी होतो, त्यावर
आघात केला. आणि
आम्हास लाचार बनविले.
गुलाम केले. हे
काहीच नाही. १९४७
साली भारत देश
जरी स्वतंत्र झालेला असला
तरी विचाराने आज सुध्दा
तो पारतंत्रातच आहे. तीच
गुलामी तीच लाचारी
आज सुध्दा गर्वाने
चालू आहे. फरक
एव्हढाच आहे कि,
१९४७ च्या आधी
परकीय सत्ताधीश जनतेचे शोषण
करीत होते तर
आता स्वकीयच स्वकीयांचे रक्त पीत
आहेत आणि त्याचे
त्यांना भूषण वाटते
ही शोकांतिका आहे. हा
विस्तार इतक्या कडव्या
शब्दामध्ये करण्याचे कारण हेच
आहे कि ग्रामिण
विकासातील खरे अडथळे
समजून उमजून घेणे
अत्यंत महत्त्वाचे आहे.
म्हणून ग्रामिण विकासासाठी प्रथमतः शेतकयाचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. तो यात्रा-मिरवणूकीने
कदापीही होणार नाही
हे पक्के जाणून
धेतले पाहिजे. येथे ग्रामिण
विकासाच्या माझ्या कल्पना
किंवा योजना सांगण्या
पेक्षा ग्रामिण विकासाचा सखोल विचार
स्पष्ट करण्याचा प्रयत्न आवर्जून केलेला आहे.
कारण कल्पने मागचा
दृष्टीकोन लक्षात आल्यावर
त्यानुसार एकच काय
हजार योजना कल्पना
सांगता येतील. दुसरा
मुद्दा हा कि शेतकयास स्वावलंबी बनविले पाहिजे.
त्यामुळे त्याला त्याच्या
जबाबदारीची जाणिव होईल.
नुकसानीची झळ आपल्यालाच
सहन करावी लागणार
या जबाबदारीमुळे त्याची कार्यक्षमता
वाढेल. साहजिकच त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये
वृध्दी होईल. आणि
ग्रामिण विकास आपोआप
होईल. त्यासाठी सरकारी धोरणे
जाहीर करावी लागत
नसतात. तिसरी महत्त्वाची
गोष्ट ही कि, कृषी व्यवसायातील
गैरसमजूती नष्ट केल्या
पाहिजेत. उदा. शेतीसाठी
खूप पाणी लागते.
महागड्या रासायनिक खतांच्या वापराने उत्पादने वाढतात. मोठ्या बाजारपेठांमध्ये
जास्त भाव मिळतो.
आंदोलने केल्यावर करमाफी, कर्जमाफी, पाणी-पुरवठ्यासाठी मोठमोठ्या धरण योजना,
दुष्काळग्रस्तांना आर्थीक सहाय्य,
मोफत वीज, सरकारी
हस्तक्षेपाने चढता भाव
इत्यादी सवलती मिळविता
येतात. अशा प्रमुख
मुद्दयांचा निरपेक्ष दृष्टिकोनातून सखोल विचार
केला तर ग्रामिण विकास आपल्या
देशामध्ये सहज शक्य
आहे कारण आपण
याच विचारांचा वारसा घेऊन
सुमारे तिनशे वर्षांपुर्वी
आपल्या भारत देशामध्ये
सुबत्ता-समृध्दी होती हे
विसरून चालणार नाही.
ही माझी
कल्पना ग्रामिण विकासाची. आजचा आणि
उद्याचा इतकाच संकुचित
विचार न करता मागच्या व पुढच्या
शंभर वर्षांचा विचार करून
मांडलेली आहे. म्हणून
त्यास परिपक्वता आलेली आहे.
याचा सर्वांनी विचार जरूर
करावा.
No comments:
Post a Comment