Monday, 17 July 2017

महाराष्ट्रातील मुख्य भक्ति संप्रदाय



  महाराष्ट्रातील  मुख्य  भक्ति  संप्रदाय
 भारताच्या  इतिहासामध्ये  वेदकालापासून  सुरू  असलेली   आता  पर्यंत  वाहात  असलेली  धर्म-तत्त्वज्ञानाची  धारा  अखंड   अत्यंत  समृध्द  आहे.  एखाद्या  महान  पर्वतावर  लहान  मोठे  प्रवाह  उगम  पावतात,  आणि  ते  अनेक  दिशांमध्ये  वेदवेगळे  वाहात  जातात,  काही  एकमेकात  मिसळून  मोठे  बनतात,   त्यांचे  नद्यांमध्ये  रूपांतर  होते.   त्या  नित्य  वाहणाया  नद्या  बनून  सागराला  जाऊन  मिळतात.  तसेच  भारतीय  धर्म-संप्रदायांचे  झालेले  पहावयास  मिळते.  प्रामुख्याने  शैव,  वैष्णव   शाक्त  हे  धर्म-संप्रदाय  गंगा,  यमुना,  नर्मदा,  गोदावरी,  कावेरी  वगैरे  नद्यांसारखे  मोठे,  पुष्ट   नित्य  वाहत  राहणारे  बनले,  तर  काही  संप्रदाय  काही  शतके   विशिष्ट  भूप्रदेशात,  म्हणजे  काही  प्रांतातच  राहिले,  वाढले   नंतर  त्यांचा  विकास  कुंठीत  झाला.
 मध्ययुगीन  कालखंडामध्ये  भारतामध्ये  भक्तिसंप्रदायांचा  उदय  झाला.  तो  प्रथम  दक्षिण  भारतात  तामिळ  प्रांतामध्ये  सातव्या  शतकात  झाला,  आणि  तो  हळूहळू  उत्तरेकडे  कर्नाटक   महाराष्ट्र  प्रांतामध्ये  पसरत  जाऊन  पंधराव्या  शतकापासून  पुढच्या  काळात  उत्तर  भारतात   बंगालमध्ये  दूरदूर  पसरला.  वैयक्तिक  श्रध्दा  निर्माण  झाल्याने  धार्मिक  जीवनाचे  गुणात्मक  स्वरूप  बदलले,  आणि  त्याला  नवे  वळण  लागले.  बाह्य  कर्मकांड,  यज्ञमार्ग   शास्त्राने  सांगितलेले  विधी  करणे  किंवा  ईश्वराच्या  शोधासाठी  संन्यास  घेऊन  घरादारापासून,  समाजापासून  दूर  जाऊन  अरण्यात  ईश्वराचे  ज्ञान  प्रप्त  करून  घेणे  याला  कमी  महत्त्व  दिले  जाऊन  जो  आपल्याला  परमेश्वर  वाटतो  अशा  व्यक्तिशः  प्रेमाचा,  भक्तिचा  संबंध  प्रस्थापित  करण्याकडे  लोकांचे  मन  आकर्षित  झाले.  पूर्वी  फक्त  ब्राह्मण,  क्षत्रिय,  वैश्य  या  तीन  वर्णांच्या  लोकांनाच  मोक्षप्राप्ती  होऊ  शकते  अशी  जी  धारणा  होती  ती  बदलून  वर्ण  निरपेक्षपणे  वर्णभेद   जातपात   मानता  कोणाही  व्यक्तीला  मोक्ष  मिळू  शकतो.  तसेच  सर्वांना  मोक्षप्राप्तीचा  अधिकार   शक्यता  आहे  असा  विचार  समाजामध्ये  दृढ  होऊ  लागला.  वेद,  उपनिषदांमध्ये  धर्मशास्त्रे-पुराणांमध्ये  तत्त्वज्ञान  सोप्या   सरळ  बोलीभाषेमध्ये  सांगण्याचे  कार्य  सुरू  झाले.  तेव्हापासून  बोलीभाषेमध्ये  साहित्य  निर्माण  होऊ  लागले.  त्यामुळे  सर्वसामान्य  अशिक्षीत  मनुष्यास  मोक्षाची  द्वारे  खुली  झाली.  रामानुजाचार्यांनी  जो  वैष्णव  भक्तिसंप्रदाय  सुरू  केला  त्याच्यातूनच  अनेक  भक्तिसंप्रदायांचा  उगम  झाला.  महाराष्ट्रात  नाथसंप्रदायाची  परंपरा  रूजविणारा  गहिनीनाथ  हा  पहिला  नाथसिध्द  होय.  (शके११३०-१२००)  त्याला  नाथ  संप्रदायामध्ये  करभाजनाचा  अवतार  समजतात.  (नवयोगेश्वर--भागवत)  त्याने  नाथपंथास  कृष्णभक्तिची  जोड  दिली.नाथपंथी  योगप्रधान  असल्यामुळे  केवळ  शरीरशुध्दीला  महत्त्व  देणारा  नसून  चित्तशुध्दी   आंतरिक  भाव  याला  प्राधान्य.  चित्तवृत्तीचा  निरोध  मनाच्या  एकाग्रतेसाठी   ध्यानासाठी    अत्यावश्यक.  नाथमार्ग  हा  अद्वैतवादी.  परमपदाशी  समरसीकरण  साधणे  म्हणजे  कुंडलिनी  जागृत  करून  सामाधिस्थितीप्रत  पोचणे होय.  मंत्रयोग,  हठयोग,  लययोग   राज  योग  या  चार  प्रकारच्या  योगांनी  कुंडलिनी  जागृत  करून  तेच  शरीर  नाहिसे  करणे  म्हणजेच  पदपिंडाची  गाठी  होय.  नाथपंथाचा  हठयोगावर  आधिक  भर  आहे.  हठयोगाने  कुंडलिनी  जागृत  करून  शरीराकडून  तेच  शरीर  नाहिसे  करणे  म्हणजेच  पदपिंडाची  गाठी  होय.  त्यासाठी  कुंडलिनी  शक्ति  मूलाधार  चक्रातून  जागी  होऊन  षटचक्रभेद  करून  सहस्त्रार  चक्रात  शिवाला  जाऊन  मिळून  त्यात  एकरूप  होते   हा  तीचा  प्रवास  सुखाचा  व्हावा  म्हणून  धौति,  बस्ति,  नेति,  त्राटक,  नौलि  आणि  कपालभाति  या  सहा  प्रक्रियांनी  नाडीशुध्दी  साध्य  केल्यावर  प्राणादी  वायूंचे  शमन  होते.   अशा  रितीने  कुंडलिनीचा  सुषुम्नामार्ग  खुला  होऊन  ब्रह्मरंध्रातून  सहस्त्रार  चक्रातील  शिवमिलनासाठी  ती  धावत  असते.  मूलाधार  चक्रात  सुप्त  असणारी  ही  कुंडलिनी  शक्ति  जेव्हा  अशा  रितीने  सहस्त्रार  चक्रातील  शिवाशी  समरस  होते  तेव्हा  योग्यास  परमानंदाची  सहजसमाधी  प्राप्त  होऊन  सामरस्याचा  असामान्य  तृप्तीचा  अनुभव  मिळतो.  हेच  नाथपंथांचे  मुख्य  ध्येय.  हठयोग  या  शब्दातील   वर्णाचा  अर्थ  सूर्य  (पिंगला  नाडी)  आणि   वर्णाचा  अर्थ  चंद्र  (इडा  नाडी)असा  आहे.  म्हणून  हठयोग  या  शब्दाचा  अर्थ  उजव्या   डाव्या  नाकपुडीतून  वाहणाया  वायूंच्या  म्हणजे  प्राण   अपान  यांच्‌ा  नियमनाने  चित्ताच्या  वृत्तींचा  निरोध  करणे  असा  होतो.  कारण  इडा  नाडीचा  शेवट  डाव्या  नाकपुडीत   पिंगला  नाडीचा  शेवट  उजव्या  नाकपुडीत  होतो.  नाथ  संप्रदाय  उदयास  येण्या  पुर्वी  धार्मिक   सामाजिक  अधिकाराची  सूत्रे  वैदिक  धर्मानुयायी  व्यक्तींच्या  हातात  होती.  ब्राह्मणांचे   पुरोहितांचे  मोठ्या  प्रमाणात  समाजात  वर्चस्व  होते.स्त्री-पुरूष,  स्पृश्य-अस्पृश्य,  असले  भेद  फार  कडक  होते.  अध्यात्मिक  ज्ञानाचा  अधिकार  सर्वांना  मोकळा  नव्हता.  र्माच्या  बाह्य  व्रतवैकल्यांना   कर्मकांडालाच  सर्वस्वी  महत्त्व  देण्यात  आल्याने  अध्यात्मिक  अंतरंगाकडे  दुर्लक्ष  झाले  होते.   धर्म  हा  यांत्रिक  बनून  अंधश्रध्दांचा  बुजबुजाट  होऊन  गरीब,  अशिक्षित,  दलितवर्ग   स्त्रिया  यांचे  फार  मोठ्या  प्रमाणात  शोषण  होत  होते.  या  सर्व  दोषांचे  निराकरण  करण्याचे  अंशतः  श्रेय  नाथपंथाचे  होते.  कार्य--नाथपंथाने  कैवल्यमुक्तीचे  द्वार  स्त्रिया   शुद्रादिक  सर्वांना  खुले  केले.  धार्मिक  तत्त्वज्ञान  मराठी  हिंदी,  बंगाली  सारख्या  लोकभाषेतून  मांडण्यास  प्रारंभ  केला.  वेदांती,कर्मठ  लोकांची  वैगुण्ये  समाजापुढे  स्पष्टपणे  मांडली.  आधीपासून  चालत  आलेल्या  भक्तिप्रवाहाला  नाथपंथाने  प्रोत्साहन  देऊन  प्रभावी  बनविले.  नमस्मरणा  बरोबरच  इंद्रियनिग्रह,  शुध्द  नैतिक  आचरण,  वैराग्यशीलता  यांना  उचलून  धरून  विकृत   लैगिक  आचरणाला  चांगलाच  आळा  घातला.  वर्णाश्रमधर्म,  रूढी,  कर्मठपणा,  तीर्थयात्रा  इत्यादी  आचारांना  कडवा  विरोध  केला.  नाथ  संप्रदायात  भक्तीचा  ओलावा  नाही  असे  म्हणतात  परंतु  या  संप्रदायाने  गुरूलाच  ईश्वरस्वरूप  मानले,  आणि  आपल्या  अंतःकरणातील  अनिवार  भक्तिपेरमाचा  वर्षाव  गुरूच्या  ठिकाणी  केला.  भक्तिचा  हाच  धागा  गहिनीनाथाने  निरूपलेल्या  कृष्णप्रेमा  भोवती  गुंडाळलेला  आहे.  हिंदू-मुसलमान  असा  भेदभाव   करता  या  नाथपंथाच्या  विशुध्द  भुमिकेशी  समरस  होणाया  मुसलमानांनाही  या  पंथात  समाविष्ट  केले.   अवनती--  या  पंथातील  सर्वांना  योगमार्गाचे  कडक  व्रताचरण  सांभाळणे  पेलवले  नाही.  अशा  परिस्थितीत  शक्तिपूजा,  ब्रह्मचर्याची  पारख  आणि  तांत्रिक  साधना  यांच्या  रूपाने  अनाचाराचे  विष  भिनत  जाऊन  संप्रदायाला  विकृत  वळण  प्राप्त  झाल्याचे  दिसून  आले.  त्यातूनच  पंचमकारांचे  सेवन,  घटपूजन  इत्यादी  मार्गांचा  अवलंब  करणारे  चोलिका  पंथ  किंवा  घोडाचूडी  पंथ  या  सारखे  वामाचारी  उपपंथ  तयार  झाले.  जरी  नाथपंथी  अध्यात्मिक  समता  मानीत  असला  तरी  त्यात  प्रविष्ट  झालेले  मुसलमान  जोगी,  विणकर  जुगी,  पीर  यांच्या  पूर्वीच्या  जातीय  अस्मिता  नष्ट  होऊ  शकल्या  नाहीत   त्यांचे  जातीय  भेद  तसेच  या  पंथात  चालू  राहिले.
 महानुभाव  या  शब्दाचा  महान  अनुभव  असलेल्या  लोकांचा  पंथ  तो  महानुभाव  पंथ  असे  म्हणता  येईल.  चौदाव्या  शतकामध्ये  चक्रधराने  हा  पंथ  स्थापीत  केला.  निवृत्तीपर   वैराग्यपर  असल्याने  वेदांताला  जवळ  आहे.  विद्वानांमध्ये  मतभेद  आहेत.  ज्येष्ठ  अभ्यासक  पांगारकर   गं.बा.  सरदार  यांना  हा  पंथ  वैदीक   भागवत  धर्माला  जवळचा  वाटतो.  कोलते  यांनी  मात्र  हा  पंथ  अवैदीक  असल्याचे  सिध्द  करण्याचा  प्रयत्न  केला  आहे.  तो  एक  उपासना  पंथ  आहे.  त्या  वेळच्या  सामाजिक  परिस्थितीत  सलणाया   बोचणाया  ज्या  विधिनिषेधाच्या  अनेक  गोष्टी  होत्या  त्यावर  या  पंथाने  प्रहार  करून  आचारधर्माचा  एक  नवीन  प्रवाह  निर्माण  केला.  महानुभावांचे  तत्त्वज्ञान  आणि  आचारधर्म  यांचा  सखोल  अभ्यास  असे  आढळून  येते  की  त्यातील  काही  भाग  प्रतिक्रियात्मक  स्वरूपात  व्यक्त  झालेला  आहे.  जीवनातील  द्वंद्वमूलक  संघर्षातून  मुक्त  होण्याच्या  अनिवार  धडपडीतून  वैदिकांच्या  परंपरांत  संन्यासवादी  विचारांचा  पगडा  काही  प्रमाणात  दिसून  येतो.  तत्कालीन  वैदिक  परंपरेतील  व्रतवैकल्ये,  तीर्थयात्रा  इत्यादी  कर्मकांडा  विरूध्द  प्रतिक्रिया-स्वरूपात  कर्मसंन्यासपर  निवृत्तिवाद  महानुभाव  परंपरेत  प्रबळ  झालेला  दिसतो.  यज्ञीय  हिसेला  तीव्र  विरोध  केला.  दुय्यम  प्रतीच्या  देवतांना  फार  महत्त्व   देता  परमेश्वराची  उपासना  हीच  श्रेष्ठ  आहे.  महानुभाव  पंथ  मोक्षप्राप्तीला  परमोच्च  ध्येय  मानतो.  परमेश्वराच्या  अच्युतपदाची  प्राप्ती  हेच  सर्वोत्तम  ध्येय  असले  पाहिजे  असे  चक्रधराने  आपल्या  शिष्यांना  निक्षून  सांगितले  आणि  त्यासाठी  ज्ञानमार्ग   भक्तीचा  प्रेममार्ग  साधनवत  म्हणून  प्रतिपादलेला  आहे.  परंतू  ही  भक्ती  प्रवृत्तिपर  नसून  निवृत्तिपर  आचरणाची  आहे.  त्यांचा  मोक्ष  म्हणजे  अच्युतपदप्राप्ती  असून  त्यात  ईश्वराच्या  ओसंडणाया  आनंदाचे  अधिकारी  बनायचे  असते  म्हणून  ही  भूमिका  द्वैतवादाची  असून  ती  मध्वाचार्यांच्या  मताशी  जुळणारी  आहे.चक्रधराने  चातुर्वण्यांच्या  वैदिक  परंपरेला   वर्णाच्या  उच्च-नीच  भेदांना  मान्यता  दिली  नाही,  उलट  त्याच्यावर  टीका  केली.  आपल्या  पंथाचे  ग्रंथ  मराठीत  रचले  म्हणून  महानुभाव  ग्रंथनिर्मितीस  मराठी  भाषेची  गंगोत्री  म्हणतात.  मराठी  भाषेत  तात्विक   धार्मिक  ग्रंथाची  रचना  करावयास  महानुभावंनी  केलेली  सुरवात  इतिहासाच्या  दृष्टीने  अत्यंत  महत्तवाची  समजली  जाते.  चक्रधरप्रणीत  महानुभाव  द्वैत-तत्त्वज्ञान  जीव,  देवता,  प्रपंच  आणि  परमेश्वर  असे  चार  स्वतंत्र  पदार्थ  मानते.  प्रत्येक  पदार्थ  इतरांपासून  पूर्णपणे  स्वतंत्र  असून  त्यातील  कोणत्याही  दोघांत  पूर्णपणे  ऐक्य  निर्माण  होऊ  शकत  नाही.  जीवाला  जरी  ईश्वराचे  संनिधान  घडले,   त्याची  अविद्या  नष्ट  झाली  तरी  जीव  आणि  ईश्वर  यांच्यातील  द्वैत  संपत  नाही.  म्हणून  महानुभाव  पूर्णद्वैती  आहे.  कार्यरूप  प्रपंच  जड   अनित्य  आहे.  देवता  नित्यबध्द  आहेत.  परमेश्वर  नित्यमुक्त  आहे.  आणि  जीव  बध्दमुक्त  आहे.  महानुभाव  पंथ  ज्ञानापेक्षा  भक्तिमार्ग  आधिक  श्रेयस्कर  समजतो.  परमेश्वर  प्राप्तीसाठी  ज्ञानाला  उत्कट  भक्तीची  जोड  मिळणे  आवश्यक  आहे.  परमेश्वराच्या  आत्यंतिक  प्रेमातून  भक्ती  निर्माण  होते,   ज्ञान  शुष्क   राहता  प्प्रेमार्द्र  बनते.   महानुभावांचा  भर  वैराग्यतेपर   संन्यासावर  आहे.  जिवेश्वरेद,  संन्यास,  भक्ती  आणि  अहिंसा  या  चार  प्रमुख  तत्त्वांवर  या  आचारधर्माची  उभारणी  झालेली  आहे.  हा  संन्यासमार्ग  खूपच  उग्र  आहे.   कार्य--सर्वसामान्यांना  मुक्तीचा  मार्ग  मोकळा  करून  देणे  ही  या  पंथाची  प्रमुख  प्रेरणा  होती.  त्या  काळात  धार्मिक  क्षेत्रात  वैदीक  धर्माचे  शब्दप्रामाण्य   कर्मकांड  यांचा  प्रभाव  ओसरत  चालला  होता.  त्याला  पुनः  बळकट  करण्याचे  कार्य  हेमाद्री,  बोपदेव  यांच्या  सारखे  पंडीत  करीत  होते.  त्यामुळे  उपनि,दातील  थोर  आध्यात्मिक  विचार  बाजूला  पडून  यांत्रिक  कर्मकांड,  तीर्थयात्रा,  व्रतवैकल्ये  यांचेच  प्रस्थ  अधिक  माजू  लागले.  अशा  परिस्थितीत  वैदिक  धर्मातील  कर्मठपणा  बहिर्मुखता  आणि  उच्चवर्णियांचे  वर्चस्व  यांना  प्रभावितपणे  विरोध  करून  ज्ञान   प्रेमभक्ती  यांच्या  दृढ  पायावर  धर्माला  उभे  करण्याची  गरज  ओळखून  ते  कठीण  कार्य  चक्रधराने  केले.  अवघड  योगमार्गाचा  प्रामाणिकपणे  आचार  करणे  अशक्य  झाल्याने  त्याचा  अपरिहार्य  परिणाम  बेगडी  बाह्याचरण  करण्यात   दांभिकतेत  झाला.  तरी  निखळ  अध्यात्म  वाचविण्यासाठी  अशा  बाह्यांगाचा  अव्हेर  करावा  लागतो  ते  महत्त्वाचे  कार्य  चक्रधराने  केले.  हठयोगावर  भर   देता  आपल्या  तत्त्वज्ञानात   आचार  संहितेत  सर्वसामान्य  माणसांना  पेलवेल  अशा  भक्तिमार्गाला  प्राधान्य  दिले.  देवता  नित्यबध्द  असून  त्या  परमेश्वर  नव्हेती  असे  सांगून  त्या  देवतांची  उपासना  गौण  मानली.  त्यामुळे  अज्ञानी  जनतेतकेल्या  जाणाया  गौण  प्रतीच्या  देवतांच्या  तामसी  उपासनेला  आळा  बसण्यास  मदत  झाली.  महानुभावाने  नाथपंथातून  विशुध्दाचरणाचे  महत्त्व,  समत्वभाव,  जनसाधारणाच्या  उन्नतीसाठीलोकभाषेचा  उपयोग,  इत्यादी  गोष्टींचा  स्विकार  केला.  तर  वैष्ण  परंपरेतून  कृष्णभक्ति,  अवतारांची  कल्पना,  माया,  इत्यादी  गोष्टींचा  स्विकार  केला.  जैन  धर्मातील  शुध्द  नैतिक  आचरणावरील  भर  त्यांनी  घेतला.  आणि  या  सर्व  चांगल्या  गोष्टींचा  समन्वय  महानुभाव  पंथाच्या  तत्त्वज्ञानात  करण्याचा  मोठा  प्रयोग  केला.चक्रधरांचा  निःसंगभक्तियोग  आणि  जैनांचा  श्रमणधर्म  यांत  खूपच  साम्य  आढळते.  विषयांची  निवृत्ती,  देहाची  अनास्था,  निराशा   निराश्रय  राहणे,  चित्रीची  ही  स्त्री   पाहणे  इत्यादी  आचार  जैन  श्रमण  आचारांशी  जुळणारे  आहेत.  अहिंसापालन,  कर्मसंन्यासपरता,  निवृत्तीप्रधानता,  स्त्रियांना  संन्यास  घेण्यास  मोकळीक  इत्यादी  गोष्टी  महानुभावांनी  जैनांपासून  घेतलेल्या  आहेत  असे  दिसून  येते.  या  पंथाचा  कटाक्ष  महान  किंवा  व्यापक  अनुभवांवर   आंतरिक  वृत्तींवर  होता,  आणि  तो  समाजावर  मोठ्या  प्रमाणावर  लोकांना  समान  पातळीवर  एकत्र  आणण्याचा  उद्देश  ठेऊन  आपला  संप्रदाय  उदार  पायावर  संघटित  करीत  होता.  अवनती--हा  एक  चमत्कारीक  अंतर्विरोध  आहे  की  ज्या  पंथाचा  उदय  समाजाला  वैदिक  कर्मकांडापासून  मुक्त  करण्याच्या  उद्देशातून  झाला  त्याच्यातच  आचारधर्माच्या  कर्मकांडाचे  इतके  स्तोम  माजले  कि  ज्या  सामान्य  जनांकरिता  तो  पंथ  झटत  होता  त्या  सामान्यजनांना  त्याचे  कठोर  कर्मकांड  पेलवेनासे  झाले.  खाणे,  पिणे,  राहणे,  फिरणे,  झोपणे,  भिक्षा  मागणे,  वेश  करणे  इत्यादी  सामान्य  बाबींसाठी  चक्रधराने  घालून  दिलेले  कडक  नियम  लोकांना  काटेकोरपणे  पाळणे  बोचक  वाटू  लागले.  साधकाने  आचारवयाचा  कमालीचा  निवृत्तीमार्ग,  स्वदेश,  स्वग्राम,  स्वजन  यांचा  त्याग,  इंद्रियनिग्रहाची  अतिरेकी  कल्पना,  देहाविषयी  उपेक्षा,  स्त्री  विषयी  तुच्छभावना  इत्यादी  गोष्टिंचे  पालन  प्रामाणिकपणे  करणे  हे  सामान्य  माणसाच्या  आवाक्याच्या  पलिकडचे  बनले.  त्यामुळे  त्यांच्या  मनात  या  पंथाविषयी  औदासीन्य  निर्माण  झाले.  नाथ  पंथाने  योगसाधनेवर  अवास्तव  भर  दिला  तर  महानुभावांनी  आचारधर्माला  दुर्धर  कर्मकांडाचे  स्वरूप  दिले.  कर्मसंन्यासातू  आलेली  निष्क्रियता  महानुभावांच्या  लोकप्रियतेस  बाधक  ठरली.
 वारकरी  संप्रदाय--महाराष्ट्रामध्ये  बहुजन  समाजात  अत्यंत  लोकप्रिय.  सुक्षिशीत-अक्षिशीत,  श्रीमंत-गरीब,  स्त्री-पुरूष,  वृध्द-बाल,  शहरी-ग्रामीण  असे  कोणतेही  भद   मानणारा.सर्वांना  समान  भावाने  वागविणारा.  सर्व  मानवांना  आपल्या  औदार्याने   वात्सल्याने  पोटाशी  धरून  सर्व  दीनांना  दुर्बलांना   निराधारांना  दिलासा  देणारा  एक  श्रेष्ठ  पंथ  आहे.  तो  ईश्वरनिष्ठ  असूनही  त्याचे  स्वतःचे  असे  कोणतेही  जड  कर्मकांड  नाही,  त्याच्यावर  पुरोहितांचे  वर्चस्व  नाही.  पोथीपुराणांचा  अधिकार  नाही.  त्यात  प्रत्येक  व्यक्ती  आपल्या  कुवती  प्रमाणे,  प्रवृत्तीप्रमाणे,  आवडी  प्रमाणे  भक्ति  करण्यात  रंगून  जाते.  भजन,  कथा-कीर्तन  करणे,  नामस्मरणात  रंगून  जाणे,  बेभान  होन  नाचणे,  गाणे  यातच  या  भक्तांना  परमोच्च  समाधान  वाटते.  त्यांचे  सर्व  भक्तिवाङ्मय  साध्यासुध्या,  मराठमोळ्या  मराठी  भाषेत   बोलीभाषेत  आहे.  त्यामुळे  त्यांचे  अभंग,  ओव्या  ही  निरक्षर  माणसाच्याही  अंतःकरणाचा  ठाव  घेतात,   त्याला  भाराऊन  टाकतात  आणि  त्याला  त्याच्या  संकुचित  स्वार्थाच्या   अहं  च्या  वर,  पलिकडे  घेऊन  जातात.  पंढरपूर  हे  त्यांचे  मुख्य  तीर्थक्षेत्र.  विठोबा  हे  सर्वश्रेष्ठ  दैवत.  वारकयांचा  पेहराव,  कपडे  या  बद्दल  कोणताही  आग्रह  नाही.  वारकरी  होण्यासाठी  गळ्यात  १०८  मण्यांची  तूळशीची  माळ  धारण  करणे  अत्यावश्यक  असते.  तसेच  कपाळावर  बुक्का  लावतात.  आषाढी   कार्तीकातील  एकादशीला  पंढरीचा  वारी  करतात.  रोज  हरिपाठ  म्हणतात.  राम  कृष्ण  हरि  असे  भजन  करतात.  आचरण  शुध्द   नैतिक.  सत्यवचन.  परस्त्रीकडे  मातेच्या  पवित्र  भावनेने  पहावे.  परधनाला  स्पर्श  करीत  नाही.  मद्यपान  नाही.  इंद्रियांवर  नियंत्रण.  भक्तिसाधना  करण्यासाठी  घरदार  ,  संसार   सामाजिक  व्यवहार  सोडून  अरण्यात  जाण्याची  आवश्यकता  नाही.  नामस्रणाने  ईश्वरकृपा  होऊन  मोक्ष  मिळतो.  वैदीक  पंथ.  तत्त्वचिंतनामागील  त्यांची  प्रेरणा  केवळ  बौध्दीक  नव्हती,  तर  अनुभवात्मक  मोक्षप्राप्तीची  होती.  वाककरी  साहित्य  आत्मानुभवातून  उगम  पावलेले  असल्यामुळे  त्यंची  सर्व  वचने  चैतन्याने  वजिवंतपणाने  ओतप्रोत  भरलेली   ओथंबलेली  वाटतात,   त्यांच्यात  केवळ  शब्दांचे  कृत्रिम  फुलोरे  नाहीत,  आणि  तर्ककर्कश  वादविवाद  नाहीत.  ज्ञानेश्वर  हे  या  पंथाचे  जनक.  ज्ञानेश्वरी  एकनाथी  भागवत   तुकारामगाथा  ही  या  पंथाची  प्रस्थानत्रयी.  हा  पंथ  भक्तिप्रधान  असला  तरी  त्याची  बैठक  नुसत्या  भावनेवर  उभारलेली  नाही.  त्या  भक्तिविचारांच्या  मागे  अद्वयानंदाच्या  तत्त्वज्ञानाची  उच्च  बैठक  आहे.  हा  पंथ  अजातवादी,  आत्मसत्तावादी,  ब्रह्मवादी,  अद्वयवादी,  अनुभूतीवादी  आहे.  कर्माची  उपेक्षा   करता  कर्माला  भक्तीची  जोड  दिली.  परमेश्वराशी  अनन्य  होऊन  केलेल्या  स्वकर्माचरणयुक्त  भक्तीतूनच  मानवी  जीवनाला  कल्याणकारक  असे  नितीशास्त्र  जन्माला  येते.  वारकयाच्या  ठिकाणी  दया,  शांती,  आणि  बंधुभाव  या  भावनांचा  उगम  होऊन  त्याला  सर्वांविषयी  जवळीक   जिव्हाळा  लागतो.  त्यांचे  नितीशास्त्र  वैदिक  स्वरूपाचे  आहे.  पुर्वजन्म-उत्तरजन्म,  पाप-पुण्य,  ईश्वराची  सत्ता,  कर्माचा  सिध्दांत,  इत्यादी  वैदिक  कल्पनांवर  त्यांची  आचारसंहिता  आधारलेली  आहे.  हा  पंथ  एकांगी  किंवा  टोकाची  भूमिका  घेत  नाही.  समाजाच्या  व्यापक  हिताच्य  दृष्टीने  निर्णय  घेतले  जातात.  अशी  त्यांची  समतोल  निती  आहे.  रामकृष्णहरि  मंत्र.  नामसाधनेने  परब्रह्माशी  एकरूप  होता  येते  अशी  धारणा.  १०८  जप  करणे,  तुळशीमाळ  धारण  करणे,  गोपीचंदनाची  मुद्रा  लाऊन  बुक्का  लावणे.  पंढरीचा  वारी  करणे.  संताच्या  अभंगाचे  गायन  करणे.  उच्चनिचतेचे  भेद  विसरून  एकत्र  सर्वजण  समान  पातळीवर  आनंद  घेतात.  या  पंथात  अठरा  पगड  जातीतील  प्रत्येक  जातीत  जणु  लहान  मोठे  संत  निर्माण  झाले.  चोखामेळा--महार,  नामदेव--शिंपी,  नरहरी--सोनार.  सावता--माळी,  गोरा--कुंभार,  वेश्यापुत्री--कान्होपात्रा,  सेना--न्हावी  इत्यादी.  जातीची,  वर्णाची  पोलादी  चौकट  काढून  सर्व  मानव  सारखे  अशी  व्यापक  भूमिका  घेऊन  सहिष्णुतेची  भावना  वाढीस  लावली.  वारकरी  नीतीत  सखोल  आध्यात्मिकता  आणि  सामाजिक  अभ्युदय   सुव्यवस्था  या  दोघांनाही  स्थान  असून  त्यंचा  सुरेख  संगम  करण्याचा  प्रयत्न  झालेला  आहे.  ही  नीती  निरामय  समाजव्यवस्थेला  पोषक   संवर्धक  आहे.  संस्कृतातील  दिव्य  ज्ञान  भोळ्या   मराठमोळ्या  अशा  सर्व  अशिक्षीत,  दीन,  गरीब  सामान्य  जनतेला  लोकांना  परिचित  असलेल्या  ओतप्रोत  भरलेला  ग्रंथ  त्यंनी  रसाळ,  सोप्या   आकर्षक  भाषेमध्ये  रचिला.   दिव्य  ज्ञान  सामान्य  माणसांपर्यंत  पोहोचविण्याचे  कार्य  केले.
 या  पंथाने  आत्यंतिक  निवृत्तीचा-मायावादाचा  उपदेश  करून  देश  दुबळा  केला.  त्यांच्या  नामसंकिर्तनानमुळे  टाळकुटेपणाची  साथ  फैलावून  समाज  रसातळास  गेला,  या  पंथाने  दैववाद,  क्षणभंगुरवाद,  दुःखवाद,   नैराश्यवाद  महाराष्ट्राला  शिकविला.   त्याला  क्लीब  बनवून  त्याची  दृष्टी  परलोकाकडे  वळविली   त्याला  अभ्युदयापासून  च्युत  केले  अशा  तहेची  टीका  इतिहास  संशोधक  राजवाडे  यांनी  या  पंथावर  केली  आहे.  दत्तसंप्रदाय--१४व्या  शतकापासून  नृसिंह  सरस्वती  यांच्या  पासून  झाली.  दत्तोपासनेला  प्राधान्य.  शक्तिदानाची  पध्दती  आहे.  दत्तोपासनेच्या  बळावर  सिध्द  पुरूषांना  अशा  शक्ती  प्राप्त  होतात  आणि  त्या  शक्तीच्या  प्रभावाने  दत्तभक्त  लोकांची  दुःखे  दूर  करून  त्यांना  साधनेच्या  मार्गावर  सांभाळून  नेऊ  शकतात  अशी  भावना  सामान्य  लोकांच्या  मनात  रूजत  गेली   या  भावनेतच  या  संप्रदायाच्या  लोकप्रियतेचे  रहस्य  आहे.  गुरू  उपासनेला  जास्त  महत्त्व.  पुजेसाठी  मुर्ती  ऐवजी  पादुका  वापर्ण्याची  पध्दत.  गुरूचरित्र  हा  मुख्य  ग्रंथ.  कठोर  उपासना,  काया  क्लेश   आत्मक्लेश  यावर  भर.  दत्तसंप्रदायापुर्वी  नाथपंथ,महानुभावपंथ,  वारकरी  पंथ  अस्तित्वात  आले   नंतर  समर्थपंथ  झाला.  समर्थ  पंथ--  रामदासस्वामी  संस्थापक.  श्रीराम,  हनुमान,  तुळजाभवानी  ही  दैवते.  सनातन,  पारंपारिक  अध्यात्मज्ञानाचाच  पुरस्कार  केलेला  असून  त्याची  मांडणी  मात्र  नाविन्यपुर्ण  आणि  अधिक  चिकीत्सक  रितीने  केलेली  आहे.  त्यांनी  संदिग्धतेली   संदेहाला  वाव  ठेवलेला  नाही.  त्यावर  शंकराचार्यांच्या  तात्विक  दृष्टिकोनाचा  खूपच  प्रभाव  झालेला  आहे.  रामदासांनी  अद्वैताचा   मायावादाचा  पुरस्कार  केलेला  आहे.  वारकरी   परिवर्तनवादी  तर  रामदासी  मात्र  पुनरूज्जिवनवादी.  वाकयांनी  समतेचा  पुरस्कार  केला  तर  रामदासांनी  वर्णवर्चस्वाची  तरफदारी  करून  उच्चनीच  भावाला  बळकटी  आणली.  संतांनी  भूतदयेवर  भर  दिला.  तर  रामदासांनी  पराक्रमाची  महती  गाईली.  वारकयांनी  परमार्थबुध्दीचा  आग्रह  धरला.  तर  रामदासांनी  प्रपंचसिध्दीलाही  पाठींबा  दिला.  रामदास  पंथाने  संघटना  तत्त्वाला  प्रयत्नवादाची   ध्येयवादाची  जोड  देऊन  धार्मिक  जीवन  दुबळे   राहू  देता  करारी   पुरूषार्थी  बनविले.  लोकांत  स्वदेश,  स्वधर्म   स्वसंस्कृती  याच्या  विषयी  निष्ठा   नवे  प्रेम  उत्पन्न  करून  स्वाभिमान  शिकवून  तेजस्वी   झुंझार  बनविले.
 ज्ञानेश्वरांनी  स्फुर्तिवादाच्या  बीजरूपाने  सांगितलेला  कर्मयोग,  नामदेवांनी  दूरवर  जाऊन  लावलेला  ज्ञानदीप,  एकनाथांनी  दाखविलेला  समन्वय  पंथ  आणि  तुकारामात  दिसून  येणारी  भक्तियुक्त  अंतर्मुखवृत्ती  या  सर्वांचा  परमोच्चसंगम  रामदासात  आढळतो.  या  चौघांची  कर्तृत्वे  आपणांमध्ये  सामावून  घेऊन  रामदासांनी  त्यावर  स्वतच्या  स्वतंत्र  अशा  कर्तृत्वाचा  जो  ध्वज  फडकावला  त्याला  तर  इतिहासामध्ये  तोड  नाही  असे  शं.गो.  तुळपुळे  म्हणतात.

 -------स्वामी  मोहनदास,  भागवताचार्य   एल  -  ५०७   चंद्रमा-  विश्व,   धायरी,   पुणे  -  ४११०४१


No comments:

Post a Comment