Saturday, 30 September 2017

पितरांची स्तुति



सार्थ पितृस्तोत्र
ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार ब्रह्मर्षि रूचि यांनी पितरांची स्तुति केली.
जे सर्वांना पूजनिय, अत्यंत तेजस्वी, तसेच दिव्यदृष्टिसंपन्न आहेत, त्या पितरांना मी नमस्कार करतो. जे इंद्र व सर्व देवता, दक्ष, कश्यप, सप्तर्षि, सूर्य, चंद्र यांच्याहून श्रेष्ठ आहेत, आणि जे इच्छा पूर्ण करणारे आहेत, त्या पितरांना मी नमस्कार करतो. जे समुद्रामध्ये रहाणारे आहेत, त्या पितरांना मी नमस्कार करतो. नक्षत्र, ग्रह, वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी यांच्याहून जे श्रेष्ठ आहेत, त्या पितरांना मी हात जोडून नमस्कार करतो. जे देवर्षिंचे जन्मदाता, सर्वांना पूजनिय, तसेच नेहमी अक्षय फळ देणारे आहेत, त्या पितरांना मी हात जोडून नमस्कार करतो. प्रजापती, सोम, वरूण तसेच योगेश्वरांच्या रूपामध्ये नेहमी स्थित रहाणाऱ्या, पितरांना मी हात जोडून नमस्कार करतो. मी योगदृष्टिसंपन्न ब्रह्मदेवास आणि  चंद्रावर प्रतिष्ठित योगमूर्तिधारी पितरांना मी नमस्कार करतो. जगतपिता सोमदेवास तसेच अग्निस्वरूप सर्व पितरांना मी नमस्कार करतो, कारण हे संपूर्ण ब्रह्मांड सोममय व अग्निस्वरूप आहे. सर्व पितरांना मी एकाग्रचित्ताने पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, ते माझ्यावर प्रसन्न व्हावेत.
जो मनुष्य या भक्तिपूर्वक स्तुतिने पितरांना संतुष्ट करतो, त्यास उत्तम भोग, आत्मज्ञान, निरोगी-आयुष्य, तसेच मुले-नातवंडे प्राप्त होतात. जो मनुष्य या भक्तिपूर्वक स्तुतिने श्राध्दतिथीला ब्राह्मण-भोजन समयी पितरांना संतुष्ट करतो, ते श्राध्द अक्षय होते, यामध्ये शंका घेऊ नये. अशा प्रकारे सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी पितरांना संतुष्ट करावे.
नमाम्यहं  हषीकेशं  केशवं  मधुसूदनम्    सूदनं  सर्वदैत्यानां  नारायण  मनायम् 
 जयन्तं  विजयं  कृष्णमनन्तं  वामनं  तथा    विष्णुं  विश्वेश्वरं  पुण्यं  विश्वात्मानं  सुरार्चितम् 
 अनघं  त्वघहर्तारं  नारसिंहं  श्रियःप्रियम्    श्रीपतिं  श्रीधरं  श्रीदं  श्रीनिवासं  महोदयम् 
 श्रीरामं  माधवं  मोक्षं  क्षमारूपं  जनार्दनम्    सर्वज्ञं  सर्ववेत्तारं  सर्वेशं  सर्वदायकम् 
 हरिं  मुरारिं  गोविन्दं  पद्मनाभं  प्रजापतिम्    आनन्दं  ज्ञानसंपन्नं  ज्ञानदं  ज्ञानदायकम् 
 अच्युतं  सबलं  चन्द्रवक्त्रं  व्याप्त-परावरम्    योगेश्वरं  जगद्योनिं  ब्रह्मरूपं  महेश्वरम् 
 मुकुन्दं  चापि  वैकुण्ठमेकरूपं  कविं  ध्रुवम्    वासुदेवं  महादेवं  ब्रह्मण्यं  ब्राह्मणप्रियम् 
 गो-प्रियम्  गोहितं  यज्ञं  यज्ञांगं  यज्ञवर्धनम्    यज्ञस्यापि  सुभोक्तारं  वेदवेदांग  पारगम् 
 वेदज्ञं  वेदरूपं  तं  विद्यावासं  सुरेश्वरम्    प्रत्यक्षं    महाहंसं  शंखपाणिं  पुरातनम् 
 पुष्करं  पुष्कराक्षं    वाराहं  धरणीधरम्    प्रद्युम्नं  कामपालं    व्यासध्यातं  महेश्वरम् 
 सर्वसौख्यं  महासौख्यं  सांख्यं    पुरुषोत्तमम्    योगरूपं  महाज्ञानं  योगीशम-जितं  प्रियम् 
 असुरारिं  लोकनाथं  पद्महस्तं  गदाधरम्    गुहावासं  सर्ववासं  पुण्यवासं  महाजनम् 
 वृन्दानाथं  बृहत्कायं  पावनं  पापनाशनम्    गोपीनाथं  गोपसखं  गोपालं  गो-गणाश्रयम् 
 परात्मानं  पराधीशं  कपिलं  कार्य-मानुषम्    नमामि  निखिलं  नित्यं  मनो-वाक्काय-कर्मभिः 
your valuable comments please
you may forward this to your intimates
sanatan-sanskar.blogspot.in
swamiji.mohandas@gmail.com
स्वामी मोहनदास-९४२०८५९६१२
भारतिय तत्त्वज्ञान प्रसारक

Friday, 29 September 2017

दिवाळीचे बदलत गेलेले स्वरूप



दिवाळीचे बदलत गेलेले स्वरूप
दिवाळीचे बदलत गेलेले स्वरूप समजून घेण्यासाठी दिवाळीचे सांस्कृतिक  महत्त्व समजून  घेतले पाहिजे.  दिवाळीच्या  उत्सवामध्ये  आश्विन  कृष्ण  चतुर्दशी  म्हणजेच  नरकचतुर्दशी,  आश्विन  अमावस्या  म्हणजे  लक्ष्मीपूजन,  तर  कार्तीक  शुध्द  प्रतिपदा  म्हणजे  पाडवा  आणि  कार्तीक    शुध्द  द्वितीया  म्हणजे  भाऊबीज  असे  चार  मुख्य  दिवस  आहेत.  दिवाळी  हा  दिव्यांच्या  सजावटीचा  उत्सव  आहे.  आपले  जीवन  प्रकाशमय    समृध्द  व्हावे  हेच   दिवाळीच्या  उत्सवाचे विशेष  महत्व  आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी  पहाटे  अभ्यंगस्नान  करण्याची  प्रथा  आहे. अभ्यंगमर्दनाने शरीर  निरोगी    सशक्त  होते. आपल्या  मनातील  दुष्ट  प्रवृतींचा  नाश  करून  मनाची विशालता वाढविणे  हे  या  दिवसाचे  महत्त्व.  आश्विन  अमावस्येला  लक्ष्मीचे  पूजन  करून  कृतज्ञता  व्यक्त  केली  जाते. कार्तीक  प्रतिपदा  हा  पाडव्याचा  दिवस  व्यापारी  नवीन  वर्षाचा  प्रथम  दिवस  आहे.  व्यापारी  मंडळी  या  दिवशी  आपल्या  हिशोबांच्या  नवीन  वह्यांची  पूजा  करून  नवीन  वर्षाच्या  उद्योगधंद्याची  सुरवात  करतात.  या  दिवशी  पत्नीने  पतिराजास  औक्षण  करण्याची  पध्दत  आहे.  पति-पत्नीचे  अतूट  नाते  अखंडीत  रहावे  हा  उद्देश.  त्यानंतर  दुसऱ्या  दिवशी  कार्तिक  शुध्द  द्वितीयेला  म्हणजे  भाऊबीजेला  भावाला  बहिणीने  औक्षण  करण्याची  पध्दत  आहे.  बहिण  भावाचे  प्रेम  अतूट  रहावे  हाच  विचार.
परंतू ही संस्कृती हळुहळु बदलत गेली. एकत्र कुटुंबे विभक्त होत गेली. घरामध्ये नविन सुन आली की ती वेगळे व्हायचा विचार करू लागली. त्यासाठी नवीन घर, घरासाठी कर्ज, ते फेडण्याची विवंचना इत्यादी प्रश्न आपणहून निर्माण केले गेले. मुख्य कारण एकच मनाची संकुचितता. त्यामुळे आनंद संपला. ही मनाची संकुचितता पाश्चात्य विचारधारेतून आलेली आहे हे समजून  घेतले पाहिजे. संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे ही मनाची व्यापकता विसरली जात आहे. विभक्त कुटुंबामुळे घरांची मागणी वाढली. त्यासाठी वाडे पाडून ओनरशीप फ्लॅट झाले. चोरांच्या भितीमुळे एका दरवाज्याला दुसरे सेफ्टी डोअर असे दोन दरवाजे झाले. दोन्ही दरवाजे नेहमी बंद. फक्त जाणे येण्यासाठीच उघडायचे. शेजारधर्म संपला. विभक्त कुटुंबामध्ये आई वडील दोघेही नोकरी करू लागले. त्यामुळे फराळ, दिव्यांची रोषणाई सर्वकाही बाजारातून विकत आणले जाऊ लागले. ते घरी स्वत:च्या हाताने करण्याचा आनंद संपला आणि दुर्दॆव हे कि त्याची सवय झाली व त्यातच आनंद मानू लागले. आतषबाजीच्या  नविन  नविन  शोधामुळे  धूराचे,  ध्वनींचे    विचारांचे  प्रदुषण  वाढत  चालले  आहे.  त्यामुळे  आपले  आचरण  अधोगतीला  जाऊ  लागलेले  आहे.  तसेच  विनाकारण  पैशाचा  धूर  होत  आहे.  उदा.  दहा  हजार,  पन्नास  हजार  फटाक्यांची  माळ  वाजविणे  असा  अतिरेक  अनेक  ठिकाणी  दिसून  येतो.  ही  दिवाळीच्या  मंगल  सणाची  चेष्टा  आहे.  कारण  दिवाळी  हा  लक्ष्मीपूजनाचा  सण  आहे  तर  आपण  त्या  पैशाची  किंमत    करता  त्याची  उधळपट्टी  करतो.  हे  चूकीचे  आहे. आज मनोरंजनाची अनेक साधने असल्याने परंपरागत  रूढींचा लोप होत आहे. उदा. रांगोळी काढणे प्रथा संपली. कारण आज बाजारामध्ये विवीध प्रकारचे स्टिकरर्स, छाप मिळू लागले आहेत. सुहासिक उटण्यांच्या ऎवजी आकर्षक केमीकलची साबणे मिळू लागली आहेत. आंब्याच्या पानांच्या तोरणांच्या ऎवजी आकर्षक फुलांच्या कृत्रीम माळा मिळू लागल्या आहेत. परदेशाच्या आकर्षणाने पति, भाऊ यांना पत्नी व बहिणीकडे येता येईलच सांगता येत नाही. विज्ञान तंत्रज्ञानाच्या साह्याने पाडवा भाऊबीज साजरी करावी लागते. आपल्या देशामध्ये सुध्दा दळण-वळणाच्या आधुनिक विश्वामध्ये पति, भाऊ नोकरी-व्यवसाय निमित्त दूरवर रहात असतील तर ते प्रवासातून सुखरूप पत्नी व बहिणीकडे येतीलच सांगता येत नाही. असे अनेक विषय आहेत.  शब्दमर्यादेमुळे त्यांचा उल्लेख होऊ शकत नाही.
तरी  दिवाळीच्या  सणाचे  सांस्कृतिक  महत्व  लक्षात  घेऊन  त्याची  जोपासना  करण्यामध्ये  शहाणपणा  आहे.  त्यामध्ये  आपले    सर्वांचेच  कल्याण  आहे  हा  विचार  लक्षात  घेऊन  दिवाळी  साजरी  करावी.
या  दिवाळी  निमित्त  आपल्या  जीवनामध्ये  ज्ञानाचा  प्रकाश    सद्गुणांची  समृध्दि  व्हावी  हीच  शूभेच्छा   !  !  !

स्वामी मोहनदास, भारतीय तत्तज्ञान प्रसारक
एल-५०७ चंद्रमा-विश्व धायरी पुणे-४११०६८(९४२०८५९६१२)