Monday, 17 July 2017

कौटलीय अर्थशास्त्र




 कौटलीय  अर्थशास्त्र
 प्राचीन  भारताच्या  राजकीय  परंपरेत  कौटिल्याचे  विशिष्ट   महत्वपुर्ण  स्थान  आहे.  इसवी  सन  पुर्व  चौथ्या  शतकामध्ये  विष्णुगुप्त  नावाचा  श्रेष्ठ  ज्ञानवत्ता,  निःस्पृह  आचार्य,  आणि  महामुत्सद्यी  होऊन  गेला.  हा  विष्णुगुप्त  बुंदेलखंडातील  चणक  नावाच्या  गावा  वरून  चाणक्य,  तसेच  गोत्रनाम  कौटिल्य  अशा  तीन  नावाने  प्रसिध्द  आहे.  पंचतंत्राच्या  दुसया  श्लोकामध्ये  राजकारणी  धुरंधरांमध्ये  चाणक्याला  अभिवादन  केले  आहे.  मत्स्यपुराणामध्ये  याचा  राजर्षी  म्हणून  गौरव  केला  आहे.  हेमचंद्रकृत  आर्य  मंजूश्री  मूलकल्प  यामध्ये  याचा  बिंदुसाराचा  मुत्सद्यी  राजगुरू  म्हणून  गौरव  केला  आहे.  यानेच  मगध  देशाचा  सम्राट  धनानंद  विलासी  राजाला  आव्हान  देऊन  आपल्या  तेजस्वी  बुध्दिने  त्या  विलासी  राजाचे  संपुर्ण  साम्राज्य  उद्ध्वस्त  केले.  आणि  ते  साम्राज्य  चंद्रगुप्त  मौर्य  यांस  आपल्या  शास्त्राच्या  आधारे  मिळवून  दिले.  तो  चंद्रगुप्त  मौर्याचा  पंतप्रधान  होता.  याच्या  निःस्पृह  बुद्धिमत्तेपुढे  जगविख्यात  ग्रीक  तत्त्ववेत्ता  सॉक्रेटिस  नतमस्तक  झाला  होता.  अशा  अलौकीक  व्यक्तीमत्वाचा  कौटलीय  अर्थशास्त्र  नावाचा  ग्रंथ  प्रसिध्द  आहे.  हा  ग्रंथ  इसवी  सन  १९०९  मध्ये  हस्तलिखित  प्रतीचा  सर्वांगीण  अभ्यास  करून  डॉ.  श्यामशास्त्री  यांनी  प्रसिध्द  केला.  या  ग्रंथाचे  महत्व  जाणून  शामशास्त्री,  गणपतिशास्त्री,  डॉ.  नरेंद्रनाथ  लॉ,  प्रथमनाथ  बॅनर्जी,  डॉ.जयस्वाल,  प्रा.बंद्योपाध्याय,  प्रा.  विद्यालंकार  या  भारतीय  विद्वानांनी  तसेच  हर्मान  याकोबी,  हिलेब्रांट,  किथ  या  पाश्चात्य  विचारवंतांनी  या  ग्रंथाची  भाषांतरे   विस्तृत  प्रबंध  लिहीले  आहेत.  प्राचीन  भारतीय  इतिहास   संस्कृती  जाणण्यासाठी  हा  मुलगामी  ग्रंथ  असून  अतिशय  उपयुक्त  आहे.  यामध्ये  अर्थशास्त्राच्या  मूलभुत  अर्थाचा  विचार  केला  आहे.  या  ग्रंथामध्ये  अर्थ  म्हणजे  मनुष्यजीवन   अर्थ  म्हणजे  मनुष्य  रहातो  ती  भूमी  असे  अर्थाचे  दोन  अर्थ  सांगून  मनुष्यवती  भूमी  मिळविणे   तीचे  पालन  करणे  याचा  उपाय  म्हणजे  अर्थशास्त्र  अशी  व्याख्या  केली  आहे.  हे  अर्थशास्त्र  सर्वस्वी  राजकारणावर  अवलंबून  असल्यामुळे  या  ग्रंथामध्ये  राजधर्माचे  विवेचन  केले  आहे.  हा  विचार  लक्षात  घेण्यासारखा  आहे.  या  ग्रंथामध्ये  एकूण  पंधरा  अधिकरणे  म्हणजे  विभाग  असून  त्यामध्ये  पहिल्या  पाच  विभागामध्ये  प्रामुख्याने  राज्यशासन,  तर  पुढच्या  सहाव्या  पासून  तेराव्या  अशा  आठ  विभागामध्ये  प्रामुख्याने  राज्यसत्ता,  आणि  चौदाव्या  विभागामध्ये  प्रामुख्याने  अधार्मिकांच्या  विनाशाचे  गुप्त  उपाय  तर  शेवटच्या  पंधराव्या  विभागामध्ये  प्रामुख्याने  शास्त्र  रचना  पध्दती  या  विषयांवर  सविस्तर  चर्चा  केली  आहे.  या  पंधरा  अधिकरणांची  नावे
 (१)  विनयाधिकारिक  (२)  अध्यक्षप्रचार  (३)  धर्मस्थीयम्  (४)  कंटकशोधनम्  (५)  योगवृत्तम्  (६)  मंडलयोनिः  (७)  षाड्गुण्यम्  (८)  व्यसनाधिकारीक  (९)  अभियास्यत्  कर्म  (१०)  सांग्रामिक  (११)  संघवृतम्  (१२)  आबलीयसम्   (१३)  दुर्ग  लंभोपायः  (१४)  औपनिषदिकम्  (१५)  तंत्रयुक्तिः  अशी  आहेत.
 राज्याची  अंतर्गत  शासकीय  व्यवस्था  आणि  त्यांचे  परराष्ट्रसंबंध  या  विषयी  सर्व  दृष्टिकोनांचा  आढावा  घेणारे  खंडनमंडनात्मक  सविस्तर  विवेचन  केले  आहे.  प्रजेला  संतुष्ट  ठेवून   धाकात  ही  ठेवून  राज्यकारभार  कसा  करावा   त्या  करिता  उपयुक्त  सात  अंगाचे  रक्षण  कसे  करावे  याचे  व्यावहारिक  भूमिकेतून  त्या  काळाला  योग्य  असे  मार्गदर्शन  केले  आहे.  परराष्ट्र  संबंधाचा  ऊहापोहसुध्दा  स्वराज्याचे  स्थैर्य   वृध्दी  हे  उद्दिष्ट  ठेवून  केला  आहे.  या  ग्रंथाचे  मुख्य  वैशिष्ट्य  हे  की  कौटिल्याने  या  ग्रंथातील  सर्व  उपायांचा  प्रत्यक्ष  अवलंब  करून  नंद  सम्राटाचे  साम्राज्य  उध्वस्त  करून  ते  साम्राज्य  चंद्रगुप्ताला  मिळवून  दाखविले  आहे.  म्हणून  हा  ग्रंथ  फक्त  पुस्तकी  ज्ञान  नाही.  राजकारणविषयक   राज्यकारभाराविषयक  प्रतिभेचे  उत्तम  स्मारक  असा  हा  ग्रंथ  असून  महान  सभ्यतासंपन्न  समाजाच्या  व्यावहारीक  संघटनाचा  उत्तम  आरसा  म्हणून  हा  ग्रंथ  महत्वाचा  आहे.  अशा  रितीने  प्राचीन  भारताच्या  राजकीय  परंपरेत  या  ग्रंथाचे  विशिष्ट   महत्वपुर्ण  स्थान  आहे.
 या  सर्व  विचारांचा  अभ्यास  केल्यानंतर  असे  वाटते  आज  या  अर्थशास्त्राचा  खरा  उपयोग  करून  घ्यायला  पाहिजे  आहे.  एकेकाळी  भारताने  या  अर्थशास्त्राच्या  आधारे  पाश्चात्य  राज्यांवर  विजय  मिळविला,  आणि  त्यानंतर  त्या  पाश्चात्यंानी  या  अर्थशास्त्राचा  चिकीत्सक  पध्दतीने  अभ्यास  करून  त्यातील  तत्त्वज्ञानाचा  त्याच्या  संस्कृतीस  अनुकूल  समन्वय  साधून  त्यांचा  विकास,  प्रगती  करून  घेतली  आहे.  आणि  आता  भारत  त्या  पाश्चात्यंाच्या  राज्यशास्त्राचे  अनुकरण  करीत  आहे,  जे  त्यांच्या  संस्कृतीशी  निगडीत  आहे.
 आज  आंतरराष्ट्रीय  गुणवत्ता  प्रमाणपत्राचे  (क्ष्च्ग्र्)  स्तोम  जे  पाश्चात्यंाच्या  कडून  आले  आहे,  तेच  सुमारे  २४००  वर्षांपूर्वी  आपल्या  भारतामध्ये  कौटिल्याने  या  ग्रंथाद्वारे  करून  दाखविलेले  आहे.  क्ष्च्ग्र्  म्हणजे  थोडक्यात  काय,  नक्की  केलेल्या  धोरणांनूसार  त्यांची  अंमलबजावणी  होत  आहे  हे  सिध्द  करणे.














 कौटलीय  अर्थशास्त्र-प्राचीन  भारताच्या  राजकीय  परंपरेत  कौटिल्याचे  विशिष्ट   महत्वपुर्ण  स्थान  आहे.  इसवी  सन  पुर्व  चौथ्या  शतकामध्ये  विष्णुगुप्त  नावाचा  श्रेष्ठ  ज्ञानवत्ता,  निःस्पृह  आचार्य,  आणि  महामुत्सद्यी  होऊन  गेला.  हा  विष्णुगुप्त  बुंदेलखंडातील  चणक  नावाच्या  गावा  वरून  चाणक्य,  तसेच  गोत्रनाम  कौटिल्य  अशा  तीन  नावाने  प्रसिध्द  आहे.  पंचतंत्राच्या  दुसया  श्लोकामध्ये  राजकारणी  धुरंधरांमध्ये  चाणक्याला  अभिवादन  केले  आहे.  विष्णुपुराणामध्ये  याचा  उल्लेख  आहे.  मत्स्यपुराणामध्ये  याचा  राजर्षी  म्हणून  गौरव  केला  आहे.  हेमचंद्रकृत  आर्य  मंजूश्री  मूलकल्प  यामध्ये  याचा  बिंदुसाराचा  मुत्सद्यी  राजगुरू  म्हणून  गौरव  केला  आहे.  याने  सिकंदर  सारख्या  बलाढ्य  परदेशी  आक्रमणापासून  भारताचे  रक्षण  करण्यासाठी  लहान-सहान  राज्यांना  एकत्र  करून  विशाल  साम्राज्याचे  स्वरूप  दिले.  तसेच  यानेच  मगध  देशाचा  सम्राट  धनानंद  विलासी  राजाला  आव्हान  देऊन  आपल्या  तेजस्वी  बुध्दिने  त्या  विलासी  राजाचे  संपुर्ण  साम्राज्य  उद्ध्वस्त  केले.  आणि  ते  साम्राज्य  चंद्रगुप्त  मौर्य  यांस  आपल्या  शास्त्राच्या  आधारे  मिळवून  दिले.  तो  चंद्रगुप्त  मौर्याचा  पंतप्रधान  होता.  याच्या  निःस्पृह  बुद्धिमत्तेपुढे  जगविख्यात  ग्रीक  तत्त्ववेत्ता  सॉक्रेटिस  नतमस्तक  झाला  होता.  अशा  अलौकीक  व्यक्तीमत्वाचा  कौटलीय  अर्थशास्त्र  नावाचा  ग्रंथ  प्रसिध्द  आहे.  यामध्ये  अर्थशास्त्राच्या  मूलभुत  अर्थाचा  विचार  केला  आहे.  अर्थ  म्हणजे  मनुष्यांच्या  उपजीवीकेचे  साधन,  म्हणजेच  मनुष्यांची  वस्ती  असलेला  भूप्रदेश,  त्याचे  पालन  करण्याचे  उपाय  सांगणारे  शास्त्र  ते  अर्थशास्त्र  असा  अर्थाचा  विचार  यामध्ये  केला  आहे.  समाजाचे  हे  अर्थशास्त्र  सर्वस्वी  राजकारणावर  अवलंबून  असल्यामुळे  या  ग्रंथामध्ये  राजधर्माचे  विवेचन  केले  आहे.  हा  विचार  लक्षात  घेण्यासारखा  आहे.  य़ा  ग्रंथाची  भाषा  संस्कृत   शैली  प्राचीन  सूत्रांसारखी  गद्यपद्य  मिश्रीत   संक्षिप्तार्थक  असून  साधी   सुगम  आहे.  तसेच  स्वल्पाक्षरी   आर्ष  नसून  सुबोध   स्पष्ट  आहे.  या  ग्रंथामध्ये  विषयांचा  व्यवस्थित  अनुक्रम   एकसूत्रीपणा  दिसून  येतो.  भाषा  पाणिनीच्या  व्याकरणाला  अनुसरून  आहे.  तर  संपुर्ण  ग्रंथामध्ये  विचारपध्दती  वास्तववादी  आहे.  म्हैसुरच्या  ग्रंथसंग्रहालयाचे  व्यवस्थापक  डॉ.  श्यामशास्त्री  यांना  या  ग्रंथाची  हस्तलिखित  प्रत  इसवी  सन  १९०४  च्या  सुमारास  प्रथम  उपलब्ध  झाली.  नंतर  त्यांनी  त्याचा  सर्वांगीण  अभ्यास  करून  इसवी  सन  १९०९  मध्ये  हा  ग्रंथ  प्रसिध्द  केला.  या  ग्रंथावर  दोन  टीकात्मक  भाष्ये  लिहीली  गेली.  एक  भट्टस्वामींचे  प्रतिपद  पंचिका  हे  मुळ  ग्रंथाच्या  फक्त  दुसया  अधिकरणावर   दुसरे  माधवयज्वांचे  नयचंद्रिका  हे  मुळ  ग्रंथाच्या  फक्त  सातव्या  अधिकरणापासून  बाराव्या  अधिकरणापर्यंत  एकूण  पाच  अधिकरणावर  अशी  दोन  भाष्ये  प्रकाशित  झाली  आहे.  तसेच  या  ग्रंथाचे  महत्व  जाणून  शामशास्त्री,  गणपतिशास्त्री,  डॉ.  नरेंद्रनाथ  लॉ,  प्रथमनाथ  बॅनर्जी,  डॉ.जयस्वाल,  प्रा.बंद्योपाध्याय,  प्रा.  विद्यालंकार  या  भारतीय  विद्वानांनी  तसेच  हर्मान  याकोबी,  हिलेब्रांट,  किथ  या  पाश्चात्य  विचारवंतांनी  या  ग्रंथाची  भाषांतरे   विस्तृत  प्रबंध  लिहीले  आहेत.  डॉ.  याली  म्हणतो,  कौटिल्याचे  औषधि  विज्ञान  सुश्रुता  पेक्षा  ही  आधिक  विस्तृत  आहे.  त्याने  पारा  मिश्रीत  सुवर्णाचा   सुवर्ण  मिश्रित  रसायनाचा  उल्लेख  केला  आहे.  दहाव्या  शतकापर्यंत  काश्मीरामध्ये  या  ग्रंथाचे  अध्ययन  चालू  होते  असे  सोमदेवसूरीच्या  नीतीवाक्यामृत  यामध्ये  सांगितले  आहे.  प्राचीन  भारतीय  इतिहास   संस्कृती  जाणण्यासाठी  हा  मुलगामी  ग्रंथ  असून  अतिशय  उपयुक्त  आहे.  या  ग्रंथामध्ये  एकूण  पंधरा  अधिकरणे  म्हणजे  विभाग  असून  त्यामध्ये  पहिल्या  विनयाधिकारिक  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  राजा,  अमात्य,  मंत्री,  पुरोहित,  राजदूत  यांची  लक्षणे,  कर्तव्ये,  तसेच  त्यांच्या  नियुक्तीचे  विभिन्न  उपाय,  त्यांची  वेळोवेळी  घ्यावयाची  परिक्षा,  राज्यकारभारा  विषयीचे  गुप्तविचार,  गुप्तहेरांची  कर्तव्ये,  राजकुमारांचे  रक्षण,  कर्तव्ये,  त्यांच्या  अंतपुराची  व्यवस्था,  आत्मरक्षण,  विषप्रयोगापासून  सावधगीरी  याचा  सविस्तरपणे  विचार  केला  आहे.  राजकुमारांचे  संस्कार  धर्मशास्त्राप्रमाणे  होणे  अत्यंत  आवश्यक  असते  कारण  राजपुत्र  हे  खेकड्याप्रमाणे  स्वपितृभक्षक  असतात.  विनयाधिकाराविषयीचे  त्याचे  विचार  असे  आहेत  --  राजाच्या  विनयावर  आधारलेले  दंडधारण  प्रजेला  योगक्षेम  साध्य  करून  देते.  बाह्यक्रियेने  योग्य  मनुष्याच्याच  अंगी  विनय  येतो,  इतरांच्या  नाही.  विद्याग्रहणाविषयीचे  त्याचे  विचार  असे  आहेत  --  श्रवण  करण्याची  प्रबल  इच्छा,  श्रवण  करणे,  ग्रहण  करणे,  धारण  करणे,  समजून  घेणे,  सारासार  विचाराने  ग्राह्य-अग्राह्य  ठरविणे  आणि  तत्त्वांसंबंधी  अभिनिवेश  या  गुणांना  युक्त  अशी  ज्याची  प्रज्ञा  आहे  त्यालाच  विद्या  प्राप्त  होते,  इतरांना  नाही.  दुसया  अध्यक्षप्रचार  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  शासनसंस्थेतील  प्रमुख  म्हणजेच  अध्यक्ष,  त्याची  लक्षणे,  कर्तव्ये,  त्याचे  विभाग,  त्याच्या  संरक्षित  निवासासाठी  दुर्ग,  गडकोट  निर्मिती,  सेनापतींची  कार्ये,  तसेच  शासकीय  आधिकारी,  त्यांची  कार्ये,  त्यांच्या  वर्तणूकी  विषयी,  त्यांच्या  पैशाच्या  अफरातफरी  विषयी  शिक्षा,  गुप्तहेरांची  योजना,  ग्राम-नगर  रचना,  जमिनीची  वाटणी,  कर  वसुली,  उद्योगधंद्याच्या  योजना,  खाण,  शिकार,  सुतकाम,  कृषी  इत्यादी  व्यवसाय,  पाणीपुरवठा,  बाजार,  अनाथ,  रोगी,  वृध्द,  स्त्रीया  यांच्या  आवश्यक  सोयींसाठी  तसेच  मदतीसाठी  सार्वजनीक  संस्था,  वैश्यावृत्ती  नियंत्रण,  वनरक्षण,  वातावरणशास्त्र  इत्यादी  विषयांवर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  तिसया  धर्मस्थीयम्  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  न्यायसंस्थे  विषयी,  विवाहविषयी,  नियमांचा  समावेश  आहे.  तसेच  गृहवास्तु  विषयी,  राज्यातील  श्रम   भांडवल  यांचा  विनियोग,  नागरिकांचे  हक्क,  कायदेशीर  आधिकार,  तसेच  बेवारशी  धनाची  व्यवस्था  इत्यादी  विषयांवर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  वर्णव्यवस्था   वर्णाश्रमांबद्दल  त्याचे  विचार  असे  आहेत  --  सामवेद,  ऋग्वेद,  यजुर्वेद  या  त्रयीमध्ये  निरूपलेला  धर्म,  चार  वर्ण   चार  आश्रम  यांचे  आपापले  विशिष्ट  धर्म  निश्चित  करतो  म्हणून  ते  समाज  धारणेस  उपकारक  आहेत.  अध्ययन,  अध्यापन,  यज्ञ  करणे,  यज्ञ  करवून  घेणे,  दान  करणे   घेणे,  हा  ब्राह्मणांचा  स्वधर्म  आहे.  अध्ययन,  यज्ञ  करणे,  शस्त्रद्वारा  उपजिवीका  करणे,  दान  करणे,  प्राणिमात्रांचे  रक्षण  हा  श्रत्रियांचा  स्वधर्म  आहे.  अध्ययन,  यज्ञ  करणे,  कृषीकर्म  पशुपालन  हा  वैश्यांचा  स्वधर्म  आहे.  ब्राह्मणांची,  श्रत्रियांची   वैश्यांची  सेवा,  कारागीराचे  काम  हा  शुद्रांचा  स्वधर्म  आहे.  गुरूगृही  निवास  करून  वेदांचे  अध्ययन,  होमाग्नींची  परिचर्या,  भिक्षाव्रत  हा  ब्रह्मचर्याश्रमाचा  स्वधर्म  आहे.  समान  वर्णाच्या  परंतू  सगोत्र  नसलेल्यांशी  विवाह  करून  स्वधर्मास  अनुसरून  उपजिवीकेचा  व्यवसाय  अतिथीपूजन  हा  गृहस्थाश्रमाचा  स्वधर्म  आहे.  ब्रह्मचर्याचे  पालन,  भूमीवर  शयन,  जटाधारण,  वनामध्ये  निवास  हा  वानप्रस्थांचा  स्वधर्म  आहे.  इंद्रियांवर  संपुर्ण  ताबा,  आसक्तीचा  त्याग,  भिक्षाव्रत,  वनामध्ये  सतत  भ्रमण,  अंतर्बाह्य  शुचिता  हा  संन्यासांचा  स्वधर्म,  निश्चित  रूपाने  सांगितला  आहे.  सर्व  वर्ण  आणि  आश्रम  यांचा  अहिंसा,  सत्य,  शुचिता,  अनिष्ठरता   क्षमा  यांचे  पालन  हा  समान  धर्म  होय.  चौथ्या  कंटकशोधनम्  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  कारागिरांचे   व्यापायांचे  समाज  कंटकांकडून  होणाया  अत्याचारांपासून  पुर्ण  संरक्षणासाठी  करावयाचे  उपाय,  तसेच  प्रजेचे   व्यापायांच्या  व्यवसायातील  लबाड्यांपासून  रक्षण,  त्याविषयी  योग्य  शिक्षा   त्यावर  नियंत्रण,  अधूनमधून  होणाया  दैवी  आपत्तीवर  करावयाचे  उपाय,  तसेच  समाज  कंटकांचे  उच्चाटन  करण्यासाठी  त्यांच्यावर  कठोर  शिक्षा  करण्यासंबंधी  चर्चा  करण्यात  आली  आहे.  पाचव्या  योगवृत्तम्  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  राजाविषयी  सेवकांची  कर्तव्ये,  विश्वासघातकी  सेवकांचा  प्रतिकार  कसा  करावा,  त्याविषयी  नियमावली,  तसेच  त्यांच्या  शिक्षेविषयी,  राज्याचा  कोशसंग्रह  कीती  असावा,  तो  प्रजेच्या  कल्याणासाठी  आहे,  तो  कसा  मिळवावा,  त्याचा  उपयोग  कसा   कोठे  करावा,  तसेच  संकटकाळी  राज्याचा  कोषभांडार  रिकामा  झाल्यास  खजिना  भरण्याचे  कावेबाज  उपाय,  व्यापायांकडून,  श्रीमंतांकडून,  पाखंडी  लोकांकडून  निधी  मिळविण्या  विषयी,  इत्यादी  विषयांवर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  सहाव्या  मंडलयोनिः   या  विभागामध्ये  प्रामुख्याने  राज्याची  आर्थिक  उन्नती   संरक्षण,  शत्रुराष्ट्रांना  वंश  करून  घेण्याचे  उपाय,  प्रकृतीचे  गुण,  संपुर्ण  राज्याचा  उद्योग  व्यवसाय,  तसेच  संपुर्ण  राज्यामध्ये  सुखशांतीचे  उपाय  इत्यादी  विषयांवर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  उद्योग,  व्यवसायसंबंधी  त्याचे  विचार  असे  आहेत  --  शेती,  पशुपालन,  आणि  व्यापार  या  व्यवसायांना  वार्ता  म्हणतात.  ती  धान्य,  पशू,  धन   जंगलातील  उत्पन्न  आणि  कामगार  यांचा  लाभकरून  देते  म्हणून  ती  राज्याला  उपकारक  आहे.  तीच्यामुळे  राज्याचा  कोशसंग्रह  अवलंबून  असतो  म्हणून  याकडे  बारीक  लक्ष  देण्यात  यावे.  राज्यकारभाराचे  सार  पुढिल  प्रमाणे  सांगता  येईल.  राजा,  मंत्री,  देश,  दुर्ग,  कोश,  सैन्य,  सामंत  हे  राज्यसंस्थेचे  सात  घटक  आहेत.  त्यांना  प्रकृती  म्हणतात.  आणि  या  सर्वांच्या  समुदायाला  प्रकृतीमंडल  म्हणतात.  राजा  उच्चकुलीन,  प्रयत्नवादी,  स्वतंत्र,  प्रभावी  व्यक्तीमत्वाचा,  सत्यवादी,  महत्वाकांक्षी,  सदाचारी,  स्थिरबुध्दिचा,  शिस्तप्रिय  असावा.  नाहीतर  त्यास  लोकप्रियता  लाभत  नाही.  त्याची  दिनचर्या  तसेच  रात्रचर्या  आखून  दिली  आहे.  त्याचे  वर्तन  त्याप्रमाणे  नसेल  तर  त्याला  पदच्यूत  करून  त्याचा  वध  करावा.  राजाचे  कल्याण   सुख  प्रजेच्या  कल्याणात,  सुखात   विशेषतः  वर्णाश्रमाच्या  रक्षणात  सामावलेले  आहे.  आणि  त्याला  याहून  आधिक  श्रेयस्कर  दुसरे  काहीही  असू  शकत  नाही.  मंत्री  स्वदेशी  जन्मलेले,  शास्त्रविद्या  पारंगत,  प्रजेवर  प्रभाव  टाकणारे,  दुरदृष्टीचे,  कलाभिज्ञ,  धीट,  वाक्‌पंडित,  उत्साही,  कर्तृत्ववान  असावेत.  नाहीतर  राजा  स्वेच्छाचारी  होतो.  त्यामुळे  शत्रुराज्य  त्याचा  फायदा  घेऊन  राज्याचा  नाश  होतो.  देशाच्या  सर्व  सीमा  निश्चित  असाव्यात.  विपत्काली  देशातील  प्रजेची  उपजिवीका  चालू  शकेल  इतके  धान्य  पिकविणारी  भूमी  असावी.  वेळप्रसंगी  परकीयांना  आसरा  देण्याची  पात्रता  असावी.  दुर्ग  म्हणजे  या  भूमीच्या  संरक्षणासाठी  किल्ले  बांधून  त्याची  योग्य  ती  मशागत  करावी.  नाहीतर  शेजारच्या  राज्यांकडून  एकसारखे  हल्ले  होण्याची  भिती  असते.  त्यासाठी  अनावश्यक  युध्दखर्च  सहन  करावा  लागतो.  कोश  म्हणजे  कायदेशीर  वारसाहक्काने  मिळालेली  कींवा  राजाने  स्वपराक्रमाने  मिळविलेली  संपत्ती  राज्यभांडारामध्ये  असावी.  बयाच  काळापर्यंत  नैसर्गिक  आपत्तीमध्ये  राज्याचे  सर्व  व्यवहार  सुरळीतपणे  चालू  राहतील  इतकी  संपत्ती  नेहमी  राज्यभांडारामध्ये  असावी.  नाहीतर  नैसर्गिक  आपत्तीच्या  काळात  शेजारच्या  राज्यांकडून  उसनवारी  घ्यावी  लागते,  त्याचा  गैरफायदा  शेजारच्या  राज्ये  कसा  घेतील  हे  समजत  नाही.  सैन्य  राजनिष्ठ,  आज्ञाधारी,  शस्त्रविद्येयुक्त,  परमुलूखात  सुध्दा  देशप्रेमी  असावे.  नाहीतर  युध्दामध्ये  पराजय  पत्करावा  लागतो.  कारण  युध्दाचा  विजय  नेहमी  राज्यातील  सैन्यावरच  अवलंबून  असतो.  सामंत  म्हणजे  मांडलीक  हे  निष्ठावान,  संकटकाळी  सर्वतहेची  मदत  करणारे,  राजाची  आज्ञा  पाळणारे  असावेत.  नाहीतर  राज्यावरील  संकट  प्रसंगी  राज्याचे  सर्व  व्यवहार  सुरळीतपणे  चालू  राहण्यास  बाधा  येऊन  प्रजेमध्ये  असंतोष  होतो.  ते  राज्यास  अपायकारी  असते.  अशा  प्रकारचे  सप्तांगसंघटित  राज्य  आदर्श  राज्य  होते.  संपुर्ण  सार्वभौमत्व  अशा  सप्तांगसंघटित  राज्यावर  अवलंबून  असते.  सातव्या  षाड्गुण्यम्  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  प्रकृतीच्या  षडगुणांचा  उद्देश,  त्यांचे  सविस्तर  विवेचन,  युध्दविषय़ी  विचार,  युध्दाच्या  अनुशंगाने  विषय़  संधी,  विग्रह,  विक्रम,   प्रबल  शत्रुविषयी  धोरणे  इत्यादी  विषयांवर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  तसेच  शासनशास्त्रातील  (१)  शांतता,  (२)  युध्द,  (३)  तटस्थपणा,  (४)  युध्दाची  सिध्दता,  (५)  दोस्ती,  (६)  शत्रुत्व   मैत्री  यातील  परिस्थितीनुरूप  सोईस्कर  वृत्ती  असा  द्वैधीभाव  या  सहा  पध्दतींची  माहीती  सांगितली  आहे.  यातील  प्रत्येक  पध्दत  केव्हा   कशी  उपयोगात  आणावयाची  या  विषयी  सविस्तर  माहीती  सांगितली  आहे.  आठव्या  व्यसनाधिकारीक  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  राजाची  व्यसने  शिकार,  जुगार,  मद्यपान,  स्त्रीआसक्ती,  जलविहार  इत्यादी  व्यसन  प्रकार  सांगून  त्यांचे  भयंकर  परिणाम  या  विषयी  सविस्तर  माहीती  सांगितली  आहे.  राज्यावरच्या  सर्व  आपत्तींची  मुळ  कारणे   शोधून  त्यावर  उपाय  या  विषयांवर  सविस्तर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  नवव्या  अभियास्यत्  कर्म  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  युध्द  प्रस्थान  करण्या  पुर्वीची  तयारी,  तसेच  युध्द  टाळण्याविषयी,  संधी  वगैरे,  सैन्यामध्ये  विजयाविषयी  उत्साहाचे  वातावरण  करणे,  त्यासाठी  राजपुरोहीत   भाट  यांचे  मार्फत  सैन्यामध्ये  धैर्य  वाढविणे,  उपाय  म्हणून  शुरांना  स्वर्गप्राप्ती  तर  भित्र्यांना  नरकप्राप्ती  अशा  पोवाड्यांचे  गायन  करणे,  दुर्ग  जिंकण्याचे  मार्ग,  शत्रुनाशासाठी  कुटिल  कारस्थान,  इत्यादी  विषयांवर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  दहाव्या  सांग्रामिक  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  सैन्याचे  प्रयाण,  मोहीम,   सैन्याचा  तळ,  कुटयुध्द,  युध्दभूमी,  चतुरंगदलाच्या  हालचाली,  व्युह   प्रतिव्युह,  इत्यादी  विषयांवर  सविस्तर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  अकराव्या  संघवृतम्  या  विभागामध्ये  प्रामुख्याने  संघराज्यामध्ये  फूट  पाडण्या  विषयीचे  उपाय,  संघराज्यामध्ये  परस्परांत  वैमनस्ये  उत्पन्न  करून  ती  आपल्यासाठी  निरूपद्रवी  करणे,  त्याचे  प्रकार,  विवेचन,  संघधोरण,  इत्यादी  विषयांवर  चर्चा  केली  आहे.  बाराव्या  आबलीयसम्   या  विभागामध्ये  प्रामुख्याने  बलहीन  राजाशी  व्यवहार  कसा  करावा,  तसेच  दुर्बल  राजांनी  प्रबल  राजाच्या  आक्रमणाचा  प्रतिकार  कसा  करावा  या  विषयी  गुढ  प्रयोग,  मंत्रयुध्द,  तसेच  शस्त्र,  अग्नि,  रसायने  याचा  प्रयोग  तसेच  मद्य  व्यापायांमार्फत  शत्रूनाशासाठी  विषप्रयोग,  शत्रूहेरांचा  नाश,  इत्यादी  विषयांवर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  तेराव्या  दुर्ग  लंभोपायः   या  विभागामध्ये  प्रामुख्याने  शत्रुच्या  तटबंदीच्या  ठिकाणांचा  शोध,  किल्लेकोटाचा  ताबा  मिळविण्याचे  उपाय   मार्ग,  सरळमार्गी  वेढा  घालून  कींवा  पाखंडी  लोकांच्या  साह्याने  कावेबाजी  करून  शत्रुच्या  तटबंदी  काबीज  करण्याचे  उपाय,  जिंकलेल्या  प्रदेशामध्ये  शांतीचे  उपाय,  इत्यादी  विषयांवर  चर्चा  करण्यात  आली  आहे.  चौदाव्या  औपनिषदिकम्   या  विभागामध्ये  प्रामुख्याने  शत्रुघाताचे  विविध  प्रयोग,  जादूटोणा,  आगीतून  चालण्याचे,  स्वतःला  तसेच  इतरांना  अदृश्य  बनविण्याचे  उपाय,  आगी  लावण्याचे,  वेड  लावण्याचे,  रोग  उत्पन्न  करण्याचे,  रसायन  मिश्रण  तयार  करणे  तसेच  त्याचवेळी  स्वपक्षाचे  रक्षण,  अद्भुत  रसायने   औषधे  यांचे  उत्पादन,  तंत्र-मंत्र  यांचे  प्रयोग  इत्यादी  विषयांवर  चर्चा  केली  आहे.  पंधराव्या  तंत्रयुक्तिः   या  विभागामध्ये  प्रामुख्याने  अर्थशास्त्राचा  अर्थ  तसेच  प्रस्तुत  ग्रंथाच्या  रचनेची  योजना   अनुमान  पध्दतीची  यादी,  या  बस्तीस  युक्तींचे  विवेचन,  व्याख्या   उदाहरणे,  शास्त्रीय  विवेचनाची  पध्दत  इत्यादी  विषयांवर  चर्चा  केली  आहे.  या  ग्रंथामध्ये  अर्थ  म्हणजे  मनुष्यजीवन   अर्थ  म्हणजे  मनुष्य  रहातो  ती  भूमी  असे  अर्थाचे  दोन  अर्थ  सांगून  मनुष्यवती  भूमी  मिळविणे   तीचे  पालन  करणे  याचा  उपाय  म्हणजे  अर्थशास्त्र  अशी  व्याख्या  केली  आहे.  हे  अर्थशास्त्र  सर्वस्वी  राजकारणावर  अवलंबून  असल्यामुळे  या  ग्रंथामध्ये  राजधर्माचे  विवेचन  केले  आहे.  राज्याची  अंतर्गत  शासकीय  व्यवस्था  आणि  त्यांचे  परराष्ट्रसंबंध  या  विषयी  सर्व  दृष्टिकोनांचा  आढावा  घेणारे  खंडनमंडनात्मक  सविस्तर  विवेचन  केले  आहे.  प्रजेला  संतुष्ट  ठेवून   धाकात  ही  ठेवून  राज्यकारभार  कसा  करावा   त्या  करिता  उपयुक्त  सात  अंगाचे  रक्षण  कसे  करावे  याचे  व्यावहारिक  भूमिकेतून  त्या  काळाला  योग्य  असे  मार्गदर्शन  केले  आहे.  परराष्ट्र  संबंधाचा  ऊहापोहसुध्दा  स्वराज्याचे  स्थैर्य   वृध्दी  हे  उद्दिष्ट  ठेवून  केला  आहे.  या  ग्रंथाचे  मुख्य  वैशिष्ट्य  हे  की  कौटिल्याने  या  ग्रंथातील  सर्व  उपायांचा  प्रत्यक्ष  अवलंब  करून  नंद  सम्राटाचे  साम्राज्य  उध्वस्त  करून  ते  साम्राज्य  चंद्रगुप्ताला  मिळवून  दाखविले  आहे.  म्हणून  हा  ग्रंथ  फक्त  पुस्तकी  ज्ञान  नाही.  राजकारणविषयक   राज्यकारभाराविषयक  प्रतिभेचे  उत्तम  स्मारक  असा  हा  ग्रंथ  असून  महान  सभ्यतासंपन्न  समाजाच्या  व्यावहारीक  संघटनाचा  उत्तम  आरसा  म्हणून  हा  ग्रंथ  महत्वाचा  आहे.  अशा  रितीने  प्राचीन  भारताच्या  राजकीय  परंपरेत  या  ग्रंथाचे  विशिष्ट   महत्वपुर्ण  स्थान  आहे.  आज  आंतरराष्ट्रीय  गुणवत्ता  प्रमाणपत्राचे  स्तोम  जे  पाश्चात्यंाच्या  कडून  आले  आहे,  तेच  सुमारे  २४००  वर्षांपूर्वी  आपल्या  भारतामध्ये  कौटिल्याने  या  ग्रंथाद्वारे  करून  दाखविलेले  आहे.  नक्की  केलेल्या  धोरणांनूसार  त्यांची  अंमलबजावणी  होत  आहे  हे  सिध्द  करणे.
 या  सर्व  विचारांचा  अभ्यास  केल्यानंतर  असे  वाटते  आज  या  अर्थशास्त्राचा  खरा  उपयोग  करून  घ्यायला  पाहिजे  आहे.  एकेकाळी  भारताने  या  अर्थशास्त्राच्या  आधारे  पाश्चात्य  राज्यांवर  विजय  मिळविला,  आणि  त्यानंतर  त्या  पाश्चात्यंानी  या  अर्थशास्त्राचा  चिकीत्सक  पध्दतीने  अभ्यास  करून  त्यातील  तत्त्वज्ञानाचा  त्याच्या  संस्कृतीस  अनुकूल  समन्वय  साधून  त्यांचा  विकास,प्रगती  करून  घेतली  आहे.  आता  भारत  त्या  पाश्चात्यंाच्या  राज्यशास्त्राचे  अनुकरण  करीत  आहे,  जे  त्यांच्या  संस्कृतीशी  निगडीत  आहे.

No comments:

Post a Comment