Sunday, 2 July 2017

भागवत एक जीवन पध्दती


  (१)  भागवत  एक  जीवन  पध्दती --  

   Audio साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक् करा -

स्कंध १ ला    २ रा    ३ रा     ४ था      ५ वा      ६ वा   
       ७ वा    ८ वा    ९ वा   १० वा    ११ वा   १२ वा
   

भागवतामध्ये  मनुष्याने  जीवन  कसे  जगावे  तसेच  मृत्यसमयी  काय  करावे  याचे  मार्गदर्शन  केले  आहे.भागवत  हा  एक  आध्यात्मिक  विचार  आहे.  शरीराचा  आत्म्याशी  असलेला  संबंध  समजून  घेण्याचा  विचार  आहे.  भागवत  म्हणजे  फक्त  इतिहास  तसेच  पुराण  नाही,  ते  एक  परमसत्य  आहे.  भागवत  हा  एक  मनुष्यजीवन  सार्थकी  लावण्याचा  सविस्तरपणे  केलेला  उपदेश  आहे  आता  भागवताचे  इतिहासरूप  दर्शन  असे  आहे.  भागवत  हा  एक  हिंदू  संस्कृतीतील  महत्वाचा  धार्मिक  ग्रंथ  आहे.  जेव्हा  परमात्म्याचे  स्वरूप  जाणण्याची  इच्छा  ब्रह्मदेवास  झाली  तेव्हा  परमात्म्याच्या  स्वरूपाचा  उपदेश  प्रथम  विष्णुु  भगवानाने  ब्रह्मदेवाला  सांगितला.  तो  चतुःश्लोकी  भागवत  म्हणून  प्रसिध्द  आहे.  नंतर  नारदमुनींना  या  विश्वाचा  आधार  जाणण्याची  इच्छा  झाली  तेव्हा  ब्रह्मदेवाने  नारदमुनींना  परमसत्याचा  उपदेश  सांगितला.  महर्षी  व्यासांनी  अनेक  अध्यात्मिक  वाङमय  रचले.  वेदांचे  चार  भाग  केले.  वेदांचे  अध्यापन  केले.  सतरा  पुराणे  रचली  तरी  पुर्ण  समाधान  झाले  नाही.  तेव्हा  देवर्षी  नारदमुनींनी  महर्षी  व्यासांना  भक्तिचा  उपदेश  केला  ती  भागवताची  प्रस्तावना  आहे.  महर्षी  व्यासांनी  या  उपदेशानुसार  भागवत  पुराण  रचले  ज्यामध्ये  श्रीहरीगुणसंकिर्तन  प्रामुख्याने  आहे.  असे  हे  आत्मज्ञानाचे  महत्त्व  सांगणारे  दिव्यज्ञान  त्यांंनी  कलीयुगाच्या  प्रारंभी  आपल्या  पुत्र  शुकदेवास  शिकविले  जो  परमभक्त  असून  पुर्ण  वैरागी  होता.  शुकदेवाने  हाच  भागवत  उपदेश  परीक्षितास  सात  दिवसांमध्ये  केला.  जेव्हा  अर्जुनाचा  नातू  परीक्षितास  शमीकपुत्रा  कडून  तक्षकसर्पदंशाने  सातव्या  दिवशी  मृत्युचा  शाप  मिळाला  तेव्हा  परीक्षिताने  गंगाकीनारी  आमरण  उपोषण  केले  त्यावेळी  परीक्षिताने  शुकदेवास  प्रश्न  केला  माझ्या  जीवनाच्या  अंतकाळी,  मृत्युसमयी  काय  करावे  जेणे  करून  या  मनुष्यजन्माचे  सार्थक  होईल.  त्यावेळी  शुकदेवाने  परीक्षितास  सात  दिवस  जो  उपदेश  केला  तेच   हे  भागवत  होय.  सात  दिवसांमध्ये  परीक्षिताने  शुकदेवास  विश्वनिर्मीतीविषयी,  श्रीहरीअवतारांविषयी,  श्रीहरीलीलांविषयी,  हरीभक्तांविषयी,  आत्मज्ञानाविषयी  अनेक  प्रश्न  केले.  त्याचे  शुकदेवाने  विस्ताराने,  कथानकाद्वारे  प्रत्युतर  केले.  असे   हे  भागवताचे  स्वरूप  परीक्षित   शुकदेव  यांचे  संवादरूपाचे  आहे.  सात  दिवस  अखंड  तत्वज्ञान  ऐकून  परीक्षितास  आत्मज्ञानाचा  बोध  झाला.  त्याचा  देहाभिमान  पूर्णपणे  नाहीसा  झाला.  तो  ब्रह्मस्वरूप  झाला.  त्यास  मोक्ष  प्राप्त  झाला.  तेव्हा  या  गंगाकिनारी  परीक्षित  महाराजा  बरोबर  अनेक  साधु,  ऋषी,  मुनी  हे  दिव्यज्ञान  श्रवण  करण्यासाठी  बसले  होते.  त्यामध्येच  सुतमहाराज  नावाचे  एक  ज्येष्ठ  मुनी  सुध्दा  होते.  त्यांनी  हे  भागवताचे  दिव्यज्ञान  पुढे  शौनक  ऋषींना  निमीषारण्यामध्ये  कलीयुगातील  संकटावर  रामबाण  उपाय  म्हणून  हे  भागवत  पुराण  सांगितले  आहे.  आजच्या  काळामध्ये  जे  भागवत  पुराण  उपलब्ध  आहे  ते  सुत  मुनींनी  शौनक  ऋषींना  सांगितलेले  लिखीत  स्वरूपामध्ये  आहे.  हा  भागवत  ग्रंथ  संस्कृत  भाषेमध्ये  आहे.  म्हणुन  एकनाथ  महाराजांनी  सर्वसामान्यांसाठी  मराठी  भाषेमध्ये  केवळ  भक्तिरूप  तत्त्वज्ञान  असलेल्या  अकराव्या  स्कंधाचे  निरूपण  केले  आहे.  ते  एकनाथी  भागवत  म्हणून  प्रसिध्द  आहे.  पुढे  त्यांच्याच  वंशातील  कृष्ण  दयार्णवांने  एकनाथांच्या  आज्ञेप्रमाणे  श्रीकृष्णलीलेच्या  दहाव्या  स्कंधाचे  मराठी  भाषेमध्ये  निरूपण  केले.  ते  हरिवरदा  या  नावाने  प्रसिध्द  आहे.  या  भागवतधर्माला  स्थळाचे,  जातीचे,  धर्माचे,  वंशाचे,  काळाचे  कोणतेच  बंधन  नाही.  हा  भागवतधर्म  सदा  सर्वकाळ  सर्वांसाठी  आहे.  हे  तत्वज्ञान  जिज्ञासू  पर्यंत  पोहोचविण्याची  आज  गरज  आहे.  आपल्या  संस्कृतीचा  वारसा  उद्याच्या  नवीन  पिढीला  देणे  हे  आपले  कर्तव्यच  आहे.  भागवताचा  आज  उपयोग  काय,  हे  भागवत  म्हणजे  काय,  हे  समजल्यावर  स्पष्ट  होतो.  भागवत  ही  एक  जीवन  पध्दती  आहे.  अखिल  मानवांच्या  शांती,  समाधानासाठी  भागवत  अत्यंत  उपयुक्त  आहे.  ते  फक्त  आस्तिकांसाठीच  आहे,  हिंदूंसाठीच  आहे,  भक्तांसाठीच  आहे,  असे  कदापीही  नाही.  तर  भागवत  अखिल  मानवांसाठी  आहे.  भागवतातील  मुख्य  तत्त्वज्ञान  आत्मज्ञानाची  ओळख  आहे.  ही  ओळख  मनामध्ये  रूजल्यानंतर  देहाची  आसक्ती  कमी  होते.  जेव्हा  महाभारतातील  युध्दभूमीमध्ये  द्रोणाचार्यांना  आपला  पुत्र  अश्वत्थामा  मारला  गेला  हे  युधिष्ठिरा  कडून  समजले  तेव्हा  द्रोणाचार्यांचा  जीवनाचा  दृष्टीकोन  पुर्णपणे  बदलला.  त्यांनी  शस्त्रत्याग  केला   ध्यानस्थ  झाले.  आपला  पुत्र  अश्वत्थामाच  आता  या  जगात  राहीला  नाही  तर  आता  माझ्या  जीवनाला  काही  अर्थ  नाही  अशी  त्यांची  स्थिती  झाली.  हे  पुत्राच्या  बाबतीत  होते  तर  आपला  देह  म्हणजे  आपण  नाही  हे  समजल्यानंतर  काय  स्थिती  होईल.  जशी  भगवान  रमण  महर्षींची  झाली  होती.  तात्पर्य़  हेच  की  जेव्हा  देहाचीच  आसक्ती  कमी  होते  तेव्हा  मान,  अ्‌पमान,  गर्व,  अहंकार,  क्रोध,  मोह,  मत्सर  सर्व  काही  देहाचे  गळून  पडते.  हेच  आजच्या  परिस्थितीचे  मुळ  कारण  आहे.  आज  आपण  सर्वत्र  पहातो  आहे.  चोरी,  दरोडे,  खून,  मारामारी,  जाळपोळ,  हत्याकांड,  सत्तेची  हाव,  भ्रष्टाचार,  स्त्रीयांवर  अत्याचार,  इत्यादी  सर्व  काही  देहाच्या  आसक्तीमुळेच  होते  आहे.  आजच्या  काळातील  उदाहरण.  भारताचे  उपराष्ट्रपती  यांना  राष्ट्रपती  पद  मिळाले  नाही  तर  लगेच  त्यांना  मानसिक  धक्का  बसला   त्यात  त्यांचा  अंत  झाला.  राष्ट्रपती  पद  हेच  जीवनाचे  ध्येय  समजून  ते  मिळाले  तरच  जीवन  नाही  तर  जीवनाला  काही  अर्थ  नाही  अशी  त्यांची  समजूत  झाली.  असो.  भागवतातील  मुख्य  जीवनमूल्य  आत्मज्ञान  अवगत  झाल्यामुळे  आजच्या  समाजातील  देहाभिमान  संपून  आज  भेडसावणाया  सर्व  समस्या  संपुष्टात  येतील.  आजच्या  सर्व  समस्या  देहाशी  निगडीत  आहेत.  देहाभिमानाचा  विसर  झाल्यावर  एकात्मतेची  भावना  निर्माण  होइल.  मुख्य  म्हणजे  मृत्युचे  भय  रहाणार  नाही.  कारण  मृत्यु  हा  देहाचा  आहे.  आणि  आपले  खरे  स्वरूप  देह  नसून  आत्मा  आहे.  भागवताच्या  आचरणाने  वेगवेगळ्या  पातळीवर  जीवन  उध्दाराचे  बदल  दिसून  येतात.  वैयक्तीक  पातळीवर  आत्मज्ञानाची  जाण  होऊन  मनःशांती  निरोगी  शरीर  सुख  समाधान  मिळेल.  कौटुंबिक  पातळीवर  कुटूंबातील  प्रत्येकाचे  जीवन  सुखी  समृद्ध  होइल.  लहान  मुलांचे  संस्कार  त्याच  वातावरणात  चांगले  होतील.  सामाजीक  पातळीवर  एका  नवीन  समृद्ध  समाजाची  निर्मीती  होइल.  ज्या  समाजातील  प्रत्येकाची  वैचारीक  क्षमता  उदार,  विशाल  आहे.  राष्ट्रीय  पातळीवर  प्रत्येकामध्ये  विश्वबंधुत्वाची  भावना  निर्माण  होइल.  जी  आजच्या  काळाची  खरी  गरज  आहे.  ही  विश्वबंधुत्वाची  भावना  नुसतीच  धोरणे  जाहीर  करून  होत  नसते.  त्यासाठी  प्रत्येकाच्या  हृदयी  विश्वबंधुत्वाची  खरी  तळमळ  असावी  लागते.  म्हणून  या  तत्त्वज्ञानाचा  विचार  करून  त्याच्या  आचरणानेच  केवळ  मनुष्यजन्माची  सार्थकता  आहे  त्याचा  अनुभव  घ्यावा.
 .  .  .  .  .स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार    एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       

 (२)श्रीमद्  भागवत--  भागवताचे  अज्ञान  म्हणजे  आपल्या  अस्तित्वाचे  अज्ञान  होय.  कारण  आपले  अस्तित्व  हे  केवळ  आत्म्याशी  निगडीत  आहे.  मनुष्याच्या  मृत्युनंतर  शरीर  तेथेच  रहाते.  त्यातील  प्राण  निघून  जातो.  तो  प्राण  म्हणजेच  आत्मा  होय.  शरीराला  जन्म-मृत्यु  आहे,  तर  आत्मा  अमर  आहे.  शरीर  नाशीवंत  आहे  तर  आत्मा  शाश्वत  आहे.  हे  परमसत्य   जाणता  शरीरालाच  मी  म्हणणे,  समजणे  यालाच  भागवताचे  अज्ञान  म्हणतात.  या  भागवताच्या  अज्ञानामूळे  मनुष्य  शरीराची  जोपासना  करतो.  आपण  शरीर  आहे  मानतो.  त्याला  शरीराचा   कर्माचा  अहंकार  होतो.  आणि  त्या  कर्माचे  इच्छित  फळ  मिळाले  नाही  तर  तो  दुःखी  होतो,  क्रोधी,  मत्सरी  होतो.  मग  त्यातूनच  चोरी,  दरोडे,  खून,  मारामारी,  जाळपोळ,  हत्याकांड,  सत्तेची  हाव,  भ्रष्टाचार,  स्त्रीयांवर  अत्याचार  इत्यादी  वाईट  प्रकार  निर्माण  होतात.अज्ञानामूळे  मनुष्य  स्वतःचेच  नुकसान  करून  घेतो  जे  भरून  काढता  येणे  अशक्य  होते  कारण  तो  भौतिक  सुखामध्ये  जन्मभर  गुंगून  जातो,  त्यातच  त्याचा  अंत  होतो.     नंतर  अंतकाळी  ज्या  भौतिक  सुखाचे  चिंतन  असेल  त्याप्रमाणे  पुनर्जन्म  मिळतो.मनुष्यजन्म  मिळेलच  असे  नाही.  आणि  भागवतातील  आत्मज्ञान  समजून  घेणे  केवळ  मनुष्यजन्मामध्येच  शक्य  आहे.  पशू,  पक्षी,  कीटक  यांना  विचारशक्ती  नाही.  म्हणून  मनुष्यजन्म  उपभोगासाठी  नाही  तर  आत्मज्ञानाच्या  अनुभूतीमध्ये  मनुष्यजन्माची  सार्थकता  आहे.  भागवताचा  विसर  संस्कारामूळे  झाला  आहे.  आज  आपल्या  प्राचीन  संस्कृतीचे  अंशच  फक्त  शिल्लक  राहीले  आहेत.  संस्काराला  खूप  महत्व  आहे.  लहान  मूलांवर  जसे  संस्कार  होतील  तेच  त्यांचे  पुढिल  आयुष्य  घडवून  आणतात.  आजच्या  विज्ञान  प्रगतीमध्ये  मनुष्य  बहिर्मुख  प्रगत  झाला  परंतू  अंतर्मुख  अधोगतीस  चालला  आहे.  विज्ञानामूळे  अणूशकक्ती  सारख्या  अनेक  शक्तींची  निर्मिती  करून  मनुष्याचा  अहंकार  दुणावला  आहे.  अणूशकक्तीची  भिती  दाखवून  इतरांस  तो  हीन  समजू  लागला  आहे.  माझ्याकडे  शक्ती  आहे  मी  काहिही  करू  शकतो  अशा  विचारांनी  आजचा  काळ  संकूचित  वृत्तीचा  बनला  आहे.  सर्व  भौतिक  वस्तूंचा  पूरेपूर  उपभोग  घेणे  हाच  संस्कार  या  काळामध्ये  प्रकर्षाने  दिसून  येतो.  पण  या  सर्व  भौतिक  वस्तू  निर्माण  कोणी  केल्या  याचा  विचार  सुध्दा  करण्याची  इच्छा  होत  नाही.  समाजामध्ये    भागवतातील  आत्मज्ञानाचा  उपदेश  रूजविण्याचे  कार्य  सफल  झाले  नाही  याची  अनेक  कारणे  आहेत.  समाजाची  परीस्थिती  हे  एक  प्रमूख  कारण  आहे.  आजच्या  काळामध्ये  विश्वास  हे  जीवनमूल्य  नाहीसे  होत  चालले  आहे.  कोणी  आत्मज्ञानाचा  उपदेश  केला  तर  विश्वास  नसल्यामूळे  त्यावर  दुर्लक्ष  केले  गेले.  देव  कोठे  आहे  ?  दाखवा  म्हणजे  विश्वास  बसेल  अशी  आजची  विचारधारा  आहे.  विश्वासामध्ये  आदराची  भावना  असते.  आज  कोणाचाच  कोणाला  आदर  नाही.सर्वांनाच  मी  चा  अहंकार  झाला  आहे.  आज  या  अहंकाराला  समाजामध्ये   प्रतिष्ठा  प्राप्त  झाली  आहे  हे  मोठे  दुर्दैव  आहे.  या  अहंकारामूळे  भागवताचा  विसर  होतो.  भागवतातील  तत्त्वज्ञान  आत्मानुभूतीचे  आहे.  देहभान  विसरून  आत्म्याचा  आनंद  घेणे  हा  भागवताचा  अनुभव  आहे.  जो  अनुभव  सम्राट  परीक्षिताला  त्याच्या  अंतसमयी  आला  तो  दिव्य  अनुभव  हा  भागवताचा  अनुभव  आहे.  याच  अनुभूतीसाठी  शुकदेवाने  सात  दिवस  भागवत  पुराण  सम्राट  परीक्षिताला  सांगितले.  आपण  कोण  आहे  या  परमसत्याचा  साक्षात्कार  होणे  हा  भागवताचा  अनुभव  आहे.  आपले  खरे  स्वरूप  आत्मा  आहे.  शरीर  हे  आत्म्यास  प्रकट  होण्याचे  एक  साधन  आहे.  कारण  आत्मा  अव्यक्त  आहे.  त्याला  प्रकट  होण्यासाठी  साधनाची  गरज  असते.  जसे  मनुष्यशरीर,  पशुशरीर,  वृक्ष  वेली  इत्यादी.  जो  आत्मा  मनुष्यशरीरात  आहे  तोच  आत्मा  किडा-मुंगीमध्ये,  हत्तीमध्ये  झाडांमध्ये  आहे.  प्रकट  होण्यासाठी  साधने  वेगवेगळी  आहेत.  ज्या  प्रमाणे  सूर्यामधून  निघालेली  सूर्यकिरणे  असंख्य  ठीकाणी  एकाच  प्रकारची  असतात  त्याप्रमाणे  सत्यरूप  परमात्मा  अंशरूपाने  सर्व  प्राणीमात्रांमध्ये  आत्मारूपाने  स्थित  असतो.  आत्मानुभव  हा  केवळ  दिव्य  अनुभव  आहे.  कारण  हा  अनुभव  इंद्रियातीत,  त्रिगुणातीत  आहे.  कारण  इंद्रिये  आणि  त्रिगुण  प्रकृती  हे  शरीराशी  संबंधीत  आहे.  तर  आत्मा  निर्गुण,  निराकार,  अव्यक्त   अविनाशी  आहे.  श्रीकृष्णाने  हे  दिव्य  तत्त्वज्ञान  संक्षेप्तामध्ये  भागवत  पुराणातील  दहाव्या  स्कंधामध्ये  तर  विस्ताराने  उध्दवाला  सांगितल्याचा  उल्लेख  भागवतातील  अकराव्या  स्कंधामध्ये  दिसून  येतो.  जेव्हा  श्रीकृष्णाने  आपल्या  दिव्य  शरीरासहीत  स्वधामगमन  करण्याचा  संकल्प  केला  तेव्हा  आपल्या  संपुर्ण  यदुवंशाचा  ब्राह्मण  शापाने  संहार  करवून  घेतला.  परंतू  केवळ  एकट्या  उध्दवास  आपल्या  या  तत्त्वज्ञानाचा  प्रसार  करण्यासाठी  बद्रीनाथ  क्षेत्री  सुरक्षित  ठेवले.  या  तत्त्वज्ञानाला  उध्दव  गीता  असेही  म्हणतात.  या  तत्त्वज्ञानाचा  त्यानंतर  सुमारे  पाच  सहा  हजार  वर्षांच्या  कालखंडामध्ये  अनेक  विचारवंतांनी  अभ्यास  केला  त्याचे  आचरण  करण्याचा  प्रयत्न  केला  आणि  आत्मसाक्षात्कार  प्राप्त  करून  घेतला. 
 अलिकडच्या  काळामध्ये  संतश्रेष्ठ  एकनाथ  महाराजांनी  या  तत्त्वज्ञानाचे  निरूपण   आचरण  करून   स्वतःचा  आत्मोध्दार  करून  घेतलेला  आहे.  याच  एकनाथी  भागवताची  तुकाराम  महाराजांनी  एक  हजार  पारायणे  केली  असा  उल्लेख  रामचंद्र  कामत  यांनी  संपादित  केलेल्या  सार्थ  एकनाथी  भागवत  या  मध्ये  केलेला  आहे.  तसेच  आजच्या  काळातील  पावसचे  परम  पूजनीय  स्वामी  स्वरूपानंदांचे  शिष्य  स्वामी  विद्यानंद  यांनी  या  भागवताच्या  सर्वव्यापी  तत्त्वज्ञानाचा  मागोवा  घेऊन  त्याचा  प्रत्यक्ष  अनुभव  घेतला   तेच  तत्त्वज्ञान  आजच्या  काळाला  पचेल  रूचेल   अंगी  बाणता  येईल  असे  सुगम  सोपे  करून  सांगितले  आहे.  भावार्थ  श्रीमत्  भागवत  या  पुस्तकामध्ये  स्वामी  विद्यानंद  म्हणतात  -  नाथ  भागवत  हा  ग्रंथ  तत्त्वज्ञानाचे  विवेचन  करणारा  श्रेष्ठ,  मंगल,  तेजस्वी,  महाज्ञानी  तसेच  कोणत्याही  काळामध्ये   विश्वाच्या  कोणत्याही  क्षणी  प्रबोधनकारक,  चिरंजीव  स्वरूपाचा  आहे.  तसेच  भागवताच्या  सूक्ष्म  अभ्यासाने  माझ्या  जीवनाला  फार  सुंदर  वळण  लागले  असे  संत  वाङमयाचे  थोर  अभ्यासक  प्रा.  के.  वि.  बेलसरे  आपल्या  भावार्थ  भागवत  या  पुस्तकात  म्हणतात  -  विसाव्या  शतकातील  मानव  समाजापुढे  जी  समस्या  उभी  आहे  तिचे  उत्तर  शोधून  काढण्याच्या  प्रयत्नातून  भावार्थ  भागवत  तयार  झाले.
 .  .  .  .  स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार    एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (३)श्रीमद्  भागवत--  हे  भागवत  पुराणातील  तत्त्वज्ञान  सांगण्याचा  प्रयत्न  येथे  केलेला  आहे.  तसेच  हे  तत्त्वज्ञान  आज  रोजच्या  दैनंदीन  जीवनामध्ये  आचरणात  आणता  येते  आणि  त्यामुळे  मनुष्य  जीवनाचा  उध्दार  होतो  हे  सांगण्याचा  प्रयत्न  केला  आहे.  कारण  धर्मशास्त्र  वाचणायांपेक्षा,  ते  समजणायांपेक्षा,  त्या  धर्मशास्त्राचे  आचरण  करणारे  सर्वश्रेष्ठ  आहेत  असे  मनुस्मृतिमध्ये  बाराव्या  अध्यायातील  श्लोक  क्रमांक  १०३  येथे  सांगितले  आहे.  अज्ञेभ्यो  ग्रन्थिनः  श्रेष्ठा  ग्रन्थिनःभ्योधारिणोवराः   धारिभ्यो  ज्ञानिनः  श्रेष्ठाज्ञानिम्योव्यवसायिनः  ।।१२.१०३।।  -  मनुस्मृति  या  विश्वातील  सर्व  प्राणी  आपापल्या  कर्माप्रमाणे  जन्माला  येतात  आणि  जन्मभर  ज्याप्रमाणे  कर्म  करतात  त्याप्रमाणे  त्यांना  मरणानंतर  गती  मिळते.त्या  कर्मा  नुसार  त्यांना  सुखदुःख  प्राप्त  होतात.  मनुष्य  आपल्या  पुर्व  कर्मांच्या,  संस्कारांच्या  आधीन  आहे.  पुर्व  संस्कार  चांगले  असतील  तर  उत्तम  शरीर  प्राप्त  होते  तर  पुर्व  संस्कार  वाईट  असतील  तर  हलके  शरीर  प्राप्त  होते  अशा  रितीने  कर्म  हाच  मनुष्याचा  गुरू  तसेच  ईश्वर  आहे.  म्हणून  मनुष्याने  पुर्वजन्मीच्या  कर्म  संस्काराप्रमाणे  मिळालेल्या  वर्णानुसार  स्वधर्माचे  आचरण  करून  प्रत्येकाच्या  कर्माचा  आदर  करावा.  ज्यामुळे  मनुष्याचे  जीवन  सूरळीत  चालते  तोच  त्याचा  इष्ट  देव  आहे.  जसे  विवाहीत  स्त्री  आपला  लग्नाचा  पती  शिवाय  इतर  पुरूषांची  सेवा  करते  तीला  कधीही  शांती  मिळत  नाही.  तसेच  जो  मनुष्य  आपले  इष्टदेव  सोडून  दुसया  देवाची  उपासना  करतो  त्याला  कधीही  सुख  मिळत  नाही.  असे  भागवतातील  दहाव्या  स्कंधातील  चोवीसाव्या  अध्यायामध्ये  स्पष्टपणे  सांगितले  आहे.  श्रीकृष्णाने  हे  तत्त्वज्ञान  आपल्या  पित्यासमान  नंदराजाला  सांगितले  आहे.  इंद्राची  पूजा  करण्याची  प्रथा  चूकीची  आहे  हे  त्याने  नंदराजाला  तसेच  सर्व  गोकुळवासींना  समजावून  सांगितले  आहे.  आपण  जे  काही  कर्म  करतो  ते  समजून  उमजून  करावे  हे  महत्वाचे  तत्त्व  आजच्या  दैनंदीन  व्यवहारामध्ये  सुध्दा  भयंकर  महत्वाचे  आहे.  कारण  समजून  उमजून  केलेले  कर्म  अंधश्रध्दा  रहित  बुध्दिने   कार्यक्षमतेने  केले  जाते.  मनुष्य  जीवन  हा  एक  जन्मापासून  मरणा  पर्यंतचा  अखंड  प्रवास  आहे.  जेव्हा  आत्मज्ञान  मिळविण्याची  तीव्र  जिज्ञासा,  तळमळ  असते  तेव्हा  मनुष्य  जन्म  प्राप्त  होतो  परंतू  मनुष्य  जन्म  प्राप्त  झाल्यानंतर  मायेच्या  असंख्य  प्रलोभनामुळे  तो  मनुष्य  त्या  मायेमध्येच  गुंग  होतो.  तरीसुध्दा  लाखामध्ये  एखादा  जिज्ञासू  मायेचा  त्याग  करून  आत्मज्ञान  प्राप्त  करून  घेतो.  मनुष्य  अनुभवातून  शिकतो.  हे  कर्मच  त्याला  शिकविते  काय  करावे  आणि  काय  करू  नये.  धर्मशास्त्राच्या  अभ्यासाचे  कर्म  करून  मनुष्याला  आत्मज्ञान  होऊ  शकते.  स्वधर्माचे  आचरण  सोडून  स्वार्थाने  परधर्माचे  आचरण  सुरू  झाले  आणि  समाज  व्यवस्थेची  अधोगती  सुरू  झालेली  आहे.  जेव्हा  कोणतेही  कर्म  करताना  कमीपणा  कींवा  मोठेपणा  मानला  जातो   त्या  कर्मामध्ये  स्वार्थ  भूमिका  असते  तेव्हा  कलह  निर्माण  होतो.  ब्राह्मणाने  ब्राह्मण-कर्मा  बरोबर  स्वार्थी  हेतूने  ज्ञानाचा  व्यापार  केला  तर  ब्राह्मण-कर्माचे  पावित्र्य  संपून  शिक्षणाचा  खेळखंडोबा  होतो.  क्षत्रियाने  क्षत्रिय  कर्मा  बरोबर  स्वार्थी  हेतूने  रक्षणाचा  व्यापार  केला  तर  क्षत्रिय-कर्माचे  पावित्र्य  संपून  संरक्षणाची  शक्ती  कमी  होते.  वैश्याने  वैश्य  कर्मा  बरोबर  स्वार्थी  हेतूने  व्यापार  केला  तर  वैश्य-कर्माचे  पावित्र्य  संपून  व्यापाराची  कार्यक्षमता  कमी  होते.  शूद्राने  शूद्र  कर्मा  बरोबर  स्वार्थी  हेतूने  सेवाभावाचा  व्यापार  केला  तर  शूद्र-कर्माचे  पावित्र्य  संपून  सेवाभाव  वृत्ती  संपते  हेच  आजच्या  भयाण  परिस्थितीचे  मूळ  कारण  आहे.  ज्या  भिन्न  भिन्न  व्यक्तींचा  समाज  बनतो  त्या  व्यक्तींच्या  भिन्न  भिन्न  शारिरीक,  मानसिक,  बौध्दिक,  शक्ति   कर्तृत्व  यांचा  पुर्ण  विचार  करून  या  संस्कृतीमध्ये  ब्राह्मण,  क्षत्रिय,  वैश्य   शूद्र  या  चार  वर्णांची  व्यवस्था  केली  आहे.  समाजाची  प्रगति,  उध्दार  व्हायचा  असेल  तर  त्या  करिता  समाज  हितबुध्दिने  प्रेरित  झालेला  निःस्वार्थी,  ज्ञान-विज्ञानाची  उपासना  करणारा  बुध्दिमान  विचारवंतांचा  वर्ग,  बलोपासना  करून  परचक्र   समाज  कंटक  यापासून  समाजाचे  संरक्षण  करण्यास  सदैव  सज्ज  असा  वीरवृत्ति  लोकांचा  शासक  वर्ग,  कृषि-व्यापार   इतर  आर्थिक  व्यवहार  यांची  दक्षतेने  जोपासना  करून  समाजाच्या  योगक्षेमाची  काळजी  घेणारा  असा  संपत्तीचा  उत्पादक  वर्ग,  आणि  समाजाच्या  उपयोगी  अशी  इतर  कार्ये  शारिरीक  श्रम  करून  पार  पाडणारा  सामान्य  जनांचा  वर्ग  अशा  स्थूलमानाने  विभागलेल्या  चार  व्यावसायिक  वर्गाची  समाजाला  आवश्यकता  आहे.  ही  सनातन  सामाजिक  गरज  लक्षात  घेऊन  चार  वर्ण  व्यवस्था  केली  आहे.  ही  वर्ण  व्यवस्था  गुणकर्मांचा  विचार  करून  व्यक्तीचे  सामाजिक  स्थान  निश्चित  करते  परंतू  जन्मानुसार  वर्णआश्रम  व्यवस्था  आपल्या  धर्मशास्त्रामध्ये  अजिबात  नाही.  दुर्दैवाने  ती  नंतर  जन्मानुसार  झाली  याचे  कारण  व्यावहारीक  सोय  हेच  आहे.  जन्मल्याबरोबर  मुलाचे  गुण-कर्म  कसे  ओळखायचे  आणि  जर  ओळखता  आले  नाही  तर  त्याचे  संस्कार  कोणत्या  वर्णांनुसार  करायचे.  केवळ  याचमुळे  वर्णंव्यवस्था  जन्मानुसार  झाली.  परंतू  धर्मशास्त्रास  हे  मान्य  नाही.  मनुष्याचा  वर्ण  त्याच्या  जन्मानुसार  ठरवून  त्याचे  संस्कार  त्या  वर्णांनुसार  करायचे  ही  प्रथा  रूढ  झाली  परंतू  पुढे  त्याच्या  विकसित  गुण-कर्मानुसार  वर्ण  बदलण्याची  प्रथा  रूढ  झाली  नाही.  त्याचमूळे  आज  वर्णंव्यवस्थेवर  टीका  होते.  तरी  ही  चूक  आता  लक्षात  घेऊन  स्वधर्माचे  आचरण  करून  समाजाची  प्रगती  करणे  महत्वाचे  आहे.  समाज  परिपुर्ण  समृध्दतेने  वैभव  संपन्न  व्हायचा  असल्यास  त्यासाठी  कोणताही  एक  वर्ग  तेव्हढाच  असणे  उपयोगाचे  नाही.  समतेचे  गोंडस  रूप  धारण  करणारी  स्वतंत्रता-समता-बंधुता  ही  फ्रॆंच  राज्यक्रांतीतून  जन्माला  आलेली  समाजव्यवस्था  ऐकावयाला  आकर्षक  वाटत  असली  तरी  शेवटी  रक्ताचे  पाट  वाहविण्यास  कारणीभूत  झाली.  रोमन  साम्राज्याचा  नाश  वर्णसंकरामुळेच  झाला  असे  वा.  दा.  तळवळकर  चातुर्वर्ण्य  या  पुस्तकात  सांगतात.  तर  वर्णसंकरामुळे  अमेरिकन  लोकांचा  बुद्ध्यांक  उणावत  जात  आहे  असे  एका  जपानी  विचारवंतांनी  केलेल्या  चाचणी  मध्ये  स्पष्ट  झाले  आहे.  भौतिक  समृध्दीसाठी  एकवर्णात्मक  समाजरचना  उपयुक्त  नाही  असे  जस्टिस  वुड्राफ,  रोमारोला,  जॉॅर्ज  डवुर्ड,  मेरिडीथ  टाऊनशेड,  पेट्रिक  गेडेस,  व्हि.ए.स्मिथ,  सिडने  ला,  हेन्रॣ  कॉटन  अशा  अनेक  पाश्चात्य  समाजशास्त्राच्या  विचारवंतांचे  मत  असून  चार  वर्ण  व्यवस्थेचा  त्यांनी  गौरव  केलेला  आहे.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       

 (४)श्रीमद्  भागवत--  हे  श्रीमद्  भागवत  महापुराण  महर्षी  व्यासदेवांनी  रचलेले  आहे.  यामध्ये  निष्काम  परमधर्माचे  निरूपण  केलेले  आहे.  तो  परमधर्म  म्हणजे  निरपेक्ष  श्रीकृष्ण  भक्ती  होय.  ज्या  मनुष्यांचे  हृदय  शुध्द  आहे,  मत्सरशून्य  आहे,  त्यांच्यासाठी  श्रीकृष्णाच्या  दिव्य  लिलांचे  निरूपण  येथे  केलेले  आहे.  हे  श्रीमद्  भागवत  साक्षात  भगवंताचेच  रूप  आहे.  यामध्ये  आत्मस्वरूपाच्या  तत्त्वज्ञानाचे  प्रामुख्याने  निरूपण  केलेले  आहे.  आत्मज्ञानाच्या  जिज्ञासेने  श्रीकृष्ण  भक्ति  वाढते  आणि  भौतिक  वस्तुं  विषयांची  आसक्ति  कमी  होऊ  लागते.  हळू-हळू  ही  आसक्ति  कमी  होऊन  पूर्णपणे  नष्ट  झाल्यावर  परब्रह्माची  अनुभूती  येते.  आत्मसाक्षात्कार  होतो.  या  अलौकिक  ग्रंथामध्ये  अध्यात्म,  मानसशास्त्र,  समाजशास्त्र,  विश्वनिर्मिती,  कालगणना  आणि  भारतीय  संस्कृतीचा  इतिहास  विस्ताराने  सांगितलेला  आहे.  मनुष्यास  केवळ  बुध्दीच्या  जोरावर  परमानंद  मिळू  शकत  नाही.  केवळ  बुध्दीच्या  विकासाने  मनुष्याच्या  जीवनाची  इतिश्री  होत  नाही.  आज  पाश्चात्य  देशांंमध्ये  मानसिक  आणि  वैज्ञानिक  समृध्दीने  माणूसकीचा  घोर  अपमान  होत  आहे.  ज्ञानाची  अवहेलना  होत  आहे.  आज  सगळीकडे  रजोगुणी  अहंकार  वाढत  चालला  आहे.  तसेच  त्याला  प्रतिष्ठा  प्राप्त  होत  आहे  ही  मोठी  दुर्दैवाची  गोष्ट  आहे.  भागवतामध्ये  हाच  अहंकार  नष्ट  करण्याचा  आटोकाट  प्रयत्न  केलेला  आहे.  म्हणून  आज  अखिल  मानवाच्या  कल्याणा  साठी  भागवताच्या  प्रबोधनाची  अत्यंत  आवश्यकता  आहे.  विश्वबंधुत्वाची  प्रेम  भावना  संपुर्ण  विश्वामध्ये  प्रचलित  करण्यासाठी  भक्तीमार्गाच्या  आचरणाची  आवश्यकता  आहे.  भक्तियोगाने  सर्वांमध्येे  एकता,  समानता  आणि  अभिन्नतेची  भावना  उत्पन्न  होते.  मनुष्यजीवन  सुख-शांतीमय  बनू  शकते.  जो  मनुष्य  भगवंताचा  आहे  तो  भागवत  असा  भागवत  या  शब्दाचा  अर्थ  आहे.  तसा  अर्थ  भागवतातील  अनेक  प्रसंगामध्ये  भक्तांसाठी  व्यक्त  झालेला  आहे.   निष्काम  भक्ताच्या  हृदयामध्ये,  तसेच  त्याच्या  सर्वांगामध्ये  भगवंताचा  निवास  असतो.  भक्त  केवळ  भगवंतासाठी  जगतो.  त्याचे  साध्य,  साधना  सर्व  काही  श्रीकृष्णामध्ये  सामावलेले  असतेे.  या  भागवताचे  ढोबळपणे  चार  भागांमध्ये  विभाजन  करता  येते.  घटनात्मक,  उपदेशात्मक,  स्तुत्यात्मक,  आणि  गीतात्मक  असे  हे  चार  विभाग  आहेत.  त्यापैकी  उपदेशात्मक  विभागामध्ये  भगवंताने,  भगवंताच्या  अवतारांनी,  अनेक  राजांनीे,  गुरूजनांनी,  साधु-महात्म्यांनीे,  आणि  मित्रांनी  उपदेश  केलेले  आहेत.  या  उपदेशांचे  आचरण  करून  आज  सुध्दा  मनुष्य  आपले  कल्याण  साधू  शकतो.  त्याचेच  येथे  प्रबोधन  केले  जात  आहे.  हा  भागवताचा  उपदेश  आजच्या  भयाण  परिस्थितीमध्ये  अत्यंत  कल्याणकारी  आहे.  परमशांतीनेच  मनुष्याचे  दुःख  दूर  होऊ  शकते.  ही  शांती  मिळविण्यासाठी  भागवताचे  आचरण  करणे  अत्यंत  आवश्यक  आहे.  असा  आज  सगळीकडे  असत्याची  प्रशंसा  आणि  सत्याची  अवहेलना  प्रतिष्ठित  झालेली  आहे.  जो  मनुष्य  जितका  सुशिक्षित  आहे,  बुध्दिवान  आहे,  तितकाच  तो  स्वरूपज्ञान  प्राप्त  करून  घेण्या  ऐवजी  माहिती-प्रधान  ज्ञानामध्ये  डूबलेला  दिसून  येतो.  त्याच्या  जीवनामध्ये  शांतीचा  अभाव  आहे.  ही  मनः  शांती  भागवताच्या  अभ्यासाने  मिळू  शकते.  ज्या  मनुष्यास  आत्मज्ञान  मिळविण्याची  तिव्र  इच्छा  आहे,  त्यांच्यासाठी  हे  भागवत  परमात्म्याचे  दर्शन  घडविणारा  अतुलनीय  दीपक  आहे.  कलियुगाच्या  सुरवातीला  भाद्रपदातील  नवमी  पासून  सात  दिवस  शुकदेवाने  परीक्षिताला  हा  भागवत  उपदेश  केला  तेव्हा  परीक्षितास  मोक्ष  प्राप्त  झाला.  त्यानंतर  आषाढातील  नवमी  पासून  सात  दिवस  गोकर्णाने  धुंधुंकारीला  हे  भागवत  सांगितले,  तेव्हा  धुंधुंकारीची  प्रेतयोनिपासून  मुक्तता  झाली.  कार्तीकातील  नवमी  पासून  सात  दिवस  सनत्कुमारांनी  देवर्षी  नारदांना  हे  भागवत  सांगितले,  तेव्हा  भक्ती,  ज्ञान  आणि  वैराग्यास  पुन्हा  चैतन्य  प्राप्त  झाले.  त्यानंतर  सुत  महाराजाने  शौनकऋषींना  हे  भागवत  सांगितले,  ते  कलियुगातील  सर्व  दोषांवर  रामबाण  उपाय  म्हणून  सिध्द  झाले  आहे.  हेच  भागवत  आज  आपल्या  कडे  लिखीत  स्वरूपामध्ये  उपलब्ध  आहे.  त्यामध्ये  बारा  स्कंध  असून  अठरा  हजार  श्लोक  आहेत.
 श्रीमद्  भागवतातील  पहिल्या  स्कंधामध्ये  सूत  महाराजांनी  शौनकऋषींना  उपदेश  केला  आहे.  हे  श्रीमद्  भागवत  अत्यंत  गोपनीय  रहस्यात्मक  पुराण  आहे.  हे  भागवत  भगवंताच्या  स्वरूपाचा  अनुभव  करून  देणारे  असून  सर्व  वेदांचा  सारांश  आहे.  ज्याने  श्रीकृष्ण  भक्ति  होते  तोच  मनुष्याचा  सर्वश्रेष्ठ  धर्म  आहे.  ती  भक्ति  निरपेक्ष  असून  अविचलित,  अढळ  असतेे.  कर्म  बंधनातून  मुक्ति  आणि  भगवंताची  प्राप्ति  हेच  धर्माचे  वास्तविक  फळ  आहे.  परमसत्य  जाणण्याची  जिज्ञासा  होणे  हे  त्या  धर्माचे  उद्दीष्ट  आहे.  जो  मनुष्य  श्रध्दापुर्वक  वर्णाश्रमाचे  आचरण  करतो  आणि  महापुरूषांची  सेवा  करतो  त्यास  श्रीहरि  कथांमध्ये  गोडी  निर्माण  होऊन  परमेश्वरा  विषयी  प्रेम  उत्पन्न  होते.  भगवंताच्या  स्वरूपाचे,  गुणांचे,  लीलेचे,  नामाचे,  आणि  तीर्थक्षेत्राचे  श्रवण-कीर्तन  अत्यंत  पवित्र  आहे.  जो  मनुष्य  भगवंताच्या  अलौकीक  कथेचे  श्रध्देने  श्रवण  करतो,  त्याच्या  हृदयामध्ये  परमेश्वर  प्रगट  होतो.  त्यामुळे  त्याचे  अतःकरण  निर्मळ  होते.  तेव्हा  त्या  साधकाच्या  स्वभावातील  रजोगुण  आणि  तमोगुण  शांत  होतात.  आणि  हृदयामध्ये  सत्त्वगुण  स्थिर  होऊन  तो  अत्यंत  पवित्र  होतो.  त्यास  परमानंद  प्राप्त  होतो.  अशा  प्रकारे  मनुष्याची  भौतीक  आसक्ति  नष्ट  झाल्यामुळे  त्यास  भगवंताच्या  स्वरूपाचे  ज्ञान  होते.  त्याच्या  सर्व  शंकांचे  समाधान  होते.  कर्मयोगाच्या  आचरणाने  कर्मबंधनातून  मुक्ति  मिळते.  कलिच्या  पाच  जागा  आहेत.  १)जूगार  --  जेथे  असत्याचा  व्यवहार  होतो.  २)मद्यपान  --  त्याने  उन्मत्तपणा  येतो.  ३)स्त्रीसंग  --  यामुळे  कामवासनेमध्ये  आसक्ती  होते.  ४)हिंसा  --  तेथे  निर्दयता  वाढते.  ५)सुवर्ण  --  ज्यामुळे  लोभ  होतो.  ही  सर्व  अधर्माची  लक्षणे  आहेत.  ज्या  मनुष्यास  आपले  कल्याण  साधायचे  आहे,  त्याने  कधीही  यांचा  विचार  करू  नये.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       

 (५)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  दूसया  स्कंधामध्ये  शुकदेवाने  परीक्षितास  उपदेश  केला  आहे.  मृत्यु  समयी  मनुष्याने  अजिबात  घाबरू  नये.  त्याने  आत्मस्वरूपाची  अनुभूती  करून  घ्यावी  कारण  मृत्यु  तर  शरीराचा  असतो.  त्याचे  खरे  स्वरूप  आत्मारूप  आहे.  आत्मा  अविनाशी  आहे,  शाश्वत  आहे.  वैराग्याच्या  शस्त्राने  शरीराची   इतर  सर्वांची  आसक्ती  नष्ट  करावी.  पवित्र  तीर्थक्षेत्रातील  एकांतामध्ये  ॐकाराची  साधना  करावी.  प्राणवायुस  नियंत्रित  करून  मनाचे  संयमन  करावे.  विवेक  बुध्दीने  इंद्रिये  स्थिर  करावीत.  देहत्याग  होई  पर्यंत  आपले  एकाग्र  चित्त  परमेश्वरावर  स्थिर  करावे.  या  साधनेमध्ये  चित्त  विचलित  होत  असेल  तर  ते  हळुहळु  धैर्याने  योगाने  स्थिर  करण्याचा  प्रयत्न  करीत  रहावे.  चतुश्लोकी  भागवतामध्ये  परमात्म-स्वरूपाच्या  ज्ञानाचा  उपदेश  साक्षात  भगवंताने  ब्रह्मदेवास  केलेला  आहे.  पहिल्या  श्लोकामध्ये  सांगतात,  या  सृष्टिच्या  पुर्वीपासून  परामात्मा  होता,  तेव्हा  तोच  एकटा  होता.  तसेच  या  दिसणाया  सृष्टिमध्ये  तोच  प्रतीत  होत  आहे.  आणि  सृष्टि  प्रलया  नंतर  तोच  फक्त  असणार  आहे.  दूसया  श्लोकामध्ये  सांगतात,  वास्तवामध्ये  ही  सृष्टि  नसताना  सुध्दा  केवळ  त्याच्या  शक्तीमुळे  ती  अनुभवता  येते  ही  भगवंताची  माया  समजावी.  तिसया  श्लोकामध्ये  सांगतात,  सर्व  प्राणीमात्रांमध्ये  तो  आत्म्याच्या  रूपाने  स्थित  आहे,  तरी  ही  तो  अव्यक्त  आहे.  चौथ्या  श्लोकामध्ये  सांगतात,  परमात्मा  सर्वत्र  आणि  सर्वदा  स्थित  आहे,  हेच  वास्तविक  परमतत्त्व  आहे.  ज्यास  हे  परमात्मा  तत्त्व  जाणून  घेण्याची  इच्छा  आहे,  त्याने  फक्त  इतकेच  अनुभवावे.  या  परमसत्याच्या  अनुभूती  नंतर  ब्रह्मदेवाचा  विश्व  निर्मितीच्या  कर्तृत्वाचा  अहंकार  नष्ट  झाला.  या  आत्मज्ञानाच्या  साक्षात्कारा  नंतर  देहाभिमान  होत  नाही.  शरीराची  आसक्ती  नष्ट  होते.  ब्रह्मदेवाने  भागवतातील  दहा  लक्षणांचा  उपदेश  देवर्षी  नारदास  केलेला  आहे  आश्रय,  सर्ग,  विसर्ग,  स्थान,  पोषण,  उति,  मन्वन्तर,  ईशकथा,  निरोध,  मुक्ति  अशी  दहा  लक्षणे  भागवतामध्ये  सांगितलेली  आहेत.  या  दहा  लक्षणांचे  भागवतामध्ये  विस्ताराने  वर्णन  केलेले  आहे.  यामध्येै  आश्रयतत्त्व  अत्यंत  महत्त्वाचे  आहे.  सर्व  प्राणीमात्रांचा  आधार  एकमेव  परमेश्वर  आहे  असा  आश्रय  शब्दाचा  अर्थ  आहे.  या  सगुण-साकाररूप  आश्रयाचे  दहाव्या  स्कंधामध्ये  आणि  निर्गुण-निराकाररूप  आश्रयाचे  बाराव्या  स्कंधामध्ये  विशेष  वर्णन  केलेले  आहे.  आश्रयतत्त्वामध्ये  भगवंताचे  अधिष्ठान,  साक्षित्व  आणि  निरपेक्षता  सिध्द  होते.  या  सृष्टिची  उत्पत्ती  आणि  प्रलय  ज्या  महत्  तत्त्वाने  प्रकाशित  होतो  ते  परब्रह्म  म्हणजेच  आश्रय  होय.  अध्यात्मशास्त्रांमध्ये  त्यालाच  परमात्मा  म्हणतात.  दूसरे  लक्षण  सर्ग  आहे.  महतत्त्व,  विवीध  अहंकार,  तन्मात्रा,  इंद्रिय  आणि  पंचमहाभूतांच्या  सृष्टीस  सर्ग  म्हणतात.  तिसरे  लक्षण  विसर्ग  आहे.  ब्रह्मदेवाने  निर्माण  केलेल्या  सृष्टिस  विसर्ग  म्हणतात.  ब्रह्मदेवाने  प्रणिमांत्रांच्या  इच्छे  प्रमाणे  एका  बीजापासून  दूसरे  बीज  अशा  प्रकारची  सृष्टी  निर्माण  केली,  त्यास  विसर्ग  म्हणतात.  या  सृष्टीचे  वर्णन  परीक्षीताला  विस्ताराने  सांगितले  आहे.  या  विसर्ग  लक्षणाने  भगवंताच्या  सर्वोत्कृष्ट  ज्ञानाचा,  शक्तिचा  आणि  पराक्रमाचा  बोध  होतो.  या  सृष्टितील  प्रत्येक  रचनेमधील  आश्चर्य  पाहून  साधक  भक्त  मंत्रमुग्ध  होतात.  भागवतामध्ये  हे  वर्णन  करण्याचे  कारण  हेच  आहे  की  मनुष्याने  या  सृष्टि  द्वारा  आश्रयभूत  भगवंताला  ओळखले  पाहिजे.  चौथे  लक्षण  स्थान  आहे.  या  ब्रह्मदेवाने  निर्माण  केलेल्या  सृष्टिस  ज्याचे  अधिस्थान  आहे,  ज्याचा  आधार  आहे,  त्याला  स्थान  म्हणतात.  या  सृष्टिचा  व्यवहार  कसा  चालतो,  त्याच्या  मर्यादा  कोणत्या  आहेत,  त्याचा  विस्तार  किती  आहे,  अशा  अनेक  गोष्टिंचा  विचार  या  स्थान  लक्षणामध्ये  केला  जातो.  याचा  विचार  केल्यानंतर  भगवंताची  सर्वोत्कृष्टता  सिध्द  होते.  तोच  या  ब्रह्मांडाचा  आधार,  मर्यादा  प्रवर्तक  आणि  संरक्षक  आहे.  ही  भगवंताची  श्रेष्ठता  भागवतामध्ये  विस्ताराने  सांगितलेली  आहे.  या  महान  कार्याचा  विचार  केल्यास  कोणताही  मनुष्य  भगवंताच्या  चरणांशी  शरणागती  घेण्यास  प्रवृत्त  होईल.  पाचवे  लक्षण  पोषण  आहे.  भगवंताच्या  प्रत्येक  अवताराचे  मुख्य  कारण  प्राणीमात्रांवर  कृपा  करणे  हेच  आहे.  म्हणून  परमेश्वर  त्यांचे  पोषण  करतो.  तो  जात-पात,  धर्म-कर्म,  आणि  आचार-विचार  याकडे  दुर्लक्ष  करून  सर्व  प्राणीमात्रांना  आपलेसे  करतो.  हा  कृपाळूपणा  भगवंताच्या  प्रत्येक  अवतार  चरित्रामध्ये  दिसून  येतो.  त्याचा  अभ्यास  करून  मनुष्याने  भगवंताच्या  कृपेचा  आदर  करून  आपले  जीवन  कृतार्थ  केले  पाहिजे.  सहावे  लक्षण  उति  आहे.  उतिचा  अर्थ  आहे  कर्मवासना.  कर्मबंधनामुळेच  मनुष्य  आपले  खरे  स्वरूप  विसरला  आहे.  सर्व  प्राणिमात्रांचे  व्यवहार  सुरळीत  चालण्यासाठी  प्रत्येकास  कर्म  स्वातंत्र्य  आहे.  तसेच  कर्माचा  सिध्दांत  आहे.  मनुष्यास  प्रत्येक  कर्माचे  बंधन  भोगावे  लागणार  आहे.  या  कर्मवासने  मुळेच  मनुष्य  दुःखी  होत  असतो.  या  कर्मवासनेचे  दुःखरूप  ओळखून  त्याचा  त्याग  केला  पाहिजे.  या  कर्मबंधनाच्या  त्यागाचा  भागवतामध्ये  अनेक  ठीकाणी  उपदेश  केला  आहे.  सातवे  लक्षण  मन्वन्तर  आहे.  मन्वन्तर  म्हणजे  काळाची  गणना  करण्याचे  साधन  होय.  ४३,२०,०००  वर्षांची  एक  चतुर्युगी  होते.  अशा  ७१  चतुर्युगीचे  एक  मन्वन्तर  होते  तर  अशा  चौदा  मन्वन्तरांचा  एक  कल्प  होतो.  त्यापैकी  आता  वैवस्वत  नावाच्या  सातव्या  मन्वन्तरातील  अठ्ठाविसाव्वे  चतुर्युग  चालू  आहे.  आठवे  लक्षण  ईशकथा  आहे.  भगवंताच्या  आणि  भक्तांच्या  अनेक  आख्यानाने  युक्त  चरित्रास  ईशकथा  म्हणतात.  भागवतामध्ये  भगवंताच्या  अनेक  अवतारांच्या,  तसेच  परम  भक्तांच्या  कथा  सांगितलेल्या  आहेत.  या  कथा  श्रध्देने  श्रवण  केल्यानेच  भक्ती  दृढ  होत  असते.  अशा  भक्ती  मुळे  अंतःकरणाची  शुध्दी  होते.  अहंकार  नष्ट  होतो.  आणि  आत्मज्ञान  प्राप्त  होऊ  शकते.  म्हणून  श्रीहरिकथा  तन्मयतेने  ऐकल्या  पाहिजेत,  भगवंताचे  स्मरण,  चिंतन  केले  पाहिजे.  नववे  लक्षण  निरोध  आहे.  जेव्हा  परमेश्वर  योगनिद्रा  स्विकार  करून  शयन  करतात,  तेव्हा  ब्रह्मांडाचा  प्रलय  होतो  आणि  सपुर्ण  सृष्टि  परमात्म्यामध्ये  लीन  होते  त्यास  निरोध  म्हणतात.  यामध्ये  सपुर्ण  सृष्टिचे  संहारण  होते.  या  प्रलयाचे  वर्णन  भागवतामध्ये  विस्ताराने  केलेले  आहे.  दहावे  लक्षण  मुक्ति  आहे.  अज्ञानकल्पित  कर्तृृत्व  आणि  भोक्तृत्व  यांचा  परित्याग  करून  वास्तविक  स्वरूप  परमात्मामध्ये  स्थिर  होणे  याला  मुक्ति  म्हणतात.  निष्काम  भक्ती  करून  आत्मसाक्षात्कार  होऊ  शकतो.  या  आत्मज्ञानामध्ये  स्थिर  होणे  यास  मुक्ति  म्हणतात.  भागवतामध्ये  पाच  प्रकारच्या  मुक्तीचे  वर्णन  केले  आहे.  भगवंताच्या  नित्य-चिन्मय  धामामध्ये  रहाणे  ही  सालोक्य  मुक्ति  आहे.  भगवंताच्या  सारखे  ऐश्वर्य  प्राप्त  होणे  ही  सार्ष्टि  मुक्ति  आहे.  भगवंताचा  निकट  सहवास  लाभणे  ही  सामीप्य  मुक्ति  आहे.  भगवंता  सारखे  रूप  प्राप्त  होणे  ही  सारूप्य  मुक्ति  आहे.  आणि  भगवंतामध्ये  एकरूप  होणे  ही  सायुज्य  मुक्ति  आहे.  हीच  सायुज्य  मुक्ति  सर्वश्रेष्ठ  आहे.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (६)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  तिसया  स्कंधामध्ये  कपिलदेवाने  सांख्ययोगाचा  उपदेश  देवहुतिस  केला  आहे.  अध्यात्मयोग  हेच  मनुष्य्याच्या  आत्यंतिक  कल्याणाचे  मुख्य  साधन  आहे.  कारण  यामुळे  मनुष्याची  सुखदुःखे  कायमची  नष्ट  होतात.  मानवी  मन  हेच  बंधन  आणि  मुक्तीचे  कारण  आहे.  जेव्हा  मनुष्याचे  मन  इंद्रिय  विषयांमध्ये  आसक्त  होते  तेव्हा  ते  जन्म-मृत्युचे  कारण  बनते,  आणि  तेच  मन  भगवंताचे  स्मरण,  चिंतन  करते,  तेव्हा  ते  जन्म-मृत्युच्या  मुक्ति  चे  कारण  बनते.  ज्या  मनुष्याचे  चित्त  एकमेव  भगवंतामध्ये  स्थिर  झाले  आहे,  त्या  मनुष्याची  जी  स्वाभाविक  प्रवृत्ती  आहे,  तीला  अहैतुकी  भक्ति  म्हणतात.   ती  मुक्तिहून  श्रेष्ठ  आहे.  कारण  जसे  जठराग्नी  खाल्लेले  अन्न  पचवितो,  त्याप्रमाणे  ही  भक्ति  कर्मसंस्काराच्या  लिंगशरीरास  तात्काळ  भस्म  करते.  त्यामुळे  पुन्हा  जन्म-मरणाच्या  यमयातनां  पासून  मनुष्य  मुक्त  होतो.  आत्मदर्शनरूप  ज्ञान  हेच  मनुष्याच्या  मोक्षाचे  कारण  आहे.  त्यानेच  देहाभिमान  नष्ट  होतो.  या  संपूर्ण  ब्रह्मांडाला  व्यापून  जो  स्वयंप्रकाशित  आहे,  त्याला  पुरूष  म्हणतात.  तो  अनादी  निर्गुण,  निराकार,  अजन्मा  आहे.  तर  जी  त्रिगुणात्मक,  अव्यक्त,  नित्य  आणि  कार्यकारणरूप  शक्ती  आहे  तीला  प्रकृति  म्हणतात.  ज्या  प्रमाणे  पाण्यातील  सूर्याच्या  प्रतिबिंबास  पाण्याचे  गुणधर्म  शीतलता,  चंचलता  चिकटत  नाहीत  त्या  प्रमाणे  मनुष्याच्या  शरीरातील  आत्म्यास  शरीराचे  विकार  बाधीत  करू  शकत  नाहीत.  कारण  आत्मा  निर्विकार,  निर्गुण  आहे.   परंतू  तोच  आत्मा  अज्ञानाने  जेव्हा  प्राकृत  गुणांशी  संबंध  स्थापित  करतो  तेव्हा  तो  अहंकाराने  मोहित  होऊन  मी-माझे  करू  लागतो.  याच  अहंकाराने  भ्रमित  होऊन  शरीराने  केलेल्या  कर्माची  फळे  भोगु  लागतो.  आपले  स्वरूप  विसरून  शरीराच्या  विकारांना  बळी  पडतो.  त्यामुळे  कर्मानुसार  त्याला  उत्तम,  मध्यम  आणि  कनिष्ठ  योनिमध्ये  जन्म  घ्यावा  लागतो.  मरणानंतर  पुन्हा  जन्म  अशा  संसारचक्रामध्ये  तो  गुरफटला  जातो.  मनुष्याने  श्रध्दापुर्वक  निष्कामतेने  आपल्या  नित्य-नैमित्तिक  कर्तव्यांचे  पालन  केले  पाहिजे.  नित्यप्रति  शास्त्रोक्त  हिंसारहित  योगाचे  अनुष्ठान  केले  पाहिजे.  भगवंताच्या  मुर्तीचे  दर्शन,  पूजन  आणि  वंदन  केले  पाहिजे.  धैर्य  आणि  वैराग्याचे  आचरण  केले  पाहिजे.  महापुरूषांचा  मान-सन्मान  केला  पाहिजे.  यम-नियमांचे  पालन  केले  पाहिजे.  अध्यात्मशास्त्रांचे  श्रवण  केले  पाहिजे.  भगवंताचे  नाम-स्मरण  अखंडपणे  केले  पाहिजे.  सत्पुरूषांचा  सत्संग  केला  पाहिजे.  शरीराच्या  अहंकाराचा  त्याग  केला  पाहिजे.  भागवतधर्माचे  आचरण  केले  पाहिजे.  सर्व  प्राणीमात्रंामध्ये  परमेश्वराची  भावना  केली  पाहिजे.  अशा  उपासनेने  मनुष्याचे  चित्त  अत्यंत  शुध्द  होऊन  भगवंताच्या  चरणी  स्थिर  होते.  साधकांच्या  स्वभाव   गुणांतील  भेदामुळे  प्रत्येक  मनुष्याच्या  भक्तिभावामध्ये  भिन्नता  निर्माण  होते.  जो  क्रोधी  मनुष्य  हिंसा,  दंभ,  आणि  मत्सरी  भावाने  भगवंताची  पूजा  करतो  तो  तामस  भक्त  आहे.  जो  मनुष्य  विषय,  यश  आणि  ऐश्वर्याच्या  इच्छेने  भगवंताची  पूजा  करतो  तो  राजस  भक्त  आहे.  जो  मनुष्य  पुण्य  वाढविण्यासाठीे,  भगवंतास  पूजा  साहित्य  अर्पण  करण्यासाठी,  तसेच  पूजा  एक  कर्तव्य  मानून  भेदभावाने  भगवंताची  पूजा  करतो  तो  सात्विक  भक्त  आहे.  या  शिवाय  जो  मनुष्य  अनन्य  भावाने  परमेश्वरामध्ये  एकरूप  झालेला  आहे,  तो  निर्गुण  भक्त  आहे.  असेे  निष्काम  भक्त  भगवंताची  सेवा  सोडून  मुक्तीची  सुध्दा  अपेक्षा  करीत  नाहीत.  भगवत्‌-सेवेसाठी  मुक्तिचा  तिरस्कार  करणारा  हा  भक्तियोग  परम  पुरूषार्थ  असून  तेच  मनुष्यजन्माचे  अंतिम  साध्य  आहे.  या  भक्तियोगाने  मनुष्यास  परमात्म्याचे  त्रिगुणातीत  अप्राकृत  स्वरूप  प्राप्त  होते.  परमेश्वर  अंतर्यामी  रूपाने  सर्व  प्राणीमात्रांच्या  हृदयी  असतो.  म्हणून  जो  मनुष्य  सर्वभूतस्थित  परमात्म्याचा  अनादर  करून  फक्त  मुर्तीची  पूजा  करतो,  त्याची  ती  पूजा  केवळ  ढोंग  आहे.  पंडितांमध्ये  वेदांचे  तात्पर्य  जाणणारे  श्रेष्ठ  आहेत.  त्यांच्यापेक्षा  आसक्तिचा  त्याग  करून  स्वधर्माचे  निष्कामतेने  आचरण  करणारे  श्रेष्ठ  आहेत.  त्यांच्याही  पेक्षा  जे  पुरूष  आपले  सर्वस्व  परमेश्वरास  अर्पण  करून  अभिन्नतेने  भगवंताची  उपासना  करतात  ते  सर्वश्रेठ  भक्त  आहेत.  म्हणून  परमात्मा  सर्वत्र  आहे  याची  अनुभूती  घेऊन  सर्व  प्राणिमात्रांची  परमेश्वर  भावनेने  तन  मन  धनाने  सेवा  केली  पाहिजे.  तो  परमेश्वर  परब्रह्माचे  अद्भूत  प्रभावसंपन्न  स्वरूप  आहे.  प्रकृति  आणि  पुरूष  त्याचीच  दोन  रूपे  आहेत.  परंतू  तो  वास्तविकतः  यापेक्षा  भिन्न  आहे.  कारण  तो  निर्गुण  निराकार  आहे.  ज्या  प्रमाणे  स्वजन   संपत्तीमध्ये  मी-माझे  ही  आसक्ती  असते,  परंतू  विचार  केल्या  नंतर  ते  संपूर्णपणे  भिन्न  जाणवतात,  त्याच  प्रमाणे  ज्या  शरीरास  मनुष्य  आत्मा  मानतो,  तो  सुध्दा  शरीरा  पासून  पूर्णपणे  भिन्न  असतो.  ज्या  प्रमाणेजळणाया  इंधना  पासून  अग्नि  भिन्न  असतो,  त्याच  प्रमाणे  इंद्रिये   अंतःकरणाचा  साक्षीभूत  आत्मा  भिन्न  असतो.  तसेच  त्या  आत्म्या  पासून  परमात्मा  भिन्न  असतो.  आणि  या  संपूर्ण  सृष्टि   प्रकृती  पासून  त्याचा  सूत्रधार  पुरूषोत्तम  भिन्न  असतो.  ज्या  मनुष्यांची  भौतीक  वस्तुंमध्ये  आसक्ति  असून  केवळ  कर्मामध्ये  श्रध्दा  आहे,  त्या  पुरूषांना  वेदामध्ये  सांगितलेली  काम्य  आणि  नित्य  कर्मे  कर्मठ  बुध्दीने  करण्यामध्ये  उत्साह  असून  त्याचा  त्यांना  अहंकार  असतो.  त्यांची  बुध्दी  रजोगुण  प्रधान  असल्याने  कुंठीत  झालेली  असते.  प्रत्येक  कर्मापासून  फळाची  अपेक्षा  असल्याने  त्यांची  इंद्रिये  संयमित  नसतात.  असे  पुरूष  अर्थ,  धर्म  आणि  काम  हे  तीन  पुरूषार्थ  करून  महान  पराक्रमी  होतात.  तरी  सुध्दा  ते  भगवंतापासून  खूप  दूरवर  असतात.  त्यांना  मनःशांती  कधीही  मिळू  शकत  नाही.  ब्राह्मण,  गाय   अनाथ  प्राणि  ही  भगवंताचीच  रूपे  आहेत.  परंतू  पापकर्मामुळे  विवेकबुध्दी  नष्ट  होऊन  जो  मनुष्य  या  भगवंताच्या  या  रूपांना  भगवंता  पासून  भिन्न  समजतो,  त्यास  यमयातना  भोगाव्या  लागतात.  या  ज्ञानाचा  उपदेश  दुष्ट,  गर्वीष्ठ,  दुराचारी,  आणि  ढोंगी  मनुष्यास  कधी  ही  सांगू  नये.  जो  मनुष्य  इंद्रिय  विषयांमध्ये  आसक्त  आहे,  आणि  जो  मनुष्य  हरिभक्तांचा  द्वेष  करतोे,  त्यास  हा  अध्यात्मयोगाचा  उपदेश  करू  नये.  परंतू   जो  मनुष्य  अत्यंत  श्रध्दावान  आहे,  विनम्र  आहे,  दूसयामध्ये  दोषदृष्टि   पहाणारा  आहे,  सर्व  प्राणीमात्रांशी  मैत्री  करणारा  आहे,  गुरूसेवेमध्ये  तत्पर  आहे,  भौतीक  विषयांमध्ये  अनासक्त  आहे,  शांतचित्त,  मत्सरशून्य  आणि  निर्मळ  अंतःकरणाचा  आहे,  तसेच  भगवंतास  अनन्यभावाने  शरण  गेलेला  आहे,  त्यास  हा  उपदेश  आवर्जून  सांगितला  पाहिजे.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (७)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  चौथ्या  स्कंधामध्ये  मैत्रेयऋषींनी  विदुरास  उपदेश  केला  आहे.  राजाने  प्रजेला  धर्माची  शिकवण  देऊन  त्या  धर्माचे  आचरण  प्रजेकडून  होत  आहे  हे  पाहिले  पाहजे.  कारण  धर्माचे  उपेक्षा  करून  केलेले  कोणतेही  कार्य  अनेक  प्रयत्न  केले  तरी  निष्फळ  होत  असते.  राजाने  प्रजेचे  शासन,  त्यांचे  रक्षण,  त्याच्या  उपजिवीकेची  व्यवस्था  करून  प्रत्येकाच्या  बुध्दी  प्रमाणे  त्यांना  कार्यक्षेत्र  नेमून  द्यावे.  राजाने  आपल्या  कर्तृत्वाने  अलौकीक  पराक्रम  करून  सर्व  प्रजेवर  समान  दृष्टी  ठेवली  पाहिजे.  त्याने  प्रजेवर  दया  केली  पाहिजे.  राजाचे  कार्य  गुप्तरूपाने  चालले  पाहिजे.  तो  राजा  दुष्टाचा  संहार  करण्यासाठी  यमा  सारखा  आणि  वात्सल्यवृत्तीने  मनु  सारखा  पाहिजे.  त्याने  शत्रूच्या  निरपराध  पुत्रास  सुध्दा  शिक्षा  करू  नये  परंतू  आपल्या  अपराधी  पुत्रास  अवश्य  शिक्षा  करावी.  त्याने  प्रजेला  सुख-समाधान  दिले  पाहिजे.  प्रजेचे  रंजन  केले  पाहिजे.  तो  राजा  दृढसंकल्पी,  सत्यप्रतिज्ञ,  ब्राह्मणभक्त,  वृध्दांची  सेवा  करणारा,  शरणागतवत्सल,  सर्व  प्राणीमात्रांचा  आदर  करणारा  आणि  दिन-दुबळ्यांवर  दया  करणारा  असावा.  त्यानेे  परस्त्रीचा  आई  प्रमाणे  सन्मान  केला  पाहिजे.  त्याने  पित्या  प्रमाणे  प्रजेचे  पालन  केले  पाहिजे.  तर  वेदपंडितांचा  सेवा  केली  पाहिजे.  त्याने  आपले  चारित्र्य  असे  निर्माण  करावे  की  प्रजा  आपण  हून  त्याचा  सन्मान  करील.  त्याने  विरक्त  महापुरूषांचा  विशेष  आदर  सत्कार  केला  पाहिजे.  राजाच्या  आज्ञेचे  पालन  सर्वांनी  केले  पाहिजे.  कोणी  दुष्ट  स्त्री  किंवा  पुरूष  आपल्या  स्वार्थासाठी  इतरांवर  निर्दय  होत  असेल  तर  राजाने  त्यास  ठार  मारावे.  राजाने  हे  भगवंताचे  राज्य  आहे  असे  मानून  मंत्रीगणांच्या  सहाय्याने  राज  कारभार  केला  पाहिजे.  राजाने  प्रजेतील  आपल्यापेक्षा  आधिक  गुणसंपन्न  मनुष्याचा  सत्कार  केला  पाहिजे.  तर  आपल्यापेक्षा  कमी  गुणसंपन्न  मनुष्यावर  दया  केली  पाहिजे.  आणि  आपल्यापेक्षा  इतकेच  गुणसंपन्न  असलेल्या  मनुष्याशी  मैत्री  केली  पाहिजे.  राजाचे  कल्याण  प्रजापालना  मध्येच  आहे.  कारण  त्याला  प्रजेच्या  पुण्याचा  सहावा  भाग  परलोकामध्ये  प्राप्त  होत  असतो.  या  उलट  जो  राजा  प्रजेचे  रक्षण  करीत  नाही  परंतू  प्रजेकडून  भरमसाठ  कर  वसूल  करतो,  त्या  राजाचे  संचित  पुण्य  प्रजेला  मिळते  आणि  प्रजेचे  पाप  मात्र  त्याला  भोगावे  लागते.  म्हणून  राजाने  धर्माचे  आचरण  करणे  आवश्यक  आहे.  राज्यामध्ये  आसक्त   ठेवता  सद्  ब्राह्मणांच्या  मार्गदर्शनाने  राज्य  कारभार  केला  पाहिजे.  कारण  वास्तविकतः   राज्य,  सेनापतित्व,  दंडविधान  आणि  संपूर्ण  शासनाचा  अधिकार  वेदशास्त्रांचे  जाणकार  ब्राह्मणांनच  आहे.  ब्राह्मणाचेच  सर्व  काही  आहे.  इतर  सर्व  वर्णांना  जे  काही  मिळते  ते  केवळ  ब्राह्मणांच्या  कृपेनेच  मिळत  असते.  राजाने  जाणले  पाहिजे  कि  कोणते  ही  कर्म  झाले  तरी  त्याचा  कर्ता,  उपदेशक  आणि  समर्थक  यांना  त्या  कर्माचे  समान  फळ  मिळत  असतो.  त्याने  साम्राज्यलक्ष्मीने  संपन्न  आणि  गृहस्थाश्रमामध्ये  रहात  असले  तरी  अहंकारशून्य  होऊन  इंद्रिय  विषयांमध्ये  अनासक्त  झाले  पाहिजे.  त्याने  आत्मनिष्ठेमध्ये  स्थिर  होऊन  सर्व  कर्तव्यकर्मांचे  यथोचित  पालन  केले  पाहिजे.  त्याने  प्रजापालन  करण्यासाठी  आपल्या  पत्नीद्वारा  पुत्रांस  जन्म  द्यावा.  त्याने  एक  पत्नी  व्रताचे  पालन  करावे.  राजाने  अतुलनीय  पराक्रम  करून  हिमालया  समान  वस्तुंचा  संग्रह  करावा.  तर  कुबेराप्रमाणे  त्याने  राजकोशाची  समृध्दी  करावी.  कामदेवा  समान  त्याचे  सौंदर्य  अससे  पाहिजे.  सिंहासारखा  त्याचा  उत्साह  असावा.  राजाने  बृहस्पति  समान  ब्रह्मविचार  केला  पाहिजे.  त्याने  सत्पुरूषांची  सेवा  केली  पाहिजे  कारण  महापुरूषांच्या  तोंडातून  जी  हवा  बाहेर  पडते  त्याने  विसलेल्या  तत्त्वज्ञानाचे  स्मरण  होत  असते.  अशा  अतुलनीय  राजाने  आपल्या  स्तुतिचा  तिरस्कार  केला  पाहिजे.  कारण  त्यानेच  अहंकार  होतो.  त्याने  प्रजेच्या  समृध्दीसाठी  यज्ञानुष्ठान  केले  पाहिजे.  राजाने  गृहस्थधर्माचे  कर्तव्य  पुर्ण  करून  समर्थ  पुत्राचा  राज्याभिषेक  केला  पाहिजे.  नंतर  राजाने  वानप्रस्थ  आश्रमाचा  स्विकार  करून  वनामध्ये  कंदमुळे  खाऊन  भगवंताची  आराधना  केली  पाहिजे.  त्याने  ज्ञान  आणि  वैराग्याच्या  प्रभावाने  ब्रह्मस्वरूपामध्ये  स्थिर  होऊन  आपल्या  शरीराचा  त्याग  करावा.  महादेव  सतीस  उपदेश  करतात.  विद्या,  तपस्या,  धन,  सृदृढ  शरीर,  तारूण्य,  उच्च  कुळ  हे  सहा  सत्पुरूषांचे  गुण  आहेत,  परंतू  हेच  गुण  जर  दुष्ट  मनुष्यामध्ये  असतील  तर  ते  अवगुण  होतात.  कारण  या  गुणांमुळे  त्या  दुष्ट  मनुष्याचा  अहंकार  वाढतो.  त्याची  इतरांची  वर्तन  करण्याची  पध्दत  दोषयुक्त  होते.  अहंकारामुळे  त्याची  विवेक  बुध्दी  नष्ट  होते.  देवर्षी  नारद  पुरंजन  आख्यानातून  उपदेश  करतात.  दुःखाचा  मुळासकट  नाश  आणि  परमानंदाची  प्राप्ती  यामध्येच  मनुष्याचे  कल्याण  आहे.  परंतू  ते  कोणतेही  कर्म  करून  मिळत  नाही.  देहाभिमानी  जीव  अज्ञानाने  अनेक  प्रकारची  अधिभौतिक,  आध्यात्मिक  आणि  आधिदैविक  दुःखे  भोगतो.  वस्तुतः  तो  निर्गुण  आहे,  परंतु  प्राण,  इंद्रिय  आणि  मन  यांना  आपल्या  स्वरूपामध्ये  आरोपित  करतो.  मी-माझे  या  अभिमानाने  प्रकृतीच्या  त्रिगुणांमध्ये  बध्द  होतो.  तो  तुच्छ  विषयांच्या  अपेक्षेने  अनेक  प्रकारची  सात्विक,  राजस  आणि  तामस  कर्म  करतो.  तसेच  त्या  कर्मा  नुसार  भिन्न-भिन्न  योनिंमध्ये  जन्म  घेतो.  या  प्रकारे  त्या  जीवाला  त्याच्या  कर्मा  नुसार  देवयोनि,  मनुष्ययोनि,  पशु-पक्षी,  वनस्पतियोनि  मिळते.  आणि  तो  जीव  एका  नंतर  दूसया  योनिमध्ये  सुख-दुःख  भोगत  भटकत  रहातो.  ज्या  लिंग  शरीराने  मनुष्य  कर्म  करतो  ते  त्याच्या  मरणा  नंतर  सुध्दा  त्याच्या  बरोबर  असते.  ज्या  शरीरास  तो  मी-माझे  मानतो,  त्याने  केलेली  कर्माचा  अहंकार  करतो  त्यामुळेच  त्या  लिंग  शरीराला  पुन्हा  जन्म  घ्यावा  लागतो.  मृत्युसमयी  स्थुल  शरीराचे  विघटन  होते  परंतू  लिंग  शरीराला  त्याच्या  कर्मानुसार  पुन्हा  योनि  प्राप्त  होते.  अधिभौतिक,  आध्यात्मिक  आणि  आधिदैविक  अशा  तीन  प्रकारच्या  कोणत्याही  कर्मापासून  त्याची  सूटका  होत  नाही.  अशा  रितीने  कर्मफळ  भोगून  तसेच  कोणतेही  ज्ञानरहित  कर्म  करून  कर्मबंधनमुक्ती  मिळत  नाही  कारण  कर्म  आणि  कर्मफळ  दोन्ही  अविद्यायुक्त  आहेत.  म्हणून  कल्याण  प्राप्त  होण्यासाठी  आत्मज्ञान  हाच  एकमात्र  उपाय  आहे.  या  जन्म-मृत्युरूप  अनर्थ  परंपरेतून  मुक्त  होण्यासाठी  भगवंताची  निष्काम  भक्ति  आवश्यक  आहे.  वास्तविक  कर्म  तेच  आहे,  ज्यामुळे  भगवंत  प्रसन्न  होतो.  आणि  खरी  विद्या  हीच  आहे,  ज्यामुळे  भगवंतामध्ये  एकरूपता  होऊ  शकते.  ज्यास  कशाचे  ही  भय  नाही  तोच  त्या  मनुष्याचा  प्रियतम  आत्मा  आहे,  हे  जो  मनुष्य  जाणतो,  तो  ज्ञानी  आहे,  तोच  गुरू  अर्थात  साक्षात  परमेश्वर  आहे.  जेव्हा  सर्वात्मा  सर्वेश्वर  भगवंताचे  निरंतर  स्मरण  केले  जाते.  तेव्हा  मनुष्याचा  जन्म,  कर्म,  आयुष्य,  वाणी  सफल  होते.  जिज्ञासु  पुरूषाने  निश्चितपणे  समजून  घ्यावे  कि  भगवंताच्या  प्राप्तीचे  एकमात्र  साधन  अभेद-भक्ति  हेच  आहे.  यालाच  अद्वैत  साधना  म्हणतात.  परमेश्वरचरणी  संपूर्णपणे  समर्पित  झाल्या  शिवाय  परमेश्वराचे  दर्शन  होत  नाही.  भक्त  जेव्हा  भगवंतामध्ये  एकरूप  होतो  तेव्हा  त्याला  स्वतःचे  अस्तित्व  उरत  नाही.  तो  भगवंतामध्ये  एकरूप  होतो.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (८)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  पाचव्या  स्कंधामध्ये  जडभरताने  रहुगण  राजास  आत्मज्ञानाचा  उपदेश  केला  आहे.  हे  मनुष्य  शरीर  दुःखमय  विषयभोग  प्राप्त  करण्यासाठी  नाही.  ते  विषयभोग  भोग  तर  इतर  प्राण्यांना  सुध्दा  प्राप्त  होतात.  या  मनुष्य  शरीराने   दिव्य  तप  करावेे,  ज्यामुळे  अंतःकरण  शुध्द  होऊन  ब्रह्मानंद  प्राप्त  होतो.  धर्मशास्त्रांमध्ये  महापुरूषांच्या  सेवेचे  फळ  मुक्ति   आणि  कामासक्त  स्त्रीसंगाचे  फळ  घोर  नरकवास  असे  सांगितलेले  आहे.  समानचित्त,  परमशांत,  क्रोधहिन,  सर्वांचे  हितचिंतक  आणि  सदाचारसंपन्न  मनुष्यास  महापुरूष  म्हणतात.  या  जन्म-मरणमुक्तिच्या  मार्गाचा  उपदेश  माता,  पिता,  पति,  स्वजन,  गुरू,  आणि  इष्टदेव  करतात.  त्यामुळे  मृत्युभय  नष्ट  होते,  मृत्युचे  स्वरूप  समजते,  अज्ञान  नष्ट  होऊन  आत्मज्ञान  प्राप्त  होते.  ब्राह्मण  जो  पवित्र,  शम,  दम,  सत्य,  दया,  तप,  तितिक्षा  आणि  ज्ञान  या  आठ  सत्त्वगुणंानी  संपन्न  असतो,  तो  भगवंताहून  श्रेष्ठ  आहे  कारण  परमेश्वर  त्यांची  पूजा  करतो.  मनुष्यदेह  पृथ्वीचाच  एक  घटक  आहे,  संपूर्ण  मनुष्य-सृष्टि  पृथ्वीपासून  उत्पन्न  झालेली  आहे  आणि  पृथ्वीमध्येच  नाश  पावते,  परंतू  आत्मा  शाश्वत  आहे.  मनुष्य  शरीर  आणि  ही  सृष्टी  दोन्ही  पंच  महाभूतांपासून  बनलेली  आहे,  जे  नाशवंत  आहे,  परंतू  आत्मा  अविनाशी  आहे,  शाश्वत  आहे,  आणि  तेच  आपले  खरे  स्वरूप  आहे,  याची  अनुभूती  होणे  हाच  भागवताचा  प्रमुख   विषय  आहे.  फक्त  तपसाधना,  अन्नदान,  वैदिक  कर्म,  अतिथिसेवा,  धर्मानुष्ठान,  वेदाध्ययन,  सूर्य  उपासना  करून  परमात्म-ज्ञान  प्राप्त  होत  नाही.  कारण  यामुळे  तर  अहंकार  वाढतो.  मनुष्य  जेव्हा  महापुरूषांच्या  चरणधुळीने  स्नान  करतो  तेव्हाच  त्याचा  अहंकार  नष्ट  होऊ  शकतो.  आणि  अहंकार  नष्ट  झाल्यावर  आत्मज्ञान  होत  असते.  स्त्री  आणि  पुरूष  या  दोघांचा  जो  परस्पर  संबंध  आहे,  ती  एक  दुर्भेद्य  ग्रंथी  आहे.  या  शिवाय  देहाभिमानरूपी  एक  ग्रंथी  असते.  त्यामुळे   मनुष्यास  इंंद्रिये,  घर-धन,  स्वजन  यांच्यामध्ये  मी-माझे  याचा  मोह  होतो.  जेव्हा  देहाभिमानाचा  त्याग  केला  जातो  तेव्हा  ही  दुर्भेद्य  ग्रंथी  सूटते.  तेव्हा  स्त्री-पुरूष  परस्पर  संबंध  संपुष्टात  येतो.  या  संसार  भवसागरातून  पार  होण्यासाठी  मनुष्याने  अनेक  साधनाने  उपासना  केली  पाहिजे.  त्यातील  प्रमुख  साधने  अशी  आहेत.  भगवंताची  अनन्यतेने  भक्ति  करावी.  भगवंतासाठीच  सर्व  कर्मे  करावीत.  वैराग्याने  शरीर  तसेच  स्वजनातील  मी-माझे  हा  अहंकार  सोडून  द्यावा.  ब्रह्मचर्याचे  पालन  करून  कर्तव्य  कर्मे  करावीत.  योग  साधनेने  अहंकाररूपी  लिंगशरीराची  आसक्ती  नष्ट  करावी.  संपुर्ण  चराचर  सृष्टि  भगवंताचेच  विराट  शरीर  मानून  शुध्दबुध्दिने  प्रत्येक  वेळी  प्रत्येकाची  सेवा  करावी,  हीच  भगवंताची  खरी  पूजा  आहे.  अशा  प्रकारे  सावधपणे  शास्त्रोक्त  पध्दतीने  देहाभिमानरूपी  ग्रंथी  च्या  बंधनास  नष्ट  केले  पाहिजे.  कारण  यामुळेच  कर्मसंस्कारास  उत्तेजन  मिळते.  या  सर्व  साधनाच्या  उपासनेने  अंतःकरणाची  शुध्दी  होते.  त्यानंतर  त्या  साधनांचा  सुध्दा  त्याग  केला  पाहिजे.  विरक्त  मनुष्य  नेहमी  मौन  अवस्थेमध्ये  असतो.  आंधळ्या  प्रमाणे,  बहिया  प्रमाणे,  मुक्या  प्रमाणे,  आणि  वेड्या  प्रमाणे  ते  वैरागी  मनुष्य  विश्वामध्ये  सर्वत्र  भ्रमण  करीत  असतात.  एखादा  दुष्ट  मनुष्य  त्यांना  त्रास  देतो,  कोणी  त्यांना  धमकी  देतोे,  कोई  त्यांना  मारतो,  कोणी  त्याच्या  अंगावर  थूंकतोे,  कोणी  त्याच्या  अंगावर  विष्ठा  फेंकतो,  कोणी  त्यांचा  तिरस्कार  करतो.  परंतू  ते  वैरागी  यापैकी  कोणत्याही  गोष्टींकडे  लक्ष  देत  नाहीत.  कारण  या  नाशिवंत  शरीराचा  त्यांना  अहंकार  नसतो.  ते  आपल्या  स्वरूपामध्ये  तल्लीन  झालेले  असतात.  तेव्हा  ते  अजगरवृत्ती  धारण  करून  ते  अवधूत  निरंतर  परमानंदाचा  अनुभव  घेतात.  त्या  अवधूतांंकडे  सर्व  प्रकारच्या  सिध्दि  आपोआप  येतात.  परंतु  ते  त्या  सिध्दिंचा  त्याग  करतात.  कारण  त्याने  चित्त  विचलित  होते.  ते  नेहमी  एकांतामध्ये  भगवंताची  आराधना  करतात.  त्यामुळे  त्यांचे  अंतःकरण  स्थिर  राहते.  अंतसमयी  ते  ब्रह्मस्वरूपामध्ये  स्थिर  होऊन  देहत्याग  करतात.  जो  पर्यंत  मनुष्य  मायेचा  तिरस्कार  करीत  नाही,  शरीराची  आसक्ति  सोडीत  नाही.  षडविकारांचा  त्याग  करीत  नाही.  चित्ताची  चंचलता  जाणून  घेत  नाही.  तो  पर्यंत  तो  मनुष्य  जन्म-मरणाच्या  चक्रामध्ये  फिरत  रहातो.  कारण  क्रोध,  लोभ,  शोक,  मोह,  मत्सर,  आणि  अहंकार  या  षडविकारांमुळे  या  चित्तामध्येच  मी-माझे  हा  अहंकार  वाढत  रहातो.  हे  मानवी  मन  मोठे  विचीत्र  आहे.  त्याची  उपेक्षा  केली  तर  ते  आधीक  कार्यक्षम  होते.  हे  मन  जरी  कल्पित  आहे  तरी  त्यानेच  आत्मस्वरूपास  झाकून  ठेवलेले  आहे.  म्हणून  भगवंताच्या  उपासनेने  त्याम  मनास  संयमित  करून  परमेश्वर  चरणी  समर्पित  करावे.  शुकदेव  परीक्षितास  मनुष्याच्या  कर्म  गतीचा  उपदेश  करतात.  त्रिगुणात्मक  स्वभाव  आणि  प्रत्येकाच्या  भावनेतील  भेदामुळे  प्रत्येक  कर्माची  गति  निर-निराळी  आहे.  ती  प्रत्येक  कर्माच्या  कर्त्यास  प्राप्त  होते.  प्रत्येक  मनुष्याचा  स्वभाव  वेग-वेगळा  असतो.  त्या  स्वभावाचे  प्रामुख्याने  सात्विक,  राजस  आणि  तामस  असे  तीन  प्रकार  आहेत.  म्हणून  कर्म  करण्याच्या  भावनेमध्ये  भिन्नता  येते.  मनुष्य  ज्या  प्रकारचे  पापकर्म  करतो  त्या  प्रकारचा  नरक  त्यास  मरणानंतर  प्राप्त  होतो.  उदाहरणार्थ  जो  मनुष्य  दूसयास  धोका  देऊन  परस्त्रीस  उपभोगतो,  तो  अंधतामिस्त्र  नरकामध्ये  जातो.  जो  क्रूर  मनुष्य  आपल्या  खाण्याच्या  हौसे  साठी  जीवंत  पशु  किंवा  पक्ष्यांस  मारून  खातो,  तो  निष्ठूर  कुंभीपाक  नरकामध्ये  जातो.  जो  मनुष्य  आपले  माता-पिता,  ब्राह्मण  आणि  वेद  यांचा  विरोध  करतो,  तोे  कालसूत्र  नरकामध्ये  जातो.  अशा  प्रकारे  पापकर्माचे  समान  फळ  मिळत  नाही.  जो  मनुष्य  दुसयाचे  संतान,  धन,  दौलत,  स्त्री  यांचे  हरण  करतो,  तो  तमिस्त्र  नरकामध्ये  जातो.  जो  मनुष्य  शरीर,  स्त्री,  आणि  धन-संपत्तीमध्ये  आसक्त  होतो,  तो  रौरव  नरकामध्ये  जातो.  जो  मनुष्य  दूसयांची  पर्वा   करता  आपल्याच  शरीराचे  पोषण  करतो,  तो  महारौरव  नरकामध्ये  जातो.   जो  मनुष्य  निरपराधीस  विनाकारण  दंड  देतो,  ब्राह्मणांचा  छळ  करतो,  तो  सूकरमुख  नरकामध्ये  जातो.  जो  मनुष्य  पशुसमान  मद्यपान  करतो,  तो  अयःपान  नरकामध्ये  जातो.  जो  मनुष्य  कनिष्ठ  वर्णाचा  असून  सुध्दा  गुरूजनांचा  अपमान  करतो,  तोे  क्षारकर्दम  नरकामध्ये  जातो.  जो  मनुष्य  कामासक्त  होऊन  आपल्या  पत्नीस  वीर्यपानाची  जबरदस्ती  करतो,  तो  कालभक्ष  नरकामध्ये  जातो.  जो  गर्वीष्ठ  मनुष्य  स्वतःस  मोठा  श्रीमंत  मानून  इतरांचा  मत्सर  करतो  आणि  प्रत्येकाचा  संशय  घेतो,  तसेच  पैशाच्या  चिंतेने  झूरत  असतो,  आणि  पैसा  मिळविण्यासाठी  पाप  करतो,  तो  सूचीमुख  नरकामध्ये  जातो.  अशा  प्रकारे  अनेक  नरकांचे  प्रकार  सांगितलेले  आहेत.      
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (९)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  सहाव्या  स्कंधामध्ये  शुकदेवाने  परीक्षितास  उपदेश  केला  आहे.  मनुष्य  मन,  वाणी  आणि  शरीराने  जे  पाप  करतो,  त्याचे  त्याने  याच  जन्मामध्ये  प्रायश्र्चित्त  घेतले  नाही  तर  त्यास  नरकामध्ये  भयंकर  यातना  भोगाव्या  लागतात.  म्हणून  सावधपणे  आणि  सतर्कपणे  केलेल्या  पापकर्माचा  विचार  करून  ताबडतोब  त्याचे  प्रायश्र्चित्त  केले  पाहिजे.  खरे  प्रायश्र्चित्त  तर  तत्त्वज्ञान  हेच  आहे.  जो  मनुष्य  नियमांचे  आचरण  करतो,  तो  हळू-हळू  पापवासनेतून  मुक्त  होऊन  कल्याणकारी  तत्त्वज्ञान  प्राप्त  करण्यास  समर्थ  होतो.  ते  नियम  तपस्या,  ब्रह्मचर्य,  इंद्रियदमन,  मनाचे  स्थैर्य,  दान,  सत्य,  पवित्रता  असे  आहेत.  भगवंताच्या  चरणी  शरणागत  झालेले  भक्तजन,  केवल  आपल्या  निष्काम  भक्तिने  जन्मांतरीची  पापे  नष्ट  करतात,  जसे  सूर्य़  धुक्यास  नष्ट  करतो.  पापी  मनुष्याची  शुध्दि  परमेश्वरास  आत्मसमर्पण  केल्याने  आणी  सत्पुरूषांची  सेवा  केल्याने  होत  असते.  ती  घोर  तपस्या  करून  सुध्दा  होत  नाही.  असा  हा  भक्तिमार्ग  सर्वश्रेष्ठ  असून  कल्याणस्वरूप  आहे,  कारण  याच  मार्गाने  सत्पुरूषांनी  उपासना  केलेली  असून  त्यांना  आत्मज्ञान  प्राप्त  झालेले  आहे.  भगवंताचे  नामस्मरण  करावे  कारण  त्यामुळे  भगवंताच्या  अवतारांचे,  त्याच्या  गुण-पराक्रमाचे  चिंतन  होते   त्यामध्ये  मनुष्य  तल्लीन  होऊन  जातो.  तसेच  भगवंताची  कृपा  त्या  साधकांवर  होते.  म्हणून  परमेश्वराचे  नामस्मरण  करणे  हेच  कलियुगामध्ये  मोक्षाचे  सर्वोत्तम  साधन  आहे.  या  नामस्मरणाचा  परिणाम  अत्यंत  अद्भूत  आहे.  परमेश्वराचे  चिंतन  सोडून  दुसयाच  कोणत्या  तरी  अभिप्रायानेे,  विनोदाने,  किंवा  कोणाची  अवहेलना  करण्यासाठी  कोणत्याही  मनुष्याने   भगवंताच्या  नामाचा  उच्चार  केला  तरी,  त्याचे  पाप  नष्ट  होते.  जसे  नजरचूकीने  ईंधनाचा  अग्निस  स्पर्श  झाल्यावर  ते  अवश्य  जळते,  तसेच  जाणतेपणी  किंवा  अजाणतेपणी  भगवंताच्या  नामाचा  उच्चार  झाला  की  त्या  मनुष्याचे  सारे  पाप  भस्म  होते.  अजून  एक  उदाहरण  देता  येईल.  जसे  अमृताचा  गुण  माहित  नसताना  जो  मनुष्य  ते  पितो,  त्यास  ते  अमर  बनविते,  तसेच  अजाणता  परमेश्वराच्या  नामाचा  उच्चार  झाला  तरी  ते  नामोच्चरण  आपले  कार्य  जरूर  करते.  ज्या  मनुष्यास  या  संसारबंधनातून  मक्त  होण्याची  इच्छा  आहे,  त्याच्यासाठी  भगवंताचे  नामस्मरण  हेच  एकमेव  प्रभावी  साधन  आहे.  भगवंताच्या  नामाचा  आश्रय  घेतल्यावर  मनुष्याचे  चित्त  पुन्हा  कर्मामध्ये  आसक्त  होत  नाही.  नामस्मरण  सोडून  इतर  कोणत्याही  साधनाने  केवळ  रजोगुण  आणि  तमोगुण  यांचीच  वृध्दी  होत  रहाते.  तसेच  पापांचे  पूर्णपणे  संहारण  होत  नाही.  मोठ-मोठ्या  विद्वानांची  बुध्दि  कधी  कधी  महामायेने  मोहित  होऊन  जाते.  स्वर्गप्राप्तीचे  वर्णन  करणाया  वेदातील  फलश्रुतीने  ते  मोहित  होऊन  जातात.  यज्ञकर्मामध्ये   ते  मग्न  होऊन  जातात.  आणि  सोप्या  नामस्मरणाचा  महिमा  ते  कधी  ही  जाणू  शकत  नाहीत.  हे  अत्यंत  खेदकारी  आहे.  म्हणून  प्रत्येक  मनुष्याने  निरंतर  नामसंकिर्तन  केले  पाहिजे.  त्यामुळे  सर्वांचेच  कल्याण  होऊ  शकते.  या  पृथ्वीतळावर  मनुष्यासाठी  सर्वात  महत्त्वाचे  एकच  कर्तव्य  आहे,  ते  म्हणजे  नामस्मरणाने  भगवंताच्या  चरण-कमलांची  निष्काम  भक्ति  करणे.  हाच  भागवत  धर्म  आहे.  तो  अत्यंत  परम  शध्द  आहे.  तो  साक्षात  भगवंताने  सांगितलेला  आहे.  त्याचे  रहस्य  फक्त  बारा  जणांना  माहित  आहे.  ब्रह्मदेव,  नारद,  शंकर,  सनत्कुमार,  कपिलदेव,  मनु,  प्रल्हाद,  जनक,  भिष्म,  बलि,  शुकदेव,  आणि  यमदेव  यांनी  भागवत  धर्माचे  वर्म  जाणून  अनुभवलेले  आहे.
 विश्वरूपाने  इंद्रास  शत्रुंवर  विजय  मिळविण्यासाठी  नारायण-कवचाचा  उपदेश  केला  आहे.  आपल्या  सर्व  प्रकारच्या  शत्रुंवर  विजय  प्राप्त  करण्यासाठी  नारायणाची  आराधना  केली  पाहिजे.  ॐकारस्वरूप  प्रभु  आमची  सर्व  प्रकाराने  सर्व  ठीकाणी  रक्षण  कर  अशी  प्रार्थना  करावी.  मत्स्य  भगवानाने  पाण्यातील  जीव-जंतूंपासून  वरूणाच्या  पाशाने  आमचे  रक्षण  करावे.  मायेने  लहान  बटूचे  रूप  धारण  करणाया  वामनभगवानाने  जमिनीवर  आमचे  रक्षण  करावे.  विश्वरूप  श्रीत्रिविक्रम  भगवानाने  आकाशामध्ये  आमचे  रक्षण  करावे.  ज्याच्या  उग्र  रूपाने  दहा  दिशा  दुमदमल्या  त्या  भगवान  नृसिंहाने  किल्ले,  जंगल  आणि  रणभूमी  अशा  बिकट  ठीकाणी  आमचे  रक्षण  करावे.  आपल्या  दाढेवर  पृथ्वीस  धारण  करणाया  वराह  भगवानाने  प्रवासमार्गामध्येे,  परशुरामाने  पर्वत-शिखरांवर  आणि  लक्ष्मणा  सहित  भरताचा  थोरला  भाउ  भगवान  श्रीरामचंद्राने  प्रवासाच्या  वेळी  आमचे  रक्षण  करावे.  मारण-मोहन  अशा  भयंकर  राक्षसां  पासून  आणि  सर्व  प्रकारच्या  अपराधां  पासून  भगवान  नारायणाने  आमचे  रक्षण  करावे.  ऋषीश्रेष्ठ  नराने  आमच्या  गर्वा  पासून,  योगेश्वर  दत्तात्रेयाने  योगातील  विघ्नां  पासून,  त्रिगुणाधिपति  भगवान  कपिलाने  कर्मबंधनां  पासून  आमचे  रक्षण  करावे.  परम-ऋषी  सनत्कुमाराने  कामवासने  पासून,  हयग्रीव  भगवानाने  प्रवास  मार्गामध्येे  चालण्याच्या  वेळी  देवमुर्तीना  नमस्कार   करण्याच्या  अपराधा  पासून,  देवर्षी  नारदाने  बत्तीस  सेवा-अपराधां  पासून  आणि  भगवान  कच्छाने  सर्व  प्रकारच्या  नरकां  पासून  आमचे  रक्षण  करावे.  भगवान  धन्वंतरिने  कुपथ्या  पासून,  जितेंद्रिय  भगवान  ऋषभदेवाने  सुख-दुःख  या  भयदायक  द्वंद्वा  पासून,  यज्ञभगवानाने  लोक-अपवादा  पासून,  बलरामाने  मनुष्याने  केलेल्या  कष्टांपासून,  आणि  शेष  भगवानाने  विषारी  सर्पां  पासून  आमचे  रक्षण  करावे.  भगवान  व्यासदेवाने  अज्ञाना  पासून,  तसेच  बुध्ददेवाने  पाखंडि-ढोग्यां  पासून  आमचे  रक्षण  करावे.  धर्मरक्षणासाठीे  अवतार  घेणाया  कल्किभगवानाने  सर्व  कलि  दोषांपासून  आमचे  रक्षण  करावे.  प्रातःकाळी  भगवान  केशवाने  आपली  गदा  घेऊन,  सकाळी  भगवान  गोविंदाने  आपली  मधुर  बासरी  घेऊन,  दुपारच्या  आधी  भगवान  नारायणाने  आपली  तीक्ष्ण  शक्ति  घेऊन  आणि  दुपारी  भगवान  विष्णुने  चक्रराज  सुदर्शन  घेऊन  आमचे  रक्षण  करावे.  तीसया  पहरी  भगवान  मधुसूदनाने  प्रचंड  धनुष्य  घेऊन  आमचे  रक्षण  करावे.  संध्याकाळी  त्रिमुर्तीधारी  माधवाने,  सूर्यास्ता  नंतर  हृषीकेशाने,  मध्यरात्री  पद्मनाभाने  आमचे  रक्षण  करावे.  उत्तरात्रि  श्रीवत्सलांछन  श्रीहरिने,  उषःकाळी  खड्गधारी  भगवान  जनार्दनाने,  सुर्योदयाच्या  आधी  श्रीदामोदराने  आणि  संधीकाळामध्ये  कालमूर्ति  भगवान  विश्वेश्वराने  आमचे  रक्षण  करावे.  सूर्य-तारे,  ग्रह,  धुमकेतु,  दुष्ट  मनुष्य  दाढीवाले  हिंसक  पशु,  भुत-प्रेत,  तसेच  पापी  प्राण्यांपासून  होणाया  सर्व  प्रकारच्या  विघ्नां  पासून  आमचे  भगवंताच्या  नाम,  रूप  तसेच  आयुधाच्या  स्मरणाने  तात्काळ  रक्षण  करावे.  या  संपूर्ण  विश्वामध्ये  सर्वत्र  भगवंताचा  निवास  आहे,  या  परमसत्याच्या  अनुभूतीने  आमचे  सर्व  प्रकारचे  आमचे  रक्षण  निरंतर  करावे.  जो  मनुष्य  हे  नारायण-कवच  श्रध्देने  धारण  करतो,  त्याच्या  समोर  सर्व  प्राणिमात्र  आदराने  झुकतात.  आणि  तो  सर्वसमर्थ  होतो.

 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (१०)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  सातव्या  स्कंधामध्ये  प्रल्हादाने  असूर  मित्रांना  उपदेश  केला  आहे.  या  जगामध्ये  मनुष्य-जन्म  अति  दुर्लभ  आहे.  या  मनुष्य  जन्मामध्येच  अविनाशी  परमात्म-ज्ञान  प्राप्त  होऊ  शकते.  परंतु  या  मनुष्य  जन्माचा  अंत  कधी  होणार  हे  कोणीच  जाणू  शकत  नाही.  म्हणून  बुध्दिमान  मनष्याने  म्हातारपण  किंवा  तरूणपणाची  वाट   पहाता  लहानपणा  पासूनच  भगवंताची  भक्ती  केली  पाहिजे.  भगवंतास  सर्वस्व  समर्पित  करणे  हीच  या  मनुष्यजन्माची  सार्थकता  आहे.  सामान्य  मनुष्यास  बालपणी  त्याच्या  हिताचे   अहिताचे  ज्ञान  नसते.  लहानपणी  तो  खेळण्यामध्ये  रमून  जातो.  तरूणपणी  कुटूंबाच्या  पालन-पोषणामध्ये  तो  इतका  गुदमरून  जातो  की  त्यास  आत्मकल्याणाचे  भान  सुध्दा  रहात  नाही.  तर  म्हातारपणी  शरीरामध्ये  काही  साधना  करण्याची  शक्ति  नसते.  अशा  प्रकारे  मनुष्य  आपले  संपूर्ण  आयुष्य  संसारी  उपभोगामध्ये  वाया  घालवितो.  भगवंताची  भक्ती  करण्यासाठी  त्याला  वेळच  मिळत  नाही.  परंतू  विचार  केल्यास  समजते  की  भगवंतास  प्रसन्न  करण्यासाठी  कठोर  परिश्रम  करण्याची  सुध्दा  गरज  नसते  कारण  तो  सर्व  प्राणिमात्रांचा  आत्मा  असून  प्रत्येक  ठिकाणी  आहे.  ब्रह्मदेवा  पासून  अतिसुक्ष्म  जंतू  पर्यंत  सर्व  लहान  मोठ्या  पाणिमात्रांमध्ये,  पंचभूतांनी  बनलेल्या  प्रत्येक  वस्तुमध्येे,  पंचभूतांमध्ये,  सुक्ष्म  तन्मात्रामध्येे,  महतत्त्वामध्ये  आणि  प्रकृतीमध्ये  एकच  अविनाशी  परमात्मा  आहे.  त्रिगुणात्मक  मायेच्या  प्रभावाने  त्याचे  स्वरूप  झाकले  गेले  आहे.  ती  महामाया  पार  केल्या  नंतर  त्याचे  दर्शन  होऊ  शकते.  आत्मविद्या,  कर्मकांड,  तर्कशास्त्र  हे  वेदातील  प्रतिपाद्य  विषय  आहेत,  परंतु  ते  जर  भगवंतास  शरण  जाण्याचा  मार्ग  दाखवित  नसतील  तर  ते  केवळ  निरर्थक  आहेत.  जो  मनुष्य  सत्पुरूषांच्या  सत्संगा  मध्ये  आपले  देहभान  विसरतो,  त्यास  आत्मज्ञान  प्राप्त  होऊ  शकते.  कारण  त्यामुळे  देहाभिमान  नष्ट  होतो.  या  भागवतधर्मामध्ये  विज्ञानसहित  शुध्द  आत्मज्ञान  आहे.  फक्त  ब्राह्मण,  देवता  किंवा  ऋषी  होणे,  सदाचारी   ज्ञानसंपन्न  होणे,  तसेच  मोठ-मोठ्या  व्रतांचे  अनुष्ठान  करणे  इतकेच  भगवंताच्या  प्राप्ती  साठी  आवश्यक  नाही.  कोणत्याही  प्राणिमात्राने  भगवंताची  निष्काम  प्रेम-भक्ती  केली  तरी  तो  त्यास  प्रसन्न  होतो.  अहैतुक  भक्ति  हेच  एकमेव  साधन  आहे.  बाकी  सर्व  काही  केवळ  निरर्थक  आहे.  देवर्षी  नारद  युधिष्ठिरास  उपदेश  करतात.  धर्माची  तीस  लक्षणे  आहेत.  अहंकार-रहीत,  मौन,  सत्य,  चिंतन,  दया,  तपस्या,  देहशुध्दी,  विवेक,  संयम,  ब्रह्मचर्य,  त्याग,  सहजता,  ममता,  अहिंसा,  सदाचार,  आनंद,  समभाव,  वंदन,  संतसेवा,  ईश्वरभाव,  श्रवण,  संकीर्तन,  स्मरण,  सेवा,  भोगत्याग,  पूजन,  समर्पण,  दास्यसेवा,  मित्रता,  समता  या  तीस  लक्षणांचे  आचरण  करणे  हे  मनुष्याचे  कर्तव्य  आहे.  त्यामुळे  भगवंत  प्रसन्न  होतो.  ब्राह्मण,  क्षत्रिय,  वैश्य,  आणि  शूद्र  हे  चार  वर्ण  असून  ते  मनुष्याच्या  स्वभाव-गुणांवर  आधारलेले  आहेत.  जो  मनुष्य  शम,  दम,  तप,  शौच,  संतोष,  क्षमा,  सरलता,  ज्ञान,  दया,  भगवत्  परायणता  आणि  सत्य  या  लक्षणांनी  युक्त  आहे,  त्यास  ब्राह्मण  म्हणतात.  जो  मनुष्य  उत्साह,  वीरता,  धैर्यता,  तेजस्विता,  त्याग,  मनोजय,  क्षमा,  ब्राह्मण-भक्ति,  अनुग्रह,  आणि  प्रजा-रक्षण,  या  लक्षणांनी  युक्त  आहे,  त्यास  क्षत्रिय  म्हणतात.  जो  मनुष्य  अर्थ-धर्म-काम  यांची  वृध्दी  करतो,  आणि  गुरूभक्ति,  श्रीहरिभक्ति,  आस्तिकता,  उद्योगशीलता,  व्यावहारिक  निपुणता  या  लक्षणांनी  युक्त  आहे,  त्यास  वैश्य  म्हणतात.  जो  मनुष्य  ब्राह्मण,  क्षत्रिय   वैश्य  यांची  विनम्रतेने  निष्कपटसेवा  करतो,  त्यास  शूद्र  म्हणतात.  धर्म  शास्त्रांचे  अध्ययन   अध्यापन,  दानधर्म,  यज्ञकर्म  हे  ब्राह्मणाचे  मुख्य  कर्म  आहे.  प्रजेचे  रक्षण  हे  क्षत्रियाचे  मुख्य  कर्म  आहे.  गोसंवर्धन,  कृषी  आणि  व्यापार  हे  वैश्याचे  मुख्य  कर्म  आहे.  तर   ब्राह्मण,  क्षत्रिय   वैश्य  यांची  विनम्रतेने  निष्कपटसेवा  करणे  हे  शूद्राचे  मुख्य  कर्म  आहे.  ब्रह्मचर्य,  गृहस्थ,  वानप्रस्थ  आणि  संन्यास  हे  चार  आश्रम  आहेत.  हे  अध्यात्मयोगाचे  मुख्य  आचरण  तत्त्व  आहे.  गुरू  सेवा  हाच  ब्रह्मचर्याचा  मुख्य  धर्म  आहे.  यज्ञोपवित  संस्कार  झाल्या  नंतर  ब्रह्मचारी  गुरूकुलामध्ये  राहून  धर्मशासात्राचा  अभ्यास  करतो.   तो  आपल्या  इंद्रियांस  वश  करून  सेवा  वृत्तीने  गुरूदेवाच्या  चरणी  समर्पित  होतो.  तो  प्रातःकाळी  आणि  संध्याकाळी  गुरू,  अग्नि,  सूर्य  आणि  श्रेष्ठ  देवतांची  पूजा  करतो.  मौन  व्रताने  गायत्रीचे  अनुष्ठान  करतो.  गुरूदेवांच्या  आज्ञेचे  पालन  करून  वेदांचे  अध्ययन  करतो.  दररोज  अध्ययनाच्या  आधी   अध्ययनाच्या  नंतर  गुरूदेवांच्या  चरणावर  डोके  ठेऊन  नमस्कार  करतो.  शास्त्रा  प्रमाणे  मेखला,  मृगचर्म,  जटा,  दंड,  कमंडलु,  यज्ञोपवित  आणि  कुश  धारण  करतो.  दुपारी   संध्याकाळी   भिक्षा  मागून  गुरूदेवांच्या  चरणी  अर्पित  करतो.  त्यांच्या  आज्ञेनुसार  अन्न  ग्रहण  करतो.  स्त्रियांशी  संबंध  ठेवीत  नाही.  या  प्रमाणे  गुरूकुलामध्ये  धर्मशासात्राचा  अभ्यास  पुर्ण  करून  गुरू-दक्षिणा  देतो.  त्या  नंतर  त्यांच्या  आज्ञेनुसार  गृहस्थ  आश्रमामध्ये  प्रवेश  करतो.  प्रजोत्पादन  आणि  यज्ञ-याग  करणे  हा  गृहस्थाचा  मुख्य  धर्म  आहे.  तो  आपल्याच  वर्णाच्या  सुशील  कन्येशी  विवाह  करतो.  परंतू  संसारामध्ये  आसक्त  होत  नाही.  तो  गृहस्थाची  सर्व  कर्मे  भगवंतास  समर्पित  करतो.  शरीराची  आणि  कुटूंबाची  सेवा  केवळ  निर्वाहासाठी  करतो.  अंतःकरणामध्ये  विरक्त  वृत्तीने  स्वजनांमध्ये  आसक्त  होत  नाही.  माता-पिता,  भाई-बंधु,  पत्नी-पुत्र-मित्र  यांच्या  विचारांस  केवळ  अनुमोदन  देतो.  कोणत्याही  भौतिक  वस्तुमध्ये  आसक्त  होत  नाही.  प्रारब्धाने  जे  मिळेल  त्यामध्ये  संतुष्ट  राहून  कोणत्याही  भौतिक  वस्तुंचा  संग्रह  करीत  नाही.  आपल्या  कुटूंबाच्या  पालन-पोषणा  इतकेच  धन  कमवितो.  आपल्या  पत्नी  कडून  अतिथी-सत्कार  करवितो.  आपल्या  पितरांचे  श्राध्द  करतो.  या  गृहस्थधर्माचे  कर्तव्य  पूर्ण  केल्या  नंतर  तो  मनुष्य  वानप्रस्थ  आश्रमामध्ये  प्रवेश  करतो.  तपस्या  करणे  हाच  वानप्रस्थीचा  मुख्य  धर्म  आहे.  जंगलात  पर्णकुटीमध्ये  राहून  फक्त  कंदमूळाचा,  फळाचा  आहार  घेतो.  डोक्यावर  जटा  धारण  करून  नख  आणि  दाढी-मिश्या  कापीत  नाही.  उन-पाऊस   थंडी  अंगावर  घेऊन  शरीराची  आसक्ति  हळू-हळू  कमी  करतो.  आपापल्या  सहनशक्ति  नुसार  हे  व्रत  करून  बुध्दी  भ्रमिष्ट  होणार  नाही  याची  काळजी  घेतो.  आत्मानुभूती  हाच  संन्याशाचा  मुख्य  धर्म  आहे.  मनुष्य  वानप्रस्थ-व्रताचे  बारा  वर्षे  आचरण  केल्या  नंतर  ब्रह्मविचाराचे  सामर्थ्य  असेल  तर  सर्वत्याग  करून  संन्यास  ग्रहण  करतो.  कोणा  ही  व्यक्ति,  वस्तु,  स्थान  यांच्या  कडून  कशाची  ही  अपेक्षा  करीत  नाही.  एका  गावी  एकाच  दिवसाचा  मुक्काम  या  व्रताने  सर्वत्र  भ्रमण  करतो.  सर्व  प्राणीमांत्राशी  समभाव  ठेवतो.  वाद-विवाद  करीत  नाही.  शिष्य-गण  संप्रदाय  बनवित  नाही.  तो  नेहमी  आत्मानुसंधानामध्ये  मग्न  असतो.  या  प्रमाणे  वर्णाश्रमाचे  आचरण  करून  मनुष्याचे  अंतिम  कल्याण  होऊ  शकते.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       


 (११)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  आठव्या  स्कंधामध्ये  ब्रह्मदेवानेे  उपदेश  केला  आहे.  जो  मनुष्य  विषयांच्या  लोभाने  कर्म  करताना  दुःख  भोगतो,  त्याला  ते  कर्म  करतानाच  कठोर  परिश्रम  होतात.  अनेकदा  ती  कर्मे  विफल  होतात,  परंतू  जे  कर्म  परमेश्वरास  समर्पित  केले  जाते  त्याच  क्षणी  मनुष्यास  सुख  मिळते.  तसेच  समर्पित  केलेले  कोणतेही  कर्म  कधीच  विफल  होत  नाही  कारण  ते  कर्म  भगवंत  स्वतः  सफल  करीत  असतो.  या  पंचभौतीक  विश्वामध्ये  मायेचा  प्रभाव  असताना  देखील  मनुष्याने  योग-साधनेने  भगवंताची  अनुभूती  करून  घेतली  पाहिजे.  जसे  तो  गाईपासून  अमृतरूपी  दुध   जमिनीतून  जीवनावश्यक  अन्न-धान्य  प्राप्त  करून  घेतो.  जो  मनुष्य  सामर्थ्यवान  आहे,  त्याने  आपल्या  प्राणांची  पर्वा   करता  दीन-दुबळ्यांचे  रक्षण  करण्यामध्येच  त्याच्या  जीवनाची  सफलता  आहे.  मनुष्याचे  यश-अपयश,  सफलता-विफलता  हे  सर्व  काही  काळाच्या  आधीन  आहे.  ज्ञानीजन  यशामध्ये  सुखी  होत  नाहीत  तर  अपयशामध्ये  दुःखी  ही  होत  नाहीत.  भगवंत  कर्म  करताना  त्यामध्ये  आसक्त  होत  नाही  कारण  त्यांना  त्या  कर्मापासून  कोणताही  स्वार्थ  साधायचा  नसतो.  भगवंत  स्वच्छंदरूपाने  कर्म  करतात.  ते  आपल्या  अवकार  कार्यातून  मनुष्यां  समोर  आदर्श  उभा  करतात.  तोच  सर्व  धर्मांचा  प्रवर्तक  आणि  त्यांचा  जीवनदाता  आहे.  शुकदेव  परीक्षितास  उपदेश  करतात.  मनुष्य  आपल्या  प्राणाने,  धनाने,  कर्माने,  मनाने  आणि  वाणीने  स्वतःच्या  शरीरासाठी  तसेच  स्वजनांसाठी  जे  कार्य  करतो,  ते  सर्व  व्यर्थ  आहे.  कारण  त्यामध्ये  भेदबुध्दि  असते.  देहाभिमान  असतो.  परंतु  जो  मनुष्य  काया  वाचा  मनाने   सर्व  कर्मे  भगवंतासाठी  करतो,  ते  कार्य  भेदभाव  रहित  होऊन  सर्व  प्राणीमांत्रासाठी  सफळ  होत  असते.  जसे  झाडाच्या  मुळाशी  पाणी  दिले  तर  ते  झाडाच्या  पानांना,  फांद्यांना,  फळांना,  फुलांना  सर्वांना  मिळते,  तसेच  भगवंतासाठी  केलेले  प्रत्येक  कर्म  सर्व  प्राणीमात्रांसाठी  होत  असते.  जो  मनुष्य  शुध्द  अंतःकरणाने  भगवंतास  साधे  पान  अर्पण  करतो,  तीच  खरी  पूजा  आहे.  त्या  मनुष्यास  उत्तम  गति  प्राप्त  होते.  मनुष्य  आपल्या  इंद्रियांस  नियंत्रित  करू  शकत  नसेल  तर  या  विश्वातील  सर्वच्या  सर्व  विषय-भोगाने  सुध्दा  त्याची  इच्छा  पुर्ण  होणार  नाही  तो  संतुष्ट  होणार  नाही.  प्रारब्धाने  जे  मिळेल  त्यामध्ये  समाधान  मानणारा  मनुष्य  आयुष्यभर  सुखाने  जगू  शकतो.  परंतू  तीन्ही  लोकांचे  राज्य  प्राप्त  करून  सुध्दा  असमाधानी  मनुष्य  जन्मभर  दुःखच  भोगीत  रहातो.  कारण  त्याच्या  हृदयामध्ये  असंतोषाची  आग  भडकत  असते.  मनुष्य  धन-संपत्ती   भोगामध्ये  संतुष्ट  झाला  नाही  तर  त्याला  जन्म-मरणाच्या  चक्रामध्ये  भटकावे  लागते.त्यामुळे  त्याचे  तेज  नष्ट  होते.  परंतू  जो  मनुष्य  जे  मिळेल  त्यामध्ये  समाधान  मानतो  त्यास  जन्म-मरणातून  मुक्ती  मिळते.  त्याचे  तेज  अंगकांतीमध्ये  दिसून  येते.  ज्या  मायेने  मोहित  होऊन  जीव  आपले  वास्तविक  स्वरूप  विसरलेला  आहे,  ती  महामाया  भगवंताची  दासी  आहे.  तीला  पार  करणे   अत्यंत  कठीण  आहे.  जीव  केवळ  आपल्या  पुरूषार्थाने  मायेस  जाणू  शकत  नाही.  त्यासाठी  भगवंताची  कृपा  आवश्यक  आहे.  ब्रह्मदेव,  ऋषी-मुनी  आणि  देवता  भगवंताच्या  परमप्रिय  सत्त्वमय  शरीरातून  उत्पन्न  झालेले  असून  ते  सुध्दा  भगवंताच्या  वास्तविक  स्वरूपास  जाणू  शकत  नाहीत.  तर  मग  रजोगुण  आणि  तमोगुणप्रधान  प्राणिमात्रांस  भगवंताचे  स्वरूप  जाणणे  केवळ  अशक्य  आहे.  भगवंत  ज्या  मनुष्यावर  कृपा  करतो,  त्याची  धन-संपत्ती  प्रथम  हिरावून  घेतो.  कारण  संपत्तीच्या  अहंकाराने  मनुष्य  उन्मत्त  होतो,  तो  भगवंताचा  आणी  इतरांचा  सुध्दा  तिरस्कार  करू  लागतो.  तो  जीव  कर्मानुसार  अनेक  योनिंमध्ये  भटकत  राहतो.  अनेक  जन्मां  नंतर  जेव्हा  भगवंताची  त्या  जीवावर  कृपा  होते,  तेव्हा  त्याला  पुन्हा  मनुष्य  शरीर  प्राप्त  होते.  तेव्हा  त्याला  आपल्या  कुळाचा,  कर्माचा,  रूपाचा,  विद्येचा,  ऐश्वर्याचा,  आणि  धन-संपत्तीचा  अहंकार  होत  नाही.  कारण  त्या  मनुष्यावर  भगवंताची  कृपा  असते.  हा  देहाचा  अभिमान   मनुष्याच्या  अनेक  कल्याणकारी  साधन  मार्गातील  मोठा  अडसर  आहे.  परंतु  जो  मनुष्य  भगवंतास  शरणागत  होउन  त्याची  कृपा  संपादन  करतो,  त्यास  हा  देहाचा  अभिमान  मोहित  करू  शकत  नाही.  शुक्राचार्य  बलिराजास  उपदेश  करतात  जो  मनुष्य  आपल्या  उत्पन्नातील  काही  भाग  धर्मकार्यासाठी  खर्च  करतो,  काही  भाग  आपल्या  यशकीर्तीसाठी  खर्च  करतो,  काही  भाग  उत्पन्नाच्या  वृध्दीसाठी  खर्च  करतो,  काही  भाग  उपभोगासाठी  खर्च  करतो,  आणि  काही  भाग  आपल्या  स्वजनांसाठी  खर्च  करतो,  त्यास  जन्मभर   मरणानंतर  सुध्दा  सुख-शांती  प्राप्त  होते.  ज्या  संपत्तीचा  मनुष्याला  अंतसमयी  त्याग  करावा  लागतो.  ती  संपत्ती  जिवंतपणी  ब्राह्मणांस  दान  देऊन  त्यास  संतुष्ट  करणे  हेच  हितकारी  आहे.  राज्यनाश,  दरिद्रता,  अपार  दुःख,  मृत्यु,  नरकवास  या  स्वां  पेक्षा  ब्राह्मणाचा  क्रोध  भयंकर  उग्र  असतो.  म्हणून  ब्राह्मणांस  जो  मनुष्य  संतुष्ट  करतो  त्यास  जन्मभर  आणि  मरणा  नंतर  सुध्दा  समाधान  प्रप्त  होते.  जो  मनुष्य  उदार  अंतःकरणाने  सत्पात्र  दान  करून  निर्धन  होतो,  तरी  त्याचे  निर्धन  हेच  त्या  मनुष्यास  गौरवास्पद  असते.  सत्य  आचरण  करणे  हे  शास्त्र  संमत  असले  तरी  काही  अपवादात्मक  प्रसंगामध्ये  असत्य-भाषण  निंदनीय  नाही.  उदाहरणार्थ  स्त्रियांना  प्रसन्न  करताना,  थट्टा-मस्करीमध्ये,  विवाह  प्रसंगी,  कन्येची  प्रशंसा  करताना,  आपल्या  संपत्तीच्या  रक्षणासाठी,  प्राणसंकट  प्रसंगी,  आणि  गाय   ब्राह्मणांच्या  हितासाठी,  असत्य  बोलणे  निंदनीय  नसते.  सत्यव्रत  राजा  उपदेश  करतात.  या  ब्रह्मांडातील  सर्व  देवता,  सद्गुरू,  सत्पुरूष  या  सर्वांनी  एकत्रपणे  जरी  एखाद्या  मनुष्यावर  कृपा  केली  तरी  ती  भगवंताच्या  कृपेची  बरोबरी  करू  शकणार  नाही.  भगवंत  एकमेव  सर्वशक्तिमान  आहे.  म्हणून  त्या  भगवंतास  आपले  सर्वस्व  समर्पित  करावे.  अविद्येने  मनुष्याचे  आत्मज्ञान  झाकले  गेले  आहे.  तो  आंधळा  झाला  आहे.  त्यामुळेच  तो  असंख्य  दुःख  भोगीत  आहे.  जसे  एक  आंधळा  दुसया  आंधळ्यास  आपल्या  प्रवासाचा  मार्गदर्शक  बनवितो,  त्याच  प्रमाणे  अज्ञानी  मनुष्य  अज्ञानी  मनुष्यास  आपला  गुरू  मानतो.  त्या  अज्ञानी  गुरूने  केलेला  उपदेश  केवळ  अज्ञानच  आहे.  त्याने  घोर  अंधकारी  अज्ञानाचीच  वृध्दी  होत  असते.  परंतू  भगवंताच्या  उपदेशाने  मनुष्यास  आपल्या  नित्य  स्वरूपाचे  ज्ञान  होते.  म्हणून  मनुष्याने  केवळ  भगवंतास  शरण  जाऊन  आत्मज्ञान  प्राप्त  करून  घ्यावे.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (१२)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  नवव्या  स्कंधामध्ये  शुकदेवाने  परीक्षित  राजास  उपदेश  केला  आहे.  भगवंताचे  परमभक्त  मोठे  भाग्यवान  असतात.  त्याना  अखंड  पृथ्वीचे  अतुलनिय  ऐश्वर्य  प्राप्त  झाले  तरी  त्यास  ते  स्वप्नतुल्य  समजतात.  कारण  ते  जाणतात  ते  सर्व  ऐश्वर्य  अस्थिर  आहे.  नाशिवंत  आहे.  असत्य  आहे.  त्याच  धन-संपत्तीच्या  लोभाने  मनुष्यास  मृत्यु  नंतर  घोर  नरकामध्ये  जावे  लागते.  ते  सर्व  ऐश्वर्य  फक्त  चार  दिवसाच्या  चांदण्या  प्रमाणे  आहे.  ते  आपल्या  स्वजनांमध्ये  आसक्त  होत  नाहीत.  कारण  त्यांचा  संबंध  केवळ  अल्प  काळ  असतो  जसे  एखाद्या  पाणपोईवर  अनोळखी  प्रवासी  थोडा  वेळ  एकत्र  येतात.  तितक्याच  काळा  पर्यंत  स्वजनांचा  संबंध  त्या  मनुष्याच्या  जीवनाशी  या  जन्मामध्ये  असतो.  अशा  प्रकारे  ही  सर्व  सृष्टि  भगवंताच्या  मायेचा  खेळ  असून  स्वप्नवत  आहे.  ते  भगवंताचे  परमभक्त  राज्य  मिळविण्याची  इच्छा  करीत  नाही.  कारण  जो  मनुष्य  राजकारणामध्ये  सहभाग  घेतो,  त्यास  आत्मस्वरूपाचे  ज्ञान  मिळविण्यासाठी  वेळ  मिळत  नाही.  असे  भक्त  अनन्यभावाने  श्रीकृष्णावर  प्रेम  करतात.  त्या  भक्तांची  प्रेम-साधना  परीपुर्ण  झाल्या  नंतर  त्यांना  हे  संपुर्ण  विश्व  आणि  त्या  विश्वातील  सर्व  ऐश्वर्य  केवळ  मातीमोल  जाणवते.  ते  परमभक्त  सर्वांगाने  श्रीकृष्णाची  आराधना  करतात.  ते  आपले  मन  श्रीकृष्णाच्या  चरणी  समर्पित  करतात.  आपल्या  वाणीने  श्रीकृष्णाच्या  दिव्य  लीलेचे  गुणगान  करतात.  आपल्या  हाताने  श्रीकृष्णाच्या  मंदिराची  सेवा  करतात.  आपल्या  कानाने  श्रीकृष्णाच्या  मंगलमयी  स्तुतींचे  श्रवण  करतात.  आपल्या  डोळ्याने  श्रीकृष्णमूर्ति  चे  दर्शन  घेतात.  श्रीकृष्णमूर्तिस  अर्पण  केलेल्या  तुळशीपत्राचा  वास  घेतात.  श्रीकृष्णास  अर्पित  केलेला  नैवेद्य  कृपा-प्रसादरूपाने  ग्रहण  करतात.   श्रीकृष्णाच्या  चरणकमलांनी  पावन  झालेल्या  तीर्थक्षेत्रांची  यात्रा  आपल्या  पायाने  करतात.  श्रीकृष्णाच्या  चरणांवर  आपले  मस्तक  ठेऊन  सर्वस्व  अर्पण  करतात.  या  प्रकारे  ते  भक्त  आपली  सर्व  कर्मे  श्रीकृष्णांस  सर्वात्मा   सर्वस्वरूप  समजून  त्यास  समर्पित  करतात.  अशा  भक्तंाना  नित्य  निरंतर  श्रीकृष्णाचे  दर्शन  होत  असते.  म्हणून  कोणतीही  भौतीक  संपत्ति  आणि  विषयभोग  त्यांना  श्रीकृष्णभक्ती  पासून  विचलित  करू  शकत  नाही.  त्या  आत्मानंदाच्या  तूलनेमध्ये  कोणतीही  भौतीक  संपत्ति  आणि  विषयभोग  केवळ  तुच्छ  आणि  तिरस्कृत  अनुभवास  येते.  अशा  परमभक्तांच्या  रक्षणासाठी  श्रीकृष्णाचे  सुदर्शन  चक्र  आहे.  हे  सुदर्शन  चक्र  अग्निस्वरूप  असून  ते  दुष्टांचा  संहारक   भक्तांचे  रक्षण  करणारे  आहे.  श्रीकृष्ण  अशा  परमभक्तांच्या  अधीन  असतात.  या  परमभक्तांच्या  हृदयी  श्रीकृष्णाचा  निवास  असतो.  श्रीकृष्ण  या  परमभक्तांवर  कृपाळूपणे  प्रेम  करतात.  श्रीकृष्ण  या  परमभक्तांचा  एकमात्र  आश्रय  आहे.  म्हणून  असे  हे  परमभक्त  स्त्री,  पुत्र,  गृह,  गुरूजन,  प्राण,  धन,  इहलोक,  आणि  परलोक  सर्व  काही  सोडून  केवळ  श्रीकृष्णास  आपले  सर्वस्व  समर्पित  करतात.  जसे  पतिव्रता  स्त्री  आपल्या  पतिव्रत्याने  सदाचारी  पतिस  वश  करते,  तसेच  हे  परमभक्त  आपल्या  निष्काम  भक्तिने  श्रीकृष्णास  वश  करतात.  हे
 परमभक्त  श्रीकृष्णसेवे  मध्येच  आपल्या  जीवनाची  कृतकृत्यता  मानतात.  कोणी  दुष्ट  मनुष्याने  जरी  या  परमभक्ताचा  प्राण-घात  करण्याचा  प्रयत्न  केला  तरी,  हे  परमभक्त  त्या  दुष्ट  मनुष्याचे  मंगल  चिंतन  करतात.  ते  कोणतीही  द्वेषभावना  करीत  नाहीत.  या  प्रकारे  त्यांचा   स्वभाव  नवविधा  भक्तिरूप  होतो.  पादसेवन,  अर्चन,  वंदन,  दास्य  आणि  सख्य  ही  बहिरंग  साधने  आहेत.  स्मरण,  आत्मनिवेदन  ही  अंतरंग  साधने  आहेत.  तसेच  श्रवण  आणि  कीर्तन  ही  अंतरंग  आणि  बहिरंग  साधने  आहेत.  भक्ताच्या  अंतःकरणाची  बहिर्मुखता  नष्ट  होऊन  ते  अंतःकरण  अंतर्मुख  होऊन  श्रीकृष्णामध्ये  एकरूप  होणे  हेच  भक्तिचे  मुख्य  लक्षण  आहे.  या  प्रकारे  त्या  भक्ताच्या  अंतःकरणाच्या  सर्व  वृत्ती  अंतर्मुख  होऊन  हळू-हळू  नष्ट  होतात.   अंतःकरण  स्थिर  होते.   मुख्यतः  शरीराच्या  अहंकारची  वृत्ति  आत्म  स्वरूपामध्ये  विसर्जित  करणे  हेच  भक्तिचे  अंतिम  उद्दीष्ट  आहे.  या  कठोर  साधनेने  तो  भक्त  दिव्य  अवस्थेमध्ये  पोहोचतो,  तो  आपले  देहभान  विसरून  जातो.  त्याचे  अस्तित्व  शिल्लक  रहात  नाही.  तो  श्रीकृष्णामध्ये  एकरूप  होतो.  त्यामुळे  शरीराचे  सर्व  विकार   दोष  नष्ट  होतात.  तो  त्या  परमानंदामध्ये  मग्न  होऊन  जातो.  अशा  परमभक्तांचा  सत्संंग  केला  पाहिजे.  त्यांना  श्रीकृष्ण  सोडून  कधी  ही,  कोणत्याही   वस्तुमध्ये  कणभर  सुध्दा  आसक्ति  नसते.   अशा  निष्काम  भक्ती-साधनेने   विषयासक्तिचे  सर्व  दोष  नाहिसे  होतात.  जो  मनुष्य  श्रीकृष्णास  आपल्या  जीवनाचे  उद्दीष्ट  मानतो,  तो  कोणतेही  अशक्य  कार्य  शक्य  करून  दाखवितो,  कारण  ते  कार्य  श्रीकृष्णाच्या  कृपेने,  श्रीकृष्णच  यशस्वी  करीत  असतो.  अशा  प्रकारे  भक्तिच्या  पवित्र  सागरामध्ये  स्नान  केल्या  शिवाय  मनुष्याचे  जीवन  सुख-शांतीमय  बनू  शकत  नाही.  ययाति  राजा  उपदेश  करतात.  या  पृथ्वीवरील  सर्व  अन्न-धान्य,  सुवर्ण,  पशु,  स्त्रिया  हे  सर्व  काही  भोगी  मनुष्यास  दिले  तरी  त्याचे  मन  संतुष्ट  होणार  नाही.  इंद्रियांचे  विषय  भोगून  भोगवासना  कधी  ही  शांत  होत  नसते.  जसे  यज्ञकुंडामध्ये  आहुति  घातल्यावर  अग्नि  भडकतो,  त्या  प्रमाणे  वासना  भोगून  त्या  आधीक  प्रबळ  होतात.  इंद्रियांचे  विषय  भोगण्याची  इच्छा  हेच  दुःखाचे  मूळ  कारण  आहे.  मनुष्याचे  शरीर  म्हातारपणी  कमजोर  होते,  परंतू  भोगण्याची  इच्छा  प्रबळ  होत  रहाते.  म्हणून  जो  मनुष्य  आपले  कल्याण  साधण्याची  इच्छा  करतो,  त्याने  ताबडतोब  या  इंद्रियांचे  विषय  भोगण्याच्या  इच्छेचा  त्याग  केला  पाहिजे.  मनुष्याने  आपली  आई,  बहिण,  आणि  मूलगी  यांच्या  जवळ  सुध्दा  एकांतामध्ये  बसू  नये.  कारण  इंद्रिये  प्रबळ  असतात.  मोठ-मोठ्या  विद्वानांस  सुध्दा  ही  इंद्रिये  विचलित  करतात.  भोगासक्त  मनुष्यांची  साथ  करू  नये.  क्षणभर  सुध्दा  आपल्या  इंद्रियास  बहिर्मुख  होऊ  देऊ  नये.  नेहमी  एकटेच  रहावे.  एकांतामध्ये  आपले  चित्त  सर्वशक्तिमान  श्रीकृष्णाच्या  चरणी  स्थिर  केले  पाहिजे.  दीर्घकाळाच्या  तपस्येचे  तेज  एका  क्षणामध्ये  नष्ट  होऊ  शकते.  साथ  संगतीची  आवश्यकता  असेलच  तर  अनन्यप्रेमी  निष्ठावान  सत्पुरूषांचा  सत्संंग  करावा.  पृथ्वीवरचे  आणि  स्वर्गातील  सर्व  उपभोग  असत्य  आहेत  असे  समजून  त्यांचा  विचार  सुध्दा  करू  नये.  त्या  विचारांमुळेच  जन्म-मरणाच्या  चक्रामध्ये  मनुष्यास  भटकावे  लागते.  आणि  ते  भोग  उपभोगल्यास  अवश्य  आत्मनाश  होतो.  हे  रहस्य  जाणणारा  आणि  त्या  भोगांचा  त्याग  करणारा  आत्मज्ञानी  असतो.
 आई-वडीलांच्या  कृपेने  मनुष्यजन्म  मिळतो.  वडीलांच्या  मनातील  विचार  जाणून  आचरण  करणारा  उत्तम  पुत्र  असतो.  वडीलांच्या  आज्ञेचे  पालन  करणारा  कनिष्ठ  पुत्र  असतो.  आणि  वडीलांच्या  आज्ञेचे  पालन   करणायास  पुत्र  म्हणणे  अपराध  आहे.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (१३)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  दहाव्या  स्कंधामध्ये  श्रीकृष्णाने  उपदेश  केला  आहे.  या  सृष्टिमधील  सर्व  प्राणीमात्र  आपापल्या  कर्मानुसार  जन्माला  येतात  आणि  कर्मानुसार  मरतात.  तसेच  प्रत्येकाच्या  कर्मानुसार  त्याला  सख-दुःख  प्राप्त  होते.  जरी  कर्माचे  फळ  देणारा  परमेश्वर  आहे  असे  मानले  तरी  तो  सुध्दा  कर्म  करणायास  त्या  कर्मानुसारच  फळ  देतो.  कर्म   करणायास  फळ  देण्याचा  प्रश्नच  येत  नाही.  अशा  प्रकारे  मनुष्य  आपल्या  पुर्व-कर्म  संस्काराच्या  अधीन  आहे.  तो  मनुष्य  त्या  संस्कारा  प्रमाणे  अनुकरण  करतो.  आपल्या  कर्मानुसार  हा  शत्रु  आहे,  हा  मित्र  आहे,  असे  मानतो.  म्हणून  त्याचे  कर्म  हेच  मनुष्याचे  गुरू  आणि  ईश्वर  आहे.  मनुष्याने  आपल्या  पुर्व-संस्कारानुसार  वर्ण   आश्रमाचे  अनुकूल  आचरण  करून  कर्माचा  आदर  केला  पाहिजे.  जे  कर्म  करून  मनुष्याचे  जीवन  सुलभ  होते,  तोच  त्याचा  इष्टदेव  असतो.  तो  इष्टदेव  सोडून  इतर  देवतांची  उपासना  करून  त्यास  कधी  ही  सुख-शांती  मिळत  नाही.  श्रीकृष्ण  गोपींना  उपदेश  करतात.  जो  मनुष्य  प्रेम  करणायावरच  प्रेम  करतो,  तो  केवळ  स्वार्थी  असतो.  त्यामध्ये  फक्त  व्यवहार  असतो.  परंतू  जो  मनुष्य  प्रेम   करणायावर  ही  प्रेम  करतो,  त्याचे  प्रेम  निस्वार्थी  असते.  साधारणतः  मनुष्य  स्वभावाचे  चार  प्रकारामध्ये  वर्णन  करता  येते.  पहिल्या  प्रकारातील  मनुष्य  आपल्या  स्वरूपामध्ये  मग्न  झालेले  असतात.  सर्व  विश्वाकडे  ते  अद्वैत  भावनेने  पहातात.  दूसया  प्रकारातील  मनुष्य  द्वैत  भावाने  पहातात,  परंतू  तो  पुर्ण  समाधानी  असतो.  तिसया  प्रकारातील  मनुष्य  अज्ञानी  असतो,  त्याच्यावर  कोण  प्रेम  करते  हे  सुध्दा  त्याला  समजत  नाही.  चौथ्या  प्रकारातील  मनुष्य  प्रेम  करणाया  मनुष्याचा  मत्सर  भावनेने  द्वेष  करतो.  श्रीकृष्ण  आपल्या  भक्तांची  चित्तवृत्ती  स्थिर  करण्यासाठी  त्यांना  विरह  भक्तीची  शिकवण  देतात.  श्रीकृष्ण  आणि  गोपींचे  मिलन  हे  आत्मा  आणि  परमात्म्याचे  मिलन  असून  ते  शुध्द   निदर्ोष  आहे.  त्या  मिलनाची  परतफेड  करून  त्याचे  महत्व  करता  येत  नाही.  असे  हे  भक्ताचे   भगवंताचे  मिलन  मोठे  अलौकिक  आहे.  शुकदेव  परीक्षित  राजास  उपदेश  करतात.  सूर्य,  अग्नि  आणि  परमेश्वर  कधी  कधी  सृष्टीच्या  नियमांचे  उल्लंघन  करतात.  परंतू  त्यांना  त्याचा  दोष  लागत  नाही.  जसे  अग्निमध्ये  अनेक  प्रकारच्या  वस्तु  जळून  भस्म  होतात,  तरी  कोणत्याही  वस्तूचा  गुणधर्म  त्या  अग्निस  चिटकत  नाही.  ज्या  मनुष्यामध्ये  असे  अलौकिक  सामर्थ्य  नाही,  त्याने  त्या  पराक्रमाचा  विचार  सुध्दा  करू  नये.  प्रत्यक्ष  तो  पराक्रम  करण्याचा  प्रयत्न  कधी  ही  करू  नये.  कारण  जर  त्या  मनुष्याने  तो  पराक्रम  करण्याचा  प्रयत्न  केला  तर  त्याचा  नाश  होतो.  जसे  शंकराने  विष  प्राशन  केले  म्हणून  जो  मनुष्य  ते  विष  प्राशन  करण्याचा  प्रयत्न  करील  तो  मरून  जाईल.  म्हणून  मनुष्याने  भगवंताच्या  उपदेशाचेच  पालन  करावे.  भगवंताच्या  शुभकार्यामध्ये  त्याचा  कोणताही  स्वार्थ  नसतो.  तर  त्यांच्या  अशुभकार्यामध्ये  कोणताही  अनर्थ  नसतो.  त्यांचे  अवतारकार्य  स्वार्थ  आणि  अनर्थाच्या  हून  भिन्न  असे  अहंकार  रहित  असते.  भगवंताच्या  स्वरूपाचे  रहस्य   जाणता  भगवंतावर  निष्काम  प्रेम  केले  तर  तो  भगवंतच  त्या  भक्तांचे  कृपाळूपणे  कल्याण  करतो.  हे  परमभक्त  भगवंतासाठी  आपले  स्वजन,  लोक-लाज,  विषयभोग  या  सर्वांचा  त्याग  करून  भगवंतामध्ये  एकरूप  होतात.  भगवत्  वेदवाणी,  उपनिषदे,  श्रुती,  स्मृती  केवळ  भगवंताच्या  स्वरूपाचा  शोध  घेऊ  शकतात,  ते  प्राप्त  करू  शकत  नाही.  परंतू  ते  भगवंताचे  स्वरूप  हा  परमभक्त  केवळ  भक्तियोगाने  प्राप्त  करू  शकतो.  श्रीकृष्ण  भक्तांना  उपदेश  करतात.  भगवंत  भक्तांच्या  हृदयी  असल्याने  त्या  भक्तांना  भगवंताचा  वियोग  कधी  ही  होत  नाही.  या  सृष्टीतील  प्रत्येक  ठिकाणी  भगवंत  सुक्ष्मरूपाने  आहे.  परंतू  मायेच्या  प्रभावाने  तो  दिसत  नाही.  म्हणून  या  दृश्य  सृष्टितील  आसक्तीचा  त्याग  करून  भगवंताचा  साक्षात्कार  करून  घेतला  पाहिजे.  त्यामुळे  मनुष्याचे  अंतःकरण  शुध्द  होऊन  परमेश्वरामध्ये  स्थिर  होते.  त्या  परमभक्तांचे  जीवन-सर्वस्व  तो  एकमेव  श्रीकृष्ण  आहे.  त्या  श्रीकृष्णाच्या  सेवेसाठी  त्याची  जन्मानुजन्मे  धडपड  चाललेली  असते.  शुकदेव  परीक्षित  राजास  श्रीकृष्णाच्या  दिनचर्येचा  उपदेश  करतात.  मनुष्याने  दररोज  प्रातःकाळी  झोपेतून  उठले  पाहिजे.  प्रातर्विधी  उरकून  प्रसन्न  चित्ताने  भगवंताचे  ध्यान  केले  पाहिजे.  या  ध्यानाने  तेज,  शक्ति,  निर्मळता,  पवित्रता  यांचा  आपल्यामध्ये  अनुभव  येतो.  अंतःकरण  शुध्द  होते.  आत्म्याचे  स्मरण  होते.  त्या  नंतर  शरीरावर  पाणी  घालून  नाही  तर  नदीवर  पाण्यामध्ये  जाऊन  सूर्योदयाच्या  आधी  स्नान  केले  पाहिजे.  स्नानाने  शरीरा  बरोबरच  मनातील  मलिनता  स्वच्छ  करावी.  डूबकी  मारून  स्नान  केल्यामुळे  शरीरातील  उष्णता  कमी  होते.  शरीराची  कांती  वाढून  स्पुर्ती  मिळते.  स्वच्छ  धुतलेली  वस्त्रे  परिधान  करावी,  त्यामुळे  सात्विकता  वाढते.  संध्यावंदन  करून  देवपूजा  केल्याने  आत्मशुध्दी  होते.  देवतांना  प्रसन्न  केल्यामुळे  सुखसमृध्दीची  वृध्दी  होऊन  घरातील  वातावरण  निरोगी  रहाते.  घरातील  सर्व  थोरांचा  प्रेमळ  आशीर्वाद  मिळविण्यासाठी  त्यांना  नमस्कार  करावा.  दानधर्म  करून  ब्राह्मणांना  प्रसन्न  करावे.  त्यानंतर  दिवसभर  आपले  नित्यकर्म  करून  ते  ईश्वरार्पण  करावे.  जो  मनुष्य  याचे  आचरण  निरंतर  करतो  त्यास  कर्मबंधनातून  मुक्ती  मिळते.  श्रीकृष्ण  शंकरास  उपदेश  करतात.  ज्या  मनुष्यावर  भगवंत  कृपा  करतो,  तो  भगवंत  त्याचे  धन  हळू-हळू  कमी  करून  एक  दिवस  त्यास  निर्धन  करतो.  त्यामुळे  त्याचे  स्वजन  त्याच्या  दुःखामध्ये  सहभागी   होता  त्याला  सोडून  जातात.  तो  मनुष्य  पुन्हा  धन  मिळविण्याचा  प्रयत्न  करतो,  परंतू  परमेश्वर  त्याचे  ते  प्रयत्न  निष्फळ  करतात.  अनेक  वेळा  अपयश  आल्यामुळे  निराश  होऊन  त्याला  वैराग्य  उत्पन्न  होते.  तेव्हा  तो  मनुष्य  संसारी  उपभोगांचा  त्याग  करून  परमभक्तांचा  सत्संग  करतो.  तेव्हा  भगवंताच्या  कृपेचा  वर्षाव  होतो.   तेव्हा  त्यास  सच्चिदानंद  परब्रह्माची  प्राप्ति  होते.  अशा  प्रकारे  भगवंताची  उपासना  अत्यंत  कठीण  आहे.  म्हणून  सामान्य  मनुष्य  भगवंताची  उपासना  सोडून  इतर  देवतांची  प्रार्थना  करतात.  इतर  देवता  लवकर  प्रसन्न  होऊन  त्या  मनुष्यास  झटपट  सुखसमृध्दी  देतात.  त्यामुळे  तो  मनुष्य  उन्मत्त,  गर्विष्ठ  होतो.  नंतर  तो  त्या  देवतेस  विसरून  जातो,  तसेच  त्या  देवतेचा  तिरस्कार  करू  लागतो.  शुकदेव  परीक्षित  राजास  उपदेश  करतात.  श्रीकृष्ण  पुर्णावतार  आहे.  त्याचे  आध्यात्मिक  ज्ञान  अनंत  आहे.  त्याने  उध्दवास  वेद,  उपनिषद,  श्रुती,  स्मृती  या  सर्वांच्या  तात्पर्याचा  उपदेश  केलेला  आहे.  त्याची  आधिदैविक   आधिभैतिक  शक्ति  संपूर्ण  अवतारकार्यामध्ये  दिसून  येते.  त्या  श्रीकृष्णाचे  स्मरण  नित्य  निरंतर  केले  पाहिजे.  त्यामुळेच  अंतःकरणाची  शुध्दी  होऊन  जन्ममरण  मुक्ती  मिळू  शकते.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (१४)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  अकराव्या  स्कंधामध्ये  श्रीकृष्णाने  उध्दवास  उपदेश  केला  आहे.  या  विश्वामध्ये  जे  काही  मनाने  विचार  केले  जाते,  वाणीने  बोलले  जाते,  डोळ्याने  पाहिले  जाते,  कानाने  ऐकले  जाते  तसेच  इतर  इंद्रियांनी  अनुभवले  जाते  ते  सर्व  नाशीवंत  आहे.  स्वप्नासारखी  ती  मनाची  कल्पना  आहे.  म्हणून  ते  मायारूप  आहे.  खोटे  आहे.  ज्याचे  मन  चंचल  आहे  त्याला  अनेक  वस्तू  माहीत  होतात.  वस्तुतः  हा  मनाचा  खेळ  आहे.  अनेक  तत्त्वांचा  भ्रम  झाल्यामुळे  गुणदोष  अशी  कल्पना  करावी  लागते.  ज्याच्या  बुध्दीमध्ये  हा  गुण  दोषाचा  भेद  दृढ  झाला  आहे.  त्याच्यासाठी  कर्म,  अकर्म   विकर्म  हा  भेद  सांगितला  आहे.  म्हणून  सर्व  इंद्रियांना   चित्ताला  नियंत्रित  करून  असा  अनुभव  करावा  की  सर्व  विश्व  आपल्या  आत्म्यामध्ये  परमात्म्यामध्ये  व्यापलेले  आहे.  निश्चयरूप  ज्ञान   अनुभवरूप  विज्ञानाने  संपन्न  होऊन  आपल्या  आत्म्याच्या  अनुभूतीमध्ये  आनंदी  रहाणे  हेच  वेदांचे  तात्पर्य  आहे.  त्या  अवस्थेमध्ये  कोणत्याही  विघ्नाने  मनुष्यास  दुःख  होणार  नाही  कारण  त्या  विघ्नाचे  आणि  विघ्न  करणायाचा  आत्मा  त्या  मनुष्याच्या  आत्म्यामध्ये  एकरूप  झालेला  असतो.  तसेच  तो  मनुष्य  सर्व  प्राण्यांचा  हितचिंतक  असल्यामुळे  सर्व  प्राण्यांमध्ये  तो  परमात्म्याचे  स्वरूप  पहातो.  म्हणून  त्याला  जन्ममरण  मुक्ती  मिळते.  प्रत्येक  मनुष्याचा  आत्मा  त्याचे  हित   अहित  सांगणारा  गुरू  आहे  कारण  हित   अहित  याचा  निर्णय  करण्यास  तो  पुर्णपणे  समर्थ  आहे.  त्याच  आत्म्यामध्ये  परमात्म्याचा  साक्षात्कार  होतो.  ज्या  परमात्म्याचे  अप्रत्यक्षपणे  वर्णन  केले  जाते  तो  अप्रत्यक्ष  नसून  साक्षात  आणि  प्रत्यक्ष  आहे.  कारण  तोच  परमात्मा  सर्वांना  स्फुर्ती,  जीवनदान  देणारा  आहे.  तो  प्रथम  परा  वाणीने  प्राणासह  मनुष्य  देहातील  मुलाधार  चक्रामध्ये  प्रवेश  करतो.  त्यानंतर  मणिपूर  चक्रामध्ये  पश्यंती  वाणीने  सुक्ष्मरूप  धारण  करतो  नंतर  कंठामध्ये  येऊन  विशुध्द  चक्रामध्ये  मध्यमा  वाणीने  व्यक्त  होतो  नंतर  मुखाने  वाणीतून  स्वर  वर्णाने  व्यक्त  होतो.  या  प्रमाणे  सर्व  प्राणीमात्रांच्या  हाताने  काम  करणे,  पायाने  चालणे,  मलमूत्र  त्यागणे,  वास  घेणे,  पहाणे,  ऐकणे,  बसणे,  चालणे,  मनाने  संकल्प  विकल्प  करणे,  बुध्दिने  विचार  करणे,  अहंकाराने  विचार  करणे  अशा  सर्व  कर्मांचा  कर्ता,  कारण   कर्म  ही  त्या  परमात्म्याची  अभिव्यक्ती  आहे.  तोच  या  सर्व  विश्वाचे  कारण  आहे.  तो  प्रथम  एक  असून  अव्यक्त  होता.  कालगतीनुसार  मायेच्या  आधाराने  तो  असंख्य  रूपामध्ये  व्यक्त  झाला.  जसे  एका  बीजापासून  मोठा  वृक्ष  निर्माण  होतो  आणि  त्या  बीजाचे  सत्व  त्या  संपुर्ण  वृक्षामध्ये  सर्व  ठिकाणी  सामावलेले  असते  तसेच  हा  परमात्मा  संपुर्ण  विश्वामध्ये  सुक्ष्मरूपाने  स्थित  आहे  तरी  सुध्दा  तो  स्वतः  वेगळाच  आहे.  तो  स्वतंत्र  आहे.  या  विश्वाच्या  आधी  परमात्मा  होताच  परंतू  परमात्म्या  शिवाय  या  विश्वाला  अस्तित्व  नाही.  जसे  सुताच्या  वस्त्रामध्ये  सूत  असते  सूताशिवाय  वस्त्राला  अस्तित्व  नाही.  परंतू  वस्त्राशिवाय  सूत  हे  स्वतंत्र  आहे.  सत्व,  रज,  तम  हे  तीन  गुण  प्रकृतीचे  आहेत  सत्वगुणाने  रज   तम  या  दोन्ही  गुणांना  नियंत्रित  केले  पाहिजे.  निरंतर  सात्विक  उपासना  केली  तर  सत्वगुणांची  वृध्दी  होते.  ज्या  धर्माच्या  आचरणाने  सत्वगुणांची  वृध्दी  होते  तोच  श्रेष्ठ  धर्म  आहे.  तो  धर्म  रजोगुणाला   तमोगुणाला  नष्ट  करतो.  शात्र,  पाणी,  प्रजा,  देश,  काळ,  कर्म,  जन्म,  ध्यान,  मंत्र   संस्कार  या  गोष्टी  जर  सात्विक  असतील  तर  सत्वगुणांची  वृध्दी  होते  परंतू  याच  गोष्टी  जर  राजसिक  असतील  तर  रजोगुणांची  वृध्दी  होते  आणि  त्या  गोष्टी  जर  तामसिक  असतील  तर  तमोगुणांची  वृध्दी  होते.  ज्ञानी  पुरूष  ज्या  गोष्टींची  प्रशंसा  करतात  त्या  गोष्टी  सात्विक  आहेत.  तर  ते  ज्या  गोष्टींची  निंदा  करतात  त्या  गोष्टी  तामसिक  आहेत.  आणि  ते  ज्याचा  तिरस्कार  करतात  त्या  गोष्टी  राजसिक  आहेत.  जोपर्यंत  आत्मसाक्षात्कार  होत  नाही  तसेच  शरीराची   त्रिगुणांची  निवृत्ती  होत  नाही  तोपर्यंत  सत्वगुणांच्या  वृध्दीसाठी  सात्विक  उपासना  करीत  रहावे.  त्यानेच  धर्माची  वृध्दी  होऊन  अंतःकरणाची  शुध्दी  होते  तेव्हा  आत्मतत्वाचे  ज्ञान  होते.
 या  विश्वाचे  परमसत्य  प्रथम  परमात्म्याने  ब्रह्मदेवाला  सांगितले.  त्याने  आपला  ज्येष्ठ  पुत्र  मनुला  सांगितले,  त्यानंतर  मनुने  ऋषींना  सांगितले  त्या  ऋषींनी  आपापल्या  बुध्दी  नुसार  हे  तत्त्वज्ञान  ग्रहण  केले  कारण  प्रत्येकाचा  स्वभाव  सत्व,  रज,  तम  हे  तीन  गुणांनुसार  भिन्न  भिन्न  आहे.  याप्रमाणे  प्रत्येकाच्या  उपदेशामध्ये  फरक  असल्याने  एकच  तत्त्वज्ञान  अनेक  प्रकारचे  झाले.  त्या  उपदेशानुसार  त्यांची  विचार  बुध्दीसुध्दा  भिन्न  भिन्न  झाली.  म्हणून  आत्मज्ञानाचे  साधनमार्ग  अनेक  झाले.  मनुष्याच्या  कल्याणासाठी  भक्तीयोग,  कर्मयोग,  ज्ञानयोग  हे  तीन  मार्ग  आहेत.  याशिवाय  कोणताही  अन्य  मार्ग  कल्याणाचा  नाही.  जो  मनुष्य  कर्म   कर्मफळामध्ये  अनासक्त  आहे   ज्याने  कर्माचा  त्याग  केलेला  आहे  तो  ज्ञानयोगाचा  आधिकारी  असतो.  ज्याच्या  चित्तामध्ये  कर्माचे   कर्मफळाचे  वैराग्य  नाही  तो  सकाम  मनुष्य  कर्मयोगाचा  आधिकारी  असतो.  जो  मनुष्य  कर्मामध्ये  विरक्त  नाही  तसेच  आसक्त  नाही   ज्यास  परमात्म्याच्या  लीलांमध्ये  श्रध्दा  असते  तो  भक्तीयोगाचा  आधिकारी  असतो.
 मनुष्याने  आपली  सर्व  दैनंदीन  कर्मे  श्रीकृष्णासाठी  करावीत.  आणि  ती  कर्मे  करताना  श्रीकृष्णाचे  स्मरण  करावे.  अशी  नित्य  साधना  बराच  काळ  केल्यानंतर  त्याचे  मन   चित्त  श्रीकृष्णामध्ये  हळुहळु  समर्पित  होते.  त्याने  श्रीकृष्णभक्तांच्या  सहवासामध्ये  नेहमी  रहावे.  त्यांच्या  आचरणाचे  अनुकरण  करावे.  शुध्द  अंतःकरणाने  सर्व  प्राणीमात्रांचे  ठिकाणी  श्रीकृष्णाचे  रूप  पहावे.  जेव्हा  सर्व  प्राणीमात्रांचे  ठिकाणी  श्रीकृष्णभावना  दृढ  होते  तेव्हा  ईर्षा,  तिरस्कार,  अहंकार  हे  दोष  दूर  होतात.  सर्व  संशय  नष्ट  होतात.  हाच  भागवत  धर्म  आहे.  याचे  आचरण  केल्यानंतर  कोणत्याही  विघ्नबाधेने  या  भक्ताचे  चित्त  विचलीत  होत  नाही.  कारण  हा  भागवत  धर्म  निष्काम  आहे.  या  भागवत  धर्मामध्ये  कोणतीही  त्रुटी  नाही  तसेच  निरर्थक  कर्म  जरी  श्रीकृष्णास  निरपेक्ष  भावनेने  समर्पित  केले  तरी  सुध्दा  प्रसन्नता  येते.  हे  या  भागवत  धर्माचे  वैशिष्ट्य  आहे.  मोठमोठ्या  गर्वीष्ठ  पंडितांची  सुध्दा  परिक्षा  होते  असे  अत्युच्च  अवस्थेचे  हे  तत्त्वज्ञान  आहे.  जे  मनुष्यालाच  नव्हे  तर  देवतांना  सुध्दा  समजणे  अत्यंत  कठीण  आहे.  तरी  सुध्दा  श्रीकृष्णाने  ते  गुढ  तत्त्वज्ञान  अगदी  सोपे   सुगम  करून  स्वतः  आपल्या  परमप्रिय  उध्दवास  सांगितले  आहे.  जो  भक्त  हे  मर्म  ज्ञान  समजून  उमजून  घेतो  त्याच्या  हृदयातील  संशयग्रंथी  नष्ट  होऊन  तो  मुक्त  होतो.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       
 (१५)श्रीमद्  भागवत--  श्रीमद्  भागवतातील  बाराव्या  स्कंधामध्ये  शुकदेवाने  परीक्षितास  उपदेश  केला  आहे.  जेव्हा  श्रीकृष्णाने  स्वधामगमन  केले  तेव्हा  पासून  कलियुग  सुरू  झाले.  कलियुगामध्ये  धर्म,  सत्य,  पवित्रता,  क्षमा,  दया,  आयुष्य,  शक्ती,  आणि  स्मरणशक्ति  यांचा  लोप  होतो.  इच्छा,  प्रयत्न,  अहंकार,  ऐषराम,  भेदबुध्दि,  विषयभोग,  उत्साह,  पराक्रम,  उत्सवप्रिय  हे  रजोगुण  आहेत.  तर  क्रोध,  लोभ,  व्यर्थ  गप्पा,  हिंसा,  याचना,  श्रम,  भांडणतंटा,  शोक,  मोह,  निंदा,  आशा,  भीती,  आळस  हे  तमोगुण  आहेत.  कलियुगामध्ये  या  रजोगुणांची   तमोगुणांची  मनुष्याच्या  स्वभावांमध्ये  वृध्दी  होते.  मनुष्यांच्या  कर्मामध्ये  कोणत्यातरी  फळाची  अपेक्षा  वाढून  राजस  कर्माची  वृध्दी  होते.  तसेच  कर्मामध्ये  कोणाला  तरी  त्रास  देण्याची  वृत्ती  वाढून  तामस  कर्माची  वृध्दी  होते.  रूचकर,  स्वादिष्ट  भोजनाने  राजस  वृत्ती  आणि  उन्मादक,  अशुध्द  आहाराने  तामस  वृत्ती  वाढते.  कर्मावर   अधर्मावर  श्रध्दा  वाढल्याने  मनुष्याचा  अहंकार  वाढतो.  हा  अहंकार  मनुष्याच्या  विनाशाचे  मुळ  कारण  आहे.  मनुष्याच्या  अहंकाराने  शोक,  हर्ष,  भिती,  राग,  द्वेष,  लोभ,  मोह,  तिरस्कार  आणि  जन्ममृत्यु  या  अधर्माच्या  लक्षणांची  वृध्दी  होते.  जेव्हा  मनुष्य  आपल्या  इंद्रियरूपी  शरीराला  आपले  स्वरूप  मानतो  तेव्हा  तो  कालरूपी  जन्ममृत्युच्या  बंधनामध्ये  इकडे  तिकडे  भरकटत  असतो.  मनुष्याच्या  अशा  राजसिक   तामसिक  वृत्तीमुळे  निसर्गाचे  चक्र  विषम  होते.  कधी  दुष्काळ  होतो,  तर  कधी  महापूर  येतो.  कधी  कडाक्याची  थंडी  पडते  तर  कधी  उष्माघात  होतो.  धर्मामध्ये  ढोंगीपणा  वाढतो.  स्वार्थी  मनुष्य  अध्यात्मशास्त्रांचे  तात्पर्य  स्वार्थीपणाने  सांगतो.  वर्णाश्रमांची  चेष्टा  होते.  या  कलियुगाच्या  दोषां  पासून  मुक्त  होण्यासाठी  अढळ  श्रध्देने  भगवंताचे  अखंड  नामस्मरण  केले  पाहिजे.  सर्व  दोषांचे  मूळस्थान  मनुष्याच्या  अंतकरणामध्ये  असते.  जो  मनुष्य  भगवंताच्या  रूपाचे,  गुणांचे,  लीलांचे,  आणि  नामाचे  श्रवण,  संकीर्तन,  ध्यान,  निष्काम  भावनेनेे  करतो,  त्याच्या  हृदयामध्ये  श्रीकृष्ण  प्रगट  होतात  आणि  हजारो  जन्मांच्या  पापांचे  डोंगर  क्षणामध्ये  नाहिसे  करतात.  जसे  सोने  अग्निमध्ये  घातल्यानंतर  शुध्द  होते  त्याप्रमाणे  श्रीकृष्ण  त्या  भक्ताच्या  हृदयी  प्रगट  होऊन  त्याचे  अंतःकरण  शुध्द  करतात.  त्याचे  अशुभ  संस्कार  कायमचे  नष्ट  करतात.  कलियुगामध्ये  फक्त  श्रीकृष्णाच्या  संकीर्तनाने  मनुष्याच्या  सर्व  भौतिक  वस्तुंची  भोग  आसक्ती  नष्ट  होते.  आणि  परमात्म्याची  प्राप्ति  होते.  मनुष्याचे  मन  हेच  आत्म्यासाठी  शरीर,  इंद्रियांचे  विषय  आणि  कर्माची  कल्पना  करतात.  ते  मन  पाहिलेल्या   ऐकलेल्या  विषयांचे  चिंतन  करते  आणि  क्षणामध्ये  त्या  विषयामध्ये  तल्लीन  होते.  आणि  आधीच्या  विषयाचे  विस्मरण  करते.  आत्म्याच्या  अज्ञानामुळे  होणारा  गुणदोष  भेदभाव  हा  केवळ  मनाचा  भ्रम  आहे.  सर्व  धर्माचरणाचे  अंतिम  उद्दिष्ट  एकच  आहे  ते  म्हणजे  मन  एकाग्र  होणे.  गर्भाधान,  गर्भवृध्दि,  जन्म,  बालपण,  कुमार,  तरूणपण,  पोक्त  अवस्था,  वृध्दावस्था  आणि  मृत्यु  या  नऊ  शरीराच्या  अवस्था  आहेत.  या  शरीराचा  द्रष्टा  शरीर  नसून  आत्मा  आहे.  जसे  गव्हाच्या  पेरणीने  गहू  शेतामध्ये  पिकतो,  आणि  नंतर  तो  कापला  जाऊन  पोत्यांमध्ये  भरला  जातो  या  सर्व  प्रसंगांना  मनुष्य  साक्षी  आहे  आणि  तो  त्यांच्या  पासून  भिन्न  आहे,  तसेच  जो  शरीर  आणि  त्याच्या  अवस्थांचा  साक्षी  आहे,  तो  शरीरपासून  भिन्न  आहे.  तोच  आत्मा  आहे.  आत्मा  शुध्द,  अकर्ता,  स्वयंप्रकाशित,  निर्गुण,  निर्विकार,  सर्वव्यापक,  आवरणशून्य,  चैतन्यस्वरूप  आणि  शरीराहून  पुर्णपणे  भिन्न  आहे.  मनुष्याचे  शरीर  पंचमहाभूतांं  पासून  बनलेले  आहे.  ही  पंचमहाभूते  त्रिगुणात्मक  प्रकृती  पासून  निर्माण  झालेली  आहेत.  ती  मायावी  असून  नाशिवंत  आहेत.  जसे  बीजापासून  अंकुर  आणि  अंकुरापासून  पुन्हा  बीज  तयार  होते,  तसेच  एका  शरीरापासून  दुसरे  शरीर,  दुसया  पासून  तिसरे  शरीर  अशी  असंख्य  शरीरे  निर्माण  होतात.  परंतू  आत्मा  एकच  एकमेव  आहे.  जसे  एक  दिवा  विझला  तरी  तत्त्वरूप  तेजाचा  विनाश  होत  नाही,  तसेच  विश्वाचा  प्रलय  झाला  तरी  स्वयंप्रकाशी  आत्म्याचा  नाश  कधी  ही  होत  नाही.  कारण  तो  कार्य  आणि  कारण,  व्यक्त  आणि  अव्यक्त  यांच्या  हून  भिन्न  आहे.  तो  आकाशा  सारखा  सर्वांचा  आधार  आहे.  तो  नित्य  आणि  स्थिर  आहे.  तो  अनंत  आहे.  खरे  तर  आत्म्यास  उपमा  आत्म्याचीच  देता  येईल.  या  भागवताचा  उपदेश  एकचित्ताने  श्रवण  करणारा  जिज्ञासु  मनुष्य  कृतकृत्य  होतो.  त्याचे  अज्ञान  नष्ट  होते.  त्याला  परब्रह्माचे  व्यापक  दर्शन  होते.  त्याचे  अंतःकरण  शुध्द  होते.  तो  देहभान  विसरून  जातो.  त्याला  आपल्या  शरीराहून  भिन्न  असलेल्या  आत्म्याचा  अनुभव  होतो.  त्याच्या  मृत्युची  भीती  नष्ट  होते.  कारण  मृत्यु  तर  शरीराचा  आहे.  परंतू  आपले  खरे  स्वरूप  आत्मारूप  आहे.  हे  आत्मज्ञान  त्या  मनुष्याला  होते.  आत्मा  शाश्वत  आहे.  आणि  तोच  परमात्म्याचा  अंश  आहे.  तो  परमात्मा  अनादि  काळा  पासून  आहे.  या  भागवतधर्माच्या  उपदेशांचे  आचरण  केल्याने  तो  जिज्ञासु  मनुष्य  भगवान  श्रीकृष्णाचा  परम  भक्त  बनतो.  नंतर  तो  श्रीकृष्णामध्ये  एकरूप  होतो.  जो   मनुष्य  या  भागवताचे  अढळ  श्रध्देने  अध्ययन  करतो,  आचरण  करतो,  त्यास  अन्य  कोणत्याही  अध्यात्म  शास्त्राचे  अध्ययन  करण्याची  आवश्यकता  नाही.  कारण  भागवताच्या  आचरणाने  मनुष्यजन्माचे  अंतिम  उद्दीष्ट  प्राप्त  होते.  या  भागवतधर्माचे  आचरण  केले  तर  ब्राह्मणांस  ज्ञान  प्राप्त  होते,  क्षत्रियांस  राजसत्ता  मिळते,  वैश्यांस  ऐश्वर्य  मिळते,  आणि  शूद्रांचे  पापनिवारण  होते.  हीच  चार  वर्णांची  प्रमुख  जीवन  उदिष्टे  आहेत.  भगवंताच्या  लीलांचे  वर्णन  करणारी  अनेक  पुराणे  आहेत.  परंतु  भागवतामध्ये  प्रत्येक  कथा-प्रसंगामध्ये  पदोपदी  सर्वस्वरूप  भगवंताचे   वर्णन  केलेले  आहे.  भागवतातील  प्रत्येक  कथेचे  सार  एकच  आहे.  आणि  ते  आहे  आत्मज्ञानाची  जिज्ञासा  आणि  आत्मज्ञानाची  प्राप्ती.  हेच  मनुष्यजन्माचे  अंतिम  उद्दीष्ट  आहे.  हे  भागवत  सर्व  उपनिषदांचे  सार  आहे.  जो  मनुष्य  या  भागवताचे  अध्ययन  करतो,  त्याला  कोणत्याही  इतर  पुराण-शास्त्रामध्ये  आवड  निर्माण  होणार  नाही.  या  भागवतामध्ये   जीवन्मुक्त  करणाया  अद्वितीय  ज्ञानाचे  निरूपण  केलेले  आहे.  तसेच  यामध्ये  कर्मत्यागाचे  निरूपण  ज्ञान-वैराग्य-भक्तिने  युक्त  आहे.  या  भागवतमध्ये  निष्काम  परमधर्माचे  निरूपण  केलेले  आहे.  कर्मयोग,  ज्ञानयोग  आणि  भक्तीयोग  या  तीन्ही  योगाची  परस्परपुरकता  विस्ताराने  सांगितलेली  आहे.  हा  भागवत  धर्म  संपूर्ण  विश्वाला  जीवनदान  देणारा  आहे.  जो  मनुष्य  या  भागवत  धर्माचे  निरूपण  ऐकतो,  पठण  करतोे,  स्मरण  करतोे,  स्वीकार  करतोे,  गौरव  करतो,  आणि  आचरण  करतो  तो  मनुष्य  त्याच  क्षणी  पवित्र  होतो.  आणि  भागवत  होतो.
 ..स्वामी  मोहनदास,  अध्यात्मिक-प्रबोधनकार   एल  -  ५०७   चंद्रमा-विश्व,   धायरी,   पुणे  -  ४१(९४२०८५९६१२)       




 घटनात्मक  विभागामध्ये  भगवंताची  लीला  आणि  भगवंताच्या  अवतारांचे,  तसेच  अनेक  राजांची,  आणि  भक्तांची  चरित्र  सांगितलेली  आहेत.  स्तुत्यात्मक  विभागामध्ये  भगवंताची  स्तुति  अनेक  भक्तांनी  केलेली  आहे.  आणि  गीतात्मक  विभागामध्ये  स्तोत्रांचे  गायन  केलेले  आहे.  जेव्हा  उत्स्पुर्तपणे  गीत  गायन  होते  ते  गीत  होय.  उदा.  गोपि  विरह  गीत.  हा  भागवत  ग्रंथ  परिपुर्ण  आहे.  त्यामध्ये  भगवंताच्या  वेगवेगळ्या  रूपांचे  वर्णन  केलेले  आहे.  त्या  परमेश्वराचे  निर्गुण-निराकार,  सगुण-साकार,  असे  सर्व  प्रकारांनी  वर्णन  केलेले  आहे.  प्रत्येक  मनुष्यास  ज्याच्या  त्याच्या  स्वभावानुसार  सगुण   निर्गुण  परमात्म्याची  प्राप्ती  भागवतातून  होऊ  शकते.  या  चार  विभागांपैकी  फक्त  उपदेशात्मक  विभागा
 श्रीकृष्णभक्ति  हेच  या  आत्मतत्त्वाचे  मुख्य  साधन  सांगितलेले  आहे.  श्रीमद्  भागवतामध्ये  श्रीकृष्णाच्या  रूप,  गुण  आणि  पराक्रमाचे  चिंतन,  नामस्मरण  या  साधनांचे  निरूपण  कथारूपाने  आणि  दृष्टांताच्या  रूपाने  सांगितलेले  आहे.

No comments:

Post a Comment