आयुर्वेद
हे मनुष्याच्या आयुष्याचे अलौकीक शास्त्र
आहे. मनुष्याच्या शरीराचा व सृष्टीचा
संपूर्ण अभ्यास करून
अतिप्राचीन काळापासून हे शास्त्र
प्रगत झालेले आहे.
आयुर्वेदाच्या चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व अष्टांगसंग्रह
या तीन महत्वपुर्ण
ग्रंथांपैकी अष्टांगसंग्रह हा ग्रंथ
प्रथम वाग्भटाने अंदाजे दुसया
शतकामध्ये रचलेला आहे.
या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे आहे
की, चरकसंहिता मुख्यत्वेकरून कायचिकित्सेसाठी प्रसिध्द आहे. तर
सुश्रुतसंहिता शल्यचिकित्साप्रधान आहे. परंतू
अष्टांगसंग्रहात आयुर्वेदाच्या सर्व आठही
पध्दतींचे एकत्रित विवेचन केलेले
आहे. त्यामुळे या एकाच
ग्रंथाचा अभ्यास केला
तरी आयुर्वेदाचे ज्ञान मिळू
शकते. अष्टांगसंग्रहात एकूण १५०
अध्याय असून त्यामध्ये
सूत्रस्थान, शारीरस्थान, निदानस्थान, चिकित्सास्थान, कल्पस्थान, व उत्तरस्थान
अश्या एकूण सहा
प्रकरणांमध्ये स्वस्थवृत्त, द्रव्यगुण, दोषधातुमलविज्ञान, रोगविज्ञान, चिकित्सा-तत्त्वज्ञान, पंचकर्म, शरिरविज्ञान, अरिष्टविज्ञान, रोगनिदान, कायचिकित्सा, पंचकर्मांचे कल्प, कौमारभृत्य,
भूतविद्या, मानसरोग, शालाक्य, शल्य, क्षुद्ररोग,
गुह्यरोग, अगदतंत्र, रसायन वाजीकरण,
इत्यादी विषयांचे मौलीक विचार
स्पष्ट केले आहेत.
या अष्टांगसंग्रहाची इंदू टीका
प्रसिध्द असून त्याचे
मराठी भाषांतर १९७५ साली
प्रसिध्द होऊन त्यास
महाराष्ट्रातील सर्व विद्यापिठांनी
बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून मान्यता
दिलेली आहे. अंदाजे सहाव्या शतकामध्ये दुसया वाग्भटाने
१२० अध्यायांचा अष्टांगहृदय नावाचा ग्रंथ
रचलेला आहे. या
ग्रंथाची रचना करताना
सूत्रे पाठ करता
येतील अशी सोपी
रचना केलेली आहे.
न अति संक्षेप
न अति विस्तार
या धर्तीवर या ग्रंथाची
रचना केली असल्याने
याचा सर्वत्र झपाट्याने प्रसार झाला.
थोडक्यात अष्टांगसंग्रहातील पुषकळसे अनावश्यक विषय वगळून
एक उत्तम लोकोपयोगी
असा अष्टांगहृदय नावाचा ग्रंथ
तयार केला. यामुळेच
या लोकप्रिय अष्टांगहृदयाच्या असंख्य टीका
नंतरच्या काळामध्ये प्रसिध्द झाल्या. त्यामध्ये अरूणदत्त व हेमाद्रि
या प्रामुख्याने सांगता येतील.
इतकेच नव्हे तर
परदेशी भाषांमध्ये सुध्दा याचे
अनुवाद झालेले आहेत. उदा. अष्टांकर--अरबी अनुवाद, वैडूर्यभाष्य--तिबेटी अनुवाद, तर १९४१
मध्ये जर्मन अनुवाद
प्रसिध्द झालेला आहे. आयुर्वेदामध्ये
रोगांचे प्रकार व
उपचार पध्दती यांच्यानुसार
प्रमुख आठ प्रकार
आहेत, तेच अष्टांग
आयुर्वेद म्हणून प्रसिध्द
आहे. शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, कौमारभृत्यतंत्र, कायचिकित्सा, अगदतंत्र, ग्रहचिकित्सा, रसायनतंत्र, व वाजीकरणतंत्र
ही आयुर्वेदाची आठ अंगे
आहेत. १.शल्यतंत्र--शरीराला
पीडा देणाया कोणत्याही
वस्तुला शल्य असे
म्हणतात. शरीरात घुसलेल्या वस्तु बाहेर
काढून टाकणे, जखम
भरून आणणे व त्यामुळे झालेल्या व्रणांची व त्या अनुषंगिक इतर व्याधींची
योग्य चिकित्सा करणाया शास्त्राला
शल्यतंत्र असे म्हणतात.
सुश्रुताने शल्याचे अनेक प्रकार
स्पष्ट केले आहेत.
उदा. गवत, काडी,
दगड, लोखंड, अस्थी,
नख इत्यादी हे सर्व
आंगतुशल्याचे प्रकार आहेत.
ऋग्वेदात सुध्दा शल्यतंत्राचे
स्पष्ट उल्लेख आहेत,
म्हणून शल्यतंत्राची उत्पत्ती ऋग्वेदकालापासून मानावी लागते.
त्यानंतरच्या काळामध्ये
शल्यतंत्राची प्रगती झालेली
नाही. इतकेच नव्हेतर
जवळजवळ या शल्यतंत्राचा
पुर्ण हास झाला.
आजच्या काळामध्ये शल्यतंत्रातील मूलभूत सिध्दांत
नीट समजावून घेऊन त्यानुसार
नवीन शस्त्रकर्माच्या पध्दतींचे संशोधन करणे
अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी आजच्या काळातील
काही साहित्य उपयोगी आहे.
२.शालाक्यतंत्र--शलाका म्हणजे बारीक
लांब सळई अथवा
या आकाराची यंत्रे, याच्या साहाय्याने
ऊर्ध्वजंत्रुगत म्हणजे तोंड,
गळा, कान, नाक
या अवयवांचे परिक्षण व चिकित्सा
केली जाते म्हणून
त्याला शालाक्यतंत्र म्हणतात असे सुश्रुत
संहितेमध्ये सांगितले आहे. या
शालाक्यतंत्राच्या अनेक संहितांचा
उल्लेख निरनिराळ्या शास्त्रपुराणांमध्ये दिसून येतो
परंतू यापैकी पूर्णांशाने
एकही संहिता आज
उपलब्ध नसल्याने शालाक्यतंत्राचे मौलीक ज्ञान
नष्ट झालेले आहे.
तरी या शालाक्यतंत्राचे
संशोधन करण्यासाठी आजच्या काळातील
काही साहित्य उपयोगी आहे.
३.कौमारभृत्यतंत्र--या
आयुर्वेदाच्या शाखेमध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा
विचार केलेला आहे.
लहान मुलांचे पोषण, त्यांची
व्यवस्था, त्यांचे आजार त्यावर
उपचार यांची माहीती
सुश्रुत संहितेमध्ये विस्ताराने सांगितलेली आहे. केवळ
दुध पिणारे, दूध व अन्न खाणारे आणि केवळ अन्न
खाणारे बालक अश्या
तीन प्रकाराने लहान मुलांचे
वर्गीकरण करून प्रत्येक
अवस्थेमध्ये कोणकोणते रोग होऊ
शकतात त्यावर कोणते
उपचार करावेत अशी
संपूर्ण माहीती यामध्ये
दिलेली आहे. या
कौमारभृत्यतंत्राच्या आठ संहिता
निर्माण झाल्याचा उल्लेख शास्त्रपुराणांमध्ये
दिसून येतो परंतू
यापैकी फक्त काश्यपसंहिता
आज सुध्दा उपलब्ध
आहे. तरी या कौमारभृत्यतंत्राचा अभ्यास करण्यासाठी
आजच्या काळातील काही साहित्य
उपयोगी आहे. ४.
कायचिकित्सा--संपूर्ण शरीरामध्ये होणारे ज्वर,
रक्तपित्तदोष, उन्माद, अपस्मार, कुष्ठ, अतिसार
इ. रोगांची चिकित्सा केली जाते
म्हणून त्याला कायचिकित्सा
म्हणतात. काय याचा
अर्थ संपुर्ण शरीर, म्हणून
संपुर्ण शरीरगत रोगांच्या
चिकित्सेला कायचिकित्सा म्हणतात. मनुष्याच्या शरीरातील जठाराग्नी अन्नपचनाचे कार्य करून
शरीराचे पोषण करतो.
हा जठाराग्नी कार्यक्षम ठेवण्यासाठी जी चिकित्सा
केली जाते तीला
कायचिकित्सा म्हणतात.रोग नष्ट करण्यासाठी
जी प्रक्रिया केली जाते
त्याला चिकित्सा म्हणतात. आयुर्वेदामध्ये शरीराचे स्वास्थ व व्याधी
या दोघांचाही विचार केलेला
आहे. वैद्य, औषध,
रोगी व परिचारक
या चार गोष्टी
उत्तम चिकित्सेचे आधारस्तंभ आहेत या
चारही गोष्टी सर्वगुणसंपन्न
असल्या तर चिकित्सा
उत्तम व यशस्वी
होते. शरीरातील दोष आधिक
प्रमाणात असतील तर
ते शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी
उपाय करावे लागतात,
त्याला पंचकर्म चिकित्सा असे म्हणतात.
तसेच शरीरातील दोष कमी
प्रमाणात असतील, किंवा
पंचकर्म चिकित्सा करणे अशक्य
असेल तेव्हा निरनिराळ्या
उपचारांचा वापर करून
दोष बाहेर न
काढता दोषांचे साम्य निर्माण
केले जाते त्याला
शमनचिकित्सा असे म्हणतात.
पंचकर्म ही आयुर्वेदातील
एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. वमन,
विरेचन, बस्ती, नस्य,
व रक्तमोक्ष हे पंचकर्म
चिकित्सेतील उपक्रम आहेत.
या उपक्रमापुर्वी स्नेहन व
स्वेदन असे दोन
उपक्रम करावे लागतात.
त्याला पुर्वकर्म म्हणतात. स्नेहन म्हणजे
तूप, तेल इत्यादी
स्निग्ध पदार्थ पोटातून
घेण्यास व बाहेरून अंगाला चोळून
अशा दोन प्रकारांनी
स्निग्ध पदार्थांचे सेवन करणे.
स्नेहना मुळे दोष
धातूंना चिकटून बसलेले
असतात ते सुटे
होतात.
स्वेदन म्हणजे शरीराला
खूप घाम येण्यासाठी
करावयाचे उपचार होय.
स्वेदनाच्या उष्णतेमुळे दोषांचे विलयन होऊन
ते पातळ होतात
व शरीरातून बाहेर काढण्यास
सोपे होतात. वमन
म्हणजे उलटी घडवून
आणण्याचा उपचार. गाईचे
दूध, उसाचा रस,
जेष्ठमध काढा, त्रिफळाचा
काढा वगैरे पेये
भरपूर प्रमाणात पिण्यास देऊन नंतर
गेळफळाचे चूर्ण देतात.
त्याने उलटी होऊन
सर्व शरीरातील कफ व पित्तदोष निघून जातात.
मुख्यतः कफप्रधान विकारात हा उपाय
केला जातो. विरेचन
म्हणजे जुलाब होण्यासाठी
करावयाचा उपचार. एरंडेल
तेल, कुटकी, निशोत्तर
वगैरे जुलाब होणारी
औषधे देऊन शरीरातील
पित्त, कफ निघून
जातात. मुख्यतः पित्तप्रधान विकारात हा उपाय
केला जातो. बस्ती
म्हणजे गुदद्वारामधून औषधाचे काढे,
तेल वगैरे शरीरात
सोडतात नंतर काही
काळ शरीरामध्ये ही द्रव्ये
राहू दिल्यानंतर दोषाबरोबर शरीराच्या बाहेर पडतात.
मुख्यतः वातप्रधान विकारात हा उपाय
केला जातो. नस्य
म्हणजे कपाळ, मस्तक,
नाक, कान, घसा
वगैरे उर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या
वरील भागामधील विकारात नाकामध्ये औषध टाकून
दोष बाहेर काढण्याचा
उपाय. व रक्तमोक्ष
म्हणजे अशुध्द रक्तवाहीन्यामधून
रक्त काढून टाकणे
किंवा जळवा लावून
रक्त काढणे होय.
रक्तदोषांमुळे होणारे विकार
व डोकेदुखी, चक्कर या
विकारांसाठी हा उपचार
कतात. शमन चिकित्सा
सात प्रकारची आहे. दीपन
म्हणजे जठराग्नीची शक्ती वाढविणारी
औषधे देणे, पाचन
म्हणजे अन्न व आमदोष यांचे
पचन करणारी औषधे
देणे, क्षुधानिग्रह म्हणजे आहार
कमी करणे किंवा
लंघन करणे. तृष्णानिग्रह
म्हणजे तहान लागली
तरी पाणी न पिणे. व्यायाम
म्हणजे श्रमाची कामे, हिंडणे
किंवा योगासने जोर, बैठका
यासारखा व्यायाम करणे. आतपसेवा
म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा चिकित्सेसाठी उपयोग करून
घेणे. वायुनिग्रह म्हणजे प्राणायाम
करून वायुचा निग्रह
करणे. अश्याप्रकारे या सात शमन उपायांनी
दोषांचे वैषम्य नष्ट
केले जाते. तरी
या कायचिकित्सेचा अभ्यास करण्यासाठी
आजच्या काळातील भरपूर साहित्य
उपयोगी आहे. ५.
अगदतंत्र--शरीरात शिरलेले विष नष्ट
करण्यासाठी जी चिकित्सा
केली जाते त्याला
अगदतंत्र हे नाव सुश्रुुताने दिलेले आहे.
साप, विवीध विषारी
प्राणी, कीटक इत्यादी
चावल्याने किंवा त्यांच्या
संपकर्ाने मनुष्य विषग्रस्त
झाल्यास त्यावर केली
जाणाया चिकित्सेला अगदतंत्र म्हणतात. अथर्ववेदामध्ये निरनिराळ्या विषांनी विविध रोग
उत्पन्न होतात म्हणूनच
निर्विषीकरणासाठी अथर्ववेदामध्ये अनेक मंत्र
उल्लेखित केलेले आहेत.
अथर्ववेदातील श्रौतसूत्र व कौशिकसूत्र
यामध्ये अगदतंत्राची भरपूर माहिती
आहे. महाभारत व ब्रह्मवैवर्त
पुराणांमध्येही अगदतंत्राचा उपयोग केल्याचे
अनेक उल्लेख आहेत.
विष अत्यंत आशुकारी
असल्याने त्याची चिकित्सा
करताना ती त्वरेने
करावी लागते हे
लक्षात घेऊन अष्टांगसंग्रहाने
उत्तरस्थानामध्ये अगदतंत्रासंबंधी अनेक कल्प
व चिकित्सा उपक्रम सांगितलेले
आहेत. या अगदतंत्राचा
अभ्यास करण्यासाठी आजच्या काळातील
काही साहित्य उपयोगी आहे.
६.ग्रहचिकित्सा--विवीध
क्रोधीत देवता, भूत,
पिशाच्च इत्यादींच्या आक्रमणाने पिडीत व्यक्तीचे
कष्ट अथवा त्यांना
झालेले व्याधी दूर
करण्यासाठी जी चिकित्सा
केली जाते त्याला
ग्रहचिकित्सा असे नांव
अष्टांगसंग्रहाने दिलेले आहे.
सुश्रुताने या चिकित्सेला
भूतविद्या असे म्हटले
आहे. आयुर्वेदामध्ये भूतोन्माद, अमानुष उपसर्ग
व बालग्रहांचे विस्तारपुर्वक केले आहे.
या सर्वांचा समावेश भूतविद्या
किंवा ग्रहचिकित्सा यामध्ये होतो. आयुर्वेदाने
भूतविद्या किंवा ग्रहचिकित्सेला
प्रत्यक्ष न दिसणारे
विकार या दृष्टीकोनातून
समजून घेतले आहे.
आणि म्हणूनच मनाचा सत्त्वगुण
वाढविण्यासाठी यामध्ये प्राधान्याने प्रयत्न केले जातात.
७. रसायनतंत्र--तारूण्यावस्था दीर्घकाळ टिकविण्यासाठी तसेच आयुष्य
व बल यांची
वृध्दी करण्यासाठी आणि शरीराची
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी
जी चिकित्सा केली जाते
त्याला रसायनतंत्र म्हणतात. निरनिराळी औषधे, आहार
व विहार या
तीनही प्रकारांनी रसायन चिकित्सा
करता येते. या
चिकित्सेने शरीरातील रसरक्तादी धातूंची उत्तम निर्मिती
होते. रसायन चिकित्सेने
मनुष्याचे म्हातारपण व म्ह्तारपणामध्ये
उद्भवणारे रोग नष्ट
करता येतात. तरी
या रसायनतंत्राचा अभ्यास करण्यासाठी
आजच्या काळातील काहीही साहित्य
उपलब्ध नाही. ८.
वाजीकरणतंत्र--मैथुनशक्ती वाढविण्यासाठी आणि वीर्यवृध्दी
करण्यासाठी ज्या चिकित्सेचा
उपयोग केला जातो
त्याला वाजीकरणतंत्र म्हणतात. ज्यांचे वीर्य दूषीत
झालेले असते अथवा
जे क्षीणवीर्य असतात त्यांनाही
या चिकित्सेने फायदा मिळतो.
प्रामुख्याने शुक्रवर्धक आहार-विहार याचा विचार
या वाजीकरणतंत्रामध्ये केला जातो.
स्निग्ध व गोड पदार्थ उत्तम
शुक्रवर्धक आहेत म्हणून
लग्नामध्ये, केळवणामध्ये गोड पदार्थांचा
वापर करण्याची पध्दत रूढ
झालेली आहे. अश्वगंधा,
शतावरी, तालीमखाना, कवचबीज अशी
नानाविध औषधे या
वाजीकरणतंत्रामध्ये समाविष्ट आहेत.
अशा रितीने अष्टांग
आयुर्वेदाचा अभ्यास करून
आयुर्वेदाचे अलौकिक वैद्यकीय
ज्ञान मिळविणे आज आपणा
सर्वांना हितकर, कल्याणकारी
असून सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने अत्यंत आचरणीय
आहे. त्यामुळे आज भेडसावणारे
भयंकर रोग आपल्याला
बाधू शकणार नाही.
No comments:
Post a Comment