अवधूत आख्यान
श्री गणेशाय
नमः। सरस्वत्यै तथा नारायणाय
नमो नमः। भगवान
व्यासाय नमो नमः।
ॐ नमो भगवते
वासुदेवाय।।१।।
कोणत्याही कार्यारंभी गणपतीचे स्तवन -
कारण तो विघ्नहर्ता
- सप्ताहाचे कार्य निर्विघ्नपणे
होण्यासाठी - एकनाथ
महाराज म्हणतात -ऐशिया जी
गणनाथा। मीपणे कैंचा
नमिता। अकर्ताचि जाहला कर्ता।
ग्रंथविस्तारा। -- तोच या ग्रंथाचा
कर्ता आहे. - सरस्वती ही वाणीची
देवता - ज्याला
सरस्वती प्रसन्न त्याच्या मुखाने साक्षात
सरस्वती बोलते म्हणून
सरस्वतीला वंदन करून
ग्रंथाची सुरवात - या ग्रंथाचा विषय नारायणस्तुति
- साक्षात विष्णु जो
या ब्रह्मांडाचा निर्माता पालनकर्ता आणि संहारकर्ता
- नंतर भगवान
व्यासमुनींना वंदन ज्यांनी
या ग्रंथाची निर्मिती केली - या भागवताचे
मुख्य दैवत वासुदेव
जो पुर्णावतार वासुदेवाच्या भक्तासाठीच या भागवताचे
विवेचन म्हणून त्यास
साष्टांग प्रणिपात.
घोर तपस्या
महर्षि अत्रि करी।
निश्चल उभे एकपदी।
शंभर वर्षे केवळ
वायु भक्षूनी। एकच ध्यास
श्रीहरिसमान पुत्रप्राप्तीचा।।२।।
जेव्हा महर्षि
अत्रिंना सृष्टि निर्माण
करण्याची आज्ञा ब्रह्मदेवाने दिली - उग्र तपश्चर्या - थंडी उन्हाळ्याची
पर्वा नाही - प्रार्थना - परमेश्वरासी
संपुर्ण शरणागती -
तपस्या होई
सफल। तिन्ही देवांचे
साक्षात दर्शन। ब्रह्मा
विष्णु महेश रूप
मनोहर। आहेत तीन
रूपे एकाच परमेश्वराची
।।३।।
तपस्येच्या तेजाने तीन्ही
लोकांत प्रसिध्द झाले - हंस, गरूड,
व नंदी या
आसनांवरून दर्शन -
अत्रींनी स्तुती केली
- शंका - एकाच परमेश्वराचे
ध्यान - तीन देव कसे
झाले -
उत्पत्ती - पालन - संहार
यासाठी तीन रूपे
ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र। विष्णूच्या
अंशापासून दत्त। शंकराच्या
अंशाने दुर्वास। तीन जगतविख्यात
पुत्र प्राप्ती ।४।।
म्हणून तीन
पुत्र
ब्रह्मा विष्णु महेश
यांच्या आशिर्वादाने -गुरू महिमा
गातील
श्रीकृष्ण म्हणे उध्दवास।
महाराज यदुच्या दरबारात। एके दिवशी
येई दत्तात्रेय। अवधूत ब्राह्मण
स्वानंदी।।५।।
संसारी दुःख
निवारणासाठी। जन्ममृत्युची भिती जाण्यासाठी।
हृदयी श्रीहरिभक्ती होण्यासाठी। भागवताचा अभ्यास.
भागवताचा अभ्यास हा
शब्द महत्वाचा - नुसते
पारायण, सप्ताह नाही
तर अभ्यास म्हणजे
मनन, चिंतन, स्मरण
सर्वकाळ
यदुमहाराज करी आदरसत्कार
। नम्रतेने साष्टांग नमस्कार। शंका केली
प्रकट । कारण काय आपल्या
परमानंदाचे ।।६।।
श्रीकृष्ण उध्दवास कथा सांगत
आहे. उपदेशात्मक
दत्तात्रेय म्हणे महाराजास
। माझ्या परमानंदाचे
कारण। एकच ते म्हणजे आत्मज्ञान
। चोवीस गुरूंकडून
प्राप्त झाले।।७।।
पृथ्वी वायु
आकाश । पाणी अग्नि अजगर
। चंद्र सूर्य
कबूतर । समुद्र
हत्ती हरिण हे
चोवीस गुरूं।।८।।
मासा टिटवी
पतंगकिटक । वेश्या
कोळी कारागीर । कुमारी
भूंगा बालक । कुंभारिण साप मधमाशी
।।९।।
पृथ्वीकडून क्षमेची शिकवण ।
धैर्याची सहनशिलतेची शिकवण ।
वक्ष पर्वतांकडून शिकवण ।
परोपकाराची ।।१०।।
समुद्र वसने
देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम् पादस्पर्शे क्षमस्वमे
साधकाने सहनशील व्हावे
। उन्माद केला
तरी शांत रहावे
। दुसयांचे नाईलाज जाणावे
। जीवन झिजवावे
परोपकारासाठी ।।११।।
शरीरातील प्राणवायुची शिकवण ।
इच्छा केवळ अन्नपचन
। तसेच वायु
जातो अनेक ठिकाणी
। परंतू कोठेही
गुंतून जात नसतो
।।१२।।
साधकाने जगण्या पुरतेच
खावे । चटकदार
चवीने खाऊ नये
। अनासक्ती पाहिजे भोगामध्ये
। जाणावे आत्मस्वरूप
।।१३।।
आकाशाकडून व्यापकतेची शिकवण ।
आकाशामध्ये लागते आग
। पडतो पाऊस
जमतात ढग । परंतू आकाश
अलिप्त असते ।।१४।।
साधकाने मन करावे
व्यापक । सर्वत्र
करावे परमात्मा दर्शन ।
जीवनातील सर्व प्रसंगांचे
निरीक्षण । करावे
त्रयस्थ भूमिकेने ।।१५।।
पाण्याकडून स्वच्छतेची शिकवण ।
पाणी देई जीवनदान
। गंगाजल करते
पावन । विवीध
रंग धारण करते
।।१६।।
साधकाने पारदर्शक रहावे ।
इतरांना जीवनदान द्यावे ।
दुर्जनांस पवित्र करावे
। आचरण व्हावे
शुध्द ।।१७।।
अग्निकडून प्रकाशाची शिकवण ।
अग्निमध्ये सर्वकाही भस्मसात । परंतू
त्याचा दोष नाही
अग्निस । वस्तुंमध्ये
गुप्तरूपाने ।।१८।।
साधकाने ज्ञानाचा प्रकाश मिळवावा
। इतरांचा अपराध सहन
करावा । त्यांचा
दोष सोडावा ।
एकांतामध्ये साधना करावी
।।१९।।
चंद्राकडून परसत्याची शिकवण ।
पृथ्वीच्या कालगतीनुसार । चंद्रकला
वाढतात कमी होतात
। परंतू चंद्र
पुर्ण आहे ।।२०।।
मनुष्याच्या बुध्दीने परमात्मा स्वरूप समजणार
नाही कारण बुध्दीच
गुण विकारी आहे
तर परमात्मा निर्गुण आहे. हे
उमजण्यासाठी बुध्दी दिलेली
आहे.
साधकाने जाणावे परमसत्य
। जन्मापासून मृत्युपर्यंत । सर्व अवस्था शरीराच्या
आहेत । तर आत्मा अविनाशी
आहे ।।२१।।
या सृष्टिच्या
आधी फक्त श्रीहरी
। या सृष्टिमध्ये
सर्वत्र श्रीहरी । यासृष्टिच्या
नंतर सुध्दा श्रीहरी
। असा श्रीहरी
अलौकिक।
जे खरे नाही परंतु
दिसते । खरे वाटते भासमान
असून । प्रत्यक्ष
अनुभवता येते । ती सर्व
श्रीहरिची महामाया समजावीे ।
प्राणीमात्रांमध्ये आत्मारूपाने । श्रीहरी त्यांच्या हृदयी आहे
। परंतु परमतत्त्वानुसार
अलिप्त आहे । नित्यमुक्त निर्गुण ।
सर्वस्वरूप श्रीहरी सर्वकाळ आहे । हेच केवळ
परमसत्य आहे । हेच जाणण्याची
आवश्यकता आहे । आत्मानुभूतीसाठी ।
सूर्याकडून त्यागाची शिकवण ।
सूर्य घेतो पाणी
शोषून । आणि पाडतो पाऊस
मुसळधार । त्यास
पाण्याची आसक्ती नसते
।।२२।।
साधकाने त्यागाची भावना धरावी
। आत्म्याची पुर्णता जाणावी ।
प्राणीमात्रांमध्ये भिन्न असला
तरी । एकच अनंत झाला
आहे ।।२३।।
कबूतराकडून मोह-त्यागाची शिकवण ।
कबूतर कबूतरीमध्ये आसक्त ।
तीच्या शिकारीने होई दुःख
। स्वतः शिकार
होई ।।२४।।
साधकाने मोह-ममता सोडावी ।
स्वजनांच्या मृत्युचे दुःख नाही
। कारण त्यांच्या
मोहात सुख नाही
। परमशांती नसते ।।२५।।
शुकदेव सांगतात
(८)भरत मृगाच्या
मोहामध्ये फसून मृगयोनिमध्ये
जन्म
ऋषभदेवांचा ज्येष्ठ पुत्र भरत
मोठा भगवत् भक्त
होता कर्मयोगी एकांतामध्ये फक्त कंदमूळे
खाऊन वनामध्ये खूप वर्षे
आराधना केली अंतःकरण
शुध्द झाले एकचित्ताने
श्रीहरि स्मरण -
एके दिवशी हरिणाच्या
पिल्लाची आसक्ती लागली
तेव्हापासून दिवसभर त्या
हरिणाकडेच लक्ष श्रीहरिचे
चिंतन नाही - शेवटी मृत्युसमयी
तेच चिंतन म्हणून
पुढचा जन्म हरिणाचा
- म्हणून १०
वर्षे तपसाधना केली २०
वर्षे तपसाधना केली आता
पूरे म्हणून चालणार
नाही कारण अंतकाळापर्यंत
श्रीहरि चिंतन महत्वाचे
आहे.
अजगराकडून समाधानाची शिकवण ।
अन्नासाठी प्रयत्न नाही करीत
। मिळेल ते
खाऊन समाधान ।
तर कधी उपाशी
सुध्दा ।।२६।।
साधकाने इच्छा करू
नये । मिळेल
त्यात संतुष्ट व्हावे ।
प्रारब्धा प्रमाणे सुख मिळत
असते । धारण करावे वैराग्य
।।२७।।
समुद्राकडून
गंभीरतेची शिकवण ।
नद्यांच्या पुराने नाही
वाढत । उन्हाळ्यामध्ये
नाही घटत । त्याची विशालता
जाणावी ।।२८।।
साधकाने गंभीरपणे चिंतन करावे
। प्रशंसेमध्ये आनंदून जाऊ
नये । निंदेमध्ये
क्रोध करू नये
। मनाची व्यापकता
वाढवावी ।।२९।।
पतंगकिटकाकडून
मोह-त्यागाची शिकवण ।
अग्निरूपाचा त्यास मोह
। अग्निमध्ये घेई धाव
। आणि होई
भस्मसात ।।३०।।
साधकाने इंद्रियांचा
संयम राखावा ।
स्त्रीरूपाचा मोह टाळावा।
ती मोक्षाच्या आड येणारी
माया । अधोगती
थांबवावी ।।३१।।
मधमाशीकडून
असंग्रहाची शिकवण ।
मधाची करते साठवण
। मधाच्या लालसेने त्यांना मारून ।
मनुष्य मध घेऊन
जातो ।।३२।।
साधकाने वस्तुंचा संग्रह करू
नये । भिक्षेचा
ही संग्रह करू
नये । पोट साठवण तर
हात पात्र भिक्षेचे
। दुसया वेळेची
नको चिंता ।।३३।।
भुंग्याकडून अनासक्तीची
शिकवण । भुंगा
मध घेई असंख्य
फुलांतून । फुलांना
इजा न करून । भेदभाव
नाही फुलांचा ।।३४।।
साधकाने भिक्षा मागावी
। प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या
घरी । एकाच घराची नको
आसक्ति । शास्त्रांतील
सार काढावे ।।३५।।
हत्तीकडून
काम-त्यागाची शिकवण ।
हत्तिणीला पाहुन होतो
कामातूर । कामभोगामध्ये
गुंग । आत्मघात
होतो शेवटी ।।३६।।
साधकाने स्त्रीचा विचार करू
नये । भोगासाठी
स्त्री नसते । कारण काम
भोग मृत्युरूप आहे । कामाचा त्याग
करावा ।।३७।।
हरिणाकडून
संगीत-त्यागाची शिकवण ।
हरिणाची गाण्याने होते शिकार
। त्याच्या गर्भाने ऐकले संगीत
। खोलवर परिणाम
झाला ।।३८।।
साधकाने स्त्रीयांविषयी ऐकू नये
। नाचगाणे पाहु नये
। कारण ते
आत्मघातकी असते । निर्माण होते काम-वासना
।।३९।।
आपल्या आई शेजारी
बसू नये । मुलगी बहिणी
शेजारी बसू नये
। एकांतामध्ये बसू नये
। कारण वासना
विचलित होऊ शकते
।१९.१७
ययाती आपल्या प्रियतमेस
म्हणतो स्त्रियांचे चरित्र कोण
जाणेल । कमळाप्रमाणे
त्यांचे मुख । अमृतसमान मधुर वचन
। परंतु अंतःकरण
तीक्ष्ण धारदार
कश्यप असूराची माता दितीला
सांगतात स्त्रिया आशेच्या भूकेल्या असतात ।
कोणावरही प्रेम करीत
नसतात । भाऊ पति पुत्र
यांस । मारतात
किंवा मारून घेतात
कश्यप ऋषी म्हणतात
असूराची माता दितीला
उद्देशून
माश्याकडून
लोभ-त्यागाची शिकवण ।
गळाला लावलेले मांस । खाल्यावर मरतो तडफडून
। घात होतो
स्वादाच्या लोभाने ।।४०।।
साधकाने जिभेवर नियंत्रण
ठेवावे । चवीने
खाणेपिणे बंद करावे
। जीवन निर्वासाठीच
खावे । अन्नाचा
लोभ टाळावा ।।४१।।
वैश्याकडून
वैराग्याची शिकवण ।
धनाच्या आशेने एक
दिवस । मिळाला
नाही पुरूष-भोग । भोगाचा
झाला तिटकारा ।।४२।।
साधकाने वैराग्य आचरावे ।
भौतिक सुखामध्ये आसक्त नसावे
। परमेश्वराचे चिंतन करावे
। ध्यास आत्मानुभूतीचा
।।४३।।
टिटवीकडून
असंग्रहाची शिकवण ।
मांसाच्या तुकड्यासाठी दुःख । त्याचा त्याग
केल्यावर सुख । सुरक्षतेची चिंता ।।४४।।
साधकाने कशाचाही संग्रह करू
नये । मनाने
त्याचा विचार करू
नये । सुरक्षतेची
चिंता नसते । मिळते परमशांती
।।४५।।
बालकाकडून
अहंकार-त्यागाची शिकवण ।
नसतो मान-अपमान । देहाचा
नाही अहंकार ।
मग्न आत्मसुखामध्ये ।।४६।।
साधकाने देहाभिमानाचा त्याग करावा
। मान-अपमान देहाचा। ध्यास आत्मसाक्षात्काराचा
। आत्मा निर्गुण
आहे ।।४७।।
कुमारीकडून
एकांताची शिकवण ।
एकदा पाहुण्यांसाठी स्वयंपाक । करताना
बांगड्याचा आवाज । प्रत्येकी एकच ठेवली
।।४८।।
साधकाने एकांतामध्ये साधना करावी
। गोंधळ गदर्ी
टाळावी । दोघांमध्ये
सुध्दा बोलणी ।
एकट्याचीच साधना पुर्ण
होते ।।४९।।
कारागीराकडून
एकाग्रतेची शिकवण ।
कारागीर कामामध्ये तन्मय ।
शेजारच्या गोष्टींकडे नाही लक्ष
। कार्यक्षमता वाढते ।।५०।।
साधकाने मन एकाग्र
करावे । योगासने
व प्राणायामाने । परमात्म्यामध्ये
मन स्थिर करावे
। साघनेने शांत होते
मन ।।५१।।
मनाची एकाग्रता
फार महत्त्वाची. हे मन वासनामय, विषयासक्त त्रिगुणांनी प्रेरित होऊन शरीरामध्ये
भावनात्मक कार्य करते
सुखदुःखाची धारणा करते
या मनासाठी रामदास स्वामींनी
एक दोन नाही
तर २०५ मनाचे
श्लोक लिहिले आहे
म्हणून हे मन घातकी कसे
आहे हे ओळखून
रहावे चंचल आहे
त्याला वळण लाऊन
स्थिर करावे. ज्ञानेश्वर
म्हणतात-- (६.४१८ ते
४२०) या मनाचा
स्वभाव
खरोखर चंचलच
आहे परंतू याला
वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर
काही काळाने हे
स्थिर होईल कारण
मनाच्या ठिकाणी एक
चांगला गुण आहे
तो म्हणजे
त्या मनाला
एकदा अनुभविलेल्या सुखाची गोडी
लागली की त्याची
मनाला चटक लागते.
सापाकडून
एकांताची शिकवण ।
सापाचा संचार एकट्यानेच
। सापांचा नसतो समुह
। दुसयांच्या घरामध्ये आराम करतो
।।५२।।
साधकाने एकट्यानेच भ्रमण करावे
। आश्रम बांधू
नये । एकाच ठिकाणी राहु
नये । प्रसिध्दी
मिंधेपणा नसावा ।।५३।।
कोळीकडून
विश्वाची शिकवण ।
तो आपल्या तंतूने
करतो जाळं । तेच टाकतो
खाऊन । तयार करतो व नष्ट करतो
।।५४।।
साधकाने विश्वाची रचना जाणावी
। परमात्मा विश्व निर्माण
करी । तोच त्याचा संहार
करी । तोच कर्ता करविता
।।५५।।
कुंभारीणीकडून
एकरूपतेची शिकवण ।
एका आळीस कवचाने
करते बंद । ती आळी कुंभारीणीचे चिंतन ।
होते कुंभारीण ।।५६।।
साधकाने परमेश्वराशी एकरूपता साधावी ।
प्रेमाने भितीने द्वेषाने
कशीही । एकरूपता
आहे महत्वाची । तो परमेश्वरमय ।।५७।।
शरीराकडून
विवेकाची शिकवण ।
शरीर आहे नाशिवंत
। जन्ममरण हा त्याचा
स्वभाव । त्याच्या
आसक्तीमुळेच सुखदुःख होते ।।५८।।