प्राचीन काळातील
घटना आहे. एकदा निमीराजाच्या यज्ञमंडपात ऋषभनंदन नवयोगेश्वरांनी भागवत-उपदेश केला. पहिल्या योगेश्वराचे नाव कवि आहे, ते
सांगतात--भगवंताच्या
चरणांची नित्य उपासनेने सर्व भय नष्ट होते. साक्षात भगवंताने भगवंत प्राप्तीचे
सहजपणे सांगितलेले
उपाय म्हणजे भागवत होय. शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुध्दीने, अहंकाराने, केलेली सर्व कर्मे नारायणास समर्पित करावी. विवेकी मनुष्याने मन संयमित करावे. जसे जेवणाऱ्यास तृप्ती, जीवन शक्ती, भूक संपणे असे तीन लाभ
प्राप्त होतात, तसेच भगवंतास शरण जाणाऱ्यास भगवंताचे प्रेम,स्वरूपाचा अनुभव, व वैराग्य याचा लाभ होतो.
तर दुसऱ्या योगेश्वराचे
नाव हरि आहे,
ते सांगतात--सर्वत्र
भगवान व भगवंतामध्ये ब्रह्मांड अशी अनुभूती ज्यास येते, त्यास उत्तम भागवत म्हणतात. भगवंताचा द्वेष करणायाची उपेक्षा करतो, तो मध्यम भागवत होय. जो प्रतिमेचे पुजन करून इतरांवर प्रेम करीत नाही, तो कनिष्ठ आहे. जो इंद्रियांनी विषय ग्रहण करून ही सर्व माया मानतो,तो उत्तम भागवत आहे. भगवंताचे स्मरण, चिंतनामध्ये
देहभान विसरतो, तो उत्तम भागवत आहे. ज्याच्या मनामध्ये भोग,वासना यांचा उदय होत नाही, तो उत्तम भागवत आहे. ज्याला त्रिभुवनाचे ऐश्वर्य दिले तरी तो भगवंताचे स्मरण क्षणभर सुध्दा सोडत नाही तो श्रेष्ठ वैष्णव आहे.
तिसऱ्या योगेश्वराचे नाव अंतरिक्ष
आहे ते सांगतात--भगवंताने ज्या शक्तीने हे ब्रह्मांड निर्माण केले ती महामाया आहे. ती त्रिगुणात्मक
असते. अज्ञानी जनांचे याच मायेमुळे स्वरूप-विस्मरण होते. त्या
सृष्टीमध्ये जीव
वेगवेगळ्या शरिरमध्ये प्रवेश करून ज्ञानेंद्रिये
व कर्मेद्रियांच्या द्वारे विषयभोग घेतो. सकाम कर्मे करून एका योनितून दुसऱ्या अशा
चौराऎशी लक्ष योनिमध्ये जीवाचा प्रवास होत असतो.
चौथ्या योगेश्वराचे नाव प्रबुध्द
आहे,
ते सांगतात--प्रत्येकजण
सुखप्राप्ती
व दुःखनिवृती साठी प्रयत्न करतो. परंतु त्याचे फळ
नेहमी विपरीत मिळते याचा
विचार करावा. मृत्युरुप
शरिर,द्रव्य, घर, स्वजन इत्यादिं नाशीवंतापसून शाश्वत सुख कसे मिळ्णार याचा विचार
केला पाहिजे. भागवत धर्माचे आचरण करावे. संसाराची
अनासक्ती, सत्संगती, दया, मैत्री, नम्रता, पावित्र्य, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय,
मनो निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, सुखदुःखाविषयी
समभाव, हा भागवत धर्म
आहे.
त्यानेच मनुष्य माया
सहजतेने पार करू
शकतो.
पाचव्या योगेश्वराचे नाव पिप्पलायन
आहे,
ते सांगतात--जो
या ब्रह्मांडाची निर्मिती, पोषण, प्रलय करतो, तो नारायण आहे. तो स्वप्न, जागृती, सुषुप्ती, समाधिमध्ये
साक्षीरूपाने
विद्यमान आहे. तोच या ब्रह्मांडाचे परमसत्य होय.
सहाव्या योगेश्वराचे नाव अविर्होत्र
आहे, ते सांगतात--कर्म(शास्त्रविहीत-सत्य), अकर्म (निषिध्द-बलात्कार), विकर्म(विहीतकर्माचे
उल्लंघन-असत्य)फक्त वेदाध्ययनानेच
जाणली जातात. ते
समजण्यासाठी पात्रता आवश्यक असते. वेदांचा मुख्यार्थ वेगळा असून, तात्पर्य वेगळे असते. वेदांमध्ये कर्मबंधनातून मुक्तीसाठी कर्माचा उपदेश केलेला
आहे.
वेदांमध्ये फळाचे प्रलोभन सांगून कर्मामध्ये प्रवृत्त करतात.
सातव्या योगेश्वराचे नाव द्रुमिळ आहे, ते सांगतात--भगवान अनंत असून त्यांच्या लिला अनंत आहेत. एकवेळ पृथ्वीवरचे धुळीचे कण मोजता येतील, परंतु भगवंताच्या
लिला मोजता येत नाही. म्हणून धर्मशास्त्रांमध्ये अवतारांचे वर्णन केलेले
आहे. भगवंताने दहा इंद्रिये, पंचमहाभूते व मन अशा सोळा कलांनी युक्त विराटरूप धारण केले. तेच अवतारांचे उगमस्थान आहे. भगवंताचे मुख्य चोवीस अवतार आहेत--१.सनक,सनंदन,सनातन, सनत्कुमार(२)वराह, (३)नारद, (४)नरनारायण, (५)कपिल (६)दत्तात्रेय, (७)यज्ञ, (८)ऋषभदेव, (९)पृथु, (१०)मत्स्य, (११)कच्छ, (१२)धन्वंतरी (१३)मोहिनी,(१४)नृसिंह,(१५)वामन,(१६)परशूराम,(१७)व्यास, (१८)श्रीराम, (१९)बलराम (२०)श्रीकृष्ण, (२१)बुद्ध, (२२)कल्कि, (२३)हंस, (२४)हयग्रीव काही अवतार अंशावतार,आवेशावतार,कलावतार,आदर्शावतार, तर श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे.
आठव्या योगेश्वराचे नाव चमस
आहे,
ते सांगतात--विराटपुरूषाच्या मुखातून सत्वप्रधान ब्राह्मण, भूजांतून सत्वरजप्रधान क्षत्रिय, मांड्यातून
रजतमप्रधान
वैश्य, चरणातून तमप्रधान शूद्र तसेच विराटपुरूषाच्या
हृदयातून ब्रह्मचर्याश्रम, मांड्यातून
गृहस्थाश्रम, वक्षःस्थळातून वानप्रस्थाश्रम, मस्तकातून संन्यासाश्रम निर्माण
झालेले आहेत. हे वर्णाश्रम
मनुष्याच्या स्वभावानुसार निर्माण केलेले आहेत. प्रत्येक मनुष्यास स्वधर्माचरणानेच
मोक्षप्राप्ती होते.
नवव्या योगेश्वराचे नाव करभाजन
आहे, ते सांगतात--युगानुसार भगवंताची आराधना भिन्न भिन्न असते. सत्ययुगामध्ये
भगवंताचा रंग पांढरा असून भगवंताची उपासना ध्यान करून होत असे. त्रेतायुगामध्ये भगवंताचा रंग लाल असून भगवंताची उपासना यज्ञ
करून होत असे. द्वापारयुगामध्ये भगवंताचा रंग
सावळा असून भगवंताची उपासना षोडपचारे पुजन
करून होत असे. कलियुगामध्ये भगवंताचा रंग काळा
असून भगवंताची उपासना नामस्मरणाने होत आहे.