Being
circulated to all over India
To
The President of India, (vide PRSEC/E/2019/20912)
New Delhi
Sub. --
CONSTITUTION OF INDIA
विषय—संविधानानुसार प्रत्येक
नागरिकांच्या मूलभूत कर्त्यव्यांचे महाराष्ट्रभर
प्रबोधन करणे
आजच्या सर्व समस्यांचे
निराकरण करण्यासाठी संविधानानुसार प्रत्येक भारतिय नागरिकांच्या मूलभूत कर्त्यव्यांचे
पालन करण्यासाठी संविधान प्रबोधन अभियान सुरू केलेले आहे.
तरी आपल्या स्तरावर सर्व
नागरिकांचे खालील प्रमाणे प्रबोधन करण्याची इच्छा आहे, त्यासाठी नियोजन करून कळवावे ही विनंती.
संविधाना नुसार नागरिकांची
मूल कर्तव्ये (भाग चार-क ५१क )
(क)संविधानाचे पालन करणे
आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ;
(ख)ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय
लढ्यास स्फृर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे ;
(ग)भारताची सार्वभौमता,
एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण
करणे ;
(घ)देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे;
(ङ)धार्मिक, भाषिक व प्रादेशिक
किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाउन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला
लावणे; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे ;
(च)आपल्या संमिश्र संस्कृतीच्या
समृध्द वारशाचे मोल जाणून तो जतन करणे;
(छ)वने, सरोवरे, नद्या
व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा आणि प्राणिमात्रांबद्दल
दयाबुध्दी बाळगणे ;
(ज)विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुध्दी व सुधारणावाद
यांचा विकास करणे ;
(झ)सार्वजानिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ;
(ञ)राष्ट्र सातत्याने,
उपक्रम व सिध्दी यांच्या चढत्या श्रेणी गाठत अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या
सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे ;
(ट)मातापित्याने किंवा
पालकाने सहा ते चौदा वर्षां दरम्यानचे आपले अपत्य
किंवा, यथास्थिती, पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे ;
संविधानानुसार(भाग ४ कलम ३८-५१)
कायदे करताना राज्य धोरणांची निदेशक तत्वे लागू करणे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्य आहे.
आमदार सत्ताधारी पक्षातील मंत्री असेल तर त्याने या सर्व कर्तव्यांचे पालन केले पहिजे.
आमदार सत्ताधारी पक्षामध्ये असेल तर त्याने या सर्व कर्तव्यांचे पालन करण्यासाठी मंत्र्यांना प्रवृत्त केले पहिजे.
आमदार विरोधी पक्षामध्ये असेल तर त्याने या सर्व कर्तव्यांचे पालन करण्यास मंत्र्यांना सहकार्य केले पहिजे.
तसेच या सर्व कर्तव्यांचे पालन न करण्या-या मंत्र्यांना विरोध केला पहिजे.
कलम ३८.(१)नुसार राज्य सरकारने परिणामकारक रीतीने,
सामाजिक,
आर्थिक व राजकिय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित केली पाहीजे.
कलम ३८.(२)नुसार विशेषत:
केवळ व्यक्ती-व्यक्तींमध्येच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये राहणा-या किंवा निरनिराळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसमुहांमध्ये देखील,
उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहीजेत.
कलम४०.नुसार राज्य सरकारने ग्रामपंचायती संघटीत करण्यासाठी उपाय योजना करून त्यांना स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार बहाल केले पाहिजेत.
कलम४१.
नुसार राज्य सरकारने आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादित कामाचा व शिक्षणाचा हक्क आणि बेकारी,
वार्धक्य,
आजार व विकलांगता यांनी पिडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहिहि अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद केली पाहिजे.
कलम४३.नुसार राज्य सरकारने अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शेतकी,
औद्योगिक अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना काम,
निर्वाह वेतन,
समुचित जिवनमान आणि फुरसतीचा आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि विशेषत:
ग्रामिण क्षेत्रामध्ये वैयक्तीक किंवा सहकारी तत्त्वावर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे.
कलम४३ क.नुसार राज्य सरकारने कोणत्याही उद्योगधंद्यात गुंतलेले उपक्रम,
आस्थापना किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी,
अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाययोजना केली पाहिजे.
कलम४५.नुसार राज्य सरकारने बालकांसाठी,
त्यांच्या वयाची ६ सर्व वर्षे पूर्ण होई पर्यंत,
प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करण्या करिता प्रयत्न केला पाहिजे.
कलम४६.नुसार राज्य सरकारने जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषत:
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करून आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण केले पाहिजे.
कलम४७.नुसार राज्य सरकारने आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे यास प्राथमिक कर्तव्य मानून आणि विशेषत:
मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे.
कलम४८.नुसार राज्य सरकारने शास्त्रीय पध्दतीने कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे आणि विशेषत:
गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करून त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरिता उपाययोजना केल्या पाहिजेत.
कलम४८ क.नुसार राज्य सरकारने हे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे.
ONLY ONE PATRIOT SWAMI
MOHANDAS IS VERY MUCH eager FOR THE governance of the country as per the
Constitution.
BUT WHO CARES.
01-11-2019