Tuesday, 4 July 2017

वैदीक सनातन संस्कृती


  वैदीक  सनातन  संस्कृतीमध्ये  ब्राह्मण,  क्षत्रिय,  वैश्य,  आणि  शूद्र  हे  चार  वर्ण  असून  ते  मनुष्याच्या  स्वभाव-गुणांवर  आधारलेले  आहेत.
 मनुस्मृती मध्ये  समाजाची  ब्राह्मण,  क्षत्रिय,  वैश्य  व  शूद्र  या  चार  वर्णांत  गुण  व  कर्म  यांच्या  निकषावर  विभागणी  केली  आहे.  ती  प्रत्यक्षात  जन्मानुसार  झाली  याचे  कारण  व्यावहारीक  सोय  हेच  आहे.  जन्मल्याबरोबर  मुलाचे  गुण-कर्म  कसे  ओळखायचे  आणि  जर  ओळखता  आले  नाही  तर  त्याचे  संस्कार  कोणत्या  वर्णांनुसार  करायचे.  केवळ  याचमुळे  वर्णंव्यवस्था  जन्मानुसार  झाली.  परंतू  धर्मशास्त्रास  हे  मान्य  नाही.  व्यास-नारद-वसिष्ठ  इत्यादी  प्राचीन  उदाहरणे  दाखवितात  की  मनुष्याचा  वर्ण  त्याच्या  जन्मानुसार  नव्हे  तर  गुण-कर्मानुसार  ठरविला  जात  असे,  कारण  या  तिघांचाही  जन्म  ब्राह्मणवर्णांमध्ये  झाला  नव्हता,  तरीही  त्यांच्या  गुण-कर्मानुसार  त्यांची  गणना  सर्वश्रेष्ठ  ब्राह्मण  म्हणून  होते.  परकियांनी  प्रशंसा--मॉरीस  मेटरलिंक  हा  बेल्जिअन  पंडित,  ऑस्पेन्सकी  नावाचा  अलिकडच्या  काळातील  पाश्चात्य  पंडित,  नीत्शे  हा  जर्मन  तत्त्ववेत्ता    आपली  संस्कृती-मोक्षप्रधान      पाश्चात्य--भोगवादी
 समाज  परिपुर्ण  समृध्दतेने  वैभव  संपन्न  व्हायचा  असल्यास  त्यासाठी  कोणताही  एक  वर्ग  तेव्हढाच  असणे  उपयोगाचे  नाही.  समतेचे  गोंडस  रूप  धारण  करणारी  स्वतंत्रता-समता-बंधुता  ही  फ्रॆंच  राज्यक्रांतीतून  जन्माला  आलेली  समाजव्यवस्था  ऐकावयाला  आकर्षक  वाटत  असली  तरी  शेवटी  रक्ताचे  पाट  वाहविण्यास  कारणीभूत  झाली.  रोमन  साम्राज्याचा  नाश  वर्णसंकरामुळेच  झाला  असे  वा.  दा.  तळवळकर  चातुर्वर्ण्य  या  पुस्तकात  सांगतात.  तर  वर्णसंकरामुळे  अमेरिकन  लोकांचा  बुद्ध्यांक  उणावत  जात  आहे  असे  एका  जपानी  विचारवंतांनी  केलेल्या  चाचणी  मध्ये  स्पष्ट  झाले  आहे.  भौतिक  समृध्दीसाठी  एकवर्णात्मक  समाजरचना  उपयुक्त  नाही  असे  जस्टिस  वुड्राफ,  रोमारोला,  जॉर्ज  डवुर्ड,  मेरिडीथ  टाऊनशेड,  पेट्रिक  गेडेस,  व्हि.ए.स्मिथ,  सिडने  ला,  हेन्रॣ  कॉटन  अशा  अनेक  पाश्चात्य  समाजशास्त्राच्या  विचारवंतांचे  मत  असून  चार  वर्णआश्रम  व्यवस्थेचा  त्यांनी  गौरव  केलेला  आहे.
 इथे  पृथ्वीवरी  किंवा  स्वर्गी  देवादिकांतहि   काहिं  कुठे  नसे  मुक्त  प्रकृतीच्या  गुणांतुनी  ।।  १८.४०।।
 ब्राह्मणादिक  वर्णांची  कर्मे  ती  ती  विभागिली   स्वभावसिध्द  जे  ज्याचे  गुण  त्यांस  धरूनिया  ।।४१।।
 सपूर्ण  सत्त्वगुण--ब्राह्मण,  थोडा  सत्त्व   थोडा  रजो--क्षत्रिय,  थोडा  रजो   थोडा  तमो--वैश्य,   सपूर्ण  तमोगुण-शूद्र
 जो  मनुष्य  शम,  दम,  तप,  शौच,  संतोष,  क्षमा,  सरलता,  ज्ञान,  दया,  भगवत्  परायणता  आणि  सत्य  या  लक्षणांनी  युक्त  आहे,  त्यास  ब्राह्मण  म्हणतात.  जो  मनुष्य  उत्साह,  वीरता,  धैर्यता,  तेजस्विता,  त्याग,  मनोजय,  क्षमा,  ब्राह्मण-भक्ति,  अनुग्रह,  आणि  प्रजा-रक्षण,  या  लक्षणांनी  युक्त  आहे,  त्यास  क्षत्रिय  म्हणतात.  जो  मनुष्य  अर्थ-धर्म-काम  यांची  वृध्दी  करतो,  आणि  गुरूभक्ति,  श्रीहरिभक्ति,  आस्तिकता,  उद्योगशीलता,  व्यावहारिक  निपुणता  या  लक्षणांनी  युक्त  आहे,  त्यास  वैश्य  म्हणतात.  जो  मनुष्य  ब्राह्मण,  क्षत्रिय   वैश्य  यांची  विनम्रतेने  निष्कपटसेवा  करतो,  त्यास  शूद्र  म्हणतात.  धर्म  शास्त्रांचे  अध्ययन   अध्यापन,  दानधर्म,  यज्ञकर्म  हे  ब्राह्मणाचे  मुख्य  कर्म  आहे.  प्रजेचे  रक्षण  हे  क्षत्रियाचे  मुख्य  कर्म  आहे.  गोसंवर्धन,  कृषी  आणि  व्यापार  हे  वैश्याचे  मुख्य  कर्म  आहे.  तर   ब्राह्मण,  क्षत्रिय   वैश्य  यांची  विनम्रतेने  निष्कपटसेवा  करणे  हे  शूद्राचे  मुख्य  कर्म  आहे.
 ब्रह्मचर्य,  गृहस्थ,  वानप्रस्थ  आणि  संन्यास  हे  चार  आश्रम  आहेत.  हे  अध्यात्मयोगाचे  मुख्य  आचरण  तत्त्व  आहे.
 गुरू  सेवा  हाच  ब्रह्मचर्याचा  मुख्य  धर्म  आहे.  यज्ञोपवित  संस्कार  झाल्या  नंतर  ब्रह्मचारी  गुरूकुलामध्ये  राहून  धर्मशास्त्राचा  अभ्यास  करतो.   तो  आपल्या  इंद्रियांस  वश  करून  सेवा  वृत्तीने  गुरूदेवाच्या  चरणी  समर्पित  होतो.  तो  प्रातःकाळी  आणि  संध्याकाळी  गुरू,  अग्नि,  सूर्य  आणि  श्रेष्ठ  देवतांची  पूजा  करतो.  मौन  व्रताने  गायत्रीचे  अनुष्ठान  करतो.  गुरूदेवांच्या  आज्ञेचे  पालन  करून  वेदांचे  अध्ययन  करतो.  दररोज  अध्ययनाच्या  आधी   अध्ययनाच्या  नंतर  गुरूदेवांच्या  चरणावर  डोके  ठेऊन  नमस्कार  करतो.  शास्त्रा  प्रमाणे  मेखला,  मृगचर्म,  जटा,  दंड,  कमंडलु,  यज्ञोपवित  आणि  कुश  धारण  करतो.  दुपारी   संध्याकाळी   भिक्षा  मागून  गुरूदेवांच्या  चरणी  अर्पित  करतो.  त्यांच्या  आज्ञेनुसार  अन्न  ग्रहण  करतो.  स्त्रियांशी  संबंध  ठेवीत  नाही.  या  प्रमाणे  गुरूकुलामध्ये  धर्मशास्त्राचा  अभ्यास  पुर्ण  करून  गुरू-दक्षिणा  देतो.  ज्ञानाचा  उपदेश  करणे  ही  खरी  गुरू-दक्षिणा
 त्या  नंतर  त्यांच्या  आज्ञेनुसार  गृहस्थ  आश्रमामध्ये  प्रवेश  करतो.  प्रजोत्पादन  आणि  यज्ञ-याग  करणे  हा  गृहस्थाचा  मुख्य  धर्म  आहे.  तो  आपल्याच  वर्णाच्या  सुशील  कन्येशी  विवाह  करतो.  परंतू  संसारामध्ये  आसक्त  होत  नाही.  तो  गृहस्थाची  सर्व  कर्मे  भगवंतास  समर्पित  करतो.  शरीराची  आणि  कुटूंबाची  सेवा  केवळ  निर्वाहासाठी  करतो.  अंतःकरणामध्ये  विरक्त  वृत्तीने  स्वजनांमध्ये  आसक्त  होत  नाही.  माता-पिता,  भाई-बंधु,  पत्नी-पुत्र-मित्र  यांच्या  विचारांस  केवळ  अनुमोदन  देतो.  कोणत्याही  भौतिक  वस्तुमध्ये  आसक्त  होत  नाही.  प्रारब्धाने  जे  मिळेल  त्यामध्ये  संतुष्ट  राहून  कोणत्याही  भौतिक  वस्तुंचा  संग्रह  करीत  नाही.  आपल्या  कुटूंबाच्या  पालन-पोषणा  इतकेच  धन  कमवितो.  आपल्या  पत्नी  कडून  अतिथी-सत्कार  करवितो.  आपल्या  पितरांचे  श्राध्द  करतो.  या  गृहस्थधर्माचे  कर्तव्य  पूर्ण  केल्या  नंतर  तो  मनुष्य  वानप्रस्थ  आश्रमामध्ये  प्रवेश  करतो.
 तपस्या  करणे  हाच  वानप्रस्थीचा  मुख्य  धर्म  आहे.  जंगलात  पर्णकुटीमध्ये  राहून  फक्त  कंदमूळाचा,  फळाचा  आहार  घेतो.  डोक्यावर  जटा  धारण  करून  नख  आणि  दाढी-मिश्या  कापीत  नाही.  उन-पाऊस   थंडी  अंगावर  घेऊन  शरीराची  आसक्ति  हळू-हळू  कमी  करतो.  आपापल्या  सहनशक्ति  नुसार  हे  व्रत  करून  बुध्दी  भ्रमिष्ट  होणार  नाही  याची  काळजी  घेतो.  आत्मानुभूती  हाच  संन्याशाचा  मुख्य  धर्म  आहे.  मनुष्य  वानप्रस्थ-व्रताचे  बारा  वर्षे  आचरण  केल्या  नंतर  ब्रह्मविचाराचे  सामर्थ्य  असेल  तर  सर्वत्याग  करून  संन्यास  ग्रहण  करतो.  कोणा  ही  व्यक्ति,  वस्तु,  स्थान  यांच्या  कडून  कशाची  ही  अपेक्षा  करीत  नाही.  एक   गावी  एकाच  दिवसाचा  मुक्काम  या  व्रताने  सर्वत्र  भ्रमण  करतो.  सर्व  प्राणीमांत्राशी  समभाव  ठेवतो.  वाद-विवाद  करीत  नाही.  शिष्य-गण  संप्रदाय  बनवित  नाही.  तो  नेहमी  आत्मानुसंधानामध्ये  मग्न  असतो.  या  प्रमाणे  वर्णाश्रमाचे  आचरण  करून  मनुष्याचे  अंतिम  कल्याण  होऊ  शकते.





No comments:

Post a Comment