Tuesday, 4 July 2017

नवविधा भक्तितून आजच्या शिक्षणाचा वेध


  नवविधा  भक्तितून  आजच्या  शिक्षणाचा  वेध
 श्रवण,  किर्तन,  स्मरण,  पादसेवन,  अर्चन,  वंदन,  दास्य,  सख्य  आणि  आत्मनिवेदन  अशी  नऊ  प्रकारची  ही  भक्ति  एक  उत्तम  अध्ययन  पध्दती  आहे  असे  भक्तराज  प्रल्हाद  आपल्या  असूर  मित्रांना  सांगतो  आहे.  खरोखर  बारकाईने  विचार  केल्यास  लक्षात  येते  की,  नऊ  प्रकाराने  अध्ययन  करता  येते.  आता  आपण  एक  एक  प्रकारांचा  बारकाईने  विचार  करू.  या  नऊ  प्रकारच्या  अध्ययन  पध्दती  मध्ये  क्रमाला  सुध्दा  महत्व  आहे.
 श्रवण  म्हणजे  ऐकणे.  अध्ययनामध्ये  ऐकण्याला  अत्यंत  महत्व  आहे.  आपल्या  प्राचीन  गुरूकुल  पध्दती  मध्ये  एकपाठी  असा  शब्द  प्रचलीत  होता.  एकपाठी  म्हणजे  एकदा  ऐकलेले  जन्मभर  लक्षात  रहाणे.  आज  हे  एकपाठी  कौशल्य  कितीतरी  उपयोगाचे  आहे.  शिक्षकांनी  शिकविलेले  एकदा  ऐकलेले  जन्मभर  लक्षात  रहात  असेल  तर  ते  परिक्षेच्या  दिवशी  सुध्दा  लक्षात  रहाणाराच.  वर्षभर  शिकविलेल्यातूनच  परिक्षेमध्ये  प्रश्न  विचारले  जातात.  हा  एकपाठी  विद्यार्थी  कोणत्याही  प्रश्नाचे  उत्तर  आठवून  लिहू  शकतो.  आणि  शंभर  टक्के  गुण  मिळवू  शकतो.  आजच्या  शिक्षण  पध्दतीमध्ये  अजून  काय  पाहिजे  आहे.  याचा  अर्थ  श्रवणभक्ति  आजच्या  शिक्षणामध्ये  सुध्दा  अत्यंत  उपयुक्त  आहे.  हे  एकपाठी  कौशल्य  मनाच्या  एकाग्रतेने  श्रवण  केल्यानेच  प्राप्त  होत  असते.  मनाची  एकाग्रता  शरीराच्या  स्थिरतेनेच  साधता  येते.  ज्या  स्थितीमध्ये  शरीरास  सुख   मनास  स्थिरता  प्राप्त  होते  त्या  शरीराच्या  स्थितीला  आसन  म्हणतात.  अशी  शरीराच्या  स्थितीमध्ये  दीर्घकाळ  रहाणे  त्यास  आसन  जय  म्हणतात.
 किर्तन  म्हणजे  ऐकलेली  माहिती  व्यक्त  करणे.  अध्ययनामध्ये  सांगण्याला  सुध्दा  अत्यंत  महत्व  आहे.  विद्यार्थ्याची  बुध्दी  तो  माहिती  काय   किती  सांगतो  यावर  तपासली  जाते.  माहिती  पटापट  सांगण्यासाठी  ती  प्रथमतः  ऐकलेली  असावी  लागते.  याचा  अर्थ  प्रथमतः  श्रवणभक्ति  हा  अध्ययन  पध्दतीतला  मूलभूत  पाया  म्हणजेच  पहिली  पायरी  आहे.  ऐकलेली  माहिती  सांगणे  ही  दुसरी  पायरी  आहे.  आजच्या  शिक्षण  पध्दतीमध्ये  तोंडी  परिक्षेमध्ये  ही  ऐकलेली  माहिती  व्यक्त  करण्याचा  प्रकार  उपयुक्त  आहे.
 स्मरण  म्हणजे  ऐकलेली  माहिती  आठवणे.  अध्ययनामध्ये  स्मरणशक्तीला  अत्यंत  महत्व  आहे.  आजच्या  शिक्षण  पध्दतीमध्ये  जितकी  स्मरणशक्ती  जास्त  तितके  गुण  परिक्षेमध्ये  आधिक  मिळतात.  विद्यार्थ्याची  स्मरणशक्ती  शंभर  टक्के  असल्यास  तो  लेखी  परिक्षेमध्ये  शंभर  टक्के  गुण  मिळवू  शकतो.  आजच्या  शिक्षण  पध्दतीमध्ये  स्मरणशक्तीचा  सराव  हाच  खरा  अभ्यास  आहे.  याचा  अर्थ  ऐकलेली  माहिती  आठवणे  ही  तिसरी  पायरी  आहे.  स्मरणशक्तीच्या  सरावाने  माहितीज्ञानाची  उजळणी  होते.  व्यवहारामध्ये  सुध्दा  ही  स्मरणशक्ती  अत्यंत  उपयुक्त  आहे.
 पादसेवन  म्हणजे  गुरूंविषयी  श्रध्दा  तसेच  शिक्षकांबद्दल  आदर  भावना  असणे.  विद्यार्थ्याच्या  मनामध्ये  शिक्षकांबद्दल  आदर  भावना  असेल  तरच  त्या  शिक्षकाच्या  शिकविण्याकडे  विद्यार्थ्याचे  लक्ष  लागते.  हा  मानसशास्त्राचा  विषय  समझून  घेतला  तरच  आजच्या  शिक्षणातून  थोर  विचारवंत  उदयास  पावतील.  विद्यार्थ्याच्या  मनामध्ये  शिक्षकांबद्दल  आदर  भावना  येण्यासाठी  शिक्षक  आदर्श  असला  पाहिजे.  शिक्षक  आणि  विद्यार्थ्यांमध्ये  घट्ट  जिव्हाळ्याचे  संबंध  असले  पाहिजेत,  त्यांना  विद्यार्थ्यांबद्दल  ममता  वाटली  पाहिजे  आणि  विद्यार्थ्यांचा  आदर  त्यांनी  सहजतेने  संपादन  केला  पाहिजे,  असे  डॉ.  राधाकृष्णन्  म्हणतात.  तर  आपल्या  देशाचे  राष्ट्रपिता  महात्मा  गांधी  म्हणतात--आपल्या  जीवनातील  व्यक्तीगत  शुध्दता,  पावित्र्य  यांकडे  शिक्षकांचे  लक्ष  नसेल  तर  शिक्षकांचा  नाश  होईल.  केवळ  शिक्षकांच्या  पांडित्याला  काही  किंमत  नाही.  अशा  अनेक  विचारवंतांनी  शिक्षकांच्या  चारित्र्याबद्दल  मुलभूत  विचार  व्यक्त  केले  आहेत.  त्याचा  प्रामुख्याने  शिक्षकांनी   पालकांनी  गांभिर्याने  विचार  केला  पाहिजे.  म्हणून  शिक्षकांबद्दल  आदर  भावना  असणे  ही  अध्ययनातील  चौथी  पायरी  आहे.
 अर्चन  म्हणजे  शिक्षकांबद्दल  आदर  भावना  व्यक्त  करणे.  विद्यार्थ्याच्या  मनामध्ये  शिक्षकांबद्दल  आदर  भावना  व्यक्त  झाल्यास  त्या  शिक्षकाने  शिकविलेले  लक्षात  रहाण्यास  अनुकूलता  प्राप्त  होते.  हा  सुध्दा  मानसशास्त्राचाच  विषय  आहे.  अमुक  शिक्षक  अमुक  विषय  खुप  सोपा  करून  शिकवितात  हे  सांगताना  त्या  विद्यार्थ्यांस  शिकविलेले  आठवते.  विद्यार्थ्याच्या  स्मरणशक्तीची  वृध्दी  होण्यास  हा  अध्ययन  प्रकार  सुक्ष्मतेने  कारणीभूत  आहे  असे  मानसशास्त्राचा  अभ्यास  केला  तरच  समजू  शकते.  म्हणून  शिक्षकांबद्दल  आदर  भावना  व्यक्त  करणे  ही  अध्ययनातील  पाचवी  पायरी  महत्वाची  आहे.
 वंदन  म्हणजे  शिक्षकांबद्दल  कृतज्ञता   नम्रता  असणे.  विद्यार्थ्याच्या  मनामध्ये  शिक्षकांबद्दल  तसेच  शिक्षणाबद्दल  जिव्हाळा,  प्रेम  असेल  तरच  विद्यार्थ्यास  शिक्षणाची,  अभ्यासाची  गोडी  लागते.  आजच्या  शिक्षण  पध्दतीमध्ये  विद्यार्थ्यांना  शिक्षणाची,  अभ्यासाची  गोडी  लागत  नाही  हे  दुर्दैवाने  नमुद  करावे  लागते  आहे.  कारण  विद्यार्थ्याच्या  कृतज्ञतेचा   नम्रतेचा  विचार  करण्याची  व्यवस्था  नाही.  थोर  शिक्षणतज्ञ  आणि  महाराष्ट्र  शासनाचे  माजी  शिक्षणसंचालक  वि.  वि.  चिपळूणकर  आजच्या  शिक्षणपध्दती  वर  कडाडून  टीका  करताना  म्हणतात--आजचे  शिक्षण  केवळ  परिक्षाभिमुख  झालेले  असून  चार  भिंती,  गाईडस्  आणि  परिक्षेचे  फास  यात  विद्यार्थी  गुदमरून  जात  आहेत.  विद्यार्थ्यांना  शिक्षणाची,  अभ्यासाची  गोडी  लागल्यावर  अभ्यास  करा  याचा  तगादा  शिक्षकांना   पालकांना  करावा  लागत  नाही.  विद्यार्थी  आपणहून  अभ्यास  करतील  तेव्हाच  ते  खरे  शिक्षण  घेतील.  म्हणून  हा  कृतज्ञतेचा  प्रकार  ही  अध्ययनातील  सहावी  पायरी  अत्यंत  महत्वाची  आहे.  हे  शिक्षकांनी   पालकांनी  समजून  घेतले  पाहिजे.
 दास्य  म्हणजे  शिक्षकांच्या  आज्ञा  पालनामध्ये  तत्पर  असणे.  विद्यार्थ्याच्या  मनामध्ये  शिक्षकांबद्दल  जिव्हाळा,  प्रेम  असेल  तरच  आज्ञा-पालन  उस्फुर्तपणे  होत  असते.  विद्यार्थ्याच्या  मनामध्ये  शिक्षकांबद्दल  आदर  भावना  येण्यासाठी  शिक्षक  आदर्श  असला  पाहिजे.  शिक्षक  स्वतः  निरंतर  अध्ययनशील  असल्याशिवाय  विद्यार्थ्याना  शिकवू  शकणार  नाही  असे  रविंद्रनाथ  टागोर  म्हणतात.  तर  विद्यार्थ्यांपुढे  आदर्श  व्हावा  अशाच  प्रकारे  शिक्षकाने  आपले  जीवन  व्यतीत  करावे.  मनात  सदैव  पवित्र  विचार  बाळगून  त्यानुसार  दैनंदीन  आचरण  ठेवावे.  शिक्षकांच्या  आचरणातून  विद्यार्थ्यांवर  संस्कार  घडणार  याचा  विचार  सदैव  बाळगावा   त्यासाठी  आचार-विचार-उच्चार  यांचे  पावित्र  कटाक्षाने  पाळावे  असे  भारताचे  माजी  राष्ट्रपती  डॉ.  ए.पी.जे.कलाम  म्हणतात.  शिक्षकांनी  करावयास  सांगितलेला  अभ्यास-सराव,  करण्याने  शिक्षणाची,  अभ्यासाची  गोडी  विद्यार्थ्यामध्ये  वृध्दींगत  होण्यास  अनुकूलता  प्राप्त  होते.  म्हणून  हा  शिक्षकांच्या  आज्ञा  पालनामध्ये  तत्पर  असणे  हा  प्रकार  ही  अध्ययनातील  सातवी  पायरी  अत्यंत  महत्वाची  आहे.  याचा  शिक्षकांनी   पालकांनी  मानसशास्त्रीय  दृष्ट्या  विचार  केला  पाहिजे.
 सख्य  म्हणजे  शिक्षकांच्या  सहवासातून  आचरणातून  शिकणेे.  शिक्षक  विद्यार्थ्यांना  काय  शिकवितात  यापेक्षा  शिक्षक  आचरण  काय  करतात,  यातून  विद्यार्थी  जास्त  शिकत  असतो.  एखाद्या  शिक्षकाने  विद्यार्थ्यांना  सदाचरण  कसे  करावे  हे  महिनाभर  शिकविले  आणि  त्या  महिना  भरामध्ये  त्या  शिक्षकाने  दुराचरण  करताना  विद्यार्थ्यांनी  पाहिले  तर  विद्यार्थी  दुराचरण  शिकतील.  म्हणून  विनोबाजी  भावे  म्हणतात--जे  अनुभवले  जाते,  रक्तात  मुरले  जाते  तेच  खरे  शिक्षण  आहे.  विद्यार्थ्यांना  शिक्षण  देत  आहे,  अशी  दूरची  पुसट  भावनाही  शिक्षकाच्या  मनात  असता  कामा  नये.  यासाठी  शिक्षकाचे  चारित्र्य  आदर्श  असणे  अत्यावश्यक  आहे.  विद्यार्थीदशा  ही  अनुकरणीय  असते.  शिक्षकांच्या  आचरणातूनच  विद्यार्थी  घडत  असतो.  शिक्षकांच्या  व्यसनाचे  अनुकरण  विद्यार्थी  तात्काळ  करीत  असतात  या  मानसशास्त्राचा  शिक्षकांनी   पालकांनी  गांभिर्याने  विचार  केला  पाहिजे.  म्हणून  शिक्षकांच्या  सहवासातून  आचरणातून  शिकणेे  ही  अध्ययनातील  आठवी  अत्यंत  महत्वाची  पायरी  आहे.
 आत्मनिवेदन  म्हणजे  विद्यार्थ्यांनी  शिक्षणामध्ये  समर्पित  होणे.  विद्यार्थी  ज्यावेळी  शिक्षणामध्ये  पूर्णपणे  समर्पित  होतील  तेव्हा  त्यांच्या  शिक्षणाचा  दर्जा  उंचावलेला  असेल.  शिक्षणाचा  दर्जा  सुधारण्याचे  अत्यंत  मौलीक  कार्य  या  समर्पणामध्ये  आहे.  समर्पणामध्ये  एक  ध्यास  असतो.  जेव्हा  विद्यार्थी  शिक्षणाच्या  ध्यासाने  प्रेरीत  होतो,  तेव्हा  तो  उस्फुर्तपणे  अभ्यासामध्ये  एकाग्र  होतो.  म्हणून  स्वामी  विवेकानंद  म्हणतात--मनाची  एकाग्रता  हेच  सर्व  शिक्षणाचे  सार  आहे.  म्हणून  विद्यार्थ्यांनी  शिक्षणामध्ये  समर्पित  होणे  ही  अध्ययनातील  शेवटची  नववी  पायरी  अत्यंत  महत्वाची  आहे.  या  मानसशास्त्राचा  विद्यार्थ्यांनी  शिक्षकांनी   पालकांनी  तसेच  सर्वांनी  गांभिर्याने  विचार  केला  पाहिजे.  कारण  शिक्षण  म्हणजे  फक्त  पैसे  मिळविण्याचे  एक  साधन  नसून  ते  समाज  सुधारण्याचे  अत्यंत  प्रभावी  साधन  आहे.  शिक्षणाचा  दर्जा  सुधारल्याने  सामाजीक  पातळीवर  एका  नवीन  समृद्ध  समाजाची  निर्मीती  होइल.  ज्या  समाजातील  प्रत्येकाची  वैचारीक  क्षमता  उदार,  विशाल  आहे.  राष्ट्रीय  पातळीवर  प्रत्येकामध्ये  विश्वबंधुत्वाची  भावना  निर्माण  होइल.  जी  आजच्या  काळाची  खरी  गरज  आहे.  ही  विश्वबंधुत्वाची  भावना  नुसतीच  धोरणे  जाहीर  करून  होत  नसते.  त्यासाठी  प्रत्येकाच्या  हृदयी  विश्वबंधुत्वाची  खरी  तळमळ  असावी  लागते.
 अशा  रितीने  आजच्या  शिक्षण  पध्दतीमध्ये  सुध्दा  शिक्षणाचा  दर्जा  सुधारण्यासाठी  श्रवण,  किर्तन,  स्मरण,  पादसेवन,  अर्चन,  वंदन,  दास्य,  सख्य  आणि  आत्मनिवेदन  हे  नऊ  प्रकार  क्रमशः  अत्यंत  उपकारक  आहेत.  पहिल्या  पायरीतून  दुसरी  नंतर  तिसरी  याच  पायरी-पायरीने  क्रमशः  या  नऊ  प्रकारांचे  महत्व  अलौकिक  आहे,  कारण  हे  सर्व  नऊ  प्रकार  परस्परपूरक  आहे.  या  भूमिकेतून  विद्यार्थ्यांनी,  शिक्षकांनी   पालकांनी  तसेच  सर्वांनी  या  मानसशास्त्राचा  गांभिर्याने  विचार  केला  पाहिजे.  त्यामुळेच  शिक्षणाचे  अंतिम  ध्येय  साध्य  होऊ  शकेल.  म्हणून  स्वामी  विवेकानंद  म्हणतात--शिक्षणाचा  उद्देश  आहे,  माणसाला  विकसित  होण्याला  सहाय्य  करणे  ज्या  वळणामुळे  इच्छा  शक्तींचा  प्रवाह  आणि  अविष्कार  आपल्या  स्वतःच्या  नियंत्रणाखाली  येऊन  सुफलित  होतो  त्यालाच  शिक्षण  म्हणतात.

 स्वामी  मोहनदास  (भ्रमणध्वनी  ९४२०८५९६१२) swamiji.mohandas@gmail.com


No comments:

Post a Comment