माहात्म्य (पद्म पुराण)
श्री गणेशाय नमः।
सरस्वत्यै तथा नारायणाय
नमो नमः। भगवान
व्यासाय नमो नमः।
ॐ नमो भगवते
वासुदेवाय
श्रीकृष्ण सच्चिदानंदस्वरूप । विश्वाचे
आदिकारण । करी त्रितापाचा नाश । त्यास साष्टांग
नमस्कार माझा ।१.१
घोर कलियुगात । मनुष्याचे
वर्तन पशु समान
। असंख्य दोषाने
बेजार । उद्धारासाठी
काय उपाय आहे
।१.६
अंतःकरण शुध्दीसाठी । पुर्वजन्मीच्या
पुण्याईने प्राप्ती । जनम-मरण
मुक्तीसाठी । भागवत
हाच रामबाण उपाय
।१.१२
जेव्हा श्रीकृष्णाचे
स्वधामगमन । तेव्हापासून
कलियुग प्रारंभ । दुराचाराची
सुरवात । पृथ्वीवर
सुरू झाली ।१.६६
लोभाने पुराणे तत्त्वहीन।
नास्तिकामुळे तीर्थस्थाने प्रभावहीन। भोंदूगिरीमुळे नाही तपोबल।
हा प्रभाव कलियुगाचा
।१.७२
सत्य-त्रेता-द्वापार युगी । ज्ञान वैराग्याने
मुक्ती । कलियुगात
निष्काम भक्ती ।
हेच मोक्षाचे साधन आहे
।२.४
श्रीकृष्णप्राप्ती होत नसते
। तपाने ज्ञानाने
कर्माने । होते केवळ निष्काम
भक्तीने । त्याचे
प्रमाण गोपी आहेत
।२.१८
जो भक्तीचा द्वष करतो
। जो भक्तांचा
मत्सर करतो । तो असंख्य
भोगतो । दुर्वासा
मुनींप्रमाणे ।२.२०
भागवत वेद-उपनिषदांचे सार । कथेच्या स्वरूपात । फलश्रुतीच्या
स्वरूपात । म्हणोनी
उत्तम आहे ।२.६७
जसे झाडातील रस । मुळापासून असतो शेंड्यापर्यंत
। परंतू नाही
घेता येत । जो केवळ
फळाच्या रूपाने शक्य
।२.६८
भागवत संकिर्तन नित्य करावे।
श्रवण आचरण करावे
। चिंतन मनन
करावे । त्यानेच
हृदयी श्रीकृष्ण जाणवतो ।३.२५
अनेक ग्रंथाचे वाचन । केल्यामुळे वाढतो आभास
। वाया जातो
वेळ । मोक्षासाठी
एकमेव भागवत ।३.२८
भागवत ग्रंथ ज्या
घरामध्ये आहे । ते घर तीर्थरूप होते । घरातील सर्वांचे
पाप नष्ट होते
। हा भागवत
महिमा ।३.२९
ज्याने आयुष्यमध्ये । एकदाही
भागवत नाही ऐकले
। एकाग्रतेने श्रध्देने । त्याचे
आयुष्य गेले वाया
।३.४२
भागवत संकिर्तन करावे। श्रवण
सत्यभाषण ब्रह्मचर्य पालनाने। हे कलियुगामध्ये
कठिण आहे। म्हणोनी
सप्ताहविधी।३.४६
ज्याच्या हृदयी भक्ती
। तो निर्धन
असला तरी । परम धन्य
आहे कारण की
। परमेश्वर त्याच्या हृदयी असतो
।३.७३
भागवत परब्रह्मस्वरूप । वक्ता
श्रोता होतो श्रीकृष्णस्वरूप
। हे भागवताचे
स्वरूप । अन्य ग्रंथाचे कारण नाही
।३.७४
पुत्राचा मोह सोडावा
। कर्मबंधनाचा मद नष्ट
करावा । विवेकाचा
मार्ग अनुसारावा । भौतिक
आसक्ती सोडावी ।४.३४
हा देह हाडामांसाचा
आहे । त्याचा
मी-पणा धरू नये
। या विश्वाला
क्षणभंगूर समजावे ।
आत्मानुभूती साधावी ।४.७९
जसे अग्निमध्ये भस्मसात । ओले सुके लहान
मोठे इंधन । तसेच भागवताने
पापनाश । कायावाचामनाने
केलेले सर्व ।५.५५
लक्ष न देता केलेले श्रवण
। संशयाने ऐकलेला उपदेश
। आणि चंचल
मनाने केलेले ध्यान
। केवळ व्यर्थ
आहे ।५.७३
एकाग्रतेने श्रवण करावे
। दृढविश्वासाने चिंतन करावे
। आत्मदर्शन करून घ्यावे
। हाच आहे
प्रत्यक्ष मोक्ष ।५.७५
हे कल्पवृक्षाचे फळ। अमृत
रसाने रसरसीत। साल नाही
बी नाही यात।
कलियुगी करावे रसपान
अढळ श्रध्देने।६.८०
हे भागवत व्यास
रचित । निष्काम
परमधर्माचे निरूपण ।
प्राप्त होतो परमानंद
। दुसया कशाचीही
गरज नाही ।६.८१
ज्ञान वैराग्य भक्तिचे सर्वोत्तम निरूपण। करावे श्रवण
पठण । त्यानेच
आत्मसाक्षात्कार । हा भागवताचा महीमा ।६.८२
सप्ताहामध्ये येउनी। प्रल्हाद
टाळ्या उध्दव झांजा
वाजवी। नारद वीणा
इंद्र मृदंग वाजवी।
अर्जुन शास्त्रीय गायन।६.८६
सनकादि जय घोष करी। भक्ति
ज्ञान वैराग्य नृत्य करी।
ब्रह्मा विष्णु महेश
येती। वरदान करी
प्रदान होउनी प्रसन्न
।६.८९
ज्यास दुःख दारिद्र्य
आहे। ज्यास भुताची
बाधा आहे। जो
संसारी उपभोगामध्ये गुंग आहे।
त्याच्यासाठी भागवत ।६.९२
या अलौकिक महोत्सवात।
शुध्द होई अंतःकरण
। हरीभक्ति दृढ होई
हृदयात। हा दुर्मिळ
योग कारणी लावावा
।६.१०३
भागवतामध्ये कर्मठ कर्मकांड
नाही। रंजक अर्थहीन
कथा नाही। ऐहीक
सुखाचे साधन नाही।
केवळ आत्मानुभूती आहे।
माहात्म्य (स्कंद पुराण)
अनेक जन्मांच्या साधनेने। मनुष्य पुर्ण
सिध्द झाल्याने। आणि श्रीहरिच्या
कृपाप्रसादाने। होते भागवत
प्राप्ती।।१।।
केवळ परमानंद म्हणजे भागवत।
श्रीमद भागवताचे स्वरूप। ते म्हणजे
सच्चिदानंदमय। सदा सर्वकाळ
एकच आहे।।२।।
ज्याचे चित्त श्रीकृष्णामध्ये
एकरूप। जो करी श्रीकृष्णसंकिर्तन। जो भक्त
एकचित्ताने करी श्रवण।
तो भागवत आहे।।३।।
भक्तिचे सर्वोत्तम निरूपण। महामायेचे स्वरूप जाणुनी
दुर्लक्ष। आत्मानुभूतीचा साक्षात्कार। ते भागवत
आहे।।४।।
विष्णुचा उपदेश ब्रह्मदेवास।
त्याचे ज्ञान फक्त
ब्रह्मा महेशास। सामान्यांसाठी शुकदेव परीक्षित
संवाद। तेच भागवत
आहे ।।५।।
भागवतामध्ये बारा स्कंध।
एकूण अध्याय तिनशे
पस्तीस। आणि श्लोकसंख्या
अठरा हजार। भागवत
असे आहे ।।६।।
सात दिवसाचे पारायण राजस।
एकदोन महिन्याचे सात्विक। वर्षभराचे पारायण तामस।
सर्वकाळ केलेले निर्गुणी।।७।।
भागवताचे श्रवण एकचित्ताने।
उपदेश ग्रहण शिष्यत्वाने
नम्रतेने। चिंतन करावे
अढळ श्रध्देने। तो उत्तम
आहे श्रोता।।८।।
हृदयी नित्य श्रीहरीध्यास।
निरपेक्ष वृत्ती सर्वाप्रती
समभाव। तत्वज्ञान सांगण्यात चतुर। तो
उत्तम आहे वक्ता।।९।।
शुकदेवाने सांगितले भागवत। परीक्षितास
सात दिवसात। कारण त्याचे
आयुष्य तेव्हढेच। म्हणुनी ते आहे निर्गुणी।।१०।।
हरीभक्त होई आतुर।
भागवत श्रवणासाठी होई व्याकुळ।
नाही मोक्षाची इच्छा त्यांस।
भागवत हेच त्यांची
संपत्ती।।११।।
हरीभक्त दोन प्रकारचे।
श्रीकृष्णाची इच्छा करणारे।
श्रीकृष्णाच्या वैभवाची इच्छा करणारे।
भागवत आहे दोघांसाठी।।१२।।
ज्यास इच्छा श्रीकृष्णाची।
ते निष्काम कर्म करी।
देहाभिमान नाही अहंकार
नाही। कारण हृदयी
फक्त प्रेम आहे।।१३।।
ज्यास इच्छा वैभवाची।
कर्मामध्ये सकाम बुध्दि।
देहाभिमानामुळे परमशांती नाही। प्रत्येक
कर्मामध्ये फळाची आशा।।१४।।
इच्छेेमध्ये सुखदुःख आहे। षडविकारांचे
चक्र आहे। याचेच
भागवतामध्ये विडंबन आहे।
भागवतामध्ये अपेक्षा नसावी।।१५।।
श्रीहरीचा उपदेश ब्रह्मास।
ब्रह्माचा नारदास नारदचा
व्यासदेवास। व्यासाने पढविले शुकास।
ही भागवताची परंपरा।।१६।।
विश्व निर्मितीसमयी प्रार्थना ब्रह्माची । श्रीहरीस्वरूप
जाणण्याची। तो भागवत
उपदेश चतुःश्लोकी । हे मुळ भागवत।।१७।।
नारद प्रश्न करी।
इच्छा विश्वाचा आधार जाणण्याची।
ब्रह्मदेव उपदेश करी।
तो विस्तार भागवताचा।।१८।।
व्यासदेव होई उदास।
वेदपुराणां नंतरही असमाधान
। म्हणुनी नारदचा भक्ति
उपदेश । ती भागवताची प्रस्तावना।।१९।।
त्याचेच रचिले भागवत
पुराण। ज्यामध्ये श्रीहरीगुणसंकिर्तन। ते शिकविले
पुत्र शुकदेवास। परमभक्त जो पुर्ण
वैरागी।।२०।।
शुकाचा उपदेश परीक्षितास।
जो शापामुळे
प्राणांतिक उपोषणावर। प्रश्न करी
शुकदेवास। अंतसमयी काय करावे।।२१।।
भागवताचे स्वरूप संवादरूप।
परीक्षितास शुकाचे उत्तर।
संपुर्ण संवादाचा आशय एकच।
अंतसमयी काय करावे।।२२।।
शुकदेवा शिवाय सर्वांनी
श्रवण केले। कोणत्यातरी
उद्देशाने। शुकदेवाने आत्मसात केले। केवळ
व्यासांच्या इच्छेसाठी।२३।।
आजचा ग्रंथ सूतशौनकसंवादरूप।
कलियुगी मानव कल्याणासाठी
प्रयास। कथिले गंगातीरावर।
प्रत्यक्ष मोक्षप्राप्ती।।२४।।
भागवत ग्रंथ संस्कृतात।
म्हणोनी सामान्यांसाठी निरूपण। एकनाथांनी मराठीत। केवळ भक्तिरूप
अकराव्या स्कंधाचे।।२५।।
पुढे कृष्ण दयार्णवांने।
निरूपण श्रीकृष्णलीलेच्या दहाव्या स्कंधाचे। मराठीत आज्ञेप्रमाणे
एकनाथांच्या ।।२६।।
आता फक्त भागवतसप्ताह।
सात दिवस कथा
मनोरंजन। उत्सवाचा अनावश्यक झगमगाट। तत्वज्ञान नाही।।२७।।
प्रथम भागवत अभ्यासावे।
त्यातील तत्वज्ञान जाणावे। कथा स्पष्टीकरणासाठी
आहे। तेव्हा गोडी
लागेल भागवताची।।२८।।
हा एक अध्यात्मिक
विचार। काय करावे
करू नये हा उपदेश। तिरस्काराचे
काय कारण। आज
गरज भागवताची।।२९।।
प्रयत्न भागवत जगण्याचा।
जो आज साधता
येण्याजोगा। त्यासाठी पाहिजे जिज्ञासा।
त्यासाठीच हा उपक्रम
आहे।।३०।।
स्कंध ।।१।।
जो सर्व ठिकाणी
आहे । मायाकार्यापासून
मुक्त मायातीत आहे । स्वयंप्रकाशित आहे । त्या परमात्म्याचे
ध्यान आम्हा ।१.१
त्रिगुणमयी सृष्टि भासमान
आहे । तरी ज्याच्या सत्तेमुळे । मायारूप
सृष्टि सत्यवत भासते
। तोच आहे
परमात्मा । १.१
भागवत व्यासांनी रचिले ।
त्यात मोक्षापर्यंतचे फळ आहे । परंतू
कोणतीही इच्छा नसलेले
। व परमधर्माचे
निरूपण । १.२
शुध्द अंतःकरणाच्या पुरूषाने । जाणण्यास
योग्य असे । परमात्म्याचे निरूपण आहे
। जे तीन तापांचा नाश करते
।१.२
वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे । रसरशीत
परमानंदाने । साल-बी
नाही यामध्ये । टाकाऊ
काहीच नाही।१.३
जो पर्यंत मनुष्य
जिवंत आहे । तोपर्यंत या भागवत
रसाचे । निरंतर
श्रवण करीत रहावे
। जे मुळीच
अवघड नाही । १.३
श्रीहरिची कथा श्रवण
केल्याने । कधीही
तृप्ति होत नसते
। कारण क्षणोक्षणी
जिज्ञासु श्रोते ।
नविन अनुभव घेतात
।१.१९
तीव्र इच्छा आहे
ज्याची । घोर अंधकारातून बाहेर पडण्याची
। भागवत त्याच्या
साठी । प्रकाश
देणारा दिपक आहे
।२.३
मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे
। ज्याने श्रीहरिची
भक्ति होते । कोणतीही आकांक्षा नसते । ही निरपेक्ष
भक्ति नित्य ।२.६
धर्माचे अनुष्ठान केले तरी
। हृदयात भक्तिचा
उदय नाही । तेव्हा ते
अनुष्ठान उपयोगाचे नाही । केवळ निरर्थक ।२.८
धर्माचे फळ भोगविलास
नाही । केवळ इंद्रिय-तृप्तीसाठी भोग नाही
। जीवन-निर्वाहासाठी । उपभोगाचे
प्रयोजन आहे ।२.९
निरपेक्ष भक्तिने रजो-तमोगुणी । काम क्रोध लोभ
शांत होऊनी ।
चित्त सत्त्वगुणमे स्थिर होऊनी
। निर्मल होते
।२.१९
भक्तिने जेहा विषयांची
आसक्ति संपते ।
हृदय आनंदाने भरून येते
। तेव्हा आत्मानुभूती
होते । सहजतेने
आपोआप ।२.२०
जरी श्रीहरी प्रकृती गुणातीत आहे । तरी सुध्दा
प्रपंचाच्या दृष्टिने आहे । नाही तत्त्वतः
दृष्टिने । श्रीहरिची
लीला ।२.३०
प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये । ज्ञानेंद्रियाद्वारे
विषयभोग सुक्ष्मरूपाने । परंतु
त्यांच्याहून विभक्त आहे
। स्वतंत्र आहे ।३.३६
जसे जादूगराच्या करामती ।
सामान्यजन जाणू शकत
नाही । तसेच लीला श्रीहरिची
। जाणता येत
नाही तकर्ाने ।३.३७
रहस्य श्रीहरिच्या लीलेचे ।
त्यास जाणणे शक्य
आहे । जो निरंतर निष्कपटाने
। श्रीहरिच्या चरणांचे चिंतन करतो।
३.३८
जो श्रीहरिची सर्वात्मक आत्मभावाने । अनन्य
भक्तिभावाने श्रध्देने । चिंतन
करतो अविरतपणे । मुक्ती
मिळते त्याला ।३.३९
जरी समर्थ ब्रह्मतेजाने
। तरी अपूर्णत्वाची
जाणीव हृदयामध्ये । कारण श्रीहरिच्या भक्तिचे । निरूपण
केले नाही ।४.३१
ज्यामुळे श्रीहरी संतुष्ट होत नाही
। ते शास्त्र
ज्ञान पुर्ण नाही
। ते नक्कीच
पवित्र नाही । तिरस्करणीय आहे ।५.१०
ज्यामध्ये संदर रचना
नाही । ज्यामध्ये
साहित्यालंकार नाही । ज्यामध्ये श्रीहरीनामाची गोडी । ते पापनाशक
आहे ।५.११
जो श्रीहरि लीले शिवाय
। काही इच्छा
करी मनात । तो त्याच
इच्छेमुळे केवळ । जन्ममृत्युचक्रामध्ये पडतो ।५.१४
केवळ जिज्ञासु ज्ञानीपुरूष । संसार-भोगांचा
त्याग करून । आत्मज्ञान प्राप्त करून । आत्मानुभूती घेऊ शकतो
।५.१६
जी गोष्ट कोणत्याही
योनीमध्ये । कर्मफळाच्या
स्वरूपाने । केवळ ज्ञानाच्या सामर्थ्याने । कधीही
प्राप्त होत नाही
।५.१८
तपस्या वेदाध्ययन स्वाध्याय । साधनमार्ग
जरी अनेक । सर्वांचे उद्दीष्ट एकच । श्रीहरिच्या
लीलेचे चिंतन व्हावे
।५.२२
जरी प्रत्येक कर्म मनुष्याचे
। जन्ममृत्युचक्रामध्ये नेते । परंतु जे
कर्म समर्पित होते । कर्माचा अहंकार नष्ट
होतो ।५.३४
क्रूरतेने जो दुष्ट
पुरूष । उपभोगतो
दूसयांना मारून ।
त्याचा करणे वध
। हेच त्याच्यासाठी
कल्याणकारी ।७.३७
मुंडन करणे धन
घेणे । घरातून
हाकलून देणे । हा अधम ब्राह्मणाचा वधच आहे
। ब्राह्मणास शारीरिक वध नाही
।७.५७
सामान्यजन साध्या वेषात
। कलाकाराला पाहून ।
त्यास नाही ओळखू
शकत । तसेच श्रीहरिस जाणू शकत
नाहीे ।८.१९
गृहस्थ-धर्म पुर्ण केल्या
नंतर । संसारातून
विरक्त होऊन । करतो श्रीहरिस
हृदयी धारण । तो उत्तम
पुरूष आहे ।१३.२६
आत्मकल्याण साधणायाने । द्यूत
मद्यपान स्त्रीसंग हिंसा धन
यांचे । कधीही
सेवन करू नये
। रजोगुणी विकार ।१७.४१
अपराधी जरी सम्राट
। असला तरी
पापाचे प्रायश्चित । व्हावे
इतके कडक शासन
। अपराध पुन्हा
होणार नाही ।१९.२
स्कंध ।।२।।
हेच उद्दीष्ट मनुष्यजन्माचे । ज्ञानाने
किंवा भक्तिने । संपर्ण
जीवन असे बनवावे
। मृत्युसमयी श्रीहरिचे स्मरण होईल
।१.६
संसारातून विरक्तीने जो । मोक्षाची इच्छा करतो
। त्याच्यासाठी शास्त्रांचा निर्णय आहे
। त्याने नामस्मरण
करावे।१.११
मनुष्य भौतिक सुखासाठी
। जन्मभर धडपड
प्रसिध्दीसाठी । संपुर्ण
आयुष्य अहंकारासाठी । परंतु
कल्याण नाही ।१.१२
नामस्मरण नाही श्रीहरिचे
। त्याचे आयुष्य
व्यर्थ जाते । सूर्यदेव दररोज कालगतीने
। त्यांचे आयुष्य कमी
करतो ।३.१७
श्रीहरी सृष्टि निर्माण
करतो । प्रत्येक
प्राणीमात्रांमध्ये रहातो ।
इंद्रियेद्वारा विषयांचा भोगतो ।
तोच कर्ता करविता
।४.२३
जसे कोळी जाळे
तयार करून । त्यामध्ये होतो गुंग
। तसेच श्रीहरी
सृष्टि निर्माण करून । त्यामध्ये लीला करतो
।५.५
मनुष्यास आत्मतत्त्वाची । अनुभूती
होत नाही । तोपर्यंत देहाभिमान जात नाही
। मी-माझे हाच भाव
कायम रहातो ।५.१०
चित्त श्रीहरिमध्ये मग्न असते
। तेव्हा वाणी
सत्यवादी होते । मन सत्य
संकल्प करते । आणि इंद्रिये
वश रहातात ।६.३३
जे निष्कपटतेने आपले । सर्वस्व समर्पितात श्रीहरिमध्ये । त्यांनाच
मायास्वरूप उमजते ।
अनुभूती येते परमसत्याची
।७.४२
कर्मफळ श्रीहरी देतो । कारण तोच
सुक्ष्मरूपाने कर्म करतो
। तरीही कर्माचा
अहंकार होतो । केवळ महामाये
मुळे ।७.४९
शरीरात आत्मा नसेल
तर । नष्ट होते पंचभूताचे
शरीर । तरी आत्मा नष्ट
नाही होत । कारण आत्मा
अविनाशी ।७.४९
श्रीहरिसंकिर्तन करतो । श्रवण स्मरण
चिंतन करतो । आणि त्याचे
कौतुक करतो । तो मायेने
मोहित होत नाही
।७.५३
स्वप्नामधील घटनांशी । जागेपणी
संबंध नाही । तसेच आत्म्याचा
माये बरोबर संबंध
नाही । आत्मसाक्षात्कारानंतर
।९.१
आत्मा मायेमध्ये रमतो । त्रिगुणी प्रकृतीमध्ये गुंग होतो
। तेव्हा आत्मा
त्याचे स्वरूप विसरतो
। मानू लागतो
मी-माझे ।९.२
आत्मा मायेला सोडून
। स्वरूपामध्ये होतो मग्न
। तेव्हा संपतो
त्याचा मी-माझे हा भाव । तो पूणपणे गुणातीत
होतो ।९.३
सृष्टिच्या आधी फक्त
श्रीहरी । सृष्टिमध्ये
सर्वत्र श्रीहरी । सृष्टिच्या
नंतर सुध्दा श्रीहरी
। असा श्रीहरी
अलौकिक ।९.३२
खरे नाही परंतु
दिसते । भासमान
खरे वाटते ।
प्रत्यक्ष अनुभवता येते । ती सर्व
श्रीहरिची महामाया समजावीे ।९.३३
प्राणीमात्रांमध्ये आत्मारूपाने । श्रीहरी
त्यांच्या हृदयी आहे
। तरी परमतत्त्वानुसार
अलिप्त आहे । नित्यमुक्त निर्गुण ।९.३४
सर्वस्वरूप श्रीहरी सर्वकाळ आहे । हेच परमसत्य
आहे । हेच जाणण्याची आवश्यकता आहे । आत्मानुभूतीसाठी ।९.३५
श्रीहरिच्या प्रेरणेने त्रिगुणामध्ये । पंचभूते
अहंकार इंद्रिये । आणि महत्तत्त्व निर्माण होते । त्याला सर्ग
म्हणतात ।१०.३
श्रीहरिच्या विराटरूपा मधून । ब्रह्मदेव सृष्टि करी
निर्माण । असंख्य
विभिन्न चराचर ।
त्याला विसर्ग म्हणतात
।१०.३
काळाने नाश पावणारी
।
सृष्टिला मर्यादेने स्थिर करणारी
। जी श्रेष्ठता
आहे श्रीहरिची । त्याला
स्थान म्हणतात ।१०.४
सृष्टिमध्ये भक्तांवर कृपा । दीनांच्या रक्षणासाठी करूणा ।
पतितांच्या उध्दारासाठी दया । त्याला पोषण
म्हणतात ।१०.४
सत्त्वगुणाची वृध्दी करतो
। निष्काम भक्तिचे आचरण करतो
। धर्माचे अनुष्ठान करतो । त्याला मन्वन्तर
म्हणतात ।१०.४
मनुष्य विषयवासनांना भुलतो ।
कर्म करण्यास प्रवृत्त होतो । आणि कर्मबंधनमध्ये
अडकतो । त्याला
ऊति म्हणतात ।१०.४
श्रीहरिच्या अवतारकथा । भक्तांच्या
चरित्रकथा। विवीध पुराणातील
कथा । त्याला
ईशकथा म्हणतात ।१०.५
जेव्हा आत्मज्ञान होते । सर्वत्र श्रीहरी दर्शन होते
। आत्म्याचे परमात्म्यामध्ये मिलन होते
। त्याला निरोध
म्हणतात ।१०.६
अज्ञानयुक्त देहाचा अहंकार
। कर्माचा कुळाचा त्याग
करून । आत्मस्वरूपामध्ये
शांत । त्याला
मुक्ति म्हणतात ।१०.६
सृष्टिचा जो निर्माता
। पालन कर्ता
आणि संहारिता । ज्याच्या
तत्त्वामुळे चैतन्यता । त्या परब्रह्माला आश्रय म्हणतात।१०.७
स्कंध ।।३।।
उध्दव म्हणे विदुरास
। श्रीकृष्णाने आज्ञा केली
मैत्रैयजींस । उपदेश करण्याची
विदुरास । स्वधामगमनसमयी
।४.२६
अज्ञानी पुरूषांचे वर्तन खेदकारी
।
केवळ विनाशकारी । प्रारब्धानुसार
आत्मघातकी । म्हणून
श्रीहरिचे चिंतन नाही
।५.१४
काळ प्रत्येकाचे आयुष्य संपवितो
। अज्ञानी वाया घालवितो
। व्यर्थ वाद-विवाद
चेष्टा करतो । काया-वाचा-मनाने ।५.१४
दृष्य व दृष्टा
यांचे द्वारा ।
ब्रह्मांडाचा सर्व पसारा
। प्रकृतीच्या शक्तिने निर्माण झाला । तीच माया
कार्यकारणरूप ।५.२५
इंद्रियांच्या विषयभोगासाठी । सदैव धडपड त्यांची
। ते केविलवाणे
अज्ञानी । श्रीहरिपासून
हट्टाने दूर रहातात
।५.४४
ब्रह्मांडाची उत्पत्ती श्रीहरिच्या विराटरूपातून । म्हणूनच
सर्व ठिकाणी त्याचा
अंश । सर्वांचा
आत्मा तोच । परमात्मा ।६.८
सर्व इंद्रिये विषयमुक्त होतात ।
तेव्हा ती परमात्म्यामध्ये
स्थिर होतात ।
तेव्हा संपतात ।
राग-द्वेश-क्लेश देहाचे ।७.१३
जो अतिसूक्ष्म आहे आणि
। ज्याचे पृथकरण
करता येत नाही
। इतराशी संयोग
झालेला नाही । तो परमाणु
आहे ।११.१
दोन परमाणुंचा एक अणु होतो । तीन अणुंचा
एक त्रसरेणु होतो । जो सूर्यकिरणांमध्ये
दिसतो । हालचालताना
।११.५
श्रीहरिकथा सोडून ।
भौतिकसुखाचे चिंतन करतात
। ज्यामुळे बुध्दि होते
भ्रष्ट । हमखास
भोगतात नरकयातना ।१५.२३
आपल्या नोकराच्या अपराधाची । आपण स्वतः घेणे
जबाबदारी । दखल घ्यावी परिणामांची
। ही आहे विनम्रता ।१६.४
कर्माने धर्माचरण होत नाही
। वैराग्य प्राप्त होत नाही
। श्रीहरिभक्ति होत नाही
। तो मेलेल्या
सारखाच आहे ।२३.५६
अध्यात्मयोग हेच मनुष्याच्या
आत्यंतिक। कल्याणाचे
मुख्य साधन । ज्यामुळे संसारी सुख
दुःख । होतात
नष्ट ।२५.१३
मनुष्याचे मन हेच साधन । विषयासक्त
झाले तर जन्ममृत्युचे
बंधन । श्रीहरी स्वरूप झाले
तर । जन्ममरणमुक्ति
।२५.१५
चित्त श्रीहरी चरणी एकरूप
। तोच त्याचा
नित्य स्वभाव ।
तीलाच निष्काम भक्ति म्हणतात
। जी मुक्तिहुन
श्रेष्ठ ।२५.३२
अन्नाचे ज्याप्रमाणे । जठराग्निद्वारा
पचन होते । त्याचप्रमाणे कर्मसंस्काराचे भस्म होते
। निष्काम भक्तिद्वारा ।२५.३२
हे ब्रह्मांड ज्याने व्यापलेले
आहे । ज्याच्यामुळे
प्रकाशित होते । तोच परमात्मा
आहे । पुराणपुरूष
अनादि निर्गुण ।२६.३
निर्गुण परमात्म्याने त्रिगुण मायेचा ।
संकल्पाने स्विकार केला । ही आहे श्रीहरिचीच लीला । गुढ आणि
अगाध ।२६.४
सूर्य प्रतिबिंबास । पाण्याचे
गुण नाही चिटकत
। तसेच प्रकृतिच्या
कार्यामुळे परमात्म्यास । त्रिगुणाची
बाधा नाही ।२७.१
परंतु जेव्हा आत्मा
गुणरूप होतो। अहंकाराने
मोहित होतो। कर्माचे
कर्तेपणा मानु लागतो।
विसरतो आत्मस्वरूप ।२७.२
देहाभिमानामुळे कर्मबंधन होते। पुण्य-पाप
भोगावे लागते ।
आत्मस्वरूपाचा विसर पडतो।
म्हणून परमशांती नाहीै ।२७.३
स्वप्नामध्येे शोकाचे दुःख
होते । तसेच संसारामध्ये दुःख होते
। जरी ते भासमान असते
। हा प्रभाव
मायेचा ।२७.४
म्हणून बुध्दिमान मनुष्याने। विषयी चित्ताला
वश करावे। निरंतर
निष्काम भक्तिमार्गाने। समर्पित करावे श्रीहरिचरणी
।२७.५
निष्काम भक्तिने वैराग्याने। आणि चित्ताच्या
एकाग्रतेने। मनुष्याची वासना क्षीण
होते । लीन होते श्रीहरिचरणी
।२७.२३
ज्यास आत्मज्ञान झाले। श्रीहरिचरणी
चित्त ज्याचे। निरंतर एकरूप
झाले । त्यास
मायेचा कोणताच धोका
नाही ।२७.२६
सोने तापविल्याने ज्याप्रमाणे । निर्मळ
शुध्द होते । तसे योगी
प्राणायामाने । आपल्या
चित्त शुध्दी करून
घेतात ।२८.१०
आत्मानुभूती झाल्या नंतर
। नष्ट होतो
देहाभिमान । दिसणारे
व पहाणारा संपतो हा
भेद । एक परमात्मा सर्वत्र ।२८.३५
एकच अग्नि प्रकारांमुळे
। अनेक ठिकाणी
दिसतो तसे । एकच परमात्मा
गुणभेदामुळे । विवीधतेमध्ये
दिसून येतो ।२८.४३
गंगेच्या प्रवाहाला जशी । ओढ असते
समुद्राची । तसेच नामस्मरणाने
आत्म्याची । ओढ परमात्माकडे असते ।२९.१२
जो मूर्ख विषयासक्त
आहे। कुटूंबामध्ये आयुष्य व्यर्थ
जाते। त्यास कुटूंबाकडूनच
दुःख मिळते ।
त्यामुळे सुन्न होतो
।३०.१८
चित्त विषयासक्त ज्यांचे । जरी सात्विक कर्म केले
। जरी धर्माचे
अनुष्ठान केले । तरी श्रीहरिपासून
दूर आहेत ।३२.१६
स्कंध ।।४।।
देहाचा अहंकार करून
। श्रीहरिचा करतो द्वेष
। द्वैत मताचा
धरतो आग्रह ।
तो तत्त्वज्ञानापासून वंचित रहातो
।२.२१
अज्ञानाचे सदगुण होतात
। अवगुण कारण
ते अहंकार वाढवितात
। विवेकशक्ति नष्ट करतात
। सावध असावे।३.१७
आपल्याच व्यक्तिकडून जर । स्वतःचा अहंकार दुखावला
तर । तो मनुष्य होतो
बेचैन । दिवस-रात्र
तीच विवंचना ।३.१९
महापुरूषांची किर्ती पाहुन।
अज्ञानीच्या हृदयी संताप
। तिरस्कार आणि मत्सर
। जसे असूर
श्रीहरिचा द्वेष करतात
।३.२१
जरी सज्जन पुरूष
। दुष्टांच्या निंदेकडे लक्ष देत
नाहीत । तरी दुष्टांचे नष्ट होते
तेज । सज्जनांच्या
चरणधूळीनेे ।४.१३
जे भेदबुध्दिने कर्मामध्ये आसक्त आहेत
। त्यांचा वध करणे
नाही उचित । कारण ते
मृतवत असतात ।
अज्ञानामुळे ।६.४७
जो स्वतःमध्ये व परमात्म्यामध्ये
भेद। नाही मानत
। तो आहे श्रीहरिस अतिप्रिय । भेद-बुध्दीनेच
विभिन्नता येते ।७.३८
मनुष्यदेह । मिळाल्यावर
मायेने भुलून ।
मी-माझे असा करतो
अहंकार । आणि स्वजनांकडून तिरस्कृत होतो।७.४४
मनुष्य अवयवांस । वेगळे
नाही मानत । त्याचप्रकारे भक्त इतर
प्राणीमात्रांस । श्रीहरिपासून
भिन्न समजत नाही
।७.५३
मिळेल त्यात समाधान
मानणे । प्रारब्धानुसार
सुख-दुःख मिळते ।
त्यातच संतुष्ट रहाणे ।
त्यानेच संसार पार
होतो ।८.३३
आपल्याहुन अधिक गुणवंताची।
स्तुती करावी। कमी
गुणवंतावर दया करावी।
मैत्री करावी समान
गुणवंतांबरोबर ।८.३४
जर मनुष्यास इंद्रियभोगाचे। वैराग्य निर्माण झाले । मोक्ष प्राप्तिसाठी
तरच त्याने ।
श्रीहरिचे भक्तिपुर्वक भजन करावे।८.६१
श्रीहरिचरणांचे ध्यान करून।
प्राप्त होतो जो
आनंद। तो आत्मानंदामध्ये
ही नाही मिळत
। केवळ अलौकिक
आहे ।९.१०
जसे औषधाने रोग
शांत । केला जातो तसेच
। आपले तत्त्वज्ञान
मनुष्याचा क्रोध ।
शांत करण्यासाठीच आहे ।११.३१
जे शांत स्वभावी
आहेत । समदर्शी
धर्मनिष्ठ आहेत । सर्वांप्रति प्रेम करतात
। ते सहजपणे
वैकुंठ प्राप्त करतात ।१२.३७
काया-वाचा-मनाने । आणि बुध्दिने धर्माचे आचरण केले
। तर तोच धर्म मनुष्याचे
। अंतिम उद्दिष्ट
साधून देतो ।१४.१५
सामान्य मनुष्यास आपल्या वाईट।
कर्मांची चर्चा नाही
आवडत। तसे समर्थ
पुरूषास। स्वतःची स्तुति आवडत
नाही।१५.२५
शत्रुस विनाकारण शिक्षा नाही।
अपराधी पुत्रास क्षमा नाही।
स्वैराचार करीत नाही।
जो राजा धर्मनिष्ठ
आहे ।१६.१३
जो दुष्ट स्वार्थी
आहे। दुसयांसाठी निर्दयी आहे। त्याला
ठार मारणे। हे
न मारण्यासारखेच केवळ राजासाठी
।१७.२६
जो अज्ञानी शास्त्रांचा अनादर ।
करून मनोकल्पित उपाय । यांचा करतो
आग्रह । सर्व प्रयत्न निष्फळ त्याचे।१८.५
ज्ञानी पुरूष देहाला
। अविद्या वासना कर्माचा
पुतळा । असे समजून त्याचा
। मोह न करून आसक्त
होत नाही।२०.५
जो मनुष्य देहासक्त
नाही । तो देहाशी संबंधीत
घर पुत्र पत्नी।
आणि धन यांचा
मोह आसक्ति ।
कशासाठी करील ।२०.६
आत्मा एक शाश्वत
आहे । स्वयंप्रकाश
निर्गुण आहे । सर्वव्यापक आवरणशून्य आहे । म्हणून मनुष्य
शरीराहुन भिन्न ।२०.७
जो शरीरातील आत्म्यास । भिन्न
जाणतो शरीराहुन । मायेचा
धोका नाही त्यास
। जरी मायेशी
संबंध आला तरी
।२०.८
जो प्रजेस धर्माचा
उपदेश । करीत नाही करतो
कर वसूल । तो प्रजेच्या
पापाचा भागीदार । आणि धनहीन होतो
।२१.२४
जेथे निष्काम भक्तांचा कधीही। सत्संग
होत नाही । त्या घरामध्ये
संपन्नता असुनही ।
ते घर सर्पवृक्षा
समान आहे ।२२.११
सर्व शास्त्रांमध्ये मनुष्य कल्याणाचा
। अनेक प्रकारे
विचार केला । त्यामध्ये वैराग्याचा । उपदेश
आवश्यक आहे ।२२.२१
देहाभिमान आहे । तो पर्यंत
इंद्रिय विषय आहे
। कर्माचा अहंकार आहे
। परंतु आत्मज्ञान
झाल्यावर नाही ।२२.२८
धन इंद्रिय विषयांचे चिंतन ।
केल्यामुळे होतो आत्मनाश
। कारण त्याने
होते बुध्दि भ्रष्ट
। पुनर्जन्मी शक्यता नाही
।२२.३३
सूर्य सर्वत्र प्रकाश देतो।
परंतु गुणदोष घेत
नसतो। तसे योगी
विषयभोग घेतो। परंतु
त्यामध्ये आसक्ती नाही
।२२.५२
स्कंध ।।५।।
दोरीने बांधलेले जनावर ।
वाहते मनुष्याचा भार । तसे कर्मबंधनाने
मनुष्य । श्रीहरिच्या
इच्छे प्रमाणे कर्म करतो
।१.१४
जो इंद्रियांच्या आहारी जातो
। विषयसुखासाठी धडपडतो ।
मृत्युला घाबरतो ।
कारण मृत्यू पाठलाग
करतो ।१.१७
षडविकार नको त्याने
। त्यांचा विरोध करणे
। इंद्रियनिग्रहाचा प्रयत्न करणे । करीत रहाणे
षडविकार संपे पर्यंत
।१.१८
मनुष्य-शरीर विषयभोगासाठी नाही । तप करण्यासाठी
।
अंतःकरणाच्या शुध्दीसाठी । त्यानेच ब्रह्मानंद प्राप्त होतो ।५.१
अध्यात्मशास्त्र सांगते ।
सद्गुरू सेवेने मुक्ति
मिळते । स्त्रीसंग केल्यास नरकात जावे
लागते । महापुरूष धर्मनिष्ठ
।५.२
आत्मतत्त्वाची जिज्ञासा नाही । तोपर्यंत देहाभिमान जात नाही
। कर्मबंधनातून मुक्ति नाही
। कर्मवासना टिकून रहाते
।५.५
वासनेने पुन्हा कर्माची
इच्छा । असे कर्मबंधन धरी आशा
। कर्मफळातून नाही सुटका
। पुन्हा जन्ममरण
देहबंधनाने ।५.६
जेव्हा कर्मवासना पुर्णपणे संपतात ।
तेव्हा कर्मबंधने संपतात ।
इंद्रिये शांत होतात
।
देहाचा अहंकार गळून
पडतो ।५.९
कर्मबंधनास शास्त्रीय साधनांने । मुक्त
केले पाहिजे ।
कारण हेच मूळ
कर्मसंस्कारांचे । त्यानंतर
साधनांचा त्याग ।५.१४
कशामध्ये आपले कल्याण
। हेच नाही
समजत । म्हणून
भौतिक उपभोगामध्ये समाधान ।
ज्यात क्षणिक सुख
।५.१६
जो मृत्युपासून सुटका करू
शकत नाही । तो गुरू
नाही पति नाही
। पिता नही
इष्टदेव नही । जरी असले
तरी ।५.१८
ब्रह्मांड श्रीहरिचे विराट रूप
आहे । सर्वत्र
तो स्थित आहे
। म्हणून सर्व
प्राणिमात्रांची सेवा करणे
। हीच पूजा
।५.२६
सतत विषयभोगाने अज्ञान ।
अज्ञानामुळे अंधःकार । परिणाम
विवेकबुध्दि नष्ट । त्यांच्यासाठी उपदेश आत्मज्ञानाचा
।६.१९
साधु शांत स्वभावाचे
असतात । शरणागताचे
रक्षण करतात ।
स्वतःची पर्वा नाही
करीत । धन्य ते सज्जन
।८.१०
आत्मज्ञानानंतर गरम-थंड । मान-अपमान
यांचे सुखदुःख । होत नाही कारण
देहाचा विसर । हे विकार
शरीराचे ।९.९
स्थूल कृश व्याधि
भूख । भिती अभिमान इच्छा
तहान । वृध्दपण
निद्रा प्रेम क्रोध
।
हे सर्व विकार
देहाभिमानीचे ।१०.१०
राजा प्रजेने नेमलेला नोकर । प्रजेसाठी
करणे राज्यकारभार । राजधर्माचे
करावे आचरण । ही श्रीहरिची
सेवा ।१०.२३
मनुष्याचे मन नियंत्रीत
आहे । तोपर्यंत
निष्काम कर्म होते
। कर्मेंद्रियेंद्वारा सहज कर्म
होते । त्यामध्ये
अहंकार नाही ।११.४
मनुष्याचे मन वासनामय
। विषयासक्त त्रिगुणात्मक । शरीराच्या
उपाधिमुळे मतभेद ।
चांगले आणि वाईट
असे ।११.५
मन कर्मबंधनाचे कारण । मन त्रिगुणात्मक
प्रकृतीचे कारण । गुणातीत
झाले तर मोक्षाचे
कारण । मानतात
योगी ।११.७
विषयासक्त मन मनुष्यास
। घालते संसारबंधनात
। तेच मन विषयहीन झाल्यावर । त्यास
मोक्षपद प्राप्त करून देते
।११.८
मनुष्य मायेचा त्याग
करून । सर्व आसक्ति सोडून
। आत्मतत्त्व नाही जाणत
। तोपर्यंत जन्ममृत्यू चालू रहातो
।११.१५
खरा शत्रु मनुष्याचे
मन । उपेक्षा
केली तरी बलवान
। म्हणून श्रीहरिच्या
उपासनेने । नियंत्रित
करावे मनाला ।११.१७
मनुष्यदेह पृथ्वीपासून बनला आहे
। सृष्टि पृथ्वीपासून
उत्पन्न होते । पृथ्वीमध्ये नाश पावते
। परंतु आत्मा
शाश्वत ।१२.८
वेदाध्ययन तपसाधना अन्नदान । वैदिककर्म
धर्मानुष्ठान । केवळ या साधनांनी
आत्मज्ञान । प्राप्त
होत नाही ।१२.१२
आसक्त मनुष्यास मायेने ।
कर्मठ कर्मकांडामध्ये गुंतविले । म्हणून
स्वभाव त्रीगुणी बनले । कर्मामध्ये भेदभाव झाले
।१३.१
मनुष्यजन्म श्रेष्ठ आहे । सत्संगाचे ज्ञान नाही
इतर योनिमध्येे । ते सुख नाही
देव योनिमध्ये । कारणी
लावावा ।१३.२१
अगाध आहे श्रीहरिलीला
। कोण जाणणार
अंत त्याचा ।
मनाने वाणीने तरी
कसा । म्हणून
विशेष लीलांचे वर्णन ।१६.४
सत्वगुणांमुळे माया-स्वरूप । मनुष्यास
जाणता येईल । परंतु मायामुक्त
होण्याचा उपाय । साधा सोपा
नाही । १७.२४
श्रध्दा आणि स्वभाव
त्रिगुणी । यांच्या
भेदामुळे कर्मांची गती । निर निराळ्या प्रकारची । मिळते
कर्माच्या कर्त्याला ।२६.२
पाप करणायांची । श्रध्दा कमी आधिक
झाली । समान फळ मिळत
नाही । म्हणून
हजारो प्रकारचे नरक आहेत
।२६.३
स्कंध ।।६।।
पापाचे प्रायश्चित्त करावे ।
जसे वैद्य मनुष्याच्या
रोगाचे । कारण जाणून घेतल्यामुळे
। झटपट उपाय
करतो ।१.८
कर्माने कर्माचा नाश नाही
। कारण कर्माचा
अधिकारी अज्ञानी । म्हणून
उपाय कर्म नाही
। तर तत्त्वज्ञान
आहे ।१.११
दारूला तिर्थाने पावित्र्य येत नाही
। तसे प्रायश्चित्त
करून ही । जो श्रीहरिचा
नाही । तो पापमुक्त होत नाही
।१.१८
पूर्वजन्मानुसार । पाप-पुण्यमय
संस्कारा नुसार ।
धारण करतो शरीर
। वासने प्रमाणे
स्त्री पुरूष जन्म
मिळतो ।१.५४
संसारबंधनातून मुक्त होण्याची
। इच्छा आहे
त्यांच्यासाठी । श्रीहरिनामा
शिवाय गत्यंतर नाही । पापनाशक आहे ।२.४६
मनुष्यासाठीएकच कर्तव्य आहे । श्रीहरी नाम-किर्तन करावे ।
श्रीहरिस सर्वस्व द्यावे ।
श्रीहरी चरणी भक्ति
करावी ।३.२२
विद्वानांची बुध्दि मायेने
। मोहित होऊन
कर्मकांडामध्ये । गुरफटून
नामाचे माहात्म्य विसरते ।
जे सहज सोपे
आहे ।३.२५
महापातकांचे सर्वोत्तम प्रायश्चित्त । आहे श्रीहरिसंकिर्तन । एकचित्ताने
श्रवण । आणि चिंतन स्मरण
मनन श्रीहरिचे ।३.३१
जे श्रीहरिस मानीत नाही
। विवेकबुध्दि चालत नाही
। त्यांनी प्रायश्चित्त घेतले तरी
। ते दोषमुक्त
होत नाही ।३.३३
जे शब्दामध्ये व्यक्त होते
। मन बुध्दि
इंद्रियांना जाणवते ।
ते श्रीहरिचे स्वरूप नसते
। कारण श्रीहरी
निर्गुण आहे ।४.२९
श्रीहरी सर्वांच्या हृदयी असतो
। स्वभावा नुसार दिसतो
। भिन्न देवतेमध्ये
प्रगट होतो । जसे हवा
सुगंधित जाणवते ।४.३४
मनुष्याची बुध्दि व्यभिचारिणी
। स्त्री समान
असून तीची । विवेकाने पारख केली
नाही । तर व्यर्थ अशांती
वाढते ।५.१४
दुध पाणी वेगळे
करतो हंस । तसे आत्मज्ञान
बंधन आणि मोक्ष
। यांचा वेगळा
अनुभव । विज्ञानाने
जे शक्य नाही
।५.१८
विषयाचा अनुभव करून
। त्याचा त्याग
आपणहुन । ते वैराग्य खरे जाणिवेतून
। जे कितीही
सांगून होत नाही
।५.४१
या विश्वामध्ये जे दिसते
। ते सर्व
प्रत्यक्ष श्रीहरी आहे । हे परमसत्य
उमजते । तेव्हा
सर्व विकार नष्ट
होतात ।८.३१
श्रीहरी सर्वत्र वस्तुत्वाच्या रूपात ।
सुक्ष्म रूपाने आहे
विराजमान । सर्वांचा
मायबाप । अंतर्यामी
अधिष्ठानस्वरूप ।९.३८
जो जाणतो स्वरूप
। तो अज्ञानी
मनुष्यास उपदेश ।
करतो ज्ञानाचा केवळ । जसे वैद्य
रोगीस पथ्य सांगतो
।९.५०
घर धन जन शरीर । सर्व काही
क्षणभंगुर । आपल्या
कधीच कामी नाही
येत । अंतसमयी
दुसयांच्या कामी येते
।१०.१०
दोन प्रकारचे मृत्यु श्रेष्ठ।
एक योग्याप्रमाणे शरीरत्याग। दुसरा युध्दभूमिमध्ये
बलिदान । असे मरण यावे
।१०.३३
यश-अपयश जय-पराजय । सुख-दुःख यात । इच्छा न
ठेवता सर्वकाळ । सारखाच
भाव राखता आला
पाहिजे ।१२.१४
श्रीहरी स्वरूप होतो
। त्यास उपभोगाची
अपेक्षा नसते । जो सागररूप
असतो । घागरीच्या
पाण्याची आशा नाही
।१२.२२
जसे पाण्याच्या हेलकाव्याने । जवळ-दूर
होतात कण वाळूचे
। तसे जन्म-मरण
मनुष्याचे । काळाच्या
प्रवाहात होते ।१५.३
स्त्री-पुत्र घर-धन नोकर
। सत्ता हितचिंतक
। हे सर्व
मिळाले तरी होते
दुःख । कारण ते सर्व
अनित्य आहे ।१५.२१
या अनित्य गोष्टीं
शोक मोह। दुःखाचे
आहे कारण । मनाचे आहेत
खेळ । कल्पित
मिथ्या जादूमय सर्वदा।१५.२३
मनुष्ययोनि ज्ञानाचे कारण । परंतु आत्मस्वरूपाचे
ज्ञान । करून घेत नाही
त्यास । कोणत्याही
योनिमे शांती नाही।१६.५८
सुखासाठी श्रम कष्ट
आहेत । याचा विचार करून
। कोणत्याही कर्मफळाची हाव । धरू नये
त्यात आसक्ति नको
।१६.५९
योगमार्गाचे तत्त्व जाणण्यास
। समर्थ आहे
त्याने करावा निश्चय
। परमात्मा आत्म्याचे मिलन । याची अनुभूती
।१६.६३
जे श्रीहरिस शरण जातात
। ते कधीही
भीत नाहीत ।
कारण ते सर्वांस
श्रीहरिस्वरूप पहातात ।
सर्व ब्रह्मांडामध्ये ।१७.२८
स्त्रियांचे चरित्र कोण
जाणेल । कमळाप्रमाणे
त्यांचे मुख । अमृतसमान मधुर वचन
। अंतःकरण तीक्ष्ण धारदार ।१८.४१
स्त्रिया आशाळभूत असतात ।
प्रेम करीत नसतात
। भाऊ पति
पुत्र यांस । मारतात किंवा
मारून घेतात ।१८.४२
स्कंध ।।७।।
लाकडात अग्नि असतो
। प्रज्वलीत केल्यावर प्रगटतो । तसे परमात्मा ह्दयी असतो
। परंतु आत्मशोधाने
समजतो ।१.९
निंदा स्तुति सत्कार
तिरस्कार । सगळे शरीराचे विकार ।
प्रकृति आणि पुरूष
यांत विवेक। न
केल्यामुळे होतात ।१.२२
शरीरालाच आत्मा मानतात।
तेव्हा माझे-तुझे हा भेदभाव
। शरीराच्या भिन्नतेने होतो निर्माण
। तेच कारण
आहे ।१.२३
श्रीहरिचे चिंतन करावे
। शत्रुत्वाने भक्तिने भितीने ।
स्नेहाने किंवा इच्छेने
। चित्त एकरूप
व्हावे श्रीहरिचरणी । १.२५
आत्म्यास शरीर समजणे
। हेच घोर
अज्ञान आहे । त्यामुळे कर्मबंधन होते । परिणाम जन्म-मरण चालू रहाते
।२.२५
मनष्य आपल्या घरास
। समजतो वेगळे
व मातीचेच । तसे मनुष्याचे शरीर । मातीसमान आत्म्यापासून वेगळे आहे
।२.४२
म्हणून आत्मज्ञानी नाशिवंत । शरीरासाठी
शोक नाही करीत
। आत्म्यासाठी जो शाश्वत
। तरी शोक
कशासाठी ।२.४९
जो कोणी करतो
द्वेष । देवता
श्रीहरी गाय ब्राह्मण। साधु धर्म आणि
वेद । यांचा
लवकरच त्याचा विनाश
होतो ।४.२७
ज्याची बुध्दि मोहग्रस्त
आहे । त्यास
श्रीहरिच्या महामायेमुळे । दुराग्रह
होतात खोटे । आपले परके
हा भेदभाव ।५.११
समर्पण भावनेने जर श्रीहरिचरणी
। नवविधा भक्ति
केली । तेच अध्ययन समजणारी
। संस्कृती आज झाली
पाहिजे ।५.२४
मनुष्यजन्म दुर्लभ आहे
। यातच आत्मज्ञान
होऊ शकते । अंत कधीही
शक्य आहे । म्हणून साधना
सुरू करा ।६.१
जो इंद्रिय सुखास सर्वस्व
मानतो । तो कर्मबंधनामध्ये अडकतो ।
केवळ अकल्याण साधतो ।
हे मर्म जाणून
घ्यावे ।६.१३
जो आपल्या स्त्री
पुत्रांमध्ये गुंगतो ।
तो अमूल्य आयुष्य
व्यर्थ घालवितो । जिवनाचे
सार्थक विसरतो ।
बोध घ्यावा ।६.१४
श्रीहरिच्या प्रसन्नतेसाठी । कठोर परिश्रमाची गरज नाही
। कारण तो
प्रत्येकाच्या हृदयी ।
असून त्यास जाणावे
।६.१९
अज्ञानाचा त्याग करून
। दया सर्व
प्राणिमात्रांवर । निरपेक्ष
प्रेम करावे त्यांच्यावर
। त्यानेच श्रीहरी प्रसन्न होतो ।६.२४
खाणीतून सोने मिळवितात
। तसे आत्मज्ञानी
मनुष्य शरीरातून । परमात्म्यास
जाणून घेतात ।
त्याचा प्रयत्न करावा ।७.२१
आत्मा सर्वत्र स्थित आहे
। परंतु सर्वांहुन
अलिप्त आहे । याचा विचार
शुध्द बुध्दिने । क्रमाक्रमाने
दृढता येते ।७.२४
गंधामुळे ज्ञान वायुचे
। तसे बुध्दिच्या
या अवस्थामुळे । जागृत-स्वप्न-सुषप्ति
यामुळे । साक्षीरूप
आत्मास जाणावे ।७.२६
कर्म करण्याची कारणे ।
सुख मिळविणे दुःख घालविणे
। परंतु विषयी
इच्छेमुळे । सर्वदा
दुःखच भोगावे लागते
।७.४२
मनुष्य शरीरासाठी । कर्म करतो तेच
त्याचे नाही । ते शाश्वत
नाही । आत्म्या शिवाय कुत्र्यांचे
खाद्य आहे ।७.४३
शरीराची ही दशा आहे । तर शरीराचे
संबंधीत सगळे । स्त्री पुत्र
धन संपत्ती नोकर हे
। शरीराबरोबर नष्ट होतात
।७.४४
अपेक्षा करतो तो
सेवक नाही । जो मालक
बनण्याची । इच्छा
करतो तो मालक
नाही । कर्मफळाची
आसक्ति नको ।१०.५
आपल्या स्वभावाला अनुसरून । करतो स्वधर्माचे आचरण । तो क्रमाक्रमाने
करी कर्मफल त्याग।
गुणातीत होतो ।११.३२
आकांक्षा भोगल्या शिवाय ।
कधीच पुर्ण नाही
होत । त्यामुळेच
कर्मबंधन होतात ।
जन्म-मरणाचे चक्र चालू
रहाते ।१३.२३
मनुष्याने फक्त घरासाठी।
आवश्यक वस्तुंची इच्छा करावी
। त्यापेक्षा अधिक ममता
नसावी । मनात वैराग्य असावे ।१४.५
मनुष्यास उत्पन्नाचा हक्क आहे
। ज्यामुळे त्याची भूख
भागते । त्यापेक्षा
अधिक मिळविणारे । चोर असून शिक्षापात्र
।१४.८
स्त्रीसाठी जो । आई वडिल
गुरू यांना मारतो
। त्या स्त्री
विषयी जो मोह सोडतो ।
तो जिवनात यशस्वी
होतो ।१४.१२
संकल्प-त्यागाने कामवासनेला । वासना-त्यागाने
क्रोधाला । संपत्तीच्या
त्यागाने लोभाला ।
जिंकून उध्दार करावा
।१५.२२
अध्यात्मविद्येने शोकावर ।
उपासनेने ढोंगावर । मौनाने
हिंसेवर नियंत्रण । मिळविता
आले पाहिजे मनुष्याला
।१५.२३
भौतिक दुःखाला दयेने ।
वेदनेला समाधियोगबलाने । निद्रेला
सात्विक भोजनाने । जिंकण्याचा
प्रयत्न करावा ।१५.२४
सत्वगुणाने रजोगुण व
तमोगुणावर । उपरतिने
सत्वगुणावर । आणि गुरूभक्तिने सर्व दोषांवर
। विजय मिळवावा
।१५.२५
स्कंध ।।८।।
विश्व निर्माण ज्याच्या संकल्पाने । त्यामध्ये
चैतन्य ज्याच्या स्पर्शाने । तरीही
जो अलिप्त आहे
। तो आहे परमात्मा ।१.९
सर्वत्र श्रीहरी विश्वामध्ये । सुक्ष्मरूपाने
सर्व प्राणीमात्रांमध्ये । म्हणून
आसक्ति नको त्यामध्ये
। हे सर्व
काही त्याचेच ।१.१०
वस्तुमध्ये मोह नको
। कशाचीही आस्क्ति नको । इंद्रियसुखासाठी
उपभोग नको । केवळ जीवन
निर्वाहासाठी ।१.१०
श्रीहरी कर्म करतात
। परंतु ते
आत्मतृप्त असतात ।
कर्मामध्ये आसक्त नसतात
।
त्याचे अनुकरण केले
पाहिजे ।१.१५
विश्व श्रीहरी मध्ये स्थित
आहे । त्याच्या
आधिष्ठानाने दिसते ।
तोच या विश्वामध्ये
व्याप्त आहे । कार्यासाठी प्रगटतो ।३.३
श्रीहरी सर्वांचे कारण आहे
। तो आदिकारण
आहे । तो शास्त्रांचे तात्पर्य आहे । त्याला विकार
परिणाम नाही ।३.१५
लाकडामध्ये अग्नि शांत
असतो । तसे मायेमध्ये श्रीहरी गुप्त असतो
। जो हे ज्ञान अनुभवतो
। तो ज्ञानवंत
आहे ।३.१६
जसे दयाळु मनुष्य
फसलेल्याची । सुटका
करतो त्याची ।
तसेच श्रीहरी शरणागतांची । अवश्य
मुक्तता करतात ।३.१७
जो आसक्त आहे
। शरीर पुत्र
गुरूजन यामध्ये । गृह, संपत्ति स्वजनांमध्ये । त्यास
श्रीहरी प्राप्ती कठिन आहे
।३.१८
श्रीहरी काही साधारण
नाही । केवळ असाधारण नाही । गुण कर्म
कार्य कारण नाही
। श्रीहरी सर्वकाही आहे ।३.२२
योगीजन योगाद्वारे । कर्म कर्मवासना कर्मफळाचे । भस्म करून निर्मल
हृदयामध्ये । श्रीहरिचा
साक्षात्कार करतात ।३.२७
विषयांच्या लोभासाठी । कष्ट मानसिक त्रास
त्यासाठी । केवळ क्षणिक सुखासाठी
। अनेकदा अपयश
मिळते ।५.४७
परंतु जे कर्म
श्रीहरिस समर्पित होते । तेव्हा सुख
मिळते । कारण काही अपेक्षा
नसते । कर्त्याचा
अहंकार नसतो ।५.४७
जोपर्यंत भाग्योदय नाही । तोपर्यंत
शत्रुशी संधि करावी
।
भाग्योदयाची वाट पहावी
। त्यामध्येच कल्याण आहे
।६.१९
प्रथम कशाचीही मनुष्याने । अपेक्षा
इच्छा करू नये
। आणि केलीच
तर अपेक्षाभंगाने । संताप
करून घेऊ नये
।६.२५
जेथे शक्ति सामर्थ्य
आहे । त्याचे
जीवन सफळ होते
। दुसयाचे दुःख जर
त्याने । सहन करून त्याचे
रक्षण केले ।७.३८
मनुष्य स्वतःसाठी जे काही
करतो । कर्माने मनाने शरीरासाठी
करतो । ते सर्व काही
व्यर्थ होते । कारण भेदवृत्ति
।९.२९
ज्ञानीजन कालगतिला ओळखून ।
विजयाने आनंद नाही
होत । पराजयाने
दुःखी नाही होत
। हा विचार
धरावा ।११.८
जो दान करण्याच्या
वेळी । भितो याचकास पाहुनी
। शत्रुच्या ललकारीला भितो युध्दप्रसंगी
। तो वंशघातकी
आहे ।१९.४
भौतिकसुखाचे असंख्य विषय
आहेत । ते सर्व असमर्थ
तृप्त होण्यास । जर मनुष्य इंद्रियाधिन
। समाधानी नाही ।१९.२१
इंद्रियाधिन आहे । त्यास सर्व
मिळाले तरी दुःखी
आहे । कारण हृदयात असंतोष
आहे । व्हावे
समाधानी ।१९.२४
असमाधान जन्ममृत्युचे कारण । समाधान हे
मुक्तिचे कारण । अभ्यासावे स्वभावाचे कारण । त्यानेच उध्दार होतो
।१९.२५
स्त्रियांना प्रसन्न करताना ।
विनोद करताना ।
स्वतःचे गाईचे ब्राह्मणाचे
रक्षण करताना ।
असत्य निंदनीय नाही।१९.४३
शुध्द अंतःकरणाने । पुजा करतो केवळ
पानाने । तीच खरी पूजा
असते । त्यामुळे उत्तम गति
प्राप्त होते त्याला
।२२.२३
जेथे श्रीहरिची कृपा । त्यावर लक्ष्मीची
अवकृपा । कारण ल्क्ष्मीच्या मायेने होई
आंधळा । सर्वांचा
तिरस्कार करतो ।२२.२४
परंतु जेथे लक्ष्मी
आहे । कुलिनता
कर्मयोग रूप विद्या
आहे । विनम्र
श्रीहरिचा परम भक्त
आहे । ती आहे श्रीकृपा
।२२.२६
आत्मज्ञानाच्या अज्ञानामुळे । महामायेच्या
प्रभावामुळे । झाकले
गेले आहे । म्हणून तो
अनेक विकारांनी दुःखी ।२४.४६
वासनेच्या बंधनामध्ये । देहाभिमानात
क्षणिक सुखाच्या आशेमध्ये । आपल्याच
भ्रमामध्ये । जाण नाही श्रीहरिची
।२४.४७
अज्ञानी कर्मबंधनाने । रजोगुणी
धार्मिक अनुष्ठानाने । कर्मठ
अहंकारी आचरणाने । केवळ अज्ञान वाढवित
असतो ।२४.४७
सोने अग्नितून शुध्द होते
। तसे भक्तिने
हृदय निर्मळ होते
। अंतःकरण शुध्द होते
। तेव्हा आत्मज्ञान
होऊ शकते ।२४.४८
श्रीहरी प्रसन्न होण्यासाठी नामस्मरण । त्याच्या
लिलेचे संकिर्तन । चिंतन
भजन करावे निरंतर
। सर्वस्व समर्पित करावेे ।
स्कंध ।।९।।
अतुलनिय ऐश्वर्य संपत्ति अमाप । असले तरी
ते स्वप्नवत । कारण ते आहे नाशिवंत । काही काळापूरतेच आहे ।४.१५
भक्ति करावी सर्वांगाने
। चिंतन मनात
भजन वाणीने ।
मंदिराची सेवा हाताने ।
कानाने श्रीहरिकथा श्रवण ।४.१८
डोळ्याने श्रीकृष्णरूप । तुलसीगंधाचा
घ्यावा वास । ग्रहण करावा
श्रीहरिचा प्रसाद ।
हरिभक्तांना अलिंगन द्यावे
।४.१९
तीर्थयात्रा करावी साधकाने
। श्रीहरिस नमन करावे
। निरपेक्ष कर्म करावे
। श्रीहरिस समर्पित करावे सर्वस्व
।४.२०
श्रीहरी भक्तांच्या अधीन । स्वतंत्र नाही भक्तांवर
निरंतर प्रेम ।
भक्तांच्या हृदयी निवास
। जन्मांतरीचे अतूट नाते
।४.६३
परमभक्तांचा एकमात्र आश्रय ।
त्यांंना इतरत्र नाही
रस । श्रीहरिशिवाय
त्यांना सर्व निरस
। ही त्यांची
मनोधारणा ।४.६४
जसे सती पातिव्रत्याने
। पतिला वश
करते । तसे निष्काम भक्त दृढभक्तिने
। श्रीहरिला प्रेमबंधनामध्ये आणतात ।४.६६
भक्त हेच श्रीहरिचे
हृदय । तर स्वतः श्रीहरी
निष्काम भक्तांचे हृदय । श्रीहरिप्राप्ती हेच ध्येय
। अशी भक्ति
करावी ।४.६८
अगाध महिमा
भक्तांचा। प्राणघातकांस करी क्षमा।
त्यांच्यासाठी करी मंगल कामना
। कारण हृदय उदार
आहे ।५.१४
मोक्षाची इच्छा आहे
। त्याने भोगाचा
त्याग करणे । इंद्रियंावर काबू मिळविणे
। साधुसंतांची सेवा अवश्य
करावी ।६.५१
जीवन एक खडतर
प्रवास । पुर्ण
करणे अतिकठिण । परंतु
ज्यास झाले आत्मज्ञान
। तो सहज पुर्ण करू
शकतो ।८.१४
अज्ञानाचे कारण । तो मायावी
विश्वामध्ये होतो गुंग
। हृदयातील आत्म्यास नाही जाणत
। तेच परमसत्य
आहे ।८.२३
विश्व श्रीहरिची माया आहे
। त्यालाच सत्य समजणे
। काम लोभ
ईर्ष्या मोहाने ।
चित्त शरीरामध्ये अडकते ।८.२६
पृथ्वीवर गंगा येताना
स्वर्गाहून। गंगाजलाचा वेग प्रचंड
। सौम्य केला
नाही तर । भूमीच्या पोटात पाताळात
जाईल ।९.४
महादेवाच्या मस्तकी धारण
। गंगेचा वेग
झाला साधारण । ब्रह्मनिष्ठांनी पुन्हा केले
पावन । हा आहे गंगामहिमा
।९.६
जीवन पुरूषार्थ साधण्यासाठी । धर्म-अर्थ-काम-मोक्ष
साधण्यासाठी । आत्मसाक्षात्कारासाठी
। सार्थकी लावावा ।९.२८
मन विषयासक्त आहे । रजोगुणी तमोगुणी असते । ते जरी सत्त्वगुणी असले । तरी आत्मस्वरूपाचे
ज्ञान होत नाही
।९.४६
श्रीहरी अतिसूक्ष्म आहे । शून्य नाही
शून्याप्रमाणे आहे । तो ब्रह्मांडाचे
परमसत्य आहे । तोच आहे
साक्षात परब्रह्म ।९.४९
एक दिवस शरीर
। अवश्य नष्ट
होणार । म्हणून
योगी शरीरामध्ये आसक्त नसतात
। त्यांचे ध्येय जन्ममरण
मुक्ति ।१३.९
स्त्री निर्दय असते
।
क्रूरता ही प्रवृत्ति
स्वाभाविकपणे । थोड्या
स्वार्थासाठी घात करते
।
पतिचा भावाचा सुध्दा
।१४.३७
राजसत्ता हे राजभोगाचे
मायाजाल । त्यामध्ये
डावपेंच । सतत राजकारण । वैयक्तिक
उध्दारासाठी वेळ नाही
। १८.२
पिताच्या कृपेने शरीर
मिळते । खरे तर ते पित्यानेच दिलेले ।
पित्याचे उपकार आहे
। याची जाणिव
असावी ।१८.४३
पित्याच्या मनातील गोष्ट।
न सांगता जाणणारा
उत्तम पुत्र। आज्ञा
पाळणारा मध्यम। अधम
जो आज्ञा पाळत
नाही।१८.४४
सुखाचे असंख्य विषय
आहेत । ते सर्व असमर्थ
तृप्त होण्यास । जर मनुष्य आसक्त
असेल तर । समाधानी नाही ।१९.१३
उपभोगानेे वासना शांत
होत नसते । जसे आहुतिने
आग वाढते ।
तसे वासना प्रबल
होते । हे लक्षात ठेवा
।१९.१४
मनुष्य कोणाशीही । द्वेषभाव
ठेवत नाही । कोणत्याही वस्तुवर क्रोध नाही
। तेव्हा तो
समदर्शी होऊन सुखी
होतो ।१९.१५
विषयांची भूक । हेच दुःखाचे
उगमस्थान । शरीर झीजते तरी
वाढते भूक । म्हणून विषयवासना
कमी करा ।१९.१६
आई शेजारी बसू
नये । मुलगी
बहिणी शेजारी बसू
नये । एकांतामध्ये
बसू नये । कारण निर्माण
होते कामवासना ।१९.१७
पुन्हा जन्ममरणाच्या चिंतनाने । होतोे
आत्मनाश भोग भोगण्याने
। हे समजते
आत्मज्ञानाने । त्याचीच
जिज्ञासा ।१९.२०
मनुष्यजन्मासाठी माता निमीत्त
। पित्याचेच खरे कर्तृत्व
। कारण तोच
अपत्याच्या रूपात उत्पन्न
। होत असतो
।२०.२१
माया हे जन्म
मृत्युचे कारण । त्याची कृपा
हे आत्मज्ञान । जे वेगळे करते
मायेपासून । म्हणून
जिज्ञासा पाहिजे ।२४.५८
स्कंध ।।१०।।
श्रीहरि कथा विचारणारा
। सांगणारा ऐकणारा ।
तिघेही पवित्र होतात
। जसे गंगाजल
शालीग्रामाच्या चरणामृताने ।१.१६
भेददृष्टिने शोक हर्ष
द्वेष लोभ। मनुष्य
अंध होतो कारण
अहंकार । त्यामुळे
त्यास । श्रीहरि-लीला
समजत नाही ।४.२७
संस्काराने गर्भ शुध्दी
होते । शुभमुहूर्ताने
भूमीची शरीराची स्नानाने । वस्त्राची प्रक्षालनाने । तपस्येने
इंद्रिय शुध्दी ।५.४
यज्ञाने ब्राह्मण शुध्दी होते
।
दान््ााने धनाची मनाची
संतोषाने । आत्म-शुध्दी
आत्मज्ञानाने । होते आचरण
करावे ।५.४
विषयसुख भोगतो ।
अहंकाराने भ्रष्ट होतो
। कारण विषयामध्ये
अधर्म असतो । कामवासना
जुगार दारू ने
धुंद ।१०.८
शरीर आहे साधारण
। प्रकृतीपासून तयार होऊन
। नष्ट होते
त्यातच । त्या शरीराला आत्मा मानणे
मूर्खपणा ।१०.१२
साधुसंग दरिद्रीस आहे सुलभ
। कारण वासना
नसतात । परिस्थितीमुळे
नाही भोग । अंतःकरण शुध्द सत्संगाने
।१०.१७
ज्याची बुध्दि समदर्शि
आहे । हृदय श्रीहरिस समर्पित आहे । त्यांच्या दर्शनाने । दर्शकाची
कर्म बंधने नष्ट
होतात ।१०.४१
ब्रह्मदेवास सर्वज्ञान आहे । तरी ज्ञान
नाही श्रीहरिच्या स्वरूपाचे । ते अनाकलनीय आहे । इंद्रियातीत गुणातीत ।१३.५७
मनुष्य आत्म्यावर प्रेम करतो
। स्त्री अपत्य
ऐश्वर्यावर प्रेम करतो
। कारण त्यास
ते प्रिय आहे
। जाणावा मतितार्थ
।१४.५०
आत्मा परमात्म्याचा अंश । या विश्वामध्ये
सर्वत्र त्याचा अंश
। काहीही नाही
त्याच्या शिवाय ।
परमसत्य जाणावे ।१४.५६
उन्हाने जमिन वाळते
। आणि पावसाने
हीरवीगार होते । तसे तपस्येने
शरीर झिजते ।
आत्मज्ञानाने होते धष्टपुष्ट
।२०.७
श्रीकृष्णाच्या लिला असंख्य
आहेत । वृंदावनवासी
तन्मय होतात ।
डोळे भरून येतात
। धन्य ते
वृंदावनवासी ।२१.२०
ज्याने सर्वस्व श्रीहरिला दिले । त्याला विषयसुखाची
इच्छा नसते । जसे बीज
भाजलेले । कधीच अंकुरणार नाही ।२२.२६
कर्मानुसार जन्माला येतो । कर्मानेच मरतो । जन्मभर कर्मानुसार
भोग भोगतो ।
म्हणून कर्माचा परिणाम जाणावा
।२४.१३
विवाहित पतिस सोडून
। दुसयांची सेवा करणाया
स्त्रीस । शांती नाही
मिळत । तसे श्रीहरिशिवाय शांती नाही
।२४.१९
ऐश्वर्याच्या अहंकाराने । अंध आहे तो मस्तीने सुस्त आहे
। त्यास कालगतीचे
विस्मरण होते । मरणाचे भान
नाही ।२७.१६
प्रेम केले तर
प्रेम करतो । तो केवळ
स्वार्थी असतो । त्यामध्ये काहीच धर्म
नसतो । नाही निरपेक्ष प्रेम आपूलकी
।३२.१७
प्रेम केले नाही
तरी प्रेम करतो
। स्वभावाने करूणाशील असतो । त्याच्या वागणूक सत्य
असते । हे प्रेम निस्वार्थ
।३२.१८
श्रीहरिची व भक्तांची
भेट । हा केवळ योगायोग
। तो प्रेम-ऋण
नाही फेडत । भक्तांचे ऋणी ही श्रीहरीची पसंती ।३२.२२
श्रीहरी कधीकधी धर्माचे
उल्लंघन । करून देखील निदर्ोष
। कारण स्वार्थ
नाही कोणताच ।
तो निर्विकार आहे ।३३.३०
जसे अग्निमध्ये सर्व भस्म
होते । अग्नि
त्यांचा गुण घेत
नसते । तसे श्रीहरिचे कार्य असते
। सर्वदा दोषमुक्त
।३३.३०
ज्यात सामर्थ्य नसते । त्याने विचार
सुध्दा करू नये
। प्रयत्न करणे दूर
राहिले । केलेच
तर सर्वनाश होतो ।३३.३१
कोणी मूूर्ख प्रयत्न
करील । तर त्याचा नक्कीच
विनाश । शंकराने
विष केले प्राशन
। दुसयाने घेतले तर
मृत्यु ।३३.३१
श्रीहरी अहंकारहीन आहे । त्याच्या कार्यामध्ये । स्वार्थ
नाही नुकसान नसते
। निर्विकार निर्लेप आहे श्रीहरी
।३३.३३
निरपेक्ष कर्म करावे
। फळासाठी समभाव सोडू
नये । प्रयत्न
सोडू नये । फळ प्रयत्नाने
नाही दैवी प्रेरणेने
मिलते ।३६.३८
माता पिता शरीरास
जन्म देऊन । लालन पालन
करतात । म्हणूनच
हे मनुष्यशरीर । मोक्षाची
प्राप्ती करू शकते
।४५.५
एकाच देहाशी आसक्ति
नाही । म्हणून
श्रीहरिस कोणी अप्रिय
नाही । त्यास
कोणी परके नाही
। सर्वजण समान
।४६.३७
इंद्रियांचे विषय स्वप्नवत
आहेत । जसे आत्मज्ञान झाल्यानंतर । परमसत्याचा
अनुभव । म्हणून
त्याग विषयांचा ।४७.३२
विरह प्रेम निरपेक्ष
असते । सहवासातील
प्रेमात अपेक्षा असते । त्यामध्ये आसक्ति असते
। प्रेम करावे
निस्वार्थ ।४७.३५
जो भक्त नाही
। त्याने कितीही
प्रयत्न केला तरी
। मन व्यापक
केले तरी । कमी नाही
होत त्याची वासना
।५१.६१
श्रीहरी सोडून ।
रमतो दुःखरूप तुच्छ विषयात
। तो अमृत
सोडून पित आहे
विष । असा तो केवळ
मूर्ख आहे ।६३.४२
इंद्रियावर नियंत्रण नाही । मनावर नियंत्रण
नाही। तो श्रीहरिचा
होऊ शकत नाही
। म्हणून मनाचा
संयम करावा ।७२.१०
देहाची आसक्ति सोडावी
। नित्य धर्मानुष्ठाने
करावी । दृढश्रध्देने
उपासना करावी ।
आत्म्यामध्ये रमबाण व्हावे
।७३.२३
गाढ झोपेमध्ये शरीराचे । मनुष्याला
भान नसते । तसे श्रीहरिप्राप्ती नंतर शरीराचे
। भक्ताला भान रहात
नाही ।८७.५०
स्कंध ।।११।।
परमात्म्याचे वर्णन केले
जाते । तो प्रत्यक्ष आहे । सर्वत्र चैतन्यरूपाने आहे । सर्वांना स्फुर्ती जीवनदान देणारा ।१२.१७
परमेश्श्वर प्राणरूपानेे हृदयी आहे
। बोलणे करणे
पहाणे । ऐकणे स्पर्शणे विचार करणे
। सर्व क्रिया
तोच करतो ।१२.१९
पेरलेले बी फांद्या
फळ-फुलाने । बहरते
कालांतराने । तसे त्रिगुणी प्रकृतीमुळे । एक परमेश्वर अनेकांत प्रगटतो ।१२.२०
सूताशिवाय वस्त्र नाही।परंतु
सूत आहे वस्त्र
नाही तरी । तसे श्रीहरिशिवाय
विश्व नाही । विश्वाच्या आधी श्रीहरी
।१२.२१
सत्वगुण वाढवितो । तो सर्वात श्रेष्ठ
असतो । तो धर्म रज-तमोगुण
नष्ट करतो । त्यामुळे नाश होतो
अधर्माचा ।१३.३
वेळ शास्त्र पाणी समाज
प्रदेश । कर्म जन्म ध्यान
मंत्र संस्कार । या दहा गोष्टी
सात्विक । तरच सत्वगुण वृध्दि ।१३.४
ज्याची योगीजन ।
प्रशंसा करतात ते
सात्विक । निंदा
करतात ते तामसिक
। तिरस्कार करतात ते
राजसिक आहे ।१३.५
सत्वगुण वाढीसाठी । सात्विक
शास्त्राची उपासना करावी
। त्याने धर्माची
होते वृध्दि ।
आत्मज्ञान शुध्द अंतःकरणी
।१३.६
जोपर्यंत सर्वत्र सत्यभाव । प्रतीत
होत नाही तोपर्यंत
। अज्ञानी अहंकारी मनुष्य ।
जागेपणी आहे झोपलेला
।१३.३०
परमसत्याचे आकलन । प्रत्येकास स्वभावानुसार । तो सत्व-रज-तम गुणानुसार । म्हणून
साधनमार्गात भिन्नता ।१४.७
सोने अग्निमध्ये शुध्द होते
। तसे भक्तियोगाने
आत्मज्ञान होते । अंतःकरण निर्मळ होते
। तेव्हा श्रीहरि
भेटतो ।१४.२५
ज्यामुळे भक्ति होते
तो धर्म आहे
। ज्ञान जे
आत्मज्ञान घडविते ।
विषय त्याग हे
वैराग्य आहे । अभ्यास करावा
।१९.२७
इच्छात्याग हा संन्यास
। धर्म हे
मनुष्यांचे धन । विद्या जी
संपविते माझे-तुझे भेद । लाज म्हणजे
पापाची उपेक्षा।१९.४०
भोगाची इच्छा होणे
। हेच दुःखाचे
मूळ कारण आहे
। सुख-दुःख नसणे हे
सुख आहे । याचा अभ्यास
करावा ।१९.४१
मोक्ष आणि कर्मबंधनाचे
। तत्त्वज्ञान जाणतो तो
पंडीत आहे । देहासक्त जो करतो
मी-माझे । तो केवळ आहे
मूर्ख ।१९.४२
जो मार्ग महामायेस
करतो निवृत्त । तो कल्याणकारी शाश्वत ।
जो आसक्तिमध्ये करतो प्रवृत्त
। तो आत्मघातकी
।१९.४३
मनुष्याच्या कल्याणाचे उपदेश ।
स्वभावानुसार तीन प्रकार
। ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग । श्रीहरिने
सांगितलेले।२०.६
कर्मफळात विरक्त त्याचा
ज्ञानमार्ग । जो विरक्त नाही
त्याचा कर्ममार्ग । आणि भक्तिमार्ग । विरक्त
आसक्त नाही ।२०.७
पित्यास पुत्राच्या जन्माने । पुत्रास
पित्याच्या मृत्युने । आपल्या
जन्ममरणाचे स्मरण करावे
। देह नाशिवंत
असतो ।२२.४८
परमात्म्याची दोन रूपे
आहेत । प्रकृति
कार्यशक्ति मायास्वरूप । दुसरे
आहे पुरूष ।
प्रत्यक्ष परमात्मा ज्ञानस्वरूप ।२४.४
प्रकृतिचे तीन गुण।
सत्व रज आणि तम । या त्रिगुणानेच
बनतो मनुष्यस्वभाव । त्याची ओळख
होऊ शकते ।२५.१
सत्वगुण स्वभाव ।
मनाचा संयम सहिष्णुता
इंद्रियनिग्रह । विवेक
तप सत्य दया
संतोष । त्याग
श्रध्दा नम्रता स्मृति
।२५.२
रजोगुण स्वभाव ।
इच्छा प्रयत्न गर्व असंतोष
।भेदबुध्दि भोग इच्छा
उत्साह हास्य पराक्रम।कर्मकांड
ध्यास वैभवाचा ।२५.३
तमोगुण स्वभाव ।
लोभ व्यर्थ गप्पा
हिंसा क्रोध ।
याचना कलह दिनता
निद्रा मोह । आशा भय ढोंग आळशीपणा
।२५.४
सत्वगुण निर्मल शांत
आहे। रज-तमोगुणा पेक्षा वरचढ
होतो । तेव्हा
धर्मज्ञान प्राप्त होते । म्हणून तो
वाढवावा ।२५.१३
रजोगुण भेदबुध्दिचे कारण आहे
। सत्व-तमोगुणा पेक्षा वरचढ
होतो । तेव्हा
यश वैभव मिळते
। तरी कमी
करावा ।२५.१४
तमोगुण अज्ञान आहे
। सत्व-रजोेगुणा पेक्षा वरचढ
होतो । तेव्हा
हिंसाचार होतो । म्हणून तमोगुण
नसावा ।२५.१५
आत्मज्ञान सात्विक आहे । त्याला कर्ता
समजणे राजस आहे
। शरीर समजणे
तामस आहे । पुर्ण विचार
करावा ।२५.२४
श्रीहरिप्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे
। सर्व प्राणिमात्रांमध्ये
। श्रध्दायुक्त काया वाचा
मनाने । त्याचे
आधिष्ठान मानणे ।२९.१९
हाच भागवत धर्म
आहे । जो सांगितलेला स्वतः श्रीहरिने
। अचूक निष्काम
सर्वोत्तम आहे । केवळ परमभक्तांसाठी
।२९.२०
स्कंध ।।१२।।
घोर कलियुगामध्ये उत्तरोत्तर । धर्म पवित्रता क्षमा दया
सत्य । शक्ति
स्मरणशक्ति आयुष्य ।
यांचा हास होत
राहील ।२.१
श्रीमंत सदगुणी भूषवतील
। कुळाचारी सदाचारी मानू लागतील
।
शक्तिवान म्हणेल तो
न्याय । विपरित
घडेल ।२.२
व्यवहार-कौशल्य सचोटीत नसेल
। ईमानदारी संपेल। जो
जितकी बेईमानी करेल । तितका कुशल
मानला जाईल ।२.३
कर्मठ कर्मकांड वाढविल ।
तो महान प्रसिध्दि
पावेल । विवाहसंस्कार
नसतील । कपडे बदलणे हेच
स्नान असेल ।२.५
पोट भरणे हेच
जीवन ध्येय ।
कुटुंबाचे पालन पोषण।
प्रसिध्दीसाठी धर्माचरण । हा मनुष्याचा योग्य पुरूषार्थ
होईल ।२.७
कधी पूर तर कधी दुष्काळ
। कधी कडक
थंडी तर कधी उष्माघात । कधी वादळे भयंकर
। बेजार होईल
प्रजा ।२.१०
अन्न-पाण्याची चिंता वाढेल
। विषम वातावरणाने
रोगराई वाढेल ।
आयुष्य तीस वर्षांपर्यंत
। हा प्रभाव
कलियुगाचा ।२.११
वर्ण-आश्रम नष्ट होतील
। वेदाचे आचरण
नष्ट होईल । धर्माचरणात ढोंगीपणा वाढेल ।
पापकर्माचे आचरण सर्वत्र
।२.१२
ब्रह्मचर्याचे पावित्र्य संपेल ।
गृहस्थाश्रमी वैभवाची प्रतिष्ठा वाढेल ।
वानप्रस्थाश्रम नसेल । लोभी होतील
संन्यासी ।२.१४
मनुष्य-स्वभाव पशू समान
होईल । केवळ विषय-भोगामध्ये रमतील ।
स्थिती असह्य होईल
। अवतार होईल
तेव्हा ।२.१६
विषय-भोगाने मतिमंद होईल
। अज्ञानाने अंध होतील
।
क्षणभंगुर शरीरावर विश्वास ठेवतील ।
आत्मघात त्यामुळे ।३.२
असत्य कपट हिंसा
मतभेद । भय दीनता
आणि मोह । यांचे प्रमाण
खूप वाढेल ।
तेव्हा घोर कलियुग
समजणे ।३.३०
ढोंगी शास्त्रार्थ लावतील ।
मतलबानुसार । त्यामुळे
शास्त्रे होतील कलंकित
। पिळवणूक करतील राज्यकर्ते
।३.३२
ढोंग्यांंची प्रतिष्ठा वाढेल ।
कर्मकांडाचे स्तोम माजेल
। भक्तिमध्ये अपेक्षा येईल । त्यामुळे श्रीहरिपासून परावृत्त ।३.४३
मरणकाळ आला आहे
। त्याने श्रीहरिचेच
ध्यान करावे ।
श्रीहरिचे भक्तांवर प्रेम असते
। भक्त हरिस्वरूप
होतात ।३.५०
कलियुगात असंख्य दोष
। अहंकार वाढवितात
। तरी एक आहे चांगला
गुण । केवळ नामस्मरणाने मुक्ती शक्य
।३.५१
जेव्हा मनुष्य अहंकार
सोडतो । विवेकाने
सत्य असत्य जाणतो
। मायेचे बंधन
तोडतो । तेव्हा
स्थिर स्वरूपामध्ये ।४.३४
हा भवसागर पार
करण्याची । तीव्र
इच्छा आहे ज्याची
। त्याने श्रीहरी
कथा ऐकावी ।
हेच एकमेव साधन
आहे ।४.४०
एका बीपासून एक वृक्ष
। त्या पासून
अनेक वृक्ष ।
निर्माण होत असतात
। तसेच एका
शरीरा पासून असंख्य
शरीरे ।५.३
अग्नि इंधनापासून वेगळा ।
तसे आत्मा देहापासून
वेगळा । तो परमात्म्याचा अंश जाणावा
। हेच परमसत्य
आहे ।५.३
आत्मा हेच शरीर
मानणे । भौतिक
सुखाची इच्छा करणे
। महामायेस सत्य समजणे
। हे सर्व
मनाचे खेळ आहेत
।५.६
जसे ज्योत विझली
तरी । तेजस्विता
नाश पावत नाही
। तसे विश्वाचा
प्रलय झाला तरी
। आत्मा आहे
अविनाशी ।५.८
मनुष्याचे अज्ञान नष्ट
होते । तेव्हा
एकात्मता होते । आत्मज्ञानाची अनुभूती येते । एकचित्ताने श्रवण त्यासाठी
।६.७
भागवतामध्ये ब्रह्मतत्त्वाचे वर्णन ।
त्याच्या अनुभूतीचे वर्णन ।
साधनांचे वर्णन ।
श्रीहरिने स्वतः केले
आहे ।१२.४
ज्या साहित्यात नाममाहात्म्य नाही । ते अलंकारयुक्त
भावपुर्ण असले तरी
। परिपुर्ण नाही । केवळ निरर्थक
आहे ।१२.४८
कर्म अर्पण केले
नाही । ते सत्कर्म असले तरी
। समाधान होणार
नाही । त्याने
दुःख यातना होणार
।१२.५२
भागवत आचरणाने । ब्राह्मणास
ज्ञान क्षत्रियास राज्य मिळते
। वैश्यास वैभव मिळते
। आणि शूद्र
होतात पापमुक्त ।१२.६४
श्रीहरिकथा अनेक पुराणात
। परंतु भागवतामध्ये
प्रत्येक प्रसंगात । आत्मज्ञानाचा
उपदेश । परमसत्य
सांगतो ।१२.६५
भागवत उपनिषदांचे सार । जो मनुष्य
करी याचा अभ्यास
। त्यास इतर
पुराणे होई निरस
। हा भागवत
महीमा ।१३.१५
जीवनमुक्तीचे अद्वितीय ज्ञान ।
मायेस जाणूनी दुर्लक्ष
। कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग । निरूपण
योगांच्या एकत्वाचे।१३.१८
श्रीहरिस एकच प्रार्थना।
अविरत कृपावर्षाव करावा ।
जन्मोजन्मी भक्तीभाव दृढ व्हावा
। वंदन नित्य
नामस्मरणाने।१३.२३
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
No comments:
Post a Comment