महिला दिनाच्या निमीत्ताने
एकंदरीत आज स्त्रीजीवन
सुख समृध्दीचे आहे का याचा बारकाईने
विचार केल्यास हेच दिसून
येते की आज स्त्री पुढे
अनेक समस्या आहेत.
विवाहानंतर स्त्रीचे खरे कर्तृत्व
सुरु होत असते.
त्या विवाहासाठी नोकरीची गरज आहे.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी
लग्नवधु शिकलेली असावी असा
आग्रह होता, आज
ती नोकरी करणारी
पाहीजे असा आग्रह
आहे, तर पुढे
ती संगणकाचे ज्ञान असणारी
पाहिजे असा आग्रह
होईल. ही काळाची
गरज आहे असे
पुरूषांकडून बोलले जाते.
नोकरी ही एक बिकट समस्या
आहे. तसेच विवाहासाठी
हुंडा हा शब्द
न वापरता दुसरे
काही तरी द्यावे
लागते. त्यात कमतरता
झाल्यास स्त्रीला पुढे जन्मभर
सासरी अनेक संकटांना
तोंड द्यावे लागते.
सासरी आलेल्या स्त्रीला सासरच्या सर्व माणसांबरोबर
रहावे लागते, त्यांची
सेवा करावी लागते
नाहीतर वेगळे घर
बनवावे लागते. घर
घेणे आजच्या काळात
काही सोपी गोष्ट
नाही. पुढे मूले
बाळे झाल्यावर त्यांच्या शिक्षणाची समस्या आहेच.
आजच्या काळात मूलांवर
संस्कार हा शब्द
काहीसा अपरिचीत वाटतो कारण
त्यासाठी त्या स्त्रीला
वेळ कोठे आहे.
दररोज घरातील कसेतरी
आवरून नोकरी करणे
हेच तीच्या जीवनाचे
उद्दिष्ट मानले गेले
आहे. ही धावपळ
करून आजची स्त्री
शरीराने थकून जाते.
तर नोकरीच्या मानसिक ताणामुळे
ती मनाने थकून
जाते. तरी सुध्दा
केवळ ध्येयवादासाठी घरातील व
बाहेरची सर्व कामे
करते. त्यातून तसेच पाश्चात्य
संस्कृतीच्या प्रभावामुळे स्त्रीमुक्तीवाद व स्त्रीशक्ती
या संकल्पना आजच्या काळात
केवळ फॅशन म्हणून
रूढ झालेल्या आहेत. स्त्रीया
पुरूषाप्रमाणे सर्व कामे
करतात म्हणून त्यांना
समान हक्क-आधिकार पाहीजे हा
गहन प्रश्न निर्माण
झाला आहे. या
स्त्रीच्या अहंकाराला धक्का पोहोचल्यास
घटस्फोटाच्या समस्या निर्माण
होतात. तर घटस्फोटानंतरच्या
समस्येला स्त्रीला तोंड द्यावे
लागते. तसेच मानहानी,
बळजबरी, शारिरीक अत्याचार या समस्या
आहेतच. ग्रामीण स्त्रीचे प्रश्न अजून
वेगळे आहेत. स्त्रीशिक्षणाचा
अभाव हा मुख्य
प्रश्न असून त्याला
अनूषंगून कुटूंब नियोजनाचे,
कायद्याचे, स्त्रीहक्काचे अज्ञान इत्यादी.
त्यामुळे स्त्रीची प्रगती न
होता अधोगती होते.
समाजातील रूढींप्रमाणेच जीवन जगावे
लागते. त्या रूढी-परंपरा
चूकीच्या अंधश्रध्देवर आधारीत असल्यातरी
सुध्दा त्याप्रमाणे वागले तरच
ती स्त्री समाजात
टिकाव धरू शकते.
या सर्व प्रश्नांना
तोंड देण्याचे काम फक्त
स्त्रीलाच करावे लागते
असे मूळीच नाही.
पुरूषांना सुध्दा या
प्रकारच्या समस्या त्यांच्या
दृष्टिकोनातून आहेतच परंतू
स्त्री ही पुरूषापेक्षा
स्वभावाने भावनीक असल्याने
स्त्रीयांच्या प्रश्नांकडे आपण लक्ष
देऊ.
या सर्व
समस्यांचा बारकाईने विचार केल्यास
असे लक्षात येते
की या सर्व
समस्या आजच्या परिस्थीतीमुळेच
निर्माण झाल्या आहेत.
आज पाश्चात्य संस्कृतीचा खूप प्रभाव
आहे. आपल्या प्राचीन
संस्कृतीचा विचार केला
तर नक्की असे
दिसून येते की
या संस्कृतीमध्ये स्त्रीजीवन सुखी व समृध्द होते.
हे जाणून घेण्यासाठी
प्राचीन संस्कृतीची माहीती करून
घेतली पाहीजे. आपल्या प्राचीन
संस्कृती प्रामुख्याने मनुस्मृतीवर आधारलेली आहे असे
दिसून येते. प्राचीन
संस्कृतीने तत्त्वज्ञानाला उच्च मूल्याचे
मानून, आध्यात्मिक अंतःस्फूर्ति, तात्त्विक विचार व
मानसिक अनुभूति यांचा सुमेळ
घालून संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये आत्मा, मन
आणि शरीर यांमध्ये
स्वभाविक सुसंवाद राखण्याचा निर्धार केला आहे.
स्त्रियांना गृहलक्ष्मीचे स्थान देऊन
गौरव केला आहे.
स्त्रीचा सन्मान व
तीचे संरक्षण केवळ याच
उद्देशाने स्त्रियांवर गृहीणीकर्माची जबाबदारी टाकलेली आहे. त्यामध्ये
स्त्रियांना घरामध्ये कोंडून ठेवण्याचा
विचार कसा असेल,
जेथे स्त्रियांच्या सन्मानाचा विचार आहे
ही विचार करण्याची
गोष्ट आहे. हा
एक गैरसमज मात्र
आहे.आपले कल्याण साधणाया
पित्यांनी, भावांनी, पतींनी, व पुत्रांनी
स्त्रियांना पूजनीय मानावे.
जेथे स्त्रियांची पूजा होते
तेथे सुख-शांती व समृध्दि
असते; तर जेथे
स्त्रियांची पूजा होत
नाही तेथे कष्ट-दारिद्र्य
व संताप असतो.
कौमारवयात पिता, यौवनात
पति, व वृध्दावस्थेत
पुत्र हे स्त्रिचे
रक्षक असतात. त्यांनीच
ही जबाबदारी आपल्यावर घेतली पाहिजे
कारण स्त्री ही
स्वतःचे रक्षण करण्यास
योग्य वा समर्थ
नसते म्हणूनच तारूण्यात कन्यादान न करणारा
पिता, यौवनात रंजन
न करणारा पती,
व वार्धक्यात काळजी न
घेणारा पुत्र हे
निंदनीय आहेत. उपाध्यायापेक्षा
दहापट आचार्य, आचार्यापेक्षा शंभरपट पिता,
आणि पित्यापेक्षा सहस्त्रपट माता गौरवास्पद
आहे. अशा रितीने
मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचा गौरव केला
आहे. स्त्री रूपाकडे,
वयाकडे पहात नाही.
पुरूष म्हणूनच ती पुरूषाला
भोगते, पुरूषाला पाहून रस्सखलीत
होत असल्याने, मनाने अतिचंचल
असल्याने, स्वभावतःच प्रेमळ नसल्याने,
संरक्षणाचे प्रयत्न करीत असताना
सुध्दा स्त्री पतीच्या
विरोधात जाते. हा
स्त्रीचा मुळ स्वभाव
जाणून त्याचा बारकाईने
विचार करून तीचे
केवळ कल्याण करण्यासाठी
स्त्रीधर्म सांगितला आहे. स्त्रीचा
स्वभाव चंचल असून
सौंदर्यसाधने अलंकार या
विषयांची ओढ असते.
काम, क्रोध असभ्यता,
विद्रोह, दुर्वर्तन हे स्वभावदोष
स्त्रीयांच्या ठिकाणी सहजपणे
असतात. हे सर्व
स्वभाव लक्षात घेउन
त्यावर योग्य उपायासाठी
गृहीणीधर्माची संपुर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
घराबाहेर जाऊन काम
करण्याची शारिरीक शक्ती स्त्रीमध्ये
नसते. गृहीणीधर्माच्या निमीत्ताने स्त्री घरामध्ये
राहून घरातील कामे
तसेच मुलांचे संगोपन करू
शकते. या कामामध्ये
गुंतून राहील्यामुळे इंद्रिये संयमीत ठेवणे
शक्य होऊ शकते.
स्त्रियांना कोणत्याही विषयांची ओढ स्वभावतःच
आधिक असते म्हणून
त्यांचे संयमन करण्यासाठी
त्यांना धनाची आय-व्यय
व्यवस्था पहाणे, गृहीणीधर्माचे
पालन करणे, यामध्ये
गुंतवून ठेवावे. येथे मुळ
स्वभावाचा कीती खोलवर
विचार केला आहे
हेच दिसून येते.
घरातील दोन व्यक्तींपैकी
एक व्यक्ती, म्हणजे पुरूष
घराबाहेरील कामे करीत
असेल तर दुसया
व्यक्तीने, म्हणजे स्त्रीने
घर सांभाळण्यासाठी पुढे आलेच
पाहिजे. यात चूक
काहीच नाही. चूक
आहे दृष्टिकोनामध्ये. पाश्चिमात्य संस्कृती केवळ बुद्धिविकास,
कार्यक्षम प्राणशक्ति, शरीर आरोग्य,
शरीर भोग, बुद्धिप्रणीत,
समाजव्यवस्थेवर आधारलेली आहे. पाश्चिमात्य
संस्कृती भोगप्रधान आहे. भोगप्रधान विचारधारा वरवर इंद्रियांना
कीतीही सुखावह वाटली
तरी शेवटी ती
विषकन्ये प्रमाणे घात करते,
तर मोक्षप्रधान विचारधारा मनुष्याचा विकास करते,
त्यासाठी धर्म व मोक्ष हे
मुख्य पुरूषार्थ जाणून जीवनाचा
उध्दार कसा करावा
याचे मार्गदर्शन या आपल्या
प्राचीन संस्कृतीमध्ये दिसते. गृहीणीधर्माच्या
निमीत्ताने स्त्री घरामध्ये
राहून घरातील कामे
तसेच मुलांचे संगोपन करू
शकते. हे मुलांचे
संगोपन कीती महत्वाचे
आहे आज दिसून
येते. आज तरूण
पीढीच्या मनामध्ये स्त्री विषयी
काय भावना आहेत.
केवळ उपभोग्य वस्तु म्हणून
स्त्रीकडे पाहीले जाते.
कारण या तरूण
पीढीवर लहानपणी चांगले संस्कार
झाले नाहीत मात्र
विपरीत संस्कार दुरसंचाच्या विविध वाहीन्यामुळे
आपोआप झाले. लहानपणी
चांगले संस्कार झाले तर
तरूणपणी त्यांची विचारधारा उच्चतम बनून
विवेकशक्ती वाढते. मुलांचे
संस्कार घरातील आईवर
अवलंबून असतात. त्यासाठी
आईने घरामध्ये राहणे काय
चूकीचे आहे. तरूणपणी
आपला मुलगा -
मुलगी विवेकी, कर्तबगार, आत्मविश्वासी होण्यासाठी तरी निदान
आईने घरी राहणे
आवश्यक आहे. नोकरी
करून घर सांभाळणे
म्हणजे ना तळ्यात
ना मळ्यात अशी
अवस्था असते. नोकरी
करणारी स्त्री घराबाहेर
पडल्यावर ती मुलांवर
कसे संस्कार करू शकेल,
तर नोकरी मध्ये
मुलांची आठवण आल्यावर
नोकरी मध्ये एकाग्रतेने
कसे काम करू
शकेल. परंतू हा
विचार इतका दृढ
झालेला आहे की नोकरी मध्ये
जेव्हढे होईल तेव्हढे
काम करायचे व
घरी आल्यावर मुलांकडे बघायचे, त्यात काय
विशेष आहे. याचा
परिणाम हाच होतो
नोकरी मध्ये काम
व्यवस्थित होत नाही
आणि घरी मुलांना
वाईट वळण लागते.
आता प्रश्न असा
आहे की आजच्या
काळामध्ये गृहिणीधर्म आचरणात येऊ
शकतो का? याचे उत्तर
हेच आहे की जे शंभर
वर्षांपुर्वी शक्य होते
ते आता का होणार नाही
त्यासाठी सुखाचा, आनंदाचा, कल्याणाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक
आहे. मुलगी खुप
शिकली, मोठ्या प्रसिध्दीला
आली पुढे पंतप्रधान
झाली यामध्ये त्यास्त्रीचे सुख, आनंद,
कल्याण आहे का?
फक्त पैसा व प्रसिध्दी यामध्ये तात्पुरते सुख असले
तरी कल्याण नसते
कारण पैसा व प्रसिध्दीमुळे लोभ, मत्सर,
द्वेष यासारख्या विकारांची मैत्री करावी
लागते, जी मनुष्यास
अधोगतीला नेते.
आज स्त्रीशक्तीचे
प्रदर्शन मांडण्यात येते. स्त्रीशक्ती
म्हणजे काय? अनेक
स्त्रीयांनी एकत्र येऊन
अन्याया विरूध्द आंदोलने करायची, धरणे धरायची
भाषणे करायची हीच
स्त्रीशक्ती आज दिसून
येते. असे आज स्त्रीशक्तीचे प्रदर्शन करावे लागते.
परंतू स्त्री हीच
शक्ती आहे. आणि
ती धर्माचरणाने प्रगट होते.
स्त्री चा गृहिणीधर्म
या स्वधर्माचे आचरण केल्याने
स्त्रीशक्ती प्रगट होते.
आजच्या युवा पीढीचे
भवितव्य उज्वल करण्याचे
सामर्थ्य स्त्रीशक्ती मध्ये आहे.
स्त्रीशक्ती वात्सल्यभाव, दया, क्षमा,
शांती, अन्नपुर्णा यामध्ये प्रगट होते.
स्त्रीशक्ती मध्ये एकमेकांतील
गैरसमज दूर रून
आपूलकी व सलोखा
निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. स्त्रीशक्ती
मध्ये अनीतीने वागणायास क्षमा करून
त्यांच्यातील विवेकबुध्दी जागृत करून
त्यांना नीतीने वागणूक
करण्याचे सामर्थ्य आहे. या
स्त्रीशक्तीची आज नीतांत
आवश्यकता आहे. परंतू
आज स्त्रीने स्वतःच अंगप्रदर्शन
करायचे आणि पुरूषाने
त्या अंगाला हात
लावला तर आरडा
ओरड करून अन्यायाचा
लढा पुकारायचा हे आपणहून
पाण्यात उडी मारून
भिजल्यावर पाण्याला दोष देणे
या सारखे मुर्खपणाचे
आहे. कोणत्याही गोष्टीच्या परिणामाचा विचार अजिबात
न करता केवळ
अनुकरण म्हणून त्या
गोष्टी करण्याची
फॅशन दिवसेदिवस वाढत चालली
आहे. या गृहीणीधर्माच्या
स्वधर्म आचरणाने स्त्रीयांवर अन्याय होण्याचा
प्रश्नच निर्माण होत नाही.
अन्याय कधी होतो
जेव्हा परधर्माचे आचरण होते.
पायाचा स्वधर्म चालणे हा
आहे परंतू हाताने
पायासारखे चालायला सुरवात केली
तर तो पशुसमान
होतो. दुर्दैवाने आज याच प्रकारच्या पशुजीवनाला प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त
झाले आहे. उदा.
स्त्रीयांनी नोकरी करणे
हे त्यांचे स्वधर्माचरण नाही परंतू
स्त्रीयांच्या नोकरीला
आज प्रतिष्ठेचे स्थान आहे,
एव्हढेच नव्हे तर
त्यासाठी त्यांना अनेक सवलती
देण्यात येतात. उदा.
बाळंतपणाची रजा, आयकरामध्ये
सवलत, परगांवच्या बदलीमध्ये सूट इत्यादी.
यामुळे खरेतर पुरूषांवर
अन्याय होतो परंतू
इकडे कोणाचे लक्ष
जात नाही. आज
जे करायला नको
ते आवर्जून केले जाते,
त्याला प्रतिष्ठेचे स्थान आहे
आणि जे करायला
पाहिजे ते अजिबात
केले जात नाही,
त्याची लाज वाटते.
म्हणून आज बेकारी,
मारामारी, खून, चोया,
दरोडे, स्त्रीयांवर अत्याचार असे वाईट
प्रकार घडतात. स्त्रीयांच्या
नोकरीमुळे आज पुरूष
बेकार आहेत. बेकारीमुळे
चोया, दरोडे, मारामारी,
खून होतात. तसेच
आजच्या तरूण पीढीवर
चांगले संस्कार नाहीत म्हणून
स्त्रीयांवर अत्याचार सहजपणे होतात.
या तरूणपीढीवर स्त्री ही
भोगवस्तु आहे हाच
संस्कार आजचे दुरसंच
वेगवेगळ्या वाहीन्याच्याद्वारे करीत आहेत.
स्त्री ही शक्ती
व लक्ष्मीस्वरूप आहे हा संस्कार जोपर्यंत लहान मुलांवर
आईकडून होत नाही
तोपर्यंत तरूणपीढीला स्त्री ही
भोगवस्तुच दिसणार आहे
यामध्ये तरूणपीढीचा दोष नसून
घराबाहेर पडणाया स्त्रीयांचा
आहे.
आणखी एक
गहन प्रश्न म्हणजे
आज पुरूषाप्रमाणे स्त्रीयांना समान आधिकार
पाहीजे याचा बोजवारा
सुरू आहे.
स्त्रि व
पुरूष या दोघांचेही
अंतिम उद्दिष्ट एकच मुक्तिलाभ
असले तरी याचा
अर्थ स्त्रिने सर्व बाबतीत
पुरूषांचे अनुकरण केले
पाहिजे असा नाही.
स्त्रि व पुरूष
यांच्यात शारिरीक दृष्टीने व मानसिक
दृष्टीने पार्थक्य आहे; दोघांची
शक्ती एकमेकाहून अगदी भिन्न
प्रकारची आहे, त्याच्या
उणीवाही भिन्न आहेत.
योग्य प्रकारे दोघांची शक्ती एकत्र
आणली तर एकजण
दूसयाची उणीव भरून
काढू शकतो. स्त्रीचा
मेंदू पुरूषाच्या मेंदू पेक्षा
आकाराने लहान असतो.
स्त्रीची श्वसनक्रिया छातीच्या हालचालीने आधिक होते.
तर पुरूषाची श्वसनक्रिया पोटाच्या हालचालीने आधिक होते.
तसेच स्त्रीयांचे स्नायू पुरूषापेक्षा
कमजोर असतात. अशा
प्रकारे स्त्रि व
पुरूष यांच्यात शारिरीक दृष्टीने फरक आहे
हे आजच्या विज्ञानाने
सिध्द झाले आहे.
तसेच मेंदूत डोकावणाया
अत्यधुनिक इलेक्ट्रॉनीक तंत्रज्ञानामुळे स्त्री पुरूषांच्या
मेंदूतील फरक स्पष्ट
झाले आहेत. स्त्रीयांना
पुुरूषापेक्षा दुसयांच्या भावना आधिक
लवकर कळतात. तसेच
स्त्रीयांच्या मेंदूचा शाब्दिक आणि वाचिक
प्रकटीकरणाशी संबंधीत भाग पुरूषांच्या
पुरूषांच्या मेंदूतील भागापेक्षा मोठा असतो.
त्याठिकाणी जास्त प्रमाणात
चेतापेशी एकवटलेल्या असतात. लक्ष
वेधून काम करण्याच्या
प्रसंगी स्त्रीया अग्रेसर असतात तर
कमी वेळामध्ये लक्ष केंद्रित
करण्याच्या प्रसंगी पुरूष अग्रेसर
असतात. स्त्रि व
पुरूष या समाजाच्या
दोन्ही बाजू परस्पर
सहकार्याने, परस्परांच्या उणीवा भरून
काढून, दोघांचीही उन्नती कशी
होईल यासाठी स्त्रीने
घरातील तर पुरूषाने
घराबाहेरील कामे करण्याचे
नियम मान्य करण्यासारखे
आहेत असे नक्कीच
लक्षात येते. एकंदरीत
सर्व विचार करून
असे लक्षात येते
की जर मुळामध्येच
स्त्रि व पुरूष
यामध्ये विषमता असेल,
शरीर प्रकृती भिन्न असेल
तर स्त्रीयांनी पुरूषाप्रमाणे समान आधिकार
मागणे हे सर्वथा
चूकीचेच आहे. त्याचा
विरोधच केला पाहिजे.
त्यामध्ये स्त्रीयांचेच कल्याण आहे.
दोघांचे स्वधर्म वेगवेगळे आहेत. दोघांची
कार्यक्षेत्रे निरनिराळी आहेत म्हणून
स्त्रि व पुरूष
समान आधिकार हा
विचार स्त्रीचे स्त्रीत्व खच्ची करण्याचा
प्रयत्न आहे याचा
स्त्रीयांनी गंभीरपणे विचार करायला
पाहिजे.
आजच्या सर्व
स्त्री समस्या केवळ
स्त्री घराबाहेर पडल्यामुळेच निर्माण झालेल्या आहेत. केवळ
स्त्रीच्याच नव्हेतर संपुर्ण समाजावर त्याचा विपरित
परिणाम होतो हे
आज अनुभवाला येत आहे
म्हणून स्त्रीयांनी स्वधर्म आचरण्यात आणून गृहीणीधर्माची
जबाबदारी मोठ्या आनंदाने
स्विकारावी यांत काहीच
शंका नाही.
No comments:
Post a Comment