विविध स्मृती
सनातन धर्माचे मूळ वेद असून ती साक्षात
परमेश्वराची देववाणी आहे. या वैदीक दिव्यज्ञानाचा अनुभव साररूपाने ऋषींनी
स्मरणासाठी ग्रंथीत केला म्हणून त्यांना
स्मृती म्हणतात. भारताच्या
धार्मिक साहीत्यात स्मृती
ग्रंथांना एक विशिष्ट
स्थान आहे. धार्मिकतेमध्ये श्रुतींच्या
खालोखाल स्मृतींना प्रामाण्य
आहे. धर्माचा मूळ स्त्रोत जिथून प्रवाहीत झाला त्यात स्मृती
ग्रंथांचा मुख्य वाटा आहे. भारतातील
सामाजीक व्यवहाराचे म्हणजे
कायद्याचे ज्ञान करून घ्यायचे असल्यास
स्मृती ग्रंथांचा अभ्यास
आवश्यक आहे. स्मृती
ग्रंथांमध्ये प्रामुख्याने आचार, व्यवहार व प्रायश्चित्त यांचे वर्णन केले आहे. आचारामध्ये
चार वर्ण-आश्रम त्यांची कर्तव्ये,
कर्मे यांचे वर्णन,
तर व्यवहारामध्ये न्यायव्यवस्थेबद्दल विवेचन,
आणि प्रायश्चित्तामध्ये दुष्कृत्यामूळे होणारे
परिणाम व परिमार्जन
म्हणून अनेक निरनिराळी
प्रायश्चित्ते सांगितली आहेत. भारतीय सामाजाची
नीट व्यवस्था लावणे हे मुख्य कार्य स्मृती
ग्रंथांनी केले आहे. समाजाची ऊन्नती
म्हणजे व्यक्तीची ऊन्नती
म्हणून प्रत्येक व्यक्तीसाठी
व्यापक नियमावली करून समाजाची, संस्कृतीची
पक्की घडण केली. त्यामूळे विदेशी
आक्रमणामध्ये सुध्दा भारतीय
संस्कृती टिकून राहीली.
आध्यात्म
दर्शनाचा पाया शुध्द आचार आणि आचरणाच्या नीतीरूपी,
सदाचाररूपी सीमारेषा नियमबध्द
करण्याचे कार्य या स्मृतींनी केले आहे. भोगप्रधान
विचारधारा वरवर इंद्रियांना
कीतीही सुखावह वाटली तरी शेवटी ती विषकन्ये
प्रमाणे घात करते, तर मोक्षप्रधान
विचारधारा मनुष्याचा विकास करते, त्यासाठी
धर्म व मोक्ष हे मुख्य पुरूषार्थ जाणून जीवनाचा वाटचाल
कशी करावी याचे मार्गदर्शन या विविध स्मृतीं
करतात.
भारताच्या
धार्मिक साहीत्यात स्मृती
ग्रंथ अनेक आहेत. परंतू याज्ञवल्क्य
ऋषींनी प्रमुख वीस स्मृतींची नामावली
दिली आहे. त्या वीस स्मृती
याप्रमाणे आहेत. (१) अत्रिस्मृती (२) आपस्तम्बस्मृती (३) औशनसस्मृती (४) आंगिरसस्मृती
(५) कात्यायनस्मृती (६) गौतमस्मृती (७) दक्षस्मृती (८) पाराशरस्मृती (९) बृहस्पतिस्मृती (१०) मनुस्मृती (११) यमस्मृती (१२) याज्ञवल्क्य स्मृती
(१३) लिखितस्मृती (१४) वसिष्ठस्मृती (१५) विष्णुस्मृती (१६) व्यासस्मृती (१७) शातातपस्मृती (१८) शंखस्मृती (१९) सवर्त्तस्मृती (२०) हारीतस्मृती
या सर्व स्मृतींमध्ये
प्रामुख्याने वर्णव्यवस्था-आश्रमव्यवस्था या मुलभूत पायावर
आधारलेल्या समाज व्यवस्थेविषयी
सदाचाराचे, धर्माचरणाचे मार्गदर्शन
याच विषयावर विवेचन
केलेले आहे. काही स्मृतींमध्ये विशेष उल्लेखनीय विचार आलेले आहेत ते आता प्रत्येक स्मृतींचा
विचार करून पहाता येईल. (१) अत्रिस्मृती -- या स्मृतीमध्ये
३९७ श्लोक असून अत्रिऋषींनी, त्रैलोकाचे
कल्याण व्हावे याउद्देशाने
या स्मृतीची निर्मिती
झाली. इष्टकर्म म्हणजे
आत्मोन्नतीचे कर्म, तर पूर्तकर्म म्हणजे
लोककल्याणाचे कर्म, ब्राह्मण,क्षत्रिय, व वैश्य या तीन वर्णांना
इष्टकर्म व पूर्तकर्म
यांचे समान आधिकार
आहेत, परंतू शूद्र या वर्णास
फक्त पूर्तकर्माचाच आधिकार
आहे. अत्याचार व बलात्कार झालेल्या
स्त्रीया दूषीत नसतात,
त्यांचा त्याग करू नये हा क्रांतीकारी विचार या स्मृतीमध्ये
प्रगट केला आहे. (२) आपस्तम्बस्मृती -- या स्मृतीमध्ये
१९० श्लोक असून प्रामुख्याने प्रायश्चित्त
विधी याच विषयावर
विवेचन केलेले आहे. ज्ञानीवंताची व्याख्या
अशी केली आहे, जो परस्त्रीला
माते समान मानतो,
परद्रव्याला माती समान मानतो, व समस्त प्राणिमात्रांना जो आपल्या सारखे मानतो, तोच खरा ज्ञानी
होय. या स्मृतीची
रचना मुख्यत्वे करून गद्यात असली तरी अधून मधून श्लोकरचना
आहे. फार प्राचीन
काळापासून या स्मृतीतील
काही श्लोक प्रमाणभूत
वचने म्हणून अनेक ग्रंथामध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ
जैमिनीसूत्रावरील भाष्यात शबरस्वामींनी,
तर तंत्रवार्तिकामध्ये कुमारिलभट्टांनी, ब्रह्मसूत्रावरील भाष्यात
शंकराचार्यांनी, याज्ञवल्क्य स्मृतीवरील
टिकेमध्ये विश्वरूपाने, मनुस्मृतीवरील
टिकेमध्ये मेधतिथीने, मिताक्षरेमध्ये अपराकर्ाने
इत्यादी रचनेंमध्ये या स्मृतीतील काही श्लोक प्रमाणभूत
वचने म्हणून नमूद केली आहेत.
(३) औशनसस्मृती -- या स्मृतीमध्ये
२४७ श्लोक असून प्रामुख्याने ब्रह्मचारी
विद्यार्थ्याचा धर्म सांगितला
आहे. ब्रह्मचर्यव्रत धारण केलेल्या विद्यार्थ्याचे क्रमागत
कर्तव्य, शौचाचार स्वच्छते
विषयी सविस्तर आणि व्यक्तिगत संपन्नतेसाठी
आवश्यक सद्गुणांची धारणा अशा तीन भागमध्ये रचना केली आहे. (४)आंगिरसस्मृती -- या स्मृतीमध्ये
७१ श्लोक असून प्रामुख्याने वर्णाश्रमातील
प्रायश्चित्त विधी या विषयावर सविस्तर
विवेचन केलेले आहे. (५) कात्यायनस्मृती -- या स्मृतीमध्ये
४८६ श्लोक असून प्रामुख्याने वर्णाश्रमातील
उपासने विषयी सविस्तर
विवेचन केलेले आहे. गृहस्थाश्रमीने दररोज देवयज्ञ म्हणजे
हवन, भूतयज्ञ म्हणजे
प्राणिमात्रांस अन्नदान, पितृयज्ञ
म्हणजे पितरांस तर्पण,
ब्रह्मयज्ञ म्हणजे अध्यापन
करणे, मनुष्ययज्ञ म्हणजे
अतिथीपूजन असे पाच यज्ञ करावेत.
मृत्युचा शोक करू नये कारण सर्व प्राणी
अनित्य असतात. मृत्युमूळे
रडणे उचित नाही तर यत्नपुर्वक
आपले कर्म करणे हेच कर्तव्य
आहे. हे निखळ सत्य सांगितले
आहे. (६) गौतमस्मृती
-- या स्मृतीमध्ये
२९ अध्याय असून प्रामुख्याने गृहस्थाश्रमा
विषयी सविस्तर विवेचन
केलेले आहे. या स्मृतीची रचना गद्यामध्ये असून पाणिनीच्या व्याकरणाशी
जुळणारी आहे. त्रेतायुगातील
धर्माचरणावर या स्मृतीचा
सर्वाधिक प्रभाव होता. त्याकाळी त्रेतायुगाचे
धर्मशास्त्र म्हणून ही स्मृती प्रामाण्य
होती. या स्मृतीचे
अध्ययन विशेषतः सामवेद
अनुयायी करीत असत. या स्मृतीतील
काही सूत्रे प्रमाणभूत
वचने म्हणून तंत्रवार्तिकामध्ये कुमारिलभट्टांनी, वेदान्तसूत्रामध्ये शंकराचार्यांनी, याज्ञवल्क्य
स्मृतीवरील टिकेमध्ये विश्वरूपाने,
मनुस्मृतीवरील टिकेमध्ये मेधतिथीने,
इत्यादी रचनेंमध्ये नमूद केली आहेत.
(७) दक्षस्मृती -- या स्मृतीमध्ये
२२० श्लोक असून प्रामुख्याने धर्मधारणेची
नीती या विषयावर
सविस्तर विवेचन केलेले
आहे. कष्टाशिवाय धन मिळत नाही, मिळाले तरी टिकत नाही, धनाशिवाय कर्म घडत नाही, कर्माशिवाय धर्मरक्षण
होत नाही, धर्माशिवाय
सुख मिळत नाही, म्हणून सुखाकरिता
धर्माचरण आवश्यक आहे. बाह्यशुचिता जलाने होऊ शकते,परंतू
आंतरिक शुचिता केवळ मनाच्या शुध्दतेनेच
होते. जो या स्मृतीचे अध्ययन
करतो त्यास परलोकाची
प्राप्ती होते. नीच वर्णातील कोणीही
या स्मृतीचे पठण, श्रवण केले तर तो पुत्रपौत्रयुक्त होऊन अक्षय कीर्ती
प्राप्त करतो. (८) पाराशरस्मृती -- या स्मृतीमध्ये
५६९ श्लोक असून प्रामुख्याने चातुर्वर्ण
व प्रायश्चित्त या विषयावर सविस्तर
विवेचन केलेले आहे. कलियुगाचे धर्मशास्त्र
म्हणून ही स्मृती
प्रामाण्य आहे. पहील्या
अध्यायामध्ये चातुर्वर्णाचे निरूपण,
अतिथी सत्काराचे फळ, षटकर्माचे ब्राह्मणाला
लाभणारे फळ, दुसया अध्यायामध्ये गृहस्थाची
कर्तव्ये, तिसया अध्यायामध्ये
जन्म-मरण, शौच-अशौच कथन व पुढिल नऊ अध्यायामध्ये
प्रायश्चित्ताचे विवेचन केले आहे. धर्माचा
पालनकर्ता सदाचार आहे. धर्माच्या
केवळ
कथनाने नव्हे तर आचरणाने धर्मधारणा
होते. संध्या-स्नान-तप, हवन, वेदाध्ययन, देवताचे
पूजन, अतिथीसेवा, बलिवैश्वदेव
ही ब्राह्मणाची षटकर्मे
आहेत. चाणक्याने कौटिलीय
अर्थशास्त्रामध्ये या स्मृतीतील
सूत्रांचा राजव्यवस्थेच्या विवेचनात
उपयोग केलाआहे.
(९) बृहस्पतिस्मृती या स्मृतीमध्ये ८० श्लोक असून प्रामुख्याने भूमिदान,
गयाश्राध्द, सत्पात्री दानधर्म
व उपासना या विषयावर सविस्तर
विवेचन केलेले आहे. जो मनुष्य
बारा वर्षे उपवास करतो, दीक्षा
धारणा करून अभिषेक
करतो, तो उत्तम गतीने स्वर्गात
जातो. जो मनुष्य
संपुर्ण वेदाध्ययन करतो त्यास दुःखापासून
मुक्ती मिळते. जो मनुष्य पवित्र
धर्माचे आचरण करतो त्यास स्वर्गामध्ये
पूजनीय स्थान मिळते.
(१०) मनुस्मृती -- या स्मृतीमध्ये
२६८४ श्लोक असून प्रामुख्याने वर्णाश्रमातील
सर्व विषयांचे सविस्तर
विवेचन केलेले आहे.ही
स्मृती सर्वप्रधान स्मृती
म्हणून प्रसिध्द आहे. ग्रंथ न वाचणायांपेक्षा ग्रंथ वाचणारे श्रेष्ठ,
ग्रंथ वाचणायांपेक्षा ग्रंथाचे
पाठांतर करणारे श्रेष्ठ,
ग्रंथाचे पाठांतर करणायांपेक्षा
ग्रंथाचा अर्थ जाणणारे
श्रेष्ठ, तर ग्रंथाचे
अर्थ जाणणायांपेक्षा ग्रंथातील
तत्त्वज्ञानाचे आचरण करणारे
श्रेष्ठ आहेत. उत्तम विद्या शूद्राकडून
ही ग्रहण करावी,
परमधर्म चांडाळाकडून ही ग्रहण करवा, नीचकुलातील स्त्री
जर श्रेष्ठ असेल तर पत्नी म्हणून स्विकारण्यास
हरकत नाही. सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय
बोलू नये, असत्य जरी प्रिय असले तरी बोलू नये हाच सनातन धर्म आहे. अहंकाराने तपाचा,
असत्याने यज्ञाचा, परनिंदेने
आयुष्याचा तर वाच्यातेने
दानाचा नाश होतो. मौन हा वाग्द्ण्ड, उपवास हा मनोदण्ड
तर प्राणायाम हा शरीरदण्ड आहे. जीवनाच्या अंतसमयी
माता,पिता,पत्नी,पुत्र कोणीही उपयोगी
येत नाही, केवळ एक धर्म च सहाय्यभूत
होतो. जीव एकटाच जन्माला येतो, एकटाच जीवनाची
कर्मफळे भोगतो व एकटाच मरतो.
(११) यमस्मृती -- या स्मृतीमध्ये
९७ श्लोक असून प्रामुख्याने दण्ड व प्रायश्चित्त
या विषयावर सविस्तर
विवेचन केलेले आहे. (१२) याज्ञवल्क्य
स्मृती -- या स्मृतीमध्ये ४९३ श्लोक असून प्रामुख्याने वर्णाश्रमातील
सर्व विषयांचे संक्षेपाने
सुस्पष्ट व सूत्रबध्द
असून आचाराध्य, व्यवहाराध्याय, व प्रायश्चित्ताध्याय या तीन विभागामध्ये
विवेचन केलेले आहे. या स्मृतीतील
काही श्लोक शुक्ल यजुर्वेदातील वाजसनेय
संहीतेमध्ये येतात. ही स्मृती मनुस्मृती
नंतर प्रामाण्य मानली जाते. या स्मृतीवर प्रामुख्याने
विश्वरूप, विज्ञानेश्वर, अपरार्क,
शुलपाणी इत्यादी पंडितांच्या
टीका प्रसिध्द आहेत. ब्रिटीश सरकारच्या
न्यायालयात हिंदू कायद्याच्या
अंमलबजावणीच्या बाबतीत सर्व हिंदूस्थानभर विज्ञानेश्वरांच्या मिताक्षरा
टीकेला सर्वोच्च महत्वाचे
स्थान प्राप्त झाले आहे. पर्यायाने
या स्मृतीला सर्व हिंदूस्थानभर आधिकृत
ग्रंथाचे स्थान प्राप्त
झाले आहे. थोडक्यात
परंतू स्पष्ट शब्दात
केलेले तत्त्वांचे प्रतिपादन,
व्यापक दृष्टी आणि वर्णव्यवस्थेबाबत इतर ग्रंथाच्या मानाने
आधिक निपक्षपातापणा इत्यादी
गुणांमूळे या स्मृतीचे
स्थान भारतीय संस्कृतीमध्ये
अतिशय महत्वाचे आहे. (१३) लिखितस्मृती
-- या स्मृतीमध्ये
९२ श्लोक असून प्रामुख्याने ब्राह्मणांची
कर्तव्ये, श्राध्द व प्रायश्चित्त या विषयावर सविस्तर
विवेचन केलेले आहे. ब्राह्मणांनी प्रयत्नपुर्वक
इष्टकर्म व पुर्तकर्म
करावे. इष्टकर्म केल्याने
स्वर्गप्राप्त होतो. तर पुर्तकर्म केल्याने
मोक्ष प्राप्त होतो. अग्निहोत्र, तप सत्यव्रत, वेदांचे
अध्ययन ही इष्टकर्म आहेत,तर
जलाशय, विहीर, व मंदिर यांची दुरूस्ती व जीर्णोध्दार ही पुर्तकर्म आहेत. द्विजातींना म्हणजे
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना इष्टकर्म
व पुर्तकर्म या दोन्हीया आधिकार
आहे. परंतू शूद्राला
मात्र केवळ पुर्तकर्माचाच
आधिकार आहे.
(१४) वसिष्ठस्मृती -- या स्मृतीमध्ये
३६२ श्लोक असून प्रामुख्याने वर्णाश्रमाचे
नेमके विवेचन केलेले
आहे. मनु व याज्ञवल्क्य यांनी या स्मृतीला
एक प्रमाणभूत धर्मग्रंथाचे
स्थान मानले आहे. समाजव्यवस्थेतील व्यापाराविषयी
विवेचन करताना, कृत्रीमरित्या
महागाई वाढवून जनस्वास्थ
विचलित करणाया समाजद्रोही
प्रवृत्तीची तिव्र शब्दामध्ये
निर्भत्सना केली आहे. उपाध्याय हे एका वेदाचे
अध्ययन करतात. तर आचार्य सर्व वेदांचे अध्ययन
करतात. मातेची थोरवी सांगितली आहे. उपाध्यायाच्या दसपट गौरव आचार्याचा,
आचार्यापेक्षा शतपट पिता श्रेष्ठ असतो, तर पित्यापेक्षा
सहस्त्रपट माता श्रेष्ठ
आहे.
(१५) विष्णुस्मृती -- ही स्मृतीरचना
गद्यपद्यात्मक असून प्रारंभीचा
विश्व निर्मितीचा भाग पद्यात्मक, तर उरलेला सर्व भाग गद्यामध्ये
असून भाषा सरळ काहीशी पाल्हाळीक
आहे. प्रामुख्याने वर्णाश्रमाचे
सविस्तर विवेचन केलेले
आहे. यास्मृतीमध्ये काठकसंहीतेमधील मंत्र आणि काठकगुह्यस्ूुत्रातील काही सूत्रे नमुद केली आहेत. यास्मृतीवर नंद पंडिताने वैजयंती
नावाची टीका लिहीली
आहे. यास्मृतीमध्ये सर्वार्थाने
वैशिष्ट्यपुर्ण धर्मातील कर्मकांडाचा
उहापोह न करता धर्म व्यवहार्य
कसा करावा, कोणती कर्मे आचरण्यात
यावीत, याचे सुस्पष्ट
दिग्दर्शन केले आहे. इहलोक-परलोक तसेच पुरूषार्थ-परमार्थ यांची अप्रतिम सांगड घातलेली दिसून येते. (१६) व्यासस्मृती -- या स्मृतीमध्ये
२४१ श्लोक असून प्रामुख्याने गृहस्थाश्रम
या विषयावर सविस्तर
विवेचन केलेले आहे. एकूण चार अध्याय असून पहील्या अध्यायात
सोळा संस्कार, ब्रह्मचर्य
व्रत, दुसया अध्यायात
गृहस्थाश्रम, स्त्रीधर्म लक्षणे,
तिसया अध्यायात गृहस्थाची
नित्य कर्मनिरूपण तर चौथ्या अध्यायात
गृहस्थाश्रमाची थोरवी व दानधर्म इत्यादी
विषयांचे मार्गदर्शन केले आहे. जो इंद्रिय जय करतो तो शूर होय. जो धर्माचरणी
असतो तो पंडित होय. हितकारी
व प्रिय वचन बोलतो तो वक्ता होय. जो सन्मानपुर्वक
दान करतो तो दाता होय. सर्वसाधारणपणे शंभरामध्ये
एक शूर असतो. सहस्त्रामध्ये एक पंडित असतो. तर शतसहस्त्रामध्ये एक वक्ता व दाता असतो. या स्मृतीतील
वचनांचे आचरण केल्यास
मनुष्याचे कधीही पतन होत नाही, शास्त्रोक्त आचरण केल्यास धर्माची
प्राप्ती होते. (१७) शातातपस्मृती -- या स्मृतीमध्ये
२२० श्लोक असून प्रामुख्याने प्रायश्चित्त
या विषयावर सविस्तर
विवेचन केलेले आहे. मनुष्य कर्म करण्यामध्ये स्वतंत्र
असला तरी कर्मफळामध्ये
परतंत्र आहे. म्हणून
क्रियमाण कर्म प्रत्येकाने
आधिकात आधिक सत्विक
करावे हाच धर्माचा
गर्भितार्थ आहे. मनुष्याने
प्रायश्चित्त केले नाही तर नरकातील
यातना भोगून पुन्हा
पापसूचक चिन्हांनी युक्त होउन जन्म घ्यावा लागतो,
जोपर्यंत प्रायश्चित्त होत नाही तोपर्यंत
पुन्हा पापसूचक चिन्हांनी
युक्त होउन जन्म घ्यावा लागतो.
प्रायश्चित्त केले तर पाप हळूहळू
नाहीसे होते. महापातक
सात जन्मांनंतर प्रायश्चित्त
केले तर नष्ट होते, उपपातक
पाच जन्मांनंतर प्रायश्चित्त
केले तर नष्ट होते, तर पाप तीन जन्मांनंतर प्रायश्चित्त
केले तर नष्ट होते. (१८) शंखस्मृती -- या स्मृतीमध्ये
३६३ श्लोक असून प्रामुख्याने वर्णाश्रमाचे
सविस्तर विवेचन केलेले
आहे. (१९) सवर्त्तस्मृती
-- या स्मृतीमध्ये
२३२ श्लोक असून प्रामुख्याने वर्णाश्रमाचे
सविस्तर विवेचन केलेले
आहे.प्राणांना वंश करणे म्हणजे प्राणायाम
होय. मन, वाणी, व देहाने
झालेली पापे प्राणायामाच्या प्रभावाने
नष्ट होतात. या स्मृतीच्या पठणाने
सनातन ब्रह्मलोकप्राप्ती होते.
(२०) हारीतस्मृती -- या स्मृतीमध्ये
१९७ श्लोक असून प्रामुख्याने वर्णाश्रमाचे
नेमके विवेचन केलेले
आहे. या स्मृतीमध्ये
एकूण सात अध्याय
असून पहील्या व दुसया अध्यायात
विषयाची प्रस्तावना, तिसया अध्यायापासून सहाव्या
अध्यायापर्यंत चार आश्रमंाची
माहीती, व शेवटच्या
सातव्या अध्यायात वर्णाश्रमाचे
फळ इत्यादी विषयांचे
मार्गदर्शन केले आहे. संपूर्ण प्राणिमात्रांच्या हृदयात
विराजमान असलेल्या परमात्म्याचे
सदैव चिंतन करावे.
स्मृतींचा मार्ग आचरावा.
विरोधी काहीही करू नये. ज्याप्रमाणे
घोड्याविना रथ व सारध्याविना घोडा चालत नाही त्याप्रमाणे विद्या,
तपस्या व सदाचाराशिवाय
समाजाचा विकास होऊ शकत नाही. विद्या व तपस्या ही भवरोगावरील रामबाण
औषधे आहेत. सदाचाराने
त्यांचे प्राशन करून जीवनोध्दार करून घ्यावा. असे वर्णाश्रमाने मोक्ष सांधणारे सूत्रबध्द
निरूपण व सदाचाराचे
सार सांगणारे अप्रतिम
विवेचन आहे.
या विविध स्मृतींचा
अभ्यास करून विश्वरूप,
मेधतिथी, धारेश्वर, भोजदेव,
विज्ञानेश्वर, जीमूतवाहन, अपरार्क,
हेमाद्री, माधवाचार्य, काशीनाथ
उपाध्याय, कुल्लुकभट्ट, नारायणभट्ट,
कमलाकरभट्ट, नीलकंठभट्ट इत्यादी
संस्कृत पंडितांचे या विविध स्मृतींवर
चे टीकाग्रंथ प्रसिध्द
आहेत. तसेच या विविध स्मृतींचा
अभ्यास करून देवण्णभट्ट
या संस्कृत पंडिताने
स्मृती चंद्रिका निबंधग्रंथ
इसवी सन ११५० ते १२२५ या काळामध्ये
तयार केला. यामध्ये
अनेक स्मृतींचे उतारे दिले आहे. तर काही स्मृतींची पुनर्रचना
केलेली दिसून येते. दक्षिण भारतामध्ये
हा निबंधग्रंथ प्रमाणभूत
मानीत असल्याचे प्राचीन
इतिहास संशोधनातील न्यायालयीन
निवाड्यावरून दिसते. या निबंधग्रंथामध्ये प्रामुख्याने
संस्कार, व्यवहार, समाज, गर्भाधान, पुंसवन,
वर्ण-जातींची कर्मे, न्यायालयीन
कार्यपध्दती, पुराव्याची साधने,
भागीदारी, कायद्याचे विषय, खाद्यपदार्थांच्या वर्ज्यावर्ज्यतेचे नियम, श्राध्द विषयी सविस्तर नियम, दंडाचे प्रकार,
साक्षीदाराचे प्रकार, शपथ, अग्निशुध्दी, न्यायाधीशाचे
गुण, निर्णय देण्याची
रीत, सीमेचा निर्णय,
संपत्तीची वाटणी, कराची व्यवस्था, पाप प्रायश्चित्ते, त्यांचे
प्रकार व उपाय, इत्यादी विषयांवर
चर्चा करण्यात आली आहे. तसेच याच काळामध्ये
शुकदेव मिश्र, आपदेव,
वामदेव भट्टचार्य इत्यादी
ग्रंथकारांनी स्मृती चंद्रिका
याच नावाने ग्रंथ लिहीले आहेत. तर श्रीधर
या संस्कृत पंडिताने
इसवी सन ११५० मध्ये स्मृत्यर्थसार
या नावाचा ग्रंथ तयार केला.
समाजव्यवस्थेच्या मुळाशी
प्रमुख कल्पना ही होती की, मानवी वासनेचे
व स्वार्थाचे नियंत्रण
सामाजिक नैतिक कायद्याने,
अर्थात धर्माने व्हावे,
आणि याप्रमाणे मानवाची
आध्यात्मिक जीवन जगण्याची
तयारी व्हावी. त्यांची
व्यापकता, अखंड एकात्मता,
हे दाखवितात कीं यामध्ये बौध्दिक,
सौंदर्यविषयक, नैतिक जाणीव इतकी प्रगत आहे, की त्यामध्ये उदात्त
सुव्यवस्थित सभ्यता व संस्कृति निर्माण
करण्याची प्रवृत्ति व क्षमता आहे.
No comments:
Post a Comment