एके दिवशी नारदमुनींचे युधिष्ठिराच्या महालामध्ये आगमन झाले. नारदमुनी महान तपस्वी, वेदांतशास्त्राचे
जाणकार, सर्व विद्यांचे पंडीत, ब्रह्मतेजाने
संपन्न, नितीज्ञ असून त्यांना परमात्मा ज्ञान प्राप्त होते. त्यांचे देवता, दानव व मनुष्य असे सर्वजण
स्वागत करीत असे.
ते निरंतर भ्रमण करीत असत. नारद पांडवांना
म्हणाले, द्रौपदी तूम्हा सर्वांची एकच पत्नी आहे. म्हणून तूम्ही एक नियम करा की तूमच्यामध्ये कधीही फूट पडु नये. यासंबंधी एक इतिहासातील प्रसंग सांगतो. प्राचीन काळामध्ये सुंद व उपसुंद नावाचे दोन असुर भाऊ होते. ते नेहमी एकत्र रहात होते. त्यांची सर्वत्र ख्याती होती. त्यांचे एक राज्य, एक महाल, एक बिछाना, एक आसन, एकत्र भोजन असे
सर्वकाही एकच होते. असे परस्परांवर अतूट प्रेम असून सुध्दा तिलोत्तमा अप्सरेमुळे दोघांमध्ये युध्द होऊन ते दोघेही मेले. प्राचीन काळामध्ये हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये निकुंभ नावाचा दैत्यराज होऊन गेला. तो तजस्वी व बलवान होता. त्याला दोन महापराक्रमी सुंद व उपसुंद नावाचे दोन पुत्र होते. ते भयंकर क्रूर होते. त्या दोघांचा निश्चय एकच होत असे. एका कार्यासाठी ते दोघे सहमत होत असत. त्यांची सुख-दुःखे सुध्दा एकच असत. ते दोघे नेहमी एकत्र रहात होते. त्या दोघांचे एक आसन, एकत्र भोजन, असे एकमेकांचे अतूट प्रेम होते. जणुकाय एकच आत्मा दोन शरीरांमध्ये
होता. एकदा त्यांनी तीन्ही लोकांवर विजय मिळविण्यासाठी विंध्य पर्वतावर कठोर तपस्या केली. त्यांची उग्र तपस्येने देवता भयभीत झाले. देवतांनी त्यांची तपस्या भंग करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतू ते निष्फळ झाले. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न होऊन वर दिला सुंद व उपसुंद दोघांस मायेचे ज्ञान, अस्त्र शस्त्रांमध्ये
निपूणता, इच्छेनुसार
रूप धारण आणि अमरत्व हे सर्व काही प्राप्त होईल. अमरत्व सोडून इतर सर्वकाही तूम्हास प्राप्त होईल. तुमच्या
इच्छेनुसार
तुम्हां दोघांपैकी एक दूस-याकडूनच तुमचा मृत्यु होईल. इतर कोणाकडूनही तुमचा मृत्यु होणार नाही.
ब्रह्मदे तथास्तु म्हणून त्यांना वर दिला. वरदान मिळाल्यानंतर ते दोघे मौज-मजा करू लागले. एकदा सुंद व उपसुंद यांनी पाताळ पृथ्वी व स्वर्ग अशा तिन्ही लोकांवर आपला आधिकार प्रस्थापित केला. देवतांचा, ब्राह्मणांचा, ऋषी-मुनींचा नागलोकांचा
छळ करण्यास सूरवात केली. देवतांचा, ब्राह्मणांचा, ऋषी-मुनींचा नागलोकांच्या
धर्मकार्यात
विघ्न उत्पन्न करू लागले. त्यांच्या उन्मत्तपणाचा अतिरेक झाला. सुंद व उपसुंद यांनी
केलेल्या हत्याकांडानंतर देवता, ब्राह्मण, ऋषी-मुनीं, नागलोक सर्वजण दुःखी झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने एक सौदर्यवान स्त्री उत्पन्न करण्यास सांगितले. विश्वकर्म्याने एक दिव्य स्त्री निर्माण केली. ती तिन्ही लोकांमध्ये अनुपम होती. ती कामरूपीणी होती. ब्रह्मदेवाने तीचे नाव तिलोत्तमा ठेवले. तीला सुंद व उपसुंद कडे जाण्यास सांगितले. आपल्या रूपसामर्थ्याने सुंद व उपसुंद यांच्यामध्ये विरोध उत्पन्न करण्यास सांगितले. तिलोत्तमेने ब्रह्मदेवास प्रदक्षिणा घालून आशीर्वाद घेऊन सुंद व उपसुंद यांच्या कडे गेली. सुंद व उपसुंद यांनी पाताळ पृथ्वी व स्वर्ग अशा तिन्ही लोकांवरची सर्व सर्वोत्तम रत्ने, हिरे, सुगंधी-दर्व्ये, भोजन पदार्थ, सुंदर स्त्रीया यांचा ते दोघे उपभोग घेऊ लागले. एकदा विंध्य पर्वतावर फुलांनी बहरलेल्या उपवनामध्ये
ते दोघे सुंदर स्त्रीयां समवेत विहार करीत असताना त्याच वनामध्ये तिलोत्तमा फुले घेण्यासाठी आली. मनुष्यास उन्मत्त होण्यास पूरक असे तीचे रूप-सौंदर्य होते. फुलांचा गुच्छ करून ती सुंद व उपसुंद यांच्या जवळ गेली. त्या दोघांनी मादक रस पिलेला होता. त्या नशेमुळे डोळे लाल झालेले
होते. तिलोत्तमेला पहाताच दोघेही कामातूर झाले. सुंदाने तीचा उजवा हात पकडला तर उपसुंदाने तीचा डावा हात पकडला. तिलोत्तमा आपल्या नयनरम्य डोळ्याने दोघांनाही आकृष्ट करीत होती. तीचा सुगंध, आभूषण व रूप-सौंदर्य यामुळे दोघेजण तात्काळ मोहीत झाले. सुंद उपसुंदास म्हणाला, अरे ही माझी पत्नी. तूला माते समान आहे. तर उपसुंद
म्हणाला नाही नाही ही माझीच आहे. तूला ती पुत्रवधुसमान. तूझी नाही ही माझी आहे असे म्हणता म्हणता त्यांचा क्रोध वाढू लागला. मादक नशेमुळे त्यांचे परस्पर प्रेम संपले. तिलोत्तमेला प्राप्त करण्यासाठी दोघांनीही गदा घेऊन युध्द सुरू केले. त्यामध्येच दोघांचा अंत झाला. पांडवांनो, अशा प्रकारे त्या महापराक्रमी दैत्यांचा अंत तिलोत्तमेमुळे झाला. म्हणून माझी तूम्हास विनंती आहे की, तूम्ही एखादा नियम करा की, द्रौपदीमुळे तूम्हा भावंडांमध्ये फूट पडू नये. नारदमुनींच्या समक्ष पांडवांनी नियम केला. आमच्या पैकी प्रत्येकाच्या घरी द्रौपदी एक-एक वर्ष निवास करेल. द्रौपदी समवेत एकांतामध्ये
असलेल्या भावास कोणीही पाहील्यास त्या भावाला बारा वर्षे ब्रह्मचर्य पालन करून वनवास घ्यावा
लागेल. म्हणून पांडव नियमानुसार द्रौपदीसमवेत गुण्यागोविंदाने सूखी होते.
No comments:
Post a Comment