Monday, 17 July 2017

भारतीय संस्कृती



  भारतीय  संस्कृती

  भारतीय  संस्कृती  अतिप्राचीन  आहे.  मनुष्य-सृष्टी  जेव्हा  निर्माण  झाली  तेव्हापासून  ही   भारतीय  संस्कृती  अस्तित्वामध्ये  आहे.  कलियुगाची  ४,३२,०००वर्षे,  द्वापारयुगाची  ८,६४,०००वर्षे,  त्रेतायुगाची  १२,९६,०००वर्षे,   सत्ययुगाची  १७,२८,०००वर्षे  मिळून  ४३,२०,०००  वर्षांची  एक  चतुर्युगी  होते.  अशा  ७१  चतुर्युगीचे  एक  मन्वन्तर  होते  तर  अशा  चौदा  मन्वन्तरांचा  एक  कल्प  होतो.  त्यापैकी  आता  वैवस्वत  नावाच्या  सातव्या  मन्वन्तरातील  अठ्ठाविसाव्वे  चतुर्युगातील  कलियुग  चालू  आहे.  काळाची  अशी  अफाट  परंपरा  या  संस्कृतीस  लाभलेली  आहे.  धर्म,  दर्शन,  इतिहास,  वर्ण  तसेच  संस्कार-परंपरा  या  पाच  मुलतत्वांनी  ही   भारतीय  संस्कृती  समृध्द  झालेली  आहे.  संस्कृती  या  शब्दाचा  मतितार्थ  मनुष्याचा  उध्दार  असा  आहे  तर  संस्कृती  या  शब्दाचा  भावार्थ  उध्दार  करण्याची  प्रक्रिया  असा  आहे.  एखाद्या  ढोबळ  वस्तूमधून  मूलतत्त्व  शोधून  काढण्याच्या  प्रक्रियेला  संस्कृती  म्हणतात.  आत्मा,  मन  आणि  शरीर  यांमध्ये  स्वभाविक  सुसंवाद  राखणे  म्हणजे  काय  ते  शोधून  काढून  असा  स्वाभाविक  सुसंवाद,  सुमेळ  उत्पन्न  करणे  आणि  टिकवून  धरणे  हेच   भारतीय  संस्कृतीचे  गमक  आहे.  वसुधैव  कुटूम्बकम्  असा  जगत्‌-व्यापक  ध्यास  घेणारी  ही   भारतीय  संस्कृती  अखिल  विश्वामध्ये  एकमेव  आहे.  या  संस्कृतीला  स्थळाचे,  काळाचे,  वंशाचे,  जातीचे,  धर्माचे  कोणतेच  बंधन  नाही.  ही   भारतीय  संस्कृती  सदा  सर्वकाळ  अखिल  मनुष्यमात्रांसाठी  आहे.  वैदीक  सनातन  धर्म  हाच   भारतीय  संस्कृतीचा  आत्मा  आहे.  धारयतीति  धर्मः।  जो  समाजाचे,  मनुष्याचे  धारण  करतो  तो  धर्म  होय,  अशी  सोपी  व्याख्या  आहे.  हाच  धर्म  मनुष्याचे  घारण  करतो.  ज्यामुळे  मनुष्याची  भौतिक  समृध्दी  होऊन  मोक्ष  प्राती  होते  तो  धर्म  होय,  अशी  दुसरी  एक  व्याख्या  आहे.  सद्-विचार  वर्तन  हा  या  धर्माचा  पहिला  विचार  आहे.  आत्मानुभूती  चा  विचार  हाच  सद्-विचार  हा  या  धर्माचा  दुसरा  विचार  आहे.  स्वभावानुसार  वर्ण-कर्माचे  पालन  हा  या  धर्माचा  तिसरा  विचार  आहे.  स्त्रीयांनी  पातिव्रत्याचे  पालन  हा  या  धर्माचा  चौथा  विचार  आहे.  चार  आश्रमाचे  आचरण  हा  या  धर्माचा  पाचवा  विचार  आहे.  या  आश्रमव्यवस्थेमध्ये  क्रमाक्रमाने  मनुष्याच्या  उध्दाराचा  विचार  केलेला  आहे.  सर्वव्यापक  परमात्म्यावर  श्रध्दा  हा  या  धर्माचा  सहावा  विचार  आहे.  परमात्म्याच्या  अवतारांवर  श्रध्दा  हा  या  धर्माचा  सातवा  विचार  आहे.  अष्टांगयोगाचरण  हा  या  धर्माचा  आठवा  विचार  आहे.  परमेश्वराच्या  प्रतिमेची  उपासना  हा  या  धर्माचा  नववा  विचार  आहे.  शरीर  शुध्दता,  मानसिक  पवित्रता  हा  या  धर्माचा  दहावा  विचार  आहे.  यज्ञ-साधना  हा  या  धर्माचा  अकरावा  विचार  आहे.  वेद  तसेच  वेदोक्त  तत्त्वज्ञानावर  श्रध्दा  हा  या  धर्माचा  बारावा  विचार  आहे.  कर्मसिध्दांत  आणि  कर्मसंस्कारावर  श्रध्दा  हा  या  धर्माचा  तेरावा  विचार  आहे.  पुनर्जन्मावर  विश्वास  हा  या  धर्माचा  चौदावा  विचार  आहे.  निर्गुण  तसेच  सगुण  उपासना  हा  या  धर्माचा  पंधरावा  विचार  आहे.  मोक्षप्राप्ती  हा  या  धर्माचा  सोळावा  विचार  आहे.  उशा  अनेक  विचारांनी  हा  वैदीक  सनातन  धर्म  समृध्द  झालेला  आहे.   भारतीय  संस्कृती  मध्ये  दोन  प्रकारची  दर्शने  आहेत.  दर्शन  याचा  अर्थ  जे  ज्ञान  दिसले  अनुभवले  ते  ज्ञान  असा  आहे.  आस्तिक  दर्शने  म्हणजे  ज्या  तत्वज्ञानामध्ये  वेदाचा  आदर  केलेला  आहे.  तर  नास्तिक  दर्शने  म्हणजे  ज्या  तत्वज्ञानामध्ये  वेदाचा  अनादर  केलेला  आहे.  सहा  प्रकारची  आस्तिक  दर्शने  आहेत.  (१)वैशेषिक  दर्शनामध्ये  पूर्वजन्मातील  कर्माचा  प्रभाव  म्हणून  विशेष  कर्म  करण्यासाठी  जीव  उत्पन्न  होतो,  मनुष्याने  कर्म  निष्कामतेने  केल्यास  मोक्ष  प्राप्त  होतो,  ईश्वराच्या  इच्छेने  सृष्टी   संहार  घडून  येतो  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  वैशेषिक  दर्शनाचे  आचार्य  कणादमुनी  आहेत.  (२)सांख्य  दर्शनामध्ये  विश्व  प्रकृतीच्या  २५  मूलतत्त्वांनी  बनले  असून  पुरूष  हा  आत्मारूप  आहे,  ईश्वराचे  निरिश्वर   सेश्वर  असे  दोन  भाग  आहेत,  मनुष्यास  कैवल्यज्ञानाने  मुक्ति  लाभते  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  सांख्य  दर्शनाचे  आचार्य  कपिलमुनी  आहेत.  (३)योग  दर्शनामध्ये  जीवाचे  संसारी   मुक्त  असे  दोन  प्रकार  आहेत,  आत्मा  सच्चिदानंद  स्वरूप  आहे,  मनुष्याच्या  चित्तवृत्तीचा  निरोध  म्हणजे  समाधी,  जीवा-शिवाचे  अद्वैत  ज्ञान  प्राप्त  झ्याल्यावर  मुक्ति  लाभते  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  योग  दर्शनाचे  आचार्य  पतंजलीमुनी  आहेत.  (४)न्याय  दर्शनामध्ये  जीवाच्या  ठिकाणी  सुख-दुःख  निर्माण  होतात,  त्यांचा  नाश  झाल्यावर  मुक्ति  लाभते,  सोळा  पदार्थांच्या  यथार्थज्ञानाने  मोक्ष  मिळतो  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  न्याय  दर्शनाचे  आचार्य  अक्षपादमुनी  आहेत.  (५)पूर्वमिमांसा  दर्शनामध्ये  विश्व  सत्य  आहे,  आत्मा  परिणामशील  असतो,  ईश्वर  हे  कर्माचे  साधन  आहे,  जगाशी  आत्म्याचा  संबंध  नष्ट  होणे  म्हणजे  मोक्ष  होय  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  पूर्वमिमांसा  दर्शनाचे  आचार्य  जैमिनीमुनी  आहेत.  (६)उत्तरमिमांसा  दर्शनामध्ये  जीव  हा  कर्मफलाचा  भोक्ता  आहे,  जगत  हे  मित्था  आहे,  आत्मा  स्वयंसिध्द  असतो,  ईश्वर  निर्गुण   सगुण  ब्रह्म  आहे,  जीव   ब्रह्माचे  ऐक्य  म्हणजे  मोक्ष  होय  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  उत्तरमिमांसा  दर्शनाचे  आचार्य  आद्य  शंकराचार्य  आहेत.  तीन  प्रकारची  नास्तिक  दर्शने  आहेत.  (१)चार्वाक  दर्शनामध्ये  पृथ्वी,  आप,  तेज,   वायु  याच्या  समुदायास  शरीर,  इंद्रिय   विषय  म्हणतात,  चैतन्यरूपी  विशिष्ट  देह  हाच  आत्मा  आहे,  परमेश्वराच्या  अस्तित्वावर  विश्वास  नाही,  सर्व  प्रकारचे  स्वातंत्र्य  हाच  मोक्ष  असून  मरण  म्हणजेच  मुक्ति  होय  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  चार्वाक  दर्शनाचे  आचार्य  चार्वाक  आहेत.  (२)जैन  दर्शनामध्ये  जीव  चेतन  असून  ज्ञान  हा  त्याचा  स्वभाव  आहे,  आत्मा   जीव  समान  आहे,  ईश्वर  स्विकारीत  नाही,  निर्जरा  अवस्थेचे  फळ  म्हणजे  मोक्ष  होय  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  जैन  दर्शनाचे  आचार्य  महावीर  आहेत.  (३)बौध्द  दर्शनामध्ये  जगत  हे  रूप  वेदना,  संत्रा,  संस्कार,   विज्ञान  यांपासून  बनले  आहे,  आत्म्या  बद्दल  मूक  रहाणे  ईश्वराबद्दल  काहीही  निर्देश  केलेला  नाही,  निर्वाण  म्हणजे  विझून  जाणे,  दुःखाचा  अंत  होणे  म्हणजे  निर्वाण  होय  असे  विचार  मांडलेलै  आहेत.  बौध्द  दर्शनाचे  आचार्य  गौतम  बुध्द  आहेत.  या  सर्व  दर्शनांच्या  तत्वज्ञानातून   भारतीय  संस्कृतीची  व्यापकता,  सहिष्णुता  आणि  विचार  स्वातंत्र्य  प्रखरतेने  दिसून  येते.   भारतीय  संस्कृतीला  इतिहास  अनंत  वर्षांचा  आहे.  या  काळातील  असंख्य  ऋषीमुनी,  भगवंताचे  अनंत  अवतार,  संतमहात्मे,  थोर  विचारवंत,  राष्ट्रभक्त,  योगी,  आयुर्वेदी  चिकीत्सक,  शिल्पकार,  चित्रकार,  महाकवी,  कलाकार,  इत्यादी  असंख्य  भारतपुत्रांची  तसेच  त्यांच्या  थोर  कार्याची  परंपरा  आहे.   भारतीय  संस्कृती  मध्ये  चातुर्वण्याश्रम  व्यवस्था  मनुष्याच्या  उध्दारासाठी  प्रतिपादलेली  आहे.  मनुष्याचे  स्वभावानुसार  चार  वर्ण  आहेत,  मनुष्याच्या  प्रवृत्ती-गुण   कर्म  यांवरून  त्याचा  वर्ण  निश्चित  होतो.  सत्वगुणाचे  प्राबल्य  असलेल्या  व्यक्ती  स्वभावतःच  शांत,  ज्ञानाची  आवड  असणाया  असतात  म्हणून  त्यांना  ब्राह्मण  म्हणतात.  रजोगुणाचे  प्राबल्य  असलेल्या  व्यक्ती  स्वभावतःच  कार्यप्रवण  असून,  शौर्य,  साहस,  उदारता  यांची  आवड  असणाया  असतात  म्हणून  त्यांना  क्षत्रिय  म्हणतात.  तमोगुणाचे  प्राबल्य  असलेल्या  व्यक्ती  स्वभावतःच  कर्मशील  असून,  स्वाभाविक-व्यवहारी  ज्ञानाची,  शेती-वाणिज्याची  आवड  असणाया  असतात  म्हणून  त्यांना  वैश्य  म्हणतात.  तर  काही  तमोगुणाचे  प्राबल्य  असलेल्या  व्यक्ती  स्वभावतःच  आळशी,  विवेकशून्य,  अज्ञानी  असून,  स्वतः  हून  काम  करण्याची  आवड  नसणाया  असतात  म्हणून  त्यांना  शूद्र  म्हणतात.  वस्तुतः  कोणतेच  कर्म  श्रेष्ठ   कनिष्ठ  नसते.  ज्याला  ज्या  कर्माद्वारे  आपले  परमध्येयाकडे  वाटचाल  करता  येईल  तेच  कर्म  त्याच्या  साठी  उत्तम  आहे.  प्रथम  मनुष्य  ब्रह्मचर्याश्रमामध्ये  अध्ययन  करतो.  अध्ययन  पूर्ण  झाल्यानंतर  गृहस्थाश्रमाची  कर्तव्ये  निष्कामतेने  करतो.  गृहस्थाश्रमाची  कर्तव्ये  पूर्ण  झाल्यानंतर  वानप्रस्थ  आश्रम  स्विकारून  देहासक्ती  नष्ट  करतो.  वानप्रस्थव्रताच्या  बारा  वर्षांनतर  संन्यासाश्रमी  ज्ञान  दान  करून  यथावकाश  देहत्याग  करतो,   मोक्षप्राप्ती  होते.  देहाची  अनासक्ती,  मौन,  सत्य,  चिंतन,  दया,  तपस्या,  देहशुध्दी,  विवेक,  संयम,  ब्रह्मचर्य,  त्याग,  सहजता,  ममता,  अहिंसा,  सदाचार,  आनंद,  समभाव,  वंदन,  संतसेवा,  ईश्वरभाव,  श्रवण,  संकीर्तन,  स्मरण,  सेवा,  भोगत्याग,  पूजन,  समर्पण,  दास्यसेवा,  मित्रता,  समता  या  तीस  लक्षणांनी   भारतीय  संस्कृती  आधिक  सुसंस्कृत  झालेली  आहे.
 थोडक्यात   भारतीय  संस्कृतीमध्ये  तीन  प्रमुख  विचारधारा  आहेत.  धर्म-विज्ञान,  योग-विज्ञान,   अध्यात्म-विज्ञान.  धर्म-विज्ञानाने  मनुष्याचे  जीवन  समृध्द  होते.  योग-विज्ञानाने  मनुष्यास  कार्यशक्ति  प्राप्त  होते,  तर  अध्यात्म-विज्ञानाने  मनुष्यास  स्वरूप-ज्ञान  प्राप्त  होते.

No comments:

Post a Comment